Home Blog Page 92

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ

सिंधुदुर्ग, दि. 11 एप्रिल
नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे. आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.

यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले. विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी आमदार निलेश राणे, पुण्याच्या डी.ई.एस. नवलमल फिरोदिया, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, व्हिक्टर डांटस फाउंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर एफ. डांटस कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा मार्गज, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर उपस्थित होत्या.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आधार किट वाटप उपस्थित राहून सेवा केंद्राचे वितरण केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सांस्कृतिक विभाग अजय पाटील, दिग्दर्शक दिपक कदम, तहसीलदार सचिन पाटील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी कट्टा येथील शतक महोत्सवी कट्टा पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले त्यांच्या हस्ते कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

मनःशांती- विश्वशांतीसाठी भारतीय योग व सूर्यनमस्कार दिशादर्शक

पोलंडचे तज्ञ डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांचे विचार
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या निवासस्थानी घडला हृद्य संवाद

पुणे, ११ एप्रिल ः सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शारीरिक स्वास्थ, योग चिकित्सा, मनःस्वास्थ आणि पर्यायाने समाज स्वास्थ साध्य करणे आजच्या वैश्विक अशांतीच्या काळात गरजेचे आहे, असे विचार वॉर्सा, पोलंड येथील शारीरिक शिक्षण शास्त्रातील तज्ञ प्राध्यापक डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांनी व्यक्त केले.

भारत भेटीवर आले असतांना ते थोर शिक्षण तज्ज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या विश्वशांती क्षेत्रातील कार्याने प्रभावीत होऊन  त्यांना भेटायला कोथरुड येथील त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी निमंत्रतासाठी एक स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होेता.

या  प्रसंगी डॉ. स्टेक यांना मानाची शाल आणि जगतातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

 आपली भावना व्यक्त करताना डॉ. क्रिश्टॉफ स्टेक म्हणाले, भारतीय संस्कृती ही नुसती एक जीवनशैली नसून ती जीवनाचे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. विविध धर्म, कला, संगीत, संस्कार आणि परंपरा यांचे संगम असलेली भारतीय संस्कृती केवळ भारताच नव्हे तर संपूर्ण जगभर आदर्श मानली जाते. त्याची सुंदरता, विचार आणि त्याची संस्काराधारा हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार बनतात.  विविधता, अध्यात्म आणि वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारित आध्यात्मिक व नैतिक मूल्ये, योग व आयुर्वेद यांचे मानवाच्या विकासात योगदान तसेच मानवतेची शिकवण देते.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी भावना व्यक्त केली की सध्याच्या युद्ध जन्य परिस्थितीमध्ये जेव्हा जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशा वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध स्थगितीची घोषणा करुन जगाला एका मोठ्या संकटापासून वाचविले आहे. त्याबद्दल राष्ट्रपती ट्रम्प आणि इराणचे सरकार यांचे आभार.  
डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांच्या भेटीच्या निमित्ताने जगात शांतता आणि सद्भाव पसरविण्याचा संदेश  दिला जावा अशी आशा ही डॉ. कराड यांनी व्यक्त केली. विश्वगुरु भारताची ही स्वत्वाचा बोध घेणारी मालिका कायम सुरू राहिली पाहिजे असे त्यांनी उपस्थितांना संबोधिले.

माईर्स चे  रजिस्ट्रार डॉ. रत्नदीप जोशी यांनी सांगितले की, डॉ. स्टेक यांनी पोलंड येथील यान युनिव्हर्सिटीमधून शारीरिक शिक्षणात पीएचडी केली आहे. ते गेल्या ५० वर्षापासून भारतात येऊन येथे त्यांनी  कैवल्य धाम योगसंस्था, बनारस हिदू युनिव्हर्सिटी इ. संस्थामधून संस्कृत आणि योगविषयी संशोधन केले आहे. भारतीय संस्कृतीचे वैश्विक वैचारिक दर्शन सर्व जगाला घडविण्यासाठी युरोप पासून सर्व खंडांमध्ये डॉ स्टेक करीत असलेले कार्य भारतमातेचे गौरवशाली महात्म्य वर्णन करते.

