Home Blog Page 90

मतदानाच्या सर्वसमान अधिकारासाठी मविआ’चा संघर्ष… ही संविधानीक कर्तव्यपूर्ती..!- काँग्रेस’ची फडणवीसांवर टीका

विरोधकां विषयी उपहासात्मक बोलण्यास बुद्धी लागत नाही…!
पुणे –
‘जनतेच्या मतांच्या मौलीक हक्का संबंघि’ मविआ’ शिष्टमंडळ निवडणुक आयोगास भेटल्याच्या पार्श्वभूमिवर निवडणुक आयोगाची चपलाशी करण्याच्या नादात,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर उपहासक पध्दतीने वक्तव्ये करून विरोधी पक्ष नेत्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला निंद्य प्रयत्न ‘महाराष्ट्राच्या सुसंस्कृत नेतृत्वाच्या परंपरेला’ गालबोट लावणारा असल्याची प्रखर टीका प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
विरोधक हे सत्ताधारी पक्षाचे शत्रू नसुन, जनतेचा आवाज व आशास्थान आहे हे फडणवीसांना समजू नये काय (?) असा सवाल केला.
वास्तविक पाहता, मविआ पक्षातील नेत्यांनी फडणवीसांच्या कालावधी पेक्षाही जास्त कालावधी जनतेच्या पाठींब्यावर, विरोधी पक्षांची तोडफोड न करता व मतचोरींच्या आरोपां शिवाय निर्वादातीत कालावधी वारंवार उपभोगला आहे याचे किमान भान फडणवीसांनी ठेवायला हवे होते.
गांधीवादी, सर्वोदयी विचारांचे पाईक व चळवळीतील, निष्ठावान व निष्कलंक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांची पात्रता काढण्यापुर्वी, केवळ आमदार गंगाधर फडणवीसांचे चिरंजीव म्हणून ‘तरूण वयात महापौर पद’ पदरात पडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी विचार करायला हवा होता, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली
‘आयोगास’ विचारलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने निवडणूक आयोगाची दातखीळ बसल्याने, जनतेच्या मतदानाच्या मुलभूत अधिकारा विषयी खरेतर सत्तापक्षाने कर्तव्यपुर्तीचा राजधर्म निभावून मतदार याद्या विषयी उपस्थित प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगास देणे भाग पाडले पाहिजे मात्र त्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्नच मुख्यमंत्री फडणवीस व सत्ता पक्ष करीत जनतेचा संशय दृढ करण्याचेच काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील जनतेची विश्वासार्हता जोपासत जनतेच्या पाठींब्यावर अनेकदा सत्तेत राहीलेल्या नेत्यांना ‘भरकटलेले / विखुरलेले’ अशी उपहासात्मक टिप्पणी करण्यास अक्कल लागत नसल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

जैन समाजाच्या भावना भडकावून ब्लॅकमेलिंगचा प्रकार-ट्रस्टचे अध्यक्ष चकोर दोषींचा आरोप

0

मंदिर बोर्डिंग यांचाही पुनर्विकास होईल …

पुणे-मॉडेल कॉलनीतील जैन समाजाच्या पब्लिक ट्रस्ट ने साडेतीन एकराच्या जागेच्या केलेल्या कायदेशीर व्यवहाराबाबत धार्मिक हस्तक्षेप करून जैन समाजाच्या भावना भडकावून ब्लॅकमेलिंगचा प्रकार राबविला जात असल्याचा खुलासा कम आरोप हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट चे चेर्मान चकोर दोषी यांनी काल ‘ठराविक’माध्यमांना पाठविलेल्या एका प्रेस रिलीज द्वारे केला आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे कि,’अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित तथाकथित व्यक्ती या जैन समाजातील लोकांच्या भावना भडकावून सदर प्रकरणास जाणिवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. अॅड. योगेश पांडे व राजु शेट्टी यांचा न्यासाशी कोणताही संबंध नसताना देखील सुरूवातीपासून आजतागायत ते आमची जनसामांन्यात जाणीवपुर्वक बदनामी करीत आहेत.आमचेवर केलेले सर्व आरोप हे चुकीचे व गैरहेतूने केलेले आहेत.आमचे बाबत खोट्या बातम्या पसरवून व लोकांसमोर वस्तुस्थिती न ठेवता, आमचे विरूध्द जैन समाजातील लोकांच्या भावना भडकविण्यात आल्या.न्यासाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच न्यासाची मिळकत मा. धर्मादाय आयुक्त यांची रितसर पूर्वपरवानगी घेवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना खरेदी दिलेली आहेसेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची मालमत्ता विक्रीचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीगत फायद्यासाठी नसून ट्रस्टच्या हितासाठी व ट्रस्टच्या भविष्यात राबविण्यात येणा-या उददेशांसाठी घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी न्यासाच्या विश्वस्तांमार्फत समाजहिताचे निर्णय घेतले गेलेले असुन ट्रस्टमार्फत आजतागायत समाजाची सेवा केली जात आहे. खरेतर न्यासाच्या मिळकतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा न्यासाला हक्क व अधिकार आहे.सदर ठिकाणी असलेले मंदीर पाडणार आहोत. सदर बाब ही खोटी असुन फक्त लोकांच्या भावना भडकविण्यासाठी अशा प्रकारे वेळोवेळी खोटी विधाने जाणीवपुर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आली. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की, न्यासामार्फत ते आहे त्याच ठिकाणी आहे त्या स्थितीत ठेवले जाईल व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा हस्तक्षेप होणार नाही हॉस्टेल पाडण्यात येवून समाजातील गोर-गरीब तसेच या ठिकाणी शिक्षणाकरिता येणारे विद्यार्थ्यांना हॉस्टेल सुविधेपासून वंचित ठेवण्यात येईल असे देखील समाज माध्यमांवर ठराविक व्यक्तींनी खोटी विधाने करण्यास सुरूवात केली. हॉस्टेलच्या एकुण बांधकाम क्षेत्रापेक्षा सुमारे २.८ पट जास्त क्षेत्र असलेले हॉस्टेल मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी त्यांचे खर्चाने न्यासास बांधून देणार आहेत.प्रार्थनास्थळ पाडण्याचा आमचा कोणताही उद्देष नाही. याउलट हॉस्टेलचे बांधकाम देखील आम्ही आधीपेक्षा जास्त करून घेणार आहोत.

सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट सत्य स्थितीचा जाहीर खुलासा
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या न्यासाची स्थापना सन १९५८ साली श्री गुलाबचंद हिराचंद व श्री लालचंद हिराचंद यांचेमार्फत मुख्यत्वे गरीब व गरजूंकरिता वसतीगृह व शैक्षणिक सोयी कोणत्याही विशिष्ट धार्मिक समुदायासाठी मर्यादित न ठेवता सर्वाना उपलब्ध करून देणे या उददेशाने करण्यात आली होती.
सदर उददेशास अनुसरून दि. २९/०७/१९५८ रोजी नोंदणीकृत खरेदीखताने श्री. मोतीचंद गौतमचंद शहा यांचेकडून न्यासाने मॉडेल कॉलनी, भांबुर्डा शिवाजीनगर, पुणे येथील मालमत्तेची खरेदी केलेली असून त्याबाबतचे खरेदीखत मे. दुय्यम निबंधक, हवेली नं. २, पुणे यांचे कचेरीत अनु. क. ८७१/१९५८ वर रितसर नोंदविलेले आहे. सदर जमीन मिळकतीवर हॉस्टेल व अनुषंगिक इमारतींचे स्वरुपात बांधकाम करण्यात आलेले आहे.
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची मालमत्ता विक्रीचा निर्णय हा कोणत्याही व्यक्तीगत फायद्यासाठी नसून ट्रस्टच्या हितासाठी व ट्रस्टच्या भविष्यात राबविण्यात येणा-या उददेशांसाठी घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी न्यासाच्या विश्वस्तांमार्फत समाजहिताचे निर्णय घेतले गेलेले असुन ट्रस्टमार्फत आजतागायत समाजाची सेवा केली जात आहे. खरेतर न्यासाच्या मिळकतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा न्यासाला हक्क व अधिकार आहे. परंतु अप्रत्यक्ष धार्मिक हस्तक्षेपामुळे आम्हांस प्रचंड मानसिक त्रास झालेला असुन काही व्यक्तींनी आमच्या भावना समजावून न घेता, काही विशिष्ट हेतूने प्रेरित होवून आमचेवर नाहक बदनामीकारक आरोप केलेले आहेत.

