पुणे: भारतातील आघाडीची ई-कॉमर्स बाजारपेठ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या स्नॅपडीलने भारतीय रिटेल उद्योगक्षेत्र या मूल्याबाबत अतिशय जागरूक असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करता याव्यात यासाठी व्यवसाय विस्तार केला आहे.
भारतीय रिटेल क्षेत्र
भारतीय रिटेल क्षेत्राची सध्याची आर्थिक उलाढाल जवळपास ५६ लाख कोटी रुपयांची आहे आणि २०२५ पर्यंत ती १३८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. एकूण रिटेलमध्ये ऑनलाईन खरेदीचे प्रमाण सध्या २% ते ३% आहे आणि २०२५ पर्यंत ते १०% पर्यंत वाढेल. त्यामुळे पुढील ६-७ वर्षात भारतातील ऑनलाईन बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल तब्बल १४ लाख कोटी रुपयांवर पोहोचलेली असेल जी सध्या जवळपास २.८ लाख कोटी रुपयांची आहे.
भारतात फक्त १०% रिटेल बाजारपेठ संघटीत असून उरलेल्या ९०% रिटेल बाजारपेठेला असंघटीत क्षेत्राकडून सेवा पुरविल्या जातात. यामध्ये भारतातील विविध ठिकाणच्या बाजारांचा समावेश आहे. या सर्व बाजारांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळवून देण्यावर स्नॅपडील विशेष भर देत आहे.
मूल्यांबाबत विशेष जागरूक असलेला विभाग म्हणजेच स्थानिक बाजार ऑनलाईन येणे
ई-कॉमर्स ट्रेंड्सबद्दल प्रतिक्रिया देताना स्नॅपडील प्रवक्त्याने सांगितले, “भारतात ई-कॉमर्स सुरु होऊन आता एक दशक उलटून गेले आहे. सुरुवातीला ई-कॉमर्सच्या ग्राहकांमध्ये उच्च उत्पन्न गटातील लोकांची संख्या सर्वाधिक होती. त्यांच्या खरेदीमध्ये देखील मोबाईल फोन, मोठी उपकरणे आणि ब्रँडेड वस्तूंसारख्या महाग उत्पादनांचा समावेश असे.”
त्यांनी पुढे असेही सांगितले, “स्मार्टफोन्स आणि डेटा (इंटरनेट) यांच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असल्याकारणाने भारतातील मध्यम वर्ग देखील मोठ्या संख्येने ऑनलाईन येऊ लागला आहे. या नवीन ४०० मिलियन ऑनलाईन खरेदीदारांच्या मागण्या अतिशय वैविध्यपूर्ण आहेत, त्यांची शहरे, त्यांच्याकडून वापरला जाणारा मीडिया, त्यांच्या भाषा, ऑनलाईन खरेदीचे प्रमाण आणि त्यांचे उत्पन्न यामध्ये देखील खूप वैविध्य आहे. त्यांनी देखील ऑनलाईन खरेदी करण्यास सुरुवात केली असून भारतातील विविध बाजारपेठांमध्ये त्यांना खरेदीमधून जे मूल्य मिळते ते त्यांना ऑनलाईन खरेदीमधून हवे असते.”
बाजारपेठांच्या तुलनेत खरेदीचे पुरेपूर मूल्य देणाऱ्या उत्पादनांचा पुरवठा ऑनलाईन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील विविध बाजारांमधील उत्पादने याठिकाणी उपलब्ध होऊ लागली आहेत. ही बाजारपेठ जवळपास १६३ बिलियन यूएस डॉलर्सची असून यापैकी फक्त १-२% ऑनलाईन उपलब्ध आहेत. मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींसारखी ब्रँडेड उत्पादने ऑनलाईन उपलब्ध असण्याचे प्रमाण १०-४०% इतके जास्त आहे.
विक्रेते: महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्पादने
महाराष्ट्रातील विक्रेत्यांकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये व्यक्तिगत वापराच्या उपकरणांचा, उदाहरणार्थ, ट्रीमर्स, शेवर्स, स्ट्रेटनर्स, ड्रायर्स आणि मल्टी ग्रूमिंग किट्स यांचा समावेश आहे. पैठणी साड्या, मोत्यांच्या आणि रंगीत खड्यांच्या नथी यासारखी पारंपरिक फॅशन उत्पादने देखील लोकप्रिय आहेत.