या प्रसंगी प्रा.डॉ. कराड सर यांच्या प्रेरणादायी जीवनयात्रेवर आधारित डॉ. संजय उपाध्ये यांनी रचलेल्या निवडक गीतांचे सांगीतिक सादरीकरण प्रा. शशांक दिवेकर यांनी केले. प्रा. शशांक दिवेकर यांनी या गीतांना श्रवणीय चाली बाधले आहेत. पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतींचे ऋणानुबंध घट्ट करून वसुधैव कुटुम्बकम या तत्वाचे सर्वांना स्मरण करून देणारा हा हृदय संवाद उपस्थित निमंत्रित सर्वांना खूपच भावला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ट मान्यवर या ज्ञान चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समतेचा विचार घराघरात पोहोचवूया! मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा संकल्प

पुणे: सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरूड येथील निवासस्थानी महात्मा फुले यांना अभिवादन केले. महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणात नाही, तर कृतीत आणणे आपली सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते म्हणाले की, “महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली आणि समतेचा विचार समाजात रुजवला. त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.”

या कार्यक्रमात केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे, तर कोथरूडमधील सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती, आ. योगेश टिळेकर, भाजपचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विकास लवटे, माजी शहराध्यक्ष नामदेव माळवदे, रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह अनेक दिग्गज विविध पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन महात्मा फुलेंना अभिवादन केले. त्यामुळे हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारांची उजळणी करणारा एक ऊर्जादायी उत्सव ठरला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे मानसिक आरोग्य हे राज्याच्या उज्ज्वल भविष्याचे पायाभूत तत्व आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आपण बालकांच्या भावनिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहेत.याचा फायदा भविष्यात होणार असून प्रत्येक बालक आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करू शकेल.

हा करार एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत करण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स च्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. ऑफलाइन आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, जनजागृती वाढवणे आणि मानसिक आजारांबाबतचा कलंक कमी करणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (डीएमएचपी) सोबत समन्वय साधून राबवला जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेला हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थचे संस्थापक-संचालक, डॉ. प्रा. अनिल वर्तक, उपाध्यक्ष प्राची बर्वे, सचिव स्मिता गोडसे, खजिनदार मंजिरी चव्हाण, आजीवन सदस्य संध्या वर्तक यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

अश्व क्षेत्राला मिळेल उभारी,राज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा


इक्वाइन कलेक्टिव्ह आयोजित द इक्वेस्ट्रियन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे, ११ एप्रिल ः अश्व क्षेत्रांच्या परिसंस्थेला उभारी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थाशीं सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. त्यासाठी संस्थांशी सामंजस्य करार करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या अधिपत्याखालील द इक्वाईन कलेक्टिव्ह या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
या परिषदेचे उदघाटन प्रसंगी राज्य सरकारच्या पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका  गायत्री कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालिका  डॉ. आदिती राहुल कराड, नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एफ. एफ. वाडिया व जयपाल सिंग रावल उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, या क्षेत्रात केवळ क्रीडा नाही तर ग्रामीण विकास, पर्यावरण आणि रोजगार निर्मितीमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे. नव्या कल्पना नेहमीच आव्हानात्मक असून ते शक्तीशाली असते. अश्व क्षेत्रासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारण्याची ही संकल्पना अत्यंत समायोचित आणि आवश्यक आहे.
गायत्री कराड म्हणाल्या, देशात अश्व क्षेत्र हे तिनशे अब्ज डॉलर्सचे मूल्य असलेले जागतिक अश्व परिसंस्थेचा एक भाग आहे. परंतू ते अद्याप ही असंघटित अवस्थेत आहे. या क्षेत्रातील कार्यरत मुनष्यबळाला औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणिकरणाचा अभाव दिसून येत आहे. द इक्वेस्ट्रियन फोरमच्या माध्यमातून कौशल्य, विकास कामाचे प्रमाणीकरण आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करुन देणारे एक व्यासपीठ उभारू. या क्षेत्रात कार्यरत हजारो लोकांसाठी शाश्वत संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

जयकुमार रावल म्हणाले,  “मानव आणि घोडे यांच्यातील नाते हे विश्वास, शिस्त आणि भावनिक बंधावर आधारलेले आहे. भारताला अश्व क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे; या क्षेत्राचे आधुनिकीकरण करतानाच, हा वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्व पैदास, अश्व पर्यटन, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाची मोठी क्षमता उपलब्ध आहे.”

डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले, “‘द इक्वेस्ट्रियन फोरम’  सारख्या मंचांच्या माध्यमातून, एमआयटी डब्ल्यूपियूचे उद्दिष्ट शिक्षण, प्राणी कल्याण, क्रीडा विज्ञान आणि नाविन्य  यांना परस्परांशी जोडून भारताची ‘इक्वेस्ट्रियन इकोसिस्टम’ अधिक बळकट करणे हे आहे. शाश्वत विकासासाठी शैक्षणिक संस्था, शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अनिवार्य आहे.”

उद्घाटन सत्रानंतर ‘धोरण आणि प्रशासन’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये अश्व उद्योगाचे ‘रीब्रँडिंग’ (पुर्न प्रतिष्ठापना) आणि सक्षमीकरण करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सायरस मदन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात पंकजा मुंडे,  जयकुमार रावल, ‘नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. फारुख वाडिया आणि चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिद्धू यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकुमार साहू यांनी केले.

मार्केट यार्ड परिसरातील खाजगी कोचिंग क्लास मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत भयानक कृत्य…!

पुणे- येथील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम येथील ‘मनशील अ‍ॅकॅडमी’ या खाजगी कोचिंग क्लास मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी विकास दिलीप गायकवाड (वय ३०) या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र, अ‍ॅकॅडमीच्या मालकांवर किंवा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल न झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गायकवाड हा गेल्या तीन महिन्यांपासून पीडित विद्यार्थ्याचे शारीरिक शोषण करत होता. शिकवणी वर्गाच्या परिसरातच हा सर्व किळसवाणा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी केवळ अश्लील चाळे करून थांबला नाही, तर त्याने या सर्व कृत्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले होते. या व्हिडिओचा वापर करून आरोपी पीडित मुलाला ब्लॅकमेल करत होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

बाल हक्क कार्यकर्त्यांच्या मते, अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. जर मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाला, तो एखाद्या ठिकाणी जाण्यास घाबरत असेल किंवा चिडचिडा झाला असेल, तर त्याच्याशी संवाद साधावा. तसेच, क्लासेसमध्ये प्रवेश घेताना तिथल्या सुरक्षिततेची आणि सीसीटीव्ही कव्हरेजची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

मनशील अकॅडमी’ मधील ही घटना संपूर्ण पुणे शहरासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक काळा डाग आहे. आरोपीला अटक झाली असली, तरी जोपर्यंत संस्थाचालकांची जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणात पारदर्शक तपास करून पीडित मुलाला न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालक आपल्या पोटाला चिमटा काढून हजारो हजारो रुपये फी भरून त्यांना खासगी शिकवणी वर्गांना पाठवतात. मात्र, ज्यांच्याकडे विश्वासाने पाल्याला सोपवले जाते, तिथेच जर आपली मुले सुरक्षित नसतील, पालकांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो.

सध्या आरोपी विकास गायकवाड पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यातील व्हिडिओ क्लिप्स आणि चॅटिंगची तपासणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात संस्थेच्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून केवळ कर्मचाऱ्यावरच नाही, तर ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले, त्या संस्थेवरही कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ‘मनशील अकॅडमी’ गाठून तिथल्या संचालकांना जाब विचारला. मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा संस्थांच्या निष्काळजीपणामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढते, असा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी तातडीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी विकास गायकवाडला बेड्या ठोकल्या.

मात्र, या प्रकरणात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा प्रकार घडला, त्या अकॅडमी’च्या व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही यंत्रणा असूनही तीन महिने हा प्रकार कोणाच्या लक्षात कसा आला नाही? संस्थेच्या संचालकांवर हलगर्जीपणा गुन्हा का दाखल झाला नाही? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यावर नकार दिला.

