जागतिक हत्ती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हत्ती संवर्धनकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले आहे. गेल्या 8 वर्षांत हत्तींसाठी संरक्षित क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
ते म्हणाले,“जागतिक हत्ती दिनानिमित्त हत्तीच्या संरक्षणासाठी करत असलेल्या आमच्या कटीबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. तुम्हाला हे जाणून तुम्हाला आनंद होईल कीसंपूर्ण आशियातील हत्तींपैकी सुमारे 60% हत्तींचे निवासस्थान भारत आहे. गेल्या 8 वर्षांत हत्तींसाठी संरक्षित क्षेत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. हत्तींच्या संवर्धनात सहभाग असलेल्या सर्वांचेही मी कौतुक करत आहे”हत्ती संवर्धनातील हे यश मानव-प्राणी यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी, भारतात सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांच्या संदर्भात तसेच पर्यावणासंदर्भातील संवेदना वाढवण्यासाठी स्थानिक समुदाय आणि त्यांच्या पारंपारिक ज्ञानाला एकत्रित करण्याच्या दृष्टीने पहाण्याची आवश्यकता आहे.”