Home Blog Page 93

हास्ययोग म्हणजे तणावमुक्त, आनंदी जीवनाचे प्रभावी औषध-डॉ. भाग्येश कुलकर्णी

पुणे, ता. १५ : “नवचैतन्य हास्ययोग परिवार हे खऱ्या अर्थाने पुण्याचे वैभव आहे. हास्ययोग आनंदी जीवनाची किल्ली असून, हास्याची ही चळवळ पुण्याच्या कानाकोपऱ्यात अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ठिकठिकाणी हास्यदूत निर्माण व्हावेत,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. हास्ययोग म्हणजे आनंदी जीवांचे टॉनिक आहे, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी नमूद केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हास्ययोग परिवारातील हजारो सदस्य उत्साहाने उपस्थित होते. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त नवचैतन्य आरोग्य संहिता या अधिकृत व्यायाम पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी ८९ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने पुणेरी पगडी आणि मानाची शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसंगी व्यासपीठावर प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी, मनस्विनी सारीजच्या गोदावरी रुकारी, द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक द्वारकादास माहेश्वरी, पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धोका, सोलारीस क्लबच्या डॉ. अमृता दळवी, संस्थेचे मुख्य समन्वय मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष सौ. सुमन काटे, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त  प्रमोद ढेपे, जयंत दशपुत्रे, एकनाथ सुगावकर, अतुल सलागरे, दत्तात्रय कुंदेन, हरीश पाठक, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ‘हसरे पुणे’ करण्यात मोठे योगदान दिले आहे. परिवाराने एक लाख सदस्य करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. हा केवळ एक परिवार नसून, ही एक मोठी चळवळ आहे. मी स्वतः या परिवाराचा भाग असून त्याचा वाढणारा प्रतिसाद अनुभवतो आहे.”

राजेंद्र बाठीया म्हणाले, “आम्ही व्यापारी दिवसभरामध्ये आमच्या कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे असे निखळ हास्य आमच्या वाट्याला बरेचदा येत नाही. नवचैतन्य हास्ययोग परिवाराने हजारो लोकांच्या जीवनामध्ये जे हास्य पसरवले आहे, त्याचा अभिमान वाटतो.”

प्रकाश धोका म्हणाले, हास्य क्लब ही संकल्पना पुणेकरांनी स्वीकारली आणि ती वाढवली. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. या संकल्पनेमुळे लोकांना शारीरिक व मानसिक आधार मिळाला आहे.

‘आगामी काळात हास्ययोग आनंदयात्रा काढून ७० लाख लोकसंख्येच्या पुण्यामध्ये एक लाख लोकांना हास्ययोग परिवाराशी जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे,’ असे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी सांगितले.

विठ्ठल काटे आणि उपाध्यक्ष सुमन काटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अमृता दळवी, शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रख्यात वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर उत्कृष्ट व्याख्यान झाले. सुमारे दोन हजाराहून अधिक लोकांच्या उपस्थितीमध्ये ६०० घेऊन अधिक ज्येष्ठांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन सुभाष राजवाड यांनी केले. विजय भोसले यांनी आभार मानले.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी म्हणाले, “हास्य हा सर्वात प्रभावी औषध आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी आणि मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हास्ययोग अत्यंत उपयुक्त ठरतो. नियमित हास्ययोग केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, रक्तदाब कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. आनंदी मन हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. दैनंदिन जीवनात काही क्षण मनापासून हसणे हे औषधापेक्षा जास्त परिणामकारक ठरते.”

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड – आर्थिक वर्ष 26 ची दुसरी तिमाही आणि पहिल्या सहामाहीचे ऑपरेशनल अपडेट

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत विक्री मूल्य 670 कोटी रु.मागच्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत संकलन 596 कोटी रुपयेगेल्या तिमाहीच्या तुलनेत 8% वाढ

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न प्रति चौरस फूट 7,823 रुपयेमागील तिमाहीच्या तुलनेत 7% वाढ

पुणे15 ऑक्टोबर 2025: मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आपल्या कामाने ठसा उमटवणारी पुणे येथील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL) 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही दरम्यान त्यांच्या रिअल इस्टेट ऑपरेशन्सवरील प्रमुख अपडेट्स जाहीर केले आहेत.

ऑपरेशनल कामगिरीचा आढावा:

 

नवीन क्षेत्र विक्रीQ2FY26Q1FY26Q2FY25QoQYoYH1FY26H1FY25YoY
मूल्य (कोटी रु. मध्ये)6706167709%-13%1,2861,481-13%
आकार (दशलक्ष चौ.फूट)0.860.841.032%-17%1.701.99-15%
उत्पन्न (रु. प्रति चौ.फूट)7,8237,3377,4727%5%7,5827,4412%
मिळकत (कोटी रु.मध्ये)5965505508%8%1,1461,162-1%

संकलनात डीएमए प्रकल्पांचे योगदान समाविष्ट आहे.