पीडित मुलगा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होता. तो अचानक शिकवणीला आणि शाळेला जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. जो मुलगा अभ्यासात हुशार होता, तो अचानक गप्प राहू लागल्याने पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पालकांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने आपल्यावर ओढवलेला हा भयंकर प्रसंग सांगितला. मुलाने सांगितलेली हकीकत ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने खासगी क्लासेससाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे, कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करणे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे अनिवार्य आहे. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये या नियमांचे पालन झाले होते का? जर कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर व्यवस्थापनाचे नियंत्रण कुठे होते? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. गंगाधाम आणि मार्केट यार्ड परिसर हा अशा शिकवणी वर्गांसाठी ओळखला जातो. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “आम्ही लाखोंची फी भरतो ती केवळ शिक्षणासाठी नाही, तर आमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठीही. जर क्लासमध्येच मुले सुरक्षित नसतील, तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा?” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .

पुणे महापालिकेला मंत्री पंकजा मुंडेंचा सल्ला:नदी सुशोभिकरणापेक्षा पर्यावरणाला,प्रदूषणमुक्तीला महत्व द्या

पुणे, दि. ११: राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीला प्राधान्य द्यावे असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत पुणे शहरातील मुळा- मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे,स्थायी समितीचेअध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या, अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. पुणे शहरातील सर्व सुरु असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जातील, त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी.

त्या पुढे म्हणाल्या, औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा, विभागांचा अभ्यास करुन नवीन धोरण आणले जाईल. बारामती येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

बैठकीत नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महानगरपालिका हद्दीत निर्माण होणारे मैलापाणी व प्रक्रिया क्षमता,अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्या व कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती,प्रकल्पातील अडथळे, वारजे,वडगाव, मुंढवा, मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राची माहिती सादर करण्यात आली.

सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत मंत्री अदिती तटकरेंनी साधला ‘आपुलकीचा संवाद’

पुणे, दि. ११ एप्रिल: मायेच्या उबेत वाढणाऱ्या निरागस चेहऱ्यांमध्ये जेव्हा सत्तेचा नव्हे तर स्नेहाचा स्पर्श मिसळतो, तेव्हा तो क्षण केवळ औपचारिक राहत नाही तो हृदयात साठवून ठेवावा असा अनुभव ठरतो. अशाच भावुक वातावरणात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृहातील अनाथ मुलींमध्ये रमल्या.

‘आपुलकीचा संवाद’ या उपक्रमातून माईंच्या कार्याला अभिवादन करत त्यांनी मुलींच्या कलागुणांना दाद दिली आणि त्यांच्या इतिहासप्रेमाला मनापासून सलाम केला.
संस्थेत आगमन होताच प्रवेशद्वाराजवळ चिमुकल्या मुलींनी स्वागत ताई म्हणत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी माईंच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावूकता दाटून आली होती. माई आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने त्या प्रत्येक हृदयात जिवंत आहेत, ही भावना सर्वांच्या मनात दाटून आली.

मुलींमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री अदिती तटकरे या अक्षरशः त्या निरागस जगात रमल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “संस्कार आणि विचार रुजविणे आजच्या काळात अतिशय कठीण झाले आहे. पण माईंच्या सर्व संस्थांमध्ये हे काम अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सुरू आहे. अनेक संस्था संगोपन करतात, पण माईंची संस्था समानतेने, मायेने आणि संस्कारांनी अनाथ मुलांचे संगोपन करत असल्याचे पाहून मनाला प्रचंड समाधान मिळते, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.

कार्यक्रमादरम्यान कु. सारिका आणि कु. पावनी यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकत अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दांतून माईंच्या आयुष्याची वेदना, संघर्ष आणि मातृत्वाचे दर्शन घडले. यानंतर चिमुकल्या मुलींनी सादर केलेला ऐतिहासिक पोवाडा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या पोवाड्यातून मुलींनी युद्धकाळातील प्रसंग जिवंत केले. इतिहासाची इतकी सखोल जाण आजच्या पिढीतील मुलींमध्ये पाहून मंत्री तटकरे या भारावून गेल्या.