खण कापडापासून बनविण्यात आलेली कुशन कव्हर्स, टेबल रनर्स, ट्रे, बॉक्सेस हे देखील भारतातील विविध भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात.उपकरणांचे बहुसंख्य विक्रेते भिवंडीमधील असून फॅशन आणि फर्निशिंग्सचे विक्रेते महाराष्ट्राच्या सर्व भागांमधील आहेत.
खरेदीदार ग्राहक: महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्पादने
महाराष्ट्रातील स्नॅपडीलच्या खरेदीदारांमध्ये घड्याळे, डिजिटल गिफ्ट कार्ड्स, वायरलेस ब्ल्यूटुथ इअरफोन्स व फिटनेस ट्रॅकर्स ही उत्पादने सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
लाकडाचे सर्व्हिंग स्पून्स, ब्लेंडर्स, चॉपर्स आणि वॉटर डिस्पेन्सर्स अशा स्वयंपाकघरातील वस्तूंचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
महाराष्ट्रातील महिलांच्या स्नॅपडीलवरील खरेदीमधील सर्वाधिक लोकप्रिय फॅशन ऍक्सेसरी मंगळसूत्र हे आहे.
महाराष्ट्रात एकूण २३०२ पिनकोड्स असून त्यापैकी २२८९ ठिकाणी स्नॅपडीलने आपला व्यवसाय विस्तार केला आहे. नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या ठिकाणांहून सर्वाधिक ऑर्डर्स येतात. कराड, धुळे, सांगली, खामगाव आणि जळगाव या शहरांमधून ऑर्डर्सच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.
स्नॅपडीलवर महाराष्ट्रातून येणाऱ्या दर दहापैकी आठ ऑर्डर्स या राज्यातील मध्यम किंवा छोट्या शहरांमधून असतात.
महाराष्ट्र हे स्नॅपडीलसाठी किती महत्त्वाचे आहे ते सांगताना स्नॅपडीलचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (कॉर्पोरेट अफेअर्स व कम्युनिकेशन्स) श्री. रजनीश वाही यांनी सांगितले, “स्नॅपडीलवर खूप मोठ्या प्रमाणावर, वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातील खरेदीदार मुंबई पुण्यातील लोकांप्रमाणेच त्यांना हवी ती उत्पादने आपापल्या सोयीनुसार आपल्या शहरांमधून खरेदी करू शकतात. भारतातील बाजारपेठा स्नॅपडीलच्या माध्यमातून ऑनलाईन येत आहेत. महाराष्ट्रातील उद्यमशील विक्रेत्यांचा विश्वासाचा प्लॅटफॉर्म म्हणून आमची निवड केली जाते ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”
स्नॅपडीलवरील जवळपास सर्व लिस्टिंग्स लघु उद्योजकांनी आणि भारतातील बाजारपेठांमधील रिटेलर्सनी केलेल्या आहेत. त्यांना भारतातील आणि परदेशातील नवनवीन उत्पादनांची चांगलीच माहिती आहे. त्यांना मूल्य – किमतीचे धोरण खूप चांगले समजते. देशभरात अनेक होलसेल आणि रिटेल बाजारपेठांमध्ये स्पर्धात्मक किमती हा खूप मोठा निकष असून या उद्योजकांना त्याची माहिती आहे.