न्यासाच्या घटनेप्रमाणे असणारे मुख्य उददेश व इतर उददेश याला सदर व्यवहारामुळे कोणत्याही प्रकारे बाधा निर्माण होत नसून उलटपक्षी न्यासाच्या उददेशास अनुसरूनच न्यासाच्या हिताकरिता सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत.
आमचेवर केलेले सर्व आरोप हे चुकीचे व गैरहेतूने केलेले आहेत. न्यासाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच न्यासाची मिळकत मा. धर्मादाय आयुक्त यांची रितसर पूर्वपरवानगी घेवून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना खरेदी दिलेली आहे.
न्यासाने यासंदर्भात रितसर विश्वस्त मंडळाची सभा घेवून दि. १६/१२/२०२४ रोजी न्यासाच्या मॉडेल कॉलनी, भांबुर्डा शिवाजीनगर, पुणे येथील मालमत्तेच्या विकीसंदर्भातील ठराव मंजुर केलेले आहेत. या संदर्भात ट्रस्टने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांमार्फत न्यासाने दि. २०/१२/२०२४ रोजी ४ वर्तमानपत्रात म्हणजेच दै. प्रभात, दै. पुढारी, दै. फायनान्शियल एक्सप्रेस पुणे व दै. बिझनेस स्टॅण्डर्ड मुंबई या वर्तमानपत्रांमध्ये निविदांबाबत (टेंडरबाबत) रितसर जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहीर नोटिसीप्रमाणे ज्या कोणास न्यासाची मिळकत खरेदी करण्याची आहे त्यांनी ३० दिवसांच्या आत निविदा (टेंडर) भरणे आवश्यक होते. सदर निविदा स्वीकारण्याचा शेवटवा दिवस हा दि. २०/०१/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजेपर्यंत होता. सबब, सदर निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रत्येकास संधी देण्यात आलेली होती.
सदर जाहीर नोटिसीस अनुसरून मे गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी व इतर अनेक विकसकांनी न्यासाकडे निविदा (टेंडर) भरलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आलेल्या निविदांची न्यासाने नेमलेले प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्स्लटन्ट) म्हणजेच मेरिट रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी सखोल तपासणी केली. विश्वस्त मंडळाने केलेल्या चर्चेस अनुसरून तसेच प्रकल्प सल्लागारांनी केलेल्या तपासणी या सर्व बाबींचा विचार करून मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी भरलेली निविदा ही सर्वात जास्त तसेच योग्य व वाजवी असल्याने न्यासाने त्यांचे दि. २७/०१/२०२५ रोजीच्या ठरावाने त्यांची निविदा मान्य करून ती स्वीकारली. त्यानंतर न्यासाने मा. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेण्याच्या अटीस अधिन राहून दि. २८/०१/२०२५ रोजी निविदा स्वीकारत असलेबाबत मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना रितसर पत्र दिलेले आहे.
तदअनुषंगाने न्यासाने दि. १३/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ३६ (१) चे तरतुदीनुसार मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडे विक्री परवानगीकरिता रितसर अर्ज दाखल केला होता. न्यासाने दाखल केलेल्या अर्जाची योग्य ती चौकशी करून मा. धर्मादाय आयुक्त यांनी दि. ०४/०४/२०२५ रोजी आदेश पारीत करून न्यासाच्या मालमत्तेची विक्री रुपये २३० कोटी व १०,००० चौ फु. जागेवर ५२,००० चौ. फु. चे सर्व सोयीसुविधांयुक्त हॉस्टेल या मोबदल्यावर काही अटी व शर्तीसह मे. गोखले लँडमार्क्स एल एल पी यांना करण्यास परवानगी दिली.
सदर परवानगीस अनुसरून न्यासाने में, गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांना दि. १५/०५/२०२५ रोजी मिळकतीचे साठेखत लिहुन दिलेले आहे. सदर साठेखतास अनुसरून व मा. धर्मादाय आयुक्त यांचे परवानगीस अनुसरून, गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी न्यासाला आजपर्यंत संपूर्ण मोबदला रक्कम अदा केलली आहेत. त्यानंतरच न्यासाने मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांचे लाभात दि. ०८/१०/२०२५ रोजी नोंदणीकृत खरेदीखत केलेले आहे
सबब, साधारणतः संपूर्ण निविदा प्रक्रिया तसेच त्याअनुषंगाने घेण्यात आलेली मा. धर्मादाय आयुक्त यांची परवानगी याकरिता एकूण ७-८ महिन्यांचा कालावधी लागला. सदर प्रक्रियेदरम्यान न्यासाने दि. २०/१२/२०२४ रोजी दोन मराठी व दोन इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये रितसर जाहिर नोटिसा प्रसिध्द केलेल्या आहेत. तसेच दि. १५/०५/२०२५ रोजीचे साठेखत व दि. ०८/१०/२०२५ रोजीचे खरेदीखत हे मे. दुय्यम निबंधक हवेली यांचे कचेरीत रितसर नोंदविण्यात आलेले आहे. सबब, या सर्व बाबी, सार्वजनिक कार्यक्षेत्रात (पब्लिक डोमेन) येत असल्याने त्याबाबत्त सर्वांना रितसर माहिती होती. असे असतानादेखील या सर्व प्रक्रियेस आजतागायत कोणीही कोणत्याही स्वरूपाची हरकत नोंदविलेली नाही. सबब, या सर्व बाबी, सार्वजनिक कार्यक्षेत्रात (पब्लिक डोमेन) येत असल्याने त्याबाबत सर्वांना रितसर माहिती होती. असे असतानादेखील या सर्व प्रक्रियेस आजतागायत कोणीही कोणत्याही स्वरूपाची हरकत नोंदविलेली नाही.
दरम्यानच्या काळात ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर काही व्यक्तींमार्फत या सर्व प्रकरणास वेगळे वळण लावण्यात आले संबंधित व्यक्तींनी अॅड. योगेश पांडे व श्री राजु शेटटी यांना सर्वप्रथम हातास धरून, आम्हास नोटिसा पाठवून आमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर दबावास आम्ही बळी न पडल्याने त्यानंतर आम्हास मिळालेल्या माहितीनुसार असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा)या कंपनीची स्थापना माहे जुलै २०२५ मध्ये करण्यात आलेल्या कंपनीच्या माध्यमातून आमचे बाबत खोट्या बातम्या पसरवून व लोकांसमोर वस्तुस्थिती न ठेवता, आमचे विरूध्द जैन समाजातील लोकांच्या भावना भडकविण्यात आल्या.
सर्वप्रथम लोकांना असे सांगण्यात आले की, सदर ठिकाणी असलेले मंदीर पाडणार आहोत. सदर बाब ही खोटी असुन फक्त लोकांच्या भावना भडकविण्यासाठी अशा प्रकारे वेळोवेळी खोटी विधाने जाणीवपुर्वक समाज माध्यमांमध्ये पसरविण्यात आली. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की, न्यासामार्फत ते आहे त्याच ठिकाणी आहे त्या स्थितीत ठेवले जाईल व त्यात कोणत्याही प्रकारचा बदल अथवा हस्तक्षेप होणार नाही असे याआधीच संबंधित लोकांना सांगितलेले होते. तसेच त्याबाबत आम्ही दि. १५/०५/२०२५ रोजीच्या साठेखतामध्ये कलम ५ (जी २) व दि. ०८/१०/२०२५ रोजीच्या खरेदीखतामध्ये कलम ३ यांत रितसर व स्पष्ट तरतुद केलेली आहे.
खरी परिस्थिती अशी आहे की, याआधी असलेल्या हॉस्टेलच्या एकुण बांधकाम क्षेत्रापेक्षा सुमारे २.८ पट जास्त क्षेत्र असलेले हॉस्टेल मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी त्यांचे खचनि न्यासास बांधून देणार आहेत. (सध्याचे हॉस्टेल अंदाजे १८,२०० चौ. फु. नव्याने मिळणारे हॉस्टेल अंदाजे ५२,००० चौ. फु.) परंतु लोकांना असे सांगण्यात आले की, सदर ठिकाणी असलेले हॉस्टेल पाडण्यात येवून समाजातील गोर-गरीब तसेच या ठिकाणी शिक्षणाकरिता येणारे विद्यार्थ्यांना हॉस्टेल सुविधेपासून वंचित ठेवण्यात येईल असे देखील समाज माध्यमांवर ठराविक व्यक्तींनी खोटी विधाने करण्यास सुरूवात केली.
इथे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की प्रार्थनास्थळ पाडण्याचा आमचा कोणताही उद्देष नाही. याउलट हॉस्टेलचे बांधकाम देखील आम्ही आधीपेक्षा जास्त करून घेणार आहोत. तसेच मे. गोखले लॅण्डमार्क्स एलएलपी यांनी याशिवाय न्यासाला रक्कम रू. २३० कोटी अदा केलेले आहेत. या सर्व बाबी जैन धर्मातील संबंधित लोकांपासुन जाणीवपुर्वक लपविण्यात येवून त्या बाबींचा जाणीवपुर्वक खोटी विधाने करून विपर्यास करण्यात येत आहे. सदर रक्कम रू. २३० कोटींवर येणाऱ्या व्याजाच्या रक्कमेचा विनियोग देखील न्यासाच्या उद्देशाकरिताच केला जाणार आहे.
कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा आमचा कधीही उद्देश नव्हता व नाही. तसेच हॉस्टेलची सुविधा देखील बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही. असे असताना देखील अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित तथाकथित व्यक्ती या जैन समाजातील लोकांच्या भावना भडकावून सदर प्रकरणास जाणिवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. अॅड. योगेश पांडे व राजु शेट्टी यांचा न्यासाशी कोणताही संबंध नसताना देखील सुरूवातीपासून आजतागायत ते आमची जनसामांन्यात जाणीवपुर्वक बदनामी करीत आहेत.
तथाकथित असोसिएशन ऑफ एस. एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा), यांनी मा. उच्च न्यायालयात दिवाणी रिट याचिका क्र. १२८६९/२०२५ दाखल केलेली आहे. सदर याचिका प्रलंबित आहे. सदर याचिकेमध्ये सदर कंपनी ने मा. उच्च न्यायालयाकडुन अंतरिम मनाईचे आदेश देणेबाबत विनंती केलेली होती. परंतु मा. उच्च न्यायालयाने असे कोणतेही मनाईचे आदेश पारित केलेले नाहीत. असे असताना देखील समाजमाध्यमांवर असे मनाईचे आदेश पारित केलेले आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न चालू असुन त्या नावाखाली सदर अॅड. योगेश पांडे तसेच असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) यांचे तथाकथित संचालक हे तमाम जैन समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्याबाबत आम्ही आमचे वकीलांचे सल्ल्याने योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत.
सदर अॅड. योगेश पांडे व असोसिएशन ऑफ एस.एच.एन.डी. हॉस्टेल अॅल्युमिनी (आशा) मधील संबंधित संचालक लोकांमध्ये गैरसमज पसरवून समाजामध्ये अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे.
सबब, आम्ही कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार केलेला नसून यासंदर्भातील सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली आहे. तरी कोणीही आमचेबाबत गैरसमज करून घेवू नये.
सत्यपरिस्थिती आपणास अवगत व्हावी याकरिता हे निवेदन.
श्री. चकोर एल दोशी
चेअरमन
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट



जैन मंदिर व HND हॉस्टेल बळकावण्याचा प्रकार आसुरी, मदमस्त खासदार म्हणत रवींद्र धंगेकरांची जहरी टीका

पुणे- जैन मंदिर आणि बोर्डिंग खरेदीच्या संशयास्पद व्यवहारात जैन समाजाने आणि मुनींनी खासदार आणि मंत्री मोहोळ यांचे वाभाडे काढत आरोपांच्या फैरी झाडल्या असताना त्यास प्रत्यक्ष उत्तरे न देता हस्ते परहस्ते स्पष्टीकरण मंत्री मोहोळ यांच्याकडून दिले जात आहे तर तिसरीकडे कालच या सर्व प्रकरणात आता पुण्याचे वादग्रस्त ? असा प्रश्न न करता बहुचर्चित आणि आक्रमक म्हणता येतील असे माजी आमदार रवी धंगेकर यांनी मात्र मोहोळ यांचे नाव न घेता पुण्याचे खासदार असे शब्द वापरत मोहोळ यांच्यावर टीकेचे महास्त्र सोडले आहे आणि जैन मंदिर व HND हॉस्टेल ची विटही हलवू देणार नाही असा पवित्रा जाहीर केला आहे .

