Home Blog Page 86

विमा आवाक्यात आणण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने संपूर्ण जीएसटी लाभ दिला

0

कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा मुदत विमा हा एक आवश्यक भाग आहे. जर घरातील कमावत्या सदस्याचे निधन झाले तर कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. या मजबूत पायाच्या आधारे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची खात्री होते.

सर्व विमा पॉलिसींना जीएसटीमधून वगळण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच सुधारणा आणल्या. पूर्वी ग्राहक जीएसटीपोटी प्रीमियम रकमेच्या 18% भरत असत, उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला 100 रुपयांचा प्रीमियम भरावा लागत असेल तर त्यापेक्षा 18 रुपये जास्त जीएसटी म्हणून आकारले जात होते. मात्र, आता जीएसटी सूट मिळाल्याने त्या व्यक्तीला फक्त 100 रुपये द्यावे लागतील. यामुळे जीवन विमा उत्पादने स्वस्त झाली आहेत, यात मुदत विमा उत्पादनांचा देखील समावेश आहे.

ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देण्याच्या वचनबद्धतेनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी सूट लाभ दिला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी विमा योजना अधिक परवडणाऱ्या आणि सुलभ बनविल्या जात आहेत.

टर्म इन्शुरन्स उत्पादनांच्या किंमतीवर याचा काय परिणाम झाला आहे ते पाहूया. पूर्वी, 30 वर्षांचा धूम्रपान न करणारा पुरुष, जीएसटीसह 825 रुपये मासिक प्रीमियम भरत असे. आता त्याच व्यक्तीला 30 वर्षांच्या कालावधीसाठी 1 कोटी रुपयांच्या जीवन विमा कव्हरसाठी फक्त 699 रुपये द्यावे लागतील. शिवाय, तेच कव्हर आणि त्याच कालावधीसाठी धूम्रपान न करणाऱ्या 30 वर्षांच्या महिलेला आता जीएसटीसह 697 रुपयांऐवजी फक्त 594 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​मुख्य उत्पादन अधिकारी श्री. विकास गुप्ता म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी जे योग्य आहे ते करणेच महत्त्वाचे आहे, यावर आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना जी परतफेड करतो त्या प्रत्येकातून विश्वास मजबूत होतो, परवडणारी क्षमता वाढते आणि आम्हाला अशा भविष्याच्या जवळ नेते जिथे विमा प्रत्येकाच्या आवाक्यात असेल. अधिकाधिक व्यक्तींना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास प्रोत्साहित करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना ते पूरक आहे.”

महत्त्वाचे म्हणजे, टर्म इन्शुरन्स हा एक आर्थिक सुरक्षा  उपाय आहे जो एखाद्या व्यक्तीच्या प्रियजनांची त्याच्या अनुपस्थितीतही काळजी घेतो. म्हणूनच, संरक्षण उत्पादने सर्वांच्या आवाक्यात असणे महत्त्वाचे असते. आता कमी केलेल्या प्रीमियममुळे विम्याचा विस्तार वाढेल आणि लाखो भारतीयांच्या जीवनात आर्थिक संरक्षण आणण्याच्या उद्देशाला पाठबळ मिळेल.

मीशोने सेबीकडे दाखल केला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस

0

मीशो लिमिटेड ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहक, विक्रेते, लॉजिस्टिक्स भागीदार आणि कंटेंट क्रिएटर्स या चार प्रमुख घटकांना एकत्र आणणारे मल्टी-साइडेड टेक्नॉलॉजी कंपनी आहे. कंपनीने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP) दाखल केला आहे.

प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मध्ये ₹4,250 कोटींच्या नवीन इक्विटी शेअर्सचा इश्यू (फेस व्हॅल्यू ₹1 प्रत्येकी) तसेच 17,56,96,602 इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. या ओएफएसमध्ये एलेव्हेशन कॅपिटल व्ही लिमिटेड, पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स व्ही, हायवे सिरीज 1 (व्हेंचर हायवे एसपीव्ही एलएलसीचा एक भाग), वाय कॉम्बिनेटर कॉन्टिन्युइटी होल्डिंग्ज I एलएलसी, गोल्डन समिट लिमिटेड, व्हीएच कॅपिटल, व्हीएच कॅपिटल एक्सआय हे कॉर्पोरेट सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत. विदित आत्रेय आणि संजीव कुमार हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत, तर मॅन हे टॅम हे इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर म्हणून सहभागी आहेत.

कंपनीने नेट प्रोसीड्सचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे : मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (सबसिडियरी) मध्ये क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरील गुंतवणूक; मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि टेक्नॉलॉजी विकासासाठी काम करणाऱ्या टीम्सच्या विद्यमान व नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन भरणे; मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (सबसिडियरी) मार्केटिंग आणि ब्रँड इनिशिएटिव्हसाठी खर्चाची गुंतवणूक; तसेच अधिग्रहण (Acquisitions) व इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनऑर्गॅनिक ग्रोथ साधणे आणि सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी निधी वापरणे.

FY25 मध्ये मीशो भारतातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले. वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स आणि वार्षिक प्लेस्ड ऑर्डर्स या दोन्ही बाबतीत मीशोने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना मागे टाकले. या प्लॅटफॉर्मने 5 लाखांहून अधिक ट्रान्झॅक्टिंग विक्रेत्यांना सुमारे 199 दशलक्ष वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स सोबत जोडले आणि वर्षभरात जवळपास 1.8 अब्ज ऑर्डर्स सुलभ केल्या — हे भारतभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अधिक परवडणारे, सुलभ आणि आकर्षक करण्याच्या मीशोच्या प्रयत्नांचे खरे प्रतिबिंब आहे.

मीशोचे वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स (ATU) FY25 मध्ये सुमारे 28% वार्षिक वाढीसह सातत्याने मजबूत कामगिरी करत राहिले असून, जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत (LTM) ते सुमारे 213 दशलक्षांवर पोहोचले. FY23 ते FY25 या कालावधीत ऑर्डर फ्रिक्वेन्सी वर्षाला 7.5x वरून 9.2x पर्यंत सुधारली, तर जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत ती 9.4x झाली. यामुळे प्लॅटफॉर्मवरील वाढता एंगेजमेंट आणि विश्वास अधोरेखित होतो, ज्याला सतत उत्तम डिस्कव्हरी व युजर एक्सपीरियन्स देण्याच्या प्रयत्नांची साथ आहे.