·   आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रीत 9% ची वाढ होऊन ती 670 कोटी रुपयांवर पोहोचली.

o   या तिमाहीतील विक्रीत टिकाऊ इन्व्हेंटरीचे लक्षणीय योगदान.

· विक्रीचे प्रमाण 0.86 दशलक्ष चौरस फूट. गेल्या तिमाहीच्या तुलनेत 2% वाढ.

o   केपीडीएलचा प्रमुख एकात्मिक टाउनशिप प्रकल्प, लाईफ रिपब्लिकने आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत 0.51 दशलक्ष चौरस फूट विक्री नोंदवली.

· या तिमाहीत 596 कोटी रुपयांची मिळकत, गेल्या तिमाहीच्या तुलनेत 8% वाढ. सर्व प्रकल्पांमधील बांधकामाच्या चांगल्या गतीमुळे झाली वाढ.

· 7,823 रुपये प्रति चौरस फूट या दराने मिळकतीत वाढ. तिमाहीत 7% तर वार्षिक 5% वाढ. प्रमुख प्रकल्पांमधील निश्चित किंमत आणि आमच्या 24K प्रोजेक्टला असलेल्या मागणीमुळे ही वाढ झाली.

· ऑक्टोबर 2025 मध्ये, कंपनीने पुण्यातील भूगाव येथे सुमारे 7.5 एकर जमीन खरेदी केली, ज्याचे विक्रीयोग्य क्षेत्र अंदाजे 1.9 दशलक्ष चौरस फूट आणि एकूण विकास मूल्य (GDV) रु. 1,400 कोटी.

या कामगिरीबद्दल भाष्य करतानाकोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील म्हणाले,

आम्ही विक्रीपूर्व मूल्यात 9% आणि संकलनात 8% अशी उत्तम तिमाही वाढ नोंदवल्याचा मला आनंद आहे. आर्थिक वाढकमी व्याजदर आणि घटत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढेल अशी आम्हाला आशा आहे. विस्ताराच्या अनुषंगानेआम्ही आमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत आहोत. अलीकडेच आम्ही पुण्यातील भूगाव येथे 1,400 कोटी रुपयांच्या अंदाजे जीडीव्हीसह ~7.5 एकर जमीन खरेदी केली आहे.

या तिमाहीतील एका महत्त्वाच्या घडामोडीमध्येब्लॅकस्टोनने कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 40% पर्यंत वाढवली. कंपनीच्या वाढीच्या प्रवासात ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आम्ही जलदगतीने विस्तारनवोपक्रमाला चालना आणि या क्षेत्रातील नेतृत्व मजबूत करण्याच्या सामायिक दृष्टिकोनासह पुढे जात आहोत. विश्वासनवोपक्रम आणि ग्राहक प्राधान्य या तत्त्वांना अनुसरून कंपनी सर्व भागधारकांसाठी शाश्वत वाढ आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी भक्कम आहे.”

महायुतीच्या २३२ जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा का होता – राज ठाकरे

वेबसाइटवरून याद्या गायब झाल्याबद्दल आयोगालाच काही माहिती नाही – राज ठाकरे

मुंबई-मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगासमोर ठेवल्यानंतर मला असे वाटते, ते आणि राजकीय पक्षांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत. याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीच्या निवडून आल्यात. एवढ्या जागा निवडून आल्यानंतर देखील संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता, तो नव्हता. हे कसले द्योतक आहे. निवडणुकीत पडलेल्यांना धक्का बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसावा, ही कोणती निवडणूक आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहेत. हे घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत. ते सुधारून विरोधीपक्षाचे समाधान झाले पाहिजे. सत्ताधारी पक्षांचेही समाधान झाले पाहिजे. जे निवडणुका लढवतात, त्या राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय आयोगाने निवडणुका घेऊ नयेत, ही आमची रास्त मागणी आहे. यात काहीच गैर नाही. निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नयेत. ही सोपी गोष्टी आहे. त्यात काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आम्ही क्लिष्ट विषय बोलत नाहीयेत, असे राज ठाकरे म्हणाले.

वृत्तवाहिनीवर खोट्या मतदार यादीची बातमी येते आणि सायंकाळी सहा वाजता ती गायब होते. त्या संपूर्ण बातमी आणि मतदार यादीबद्दल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही. आम्ही माहिती घेऊन सांगतो, असे आयोग म्हणाले. ती यादी त्यांच्या वेबसाइटवरून गायब झालीये. वृत्तवाहिनीवर दाखवल्यानंतर याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय? कोण काढतंय? आणि कोण घालतंय? ही बाब त्यांना विचारली गेली. त्यावर केवळ आम्ही चौकशी करून सांगतो, एवढेच निवडणूक आयोगाने सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.

