Home Blog Page 94

प्रेम आणि रहस्यांनी भरलेला ‘असंभव’

पोस्टर्सने वाढवली चित्रपटाची उत्सुकता

टीझरपासूनच चर्चेत असलेला ‘असंभव’ आता आपल्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत कधीही न पाहिलेला असा भव्य आणि सस्पेन्सने भरलेला थ्रिलर प्रेक्षकांच्या मनात सध्या असंख्य प्रश्न निर्माण करत आहे.

गडद लाल आणि काळ्या छटांमध्ये तयार झालेलं पोस्टर पाहाताक्षणीच मनात प्रश्न निर्माण होतो, ही कथा प्रेमाची आहे का सुडाची? सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या चेहऱ्यांवर दिसणारी शांतता, त्यांच्या नजरेतील अस्वस्थता आणि ओठांवरील स्मितहास्य हे सगळं एक गूढ गोष्ट सांगतंय. तीन चेहरे, त्यामागचं सत्यं… परंतु नेमकं काय ? या पोस्टरमध्ये प्रेमाचं रहस्यमयी रूप आणि संशयाची तीक्ष्ण धार दोन्ही एकत्र दिसत असून ही अद्भुत कहाणी प्रेक्षकांना एक विलक्षण अनुभव देणार आहे.

दिग्दर्शक, निर्माते सचित पाटील म्हणाले, ” ‘असंभव’ हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून मानवी भावनांच्या सर्वात खोल थरांना स्पर्श करणारा आहे. या चित्रपटात प्रेम, रहस्य, भीती आणि संघर्ष यांच्या सीमारेषा एकत्र आणल्या आहेत. नैनितालच्या मोहक आणि रहस्यमय वातावरणात चित्रीत झालेला ‘असंभव’ हा पहिला मराठी चित्रपट असून, त्याचं प्रत्येक दृश्य तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम आणि सिनेमॅटिक अनुभव देणारं आहे.”

निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, ‘’ ‘असंभव’च्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक गुणी कलाकार आणि नामवंत तंत्रज्ञ एकत्र आले आहेत. सर्वांनी मनापासून केलेल्या मेहनतीमुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. या चित्रपटाबद्दल मला अत्यंत उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकार झालेली ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.”

एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर म्हणाले, ”पोस्टरमध्ये दिसणारी गूढता ही फक्त एक झलक आहे. ‘असंभव’ प्रेक्षकांना त्यांच्या भावनांशी भिडवणारा प्रवास असून सस्पेन्स आणि थ्रिलरचा थरार या दोन्हींचं परिपूर्ण मिश्रण यात आहे.”

पुष्कर श्रोत्री सहदिग्दर्शक असून सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली आहे. तसेच एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांच्या सहनिर्मितीत तयार झाला आहे.

आर्मीतील माजी जवानाकडुन सव्वाचार लाखाच्या सोन्याचे दागिन्याची चोरी

0

पुणे-आर्मीतील एका माजी जवानाने आर्मीतील दुसऱ्या जवानाच्या घरातून सव्वाचार लाखाच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’मुंढवा पोलीस स्टेशन, गु.र.नं. २६०/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) मधील फिर्यादी हया दिनांक २६/०९/२०२५ रोजी ते दिनांक ३०/०९/२०२५ दरम्यान त्याचे मुलासह नातेवाईक यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादी याचे राहते प्लॅटचे चावीचा वापर करुन, कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे बेडरुममधील लोखंडी पेटी (ट्रंक) मध्ये ठेवलेले ४,२६,०००/- रु. किं.चे सोन्याचे दागिने चोरुन नेलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादी यांचे पती हे आर्मीमध्ये नोकरी असुन ते सध्या चेन्नई येथे कार्यरत आहे. सदर गुन्हयाचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर याचेकडे देण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकारी राजु महानोर व तपास पथकातील पोलीस अंमलदार याचे करवी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाडताळणी करुन, दाखल गुन्हयाचे अनुषंगाने संशयीत इसमाचे मोबाईल फोनचे सीडीआर व एसडीआर प्राप्त करुन, मिळालेल्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषण करुन, सदरचा गुन्हा आरोपी संदीप सुरेश चव्हाण वय ४३ वर्षे रा. साईसिध्दी कॉलनी, आदर्शनगर, जय महाराष्ट्र कॉलनी समोर, घर नंबर १०१, दिघी पुणे यांने केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपी हा यातील फिर्यादी यांचा नातेवाईक असुन, तो देखील यापुर्वी आर्मीमध्ये त्याचे पती सोबत नोकरीस असल्याची माहीती मिळाली. सदर आरोपीने ओळखीचा फायदा घेवुन, फिर्यादी घरात नसल्याचे माहीती मिळाल्यानंतर फिर्यादी याचे घरातुन सोन्याचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यास सदर गुन्हयाचे कामी दिनांक १३/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५, डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे अनुराधा उदगले यांचे मार्गदर्शनाखाली गुंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासाहेब निकम यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस अंमलदार राजु कदम, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, राहुल मोरे, शिवाजी धांडे, रुपेश तोडेकर, अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