एकूण ऑर्डर्स FY23 मधील सुमारे 1 अब्ज वरून FY25 मध्ये 1.8 अब्जांवर पोहोचल्या. फक्त 30 जून 2025 ला समाप्त झालेल्या तीन महिन्यांतच जवळपास 562 दशलक्ष ऑर्डर्स नोंदल्या गेल्या, जे Q1 FY26 मध्ये सुमारे 50% वार्षिक वाढ दर्शवते. FY25 मधील प्लेस्ड ऑर्डर्सची वाढ संपूर्ण भारतभर दिसली, विशेष म्हणजे टॉप 8 शहरांमधील ऑर्डर्स ~46% वाढल्या, तर एकूण प्लॅटफॉर्म वाढ 37% इतकी होती.

या वाढत्या प्रमाणावर आधार घेत, नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) मध्ये FY25 दरम्यान सुमारे 29% वार्षिक वाढ झाली आणि ती ₹29,988 कोटींवर पोहोचली. FY24 मध्ये ही वाढ सुमारे 21% होती. Q1 FY26 मध्ये NMV वाढ आणखी वेगवान झाली असून ती वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ₹8,679 कोटींवर गेली. उत्तम प्राइसिंग, डिस्कव्हरी आणि असॉर्टमेंटद्वारे प्लॅटफॉर्मची वॅल्यू प्रपोजिशन सुधारल्यामुळे आणि वाढीसाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे ही गती साधता आली.

ई-कॉमर्स क्षेत्रात NMV म्हणजे करांसह यशस्वीरीत्या वितरित केलेल्या ऑर्डर्सचे एकत्रित चेकआऊट मूल्य. हे प्लॅटफॉर्मच्या हेल्थचे मुख्य मोजमाप मानले जाते, कारण यातून ग्राहकांचा स्वीकार (adoption) आणि पुनर्वापर (repeat usage) किती मजबूत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच हे उत्पन्न, मार्जिन्स आणि रोख प्रवाह (cash flow) या सर्व घटकांचे महत्त्वाचे चालक मानले जाते.

उल्लेखनीय बदल घडवून आणत, मीशो FY25 मध्ये भारतातील स्केल्ड लिस्टेड ई-कॉमर्स कंपन्यांपैकी सर्वाधिक फ्री कॅश फ्लो निर्माण करणारी कंपनी ठरली. मागील बारा महिन्यांचा फ्री कॅश फ्लो निगेटिव्ह ₹2,336 कोटींवरून पॉझिटिव्ह ₹1,032 कोटींवर (व्याज उत्पन्नासह) आणि ₹591 कोटींवर (व्याज उत्पन्न वगळता) पोहोचला. हे अ‍ॅसेट-लाइट आणि कॅपिटल-इफिशियंट मॉडेलचे फायदे दर्शवते, ज्यामुळे मोठ्या भांडवली खर्चाशिवाय कंपनीला प्रमाण (scale) आणि सखोलता (depth) साधता आली.

कर व अपवादात्मक बाबींआधीचा तोटा FY23 मधील ₹1,672 कोटींवरून FY25 मध्ये केवळ ₹108 कोटींवर आला. हे होत असतानाच, वाढीचा प्रवास (growth trajectory) अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने टेक्नॉलॉजी व युजर अ‍ॅक्विझिशनमध्ये गुंतवणूक वाढवली.

तथापि, FY25 मध्ये कंपनीचा निव्वळ तोटा ₹3,942 कोटी इतका राहिला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वन-टाइम अपवादात्मक खर्च, ज्यामध्ये रिव्हर्स फ्लिप टॅक्स आणि पर्क्विझिट टॅक्सचा समावेश होता. हे खर्च कंपनीच्या पब्लिक स्ट्रक्चरमध्ये रूपांतर प्रक्रियेसाठी आवश्यक होते.

Q1 FY26 मध्ये मीशोने वाढीसाठी गुंतवणूक सुरूच ठेवली. याच काळात नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ~562 दशलक्ष ऑर्डर्सवर पोहोचली, ज्यात प्लेस्ड ऑर्डर्समध्ये सुमारे 50% वाढ दिसून आली. कंपनीने प्रमाण (scale) वाढवल्यामुळे सर्व्हर आणि टेक्नॉलॉजीवरील खर्चही वाढले, जे प्लॅटफॉर्मच्या वाढीस पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे प्रतिबिंब होते. परिणामी, या तिमाहीत अपवादात्मक बाबींआधीचा तोटा ₹148 कोटी आणि निव्वळ तोटा ₹289 कोटी इतका राहिला. हे कंपनीकडून मार्केट शेअर वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीशी सुसंगत आहे.

FY25 आणि Q1 FY26 यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की मीशो इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण (democratization) करण्याच्या बाबतीत देशात अग्रणी आहे. कंपनीचे लक्ष आता बाजारपेठेचा विस्तार, परिसंस्थेसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती आणि शाश्वत वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी मजबूत पाया तयार करण्यावर आहे.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काम पाहत आहेत.

UDRHP 1 Linkhttps://www.bseindia.com/corporates/download/381966/IPO%20Prior/MeeshoLimited_UDRHP1_20251018222146.pdf

एक्वस लिमिटेड आयपीओ द्वारे 720 कोटी रु. चे फ्रेश कॅपिटल उभारणार

0

एरोस्पेस व कंझ्युमर सेगमेंटमध्ये पूर्णपणे व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादन क्षमता सादर करण्यासाठी भारतात एका सिंगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कार्यरत एकमेव प्रिसिजन कॉम्पोनंट (अचूक घटक) उत्पादक एक्वस लिमिटेड (“एक्वस”) (स्रोत: F&S अहवाल) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 720 कोटी रु. पर्यंत फ्रेश कॅपिटल उभारणार आहे.

एक्वसने फ्रेश इश्यूसाठी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP1) दाखल केले असून त्यामध्ये 720 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 31,772,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आहेत.

एक्वसचे नेतृत्व स्वतंत्र प्रवर्तक, कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिवपुत्रप्पा मेलिगेरी करत असून ते कंपनीला धोरणात्मक दृष्टीकोन देत नेतृत्व करत आहेत. तसेच, कंपनीकडे अनुभवी व्यवस्थापन संघ असून त्यांना या उद्योग क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, अमायकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी I एलएलपी, अमायकस कॅपिटल पार्टनर्स, अमांसा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, स्टेडव्ह्यू कॅपिटल मॉरिशस लिमिटेड, कॅटामरान एकम् आणि स्पार्टा ग्रुप एलएलसी हे गुंतवणूकदार एकत्रितरीत्या ऑफरपूर्व इक्विटी शेअर भांडवलातील 25.54% हिस्सा धरून आहेत.