या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली. तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

२०२२ याद्यांमध्ये फोटो, २०२५ च्या याद्यांमधून फोटो गायब – राज ठाकरे
२०२२ मध्ये जिल्हा परिषदांच्या याद्यांमध्ये फोटो आणि नावासह सगळे आहे. पण २०२५ च्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकलेत. हे सगळे निवडणूक आयोग स्वत: करतंय. पण हे का करतंय? पारदर्शकता आणत असल्याचे ते म्हणत असतील, तर या सगळ्या गोष्टी ते का आणि कशासाठी हा घोळ करत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीत. याआधी अनेक निवडणुका झाल्या. या आधीच्या निवडणुकांमध्ये असले विषय आले नाहीत. हे विषय हल्लीच का यायला लागलेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक पानासाठी दोन रुपये द्यायचे, मग आम्ही पाने घ्यायची. म्हणजे त्यात पण कमाई.
मतदान गोपनीय असते, मतदार यादी गोपनीय कशी असेल? – राज ठाकरे
मतदार याद्या गोपनीय असतात, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले. पण मला वाटतं मतदान गोपनीय असते ना? मतदार कसा गोपनीय असेल? दुसरी गोष्ट मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावता आणि ४५ दिवसांनंतर त्यांचे फुटेज डिलीट करता. जर निवडणूक आयोग बघू शकतो, तर आम्ही नाही का बघू शकत? निवडणूक आयोगाला निवडणुका लढवायच्या नाहीत, त्या आम्हाला लढवायच्या आहेत. निवडणूक आयोग लपवा-छपवी का करतंय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा आरोप

एका घरात शेकडो मतदार राहत असल्याचे मतदान यादीतल्या नोंदणीचे दिले पुरावे

मुंबई-महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील अनेक चुका दाखवल्या. त्यावर त्यांनी सीओ यांनी आम्हाला हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याची ग्वाही दिली. तसेच या याद्या दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकरक सुरू करण्याचे आश्वासनही दिले.

आम्ही निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवले. त्या पुराव्याच्या सहीत आम्ही त्यांना काही माहिती दिली. याशिवाय आम्ही एक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात मतदार यादीमधील मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मतदार यादीत पत्ता व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचेही आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले, मी मतदार यादीतील घोटाळ्याची निवडणूक आयोगाला काही उदाहरणे दिली. मुरबाड मतदारसंघातील बुथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचे एक घर आहे. यांच्या घरापुढे घर नंबर 400 नमूद करण्यात आला आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर 218 येथील 0 क्रमांकाच्या घरामध्ये 450 मतदार राहतात. कामठी विधानसभेतही 867 मतदारांचे घर निरंक आहे. म्हणजे त्यांच्या घराला क्रमांकच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेत. म्हणजे एका व्यक्तीला 2-2, 4-4, 5-5 व 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. इपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपली खात्री होती. पण मतदार याद्यांत अनेक इपिक नंबरचे मतदार असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.

ते पुढे म्हणाले, नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव 6 वेळा नोंदवण्यात आले आहे. तिचे 6 इपिक क्रमांक आहेत. माध्यमांनी पुराव्यासह हे दाखवले आहे. त्यानंतर काही तासांतच हे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. आमचा प्रश्न हा आहे की, दुपारी 3 वाजता एक बातमी येते आणि सायंकाळी 6 वा. या महिलेचे नाव वगळले जाते. ही नावे कुणी वगळली? त्याची तक्रार कुणी केली? तक्रार कधी करण्यात आली व कुणी स्थळ पाहणी केली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या आत तिचे नाव कुणी वगळले? आमचा दावा असा आहे की, राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरे कुणीतरीच चालवत असल्याचा आमचा समज आहे.

दुसरा कुणीतरीच परस्पर या मतदार याद्यांत नाव घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावे काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक असो, त्यांच्या हातात काहीच नाही. कुणीतरी बाहेरूनच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मतदार याद्यांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी करण्यात आल्या आहेत. आत्ता मध्य विधानसभा नाशिक मतदारसंघात घर क्रमांक 3,829 या घरात 813 मतदारांची नोंद आहे. पुढे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बुथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर तासाला मतदानाची टक्केवारी जाहीर होते. किती पुरुषांनी व महिलांनी मतदान केले हे दर तासांनी जाहीर होते. विधानसभेला ही व्यवस्था पूर्णपणे फोडण्यात आली. सायंकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केले हे केव्हाच जाहीर करण्यात आली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे.