विविध कंपन्यांद्वारे आयपीओसाठी सेबी कडे अर्ज दाखल

भारतीय बाजारपेठेमध्ये आयपीओ सदरीकरणाला वेग आलेला असून विविध कंपन्यांनी आयपीओसाठी सेबी कडे अर्ज दाखल केले आहेत.

ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड

ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड ही सोने व चांदी या क्षेत्रांतील एकात्मिक प्लॅटफॉर्म कंपनी असून देशातील 24 राज्यांत ती कार्यरत आहे. ही कंपनी सुवर्ण व रौप्य मूल्यसाखळीतील विविध टप्प्यांत कार्यरत आहे. यामध्ये खरेदी व रिफाइनिंग, बुलियन ट्रेडिंग, डिजिटल सुवर्ण विक्री, दागिन्यांचे उत्पादन, आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री तसेच सोन्याच्या आधारावर वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.

कंपनीने 800 कोटींच्या ‘आयपीओ’साठी डीआरएचपीदाखल केला असून, या ‘आयपीओ’मध्ये प्रत्येकी 5 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे, 620 कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर (फ्रेश इश्यू) आणि 180 कोटींचे प्रवर्तकांकडील इक्विटी शेअर (ऑफर फॉर सेल  – ओएफएस) यांच्या विक्रीचा प्रस्ताव आहे.

लर्नफ्लुएन्स एज्युकेशन लिमिटेड

विद्यार्थी, पदवीधर आणि व्यावसायिकांसाठी मल्टी-मॉडेल लर्निंग (कॅम्पस आणि ऑनलाइन) ऑफर करणाऱ्या लर्नफ्लुएन्स एज्युकेशन लिमिटेड ही लक्ष्यची मूळ कंपनी 8 शहरांमध्ये कार्यरत आहे. डीआरएचपीनुसार, प्रस्तावित आयपीओ म्हणजे ₹2,460 दशलक्ष (246 कोटी) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि 40,00,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्री ऑफर (ओएफएस) यांचे समन्वयन आहे. ऑरवेल लिओनेल हे ऑफरसाठी शेअरहोल्डर्स विक्री करणारे प्रमोटर आहेत.

विश्वराज एनव्हीरॉनमेंट लिमिटेड

पाणी सुविधा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची आघाडीची विकासक कंपनी विश्वराज एनव्हीरॉनमेंट लिमिटेडने औद्योगिक वापरासाठी प्रक्रिया केलेल्या मैलापाणी पुनर्वापरावर लक्ष केंद्रित केले असून कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे दाखल केला आहे.

कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री प्रस्तावामध्ये (आयपीओ) 1,250 कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू  आणि प्रवर्तक विक्री समभागधारक प्रीमियर फायनान्शीयल सर्व्हिसेस लिमिटेड कडून 1,000 कोटी रु. पर्यंतचा विक्री प्रस्ताव (Offer for Sale) समाविष्ट आहे. BRLMs सोबतच्या सल्लामसलतीनुसार, VEL आपले RHP दाखल करण्यापूर्वी 250 कोटी रु. पर्यंतचा पूर्व आयपीओ विचारात घेऊ शकते. जर हे करण्यात आले तर उभारलेली रक्कम फ्रेश इश्यू मधून कमी केली जाईल.

कॉमटेल नेटवर्क्स लिमिटेड

महत्त्वाच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांसाठी समग्र दूरसंचार, सुरक्षा आणि सेफ्टी (iTSS) प्रणालींचे डिझाईन, बांधणी आणि अंमलबजावणी मधील तज्ज्ञ कॉमटेल नेटवर्क्स लिमिटेड (“कंपनी”) ने  विशेषतः तेल आणि वायू तसेच वीज क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या कंपनीने 19 देशांमध्ये 600 प्रकल्प पूर्ण केले असून त्याद्वारे 400 हून अधिक ग्राहकांना सेवा पुरविली आहे.