जरी एक्वस प्रामुख्याने एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत असले तरी गेल्या काही वर्षात कंपनीने कंझ्युमर क्लायंट साठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, प्लॅस्टिक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचा समावेश केला आहे. यामध्ये कुकवेअर सारखी कंझ्युमर ड्युरेबल्स, प्लॅस्टिक्स (आउटडोअर टॉयज, फिगरिन्स), तसेच पोर्टेबल कॉम्प्युटर्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस सारखी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी कॉम्पोनंट्स यांचा समावेश आहे.

आयपीओ मधील फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनी खालील उद्देशांसाठी करणार आहे: 1. कंपनी उपकंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी आणि  तिच्या दोन संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्वस कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची संपूर्ण/अंशतः परतफेड किंवा प्रीपेमेण्ट (जिथे लागू असेल तिथे प्रीपेमेण्ट पेनल्टीसह) करण्यासाठी;

2. कंपनी आणि तिची एक उपकंपनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भांडवल खर्चाला निधी पुरवण्यासाठी आणि 3. अजून काही अधिग्रहणांद्वारे, इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनओर्गानिक विकासाला निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर करणार आहे.

एक्वसने 2009 मध्ये एरोस्पेस ग्राहकांसाठी बेलगावी मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमधील युनिट्समध्ये एरो-स्ट्रक्चर कॉम्पोनंट्स आणि एरो-इंजिन कॉम्पोनंट्सचे उत्पादन सुरू केले. मागील 15 वर्षांमध्ये, कंपनीने सातत्याने नवीन उत्पादन क्षमता विकसित करून आणि त्यांचे  अधिग्रहण करून विकास साधला आहे. यामुळे एरोस्पेस आणि कंझ्युमर सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ आणि ग्राहकवर्ग दोन्ही वाढले आहेत. कंपनीने 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे उत्तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून धोरणात्मकदृष्ट्या उत्पादन कामकाजाचा विस्तार केला. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्रातील नवीन क्षमता कंपनीला मिळाली, उत्तर अमेरिका व युरोपमध्ये कंपनीने आपले स्थान विस्तारले आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढविला.

गेल्या काही वर्षात एक्वसने स्वतःला ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक पुरवठादार म्हणून प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या मुख्य ग्राहक/क्लायंट्स मध्ये एरोस्पेस विभागात—एअरबस, बोइंग, बॉम्बार्डियर, कॉलिन्स एरोस्पेस, स्पिरिट एरोसिस्टम्स इंक, सफ्रान, GKN एरोस्पेस, म्यूबेया एरोस्ट्रक्चर्स, हनीवेल, ईटन आणि साब्का; तर कंझ्युमर विभागात—हासब्रो, स्पिनमास्टर, वंडरचेफ आणि ट्रॅमोंटिना यांचा समावेश आहे.

एक्वसने ग्राहकांना आवश्यक असलेल्या जटिल आणि विशेष उत्पादनांच्या उत्पादनासाठी संयुक्त कंपन्यांच्या परस्पर पूरक तज्ज्ञतेचा लाभ घेत नवीन उत्पादने विकसित करण्याच्या आणि अभियांत्रिकी उपायसुविधा सादर करण्याच्या क्षमता विस्तारासाठी संयुक्त कंपन्यांमध्ये प्रवेश केला. कंपनीचा संयुक्त उपक्रम SQuAD फॉर्जिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“SQuAD”) ने कंपनीला इंजिन्स, लँडिंग गियर आणि  ब्रेकिंग सिस्टम घटकांसाठी लहान ते मध्यम आकाराचे एरोस्ट्रक्चरल भाग अल्युमिनियम, स्टील, टायटॅनियम किंवा निकेल-आधारित मिश्रधातूंमध्ये तयार करणे यामध्ये सुधारित क्षमतांनी सुसज्ज केले आहे. जोडीला कंपनीची मॅगेलन एरोस्पेस लिमिटेड, कॅनडा च्या साथीने एरोस्पेस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“API”) ही संयुक्त कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली. तिने कंपनीला नाविन्यपूर्ण सरफेस ट्रीटमेंट उपायसुविधा  पुरविण्यास सक्षम केले आहे. कंपनीची ट्रॅमोंटिना सोबतची संयुक्त कंपनी एक्वस कुकवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाविन्यपूर्ण ग्राहक उत्पादने विकसित करण्यासाठी तांत्रिक क्षमतांनी सुसज्ज आहे.

एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागांमध्ये दोन दशलक्ष चौ.फूटांहून अधिक उत्पादन जागांसह एक्वस भारतातील उत्तर कर्नाटक मधील तीन अद्वितीय, अभियांत्रिकी-आधारित व्हर्टिकली इंटिग्रेटेड व्हर्टिकली इंटिग्रेटेड अचूक उत्पादन क्षमता “इकोसिस्टिम्स” मध्ये कार्यरत आहे. याशिवाय, एक्वस एरोस्पेस विभागासाठी शोलेट  (फ्रान्स) आणि पॅरिस, टेक्सास (यू.एस.)मध्ये दोन समर्पित प्रिसिजन कॉम्पोनंट उत्पादन सुविधा केंद्रही चालवते. 

भारतामधील तीन उत्पादन इकोसिस्टिम्स आणि भारताबाहेरील दोन समर्पित एरोस्पेस सुविधा यांमध्ये, एक्वसकडे एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागातील उत्पादनांसाठी 2,919,058 वार्षिक मशीनिंग/मोल्डिंग तास क्षमता असून, एरोस्पेस विभागासाठी 200 पेक्षा जास्त कंप्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (“CNC”) मशीन आणि कंझ्युमर उत्पादनांसाठी 161 मोल्डिंग मशीन 31 मार्च, 2025 पर्यंत वापरात आहेत.

हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलला इन्फ्युजन थेरपीच्या सेवेमुळे इन्युझ या प्रतिष्ठित प्रमाणपत्राने सन्मान

0

पुणे२४ ऑक्टोबर२०२५:  सह्याद्री हॉस्पिटल, हडपसरला हे सांगताना अभिमान वाटत आहे की त्यांनी प्रतिष्ठित इन्फ्युझ (INFUZE) प्रमाणपत्र प्राप्त केले असून, हे मानांकन मिळवणारे हडपसरमधील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. या मानांकनामुळे हॉस्पिटलने उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याची आणि इन्फ्युजन थेरपी (शिरेवाटे औषध देण्याची पद्धत) मध्ये जागतिक सर्वोत्तम निकष व कार्यपद्धती आत्मसात करण्याची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.