आम्ही विधानसभेला ज्या मतदारयाद्या पाहिल्या त्याच मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरल्या तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे राहण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आयोगाला या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) साठी माध्यम अधिस्वीकृती सुरु


एफटीआयआय 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे एक दिवसाचा चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार

मुंबई, 14 ऑक्टोबर 2025

56 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील पणजी इथे आयोजित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रपटांचा हा 9 दिवसांचा जागर होणार असून त्यात 45 हजाराहून अधिक चित्ररसिक व व्यावसायिक सहभागी होणार आहेत.  जागतिक स्तरावर उत्कृष्ट गणल्या गेलेल्या चित्रपटांचा हा मेळावा अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार होणार आहे. 

तुम्ही पत्रकार आहात का? तर मग या महोत्सवाचे वार्तांकन करणारे माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या पोर्टलला भेट द्या. माध्यम अधिस्वीकृतीसाठी हे पोर्टल येत्या 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत खुले आहे.    

सर्व विशेष चित्रपट प्रदर्शने, पॅनेल चर्चासत्रे व चित्रपटनिर्मात्यांसमवेत कार्यक्रमांमध्ये केवळ अधिस्वीकृत  माध्यम व्यावसायिकांनाच  प्रवेश मिळेल.याशिवाय, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी  संस्था (FTII) 18 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील पणजी येथे फक्त अधिस्वीकृत  पत्रकारांसाठी खास चित्रपट रसग्रहण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करणार आहे. चित्रपटांचा अर्थ समजून घेत आस्वाद घेण्याचे तंत्र शिकण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ज्या पत्रकारांना आधीच्या महोत्सवातील या अभ्यासक्रमाचा लाभ घेता आला नव्हता, त्यांना यावेळी प्रथम संधी देण्यात येईल.  

जगभरातील चित्रपट निर्मात्यांच्या वैविध्यपूर्ण  दृष्टिकोनांसाठी  इफ्फी च्या  आयोजनामुळे एक  व्यासपीठ मिळेल असे पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान  महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी अधोरेखित केले आहे. या महोत्सवाचे वार्तांकन करणाऱ्या  पत्रकारांसाठी अधिस्वीकृती  प्रक्रिया सुलभ व सुरळीत व्हावी यासाठी पत्र सूचना कार्यालय वचनबद्ध असून पत्रकारांना सर्वतोपरी साहाय्य केले जाईल असे त्यांनी सांगितले. 

माध्यम प्रतिनिधींनी पोर्टलवरील सूचना काळजीपूर्वक वाचून अर्जासोबत  आपली ओळखपत्रे, व्यावसायिक परिचयपत्रे इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे  सादर करावीत.पात्रता व कागदपत्रांच्या विस्तृत माहितीसाठी अर्जदारांनी कृपया पोर्टलवरच्या  मार्गदर्शक सूचना पाहता येतील.

अधिस्वीकृतीसंदर्भात  शंकानिरसन  व मदतीसाठी पत्रकारांनी विशेष पीआयबी माहिती कक्षाशी iffi.mediadesk@pib.gov.in येथे संपर्क साधावा. 

निसर्गसुंदर  पणजी शहरात इफ्फी साठी एक उत्तम सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभणार असून यातून भारताच्या समृद्ध चित्रसंस्कृतीचे दर्शन आंतरराष्ट्रीय समुदायाला घडेल व सिनेजगताला आंतरराष्ट्रीय सहकार्याची जोड मिळेल. 

महत्वाची माहिती:

अधिस्वीकृती पोर्टल खुले : 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025

महोत्सव तारखा : 20 ते 28 नोव्हेम्बर 2025

चित्रपट रसग्रहण  अभ्यासक्रम : 18 नोव्हेंबर 2025

स्थळ : पणजी, गोवा. 

अधिस्वीकृती  पोर्टल : https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx

मदत कक्ष ई-मेल : iffi.mediadesk@pib.gov.in

आशियातील  या प्रमुख चित्रपट महोत्सवात  आपला सहभाग नक्की करण्यासाठी , कॅमेऱ्या मागच्या कथा अनुभवण्यासाठी आणि जगभरातील चित्रकर्त्यांच्या तसेच प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला सादर करणाऱ्या या व्यासपीठाचा एक भाग होण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

जास्त दिवस लागतील तर लागू दे, बॅलेटवर निवडणूक घ्या:तुम्ही सत्ताधाऱ्यांसाठी काम करता का? ठाकरे बंधुंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

मुंबई-काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), शेकापसह इतर पक्षांच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बैठकीत ठाकरे बंधुंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची कोंडी केली. विशेषतः मतदार यादीतील गोंधळावरून आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासमोर बोलती बंद झाल्याचे दिसून आले.