श्रीमती तटकरे म्हणाल्या, आजच्या चिमुकल्या पिढीला आपला संपूर्ण इतिहास माहिती आहे, ही अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची बाब आहे.” माईंच्या सहवासाच्या आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या. माझ्या वयाचे फार कमी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना माईंचा सहवास लाभला. २००९ पासून मी माईंचे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आज त्यांच्या संस्थेत आल्यावर मन गहिवरून आले. माई आज हयात नाहीत याचे दुःख आहे, पण त्यांच्या कार्यातून त्या कायम आपल्या सोबत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री श्रीमती तटकरे यांच्या हस्ते बालगृहातील मुलींना फळांचे वाटप करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षांनी शाल श्रीफळ आणि तुळशीचे रोप भेट देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळणचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, विनय सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य रुपाली अमोल झेंडे, सभापती अमित झेंडे, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, बालगृहातील मुली आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मुकेश चौधरी यांनी केले. ‘आपुलकीचा संवाद’ हा कार्यक्रम केवळ औपचारिक नव्हता, तर तो मायेच्या सावलीत घडलेला एक भावनिक मिलाफ होता ज्यात माईंच्या आठवणी, मुलींचे निरागस हास्य आणि संस्कारांची श्रीमंती एकवटली होती.

ममता बाल सदन, कुंभारवळण येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी अनाथ मुलांच्या आधार नोंदणीतील अडचणींबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अनाथ मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना सुचविणारे ५१ पानांचे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मंत्र्यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मांडण्याची ग्वाही दिली. तसेच आपल्या सचिवांना बोलावून संबंधित बैठकीत हे निवेदन सादर करण्याच्या सूचना दिल्या. अनाथ मुलांच्या प्रश्‍नांबाबत शासन पातळीवर सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बाल विकास मंत्र्यांसमोर गप्पांचा रंग अधिकच खुलला…

ममता बाल सदन, कुंभारवळण येथे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी चिमुकल्या मुलींशी मनमोकळा संवाद साधला. “तुम्हाला काय आवडते, कोणते खेळ खेळता, कोणती पुस्तके वाचता?” असे अनेक प्रश्न त्यांनी मुलींना विचारले. मुलींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंदाने आपल्या आवडी-निवडी व्यक्त केल्या. मंत्र्यांसमोर आपण आहोत याचे भान न राहता गप्पांचा रंग अधिकच खुलला. या आपुलकीच्या संवादातून मुलींच्या चेहऱ्यावर निरागस आनंद आणि आत्मीयतेची झलक दिसून आली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई, : महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील -पणनमंत्री जयकुमार रावल

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार -पणन मंत्री जयकुमार रावल

पणन पणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन

पुणे-‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राची राजधानी मुबंई आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, याकरीता शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एकूणच राज्याचा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मार्केट यार्ड येथे आयोजित ‘आंबा महोत्सव-२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

श्री. रावल म्हणाले, सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालय आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, देवगड आणि महामँगो यांच्या माध्यमातून सुरू झालेली उत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीची संकल्पना आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेली आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बदल टप्प्याने बदल करुन या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.

यावर्षीचा महोत्सव सुमारे ४० दिवस सुरू राहणार असून यामध्ये एकूण ६० स्टॉल असून प्रत्येक दोन शेतकरी आंबा विक्री करीत आहे. येत्या काळात पणन मंडळाच्यावतीने सुमारे १५० स्टॉल उभे करण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आपला आंबा थेट ग्राहकांना विकून कायमची शृखंला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कायमचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

महोत्सवात कोकणातील पाच जिल्ह्यांमधील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी आणि इतर विविध वाणांचे आंबे उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना हापूस आंब्यासाठी जीआय मानांकन मिळाले आहे.भौगोलिक मानांकनामुळे अस्सल हापूस ओळखता येतो व फसवणूक कमी होते.

बदल्या काळानुसार ‘क्यूआर कोड’च्यामाध्यमातून आंबा फळाला नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ‘नो युवर फार्मर’ (एनयुएफ) ही संकल्पनेच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे, ज्यामुळे विश्वासार्हता अधिक वाढेल. आगामी काळात समाज माध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन मोठ्या प्रमाणात या महोत्सवाचे मार्केटिंग करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यात उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने मिलेट महोत्सव, संत्रा महोत्सव, आंबा महोत्सव, काजू-बेदाणा महोत्सव अशा विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, पणन संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग असतो.

