पुणे, दि.१: पर्यटन संचालनालयातर्फे पुणे विभागात पर्यटनाच्यादृष्टीने हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यासाठी हॉटेल मालकांनी अर्ज केले असून ३ आणि ४ ऑगस्ट रोजी पहिली तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
जून २०२१ पासून एकूण १८१ अ-वर्गीकृत हॉटेल मालकांनी केलेल्या अर्जानुसार तपासणी समिती आणि नियुक्त संस्थेतर्फे या हॉटेल्सची पाहणी करण्यात येणार आहे.
औद्योगिक सवलती या अर्जदार हॉटेलच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या तारखेपासून लागू होतील. इच्छुक हॉटेल व्यावसायिकांनी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions या शासन निर्णयातील निकष पुर्तता करुन अर्ज करावे. पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरावा. तसेच अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी इंदिरा ठाकूर यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९८१९६२०४८४, ई-मेल- pro.dot-mh@gov.in वर सपंर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी केले आहे.
000