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावले की, ‘सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. तुम्ही सत्तेतील तीन पक्षांसाठी काम करत नाही,’ असे ते म्हणाले. ‘आमचं-तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका,’ अशी मागणी करत त्यांनी निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली.

यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ‘सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा,’ असे सांगितले. VVPAT वापरले नाही, तर सर्व पुरावे नष्ट होतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही. VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या,’ अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर राज ठाकरे म्हणाले की, ‘बॅलेटवर निवडणूक घेतल्यास जास्त दिवस लागत असतील तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याव्यतिरिक्त काय काम आहे?’ असा थेट सवाल त्यांनी केला. ‘पाच वर्षे निवडणूक घेतली नाही, अजून सहा महिने निवडणूक घेऊ नका. तुम्ही राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचे दिसते,’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण दिले की, थोरात आठ वेळा 80 ते 90 हजार मतांनी निवडून येतात, पण यावेळी लाखाने कसे पडले? हे कसे शक्य आहे, असा सवाल केला. या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले. ‘मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचे सांगा आणि निवडणूक पुढे ढकला,’ असे ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच झापले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. आम्ही कुणाशी बोलू? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला झापताना म्हटले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी त्यांच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमच्याकडे नाही. ‘आम्ही कुणाशी बोलू?’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

‘जर त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील, तर कशाला घेता? त्यापेक्षा थेट ‘ठराविक लोकांसाठी घेतलेली निवडणूक’ असे जाहीर करून टाका,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार यादीतील गोंधळावर अनेक मुद्दे मांडले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान सांगितलेल्या त्रुटींवर काम झाले नाही, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही अनेक तक्रारी आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी दुबार मतदारांवर बोट ठेवत, ‘तुमची यंत्रणा सज्ज नाही,’ अशी तक्रार केली.

बॅलेट पेपरला घाबरता ,एक वार्ड पद्धतीलाही घाबरता .. हवेत कशाला प्रभाग आणि EVM मशिनी – संजय राऊत EC वर गरजले

पॅनल सिस्टिम म्हणजे भाजपचा घोटाळ्याचा फॉर्म्युला!:मुख्यमंत्री बकवासगिरी, EC त्यांच्या इशाऱ्यावर नाचतो- संजय राऊत
मुंबई-मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट EVM मशीन देणं जर निवडणूक आयोगाला शक्य नसेल तर काल आम्ही सर्वांनी जी मागणी केली बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या त्याला का घाबरत आहात तुम्ही असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये तरी बॅलेटवर निवडणुका घेतल्या पाहिजे. मी तर म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत.

संजय राऊत म्हणाले की,यापूर्वी महाराष्ट्रात एकास एक निवडणूक झाली आहे. कशाला पाहिजे पॅनल सिस्टिम हे भाजप वाल्यांनी निवडणुकीत घोळ करण्याचे फॅड आणले आहे. एकाच भागात 4 नगरसेवक लोकांनी जायचे कुणाकडे. नाशिक, ठाण्यात एकाच भागाला 4 नगरसेवक हा बकवास पणा आहे. निवडणूक ही एकास एक असते. मुंबईमध्ये जशी एकास एक निवडणूक आहे तशी जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर यांचा पराभव होईल. पॅनल सिस्टिम? हा बकवास आहे.

संजय राऊत म्हणाले की, 20 हजार मतदार मी बाहेरुन आणले असे मिंधे गटाचा निवडून आलेला आमदार सांगतो आहे.याची दखल घ्यायला नको का? आमची लढाई तिथे सुरू आहे. पैठण मतदारसंघात 56 हजार मतदान बोगस आणि बाहेरुन आणण्यात आले आहे. आमदारांनी 20 हजारांचा आकडा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काहीही केलेले नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. फडणवीसांना महाराष्ट्रातील 25 वर्षे खासदार असलेला माणूस माहिती नसेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री जर ही बकवास-गिरी करत असेल तर त्यांची मानसिकता काय हे समजून
घ्या. उद्या आम्हीही म्हणू मोदी कोण? आम्ही तुमच्या छाताडावर बसणार हे लक्षात ठेवा. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत 51 टक्के मते मिळणार हे सांगितले आहे. याचा अर्थ त्यांनी तितका घोटाळा केला आहे. नाही तर हा आकडा आणला कुठून असा सवाल राऊत यांनी केला आहे. अजून निवडणूक घोषित व्हायच्या आहेत आम्ही बोललो की मग आमच्यावर टीका करतात.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही मुंबईतील वार्डावार्डातील आकडे दाखवत आहोत. आम्ही दिवसभर मतदारयाद्यांवर काम करत आहोत राजकीय कार्यकर्ते तुम्हाला काय मुर्ख वाटत आहे का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर निवडणूक आयोग भाजपची यंत्रणा वापरत आहे. ते भाजपचे बटीक झाले आहे.

