बंगलोर-: टीव्हीएस मोटरने आपली नवी TVS iQube Electric Scooter तीन वेगवेगळ्या अवतारांमध्ये आणि एकदा चार्ज केल्यावर तब्बल १४० किमीच्या या श्रेणीतील सर्वोत्तम ऑन-रोड रेंजसह बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा आज केली. या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने अनेक इंटेलिजंट कनेक्टेड वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यामध्ये ७ इंची टीएफटी टचस्क्रीन व क्लीन युआय, इन्फिनिटी थीम पर्सनलायजेशन, व्हॉइस असिस्ट आणि TVS iQube Alexa स्किलसेट, इंट्यूटिव्ह म्युझिक प्लेयर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, प्लग अँड प्ले पद्धतीच्या, स्वतःसोबत नेता येईल अशा चार्जरसह वेगवान चार्जिंग, गाडीची स्थिती व सुरक्षा याविषयी सूचना, ब्ल्यूटूथ आणि क्लाऊड कनेक्टिव्हिटीचे वेगवेगळे पर्याय, ३२ लिटर स्टोरेज स्पेस आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
टीव्हीएस मोटरच्या आजवरच्या भक्कम, सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय अभियांत्रिकी क्षमतांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या TVS iQube ला अनेक वेगवेगळ्या चाचण्या घेऊन तयार करण्यात आले आहे, सुस्थापित नेटवर्कचा पाठिंबा, रिलेशनशिप मॅनेजर आणि सर्वसमावेशक डिजिटल इकोसिस्टिमचे बळ TVS iQube च्या पाठीशी आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुदर्शन वेणू यांनी सांगितले, “नवी TVS iQube अभूतपूर्व इंटेलिजंट आणि पर्सनलाइज्ड कनेक्टेड अनुभवासह जागतिक दर्जाचे ईव्ही तंत्रज्ञान प्रस्तुत करण्याची आमच्या वचनबद्धता दर्शवते. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून टीव्हीएस मोटर इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे आणि TVS iQube ने आमच्या हजारो ग्राहकांना अतुलनीय इलेक्ट्रिक रायडींग अनुभव मिळवून दिला आहे. नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज उत्पादनांसह कनेक्टेड मोबिलिटी आणि ईव्हीमध्ये नवे उच्च मापदंड निर्माण करण्याची आपली परंपरा टीव्हीएस मोटर अशीच कायम राखेल.”
टीव्हीएस मोटर कंपनीचे फ्युचर मोबिलिटीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री मनु सक्सेना म्हणाले, “पूर्णपणे नवी आणि अतिशय रोमांचक TVS iQube सीरिज सादर करण्यात आल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या ग्राहकवर्गाच्या निवडीला आता अजून जास्त वाव मिळणार आहे. नव्या TVS iQube सीरिजमध्ये रेंज तर अधिक जास्त आहेच शिवाय चार्जिंगचे अनेक वेगवेगळे पर्याय आहेत, श्रेणीतील सर्वोत्तम डिस्प्ले व युआय पर्याय देखील यामध्ये आहेत. आधुनिक कनेक्टेड वैशिष्ट्ये, ऍप्लिकेशन्स आणि कनेक्टेड ऑन-डिव्हाईस अनुभव यांचा देखील समावेश या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आहे. सखोल आणि तपशीलवार संशोधन व विकास आणि प्रमाणीकरण प्रक्रियेमार्फत आम्ही नवी TVS iQube विकसित केली असून यामध्ये आम्ही टीव्हीएस मोटरचे उच्च गुणवत्ता कायम राखण्याचे वचन अधिक दृढ करण्यात आले आहे. आमचा असा ठाम विश्वास आहे की, आमचे सर्वदूर विस्तारलेले नेटवर्क आणि इकोसिस्टिम यांच्यासह आम्ही ग्राहकांना अतीव समाधान व पुरेपूर भरोसा देऊ शकू.”
TVS iQube सीरिजमध्ये तीन प्रकार, ११ रंग आणि चार्जिंगचे ३ पर्याय यातून ग्राहक आपली निवड ठरवू शकतात.