आंबा महोत्सवाचा उद्देश शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित साधणारा आहे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री वाढवणे, मध्यस्थ कमी करणे आणि आंबा उत्पादकांना थेट ग्राहक उपलब्ध करून देणे. मध्यस्थांना वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम, दर्जेदार, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले, भौगोलिक मानांकन असलेले आंबे या महोत्सवामुळे मिळतात.

उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय हवामानामुळे आपल्या देशात आंब्याच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा त्याच्या चव, सुगंध आणि गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात केशर आंबा उत्पादन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव मिळून त्याची आर्थिक स्थर्यता मिळू शकेल.

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यापार वृद्धीसाठीही पणन मंडळाच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा उद्देश देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांचा अभ्यास करणे, विविध राज्यांमध्ये शेतमाल विक्री व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या नवकल्पनांची माहिती घेणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करणे हा आहे.

मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यसाखळी विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात येणार असून ती समुद्र, रेल्वे, विमानतळ आणि महामार्गाशी जोडण्यात येणार आहे, याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल बांधापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जलदपुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

केळीचे कलस्टर निर्मिती तसेच कांदा प्रक्रिया संदर्भात योजना आखण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करून आपल्या शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध फळांची ब्रॅण्डिंग करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असेही श्री.रावल म्हणाले.

श्री. जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आंबा महोत्सवाकरिता अधिकाधिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन आंबा खरेदी करावा, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

श्री. कदम म्हणाले, या वर्षीचा आंबा महोत्सव १० एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत पुणे मार्केटयार्ड येथे आयोजन करण्यात आला असून या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेल्यावर्षी ३४ लाख डझन आंबा विक्री झाली असून सव्वा दोनशे कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील ३ वर्षांपासून विभागीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पणन मंत्री यांच्या निर्देशानुसार आगामी काळात मंत्रालय, महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र मंडळ येथे आंबा महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री.कदम म्हणाले.

उद्घाटनंतर मंत्री श्री. रावल यांनी स्टॉल भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Jaykumar Rawal

खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय ,हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार

पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. ‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले यांच्या जन्मगावातून द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खानवडी येथे महात्मा फुले यांच्या मूळ घराची प्रतिकृती तसेच नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा प्रकल्प कटगुण येथे तर नायगाव येथे सुमारे १५० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल घोरपडे यांनी या शाळेच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार होणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे दालन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. खानवडी येथे १२ एकर जागेवर उभारलेल्या या शाळेत प्रयोगशाळा आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही शाळा ज्युनिअर केजी ते इयत्ता १२ वीपर्यंतची सीबीएसई पॅटर्नची असून गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत २८० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्ताने महात्मा फुले स्मारकात जाऊन अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी शाळा संकुलास भेट देत विविध सुविधा पाहणी केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल बँक योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण असलेल्या शैक्षणिक दालनास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली. जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या ८८ विविध लॅब्सचे उद्घाटनही मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, राहुल कुल, शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले

पुणे-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले. या मैदानापासूनच काही अंतरावरच हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले. तत्पूर्वी, भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आीहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होते का? पायलटकडून नेमकी कशी वा का झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व्हिआयपी लोकांची सुरक्षा व समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा.

विधान भवनात महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभनिमित्त अभिवादन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समतेचा संदेश

मुंबई, दि. ११ एप्रिल २०२६ : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज विधान भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “ज्या महिलांना शिक्षणाचा लाभ झाला, त्यांच्यापैकी मी स्वतः एक आहे. आम्ही सर्वजणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या आहोत. आज माझ्या हस्ते येथे अभिवादन होत आहे, हे सर्व त्यांच्या आणि सर्व समाजसुधारकांच्या कार्याचे श्रेय आहे. मी त्यांना मनापासून नतमस्तक होऊन अभिवादन करते.”