खेडचे माजी नगराध्यक्ष  वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
पुणे : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री . खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.   आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ , असा विश्वास श्री . खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस आ . विक्रांत पाटील,   माजी आ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते .      

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की , विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे .दोन आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी  एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे  वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या  प्रवेशामुळे भाजपाला कोकणात  बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये रवेश करत आहे. भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन.  जिल्हाध्यक्ष ,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली .  
 वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये  सुबोध जाधव ,  संतोष नलावडे , सुरेश सावंत , विलास जाधव , मनिष खवळे,  मिलिंद नांदगांवकर , संजय आखाडे ,रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे.

निवडणूक प्रक्रियेवर सर्वांनाच संशय:हर्षवर्धन सपकाळ

मविआतील मनसेच्या समावेशाबाबत कोणताही प्रस्ताव वा चर्चा नाही, इंडिया आघाडीतील समावेशाचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांचा: हर्षवर्धन सपकाळ

मतचोरी व निवडणुकीतील घोटाळ्याचा मुद्दा राहुल गांधींनीच सर्वात प्रथम ऐरणीवर आणला,

नवी दिल्ली, दि. १४ ऑक्टोबर २०२५
मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष लढा देत आहे. या लढाईत देशभरातील अनेक पक्ष सहभागी होत इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील. राज्यातही भाजपाविरोधात महाविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे, असे सपकाळ म्हणाले.

निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत पण मागील काही निवडणुकांमध्ये घोटाळे करण्यात आले. मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. मतचोरीचा प्रकार राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केला आहे. हाच मुद्दा घेऊन राज्यात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड उपस्थित होते. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आघाडी वा युतीचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार…

मुंबई : आज, दिनांक 14 ऑक्टोबर 2025, मंगळवार रोजी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर अतिशय उत्साहात संपन्न झाले.
पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष .ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस .डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष .विलास केशवराव औताडे तसेच कॅप्टन.निलेश पेंढारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर शिबिराधीपती रविंद्र म्हसकर यांनी शिबिरार्थीना सेवादलाची कार्यप्रणाली यावर अतिशय सविस्तर प्रशिक्षण दिले. संध्याकाळी शिबिराथींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराच्या स्थळापासून मर्सिस, मुक्ताअळी, दिघोळे, घरतवाडी, होळी भाजी मार्केट, तरकड ग्रामपंचायत, आकटण, वासळई या भागांतून आणि गावातून संविधान सन्मान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.
तरकड ग्रामपंचायतच्या उपसरपंच श्रीमती सुनीता लिमॉस यांनी मान्यवरांचे आणि पदयात्रेचे स्वागत केले, याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदयात्रेत सहभागी झाले होते.
प्रभातफेरी नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष मा.श्री.आशितोष शिर्के साहेबांनी “मजबुतीका का नाम गांधी” या विषयावर अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले तसेच मा.श्री. राजेंद्र भिसे यांनी देखील “आजची राजकीय आव्हाने आणि सेवादलाच्या महत्वाची भूमिका” या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मा.श्री.सचिन सावंत साहेबांनी सेवादलात नवीन कार्यकर्ते तयार होऊन त्यांनी संविधान बचाव आणि सन्मानाचा विचार घेऊन गावोगावी आणि घरोघरी जावे लागेल याशिवाय काँग्रेस पक्ष निर्मितीचा इतिहास ते विद्यमान परस्थितीत सेवादलाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर अतिशय चिंतनशील मनोगत व्यक्त केले.
शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि राष्ट्रगाणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी, प्रकाश पेवेकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, मोहन घरत,.डॉमिनिक डिमेलो, रुपेश रॉड्रिक, प्रिन्स्ली घोंसाविस, सुनील यादव, किरण शिंदे आदी मान्यवरांची आणि शिबिरार्थींची उपस्थिती होती.

उच्च न्यायालयासाठी २ हजार २२८ पदांची निर्मिती

मुंबईसह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाकरिता आवश्यक मनुष्यबळ

मुंबई-मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतीमान होण्याच्या दृष्टीने २ हजार २२८ पदे निर्माण करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रीया गतीमान होण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सुविधेसाठी या पदाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मूळ शाखा व अपील शाखा आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरिता गट-अ ते गट-ड संवर्गात अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या पद निर्मितीसह या पदांसाठीच्या वेतन अनुदान व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.
ही पदे गट-अ ते गट-ड या संवर्गातील आहेत. २ हजार २२८ पदांपैकी १७१७ पदे प्रशासकीय कामकाजाशी निगडीत आहेत. आज मंजूर झालेल्या पदांपैकी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेशी संबंधित ५६२, अपील शाखेशी ७७९, औरंगाबाद खंडपीठा ५९१ आणि नागपूर खंडपीठासाठी २९६ पदांची निर्मिती होणार आहे.

‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात

कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही तर त्याच्या रूग्णांच्या कथा आणि व्यथांमधून होत असते. कुठल्या तरी आजारापायी जेव्हा एखाद्या रूग्णाचा जीव पणाला लागलेला असतो, तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरचीही प्रत्येक वेळी नव्याने परीक्षा होत असते. त्यात तो पास झाला तरच ‘ताठ कण्यानं’ जगाला सामोरा जाऊ शकतो. अशाच एका ध्येयवेड्या,  संशोधनात झोकून दिलेल्या एका डॉक्टरची कथा आहे- ताठ कणा.  डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘प्रज्ञा क्रिएशन्स’चे विजय मुडशिंगीकर, व ‘स्प्रिंग समर फिल्मसचे करण रावत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले असून दिग्दर्शक गिरीश मोहिते आहेत. 

जागतिक ख्यातीप्राप्त आणि आज वयाच्या ८६ व्या वर्षीही दररोज ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरीसाठी सज्ज असलेल्या न्यूरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांच्या विलक्षण आयुष्याची ही क्षणाक्षणाला वेगळी वळणे घेणारी सत्य कथा.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असूनही डॉक्टर होण्याचा  ध्यास त्यांनी घेतला. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर एका मोठ्या आरोपाला सामोरे गेले. त्यातून सुखरुप बाहेर पडल्यावर मोठी नोकरी सोडून देशात परत आले. द्वेष, असूया, अविश्वास यांच्याशी लढत त्यांनी अनेकांच्या पाठीचा कणा ताठ केला. परंतु एक दिवस त्यांच्या संशोधनाची अशी कसोटी लागली की सगळी बोटे त्यांच्याकडे रोखली गेली. त्याचवेळी एका ‘प्रेमा’च्या हाकेने त्यांना दुसरे एक आव्हान स्वीकारण्यास भाग पाडले.

इतरांच्या पाठीच्या कण्यावर उपचार करता करताच स्वतःच्या संशोधनाचा, इतरांच्या त्यांच्यावरील विश्वासाचा आणि पत्नीच्या द्विधा मनस्थितीचा कणा सांभाळत त्यांनी अखेर ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकले…पुढे काय झाले त्याची उत्कंठावर्धक कथा म्हणजेच संघर्ष, जिद्द आणि प्रेमाचा ‘ताठ कणा’.  उमेश कामत, दीप्ती देवी, सायली संजीव,  सुयोग गोऱ्हे, अजित भुरे, शैलेश दातार, अनुपमा ताकमोगे, रवी गोसाई,  संजीव जोतांगिया आदी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

चित्रपटाचे छायांकन कृष्णकुमार सोरेन व संकलन निलेश गावंड यांचे आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी महेश कुडाळकर यांनी सांभाळली आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. प्रशांत पवार कार्यकारी निर्माते आहेत. प्रोडक्शन कंट्रोलर जितेंद्र भोसले आहेत.

उत्कर्ष प्रकाशनच्या पहिल्या उत्कर्ष दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे : मराठी साहित्याच्या क्षेत्रात दिवाळी अंकांचे योगदान मोठे आहे. सर्जनशील लेखक तयार करणारी प्रयोगशाळा म्हणून दिवाळी अंकांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. समाजजीवनातून वैचारिकता हरवत चाललेल्या काळात दिवाळी अंकांमध्ये आजही वैचारिक मोकळेपण दिसून येते असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