डीआरएचपी नुसार, प्रस्तावित आयपीओ हा 1,500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यंतच्या  इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 7,500.00 दशलक्ष रु. (750 कोटी रु.) पर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) यांचे एकत्रित मिश्रण आहे. त्यामुळे एकूण ऑफर साइज 9,000.00 दशलक्ष रु. (900 कोटी रु.) पर्यंत असेल.

जेराई फिटनेस लिमिटेड

जेराई फिटनेस लिमिटेड ही भारतातील फिटनेस उपकरणे उत्पादित करणारी कंपनी असून, व्यावसायिक जिम, हॉटेल, कॉर्पोरेशन्स, रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स यांसारख्या विविध ग्राहकांसाठी ती उपकरणे तयार करते. ही उत्पादने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकली जातात.

प्रस्तावित ‘आयपीओ’मध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या ४३,९२,५०० इक्विटी शेअर्सची विक्री ‘ऑफर फॉर सेल’च्या (ओएफएस) माध्यमातून करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये राजेश रामसुख राय यांचे १५,००,००० शेअर्स, रिंकू राजेश राय (प्रवर्तक विक्रीदार) यांचे १६,९२,५०० शेअर्स आणि राजेश रामसुख राय एचयूएफ (प्रवर्तक गट विक्रीदार) यांचे १२,००,००० समभाग विक्रीस ठेवले जाणार आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १४ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व http://mscenmms.in या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत व विलंब शुल्कासह २२ ते ३० ऑक्टोबर पर्यंत सादर करता येतील. अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार नाहीत. ३० ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।

अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।

गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।।

नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।।

या उक्तीची अनुभूती घेत माध्यम प्रतिनिधी आणि रसिकांच्या साक्षीने ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातील कलाकारांच्या साथीने अदभूत असा आनंद सोहळा नुकताच मोठय़ा उत्साहात आणि भक्तिरसात संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा  माऊली  तुकाराम’नामाचा घोष करत आलेली दिंडी, चित्रपटातील कलाकारांनी केलेले सादरीकरण, गायकांनी सादर केलेले अभंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती  संगमाचा ऐतिहासिक क्षण ‘याची देही याची डोळा’ रसिकांनी मनात साठवला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.आशिषजी शेलार यांच्या हस्ते चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ यांचा सत्कार आशिषजी शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी  बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीचे मूळ आणि महाराष्ट्राच्या  भूमीला अपेक्षित असे संतविचार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांची टीम चित्रपटाच्या माध्यमातून ज्या यशस्वीपणे पोहचवतायेत, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षी हा चित्रपट येणे हा सुंदर योग आहे. संत तुकाराम महाराजांची महती माहीत नाही, अशी व्यक्ती या जगात नाही. आपण बोलतो ती वाचा आणि वाचेला दैवी निष्ठेचा परिमळ स्पर्श झाला की, वाचेचे रूपांतर वाणीत होते. संत तुकारामांच्या या वाणीतून लिहिलेले, गायलेले आणि समोर आलेले अभंग मग नादब्रह्मात परावर्तित झाले आणि ऐकणाऱ्याला जो यातून मिळत होता तो ‘ब्रह्मानंद’. ही संतपरंपरा मानणारे आपण सर्वजण आहोत म्हणून महाराष्ट्रात, जगात आणि संत परंपरेवर विश्वास असणाऱ्यांसाठी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचं स्थान अगदी उच्च आहे.  संत परंपरेत आणि भक्ती परंपरेत विलीन होण्याची आत्मिक शक्ती आमच्या नागरिकांमध्ये जागृत होऊ दे. इच्छाशक्ती आणि आत्मिक शक्ती एकत्र येते त्यावेळेला ब्रह्मानंदाचे टाळ वाजतात. विठ्ठलाच्या चरणी या चित्रपटाच्या यशाची प्रार्थना करताना या चित्रपटाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. 

एका चांगल्या चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठक यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे आम्हाला गरजेचे वाटले. समाजाला नवा दृष्टिकोन आपल्याला देता यावा  म्हणून आम्ही हा चित्रपट घेऊन आलो आहोत. त्याला प्रेक्षकांचा नक्की उत्तम प्रतिसाद मिळेल,असा विश्वास आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

थोर संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव. प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्‌विचारांचे अभंगामृत ठेवणारे संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्याच तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाची जी शिदोरी दिली, हाच ठेवा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपटरूपाने ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.  

