नवी दिल्ली-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी ; मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, मांस खाणे हा रोग आहे असे विधान करून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. . दिल्लीच्या जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत त्यांनी अनेक वादात्मक विधाने केली .
इफ्तार पार्टीच्या या कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी भाषण करताना इंद्रेश कुमार यांनी म्हटले की, माझी मुस्लिम समाजाला तीन आवाहने आहेत. पहिलं आवाहन म्हणजे मुस्लिमांनी रमजानच्या काळात त्यांच्या परिसरात, गल्लीत, मस्जिद आणि दर्गा अशा सर्व ठिकाणी झाडे लावावीत. जेणेकरून प्रदुषणाला आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी त्यांच्या घरात तुळशीचे रोपटे लावावे. अरबी भाषेत तुळशीला ‘जन्नत का झाड’ म्हटले असून त्यामुळे जन्नत प्राप्त होते, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले. तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यावे. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस सेवन केले नव्हते. मांस खाणे हा एकप्रकारचा रोग आहे. तर दूध हे औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असे कुमार यांनी म्हटले.