उत्कर्ष प्रकाशनच्या उत्कर्ष या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज (दि. 13) प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, प्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल, कवी, लेखक स्वप्नील पोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, दिवाळी अंकाच्या संपादिका निलीमा जोशी-वाडेकर मंचावर होते. सावरकर सभागृह, कर्वे रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाळी अंकांनी लेखनातील अनेक प्रवाह स्वीकारले. कालांतराने त्या-त्या प्रवाहांचे दिवाळी अंक प्रसिद्ध होऊ लागले, असे सांगून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, दिवाळी अंकांनी संपादक, लेखक, चित्रकार यांच्यासाठी जसे पोषक वातावरण निर्माण केले त्याच प्रमाणे त्यांना प्रतिष्ठाही मिळवून दिली. जागतिकीकरणानंतर झालेल्या स्थित्यंतरामुळे दिवाळी अंकांनी इतर ज्ञानशाखांचाही विचार केला. त्याच-त्याच लेखकांमुळे काही दिवाळी अंकांमध्ये साचलेपण दिसून येते आहे, याचा विचार व्हायला हवा. भविष्याचा विचार करता लेखक अंतर्मुख होणे तर दिवाळी अंकांच्या संपादकांनी बहिर्मुख होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विजय कुवळेकर यांनी सु. वा. जोशी यांच्या कार्याचा सुरुवातीस गौरव केला. अंतरिक प्रेरणेने त्यांच्यातील उर्जा पुढील पिढीकडे संक्रमित झाली आहे. मराठी वाचकांसाठी उत्कर्ष दिवाळी अंकामुळे नवे दालन खुले झाले आहे. ते पुढे म्हणाले, दिवाळी अंकांचे संपादक जमिनीवर राहिले तर त्याला अंकासाठी खूप विषय मिळतात. याचे प्रतिबिंब उत्कर्षच्या दिवाळी अंकात दिसून येते. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा हा अंक असल्याचे ते म्हणाले.

मंगला गोडबोले म्हणाल्या, दिवाळी हा सामूहिक आनंदाचा सण असून दिवाळी अंक हा सामूहिक प्रतिभेचा, उद्गाराचा, आनंदाचा भाग आहे. साहित्य, संस्कृतीची ओल दिवाळी अंकांमुळेच टिकून राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सुधीर गाडगीळ, रवी मुकुल, स्वप्नील पोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत सु. वा. जोशी, निलीमा जोशी-वाडेकर यांनी तर सूत्रसंचालन शाम भुर्के यांनी केले.

अगर तुम ना होते कार्यक्रमातून किशोर कुमार यांना स्वरांजली

पुणे : यॉडलिंगचा बादशहा आणि बहुगुणी कलाकार किशोर कुमार यांच्या ३८व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या अनेक गीतांची जादू पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळाली.

निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेल्या सांगीतिक स्वरांजलीचे.  अगर तुम ना होते या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. १३) पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. या कायर्क्रमात अजय राव व ॲड. रुचिरा गुरव यांनी किशोर कुमार यांची सदाबहार गीते सादर केली. अनेक दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या सुरांची मोहिनी पसरवली होती.

अगर तुम ना होते, रिमझिम गिरे सावन, हाल कैसा है जनाब का, ओ हंसिनी, नखरेवाली, जिंदगी के सफर में, कोरा कागज था ये मन मेरा, पन्नाकी तमन्ना, ओ मेरे दिल के चैन, आपकी आखों मे यांसह अनेक सुप्रसिद्‌ध गीते या प्रसंगी सादर करण्यात आली. हृदयाला स्पर्श करणारे शब्द, आणि जादूई आवाज याने रसिकांना मोहित केले. अनेक गाण्यांना वन्स मोअर देत तर अनेकदा गायकांच्या सुरात सूर मिसळत, टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत हा अनोखा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. रत्ना दहीवेलकर यांनी कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत निवेदन केले.

कर्नल वसंत बल्लेवार, शरयू जोशी, व्हाईस ऑफ किशोर कुमार म्हणून ओळखले जाणारे गायक विजय केळकर व अनिल घाटगे, मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ  यांच्यासह पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मंदार जोशी, डॉ. प्रसाद पिंपळखरे, प्रा. सविता केळकर, आनंद सराफ अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत कलाकारांना प्रोत्साहित केले.

कलाकरांचे स्वागत पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीत १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची मदत जमा

📍 मंत्रालय, मुंबई | 14 ऑक्टोबर 2025

आज उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मंत्रालय येथे सुपूर्त करण्यात आला. बँकेच्या वतीने १ कोटी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार २५ लाख ५१ हजार रुपये आणि संचालक मंडळाचा सभाभत्ता १ लाख रुपये असे एकूण १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून देण्यात आली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याआधीही विविध आपत्तीच्या काळात सामाजिक जबाबदारी जपत मदतीचे कार्य केले आहे. यानिमित्तानं बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे , उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी आमदार व संचालक दिलीप मोहिते, संचालक भालचंद्र जगताप, विकासनाना दांगट, सुरेश घुले, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, संचालिका सौ. निर्मलाताई जागडे, कु. पूजा बुट्टे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य व्यवस्थापकसमीर रजपूत, सेवक संघाचे प्रतिनिधी अजितराव जाधवराव, युनियन प्रतिनिधी संजय पायगुडे, रविंद्र जोशी, तसेच अतुल साळुंखे (खाजगी सहाय्यक) आणि सेवक संचालक राजेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.