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. कार्यक्रमास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव श्री. विजय कोमटवार, उपसभापतींचे खासगी सचिव श्री. अविनाश रणखांब, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक व जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, फुले दांपत्याच्या प्रयत्नांमुळे समाजात परिवर्तनाची चळवळ उभी राहिली.

त्या पुढे म्हणाल्या की, द्विशताब्दी वर्षानिमित्त समाजात समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासासाठी नव्याने संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण, विकास, तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रगत समाज घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले

एप्रिल 11, 2026

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे. समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे. त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

‘विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नितीविना गती गेली,

गती विना वित्त गेले,

वित्तविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले’…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे: लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले. सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी  एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले.  आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

०००

प्रवीण टाकेउपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर 9702858777

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळा

मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव

सिंधुदुर्गनगरी, :- “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राणे साहेबांच्या संसदेतील आणि विधानसभेतील अभ्यासू वृत्तीचा गौरव करताना सांगितले की, अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या ‘बजेट कसं वाचावं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली येथे माजी मुख्यमंत्री,  खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्यासाठी  उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर , आमदार रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, निलेश राणे आदी उपस्थित आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या जीवनपटावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पार पडले.

राणे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, साहेब म्हणजे एक अत्यंत ‘दिलदार’ व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कामात कमालीची शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य असते, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज आणि गोशाळा होय. साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी नीलम ताई यांचा मोठा सहभाग असून, निलेश आणि नितेश राणे यांनी त्यांचा राजकीय वारसा योग्य प्रकारे पुढे चालविला आहे. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा ही साहेबांची ओळख असली, तरी त्यांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल आणि माझ्यासारख्या सहकाऱ्यांबद्दल नेहमीच मायेची ओढ राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

या सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे साहेबांच्या जिद्दीचे कौतुक केले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले तरी राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही, उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. एक प्रभावी आणि आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम असून, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणांचा अभ्यास नवीन सदस्यांनी करायला हवा, इतके ते मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी सांगितले.

 उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, कोकणातील जनतेने राणे साहेबांना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे मान दिला आहे. त्यांच्या धाकातही माया आहे आणि मार्गदर्शनातही आपुलकी आहे. माझ्या राजकीय प्रवासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्यासारखा मार्गदर्शक लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, वरवडे सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली राणे साहेबांची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. शाखा प्रमुखापासून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा आदर्श नमुना आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख मिळाली असून, मेडिकल कॉलेजसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याची प्रगती अधिक वेगाने झाली आहे. अशा या जननेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राणे साहेबांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे, त्यांना उभारी देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला प्रेरणा आणि दिशा मिळते. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक कार्यकर्ते आज आत्मविश्वासाने काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम राणे साहेबांनी केले असून, त्यांच्या स्पष्ट विचारांमुळेच या भागाचा कायापालट झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी अत्यंत भावनिक शब्दांत या गौरव सोहळ्यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, आयुष्य हे केवळ यश-अपयशाचा प्रवास नसून, प्रामाणिक प्रयत्नांची एक अखंड साधना आहे. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड दिली, तर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते. मी राजकारणात जे काही मिळवलं, ते कोणाच्या आधारावर नाही, तर माझ्या जिद्दीवर आणि कठोर परिश्रमांवर मिळवलं आहे. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, अनेक प्रसंगांना सामोरे गेलो, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही—ती म्हणजे हार मानण्याची वृत्ती. संकटे आली, अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी नव्या उमेदीने उभा राहिलो. आज जे माझं कौतुक होत आहे, ते माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी अमूल्य संपत्ती आहे. हा सन्मान, हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श माझ्या आयुष्याचा आधार राहिला आहे. त्यांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणुकीतूनच मी माणुसकी, कर्तव्य आणि स्वाभिमान यांना सर्वोच्च स्थान दिलं आहे.  माझ्या आयुष्यात मी नेहमी माणुसकीला महत्व दिलं, कारण माणूस म्हणून जगणं हेच खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांच्या हिताचा विचार करा—यश तुमच्या पाठीशी उभं राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.