Home Blog Page 735

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने चालविलेला बेकायदा कारभार थांबवा -सहधर्मादाय आयुक्तांकडे मागणी

पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने चालविलेला बेकायदा कारभार तातडीने थांबवा आणि निवडणुका घ्या अशी मागणी पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने आज सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्याकडे केली आहे.

पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीचे धनंजय कुलकर्णी आणि शशांक महाजन यांनी यासंदर्भात सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांना दिलेले पत्र जसेच्या तसे वाचा ….

रजनी क्षीरसागर-सह धर्मादाय आयुक्त

विषय : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यकारी मंडळांने घेतलेली घटनाबाह्य मुदतवाढ आणि मुळ घटना दुरूस्तीचा होऊ घातलेला बेकायदेशीर प्रकार.
सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था महाराष्ट्रातील एक अत्यंत नावाजलेली ऐतिहासिक परंपरा असलेली आणि समाजातील मान्यवर बंदनीय अशा लोकांमुळे सर्व समाजात प्रसिद्धीस आलेली आहे. या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार सध्याचे कार्यकारी मंडळ मुळ घटनेच्या विरोधात जाऊन बेकायदेशीर पद्धतीने करत आहेत. हे बेकायदेशीर पद्धतीने चालू असलेले कामकाज त्वरेने रोखण्याची गरज आहे, ते रोखले जावे या अपेक्षेने हे निवेदन आम्ही आपणांस देत आहोत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था १०० वर्षाहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात कार्य करणारी समाजमान्य संस्था आहे. या संस्थेत लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांच्यासह मराठीतील अनेक मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेचा कारभार मूळ घटनेच्या विरोधात जाऊन लोकशाही विरोधी पद्धतीने चालू आहे. सदर संस्थेचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे हा कारभार घटनेनुसारच व्हावा असे आम्हांस वाटते. थोडक्यात मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे :-
१) महाराष्ट्र साहित्य परिषदेची विद्यमान कार्यकारणी २०१६ साली संस्थेच्या घटनेनुसार ५ वर्षाच्या कालावधीसाठी निवडून आली. हा अधिकृत कालावधी २०२१ सालीच संपला. २०२०-२१ या कालावधीत देशात करोना साथीचे संकट होते. त्या बातावरणात संस्थेच्या निवडणूका घेणे शक्य नव्हते. हे कारण पुढे करून आत्ताच्या कार्यकारीणीने बेकायदेशीररित्या आपला स्वतःचा कार्यकाल सुरूवातीला ३ वर्षासाठी बाढवून घेत आहोत असे सांगून ५ वर्षासाठी तो बाढवून घेतला. हा प्रकार मुळ घटनेच्या निवड तरतुदीच्या विरोधातच आहे.
२) करोनाचा प्रादुर्भाव २०२२ मध्येच संपला. २०२२ नंतर देशात विविध राज्यात लोकसभा, विधानसभा यांच्या सार्वत्रिक निवडणूका जनसहभागाने पार पडल्या. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक मात्र झाली नाही. हा विरोधाभास संस्थेच्या लौकिकास अप्रतिष्ठित करणारा आहे.
३) या संदर्भात संस्थेचे एक सभासद श्री. विजय शेंडगे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नियमित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची सुनावणी तेथील न्यायपद्धतीप्रमाणे सुरू आहे. त्याचा निकाल केव्हा लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. उलटपक्षी श्री. विजय शेंडगे यांचे सभासदत्व कोणत्याही प्रकारे रद्द कसे करता येईल याचे विविध मार्ग संस्थेच्या कार्यकारी मंडळाने अवलंबवण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांच्याबर बदनामीचा स्वटला टाकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. एकदा विजय शेंडगे यांचे सभासदत्व रद्द केले की धर्मादाय आयुक्तांकडची याचिका रह होईल असा प्रयत्न सध्याचे कार्यकारी मंडळ करत आहेत.
४) ही बेकायदेशीर कार्यकारणी मुळ घटनेतच आता बदल करून कायम स्वरूपी ही संस्था आपल्या ताब्यात राहील यासाठी प्रयत्नशील आहे. त्या संदर्भात घटना दुरूस्तीसाठी एक सर्व साधारण सभाही अत्यंत अयोग्य आणि बेकायदेशिररित्या बोलवण्यात आली आहे. साधारणपणे २०,००० आजीव सभासद असणाऱ्या या संस्थेच्या या बैठकीचे स्थान फक्त १०० आसन क्षमता असणाऱ्या सभागृहात केली आहे. सर्व सभासदांना या सभेची सूचना मिळालेली नाही. त्यामुळे ही सभाही बेकायदेशीर ठरते.
५) आपण आपल्या अधिकारात बरील दोन गोष्टींबर तातडीने योग्य ती उपाय योजना करावी. आपल्या अधिकारात ही सभा तातडीने स्थगीत करावी आणि संस्थेच्या निवडणूका लवकरात लवकर होतील या साठी संस्थेस योग्य ते आदेश द्यावेत ही आपणांस नम्र विनंती.

नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे -पद्मविभूषण डॉ. माशेलकर

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा शुभारंभ
‘हिरकणी’ योजनेत तीन मुलींचे स्वीकारलं पालकत्व

पुणे, १६ डिसेंबरः “नव भारत एका पायावर धावू शकत नाही, तर तो दोन पायावरच चालवायला लागेल. त्यासाठी स्त्रीयांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रीयां व मुलींना केवळ शिक्षण नाही तर भरपूर शिक्षण द्या पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे.” असा सल्ला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम सीओईपी च्या किर्लोस्कर सभागृहात संपन्न झाला.
यावेळी द एम्पॉवर हर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष संदीप नुलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपूण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते.
संस्थेच्या हिरकणी योजने अंतर्गत या वर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होई पर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाणार आहे. या मुलींना डॉ.माशेलकर यांच्या हस्ते स्वीकृती देण्यात आली.
बासमती तांदूळ व हळद पेटंट करू पहाणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या विरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्यासाठी याप्रसंगी डॉ. माशेलकर यांना बासमती तांदूळ आणि हळदीची प्रतीकात्मक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. माशेलकर म्हणाले, “वस्तूस्थिती पाहता भारताच्या वर्कफोर्स मध्ये केवळ २४ टक्केच महिला आहेत. ही टक्केवारी चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनामा ७० टक्के आणि बांग्लादेश ही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षापुर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणार्‍या नोकर्‍या महिलांना दिल्या आहेत. आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, सेविंग स्कीम, कन्या श्री प्रकल्प व शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे. देशात आजही अंधश्रध्दा दिसून येते. चंद्रावर मंगळ यान पोहोचले परंतु देशात अजून मंगळ असल्या कारणेने मुलींची लग्न ठरत नाहीत. ही विचारणीय बाब आहे.”
“सृष्टीवरील सर्वात मोठे सूत्र एज्यूकेशन इक्वल टू फ्यूचर हे आहे. आज भविष्याचा वेध घेतांना पुण्यात असे कार्य सुरू होणे हे महत्वाचे आहे. या कार्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि अनुभवा बरोबरच पैसा आणि वेळ ही महत्वाची आहे. ज्या प्रकारे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी क्रांती आणली, त्याचप्रमाणे हिरकणी योजना ही मोठी चळवळ म्हणून पुढे येईल. ”
संदीप नुलकर म्हणाले, “महिलांची व्यथा जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. वंचित मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच योग्य रोजगार मिळावा आणि त्यांचे व कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. यातील हिरकणी योजने अंतर्गत मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संहिता चांदोरकर यांनी केले.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्याने ‘सरहद’कडून “गौरव महाराष्ट्राचा

पुणे-सरहद आयोजित दिल्ली येथे भरवल्या जाणाऱ्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद संस्थेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरहद स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कात्रज येथे “गौरव महाराष्ट्राचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र येथे तज्ञ म्हणून कार्यभार पाहत असणारे डॉ. सुरेश ‌इसावे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. डॉ.सुरेश इसावे हे टिळक कॉलेजमध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या संस्थांचे सभासद ही आहेत .सरांना २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच डॉ. इसावे यांना अभ्यासाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे त्यामुळे त्यांनी ट्रेकिंग ग्रुप सुरू करून शंभर पेक्षा जास्त किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली. असे पाहुणे कार्यक्रमाला लाभणे ही आनंदाची गोष्ट आहे.
“गौरव महाराष्ट्राचा “या कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीत ‌‌’जय जय महाराष्ट्र माझा’ने झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रंगांची जणू उधळणच झाली. त्यामध्ये वेगवेगळे लोकनृत्य ,गणेश वंदना ,लावणी, कोळीनृत्य, सवाल- जवाब, गोंधळ, धनगर नृत्य ,शेतकरी नृत्य, तसेच रामायण ,मराठी शोले, हास्यरस, नारीशक्ती अशा अनेक कार्यक्रमाने महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून आले. महाराष्ट्राच्या कोसा कोसावर बदलणाऱ्या मराठी भाषेचे, संस्कृतीचे व अस्मितेचे प्रदर्शनच जणू मांडले होते. यामधून विविधतेतून एकता याचे जणू दर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध आणि आकर्षक कार्यक्रमाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमासाठी सरहद संस्थेचे विश्वस्त श्री. शैलेश वाडेकर ,श्री.अनुज नहार , संस्थेतील विविध विभाग प्रमुख कविता वानखेडे, मनीषा वाडेकर , सुजाता गोळे, रुबीना देशमुख , तसेच सर्व विभागाचे पर्यवेक्षक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ .सोनाली सहाने यांनी केले.

पुणे जिल्हा लोकअदालतमध्ये राज्यात पुन्हा अव्वल

366 कोटी तडजोड रक्कम जमा87 हजार 486 प्रकरणे निकाली
पुणे, 16 डिसेंबर:-
शनिवारी (14 डिसेंबर) रोजी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील ४थ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकअदालतमध्ये दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकारणांपैकी सुमारे 87 हजार 486 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 366 कोटीहून तडजोड रक्कम जमा करण्यात आली.
विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांचे हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन पार पडले.
याप्रसंगी न्यायालयातील अशोक हॉल येथे विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.के. महाजन म्हणाले की, लोकअदालत सर्वांसाठी जलद न्याय, सुलभता आणि न्याय विवाद निराकरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. लोकअदालतला आपल्या न्याय व्यवस्थेत नेहमीच एक अनन्यसाधारण आणि विशेष स्थान आहे. यामुळे विवादांचे जलद निराकरण करण्यासाठी आणि आपल्या न्यायालयांवरील ओझे कमी करण्यासाठी एक प्रगल्भ आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
लोकअदालतमध्ये एकूण 366 कोटीची 27 लाखाची तडजोड करण्यात आली. यावेळी 1 लाख 87 हजार 63 प्रकारणे तडजोडीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 87 हजार 486 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे तडजोडीची प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण 52 कोटी 3 लाख 27 हजार रक्कमेची तडजोड झाली आहे. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) 1 लाख 45 हजार 179 प्रकरणे तडजोडीची दाखल करण्यात आली होती. त्यापैकी 51 हजार 328 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय एकूण दाखल दाव्यात (पोस्ट लिटिगेशन) 314 कोटी 24 लाख 58 हजार 502 तडजोड रक्कम प्राप्त झाली. यामध्ये एकूण 41 हजार 884 प्रकरणे तडजोसाठी हाती घेण्यात आली होती तर त्यापैकी 36 हजार 158 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत.
विधी सेवा प्राधिकरणाच्या व्हिजन अंतर्गत आयोजित राष्ट्रीय लोकअदालत हे सर्वांसाठी न्याय, कार्यक्षमता आणि निष्पक्षतेचे प्रतिक म्हणून कार्य करीत असताना उत्कृष्ट कामगिरी भविष्यासाठी भारतीय न्यादानातील आशेचा किरण आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौरीका पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन न्यायाधीश डी जे पाटील यांनी केले.

सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू :सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करा.

माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी.

नागपूर, दि. १६ डिसेंबर २०२४
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत परभणी व बीडच्या घटनांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष ज्या दिवशी चर्चा करण्यास सांगतील त्या दिवशी चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप केल्याची माहिती पोलिसांना होती पण देशमुख यांची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या करण्यात आल्यानंतर पोलीस सक्रीय झाले. भाजपा सरकार आल्यानंतर दलित व बहुजन समाजावर अत्याचार केले जात आहेत का? ईव्हीएम सरकारने राज्यात राजकीय हत्यासत्र सुरु केले आहे का? असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांना कोठडीत असताना पोलिसांनी प्रचंड हालहाल करून मारण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून ही सरकार प्रायोजीत हत्या आहे. याप्रकरणी सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

परभणीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी पवार नावाच्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले जाते परंतु तो व्यक्ती बांग्ला देशातील हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाला होता. सरपंच संतोष देशमुख सुद्दा हिंदूच आहे, त्यांचे हातपाय कापले, मृत्यूनंतर त्यांच्या शरिरावर आरोपी नाचले, त्यांना काय म्हणणार. बांग्ला देशातील हिंदू सुरक्षित नाहीत म्हणता मग भारतातील हिंदुंच्या संरक्षणाचे काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. परभणी व बीडचे प्रकरण मारकडवडीच्या ईव्हीएम विरोधातील मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येते असेही नाना पटोले म्हणाले.

माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या मुलाला किडनॅप करून ठेवले आहे. ९ कोटी रुपयांसाठी त्याला किडनॅप केले असून त्याच्याकडून ४.५ कोटी रुपये वसून केले आहेत, बाकीच्या ४.५ कोटी रुपयाच्या वसुलीसाठी त्याच्यावर अत्याचार केले जात आहेत. ही कसली वसुली आहे ? एवढे पैसे चव्हाणांकडे आले कुठून, असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ईव्हीएम हटाव व परभणी तसेच बीडच्या मुदद्यांवर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लाडकी बहिण- डिसेंबरचा हप्ता कधी, याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत :छाननीनंतर आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द

लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशना-, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

नागपूर – २१०० रूपये वाढीव हप्ता देण्याचा निर्णय मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल. हा निर्णय आता रँडमली एकदम करू शकत नाही. डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत ठरेल अशी माहिती माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

ऑक्टोबर आणि नाेव्हेंबरचे दोन हप्ते ९ ऑक्टोबरला दिले. त्या नंतर आचारसंहीता लागल्यामुळे हप्ते जमा झाले नाही. या शिवाय आधार जोडणी विभाग स्तरावर सुरू होती. सप्टेंबरमध्ये शेवटी शेवटी नव्याने अर्ज करणाऱ्यांच्या अर्जाची छाननी अजून सुरू आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात २० लाख लाभार्थी असल्याचे तटकरे यांनी सांगितले. गेल्यावेळी जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकावेळी जमा केले होते. नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकावेळी जमा केले. आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या.

अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतरचा आकडा २ कोटी ३४ लाख होता. तो आता २ कोटी ४७ लाखांपर्यत गेला. या बाबतीत जे काही कमी जास्त ३४ ते ४७ लाखाच्या फारकत होईल असे त्या म्हणाल्या. मूळ टारगेटही साधारणत अडीच कोटींचे होते. यापुढचे कोणतेही निर्णय मंत्रिमंडळात होतील. नोंदणी करताना सगळ्यांची नोंदणी झाली. अनेक महिलांनी आधार जोडणी नसतांनाही लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे नोंदणीत लाभार्थी पात्र ठरली आहे. मात्र छाननीनंतर आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होईल असे त्या म्हणाल्या.