इन्फ्युजन नर्सिंग सोसायटी-इंडिया (INS-India) तर्फे दिले जाणारे इन्फ्युज प्रमाणपत्र हे इन्फ्युजन थेरपीसाठी ठरवलेल्या कठोर नियम आणि निकषांचे पालन करणाऱ्या आरोग्य संस्थांना दिले जाते. या कार्यक्रमाचा उद्देश इन्फ्युजन प्रक्रियांमध्ये सुधारणा करून त्यांना एकसारखे आणि व्यवस्थित बनविणे, तसेच रुग्णांची सुरक्षितता आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले करणे हा आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित संस्थेची सविस्तर तपासणी केली जाते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि नियमांचे पालन नीटपणे पाहिले जाते.

रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सेवा प्रमुख श्रीमती सोनाली तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित चॅम्पियन टीमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या टीमला सघन उपचार युनिटचे संचालक डॉ. कपिल बोरवाके आणि हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स, डॉ. अभिजित शिवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही अधिका-यांचे सक्षण क्लिनिकल नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासकीय कार्यक्षमता आणि सामूहिक सांघिक कार्य या गोष्टी मान्यता मिळवण्यात अत्यंत निर्णायक ठरल्या.

हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स डॉ. अभिजीत शिवणकर म्हणाले, “ इन्फ्युज प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हांला खूप आनंद होत आहे. हे प्रमाणपत्र आमच्या उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी आणि इन्फ्युजन थेरपीसाठी उच्च मानकांचे पालन करण्याच्या आमच्या निरंतन बांधिलकीला प्रतिबिंबित करते. आमच्या संपूर्ण टीमच्या समर्पणाशिवाय हा टप्पा गाठणे शक्य नसते. हे सन्मान मिळवणारे सह्याद्रि रुग्णालय हे हडपसरमधील पहिले रुग्णालय असल्याचा आम्हांला अभिमान आहे.”

हे यश सह्याद्रि हॉस्पिटलच्या मूळ संकल्पाला अधिक बळकटी देते. त्यांचा संकल्प केवळ पुणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्याचा आहे. यासाठी ते आरोगय सेवेत नवनवीन उपक्रम राबवून नेतृत्व स्वीकारुन आणि रुग्णांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा देऊ सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आपले ध्येय पुन्हा अधोरेखित करते.

महिला डॉक्टरची आत्महत्या, समाजातील ही सामूहिक अपयशाची वेळ – डॉ. नीलम गोऱ्हे”

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उपसभापतींची भुमिका

सातारा, दि. २४ ऑक्टोबर २०२५ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी आपल्या हातावर सुसाईड नोट स्वरूपात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप लिहिले असल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त करत, यामागील सर्व सत्य शोधून काढण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “एका डॉक्टरने इतके टोकाचे पाऊल उचलणे हे अतिशय चिंताजनक आणि वेदनादायक आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरच असे गंभीर आरोप होणे, ही व्यवस्था हादरवणारी बाब आहे. साताऱ्याचे पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनी याची सखोल चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून यामध्ये आवश्यक ती काटेकोर चौकशी होईल अशी अपेक्षा आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “मृत्यूपूर्वी लिहिलेल्या मजकुराला न्यायालयात सत्यतेचा आधार मानला जातो. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक तपशील — फॉरेन्सिक अहवाल, कॉल रेकॉर्ड्स, संबंधितांच्या चौकशा यांचा निष्पक्ष तपास व्हावा. खरं तर, डॉक्टर हे समाजाचे आरोग्य जपणारे असतात; पण जेव्हा ते स्वतः अशा मानसिक वेदनेत अडकतात, तेव्हा हे समाजासाठीच आत्मपरीक्षणाचे कारण ठरते.”

महिला डॉक्टरांच्या आत्महत्येसारख्या घटनांबद्दल बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे या वेदनेची जाणीव मला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक महिला वैद्यकीय, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे अशा टोकाच्या पावलांपर्यंत गेल्या आहेत. पण मृत्यू हा कधीच पहिला पर्याय नसतो. समाजात समुपदेशन केंद्रे, महिला आयोग, महिला संघटना आणि मदत करणारी माणसं उपलब्ध आहेत. त्यांच्याशी संवाद साधा, मदत घ्या. लढा दिल्यास न्याय मिळतोच आणि आरोपींनाही शिक्षा होते.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने आणि निष्पक्षपणे व्हावा, तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी मानसिक आरोग्य आणि महिला सुरक्षेच्या पायाभूत रचनांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचेही सांगितले प्रकरणातील आरोपी ला बडतर्फ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याचे नमूद केले.

हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या:पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा आरोप

सातारा- जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. येथील कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना समजताच रुग्णालयातील सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिकांपासून वैद्यकीय संघटनांपर्यंत सर्व स्तरांवर या घटनेबाबत दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. या कालावधीत त्यांना प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागत होता, अशी माहिती सहकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चौकशी दरम्यान त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मृत डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली असून, त्यात त्यांनी दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर मुंडे यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशामुळे सातारा जिल्ह्यात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर काही काळ पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अरे बाबांनो ऐका,रोज तो खोटं बोगस ट्वीट करतो त्याच्या नका रे बातम्या चालवू ,त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत:आता बास -म्हणाले मोहोळ

पुणे- मोहोळ तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील , तूनही लोकप्रतिनिधी आहात , मी तुम्हाला रोज प्रश्न विचारेल अशा शब्दात आज धंगेकर यांनी सुनावल्यावर केंद्रीय मंत्री असलेले मोहोळहि हट्टाला पेटलेले दिसले ते म्हणाले, अरे बाबांनो ऐका, रोज तो खोटं बोगस ट्वीट करतो त्याच्या नका रे बातम्या चालवू , त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर नाहीत, आता बास -मोहोळ म्हणाले माझे शेवटचे स्पष्टीकरण ,,