TVS iQube ST
हे या सीरिजमधील सर्वात वरचे व्हेरियंट आहे. TVS iQube ST मध्ये टीव्हीएस मोटरने डिझाईन केलेला ५.१ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून एकदा चार्ज केल्यावर १४० किमी ऑन-रोड रेंज देण्याची क्षमता यामध्ये आहे.
TVS iQube ST मध्ये अभूतपूर्व इंटेलिजंट राईड कनेक्टिव्हिटी मिळते, यामध्ये ७ इंचांची टीएफटी टच स्क्रीन, ५ पद्धतींनी जॉयस्टिक इंटरॅक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल, गाडीची स्थिती कशी आहे यासह प्रोऍक्टिव नोटिफिकेशन्स, ४जी टेलिमॅटिक्स, ओटीए अपडेट्स या सर्व वैशिष्ट्यांचा लाभ घेता येतो. याशिवाय इंफिनाईट थीम पर्सनलायजेशन, व्हॉइस असिस्ट आणि TVS iQube Alexa स्किलसेट यांचा देखील समावेश या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आहे.
TVS iQube ST मध्ये चार नवीन अल्ट्रा-प्रीमियम रंगांचे पर्याय उपलब्ध असून १.५ केडब्ल्यूएच वेगवान चार्जिंग आणि सीटच्या खाली दोन हेल्मेट मावतील इतकी ३२ लिटरची स्टोरेज जागा देखील आहे.
TVS iQube S
TVS iQube S मध्ये टीव्हीएस मोटरने डिझाईन केलेला ३.४ केडब्ल्यूएच क्षमतेचा बॅटरी पॅक असून एकदा चार्ज केल्यावर १०० किमी ऑन-रोड रेंज देण्याची क्षमता यामध्ये आहे.
TVS iQube S मध्ये ७ इंचांची टीएफटी टच स्क्रीन, इंटरॅक्शनसाठी ५ पद्धतींनी वापरता येईल अशी जॉयस्टिक, म्युझिक कंट्रोल, थीम पर्सनलायजेशन, गाडीची स्थिती कशी आहे यासह प्रोऍक्टिव नोटिफिकेशन्स या वैशिष्ट्यांचा लाभ घेता येतो.
TVS iQube S मध्ये चार नव्या रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
TVS iQube
TVS iQube हे या श्रेणीतील सर्वात खालचे व्हर्जन आहे. TVS iQube मध्ये टीव्हीएस मोटरने डिझाईन केलेली ३.४ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर १०० किमी ऑन-रोड रेंज देण्याची क्षमता यामध्ये आहे. ५ इंचांची टीएफटी स्क्रीन व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट ही वैशिष्ट्ये यामध्ये मिळतात.
TVS iQube हे बेस व्हेरियंट असून देखील यामध्ये रंगांचे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
TVS SMARTXONNECTTM प्लॅटफॉर्ममध्ये अधिक प्रगत नॅव्हिगेशन सिस्टिम, टेलिमॅटिक्स युनिट, अँटी-थेफ्ट आणि जिओफेन्सिंग वैशिष्ट्ये आणून तो अधिक जास्त सुधारित स्वरूपात उपलब्ध आहे.
हे तीनही प्रकार, TVS iQube आणि TVS iQube S यांच्या किमती अनुक्रमे ९८,५६४ रुपये आणि १,०८,६९० रुपये आहेत (ऑन-रोड दिल्ली, यामध्ये एफएएमई आणि स्टेट सबसिडी यांचा समावेश आहे)
TVS iQube ST आणि TVS iQube S मध्ये ९५० वॅट आणि ६५० वॅट क्षमतेच्या प्लग अँड प्ले पद्धतीच्या, सोबत नेता येण्याजोग्या ऑफ बोर्ड चार्जर्सचे पर्याय उपलब्ध असून, चार्जिंगसाठी ३ तास व ४.५ तास वेळ लागतो.
TVS iQube आणि TVS iQube S ची बुकिंग्स आता आमच्या वेबसाईटवर सुरु झाली आहेत. या मॉडेल्सची डिलिव्हरी लगेच सुरु होईल. सध्याच्या आमच्या ३३ शहरांमध्ये या दोन्ही स्कूटर उपलब्ध आहेत आणि अजून ५२ शहरांमध्ये आम्ही लवकरच पोहोचू.