प्रत्यक्षात रवी धंगेकर यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात खाली वाचा

पुणे शाळेतील मॉडेल कॉलनी येथे असणारे जैन मंदिर व HND हॉस्टेल कवडीमोल भावात पुण्यातील गोखले नामक बिल्डरला विकण्याचा घाट घातल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. जैन मंदिर व HND हॉस्टेल वाचविण्यासाठी समस्त जैन बांधवांनी काढलेल्या भव्य मोर्चात सहभागी होत या लढाईत मी त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

पुणे शहराचा खासदार सत्तेच्या बळावर एका बिल्डरला पार्टनर काय होतो, त्यानंतर या शहरातील मोक्याचा जागा – मैदाने हडप करण्याचा आसुरी प्रयत्न करतो आणि या मदमस्त व्यक्तीची हिंमत इतकी वाढते की थेट जैन मंदिर देखील बळकवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला आहे. अर्थात याला बहुमोल सहकार्य लाभले आहे धर्मदाय आयुक्तांचे..!

एरवी हाताला लकवा बसल्याप्रमाणे वर्षानुवर्ष प्रकरणे निकाली न काढणाऱ्या धर्मदायुक्तांनी संबंधित नेत्याचे तळवे चाटत अवघ्या महिने भरात हा सगळा व्यवहार पूर्ण करून दिला आहे.

माझा तमाम पुणेकरांच्या वतीने जैन बांधवांना शब्द आहे, आपले मंदिर आणि आपले HND होस्टेल याची वीट सुद्धा मी त्या लोकांना काढू देणार नाही. आपले जैन मंदिर व हॉस्टेल आहे त्याच ठिकाणी राहील. यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची आपली तयारी आहे.

एमपीएससी 2026 – विविध परीक्षांचे ‎वेळापत्रक जाहीर, उमेदवार तयारीला‎:स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना आता परीक्षेनुसार करता येणार नियाेजन‎

पुणे -एमपीएससीच्या २०२५ मधील काही‎महत्त्वाच्या परीक्षा अजून बाकी‎आहेत. असे असतानाच स्पर्धा‎ परीक्षांची तयारी करणाऱ्या ‎उमेदवारांना दिलासा देणारी बाब‎ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने‎२०२६ मधील विविध परीक्षांचे‎संभाव्य वेळापत्रक जाहीर केले‎आहे. यामुळे उमेदवारांना‎परीक्षेनुसार नियोजन करण्यासाठी ‎आता दिलासा मिळाला आहे.‎

राज्यभरातून विविध शाखांचे‎विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा‎परीक्षेतून करिअरची संधी मिळवू‎इच्छितात. प्रशासकीय सेवेत जाता‎यावे, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा‎आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या‎विविध परीक्षा देतात. उमेदवारांना‎परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने‎करता यावी, यासाठी नियोजन‎देखील चांगले असावे. या हेतूने‎आयोगाने २०२६ मध्ये होणाऱ्या‎गट क, गट ब यासह कृषी,‎अभियांत्रिकी आणि मुख्य परीक्षा,‎संयुक्त परीक्षांचे वेळापत्रक‎जाहीर केले आहे. या‎वेळापत्रकानुसार राज्यसेवा मुख्य‎परीक्षा २०२५ ही २९ मार्च २०२६‎ला घेण्यात येणार आहे. वनसेवा‎मुख्य परीक्षा गट अ ही ५ मे २०२६‎मध्ये घेण्यात येणार आहे. गेल्या‎काही वर्षांत परीक्षांचे वेळापत्रक‎जाहीर झाल्यानंतरही अडचणी‎आल्याने वेळापत्रकात बदल‎केला होता. तसेच‎अतिवृष्टीमुळेही ऑक्टोबरमध्ये‎होणाऱ्या परीक्षेची तारीख‎बदलण्यात आली. आता मात्र‎विद्यार्थ्यांना नियोजन करण्यासाठी‎२०२६ चे संभाव्य वेळापत्रक‎आयोगाने जाहीर केल्याचे‎सूचनापत्रात म्हटले आहे.‎

या वेळी उमेदवारांना नियोजनासाठी मिळणार पुरेसा वेळ‎

दरवर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये पुढील वेळापत्रक जाहीर होते, परंतु यंदा ऑक्टोबर‎२०२६ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले. यामुळे उमेदवारांना‎पुरेसा वेळ पुढील परीक्षांच्या तयारीसाठी मिळेल. त्याचे नियोजनही करता येईल.‎

  • अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.‎

असे आहे विविध परीक्षांचे जाहीर संभाव्य वेळापत्रक‎

राज्यसेवा मुख्य‎परीक्षा २०२५ : २९ मार्च‎२०२६, निकाल ऑगस्ट‎२०२६ ५ एप्रिल पेपर ३, १८‎एप्रिल सामान्य अध्ययन १,‎२०२६ १९ एप्रिल २०२६,‎सामान्य अध्ययन ३, २६‎एप्रिल वैकल्पिक पेपर,‎निकाल ऑगस्टमध्ये‎
महाराष्ट्र वनसेवा‎मुख्य परीक्षा २०२५ : ५ ते‎७ मे २०२६‎
स्थापत्य अभियांत्रिकी‎सेवा मुख्य परीक्षा २०२५‎: ७ ते ९ मे २०२६‎
कृषी सेवा मुख्य २०२५‎: १६ मे २०२६‎
गट ब सेवा संयुक्त‎मुख्य परीक्षा २०२५ : १७‎मे २०२६, निकाल‎सप्टेंबरमध्ये‎
गट क सेवा संयुक्त‎पूर्व परीक्षा : ४ जानेवारी‎२०२६‎
अन्न व औषध‎प्रशासकीय सेवा मुख्य‎परीक्षा : २१ नोव्हेंबर २०२६‎
वनसेवा मुख्य परीक्षा‎२०२६ : २६ डिसेंबर २०२६‎
गट ब संयुक्त पूर्व‎परीक्षा : १४ जून, निकाल‎ऑक्टोबरमध्ये‎
गट क संयुक्त पूर्व‎परीक्षा : १२ जुलै,‎नोव्हेंबरमध्ये निकाल‎
गट क मधील संयुक्त‎सेवा मुख्य परीक्षा : १३‎डिसेंबर, निकाल एप्रिल‎२०२७.‎

पुणे मेट्रोसाठी येरवड्यातील ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२५:
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला येरवडा येथील ४८,६०० चौ.मी. शासकीय जमीन कायमस्वरुपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही जमीन मेट्रो प्रकल्पासाठी लागणारा व्यवहार्यता तफावत निधी (Viability Gap Funding – VGF) उभारण्यासाठी वापरली जाणार आहे.