प्रथम आपण पाहू धंगेकर आजच्या ट्वीट नंतर माध्यमांशी बोलताना काय म्हणाले…

जैन बोर्डिंगच्या जागे संदर्भात धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. आज मध्यरात्री पुण्याचे माजी महापौर असलेल्या आणि सध्या पुण्याचे खासदार,केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवे जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार त्यामुळेच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली,बढेकर बिल्डर नावापुरतेच आहेत.बढेकर कंपनीत दमदाट्या करतच त्यांनी पार्टनरशिप मिळविली होती.महापौर असताना ते बढेकर यांचीच मोटार वापरत होते.आणि विशेष म्हणजे महापौर असताना पदाचा गैरवापर करून कोथरूड मध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले गेले.वेताळ टेकडी येथे टनेल,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तो हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी नाही तर गोखले,बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे.असाही आरोप आता धंगेकर यांनी केल्याने याची स्पष्ट उत्तरे मोहोळ देतात कि कि नाही याबाबत मोहोळ यांना मध्यम प्रतिनिधींनी छेडले असता पहा मोहोळ काय म्हणाले,’


मोहोळ म्हणाले,’…. बाबांनो आंदोलन आरे ऐका ना. अरे बाबांनो आता मला एक कळत नाही. मला एक कळत नाही. रोज सकाळी तुम्ही तिथे जाता ते खोटं. बोगस काहीतरी ट्विट करत होतो बाबा. आणि तुम्ही त्याच बातम्या चालवत आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं. आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा रे बाबांनो, उगाच काहीतरी कशाला लावताय? गाडी? बरोबर? मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतच्या खर्चाची गाडी वापरली. अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय महापौरांच्या नांवाची गाडी गाडी कुठली बढेकर प्रॉपर्टीजची ? माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट दिलंय की मी या कंपनीत पार्टनर आहे. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली. मी स्वतःची गाडी वापरली. स्वतःचं इंधन वापरलं. आरे बाबा इतका कृतघ्न का होता आहे? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतं की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी करा, ती निगेटिव्ह करू नका. उगाच रोज काहीतरी चाललेले एक वेड लागलेला. मी काय म्हणतो विकृत मनोवृत्तीचे माणूस रोज काहीतरी बोलतोय. तुम्ही रोज बातमी करता
आता बास झालं. मी तुम्हाला सांगतो ऐका आणि आता तो मुद्दा सोडा. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शन ला पण मी नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष ,कुठे तरी आकस, . मला वाटतं आता हे तुम्हीच चालवणार का? मी एक असा महापौर आहे पुण्याचा ज्याने स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली आहे? व्हिडिओ मध्ये दिसलेली गाडी वापरली त्या पार्टनरची. मी कंपनीचा पार्टनर होतो ती गाडी वापरली,ती माझी ना? अरे काय चाललंय काय? त्याने ती पोस्ट टाकली तुम्ही, पण आपलं लगेच, मला वाटतं सनसनाटी काहीतरी…. बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा. त्याला आता तुम्हीच थांबवा. तुम्ही विचारा किंवा कागद दाखवा, पुरावे द्या आणि मग बातमी करा. आता ही किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो? तेव्हा आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे. मला काय ह्या माणसाबद्दल कुठे बोलायचं नाही. मला काही उत्तर द्यायचं नाही. आता त्याचे अनेक विषय बाहेर येताहेत. बघा, दोन हजार अकराला त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत . जमीन बळकावली त्याने कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन न घेता पळाला होता.जामीन कुठे त्याला मिळाला ? असे गुन्हे त्याच्यावर आहेत. बाबांनो, मला एक गुन्हा दाखवा. उगाच आपलं काहीतरी. रोज त्याने काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मिडिया मात्र चालली आहे. काळजी नका करू. आता माझं खूप काम करायचंय आपल्याला. बघा. आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदींनी. उद्या माझा जनता दरबार आहे. सर्वत्र जनता दरबार उद्या माझा. आज प्रत्येक जनता दरबारात पाच पाच हजार लोकांची कामे करतो. हे लावा. अरे बाबांनो, चांगलं ते काय ते लावा . उगाच आपलं त्याला नाही काम नाही. सगळे करणं लोकांनी टाकून दिलेलं आहे. उगाच आपलं तेवढंच काय ते बोलतात. आपण रोजच त्याच्या बातम्या चालवताय.

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं कडक वक्तव्य

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असंही ते म्हणाले. “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “तुमचं एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. तुमच्या एका चुकीमुळे भंडारा शहराचं नुकसान होईल. तुमचं एक चुकीचं पाऊल भंडारा शहर उद्ध्वस्त करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तर रागाच्या भरात काही लोक तमाशा उभा करतात, चुकीचं मत व्यक्त करतात. तुमचं एक चुकीचं मत व तुमच्या बंडखोरीचा पक्षाला मोठा फटका बसेल.”

बावनकुळे म्हणाले, “तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे चुकीचं बटण दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत. कोण काय बोलतंय त्यावर लक्ष आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा भाजपाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेली त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच सरकारच्या कामाचा बट्ट्याबोळ होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

या कार्यक्रमाला भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयार, माजी राज्यमंत्री व आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, भंडारा जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी आमदार हेमकृष्ण कापगते भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी जिल्हा अध्यक्ष शिवराम गिऱ्हिपुंजे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, भंडारा जिल्हा भाजप युवामोर्चा अध्यक्ष सचिन बोपचे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा माहेश्वरी नेवारे, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वासनिक, अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अशोक उईके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डिम्मू शेख, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन उपस्थित होते.

नगरसेविका होण्याच्या महत्वाकांक्षेने नवऱ्याचा पत्नीने पतीचा केला गळा आवळून खून; पती होता शरद पवार गटाचा कार्यकर्ता

पुणे- शरद पवारांच्या पक्षाच्या समर्थक आणि पिंपरी चिंचवड येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नकुल भोईर असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो शहरात विविध सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राजकीय कार्यक्रमात सक्रिय होता.या प्रकरणातील पत्नी चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघांमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादातूनच चैतालीने ओढणीने गळा दाबून नकुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना चिंचवड परिसरातील नकुल आणि चैताली यांच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरा नकुल आणि चैताली यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात चैतालीने घरातील ओढणीने पतीचा गळा दाबला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर नकुल बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन आणि पाच वर्षांची लहान मुलं शेजारच्या खोलीत झोपलेली असताना घराच्या हॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक धक्कादायक अवस्थेत आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, नकुल भोईर पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. या संशयावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. चैताली ही प्रकृतीने मजबूत आणि आत्मविश्वासू स्त्री असून, तिचा स्वभावही हट्टी असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री झालेला वादही हाच मुद्दा घेऊन सुरू झाला. नकुलने पुन्हा आरोपात्मक बोलणे सुरू केले, त्यावरून संतापलेल्या चैतालीने ओढणी घेऊन नकुलचा गळा दाबला. काही क्षणांत नकुलचा श्वास थांबला. मुलं झोपेत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांच्या मते, ही घटना पूर्णतः कौटुंबिक रागातून घडली असून, यामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नाही. तथापि, आरोपीची चौकशी सुरू आहे .