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी यांनी सांभाळली आहे. अवधूत गांधी, बेला शेंडे, अजय पूरकर, जयदीप वैद्य, अजित विसपुते, चंद्रकांत माने, नूतन परब, अमिता घुगरी, मुक्ता जोशी, ईश्वरी बाविस्कर, ज्ञानेश्वर  मेश्राम,  केदार जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये  बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्हीएफएक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

राष्ट्रीय पोषण माहनिमित्त भोरमध्ये बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन

पुणे, दि. 14 :- केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत बहुमाध्यम माहिती व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरविण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नागरिकांना पोषण आहार, संतुलित आहाराचे महत्त्व, तसेच आरोग्यविषयक विविध माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात 360 डिग्री व्हिडिओ फिल्म, डिजिटल प्रश्नमंजुषा, 3 डी सेल्फी झोन, सिरॅमिक बोर्ड, डिजिटल माहिती पुस्तिका, एलईडी स्क्रिन इत्यादींच्या माध्यमातून माहिती सादर करण्यात येणार असून आपल्या आहारातून कमी झालेल्या भरड धान्यविषयक देखील माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
प्रदर्शना दरम्यान लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी पोषण, सर्वांचे आरोग्य’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारे केंद्रीय संचार ब्युरो, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे आणि उपजिल्हा रुग्णालय, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनास अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका, बचत गटातील महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनादरम्यान नागरिकांना पोषण आहार नमुन्यांचे प्रदर्शन व शारीरिक पोषणासंबंधी जनजागृती करण्यात येईल.

बनावट गुडनाइट उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर महाराष्ट्र पोलिसांचा छापा

मुंबई14 ऑक्टोबर: भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध लावला. जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने टाकण्यात आलेला हा छापा म्हणजे मुंबईपुण्यासारख्या प्रमुख शहरी बाजारपेठांसह महाराष्ट्रात बनावट डास प्रतिबंधक उत्पादनांच्या प्रसाराला आळा घालण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

कारवाई करता येईल अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक पोलीस आणि तपास पथकांनी नागपूरमधील बेकायदेशीर कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटचे साहित्य जप्त करण्यात आले. बनावट उत्पादनांची निर्मिती आणि सुव्यवस्थित वितरणाची तयारी यामुळे समोर आली. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार बनावट गुडनाइट उत्पादनांचा समावेश आहे.

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांसह राज्यभरात अशा धोकादायक उत्पादनांचा प्रसार रोखण्यासाठी अधिकारी आता या रॅकेटशी संबंधित सगळी कनेक्शन्स आणि पुरवठा नेटवर्कचा शोध घेत आहेत. बनावट वस्तूंचा व्यवहार करणाऱ्यांसाठी ही कारवाई म्हणजे एक इशारा आहे. तर ग्राहकांच्या विश्वासाचे रक्षण करण्याची ही जीसीपीएलची वचनबद्धता आहे.

या विषयासंबंधात गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे ​​मुख्य विपणन अधिकारी – भारत अश्विन मूर्ती म्हणाले, “बनावट उत्पादनांचा प्रसार हा देशभरातील एफएमसीजी उद्योगासाठी चिंतेचा एक प्रमुख विषय आहे. बनावट किंवा एकसारखी दिसणारी उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत तर मानवी आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायक देखील आहेत. जीसीपीएल त्यांच्या उत्पन्नाचा एक ठरावीक भाग अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विकास करण्यासाठी देत असते. यामुळे ग्राहकांची सोय होते. आणि गुडनाइट हे त्याचेच एक उदाहरण आहे. आम्ही आमच्या वितरण नेटवर्क, स्थानिक अधिकारी आणि ग्राहकांशी सहकार्य करून नियमितपणे आमच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासणी करतो. महाराष्ट्र पोलिसांसोबतचा हा उपक्रम राज्यातील डुप्लिकेट गुडनाइट उत्पादनांचे स्थानिक किरकोळ विक्रेते, उत्पादक आणि वितरकांना चाप बसवण्यासोबतच त्याला आळा घालेल.”