येरवडा (ता. पुणे शहर) येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला देण्यात आली आहे. यामध्ये सिटीसर्वे २२०१ मधील १४,८८० चौ.मी., सिटीसर्वे
२२१६ मधील १५,६६०.१ चौ.मी. आणि सिटीसर्वे २२२० मधील १५,९५४ चौ.मी. क्षेत्राचा समावेश आहे. ही जमीन भांबुर्डा येथील १० हे. ६० आर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून हस्तांतरित करण्यात आली आहे.

यासाठी शासनाने काही अटी घातल्या असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ आणि नियम १९७१ नुसार, ही जमीन मोफत आणि कायमस्वरुपी कब्जेहक्काने देण्यात आली आहे. पीएमआरडीएने ही जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून धारण करावी. जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारे उत्पन्न शासनाच्या व्यवहार्यता तफावत निधीसाठी वापरले जाईल.
सिटीसर्वे २२२० वरील शिक्षण संकुलाचे आरक्षण नगर विकास विभागाने लवकर बदलावे. जमिनीचा वापर केवळ मेट्रो प्रकल्पासाठीच करणे बंधनकारक आहे. अटींचा भंग झाल्यास जमीन शासन जमा करू शकते. पुणे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणापूर्वीपीएमआरडीएकडून लेखी हमीपत्र घ्यावे लागेल.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय पुणे मेट्रोच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करा! ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुण्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये बैठक

पुणे -आगामी काळात पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी, असा निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. रस्ते विकास आणि महावितरणशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी या बैठकीत दिले.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिकेच्या खात्याशी संबंधित विविध विकास कामांसंदर्भात आढावा बैठक आज संपन्न झाली. यावेळी आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त नवकिशोर राम यांनी विविध विभागाच्या माध्यमातून शहरात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा यांसह इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश होता.

त्यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “शहरात सुरू असलेले विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत. तसेच पावसाळ्यामुळे झालेले पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यास प्राधान्य द्यावे. विविध विधानसभा मतदारसंघातील खड्डे बुजविल्याचा अहवाल सर्व आमदारांना नियमितपणे उपलब्ध करून द्यावा. आगामी काळात पुणे शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंगची स्पर्धा होणार आहे. त्यासाठी दर्जेदार रस्ते आवश्यक आहेत. त्यामुळे महापालिकेने यासाठी रस्ते विकासाचा सर्वांकष आराखडा सादर करावा, असे निर्देश दिले.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, “पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या एक हजार बसेसचे देखभाल दुरुस्तीसह आर्थिक नियोजन करावे. पीएमपीएमएलला होणारा आर्थिक तोटा दोन्ही महापालिका भरून काढतात. आता त्यांनी आर्थिक सक्षम झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, वेतनातील फरक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याचे नियोजन करावे. तसेच महावितरणच्या विद्युततारा भूमिगत करणे आणि रस्त्यातील पथदिव्यांचे खांब हलविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश ना. माधुरीताईंनी दिले.

आमदारांनी बैठकीत पुढील मते मांडली

आमदार भीमराव तापकीर

पुणे महापालिकेत 11 गावांचा समावेश करण्यात आला. बहुसंख्या गावामध्ये आधीचीच पाणी योजना सुरू आहे. काही गावांमध्ये शुद्ध पाणी मिळत नसल्याने साथीचे आजार होतात. त्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. नवले पुला जवळील अपघात रोखण्यासाठी सर्व खात्यांची विभागीय आयुक्तांकडे तातडीने बैठक घ्यावी.

आमदार योगेश टिळेकर

समान पाणीपुरवठा योजनेचा फायदा पुणेकरांना कसा होणार आहे? सध्या हडपसरच्या विविध भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी येत नाही. नजीकच्या काळात दररोज पाणी येईल अशी व्यवस्था करावी.

आमदार हेमंत रासने

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होते. ज्या अतिक्रमण निरीक्षकाकडे तक्रार केली जाते, तो अतिक्रमण करणाऱ्यांना सावध करतो. कोणाच्याही व्यवसायावर गदा आणायची नाही. परंतु अतिक्रमणांवर कारवाई करावी आणि व्यवसायाबाबत धोरण ठरवावे.

आमदार बापूसाहेब पठारे

ज्या भागात महापालिकेची विकास कामे सुरू आहेत त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून लगतच्या परिसरात संबंधित एजन्सीने वार्डन पुरवावेत. महापालिका मॉलला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवते झोपडपट्टीतील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी भेट द्यावी.

आमदार सुनील कांबळे

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महापालिकेत विलेनीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. मैलापाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पांना गती द्यावी. एकाच खात्यात वर्षानुवर्षे तेच तेच अधिकारी काम करतात. त्यांच्या नियमानुसार वेळोवेळी बदल्या कराव्यात.

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे- जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

पुणे, दि.१७: एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, रुग्णांवर उपचार केल्यानंतर दावे (क्लेम) मागणीबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्याच महिन्यात दाव्याची रक्कम अदा करण्यात येईल, रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे आगामी काळात दरामध्ये (पॅकेज) वाढ करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे राज्य आरोग्य हमी सोसायटी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा आणि अंगीकृत रुग्णालय संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे, सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन करून श्री. आबिटकर म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. तसेच राज्यातील प्रत्येक रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देशात ‘आरोग्य सेवेत महाराष्ट्र सर्वोत्तम’ राज्य असले पाहिजे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह आहे.

राज्यातील गरजू रुग्णांना एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील रुग्णालयावर ५ लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता राज्य राज्यशासन आणि रुग्णालय मिळून काम करीत आहे. एकही रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही याकरीता दक्षता घेण्यात येत आहे.

श्री. आबिटकर पुढे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत मिळणाऱ्या रक्कमेतून ८० टक्के रक्कम रुग्णालयाकरिता आणि २० टक्के रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटी राखीव निधीकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यामाध्यमातून ५ लाख रुपयाच्या पुढील शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयांनी उपयोग करण्याचे आवाहन केले. राज्य शासनाच्यावतीने १०८ क्रमांकाच्या २५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयासोबतच योजनेशी संलग्न रुग्णालयांकरिता उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयुष्यमान भारत कार्ड काढणाऱ्या आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक आदींना ५ रुपये ऐवजी ३० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे १०० टक्के आयुष्यमान कार्ड गतीने काढण्यासोबतच प्रत्येक नागरिक रुग्णालयांशी संलग्न होईल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्डचे अतिशय चांगले काम झाले असून त्याच पद्धतीने राज्यातही काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा श्री. आबिटकर यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाच्यावतीने रुग्णालयाला विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्यामुळे रुग्णालयांनीदेखील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ देण्याचे काम करावे. कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्याचा तयारी ठेवावी, त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्यावर भर द्यावा. उत्कृष्ट काम करणाऱ्या रुग्णालयांच्या कामाची दखल घेऊन इतर रुग्णालयांनीदेखील त्याच पद्धतीने काम करावे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रूग्णालयाच्या पाठीमागे राज्य शासन भक्कमपणे उभे राहील. संवाद कार्यक्रमात रुग्णालय प्रतिनिधीच्यावतीने केलेल्या सूचनांचा सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात रुग्णवाहिका, रक्तदान शिबिराचा आरोग्य सेवेला लाभ झाला, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थ्यांची जबाबदारी वाढली असून यापुढेही अधिक चांगले काम करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन श्री. आबिटकर यांनी केले.