स्नॅपडीलवरील प्रत्येक उत्पादन हे स्वतंत्र विक्रेत्याकरवी विकले जाते. ते सर्वच जण मध्यम व लघु उद्योजक आहेत. स्नॅपडील एक अधिक चांगला संपूर्ण देशभर पसरलेला बाजार निर्माण करत आहे ज्यामध्ये अधिक जास्त पर्याय, अधिक जास्त डील्स, जास्त सोयीसुविधा आणि ग्राहकांना आपल्याशा वाटतील अशी धोरणे आहेत. स्नॅपडीलमुळे मौजमजेत खरेदी करता येते, भारतातील कोणत्याही बाजारपेठेत खरेदीला गेल्यावर जो आनंद आणि समाधान मिळते ते याठिकाणी मिळते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रॉडक्ट व्हिडीओज आणि इतर टूल्समुळे युजर्सना योग्य निवड करता येते
खरेदीदारांना उत्पादनांच्या विशाल महासागरामधून नेमकी आपल्याला हवी ती आणि हवी तशी वस्तू निवडता यावी यासाठी स्नॅपडीलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग्सचा वापर करून ग्राहकांच्या खरेदी प्रवृत्ती, प्राथमिकता समजून घेतल्या जातात. ग्राहकांच्या आवश्यकतांना अनुसरून, त्यांच्या जवळपास असलेली उत्पादने दाखविली जातात. याठिकाणी प्रॉडक्ट व्हिडिओज देखील असतात ज्यामध्ये उत्पादनांची वैशिष्ट्ये, उपयोग यांची माहिती नसते. सर्वच उत्पादने नावाजलेल्या ब्रॅंड्सची नसतात, ग्राहकांनी ती आधी पहिली असतीलच असे नाही पण प्रॉडक्ट व्हिडिओजमुळे त्यांची माहिती मिळते.
‘स्पिन द व्हील’ आणि ‘स्क्रॅच द कार्ड’ यासारख्या खेळांमुळे युजर्सना अधिक आकर्षक लाभ मिळतात आणि ऑनलाईन खरेदीची अधिकाधिक मजा घेता येते.
स्नॅपडील – भारतातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ
स्नॅपडील ही भारतातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी ५००,००० स्वतंत्र नोंदणीकृत विक्रेते असून त्यांनी २०० मिलियन पेक्षा जास्त वस्तू सादर केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात स्नॅपडीलने ६०,००० पेक्षा जास्त नवीन विक्रेते भागीदार समाविष्ट करून घेतले असून त्यांनी याठिकाणी ५० मिलियन पेक्षा जास्त उत्पादने सादर केली आहेत.
दर महिन्याला ८० मिलियनपेक्षा जास्त युजर्स स्नॅपडीलला भेट देतात आणि याठिकाणी उपलब्ध असलेल्या विशाल, वैविध्यपूर्ण कॅटलॉगमधून खरेदी करतात. ऑक्टोबर २०१९ मध्ये स्नॅपडीलवर २४० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली जी आजवरची सर्वाधिक मोठी विक्रमी संख्या ठरली. भारतातील १०० मिलियनपेक्षा जास्त युजर्सनी स्नॅपडील ऍप डाउनलोड केलेले आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या बारा महिन्यात स्नॅपडीलला वेबसाईट आणि ऍप मिळून ८४८ मिलियन लोकांनी भेट दिली. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टनंतर ही देशातील तिसरी सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ ठरली आहे.
चिनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्लब फॅक्टरीपेक्षा स्नॅपडील चार पटींनी मोठी आहे. क्लब फॅक्टरीला गेल्या १२ महिन्यात भेट देणाऱ्यांची संख्या २०५ मिलियन असून ती चौथ्या क्रमांकावर आहे.
स्नॅपडील ही पेटीएम मॉलपेक्षा आठ पट मोठी आहे. ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत पेटीएम मॉलला वेब आणि मोबाईल साईट मिळून १०६ मिलियन युजर्सनी भेट दिली होती.
स्नॅपडीलच्या वृद्धीचा मुख्य आधार सशक्त विभाग अर्थशास्त्र हा आहे
बाजारपेठेतील प्रत्येक विभागाचे अर्थकारण सशक्त असावे आणि त्याचवेळी संचालनात्मक सक्षमता जास्तीत जास्त वाढाव्यात हे धोरण हा स्नॅपडीलच्या वाढीचा मुख्य आधार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० च्या ऑडिटेड आर्थिक निष्कर्षांनुसार स्नॅपडीलच्या कन्सॉलिडेटेड महसुलात ७३% वाढ झाली (आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ५३५.९ कोटी रुपये ते आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ९२५.३ कोटी रुपये). त्याचबरोबरीने त्यांच्या तोट्यामध्ये ७१% घट झाली (आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ६११ कोटी रुपये तर आर्थिक वर्ष २०१९ मध्ये १८६ कोटी रुपये)