बाजारात गुडनाइटची बनावट उत्पादने उपलब्ध असल्याने, ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी आणि आपल्या खरेदीचे योग्य ते बिल घ्यावे. जर ग्राहकांना डुप्लिकेट गुडनाइट उत्पादने असल्याचा संशय आला किंवा कोणताही घाऊक विक्रेता/किरकोळ विक्रेता त्यांच्याशी व्यवहार करत असल्याचे आढळले, तर ते care@godrejcp.com वर माहिती देऊ शकतात किंवा 1800-266-0007 वर फोन करून तक्रार नोंदवू शकतात.

सणासुदीच्या काळात सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआयकडून सुरक्षेसाठी 5 प्रमुख टिप्स

पुणे-सणासुदीचे दिवस म्हणजे उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा काळ. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती दिल्या जातात, जे खरेदीचा निर्णय वेगाने घेण्यास प्रोत्साहन देतात. सणासुदीच्या या गर्दीच्या दिवसात अनेकजण चांगली डील मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, घोटाळे करणाऱ्यांना खरेदी करणाऱ्यांच्या या मानसिकतेची जाणीव असते आणि अनेकदा सोशल इंजिनीअरिंगद्वारे त्यांचा गैरफायदा घेतात. तंत्रज्ञानामुळे अनेक घोटाळे होत असताना, जागरूकता आणि काही जागरूक पावले ग्राहकांना सुरक्षित आणि विना अडथळा खरेदीचा अनुभव घेण्यास मदत करू शकतात.

अधिकृत ऍप्स आणि वेबसाइट्सवरूनच खरेदी करा: सणासुदीच्या हंगामात फसवणूक करणारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि पेमेंट तपशील चोरण्यासाठी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट्स आणि लिंक्स तयार करतात. यामुळेच जिथून खरेदी करणार असाल त्या साइटचा वेब आयडी स्वतः टाका किंवा अधिकृत ऍप वापरा. ​​प्रमोशनल ईमेल, एसएमएस किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळा. माहिती नसलेल्या स्त्रोतांवरील फाइल्स डाउनलोड करू नका किंवा लिंक्सवर क्लिक करू नका, कारण त्यामध्ये हानिकारक सॉफ्टवेअर असू शकते आणि ते तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकते.


फक्त संबंधित ऍपमध्येच पेमेंट पूर्ण करा: काही घोटाळ्यांमध्ये ग्राहकांना सुरक्षा तपासणी वगळून शॉपिंग ऍप किंवा साइटच्या बाहेरील यूपीआय आयडी किंवा लिंक्सवर पैसे देण्याचा आग्रह धरतात. त्यामुळेच नेहमी अधिकृत चेकआउट पेजवर व्यवहार पूर्ण करा आणि विक्रेत्याची माहिती नीट पाहून घ्या.

मोफत व्हाउचर आणि कॅशबॅक आश्वासनांबाबत सावधगिरी बाळगा: रिवॉर्ड्स, कॅशबॅक किंवा सणासुदीच्या भेटवस्तू देणाऱ्या मेसेजमध्ये ओटीपी, खात्याचे तपशील किंवा लहान “शुल्क” मागितले जाऊ शकते. ज्या ऑफर्स खऱ्या असतात त्यासाठी संवेदनशील माहिती किंवा आगाऊ पेमेंटची आवश्यकता नसते. त्यामुळे यावर क्लिक करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्या आणि पडताळणी करा.

ओटीपी मागणाऱ्या मेसेजमागचा इशारा समजून घ्या: पेमेंट अयशस्वी झाले आहे किंवा खाते ब्लॉक केले आहे असे सांगत काही मेसेज ओटीपी सांगण्यास सांगतात. मात्र, असे सांगितल्यास कधीही ओटीपी देऊ नये. ओटीपी हा केवळ ग्राहकांनी सुरू केलेल्या व्यवहाराची खात्री करण्यासाठी असतो. बँका किंवा पेमेंट ऍप्स कधीही कॉल किंवा मेसेजद्वारे ते विचारत नाहीत.


कोणत्याही दबावाखाली व्यवहार करू नका: घोटाळे करणारे किंवा फसवणारे ऑफर लवकरच संपेल किंवा तुम्ही कारवाई न केल्यास तुमचे खाते ब्लॉक होईल असे सांगून तुम्ही घाईने व्यवहार करावा अशी परिस्थिती निर्माण करतात. या उलट संबंधित कंपन्यांचे अधिकृत ऍप्स कधीही अशा प्रकारे मागे लागत नाहीत किंवा घाईघाईने व्यवहार करण्यास भाग पाडत नाहीत. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्या.

सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ हे तत्त्व स्वीकारले पाहिजे. कोणतेही संशयास्पद मेसेज आल्यास त्याचा थोडं थांबून, विचार करून, माहितीची पडताळणी करून आणि हुशारीने वागून ग्राहक स्वतःचे रक्षण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील माहिती जपून ठेवू शकतात, ज्यामुळे व्यवहाराचा सुरक्षित अनुभव निश्चित होतो.

सीमारेषारहित आरोग्यसेवेची नवी व्याख्या करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि मेफेअर वी केअर यांची भागीदारी

या रणनीतिक करारामुळे ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगभरात
२४x७ वैद्यकीय आणि प्रवाससहाय्य सेवा होणार उपलब्ध

मुंबई: भारतातील अग्रगण्य खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने (आरजीआयसीएल) यूके-स्थित ‘मेफेअर वी केअर लिमिटेड’ या जागतिक आरोग्य लाभ प्रशासक कंपनीशी रणनीतिक भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे ‘मेफेअर’च्या आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अखंड, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सहाय्य मिळणार आहे.

या करारानुसार, ‘मेफेअर वी केअर’ २४x७ बहुभाषिक ‘अलार्म सेंटर’ चालवणार आहे आणि त्यातून परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या ‘रिलायन्स जनरल’च्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मदत पुरविली जाणार आहे. हे केंद्र वैद्यकीय तसेच प्रवाससंबंधित सहाय्यासाठी एकाच ठिकाणी संपर्काचा केंद्रबिंदू ठरेल. ‘आरजीआयसीएल’च्या ग्राहककेंद्री आणि जागतिक स्तरावर सुलभ उपायांच्या कटिबद्धतेला यातून अधिक बळकटी मिळेल.

या सेवांच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत :

·         परदेशात पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट दावे प्रक्रियेस सहाय्य.

·         वैद्यकीय सल्लामसलत, अपॉइंटमेंट ठरवणे आणि टेलि-असिस्टन्स सेवा.

·         आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर आणि पुनरागमन यांबाबतचा समन्वय — गंभीर परिस्थितीत वेळेवर आणि विश्वसनीय मदत सुनिश्चित करण्यासाठी.

·         प्रवाससंबंधित सहाय्य, उदा. व्हिसा व लसीकरणविषयक माहिती, दुभाषाचे संदर्भ, दूतावासतून सहाय्य, हरवलेली कागदपत्रे किंवा सामान शोधण्यास मदत.

·         सहानुभूतीपूर्ण भेटी, अल्पवयीन मुलांचे पुनरागमन आणि इतर अत्यावश्यक सेवांचे समन्वय — वैद्यकीय गरजांपलीकडील सर्वांगीण काळजीची हमी.

या भागीदारीविषयी बोलताना रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन म्हणाले, “रिलायन्स जनरलमध्ये आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना अधिक मूल्य देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. ‘मेफेअर वी केअर’शी झालेली भागीदारी आम्हाला जागतिक दर्जाची, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि प्रवाससहाय्य सेवा देण्यास सक्षम बनवेल. त्यामुळे आमचे ग्राहक जगात कुठेही असले तरी त्यांना सुरक्षितता आणि काळजीची भावना मिळेल.”

हा करार १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला असून, त्याची सुरुवातीची मुदत तीन वर्षांची आहे. पुढे त्याचे नूतनीकरण करण्याची तरतूदही आहे. विमा क्षेत्रात नवोन्मेषी आणि ग्राहक-केंद्रित उपाय पुरवण्याच्या दोन्ही संस्थांच्या दीर्घकालीन बांधिलकीचे ही भागीदारी म्हणजे प्रतीक आहे.

महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५साठी 17 ऑक्टोबर पर्यंत सूचना, हरकती करण्याचे आवाहन

पुणे, दि. 13: अॅप बेसच्या वाहनांसाठीच्या महाराष्ट्र मोटर व्हेईकल ॲग्रीगेटरर्स नियम 2025 धोरणाबाबत प्रारुप नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या सदर प्रारुप नियमांच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडे हरकती, सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५ बाबत प्रारुप नियमांबाबत नागरिकांना आपल्या हरकती, सुचना प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांचेकडे rto. 12-mh@gov.in या ईमेल पत्त्यावर सादर कराव्यात.
0000

शिवछत्रपतींच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी जनसहभागाचे आवाहन

पुणे, दि. 14 ऑक्टोबर – युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी “अमृत दुर्गोत्सव २०२५” हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

युनेस्कोने घोषित केलेल्या १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करून, त्या प्रतिकृतीसोबतचा सेल्फी https://www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या लोकोत्सवाद्वारे शिवछत्रपतींच्या दुर्गांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे.

या सर्व छायाचित्रांचे संकलन करून “अमृत” (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) विश्वविक्रम नोंदणीसाठी सादर करणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीसह अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.असे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

भारताची सायकल राजधानी बनणार पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम

पुणे, १३ ऑक्टोबर – “पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा उजळविण्याची आणि पुण्याला भारताची सायकल राजधानी बनविण्याची वेळ आली आहे. आमचे उद्दिष्ट संपूर्ण शहरभर सुमारे ७५ किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणे आहे, ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील सायकलस्वार सुरक्षितपणे प्रवास करू शकतील,” असे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सांगितले.

श्री. राम हे हिंदआयन शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक या उपक्रमात सहभागी झालेल्या सायकलस्वारांना संबोधित करत होते. या कार्यक्रमात टेरीटोरियल आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, भारतीय वायुदल, तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लब आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

“सायकलिंग हे पर्यावरणपूरक तसेच आरोग्यास उपयुक्त असे वाहतूक साधन आहे. त्यामुळे सायकलस्वारांसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे श्री. राम यांनी पुढे सांगितले. “या उद्देशाने महानगरपालिका ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ साठी ७५ किमी सायकल मार्ग तयार करत आहे. हा उपक्रम जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. या उपक्रमांमुळे पुणे लवकरच देशाची सायकल राजधानी म्हणून ओळखले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

उमाकांत दिग्गीकर, इमारत परवाना विभागातील सहाय्यक अभियंता, ज्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, यांनी सांगितले – “भारतीय टेरीटोरियल आर्मी, वायुदल आणि बीएसएफच्या जवानांसोबत सायकल चालविण्याचा सन्मान लाभला. सिंहगडाच्या माथ्यावर भारतीय सैन्याने पुरविलेला भोजनाचा अनुभव संस्मरणीय होता. पुणे महानगरपालिकेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे आणि वैद्यकीय सहाय्यामुळे हा प्रवास अत्यंत आनंददायी झाला. आम्ही पुढील हिंदआयन उपक्रमांमध्ये नक्की सहभागी होऊ.”

हिंदआयन सायकल मोहिमेचे आयोजक व जगभर भूमार्गे भ्रमण करणारे पहिले भारतीय विश्‍नुदास चपके यांनी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी नागरिकांना पुढील उपक्रमांसाठी निमंत्रण दिले –
“आम्ही सर्व पुणेकरांना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती विशेष शनिवाऱवाडा ते सिंहगड बाइक अँड हाइक मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. तसेच पुणेकरांना दिल्लीतील कर्तव्य पथावरील २० किमी सायकल परेड, सिंधुदुर्गमधील १०० किमी स्टेज रेस, मुंबई ते पुणे राईड, तसेच दिल्ली ते आग्रा ‘डबल सेंच्युरी राईड’ (यमुना एक्सप्रेसवे मार्गे) या विविध स्तरांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल.”

अभाविप कार्यालयाची तोडफोड, मनविसे पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय 20) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह 20 ते 30 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते १३ ऑक्टोबर दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करुन त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक एस सुरवसे तपास करत आहेत.

महाविकास आघाडी – निवडणूक आयोग उद्या पुन्हा बैठक:आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित

मुंबई -लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता . दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पत्रकार परिषद होणार नाही. उद्या आमची बैठकीतील निष्कर्षानंतर ती पत्रकार परिषद होईल. आता तिथे कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.चोकलिंगम यांच्यासोबतच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णित आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी चोकलिंगम यांची एकत्र भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ घेतील. त्यामुळे उद्याच पत्रकारांना भेटून माहिती देऊ, असा निरोप शिष्टमंडळाकडून आलेला आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