नकुल भोईर हे पिंपरी चिंचवड परिसरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते होते. विविध समाजकारण, शिक्षण आणि नागरिकांच्या समस्यांसाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. चिंचवडगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता आणि अनेकदा ते शासकीय यंत्रणांकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी त्यांचे राजकीय संबंध होते आणि अलीकडच्या काळात ते स्थानिक निवडणुकीत सक्रिय झाले होते. त्यांच्या पत्नी चैतालीनेही नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली होती. दोघांचं हे राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य एकमेकांत मिसळलं होतं; मात्र, याच नात्यातून वारंवार वाद निर्माण होत होते. त्या वादांनीच अखेर भीषण वळण घेतलं आणि नकुलचा जीव घेतला.

पोलिस तपास सुरू; स्थानिकांत संताप

चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, चैताली भोईरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, वाद नेमक्या कोणत्या कारणावरून विकोपाला गेला, याची खात्री करण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहोत. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय असल्याने आर्थिक कारणांवरूनही वाद होत असावेत, अशी शक्यता पोलिस तपासत आहेत.

बंगळुरूला जाणाऱ्या बसला आग, 25 प्रवासी जिवंत जळाले:एका दुचाकीची बसच्या इंधन टाकीला धडक झाल्याने आग लागली

कुर्नुल –
आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खासगी बसला आग लागली. या अपघातात पंचवीस प्रवासी जिवंत जाळल्याचे वृत्त आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर प्रवास करत असताना बस आणि दुचाकीची टक्कर झाली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसने लगेचच पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. त्यापैकी सुमारे २५ जणांना जिवंत जाळण्यात आले. पोलिसांनी सांगितले की अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते.

महापौरपद व केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग त्यामुळेच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली- धंगेकरांचा पुन्हा प्रहार

पुणे- रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना काही थांबताना दिसत नाहीत.जैन बोर्डिंगच्या जागे संदर्भात धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे.एकीकडे आपल्या X म्हणजे ट्वीटर हँडलावरून त्यांनी पोस्टर बदलून केवळ सत्यमेव जयते आणि पुणेकर फर्स्ट अशा शब्दांचे नवे पोस्टर ठेवले आणि आज मध्यरात्री पुण्याचे माजी महापौर असलेल्या आणि सध्या पुण्याचे खासदार,केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवे जोरदार टीकास्त्र सोडले आहे.अद्याप पावेतो मोहोळ यांची स्पष्टीकरणे धंगेकर यांच्या टीकास्त्रांपुढे फिकी पडत असल्याचे दिसत असताना आता या नव्या टीकास्त्राने मोहोळ हे आणखी पेचात पडू शकतील अशी स्थिती आहे. महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार त्यामुळेच मोहोळांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली,बढेकर बिल्डर नावापुरतेच आहेत.बढेकर कंपनीत दमदाट्या करतच त्यांनी पार्टनरशिप मिळविली होती.महापौर असताना ते बढेकर यांचीच मोटार वापरत होते.आणि विशेष म्हणजे महापौर असताना पदाचा गैरवापर करून कोथरूड मध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले गेले.वेताळ टेकडी येथे टनेल,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तो हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी नाही तर गोखले,बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे.असाही आरोप आता धंगेकर यांनी केल्याने याची स्पष्ट उत्तरे मोहोळ देतात कि राजीनामा घेऊन त्यांचा पक्ष त्यांच्यावर ED चौकशी सुरु करतो हे पाहणे धंगेकर यांना महत्वाचे वाटते आहे.

धंगेकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये नेमके काय म्हटले आहे ते वाचा जसेच्या तसे …

पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत.परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो,मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते.हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे.त्या गाडीचा नंबर होता Mh12 SW 0909 ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर….पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का..? साडेनऊ हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का..? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले..? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत. – वेताळ टेकडी येथे टनेल,HCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही आहेत की, त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला. तुम्हाला वाटेल की हे सर्व ते ट्राफिक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी करत आहेत. परंतु नाही गोखले, बढेकर आणि आणखी तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत. वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत ,यासाठी त्यांनी हा घाट घातला आहे. अर्थात बिल्डर नावाला असतात हेच मालक असतात. आता हे शपथ पत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील..? याचा विचार न केलेला बरा. – या बढेकर बिल्डरचे मागच्या ५ वर्षातले बॅलन्सशीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणे सहज गाठली आहेत. अर्थात महापौरपद व केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रींग चा प्रकार या कंपनीतद्वारे केल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल चारशे पटीने वाढली आहे. – खरंतर या बढेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप ही दमदाट्या करूनच करण्यात आली होती. अगोदर दमदाट्या केल्या.त्या बिल्डरने वैतागून गुन्हा दाखल केला आणि मग महापौरांचा मोबाईल हॅक झाल्याचा कांगावा केला. आता बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले आहेत. परंतु माननीय म्हणतील की,आता मी राजीनामा दिला आहे आणि बढेकर बिल्डरचे नाव जैन बोर्डिंग प्रकरणात येणं हा निव्वळ योगायोग आहे.यांच्या अनेक प्रतापाकडे मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं परंतु ज्या दिवशी यांनी जैन मंदिराच्या विषयात अतिशय चुकीच्या पद्धतीने जागा लुटली तेव्हा मला हे प्रकरण लावून धरावं असं वाटले. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे आणि पुरावे देत असताना त्याची निपक्ष:पातीपणे चौकशी झाली पाहिजे. आपल्या देशात अनेक तपास यंत्रणा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तपास केला पाहिजे तर पुणेकरांची झालेली फसवणूक लुटमार लोकांच्या समोर येईल. एक गोष्ट मी निश्चितपणाने सांगू इच्छितो, या पुण्यनगरीच्या विकासात आजवर अनेक महापौरांनी योगदान दिले परंतु यात अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द राहिली ती विद्यमान खासदारांची. कुठल्याही कामाचे एक वर्षाचे टेंडर देण्याची पूर्वापार पद्धत बदलत 5/10/15/20 वर्षांचे टेंडर देण्यात आले. यामुळे महापालिकेची अतिशय दुरावस्था झाली ती यांच्या काळातच. असो…… जैन बोर्डींग प्रकरणी व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ही जमीन लुटणाऱ्या प्रत्येकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

दिवाळी पाडवा आणि अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बनविण्यात आला ६१० किलोचा विश्वविक्रमी मोतीचूर लाडू!

