Home Blog Page 82

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी पुण्याहून ३०० विद्यार्थी निघणार मुंबईला

0

पुणे-मुंबईच्या नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पुण्याहून ३ शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थी गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईकडे निघत आहेत. पुण्यातील एड्स बाधित मुलांचे संगोपन व शिक्षण करणारी मानव्य संस्था (४५ विद्यार्थी) तुळापुर वळूज येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ईश्वरपूरम संस्था (४५ विद्यार्थी) आणि निंबाळकर गुर्जरवाडी येथील सुमती बालवन शाळा (१५० विद्यार्थी) शिक्षक व स्वयंसेवकांसह गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी या तीन शाळांमधून सकाळी ६ वाजता वातानुकुलीत बसेस मधून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. एक्झिम इंटिग्रेटेड क्लब (EIC ट्रस्ट) यांचा सहयोग यासाठी लाभला आहे अशी माहिती या संकल्पनेचे जनक व बँकिंग तज्ञ शशांक वाघ आणि EIC ट्रस्टचे खजिनदार व या प्रकल्पाचे प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी दिली.

त्यांनी सांगितले की हे विद्यार्थी ८-९ वर्षांपासून १५ वर्षे वयोगटातील असून गरीब कुटुंबातील आहेत. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी समुद्र असे या विद्यार्थ्यांना दाखवून झाल्यानंतर दुपारी हे विद्यार्थी डी. वाय. पाटील स्टेडीयम मध्ये येतील. एक्सप्रेस वे, अटल सेतू मार्ग, मुंबई, समुद्र, स्टेडीयम मध्ये क्रिकेट मॅच बघणे या सर्वांची अनुभूती हे विद्यार्थी प्रथमच घेणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की या सर्व विद्यार्थी व सोबतच्या शिक्षक व स्वयंसेवकांना सकाळी नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन तसेच स्टेडीयम मध्ये नाश्ता व कोल्ड ड्रिंक दिली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विशेष टी-शर्ट आणि टोपी देखील दिली जाणार आहे. भारतीय महिला खेळाडूंना चीअर अप करण्यासाठी या विद्यार्थ्यांसमवेत ढोल-लेझीम व शंख-ध्वनी पथक देखील नेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मॅच बघतानाचा विद्यार्थ्याचा फोटो त्याला भेट म्हणून दिला जाईल. यानिमित्त विशेष गाणे बसविण्यात आले असून त्याच्या तालावर स्टेडीयम मध्ये डान्स करीत हे विद्यार्थी भारतीय महिला खेळाडूंना प्रोत्साहन देतील असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी ‘बुक माय शो’ ने एकाच ब्लॉकमधील ३०० तिकिटे उपलब्ध करून दिलेली असून टी. व्ही. ऐवजी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये तेदेखील मुंबईत जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच बघण्याचा आनंद मिळणार असल्यामुळे या विद्यार्थांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे असे शशांक वाघ आणि प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

‘पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा लोगो व जर्सी अनावरण समारंभ २९ ऑक्टोबरला

0

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या उपस्थितीत होणार संपन्न

पुणे, दि. २८: भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत द वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे बुधवार , २९ ऑक्टोबर २०२५ रोजी
सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.

या समारंभात स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, तो भारताच्या सायकलिंग इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा सचिवांसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा, तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग, मनिंदर पाल सिंग, मनजीत सिंग जी.के., आणि ओंकार सिंह हे मान्यवर उपस्थित राहतील.

आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष व UCI चे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल (मलेशिया) आणि UCI व्यवस्थापन समिती सदस्या युआन युआन (चीन) यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.

सुमारे १८० मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रायोजक, मीडिया प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघ आणि सायकलिंगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की पुणे ग्रँड टूर ही भारतातील पहिली जागतिक दर्जाची मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा ठरणार असून, महाराष्ट्रातील निसर्गरम्य मार्गांवर होणाऱ्या या स्पर्धेतून राज्याची क्रीडा प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल.

डोंगरदऱ्यांतील कातकरी वस्तीतही उजळली दिवाळी

मुळशीतील ४५ कुटुंबांना फराळ, कपडे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप  

 पुणे ः दिवाळीचा फराळ, आकाशकंदील आणि फटाक्यांची आतषबाजी यांचा आनंद कधी फक्त दूरून पाहणाऱ्या कातकरी वस्तीत यंदा खऱ्या अर्थाने प्रकाश उतरला. शहरातील तरुणांच्या पुढाकारामुळे डोंगरदऱ्यांमधील या पाड्यावरही दिवाळीचा आनंद झळाळून उठला. पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ, येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ आणि अरण्येश्वर एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जय गणेश व्यासपीठाअंतर्गत मुळशी तालुक्यातील कळमशेत भागातील कातकरी पाड्यावरील ४५ कुटुंबांना दिवाळी फराळ, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, नवीन कपडे तसेच वह्या-पुस्तके आदी साहित्य देण्यात आले. या वेळी मंडळाचे किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, अमित जाधव, सुधीर ढमाले, रवी जाधव, पीयूष शहा आणि मयूर सोनावणे उपस्थित होते.

किरण सोनिवाल म्हणाले, डोंगरदऱ्यांतील या कातकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमची दिवाळीही प्रकाशमान झाली. त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा आनंद शब्दात मावणार नाही. प्रत्येकाने आपल्या आनंदाचा थोडा वाटा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवावा, हीच खरी दिवाळी. जय गणेश व्यासपीठांतर्गत दरवर्षी वंचितांना मदत करून दिवाळी साजरी केली जाते असेही त्यांनी सांगितले. 

रवींद्र धंगेकरांचा अमित शहांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता:मंत्री उदय सामंतांचा खुलासा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अपमान केला असल्याचे बोलले जात होते. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा करत म्हटले की, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, असे धंगेकर म्हणाले होते. परंतु, आमिषाला ऐवजी अमित शहा असा अपभ्रंश झाला असल्याचे उदय सामंत म्हणाले.

पुण्यातील जैन समाजाच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्ये जाऊन जैन समाजाचा मुद्दा ऐकून घेतला असून त्यांची भूमिका धंगेकर साहेबांना पटली आहे. काही गोष्टी गैरसमजातून घडल्या असतील तर अशा गोष्टी भविष्यात घडू नये यासाठी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मला असे वाटते की आपण सगळ्यांनी यावर पडदा टाकावा. तसेच भाजपच्या नेत्यांचा अपमान करण्याचा रवींद्र धंगेकर यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली आहे. तसेच महायुतीला बाधक होईल असे काही आमच्याकडून होणार नाही.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, शासनाने जे निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे या विषयावरून कॅबिनेट बैठकीत कुठलाही वाद झाला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, एखादी वाईट गोष्ट झाली की भाजपच्या नेत्यांना दोष देण्याचे काम ते करतात. आगामी निवडणुका पाहता त्यांचे आरोप सुरू आहेत.

आगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकृत विधान आम्ही कुठेही पाहिले नाही, की मुंबईत युती करून लढू आणि इतर ठिकाणी युती न करता लढू. तिन्ही नेते सक्षम आहेत आणि आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार. तसेच याबाबतीत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जे राहुल गांधी करतात ते महाराष्ट्रात होत आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत जे राहुल गांधींनी केले, तिथे एक चित्रपट दाखवला तो यांनी मागच्या रांगेत बसून बघितला. आता ते मुंबईत तेच करत आहेत. यात नावीन्य काहीच नाही. तसेच यांनी कधी यादीच पाहिली नाही, त्यांनी कधी मतदारसंघात लक्षच दिले नाही, त्यामुळे यांना ही प्रोसेसच माहीत नाही, अशी टीका सामंत यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी :चक्क मुख्यमंत्र्यांवर आली मध्यस्थी करण्याची वेळ

मुंबई -राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्याप त्यांच्या खात्यात पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘तुम्ही सरकारकडून देण्यात आलेली मदत पोहोचली म्हणता, जिल्हाधिकारीही मदत दिली म्हणतात, पण प्रत्यक्षात शेतकरी मदत मिळाली नसल्याचा दावा करतात’, असे ते या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरताना म्हणाले. त्यावर प्रशासनाने पुन्हा एकदा ‘आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचल्याचा’ दावा केला.

यावरून मंत्री व प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. हा वाद वाढत असल्याचे पाहून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप केला. आतापर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आजच आढावा बैठक घ्या व शेतकऱ्यांपर्यंत किती मदत पोहोचली याची माहिती सादर करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी आजच्या बैठकीत अतिवृष्टी व महापुरासंबंधी सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी व महापुराशी संबंधित सरकारने घोषित केलेल्या पॅकेजचा आढावा घेतला. या प्रकरणी आतापर्यंत 8 गजार कोटी रीलिज झाले आहेत. त्यानुसार 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. सरकारने अजून 11 हजार कोटींना मान्यता दिली आहे. सरकार या प्रकरणी 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या देखील लवकरच सोडवण्यात येतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Agristack पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. सरकारकडे त्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्याने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. ही व्यवस्था प्रक्रियेला गती देणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा सरकारी कार्यालयांची धावपळ करावी लागणार नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सरकारने घोषित केलेल्या मदतीचा वाटा पोहोचला का? हे पडताळून पाहण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी शिवसैनिक घरोघरी जाऊन फॅक्ट चेक करत असताना मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावरून वाद झाल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

मारणे टोळीचा म्होरक्या रुपेश मारणे अखेर गजाआड

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती कठोर कारवाईची मागणी

कोथरूडमधील अभियंता मारहाण प्रकरणात पोलिसांना यश
पुणे – कुख्यात गजा मारणे टोळीचा मुख्य सदस्य रुपेश मारणे याला अखेर कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीदिनी कोथरूड परिसरात भाजपा कार्यकर्ते असलेले अभियंता देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण करून तो नऊ महिन्यांपासून फरार होता. मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून गुप्त माहितीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले.ही घटना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली होती. शिवजयंतीनिमित्त कोथरूडमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना वाद झाला. या वादातून रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांनी जोग यांना बेदम मारहाण केली होती.

देवेंद्र जोग हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून रुपेशच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले होते, मात्र रुपेश फरार झाला होता.रुपेश मारणे हा गजा मारणे टोळीचा निकटवर्तीय असून, गजा मारणे तुरुंगात असल्याने टोळीची सर्व सूत्रे तोच हलवत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत मारहाण, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे एकूण २० गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या उपायुक्त (झोन-२) संभाजी कदम यांनी दिली.

फरारी रुपेश पोलिसांना सतत चकमा देत ठिकाण बदलत होता. त्याच्या अटकेसाठी कोथरूड पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सापळे रचले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मुळशी तालुक्यातील आंदगाव परिसरात धाड टाकत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अटकेनंतर रुपेशकडून टोळीच्या इतर गुन्ह्यांबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल असून, पुढील तपास सुरू आहे. या अटकेमुळे मारणे टोळीच्या कारवायांना लगाम बसणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.

केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता:1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा

नवी दिल्ली-केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली, ज्यामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वेतन आयोग १८ महिन्यांच्या आत त्यांच्या शिफारशी सादर करेल. त्यांच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि भत्त्यांचा आढावा घेईल.
आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढू शकतो?

मूळ पगारातील वाढीची रक्कम फिटमेंट फॅक्टर आणि डीए विलीनीकरणावर अवलंबून असते. ७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. ८ व्या वेतन आयोगात तो २.४६ असू शकतो.

प्रत्येक वेतन आयोगात महागाई भत्ता शून्यापासून सुरू होतो. कारण नवीन मूळ पगार महागाई लक्षात घेऊन आधीच वाढवलेला असतो. त्यानंतर, महागाई भत्ता पुन्हा हळूहळू वाढतो.

सध्या, डीए मूळ वेतनाच्या ५५% आहे. डीए रद्द केल्याने, एकूण पगारातील वाढ (बेसिक + डीए + एचआरए) थोडी कमी दिसू शकते, कारण ५५% डीए घटक काढून टाकला जाईल.

उदाहरण:

समजा तुम्ही लेव्हल ६ वर आहात आणि ७ व्या वेतन आयोगानुसार तुमचा सध्याचा पगार आहे:

मूळ वेतन: ₹३५,४००
डीए (५५%): ₹१९,४७०
एचआरए (मेट्रो, २७%): ₹९,५५८
एकूण पगार: ₹६४,४२८
जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट २.४६ लागू केले तर नवीन वेतन असे असेल:

नवीन मूळ वेतन: ₹३५,४०० x २.४६ = ₹८७,०८४
डीए: ०% (रीसेट)
HRA (27%): ₹87,084 x 27% = ₹23,513
एकूण पगार: ₹८७,०८४ + ₹२३,५१३ = ₹१,१०,५९७
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

ही एक गुणक संख्या आहे जी सध्याच्या मूळ पगाराने गुणली जाते आणि नवीन मूळ पगार मिळतो. वेतन आयोग महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन ते निश्चित करतो.

शेवटचे वेतन आयोग कधी स्थापन आणि लागू करण्यात आले?

पाचवा वेतन आयोग: एप्रिल १९९४ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. जानेवारी १९९७ मध्ये सरकारला अहवाल सादर करण्यात आला, परंतु १ जानेवारी १९९६ पासून शिफारसी लागू करण्यात आल्या. ५१ वेतनश्रेणी होत्या, परंतु त्या ३४ पर्यंत कमी करण्यात आल्या.
सहावा वेतन आयोग: २० ऑक्टोबर २००६ रोजी त्याची स्थापना करण्यात आली. हा अहवाल मार्च २००८ मध्ये तयार करून सरकारला सादर करण्यात आला. ऑगस्ट २००८ मध्ये हा अहवाल मंजूर करण्यात आला आणि १ जानेवारी २००६ पासून या शिफारसी लागू झाल्या.
७ वा वेतन आयोग: फेब्रुवारी २०१४ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आणि मार्च २०१४ पर्यंत त्याच्या अटी अंतिम करण्यात आल्या. नोव्हेंबर २०१५ मध्ये अहवाल सादर करण्यात आला. जून २०१६ मध्ये सरकारने त्याला मान्यता दिली आणि १ जानेवारी २०१६ पासून या शिफारसी लागू झाल्या.

धनकवडीत दोन गटात मारामारी ; तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पुणे-धनकवडीत दोन गटात एकमेकांकडे पाहण्यावरुन जोरदार धुमचक्री उडाली असून त्यात एका गटाने तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दिलेल्या फिर्यादीत चौघांवर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अविनाश महादेव घोडके (वय ३९, रा. ठाकर गिरणीसमोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकी बाळासो कांबळे (वय २५,रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला अटक केली आहे. विशाल बाळासो कांबळे (वय २७) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडी येथील ठाकर गिरणीसमोर २४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांचे विकी कांबळे याच्याशी शाब्दिक बाचाबाची होत असल्याचे अविनाश घोडके यांना दिसले. त्यांनी विकी कांबळे याला याबाबत विचारले असता, त्याने घोडके यांना तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली. घरी जाऊन भाऊ विशाल याला घेऊन आला. विकी याने हातातील कोयत्याने घोडके यांच्या डोक्यात, डाव्या कानावर वार केले. विशाल याने पायाच्या नडघीवर वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.

त्याविरोधात विकास ऊर्फ विकी बाळासो कांबळे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश महादेव घोडके (वय ३९), ओमकार दीपक घोडके (वय २१), अविनाश घोडके यांची मेव्हणी (वय ३५) व मेव्हणीचा मुलगा अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश घोडके यांच्या मेव्हणीचा मुलगा हा विकी कांबळेकडे रागाने पहात असल्याने त्यास रागात पाहण्याचे कारण विचारले. तेव्हा अविनाश घोडके याने विकीला शिवीगाळ करुन धमकी दिली. डोक्यात, कपाळावर लोखंडी प्लेटने मारुन जखमी केले. ओमकार घोडके याने पाठीत दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.

पुढच्या दीड वर्षात चित्रपट इंडस्ट्री संपेल:महेश मांजरेकर यांचे AI बाबत भयावह भाकीत

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे चित्रपटसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे भाकीत केले आहे. पुढच्या दीड वर्षांत सिनेमा पूर्णपणे बंद होईल, कारण AI जे व्हिज्युअल्स तयार करतं, ते कॅमेऱ्याद्वारे निर्माण करणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा सगळ्यांनी नाटकांकडे वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.सध्या बऱ्याच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. केवळ एका प्रॉम्प्टवर अवघड काम सोपे होते. अनेक क्षेत्रांत एआयमुळे अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशातच आता चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी एआयच्या संदर्भाने चित्रपटसृष्टीविषयी भयावह भाकित केले आहे. ते एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

महेश मांजरेकर म्हणाले, “AI ने एवढं टेकओव्हर केलंय की आता मानवी सर्जनशीलतेची गरजच उरणार नाही. माझं मत आहे, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल — बंद म्हणजे बंदच! तुम्ही कितीही चांगले VFX केले, तरी AI तयार करत असलेली दृश्यं कॅमेऱ्यावर देणं अशक्य आहे. मी घरबसल्या बसून ‘टायटॅनिक’मधली लायटिंग, लिओनार्डो डिकॅप्रियोपेक्षा चारपट सुंदर हिरो तयार करून सिनेमा बनवू शकतो. म्हणजे, आता घरी बसूनच चित्रपट निर्मिती शक्य झाली आहे.”

महेश मांजरेकरांनी एआयने तयार केलेल्या ‘महाभारत’च्या ट्रेलरचाही उल्लेख केला. “तो ट्रेलर अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. जर हे सर्व एका क्लिकवर होऊ शकत असेल, तर लोक कलाकारांवर पैसे का खर्च करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, AI वापरण्यासाठीही हुशारीची गरज लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पण मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आजचा AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ज्या दिवशी AI ला सिनेमा बनवण्याचा कोड मिळेल, त्या दिवशी आपण संपणार! कारण रोज दहा हजार सिनेमे तयार होतील आणि त्यासाठी जवळपास काहीच खर्च लागणार नाही. माझ्या एका मित्राने एआयच्या मदतीने अॅड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये.

लोक एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सिनेमे तयार करतील, पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षांत सिनेमे बंद होणार, हे मला नक्की दिसतंय. म्हणून आता सगळ्यांनी गुपचूप नाटकांकडे वळले पाहिजे. कारण येत्या दीड वर्षांत सिनेमा संपणार हे माझे भाकीत आहे.

‘जमतारा 2’ तील अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या

पुणे-नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय मालिका “जामतारा – सबका नंबर आयेगा सीझन २” मध्ये दिसलेला २५ वर्षीय मराठी अभिनेता सचिन चांदवडे याने आत्महत्या केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी त्याचा मृतदेह पुण्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये छताच्या पंख्याला लटकलेला आढळला.

जेव्हा कुटुंबाने दरवाजा तोडला, तेव्हा आतील दृश्य भयानक होते. त्यांनी ताबडतोब सचिनला खाली आणले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्रकृती सतत खालावत गेली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला त्या रात्री धुळे येथे हलवण्यात आले, परंतु तेथेही तो जीवनाची लढाई हरला. २४ ऑक्टोबरच्या रात्री सचिनचे कायमचे निधन झाले.चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री या घटनेवर शोक व्यक्त करत आहे. सचिन चांदवडे यांनी मराठी रंगभूमी आणि लघुपटांमध्ये स्वतःचे नाव कमावले होते. नेटफ्लिक्सच्या “जामतारा २” मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यांनी अलीकडेच काही ओटीटी प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण केले होते आणि सोशल मीडियावर सक्रिय राहिले होते, त्यांनी अनेक प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्या होत्या.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सचिन गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता. तथापि, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्तानुसार, त्याच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि प्राथमिक अहवालात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे.

जैन बोर्डिंग व्यवहारातील 230 कोटी रुपये जप्त करा , ट्रस्टींना बरखास्त करा; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे- जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे (Jain Boarding House) अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला यासंदर्भात ई-मेल पाठवला होता. पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल विशाल गोखले यांनी केला आहे. आता . शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज एक्सवर ट्विट करत 230 कोटी रुपये जप्त करून सामाजिक कामासाठी वापरावेत अशी मागणी केली आहे.पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी, असंही रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.

रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्ट ला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे गैर व्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नियुक्त करावा. या पुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. यात काही न्यायमूर्ती तसेच आय.ए.एस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी. यात अजून एक पळवाट अशी आहे की, चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे,यावेळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं राजकीय दबावात काम करत वेगळा निकाल दिला तर ही 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल, असा माझा अंदाज आहे. हे 230 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी दहा हजार मुला मुलींची रहिवासी क्षमता असलेले असलेले चांगले वस्तीगृह होऊ शकते, असं रविंद्र धंगेकर म्हणाले.

‘जैन बोर्डिंग’चा घटनाक्रम- (Jain Boarding House)
15 मे 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत विक्री करारनामा दस्त नोंदणी

23 जुलै 2025- ट्रस्टकडून बांधकाम आराखडा परवानगीसाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल

8 सप्टेंबर 2025- ट्रस्ट जमिनीवर निवासी आणि व्यापारी बांधकामास परवानगी, मनपाकडून आराखडा मंजूर

6 ऑक्टोबर 2025- बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावास मंजुरी

7 ऑक्टोबर 2025- श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कडून कर्ज प्रस्तावास मंजूरी

8 ऑक्टोबर 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत जागा विक्री खरेदीखत दस्त नोंदणी

8 ऑक्टोबर 2025- खरेदी खतात 230 कोटींच्या मोबदल्याचा उल्लेख, पण बाजारभाव 311 कोटी, 81 कोटींनी कमी दाखवला

8 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन (20 कोटी) व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह (50 कोटी) यांच्यात गहाणखत दस्त

20 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांकडून खरेदी-विक्रीला प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे आदेश

24 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह यांच्यात कर्ज परतफेड दस्त

27 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनीची ट्रस्टींना ईमेल करुन व्यवहारातून माघार

28 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांसमोर आज पुन्हा सुनावणी

पाळीव कुत्री चावल्याने कुत्री पाळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भटकी कुत्री चावली तर महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकेल..

पुणे:शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाला ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतला. श्वानाने तरुणाच्या पोटरीचा चावा घेतल्याने त्याला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, श्वान मालकाने आक्रमक स्वभावाच्या ‘पीटबुल’ श्वानाला साखळी न बांधता रस्त्यावर मोकळे सोडले होते. पोलीस उपनिरीक्षक जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरी घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली. किरकोळ वादातून एका श्वान मालकाने त्याचे पाळीव श्वान एका तरुणाच्या अंगावर सोडले. या श्वानाने चावा घेतल्याने तरुण जखमी झाला. याबाबत तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या पाळीव श्वानासह थांबला असताना त्याने तक्रारदार तरुणाच्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. तक्रारदार खाली उतरून विचारणा करत असताना आरोपीने श्वान त्यांच्या अंगावर सोडले. पोलीस उपनिरीक्षक एन. शेख या घटनेचा तपास करत आहेत.

हिंदू राष्ट्र होण्यासाठी समर्पण भावनेने योगदान द्या – महंत श्री राजुदास महाराज

छट मातेचे व्रत आस्था, विश्वास, त्यागाचे प्रतीक – महंत श्री राजुदास महाराज

श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छट पूजेचे भव्य आयोजन

पुणे, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने योगदान द्यावे असे आवाहन अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजुदास महाराज यांनी केले.
उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये सूर्याची उपासना करून छटपुजेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी सनातन काळापासूनची धारणा आहे असेही महंत श्री राजुदास महाराज यांनी सांगितले.
गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने संस्थापक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर सोमवारी छटपूजा श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पारंपरिक पद्धतीने महंत श्री राजुदास महाराज यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर गंगा आरती करण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, आयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने, सुधीर काळजे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, विकास पाटील, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, दीपक चव्हाण, विजय पाटील, संदीप साकोरे व छटपूजा निमित्त आलेले भक्त भाविक उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, छट माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व हिंदू भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागतो.
विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर म्हणाले की, या सूर्यषष्ठी महोत्सवात छट मातेचे व्रत केले जाते. निसर्गात आणि समाजात एकरूपता यावी. सर्वांचे कल्याण व्हावे, पिक पाणी मुबलक यावे, यासाठी सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना केली जाते. सनातन धर्मात नदीला मातेचा दर्जा आहे. या महोत्सवात मातेचे पूजन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश जगभर दिला जातो.
स्वागत,प्रास्ताविक करताना श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी सांगितले की, महंत श्री राजुदास महाराज हे प्रभू श्री रामाची जन्मभूमी अयोध्या येथून प्रभू श्री रामाचे दूत म्हणून आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच पुण्यनगरीत आले आहेत. त्यांनी भारत देश अखंड हिंदुराष्ट्र व्हावे असा केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी श्री विश्व श्रीराम सेना कायम त्यांच्या सोबत राहील. मोशी येथील इंद्रायणी नदीघाट येथे भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक उपस्थित होते. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवारांच्या दुर्लक्षाची जैन समाज दखल घेईल ?

पुणे- पुण्यात बड्या बड्या बिल्डरांकडून जैन समाजाच्या धर्मादाय संस्थेची जी जागा विकत येत नाही , विकत कोणाला घेता येत नाही , आणि ज्या जागेचा व्यावहारिक विक्रीसाठीचे खरेदी खत देखील होऊ शकत नाही अशा मोडेल कॉलनीतील साडेतीन एकराच्या भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार झाला आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या , कधीकाळी कलमाडींच्या नेतृत्वाची जागा घ्यायला निघालेल्या सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी कळवूनही सरार्स याकडे दुर्लक्ष केल्याने जैन समाज याबाबत असमंजस भावनेत आहे . या पार्श्वभूमीवर आज जैन समाजाचे आचार्य गुप्ती नांदी महाराज यांनी देखील पत्रकार परिषदेतून नाराजीही व्यक्त केली आहे.

काय म्हणाले जैन मुनी:आमची लढाई कोणत्‍याही पक्षाशी नव्‍हे, तर भ्रष्टाचाराशी आहे, असे स्पष्ट करत जैन मुनींनी ट्रस्‍टींना सुनावले.जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे, असे सांगून जैन मुनींनी पुढची दिशा काय असणार आहे, याविषयी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.बांधकाम व्‍यावसायिक विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असेही जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. या सर्व प्रकारास ट्रस्‍टचे काही पदाधिकारी जबाबदार असून, त्‍यांच्‍यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे.तसेच, हा व्‍यवहार पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यत येत्‍या १ तारखेपासून होणारे उपोषण सुरुच राहणार असल्‍याचे ते म्‍हणाले.उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. १७ ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणे पाठवले होते. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी शब्द देखील काढलेला नाही. ते समाजासोबत उभे राहावी, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात असंख्य बिल्डर असून त्यांच्याबाबत देखील जनतेच्या असंख्य तक्रारी असतात . आणि हेच बिल्डर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या जनसंपर्क अभियानाची सूत्रे आपल्या हातही ठेऊन असतात या बाबींचा मोठा फटका अजित पवार यांच्या पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत बसेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता या राजकीय स्पर्धेत पुढे येऊ पाहते आहे तर भाजपने महापालिकेच्या कारभारात तेच तेच नेते रिपीट करून आणि मुंबई दिल्लीच्या राजकारणात देखील त्याच चेहऱ्यांना संधी दिली त्यांच्या भेदभावी कारभारावर भाजपच्या १०० नगरसेवकांच्या गोटातील मोठी संख्या नाराज आहे त्याचाही फटका भाजपला बसू शकणार आहे.

अशा स्थितीत आता जैन समाजाच्या जागेबाबत , मंदिर आणि बोर्डिंग बाबत चुप्पी साधून अजित पवार गटानेही नाराजी ओढवून घेतली आहे. कॉंग्रेसचे अरविंद शिंदे , शिवसेनेचे संजय मोरे हे या विषयामुळे जैन समाजाच्या संपर्कात राहिल्याचे दिसून आले आहे.

सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये गुंतवणूकीच्या विशाल संधी : नितीन गडकरी

0

मुंबई, 27 ऑक्टोबर 2025

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ मध्ये “जहाज क्षेत्रामध्‍ये वित्तपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा” या विषयावर संबोधित केले.  

याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अधोरेखित केले की, सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या (84 लाख कोटी रु) भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये बंदरे, जहाज वाहतूक आणि लॉजीस्टीक  यामध्ये प्रचंड गुंतवणूक क्षमता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, टोल ऑपरेट ट्रान्स्फर,खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून म्हणजेच ‘पीपीपी’ मॉडेल्सद्वारे 1.4 लाख कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. यामध्‍ये  खाजगी सहभाग 10 % वरून 35% पर्यंत वाढवला आहे असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले. असा दृष्टीकोन    प्रकल्प अंमलबजावणीला गती देऊ शकतात, तसेच  गुणवत्ता सुधारणे शक्य होते, असे सांगून मंत्री गडकरी म्हणाले, खाजगी क्षेत्रातील नवोपक्रम आणि कार्यक्षम निधी ओघाद्वारे  सरकारवरील आर्थिक भार कमी केला जावू  शकतो. त्यांनी “एकात्म  महासागर, एक सागरी दृष्टीकोन : भारताचे सागरी झेप  ” या शीर्षकांतर्गत तयार करण्‍यात आलेला सीएमईजी (आरआयएस) – ‘इंडिया मेरीटाइम रिपोर्ट 2025-26’ जारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्‍यात आलेला सागरमाला 2.0  उपक्रम  पुढे नेल्याबद्दल नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे कौतुक केले. जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापराला चालना,  बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच  किनारी भागाची  अर्थव्यवस्था मजबूत करणे त्याचबरोबर अंतर्गत जलमार्गांचे  पुनरुज्जीवन करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 

खाजगी नवोपक्रम, पारदर्शक प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीमुळे भारत आपल्या सागरी नेतृत्वावर  आणि स्पर्धात्मकतेवर कायमस्वरूपी जागतिक विश्वास निर्माण करू शकतो, यावर गडकरी यांनी यावेळी  भर दिला.