खासदार श्री. बारणे म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रात अतिशय चांगले काम होत असून विविध लोककल्याणकारी योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना लाभ होत आहे. खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकाबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडवून रुग्णांना न्याय देण्याचे काम करावे, असेही श्री. बारणे म्हणाले.

डॉ. शेटे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यानंतर एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. राज्यात विविध रुग्णालये चांगली कामे करीत आहेत. यापुढेही नागरिकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करुन नागरिकांची सेवा करावी, सामान्य नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. शेटे यांनी केले.

श्री. चव्हाण यांनी प्रस्ताविकात म्हणाले, एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये २ हजार ४७३ रुग्णालयाचा समावेश करण्यात आले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारे उपचारदेखील या योजनेत समावेश केले आहेत. राज्यात योजनेत रुग्णालय अंगीकृतकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची प्रणाली लागू करण्यात येणार असून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने होणार आहे. उपचारात आणि दरात वाढ, रुग्णालय श्रेणीवाढ, रुग्णालय गुणवत्तावाढीला प्रोत्साहन, आकंक्षित गटातील रुग्णालयांना अतिरिक्त १० टक्के नियमित प्रोत्साहनपर रक्कम, रुग्णालयांना दाव्याची रक्कम महिन्यात अदा करण्याचा निर्णय, यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. रुग्णालयानी योजनेची माहिती, त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपचाराबाबतची माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

आरोग्य सेवावृत्तींचा सन्मान

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते अंगीकृत रुग्णालये, आरोग्य मित्र, आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक, आपले सरकार सेवा केंद्र चालक, जिल्हा व गाव पातळीवरील कर्मचारी तसेच योजना अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न

रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठा यांचं नियोजन
– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. १७ :
रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठा यांचं नियोजन कराव्या असे निर्देश राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
राज्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगाम अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे येथे आज संपन्न झाली.
या बैठकीस अपर मुख्य सचिव (कृषी) श्री. विकासचंद रस्तोगी, कृषी आयुक्त श्री. सूरज मांढरे, प्रकल्प संचालक (पोक्रा) श्री. परिमल सिंग, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती भुवनेश्वरी, प्रकल्प संचालक (स्मार्ट) डॉ. हेमंत वसेकर, महासंचालक (महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद) श्रीमती वर्षा लढ्ढा, तसेच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, कृषी आयुक्तालयातील अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांतील प्रकल्प संचालक (आत्मा) उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खतं, पाणी उपलब्धता, हवामानातील बदल, तसेच विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या धरणं व विहिरी तुडुंब भरल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही. परिणामी, रब्बी पिकाखालील क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणं, खतं व निविष्ठांचं नियोजन करण्यात येणार आहे.”

श्री.भरणे म्हणाले, “दरवर्षी राज्यात सरासरी ५७ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड केली जाते. यंदा हरभरा व गहू या प्रमुख पिकाखाली ३० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र अपेक्षित आहे. हवामान विभागानुसार यावर्षी ‘ला-नीना’च्या प्रभावामुळे थंडी तीव्र राहणार आहे, जे रब्बी पिकांसाठी अनुकूल ठरेल.”

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा वापर करून चालू वर्षी महा डीबीटीद्वारे विक्रमी ४४.६७ लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहितीही कृषी मंत्र्यांनी दिली. “इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निवड झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी,” असेही त्यांनी निर्देश दिले.

राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीसाठी २२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यानंतर ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज आणि नुकत्याच झालेल्या नुकसानासाठी १३५६ कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

रब्बी हंगामात ११.२३ लाख क्विंटल बियाण्याची गरज असताना सध्या राज्यात १४.५८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे भरणे यांनी सांगितले. खतांचा मागील वर्षीचा वापर २५.८ लाख मे.टन होता, तर यंदा वाढत्या क्षेत्राचा विचार करून केंद्र सरकारकडे मागणी केल्यावर ३१.३५ लाख मे.टन खतांचं आवंटन मंजूर झालं आहे. त्यापैकी १६.१० लाख मे.टन खत सध्या राज्यात उपलब्ध आहे.

भरणे म्हणाले, “रब्बी हंगामात बियाणे उगवण तपासणी, खत वापरावरील शिफारसी, विज प्रक्रिया मोहीम, कृषी निविष्ठांचा वाजवी वापर आणि कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी प्रभावी नियोजन करावं. कृषी विभाग आणि संशोधन केंद्रांनी शिफारस केलेली तंत्रज्ञानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार मोहीम हाती घ्यावी.”

या बैठकीदरम्यान कृषी विभागातील राज्यस्तरीय आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मोबाईल सिम कार्डचे वाटप करण्यात आले. एकूण १३,१४१ सिम कार्ड वितरित केली जाणार असून, यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा वेग, समन्वय आणि शेतकऱ्यांशी संपर्क सुधारेल. “कृषी विभाग ही राज्यातील सर्वांत मोठी आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली यंत्रणा आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करावे. शेतकऱ्याला सेवा देणारी यंत्रणा ‘कागदावर नव्हे, कृतीतून’ दिसली पाहिजे,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.

सोने 3,400 ने वाढले, पहिल्यांदाच 1.30 लाखांवर:चांदी ₹3,192 वाढून 1.71 लाख किलोवर; यावर्षी सोने 54,712 ने वाढले

नवी दिल्ली–सोन्यात सलग १६ व्या दिवशी तेजी आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत आज (१७ ऑक्टोबर) ३,४०३ रुपयांनी वाढून १,३०,८७४ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. काल ती १,२७,४७१ रुपयांवर होती.

आज चांदीच्या किमतीही वाढल्या, त्या ₹३,१९२ ने वाढून ₹१,७१,२७५ प्रति किलो झाल्या. काल चांदीचा भाव ₹१,६८,०८३ प्रति किलो होता. यापूर्वी, मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी चांदीने ₹१,७८,१०० या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

या वर्षी सोने ५४,७१२ रुपयांनी आणि चांदी ८५,२५८ रुपयांनी महागली

या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ₹५४,७१२ ने वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹७६,१६२ होती, जी आता ₹१,३०,८७४ वर पोहोचली आहे.

या काळात चांदीच्या किमतीतही ₹८५,२५८ ने वाढ झाली आहे. एक किलो चांदीची किंमत, जी ३१ डिसेंबर २०२४ रोजी ₹८६,०१७ होती, ती आता ₹१,७१,२७५ प्रति किलोग्रॅम झाली आहे.