बाणेर, :दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.

हा विशाल लाडू तयार करण्यासाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा लाडू “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून Winners Book of World Records मध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी Winners Book of World Records चे चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.

कार्यक्रमादरम्यान विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके,प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी, आणि समृद्धी केटरर्स चे संचालक जालिंदर वाळके पाटीलयांना चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून, समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. सदर 610 किलो लाडूचे वितरण चार अनाथ आश्रमात वितरीत करण्यात आला.

धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल- उदय सामंत

आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार:पण, कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू; उदय सामंत यांचा इशारा

मुंबई- आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये अनेक भागांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर येत आहे.पुण्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे अनेक दिवसांपासून भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करत आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नेमके काय चित्र पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.या पार्श्वभूमीवर रवी धंगेकरांवर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल असे सांगत आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत. पण, स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीत राहूनच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्रास होणार नाही. महायुतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील. तसेच महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केले पाहिजे, अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे.

सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे. धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडले हेही पहावे लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत सामंत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी बालनाट्य परिषदेवर झालेल्या आरोपांवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, हा पूर्णपणे बालनाट्य परिषदेचा विषय आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनीच आता खुलासा केला पाहिजे. तसेच संजय राऊत यांच्या राहुल गांधी पंतप्रधान वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान होणार हे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी पंतप्रधान होतील असे म्हणणे म्हणजे मी ट्रम्प झालो, असेच आहे, अशी खोचक टीका सामंत यांनी केली.

अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय.. मोहोळांवर टीका करताना धंगेकर यांचे वक्तव्य


पुणे- अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना हे माहिती आहे त्यांना वाटतेय हे बंद झालं पाहिजे. माझा राग विकृतीवर आहे, मोहोळांवर नाही . महानगरपालिकेत टेंडरमध्ये विकृती, शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती आहे. ह्याचा जर तपास केला तर तुम्ही हिशोब लावला तर चक्कर येईल तुम्हाला अशा वाक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिटोला लगावला आहे.

एका वृत्तपत्राच्या डिजिटल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धंगेकर यांनी भाजपमधील अनेक जण अशा घोटाळेबाज तथाकथित नेत्यांवर नाराज आहेत असा सूर आवळला आहे ते म्हणाले ,’ माझी सातत्याने भूमिका ही असेल की अशा विकृतीच्या विरुद्ध लढणं. आणि जे पुणेकरांच्या हिताचे पुणेकरांसाठी पोषक आहे. याच्यासाठी सातत्याने मी बोलत राहिल. गुन्हेगारी जी पुण्यात चालली आहे त्यावर बोलेल अहो सातशे टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात. आणि त्या पुणेकरांना किती त्रास देतात . आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले जातं व पादचार्‍यांना सुद्धा मारतात . त्यातच आता म्हणजे अशी पद्धत जर या पुण्यनगरीत असेल आणि असे लोक सत्तेच्या आजूबाजूला घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही. मला वाटतं की मी काही कोणाच्या पक्षावर बोलत नाही हा सगळ्यांचा गैरसमज आहे. मी विकृती वर बोलतोय आणि पुणे शहरामध्ये ते अड्ड्यावाले गुत्त्यावाले जे एकत्र आलेत आणि ह्या पक्षाला हायजैक करून बिल्डर लॉबीच्या हातात हात घालून ज्या पद्धतीने पुणे लुटण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बोलणे गैर नाही. आणि माझी देवेंद्र फडणीस साहेबांना विनंती आहे की जैन बोर्डींग आणि महावीरांची मंदिर ह्याच्यावर ज्या पध्दतीनं काम करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. बँक असेन, धर्मादाय आयुक्त असतील, महानगरपालिका असेल यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेवटी लोकशाही मध्ये लढणं हे आपलं लढणं आपल्या रक्तात आहे.
त्यांचाही पक्षातील अनेकांना वाटतंय की हे धंगेकर बोलतायत ते बरोबर आहे.पण ते बोलत नाही. त्यांना माहितीये की अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाल्यांचा पक्ष होत चाललाय तर हे बंद झाले पाहिजे. मी ही त्यांच्या मताचा आहे. फक्त ते बोलत नाही एवढंच .
मी टीकेला घाबरत नाही. पण जर महावीरांचे देऊळ जर गहाण ठेवलं असेल तर मी बोलायचा नाही का? कोणी जर जगातला असा माणूस आला आणि म्हणला महावीरांचे देऊळ गहाण ठेवलं ,हे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे तर मी माझं तोंड तातडीने बंद करे,न कुठलाही भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊ द्यात आणि सांगू द्यात . फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे.
अड्ड्यावाले आणि गुत्त्यावाले पुणेकरांना लुटत आहेत. दिवसाढवळ्या दरोडे टाकताहेत हे काही एक प्रकरण नाही. अनेक प्रकरणे आहेत याच्यावर मी बोलणार आहे. पण ही अनेक प्रकरणे आहेत. कालच एका जैन समाजाच्या एका व्यापार्‍याने टाकलं की माझं दोन हजार वीस साली माझे बांधकाम बंद पाडले. काहीच चूक नसताना बंद पाडले तो किती तळमळत असेल. हे लोक तळमळत आहेत. जिथं बघावं तिथं ही हीच विकृती. महानगरपालीका टेंडर मध्ये ही विकृती. शासनाच्या टेंडर मध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडर मध्ये ही विकृती . यांचा जर तपास केला तर तुम्ही चक्कर येऊन पडाल. जिथे जाल तिथे लुटायचे आणि खायचं लुटायचे आणि खायचे लुटायचे आणि यांच्या या पद्धतीवर जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का?
अहो जैन समाजाच्या ट्रस्टच्या जागेचे ज्या पद्धतीने हे सगळ मॅनेज झालेलं टेंडर आहे त्याच्यामध्ये बडेकर बिल्डर कसा काय आला? योगायोगाने आला ? मेरीट कम्पनी योगायोगाने आली? आयुक्त महानगरपालीका योगायोगाने आलेत? अहो हे सगळे ठरून आले. रेशनकार्ड काढायला दोन वर्ष लागतात यांना. आपण दहा दिवसात सगळं प्लॅन पास सगळं लोन बिन पास . आता लोन कसं काय दिलं? ह्या बँकेची चौकशी केली पाहिजेच . सत्तर सत्तर कोटी एका दिवसात देणार कुठली बँक?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर माझा विश्वास आहे . चुकीच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना पुरवण्याची काही एक टीम ही माझ्या मागे लागली तर ह्यात खरे काय नाय. शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे. ते कार्यकर्त्याच्या पाठिशी राहतील. कुठल्याही पद्धतीची त्यांनी मला नोटीस दिलेली नाही किंवा कुठला फोन नाही. मी जर चुकीचं वाटलो, मला कुणी सांगावं? माझ्या नेत्याने सांगितलं तर प्रश्नच नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझी तक्रार केली पाहिजे. पण त्या विकृतीने नाही . प्रदीप रावत यांनी माझ्यावर तक्रार केली पाहिजे. कारण त्यांनी स्वच्छ मनाचे खासदार अशी त्यांची प्रतिमा मी पाहिली आहे. अत्यंत प्रामाणिक अशा लोकांनी केली तक्रार तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस ऐकतील. पण जे अड्ड्यावाले गुत्त्या वाले तक्रार करत असतील तर .. तर देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. ते काय त्यांची दखल घेतील असं मला वाटत नाही.

लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे शिवसेना उभी राहते. माझं चुकीचं असेल तर मला भाजपच्या कुठल्याही लोकांनी येऊन सांगायचं माझं चुकलं. पण माझी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमचा महावीर तुम्ही गहाण ठेवलाय. आमचं जैन बोर्डिंग युवक जे गोरगरीब युवक महाराष्ट्रात येऊन शिकतात, मोठी जातात. विद्येचं माहेरघर अनेक संस्था या पुणे शहरात आहेत. जगामधील विद्यार्थी इथे येऊन शिकायला येतात. तुम्ही त्यांच्यावर संस्कार करताय. थोडी जनाची नाही मनाची. तुम्हाला लोकप्रतिनिधी केलंय.

आमची भूमिका आहे की जैन ट्रस्टच्या जागेचा हा सगळा प्रोजेक्ट शासनाने हातात घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये भगवान महावीरांचे देऊळ दिमाखदारपणे बांधलं पाहिजे. हजारो विद्यार्थ्यांना तिथे शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचा सगळा खर्च शासनाने करावा. आणि जैन धर्माच्या लोकांच्या हातात ते द्यावं. योग्य लोकांच्या हातात देऊन तो दिमाखदारपणे ते उभं रहावं.

मी सांगतो, मी परत एकदा म्हणालो की प्रदीप रावत सारखे नेते आहेत. विजय काळे सारखे नेते आहेत. त्यांनी जर मला बोलवलं. त्यांनी नुसता फोन केला तर त्यांच्या दारात मी स्वतः जाऊन उभा राहील. पण मला ती विकृती वाल्यांनी बोलावलं तर मी कसा जाईन?
विकृतीवाल्याला फोन करायचा कसा? मला विजय काळेंनी केला पाहिजे. तेव्हा आमचे नेते प्रदीप रावत, अनिल शिरोळे यांनी बोलावलं तरी जाणार मी, अहो यांनी मोठी कामं केलीत. अनिल शिरोळे साहेबांना मी जवळून बघितलं. महानगरपालिकेत ज्या ज्या वेळेला त्यांना जर चुकीचं वाटत होतं तर पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका मांडताना मी त्यांना पाहिलंय. त्यांनी आणि रावत यांनी पक्षाच्या बाजू न पाहता जनतेच्या बाजूने शहराच्या हिताचे काम केलं. त्यांनी बोलावलं तर नक्कीच जाईन. पण मला कुणी एखाद्या घोटाळेबाजाने बोलावलं तर मी कसा जाईन?असेही धंगेकर यांनी म्हणत पुन्हा पुन्हा दंड थोपटणे सुरूच ठेवले आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत.

हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन.

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे २६ वर्षांपासूनचे व्रत.

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर..

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट करणारा उत्सव आहे. दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे..

आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हा गोमाळ परिसर माझ्यासाठी केवळ एक भूभाग नाही; माझे येथे सखोल ऋणानुबंध आहेत. येथील लोक माझे केवळ आप्तजन नाहीत, तर ते माझे स्वकीय, माझे कुटुंब आहेत. या सर्वांशी माझे अतूट आणि दृढ नाते जोडले गेले आहे. गेल्या २६ वर्षांपासून मी एक व्रत जपले आहे. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कुवतीनुसार माझ्याजवळ असलेला प्रकाश घेऊन, जिथे अंधार आहे तिथे पोहोचण्याचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाची आराधना, आणि माझा हाच प्रयत्न असतो की माझी संपूर्ण शक्ती पणाला लावून हा प्रकाश येथे आणावा, अंधाराचे रूपांतर प्रकाशात करावे. ही परंपरा अखंड ठेवत, यावर्षी मी सलग २७ वे वर्ष येथील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये दिवाळी साजरी करत आहे. आमची ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादित नसून, मिष्टान्न वाटपाबरोबरच सामुदायिक भोजन, ग्रामसभा आयोजन, वैद्यकीय शिबिरे आणि वस्त्रवाटप हे या उत्सवाचे अविभाज्य घटक आहेत.हे कोणतेही बाहेरून येऊन केलेले औपचारिक सोहळे नाहीत. जसे आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो, तसेच हे माझे कुटुंब आहे आणि आम्ही सर्व मिळून हा प्रकाशाचा सण एकत्रितपणे साजरा करतो”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतातील एक विस्तृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी पर्वतरांग आहे. या पर्वतरांगांमध्ये अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिकरीत्या वास्तव्य आहे. या समाजांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. ते पर्वत, वने, झरे, शेती व निसर्गाला जिवंत देवता मानून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करतात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचेही या आदिवासी बांधवांशी अतूट नाते निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवाळीला हे नाते अधिक घट्ट होत आहे. येथे जाण्यास रस्ताही नसल्याने गावात पोहोचणे मोठे दिव्य ठरले मात्र आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, जीवनावश्यक साहित्य आणि औषधे घेऊन जाण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला. पाऊस पडल्यामुळे ट्रॅक्टर फसले तरी स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी आदिवासींसोबतची दिवाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली.