मुंबई- बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर काही तरी भूमिका घ्यावी. भाजपचे हिंदुत्व हे केवळ मतापुरते मर्यादित आहे का?, हिंदूंना घाबरुन मते घ्यायची एवढंच त्यांना जमते. बांगलादेशासह मुंबईतही मंदिर सेफ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशातील गोर-गरीब हिंदूंवर अत्याचार होत आहे. मुंबईतील दादरमधील हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहेत, आता भाजपचे हिंदुंत्व कुठे गेले? हिंदुंच्या मतावर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीचे केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांना अजून किती राक्षसी बहुमत पाहिजे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सत्तेचा विस्तार हेच भाजपचे स्वप्न आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असे आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसे आपण एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते तसेच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचे मंदिर जाळण्यात आले. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. उद्धव ठाकरे म्हणाले की, नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. मी सांगितले होतं की रितसर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र द्यावे. कारण त्यांच्यामागे खूप व्याप आहेत. जगभरात फिरायचे असते, भाषणे द्यायची असतात. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नसतील. मणिपूरचे अन्याय कळले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील.
नवीदिल्ली–शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल भाजप नेते अमित शहा आणि उद्योजक गौतम अदानी यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यानंतर भाजप शरद पवारांना सोबत घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान उद्योजक गौतम अदानी यांच्या घरी भाजपच्या केंद्रीय नेत्याची आणि राष्ट्रवादीचा नेता भेटला अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली. यामुळे आता या सर्व चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शरद पवार गटाचे मेहबुब शेख यांनी हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळले आहे.
शरद पवार यांना सोबत घेण्यासाठीच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाहीये अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी पवारांशी चर्चा केल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी प्रवीण दरेकरांनी शरद पवार गटाचे आमदार-खासदार सत्तेत राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहू शकतात असे म्हटले होते. त्यानंतर आता या चर्चेने जोर धरला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवारांशी मंत्रिमंडळ विस्तार, परभणीतील अशांतता या विषयांवर चर्चा केली. राजकारणापलिकडील नाती जपण्यासाठी मी आणि माझे सहकारी आलो होतो. तर 13 डिसेंबरला प्रतिभाकाकींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठीही येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आज पुन्हा अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार असल्याने या चर्चांनी जोर धरला आहे.
2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात स्थिर सरकार यावे, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 123 जागा तर शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्ता स्थापनेसाठी 22 जागा कमी पडत होत्या. यातच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत, असे सूचक वक्तव्य केल्याने शरद पवार स्वत:च भूमिका घेणार आहेत का त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात 2029 पर्यंत आता कोणती मोठी निवडणूक होण्याची चिन्हे दिसून येत नाही. कारण महाराष्ट्रात भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत आहे. तर केंद्रातील सरकारही आता बऱ्यापैकी स्थीर असल्याचे दिसून येते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 कमी आहे. एनडीएकडे भाजपशिवाय 14 मित्रपक्षांचे 53 खासदार आहेत. सर्वांना मिळून एनडीएने 293 जागा आहेत. यात चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश यांचा जेडीयू 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या दोन पक्षांच्या पाठिंब्यावर सध्या केंद्र सरकार दिसून येत आहे. यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात जर काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार भाजपसोबत आले तर त्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे या चर्चांना बळ आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली. यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचे 41 आमदार निवडून देखील आले. तर शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले आहे. सत्ता नसताना लोकप्रतिनिधी जपण्यासाठी अन् पक्षाच्या भवितव्यासाठी शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत 10 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 8 जागांवर त्यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हावर विजय मिळवला आहे. यात अनेकांनी भाजपच्या दिग्गजांचा पराभव केला आहे. यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे, बीडमध्ये बजरंग सोनावणे, वर्धांचे अमर काळे, अहमदनगरातून नीलेश लंके, भिवंडीतून सुरेश म्हात्रे विजयी झाले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर उमेदवार उभे करत 8 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, अवघ्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. यात प्रदेशाध्यक्ष इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील, तासगावचे रोहित पाटील, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, बीडचे संदीप क्षीरसागर, मुंब्रातून जितेंद्र आव्हाड, वडगाव शेरी बापूसाहेब पठारे, करमाळ्यातून नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, मोहोळचे राजू खरे, माढ्याचे अभिजीत पाटील यांनाच विधिमंडळात जाता आले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी दावा केला होता की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, यामुळे तेव्हाही या वक्तव्याची मोठी चर्चा 15 दिवसांपूर्वी झाली होती.
अजित पवार- शरद पवार भेटीविषयी अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातील काही असे. लोकसभेतील पराभवाची परतफेड अजित पवारांनी विधानसभेत केली. आता त्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलण्याचे ठरवले असावे. त्याला अर्थातच शरद पवारांची संमती मिळाली आहे. अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे की, भविष्यात भाजपने त्यांना सोडले तर ते पुन्हा काकांसोबत जाऊ शकतात. मविआचे खरे अस्तित्व शरद पवारांमुळेच आहे. या भेटीमुळे उद्धव ठाकरेंना काका-पुतण्याच्या एकत्र येण्याची भीती वाटणार आहे. असे झाल्यास महाविकास आघाडी कमकुवत होऊ शकते. गरज पडल्यास शरद पवार यांच्याशी थेट राजकीय संवाद साधण्यासाठी अजित पवार यांच्या रूपाने भाजपला मोठा पर्याय मिळाला आहे. लोकसभा, विधानसभेला पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे. कारण या निवडणुकीत महायुतीमध्ये सामील असलेले पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत, असे म्हटले जात आहे. दरेकर यांचे सूचक विधान
भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत. केंद्रात भाजप युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील.
पुणे: पुण्यात एका तरुणाने दारू चक्क पिऊन हवेत गोळीबार केला आहे. वाघोली परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.महत्त्वाचे म्हणजे या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल कोलते असं या आरोपी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा मित्र संदीप हरगुडे याला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात येत होते. यावळी विशालने त्याला विरोध केला. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ नये, अशी मागणी त्याने केली.विशालच्या विरोधानंतरही व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवले. त्यावेळी संतापलेल्या विशालने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली. तसेच दगडाने रुग्णावाहिकेच्या काचाही फोडल्या. अखेर संदीपला रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आलं.
या घटनेनंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतले. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच यावेळी संदीप आणि विशाल दोघेही दारु प्यायला होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान, याप्रकरणी आता पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर रुग्णवाहिका पेटवली अशी अफवाही पसरवण्यात आली होती. मात्र, या कोणतीही तथ्य नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
संदीप हरगुडे रा. केसनंद गाव,तालुका हवेली जिल्हा पुणे आणि विशाल कोलते रा. बकोरी गाव. तालुका हवेली जिल्हा पुणे हे दोघे विशाल कोलते याचे आर्यन परमिट बार बकोरी येथे दारू पित असताना त्यांचेमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद होऊन रागात विशाल कोलते याने स्वतः जवळील पिस्टल मधून जमिनीवर फायर केला आहे. कोणतीही जीवित हानी नाही. विशाल कोलते हा सध्या वाघोली पोलिसांचे ताब्यात आहे. अशीही माहिती रात्री पोलीस सूत्रांनी दिली होती.
पुणे:मुठा नदीपात्रात तब्बल ५५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकरेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर-सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल (काॅजवे) अखेर पाडण्यात येणार आहे. हा पूल धोकादायक झाला असून, पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील पाण्याला हा पूल अथडळा ठरत आहे.
या बाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रकल्प विभागाने शहर सुधारणा समितीत ठेवला आहे.
स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेऊन हे काम केले जाणार आहे. या पुलाची लांबी ५० मीटर, तर रुंदी अवघी ४.७ मीटर आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक नदी ओलांडणे, वाहने धुणे, मासे पकडणे, प्राण्यांची स्वच्छतेसाठी करतात. वाहतुकीसाठी या पुलाचा वापर होत नाही. मात्र, दरवर्षी या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकला जातो. हा पूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षित नाही. त्यावर वारंवार खड्डे पडत असून त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे आॅडिट केले होते.
त्यात या पुलाची दुरुस्ती केल्यास ३९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुरुस्तीनंतर त्याचे आर्युमान केवळ ८ वर्षे वाढणार आहे. मात्र, त्याचा वापर केवळ दुचाकीसाठी होणार आहे. या पुलाच्या बांधकामानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि जयंतराव टिळक पूल बांधण्यात आला. हे दोन्ही पूल वापरत असल्याने तसेच दुरुस्तीनंतर “काॅजवे’चा फारसा वापर होणार नसल्याने हा पूल पाडला जाणार आहे.हा पूल पाडल्यानंतर त्याचा फायदा महापालिकेच्या नदीकाठ विकसन प्रकल्पासह पूरस्थितीच्या काळातही होणार आहे. नदीत सर्वांत कमी उंची असलेल्या या पुलाच्या खांबाला जलपर्णी तसेच कचरा अडकतो. परिणामी, पावसाळयात पाण्याला मार्ग मिळत नाही. त्यामुळे नदीतील अडथळे काढण्यासाठीही पालिका उपाययोजना करत आहे. त्यात या कामाचा फायदा होणार आहे.
पुणे :म्हैसूरचा १८ व्या शतकातील वादग्रस्त शासक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता हे कोणत्याही मिरवणुकीला (रॅली) परवानगी नाकारण्याचे कारण असू शकत नाही, अशी टिप्पणी करत टिपू जयंतीनिमित्त रॅलीची परवानगी मागणाऱ्या अर्जावर पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा, असेही आदेश दिले.टिपू सुलतान, मौलाना आझाद जयंती आणि संविधान दिनानिमित्त मिरवणूक काढण्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी नकार दिला. सार्वजनिक ठिकाणी टिपू जयंती साजरी न करता खासगी ठिकाणी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे एमआयएमच्या फैय्याज शेख यांनी पोलिसांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि एस. जी. डिगे यांच्या खंडपीठासमोर एमआयएमचे पुणे विभाग अध्यक्ष फैय्याज शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यावर खंडपीठाने अशी विचारणा केली की, टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास बंदी आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत एखाद्या विशिष्ट भागात रॅलीला परवानगी दिली जाऊ शकत नाही हे आम्हाला समजते. मात्र, पोलिस अर्जदारांना रॅलीचा मार्ग बदलण्यास सांगू शकतात. जर रॅलीत अपमानास्पद भाषा वापरली गेली किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर कायद्यानुसार आवश्यक कारवाई केली जाऊ शकते. तत्पूर्वी अतिरिक्त सरकारी वकील क्रांती हिवराळे यांनी न्यायालयाला सांगितले की, रॅलीला कोणतीही बंदी किंवा मनाई नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशावरून पुण्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व्यक्तीश: हजर झाले. शेख यांनी स्वतः देशमुख यांना भेटून रॅलीचा मार्ग आणि क्षेत्र ठरवावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी आहे.
पुणे, दि. १२: जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक भुषण लगाटे, प्रकल्प संचालक शालीनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहप्रबांधक बचेंद्रा मलिक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाप्रबंधक वृषाली सोने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्याचा वार्षिक पत पुरवठा मध्ये मागील वर्षापेक्षा ७४ हजार २८५ कोटींनी वाढवण्यात आला. कृषी पत पुरवठ्यामध्ये मागील वर्षापेक्षा ८७० कोटींची वाढ करण्यात आली तसेच सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी २० हजार कोटींची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे.
पीक कर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) खरीप हंगामाची उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी एवढे असून,किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबर २०२४ अखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून ११६ टक्के लक्ष गाठले आहे.वार्षिक पिक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड)उद्दिष्टच्या अनुषंगाने बँकांनी आज तह ५ हजार ७४५ कोटी कर्जाचे वाटप करून ९० टक्के लक्ष पुर्ण आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन ही केले.
राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोजगार योजनेचा आढावा घेत असताना बँकांनी विविध योजनांमध्ये कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी बँक स्तरावर आढावा घेवून नामंजूर झालेल्या प्रकरणांचा अहवाल डिसेंबरअखेर सादर करावा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
श्री लघाटे म्हणाले, सरकारी योजने अंतर्गत कर्ज वाटप वेळेवर करावे. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बँकांनी मेळावे घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री. मोहानवी आणि श्री योगेश पाटील यांनी कर्ज मंजुरीबाबत माहिती दिली.
पुणे, दि.१२: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.१ व क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असून १६ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत आक्षेप नोंदवावें, असे आवाहन हाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास त्याबाबत परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे पाठवता येईल. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
पुणे- भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचा मामा सतीश सादबा वाघ याचा सुपारी देवून अपहरण आणि खून केल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी येथे दिले.
पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रस्ता, वाघोली, मूळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रस्ता, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) अशी आरोपींची नावे आहेत. तर पोलिस अतिश जाधव या आरोपीचा शोध घेत आहेत.सतीश वाघ हे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. या प्रकरणी वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अक्षय जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्यात कोणत्यातरी कारणाने वाद झाल्यामुळे अक्षयने खोली सोडली होती. या कारणावरून अक्षयने चार-पाच महिन्यांपूर्वी आरोपी पवनला वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. पवनने त्याचे साथीदार नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांनी संगनमताने खुनाचा कट रचला.
सतीश वाघ ९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता फिरायला गेले असता आरोपींनी त्यांचे मोटारीतून अपहरण करून सासवडच्या दिशेने घेऊन निघून गेले. त्यानंतर चाकूने त्यांचा खून करून मृतदेह उरूळी कांचन परिसरात शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला होता.
आरोपींनी केलेले कृत्य हे घृणास्पद आणि मानवी जीविताला काळिमा फासणारे आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आरोपीकडून जप्त करावयाची आहेत. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हा गुन्हा केला आहे. त्यांनी नक्की कट केव्हा, कोठे, कसा रचला याबाबत त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. तसेच हा गुन्हा आरोपींनी नक्की कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे? गुन्ह्यामघ्ये त्यांचा इतर कोणी मुख्य सूत्रधार आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत त्यांचेकडे तपास करावयाचा आहे. आरोपी जवळकर याने इतर आरोपींना खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली आहे. हे पैसे त्याच्याकडे कशाप्रकारे आलेले आहेत ? किंवा त्याला इतर कोणी ही रक्कम दिली याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला. या गुन्ह्यातील आरोपींवर कलम अपहरण करून खून केल्याचे कलम वाढविण्यात आले होते. तसेच चारही आरोपींचे मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत, असे तपास अधिकारी असलेले अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी न्यायालयास सांगितले.
मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२४ – केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांची पेड पेंडिंगची समस्या सोडविण्यासाठी ही योजना राबविण्यासाठी आग्रह आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वतंत्र करणारी आणि त्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करणारी ही योजना प्राधान्याने राबविण्याची सूचना त्यांनी केली आहे.
सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
राज्यात दि. ११ डिसेंबरपर्यंत एकूण १,०१,४६२ सौर कृषी पंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १५,९४० पंप जालना जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत. बीड (१४,७०५ पंप), परभणी (९,३३४), अहिल्यानगर (७६३०), छत्रपती संभाजीनगर (६२६७) आणि हिंगोली (६०१४) जिल्ह्यांमध्ये जालन्याच्या खालोखाल पंप बसविण्यात आले आहेत.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. दहा लाखापेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
महावितरणने आतापर्यंत गेल्या काही वर्षात विविध योजनांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून २ लाख सौर कृषी पंप बसविले असून त्यापैकी एक लाख पंप मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत या वर्षी बसविले आहेत व देशात अतुलनीय कामगिरी केली आहे.
सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.
पुणे, १२ डिसें.२४ : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, दिल्ली, आणि शिव नाडर युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.१३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत चीनच्या औद्योगिक क्रांतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अंतर्संबंध: भारत आणि जगासाठी आव्हाने या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संत ज्ञानेश्वर सभागृह, एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्याहस्ते होईल.अध्यक्षस्थानी एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. या परिषदेत लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल भूषण गोखले, प्रा. जी. व्यंकट रमण आणि ब्रिगेडियर अंशुमन नारंग यांच्यासह अनेक नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत. औद्योगिक वृद्धीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर अर्थपूर्ण संवाद साधणे व भारतासाठी उदयोन्मुख भौगोलिक – राजकीय आणि आर्थिक वास्तवात संचालन करण्याचे मार्ग अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. परिमल माया सुधाकर यांनी दिली.
नवी दिल्ली- अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सायंकाळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा की, भेटीमागे काही वेगळे राजकारण आहे का? अशा चर्चांना सध्या सुरुवात झाली आहे. तर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटले.
शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. या दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवार यांची सहकुटुंब आणि पक्षाच्या नेत्यांसह भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांनी देखील भेट घेतली आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शाह 6 जनपथवरती दाखल झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. काहीच मिनिटांत अमित शाह आणि पवार यांची भेट झाली. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार केला तसेच निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. दरम्यान, शरद पवार यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ही भेट झाली असावी, असा अंदाज काढला जात आहे. मात्र, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जर शरद पवार महायुतीत येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच होईल.
अजित पवार यांच्यासोबतच खासदार सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील शरद पवार यांच्या निवास्थानी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो.आज शरद पवार तर उद्या काकींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्यांचे आर्शीवाद घेतले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील विविध मंत्री पवार यांना शुभेच्छापर संदेश पाठवीत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमित शाह यांनीही पवार यांना फोन करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आणि भेटीची वेळ ५ वाजता ठरविली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 11 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनाच्या प्लेनरी हॉलमध्ये पंचायती राज मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. केंद्रीय पंचायती राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा.एस. पी.सिंग बघेल हे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.
शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाप्रति त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध श्रेणीतील 45 पुरस्कार विजेत्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुरस्कार रकमेचे डिजिटल हस्तांतरण आणि पुरस्कार विजेत्या पंचायतींचे अभिनव उपक्रम अधोरेखित करणारा लघुपट यांचा समावेश होता. याप्रसंगी ‘पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या कामांवरील सर्वोत्तम पद्धती’ या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्रातील पंचायतींनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याने राज्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. पंचायती राज मंत्रालयाने स्थापन केलेले हे पुरस्कार, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्वोत्कृष्ट पंचायतींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देतात.
महाराष्ट्राने आपल्या ग्रामपंचायती, तालुका पंचायती आणि संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तालुका, जिल्हा, राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरांवर आयोजित केलेल्या स्पर्धेसह हे पुरस्कार पिरॅमिड संरचनेचे अनुसरण करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक भावनेला चालना देत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने पंचायतींचे मूल्यांकन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 च्या विजेत्यांनी ग्रामीण नवोन्मेष, शाश्वतता आणि समुदाय-चालित उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
1. मान्याचीवाडी: सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (क्रमांक 1)
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार (क्रमांक 1) जिंकला आहे.
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांगीण आणि अभिसरण दृष्टीकोनाचा अवलंब करण्यात मान्याची वाडी ग्रामपंचायत सरस ठरली आहे. 420 लोकसंख्येसह, पंचायतमध्ये 98 घरांचा समावेश आहे आणि सहा निर्वाचित प्रतिनिधी (तीन पुरुष आणि तीन महिला) त्याचे नेतृत्व करतात.
या ग्रामपंचायतीने शाश्वत पद्धती आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी आपली वचनबद्धता दर्शवून सर्व 9 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण संकल्पनेनुसार अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले.
2. तिरोडा: सर्वोत्कृष्ट गट पंचायत (क्रमांक 3)
गोंदिया जिल्ह्यातील पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी दाखवलेल्या उत्कृष्ट वचनबद्धतेसाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 – मधील नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पंचायतीने कुशल प्रशासनाचा आदर्श ठेवून नाविन्यपूर्ण विकास धोरणांचे एकत्रीकरण आणि ग्रामीण वातावरणात टिकाऊपणाला प्रोत्साहन दिले आहे, त्यांच्या या प्रभावी उपक्रमांसाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर हा बहुमान मिळाला आहे.
पुणे: पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जन्म व दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा साजरा होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील जड- अवजड वाहतूक १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १५ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरुन वळविण्याचे आदेश जारी केले आहे.
सासवड ते बंगळुरू महामार्गाकडे जाणारी जड- अवजड वाहने परींचे गाव- वीर मार्गे सारोळा अशी जातील. तसेच सासवड- दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील. कापूरहोळ ते सासवड या मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळ- शिंदेवाडी- कात्रज चौक मार्गे सासवडकडे जातील. कार, जीप आदी हलक्या वाहनांची वाहतूक पुर्वीप्रमाणेच सासवड ते कापूरहोळ मार्गावर सुरू राहील.
श्रीक्षेत्र नारायणपूर येथे १३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांचेवतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यातूनदेखील भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदीर या ठिकाणी देखील भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर असून, यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावरील अवजड वाहनांची वाहतुक वळविण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024: वास्तविक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता एक राष्ट्रव्यापी नवोन्मेष आव्हान
मुंबई, 12 डिसेंबर 2024
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या अंतिम फेरीच्या उद्घाटन दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युवा नवोन्मेषकांशी संवाद साधला. आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांसह वेगाने प्रगती करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महाअंतिम फेरीची मी आतुरतेने वाट पाहत होतो”, असे पंतप्रधान म्हणाले. युवा नवोन्मेषकांसोबत आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबईच्या मिस्टिक ओरिजनल्सच्या टीम लीडरने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या सुरक्षा आव्हानाचा सामना करण्याविषयी माहिती दिली. याअंतर्गत माइक्रो डॉपलर आधारित लक्ष्य वर्गीकरण, जसे की देण्यात आलेली वस्तू पक्षी आहे की ड्रोन ओळखण्यास साहाय्यभूत करण्याचे आव्हान त्यांना देण्यात आले. टीम लीडरने अधिक माहिती देताना सांगितले, रडारवर पक्षी आणि ड्रोन सारखे दिसत असल्याने चुकीचा इशारा दिला जाऊ शकतो आणि यातून संभाव्य सुरक्षा धोका, विशेषतः संवेदनशील क्षेत्रात उद्भवू शकतो.
चमूतल्या दुसऱ्या सदस्याने उपायाचे तपशीलवार विश्लेषण सादर केले. मानवाच्या वैशिष्ट्यपूर्ण बोटांच्या ठशांप्रमाणेच मायक्रो डॉप्लर सिग्नेचर्स विविध वस्तूंद्वारे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण नमुन्यांचा उपयोग करते. त्यावर पंतप्रधानांनी विचारले, उपायांतर्गत वेग, दिशा आणि अंतर ओळखता येते का? त्यावर हे लवकरच साध्य होईल, असे चमूतल्या सदस्याने सांगितले. ड्रोनचे विविध सकारात्मक उपयोग आहेत, मात्र काही शक्ती ड्रोन्सचा उपयोग इतरांना इजा पोहोचवण्यासाठी करतात आणि हे सुरक्षा आव्हान बनले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. अशा प्रकारचे आव्हान भेदण्यास उपाय सक्षम आहे का, या पंतप्रधानांच्या प्रश्नावर चमूतल्या सदस्याने प्रक्रिया विशद केली. हे एक कॉम्पॅक्ट सोल्यूशन असून हे किफायतशीर उपकरणांवर वापरले जाऊ शकते आणि विविध प्रकारच्या वातावरणात अनुकूल आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध क्षेत्रात ड्रोनच्या वापरावर प्रकाश टाकला आणि नमो ड्रोन दीदी योजनेचे उदाहरण दिले. देशातील दुर्गम भागात औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ड्रोनच्या वापराचा उल्लेखही त्यांनी केला. तर शत्रू त्यांचा वापर सीमेपलीकडून बंदुक आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी करतात.
राष्ट्रीय सुरक्षेच्या अशा समस्यांना तोंड देण्यासाठी युवा नवोन्मेषक अत्यंत गांभीर्याने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाबद्दल येथे अधिक जाणून घ्या.त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या भव्य अंतिम फेरीचे आभासी माध्यमातून उदघाटन केले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार देखील उदघाटन समारंभाला उपस्थित होते. उदघाटन समारंभाबद्दल येथे आणखी वाचा. 7वी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) 11 डिसेंबर 2024 रोजी देशभरातील 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी सुरू झाली. सॉफ्टवेअर एडिशन सलग 36 तास चालेल, तर हार्डवेअर एडिशन 11 ते 15 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.महाराष्ट्रात, मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या महाअंतिम फेरीचे यजमानपद भूषवत असून तिन्ही केंद्रांमध्ये राष्ट्रीय उद्घाटनापूर्वी कार्यक्रमाचे स्थानिक उद्घाटन झाले.
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे मुंबईतील आयोजन स प मंडळी यांच्या प्रिं. एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास व संशोधन संस्थेने केले आहे. उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश ब्राह्मणकर, नवोन्मेष संचालक, शिक्षण मंत्रालय , तर मान्यवर अतिथी म्हणून राहुल चंदेलिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, WOL3D, निलेश लेले,अध्यक्ष, लघु व मध्यम उद्योग विकास मंडळ, कॅप्टन मयांक कुक्रेती,(राष्ट्रीय सुरक्षा बल ) आणि वेंकट नागभूषणम जेट्टी, उप व्यवस्थापक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. उपस्थित होते.
स्पर्धा केंद्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता / मशीन लर्निंग, अनॅलिटीक्स, इमेज अनॅलिटीक्स व प्रॉब्लेम स्टेटमेंट्स या विषयांवरील स्पर्धांमध्ये 34 संघ सहभागी झाले होते. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चा मुंबईतील समारोप 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या समारोप सत्रानंतर होईल.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भोपाळच्या ओरिएंटल विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या मुस्कान मिश्रा हिने सांगितले, “आम्ही महिलांची सुरक्षा हा विषय निवडला होता. महिलांना त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल एक अल्गोरिदम वापरून त्यावर उपाययोजना कशी करावी हे सांगणारे एक ऍप आम्ही विकसित केले होते. आम्हाला आशा आहे कि आम्ही हि स्पर्धा नक्कीच जिंकू.”
पुण्यामधील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 चे आयोजन एम आय टी कला, डिझाईन व तंत्रज्ञान विद्यापीठाने केले होते. पुण्यातील या कार्यक्रमाला अभिषेक रंजन, नवोन्मेष अधिकारी, शिक्षण मंत्रालय, डॉ मोहित दुबे, प्रकुलगुरू, एम आय टी ए डी टी विद्यापीठ, डॉ महेश चोपडे, रजिस्ट्रार, डॉ रेखा सुगंधी, नोडल अधिकारी, तसेच इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 साठी निवडलेल्या देशभरातल्या 51 नोडल केंद्रांमध्ये नागपूरच्या जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली होती. या केंद्रात 20 संघांनी नोंदणी केली होती. त्यातील सॉफ्टवेअर विभागात 11 व 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये 120 स्पर्धक व 24 मेंटॉर समाविष्ट आहेत. उदघाटन समारंभात सुनील रायसोनी, संचालक, रायसोनी समूह, शिव सोनी, वरिष्ठ टेक्निकल आर्किटेक्ट, इन्फोसिस, डॉ रिझवान अहमद, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, डेलाप्लेक्स आणि सुनील उंटवाले, संचालक, जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय,हिंगणा, नागपूर हे उपस्थित होते.
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 बद्दल माहिती:
दैनंदिन आयुष्यातील महत्वाच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यादृष्टीने आयोजित केलेला स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा एक राष्ट्रव्यापी उपक्रम आहे. नवोन्मेष व समस्या निराकरणासाठीचे व्यावहारिक कौशल्य विकसित करणारी संस्कृती जोमाने तयार व्हावी यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन (SIH) मध्ये दैनंदिन आयुष्यातील समस्यांवर व्यवहार्य उपाययोजना सुचवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला प्रार्थनास्थळांच्या कायद्याच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 4 आठवड्यांच्या आत आपली भूमिका मांडण्यास सांगितले.CJI म्हणाले, ‘जोपर्यंत आम्ही या प्रकरणाची सुनावणी करत आहोत, तोपर्यंत देशातील धार्मिक स्थळांबाबत कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नाही. प्रलंबित प्रकरणांमध्ये न्यायालय अंतिम आदेश देणार नाही.सीपीआय-एम, इंडियन मुस्लिम लीग, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आरजेडी एमपी मनोज कुमार झा यांच्यासह सहा पक्षांनी या कायद्याविरोधात याचिका दाखल केली आहे.सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या विशेष खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
काय आहे प्रार्थनास्थळ कायदा-1991 मुद्दे …
भारतातील विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांची विद्यमान स्थिती कायम ठेवण्यासाठी 15 ऑगस्ट 1991 रोजी प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला.
कायद्यात असे सांगण्यात आले होते की, देशातील प्रार्थनास्थळे स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी होती त्याच स्थितीत ठेवली जातील.
संविधानाच्या अनुच्छेद 25 आणि 26 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत, नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे.
हा कायदा या अधिकारांतर्गत कोणत्याही धार्मिक स्थळाला एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बदलण्यास मनाई करतो.
प्रार्थना स्थळ कायदा हा कायदा सर्व धार्मिक स्थळांना लागू होतो. म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाचे अन्य कोणत्याही धर्मात धर्मांतर करता येणार नाही.
कायद्यात अशी तरतूद आहे की धार्मिक स्थळाच्या बदलाबाबत काही कायदेशीर वाद असल्यास निर्णय देताना 15 ऑगस्ट 1947 ची परिस्थिती विचारात घेतली जाईल.
भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय, सुब्रमण्यम स्वामी, कथाकार देवकीनंदन ठाकूर, काशीच्या राजकुमारी कृष्णा प्रिया, धार्मिक नेते स्वामी जितेंद्रनंद सरस्वती, निवृत्त लष्करी अधिकारी अनिल कबोत्रा, वकील चंद्रशेखर, रुद्र विक्रम सिंह, वाराणसी आणि इतर काही जणांनी याचिका दाखल केली आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या याचिका फेटाळण्याची मागणी
या याचिकांविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने याचिका दाखल केली आहे. जमियतचा असा युक्तिवाद आहे की या कायद्याविरुद्धच्या याचिकांवर विचार केल्यास देशभरातील मशिदींविरुद्ध खटल्यांचा पूर येईल. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि ज्ञानवापी मशिदीची देखभाल करणाऱ्या अंजुमन व्यवस्था मशीद व्यवस्थापन समितीनेही या याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.
यूपी, मध्य प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये मंदिर-मशीद प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन यांनी 19 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये संभलची जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याच दिवशी याचिका स्वीकारण्यात आली. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
5 दिवसांनंतर म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी टीम पुन्हा सर्वेक्षणासाठी जामा मशिदीत पोहोचली. तिथे लोकांची गर्दी जमली. दगडफेक आणि गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यावर संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला.
न्यायालयाने याचिका स्वीकारली. हा ट्रेंड देशाच्या विविध भागात सुरू आहे. या प्रकरणांपूर्वी वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी-ईदगाह आणि मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा येथील मशिदीबाबत खटले दाखल करण्यात आले आहेत. राम मंदिरावरील निर्णयानंतर या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.