सोने १.५५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते

गोल्डमन सॅक्सच्या अलिकडच्या अहवालानुसार, बँकेने पुढील वर्षीपर्यंत सोन्याचे प्रति औंस ५,००० डॉलर्सचे लक्ष्य ठेवले आहे. रुपयाच्या बाबतीत, सध्याच्या विनिमय दराने हे दर १० ग्रॅमला अंदाजे १,५५,००० रुपये असतील. ब्रोकरेज फर्म पीएल कॅपिटलचे संचालक संदीप रायचुरा म्हणाले की, सोने प्रति १० ग्रॅमला १,४४,००० रुपये मिळू शकते.

सोन्याच्या किमती वाढण्याची तीन प्रमुख कारणे

सणासुदीच्या काळात मागणी: दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जास्त किमतींमुळे सोने कमी असले तरी खरेदीची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.
भू-राजकीय तणाव: मध्य पूर्वेतील अशांततेमुळे आणि व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करत आहेत. अमेरिकेच्या धोरणांबद्दल अनिश्चितता आहे.
मध्यवर्ती बँक खरेदी: जगभरातील प्रमुख बँका डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून ते त्यांच्या तिजोरीतील सोन्याचा वाटा सातत्याने वाढवत आहेत.
३ कारणांमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत

दिवाळीसारख्या सणांमुळे सोन्याप्रमाणेच चांदीची मागणी वाढली आहे.
रुपया कमकुवत झाल्यामुळे चांदीच्या किमती वाढत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनेलसारख्या उद्योगांमध्ये चांदीची मागणी वाढली आहे.
सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही

केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, या वर्षी सोन्याच्या किमतीत जवळजवळ ६०% वाढ झाली आहे, त्यामुळे अल्पावधीत आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. लोक नफा बुक करू शकतात. तथापि, दीर्घकाळासाठी त्यात गुंतवणूक केल्यास फायदे मिळू शकतात.

सोने खरेदी करताना या २ गोष्टी लक्षात ठेवा

१. फक्त प्रमाणित सोने खरेदी करा: नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने खरेदी करा. हा क्रमांक अल्फान्यूमेरिक असू शकतो, जसे की AZ4524. हॉलमार्किंग सोन्याचे कॅरेटेज दर्शवते.

२. किंमत तपासा: खरेदीच्या दिवशी सोन्याचे अचूक वजन आणि त्याची किंमत अनेक स्त्रोतांकडून तपासा (जसे की इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट). सोन्याच्या किमती २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेटनुसार बदलतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा अनोखा उपक्रम! ७५ बसस्थानकांवर मोफत “वाचन कट्टा”

– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (१७ आक्टोबर) :
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रमुख ७५ एसटी बसस्थानकांवर मोफत “वाचनालय” उभारून ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, “विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारण्यात येणार आहे.”

या वाचनालयांमध्ये वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या कृती उपलब्ध असतील. तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ ठेवण्यात येणार आहेत.

“हा ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरवेल,” असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.”
— प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

शहर महिला काँग्रेसच्याअध्यक्षपदी स्वाती शिंदे

0

पुणे : पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वाती महेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा आज (शुक्रवारी) केली.

स्वाती शिंदे काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. पक्षाची आंदोलने, बैठका, मेळावे अशा सर्व उपक्रमात त्यांनी भाग घेतला आहे. महिलांच्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण करणे, महिलांसाठी अल्प खर्चात सहली आयोजित करणे, आरोग्य शिबीर भरविले. महिला बचतगटांमार्फत गरजूंना रोजगार मिळवून देणे आदी कामांमध्ये स्वाती शिंदे अग्रेसर राहिल्या आहेत. पक्षाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्या परिचित असून, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपद त्यांनी भूषविले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, महिला संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेईन. पक्षाच्या आदरणीय नेत्या खासदार श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुनजी खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार काम करेन. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी मला संधी दिली याबद्दल मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया स्वाती शिंदे यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

पीएमआरडीएच्या ४६ भूखंडांची होणार ई-लिलाव प्रक्रिया

पिंपरी (दि.१७) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील (तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील) एकूण ४६ भूखंडाचे ई-लिलाव करण्यात येणार आहे. ८० वर्षाच्या कालावधीकरिता भाडेपट्टयाने ई-लिलाव होत असून नोंदणी व निविदा दस्तऐवज दि. १६/१०/२०२५ पासून दि. ३०/१०/२०२५ पर्यंत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.

या भूखंडामध्ये शैक्षणिक वापराचे ३ भूखंड, वाणिज्य व सार्वजनिक सुविधेचे ११ भूखंड, वैद्यकीय वापराचे १ भूखंड, सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत शाळा) १ भूखंड, (Facility Center) १ भूखंड आणि सुविधा भूखंड (Amenity Space) २९ भूखंड असे एकूण ४६ भूखंड यांचे ८० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टयाने ई-लिलावाव्दारे वाटप होणार आहे.

तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ०६/११/२०२५ रोजी करण्यात येणार असून दि. ०७/११/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. सदर ई- लिलाव प्रक्रियेसंबधी सूचना सविस्तर अटी व शर्तीचे माहितीपुस्तिका https://eauction.gov.in व https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

मुरलीधर मोहोळ आणि तथाकथित बिल्डरांवर संतप्त जैन समाजाच्या मोठ्ठ्या मोर्चाने पुण्यात खळबळ, आचार्य गुप्तिनंदनजी महाराज यांचं अन्नत्याग….

जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री व्यवहाराला जैन समाजाचा विरोध
जैन बोर्डिंग विश्वस्तांच्या निर्णयाला प्रखर विरोध

पुणे : ‌‘अहिंसा परमो धर्म की.. जय‌’, ‌‘धर्माचा व्यापर बंद करा‌’, ‌‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही‌’, ‌‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा‌’, ‌‘जैन मंदिर वाचवा‌’, ‌‘जब तक सूरज-चांद रहेगा एचएनडी तेरा नाम रहेगा‌’ अशा घोषणा देत चारही पंथातील प्रक्षुब्ध जैन समाजाने एकत्र येऊन जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. भव्य मोर्चाद्वारे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना आज दिले.याचिकाकर्ता आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, ॲड. योगेश पांडे, ॲड. जिंतूरकर, अक्षय जैन यांच्यासह युथ कार्यकर्ते आणि बोर्डिंगमधील आजी माजी विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चाच्या अग्रभागी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषिजी, माताजी महाराज हे मुनीगण होते.
मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. जमीन विक्रीविषयी जाहीर नाराजी व्यक्त करण्यासाठी जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील जैन बांधवांनी काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक घेऊन आज (दि. 17) जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला.
माज़ी खासदार राजू शेट्टी, अभय छाजेड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैन समाजाच्या मागणीस पाठींबा दर्शविला.


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जैन बांधव-भगिनी मोठ्या संख्येने जैन बोर्डिंगच्या आवारात एकत्र आले. येथे आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज यांनी जमीन विक्री बेकायदा असून त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे, असे आवाहन केले.
त्यानंतर जैन बोर्डिंग येथून मोर्चाला सुरुवात झाली. संचेती हॉस्पिटल, जुना बाजार या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा नेण्यात आला. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. जैन समाजातील शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सन 1958 साली स्थापन झालेली सार्वजनिक धर्मदाय संस्था असून संस्थेच्या ताब्यात मॉडेल कॉलनी येथील सुमारे 12 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे.
ट्रस्टच्या संपत्तीबाबत काही व्यक्तींमार्फत विकसकांशी व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही स्थानिक स्तरावर विकास कामे व हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जैन समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या ठिकाणी असलेले जैन मंदिर हजारो जैन बांधवांच्या श्रद्धेचे केंद्र असून ते धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मंदिर व वसतिगृहाच्या अस्तित्वावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये ही जैन बांधवांची अपेक्षा आहे. जैन मुनी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज हे त्यांच्या संघासह सध्या जैन बोर्डिंग येथे वास्तव्यास आहेत.
आठ ऑक्टोबर 2025 रोजीचा ट्रस्ट आणि विकसक यांच्यातील विक्रीकरार आणि त्यानंतरचा कर्ज करार रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मादाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी वसतिगृहातील विद्यार्थी आणि जैन समाजाची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल : लक्ष्मीकांत खाबिया
जैन बोर्डिंगच्या जमीनविक्रीप्रकरणी लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी गुरुवारी (दि. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व कायदेशीर बाबी समजून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आज जैन समाजातील शिष्ट मंडळाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वसतिगृह आणि मंदिराविषयी समजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वास दिले, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री मोहोळ आणि बिल्डरांवर जैन मंदिर आणि बोर्डिंग हाऊसची ३५० कोटीची जागा हडपल्याचा आरोप

पुणे-पुण्यातील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन समाजाने गंभीर आरोप केले आहेत. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या बढेकर बिल्डर्स आणि गोखले बिल्डरला विकण्यात आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबतच्या दोन बिल्डरांनी जैन बोर्डिंगची जागा हडप केल्याचा आरोप जैन समाजाचे गुरु , समाजाचे असंख्य लोक आणि राजकीय नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. याप्रकरणी जैन समाजही प्रचंड आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालत जैन समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या जमीन विक्री व्यवहाराला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. जैन समाजाने केलेल्या आरोपांबाबत अद्याप मुरलीधर मोहोळ यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरुन आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात जैन समाजाच्या होस्टेलची जागा हडपली गेल्याने जैन समाजाने मोठा मोर्चा काढला आहे. दोन तीन लोकांचा नफा महत्वाचा की जैन समाजाच्या भावना महत्वाच्या हे सरकारला ठरवावेच लागेल. तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचं कळतंय. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गिळंकृत केले, अशी खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली आहे.
जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्याच्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हात आहे. बिल्डर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मिळून ही जागा विकली. या प्रकरणात जो जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे आश्वासन देऊनही राजू शेट्टी हे आक्रमक पावित्र्यात आहेत. आम्हाला असली आश्वासनं नकोत. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्रीचा व्यवहार रद्द झाल्यावरच आम्ही विश्वास ठेवू. तोपर्यंत आमचा लढा हा सुरुच राहील. दिवाळीनंतर या जमीनविक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्‍यांनी पुण्याला यावे. आम्ही त्यांचा सत्कार करु, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरून दोन तास चर्चा:युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकेत …

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही चर्चा सुमारे दोन तास चालली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते अधिक लष्करी मदतीची विनंती करू शकतात.”पुतिन यांच्याशी झालेली चर्चा अद्भुत होती. मध्य पूर्वेत शांतता आणल्याबद्दल त्यांनी माझे आणि अमेरिकेचे अभिनंदन केले,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथआउट सोशल पोस्टमध्ये लिहिले.पुतिन म्हणाले की हे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न होते. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की मध्य पूर्वेतील यश रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यास मदत करेल.पुतिन यांनी मेलानिया ट्रम्प यांचे कौतुक केले आणि म्हटले की, त्या मुलांसाठी उत्तम काम करत आहेत. दोघांनी युद्धानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यातील व्यापारावरही चर्चा केली.

या संभाषणानंतर, ट्रम्प आणि पुतिन यांनी पुढील आठवड्यात त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. अमेरिकेचे प्रतिनिधित्व परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि इतर काही लोक करतील. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

त्यानंतर ट्रम्प आणि पुतिन हंगेरीच्या बुडापेस्ट येथे भेटतील आणि रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रयत्न करतील.झेलेन्स्की ट्रम्पकडून प्रगत शस्त्रे मागण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्रांमुळे मॉस्को आणि इतर प्रमुख रशियन शहरे युक्रेनियन हल्ल्याच्या रेंजमध्ये येतील. जर पुतिन वाटाघाटी टेबलावर आले नाहीत तर ते या शस्त्रांच्या पुरवठ्याला अधिकृत करू शकतात असे ट्रम्प यांनी सूचित केले आहे.

टॉमहॉक क्षेपणास्त्रे युक्रेनच्या अंतर्गत भागात लष्करी तळ, हवाई संरक्षण प्रणाली आणि लॉजिस्टिक्स केंद्रांना लक्ष्य करू शकतात.

या क्षेपणास्त्रांचा पल्ला युक्रेनच्या सध्याच्या ATACMS क्षेपणास्त्रांपेक्षा (३०० किमी पल्ला) खूप जास्त आहे. तथापि, त्यांना चालवण्यासाठी विशेष लाँचर्स आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. अमेरिकेकडे काही जुने टॉमहॉक लाँचर्स आहेत जे युक्रेनविरुद्ध वापरले जाऊ शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प सुरुवातीला युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास विरोध करत होते, परंतु रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी शांतता चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याने ते संतप्त झाले आहेत. युक्रेनला थेट टॉमहॉक्स पुरवण्याऐवजी, अमेरिका ते नाटो देशांना विकू शकते, जे नंतर ते युक्रेनला पोहोचवू शकतात.

रशियाने आधीच निषेध नोंदवला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अलिकडेच सांगितले की या क्षेपणास्त्रांमुळे युद्धभूमीवर कोणतेही मोठे बदल होणार नाहीत, परंतु अमेरिका किंवा युक्रेन त्यांचे लक्ष्य निश्चित करतील का हा प्रश्न कायम आहे.

रशियाने युक्रेनियन ऊर्जा सुविधांवर नवीन हल्ले सुरू केले आहेत तेव्हा ही चर्चा सुरू झाली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, गुरुवारी रात्रीच रशियाने ३०० हून अधिक ड्रोन आणि ३७ क्षेपणास्त्रे डागली. या हिवाळ्यात, रशिया गॅस पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष्य करत आहे. युद्ध चौथ्या वर्षात प्रवेश करत असताना ऊर्जा प्रणालींवरील हल्ले वाढले आहेत.युद्ध संपवण्याचे वारंवार आश्वासन देणारे ट्रम्प पुतिन यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे संतापले आहेत. व्हाईट हाऊसने यावर भाष्य करण्यास नकार दिला.