Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उदय सामंतांच्या कारवरील हल्ला प्रकरणी,आदित्य ठाकरेंची सभा आयोजित करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंसह संभाजी थोरवे आणि चौघांना अटक

Date:

पुणे- गद्दार..गद्दारच्या घोषणा देत आ. उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी कात्रजच्या चौकात आदित्य ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणारे, व व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे , मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक केल्याचे वृत्त आहे. . याप्रकरणी सुमारे पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात सभा होती. त्याचवेळी मुख्यमंत्री इथन जवळच असलेल्या बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी आले होते.त्यांच्याबरोबर उदय सामंत तसेच अनेक नेते होते.सावंत यांच्या घरातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वारगेट जवळील शंकर महाराज मठात जाणार होते.त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी आपला मुंबईला जाण्याचा बेत बदलून शंकर महाराज मठात जाण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे पोलिसांनी कात्रजकडून स्वारगेटकडे जाणारा रस्ता मोकळा केला होता.त्याचवेळी उदय सामंत हे मुंबई बाय पासला जाण्यासाठी कात्रज चौकात आले. त्यावेळी नुकतीच सभा संपलेली होती.एका बाजूला मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांना वाट करुन देण्यासाठी पोलीस रस्ता मोकळा करीत असताना उदय सामंत यांची विरुद्ध दिशेने आलेली गाडी नेमकी जमावाच्या कचाट्यात सापडली.
गाडीत उदय सामंत आहेत हे पाहिल्यावर जमावातील गाडीवर बाटल्या, चपला, दगडांचा मारा केला.त्यात गाडीची मागची काच फुटली त्याचवेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांच्या गाडीला मोकळी वाट करुन दिली.तेथून ते कोथरुड पोलीस ठाण्यात आले तेथे त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...