चोकलिंगम यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारयादीतील घोळ सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी सर्व विरोधीपक्षाच्या वतीने भेट घेतली. राज ठाकरे यांनी अनेक आणलेली निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींची अनेक उदाहरणे पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ असल्याचे बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. तीच निवडणूक यादी १ जुलैला गोठवून, त्या यादीवर निवडणुका घेतल्या, तर तो गोंधळ पुन्हा चालू होईल, आम्ही याला आक्षेप घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सीईओ चोकलिंगम यांनी एकत्रित यावे आणि आमचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आम्ही केली. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की, उद्या ते दोघे एकत्रित येऊन आमचे म्हणणे ऐकतील. आम्ही त्यासाठी सादर केलेले पुरावे त्याची पुन्हा चर्चा होईल. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका घेण्याआधी राज्यातील सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. उद्या सकाळी अकरा वाजता आमची पुन्हा बैठक होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटून जी मागणी करतोय, अशीच मागणी भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडे करत आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही भाजप अशीच मागणी करतोय. त्याच मागणीसाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटत असताना भाजप नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावे, ही आमची भूमिका आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आजच्या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केलेले मुद्दे

निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली?
जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव.
मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ.
वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी.
निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?
31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का?
ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे निवडणूक अधिकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले . शिवालयातून निघाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दाखल झाले होते . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावेळी सोबत दिसून आले. शरद पवार देखील अनेक वर्षांनी मंत्रालयात पोहोचलेले पाहायला मिळाले.
पराभव दिसतो तेव्हा कारणे बघावी लागतात. ताकद नसल्यावर रडीचा डाव केला जातो, हा त्यातलाच प्रकार असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

निवडणूक आयोगात जाण्याआधी शिष्टमंडळाचे सर्व नेते शिवालयात जमले होते. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत चर्चा झाली. दुसरीकडे विरोधकांचे शिष्टमंडळ भेटीला येण्याआधी राज्य निवडणूक आयोगातही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच संदर्भात, निवडणुकीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल वाढलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने, सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ६ वा दीक्षांत समारंभ

पुणे, १४ ऑक्टोबर २०२५ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे, आपल्या ६ व्या दीक्षांत समारंभाची अभिमानाने घोषणा करत आहे. हा समारंभ १६ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी, सकाळी १०. ३०  वाजता सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, किवळे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या नव्या विभागाचे उद्घाटन मा. राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते होणार आहे. हा विभाग भारताच्या वाढत्या संरक्षण नवोन्मेष क्षेत्राला पाठबळ देत “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेला पुढे नेणारा ठरेल.

या प्रसंगी, विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक कार्यक्रमांतून पदवी प्राप्त करणाऱ्या १५३२ विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे. हा सोहळा विद्यापीठाच्या “इंडस्ट्री-रेडी” व्यावसायिक घडविण्याच्या ध्येयाला अधोरेखित करतो. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असून, महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच मुरलीधर मोहोळ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री, भारत सरकार; चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन; मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री, महाराष्ट्र शासन; तसेच माधुरी मिसाळ नगरविकास राज्यमंत्री वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, महाराष्ट्र शासन या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.  डॉ. एस. बी. मजुमदार, यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. स्वाती मजुमदार, प्रो-चान्सलर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने हा समारंभ पार पडणार आहे.

या वर्षीचा पदवीदान समारंभ विशेष महत्त्वाचा आहे, कारण सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने सलग दुसऱ्या वर्षी एन. आय. आर. एफ. (NIRF) क्रमवारीत भारतातील कौशल्याधारित उच्च शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ज्यामुळे विद्यापीठाची नेतृत्वाची भूमिका अधिक दृढ झाली आहे. तसेच एसएसपीयूने आंतरराष्ट्रीय सहकार्यांतर्गत वॉर-विक कम्युनिटी कॉलेज (अमेरिका) यांच्याशी भागीदारी केली असून, ॲलेन विद्यापीठ (जर्मनी) सोबत विद्यार्थ्यांच्या अदलाबदलीचा करार केला आहे.

या प्रसंगी बोलताना प्रो-चान्सलर डॉ. स्वाती मजुमदार म्हणाल्या,

“हा पदवीदान समारंभ केवळ आमच्या पदवीधरांच्या यशाचा उत्सव नाही, तर विद्यापीठाच्या प्रगतीतील एक अभिमानाचा क्षण आहे. सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीने भारताच्या ‘स्किल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाला मूर्त रूप दिले आहे. आमचे १५३२ पदवीधर हे कौशल्य, नवोन्मेष आणि रोजगारक्षमतेच्या समन्वयातून उभ्या राहिलेल्या शिक्षणमॉडेलचे यश दर्शवतात.”

समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या, चान्सलरचा सुवर्णपदक पुरस्कार, आत्मनिर्भर पुरस्कार आणि कुशल पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिले जातील