दत्त जयंती सप्ताहसोहळ्यात वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांचा सत्कार

पुणे: श्री स्वामी सेवा (दिंडोरी प्रणीत) केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट, विश्रांतवाडी यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त वडगावशेरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. बापूसाहेब पठारे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्वामी समर्थांचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दत्त जयंती सप्ताहसोहळा ९ ते १६ डिसेंबर यादरम्यान साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये धार्मिक उपक्रमांसोबत समाजसेवेवरही विशेष भर देण्यात आले. समारोप सोहळ्यादरम्यान सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे यांनी महिलांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. सत्कार स्वीकारताना आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले की, “स्वामी सेवा केंद्र व श्री हनुमान धर्मदाय ट्रस्ट यांनी महिलांना अधिकाधिक सहभागासाठी प्रोत्साहित केले आहे, जे की अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांचा सहभाग समाजकारणासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. याबरोबरच संपूर्ण सोहळ्याची एक खास बाब अशी की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के अध्यात्माचा समतोल साधला गेला जे बघून मी भारावून गेलो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या सेवासप्ताहात संस्कृत आणि प्राकृत भाषांच्या माध्यमातून सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा उत्कृष्ट मेळ साधला आहे, ज्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.”

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. तुकाराम निकम, सचिव श्री. रमेश कदम, विद्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते संदीप पुरकर यांच्यासह स्वामी केंद्राचे सेवेकरी सौ. वैशालीताई गिते, शिंदेताई, श्री. गजानन क्षीरसागर, संतोष कराळे, शेखर वाल्हेकर, अनिल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

बँकिंगमधील स्त्री पुरुष समानतेला चालना देण्यासाठी महिला-विशेष यंग बँकर्स कोहोर्टची सुरूवात


बंगळुरू, 16 डिसेंबर २०२४: 
भारतातील BFSI क्षेत्रासाठी आघाडीची अध्ययन सुविधा पुरवणारी संस्था मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI (MABFSI) ने ॲक्सिस बँकसोबत भागीदारी करत ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या खास महिलांसाठीच्या कोहोर्टची म्हणजेच संघटन सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या या कोहोर्टचे उद्घाटन बंगळुरू येथील MABFSI कॅम्पसमध्ये ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपती यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाने बँकेच्या विविधता आणि सर्वसमावेशक कार्यशक्तीला चालना देण्याच्या बांधिलकीला बळ दिले आहे.
ॲक्सिस बँक आणि मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI यांच्यातील सहकार्याच्यायंग बँकर्स प्रोग्रामने  गेल्या 12 वर्षांत 16,000 पेक्षा अधिक पदवीधरांना यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे. महिलांसाठीचे हे नवे, विशेष संघटन सुरू झाल्यामुळे महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या वर्षीच्या कोहोर्टच्या तुलनेत आर्थिक वर्ष २४-२५ साठी महिलांची संख्या 700 पर्यंत वाढली असून लिंग गुणोत्तर 31% वरून 38% पर्यंत सुधारले आहे. कोहोर्ट्सच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी MABFSI आणि ॲक्सिस बँक सातत्याने मूल्यमापन आणि विशिष्ट मूल्यांकन पद्धती राबवतात. याशिवाय पदवीधरांना कार्यशक्तीमध्ये सहजपणे सामावून घेता येईल हे सुनिश्चित करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संवेदनशीलता, तणावव्यवस्थापन आणि करिअर विकासावरील कार्यशाळांद्वारे शिकण्याच्या अनुभवाला अधिक सुलभ केले जाते.मणिपाल अकॅडमी ऑफ BFSI चे बिझनेस विभागाचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अँड हेड आताश शाह म्हणाले,“बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुण महिलांना आवश्यक कौशल्यांनी सक्षम करण्यासाठी ॲक्सिस बँकेसोबतची आमची भागीदारी सुरू ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम पदवीधरांना केवळ तयारच करत नाही, तर त्यांना बँकिंग करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सक्षम करतो.”
ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट अँड हेड – ह्युमन रिसोर्सेस राजकमल वेंपतीम्हणाल्या, “ॲक्सिस बँकेत, आम्ही महिलांना कार्यशक्तीमध्ये टिकून राहण्यास आणि बहुआयामी बँकर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यास वचनबद्ध आहोत. ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्रामच्या वैविध्यपूर्णतुकडीमध्ये 24% विवाहित महिला आणि 44% महिला वयाच्या 25 पेक्षा जास्त वयाच्या आहेत. आमच्या कामकाजात नवा दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना आणलेल्या अनेक तरुण महिलांना गेल्या काही वर्षांत आम्ही यशस्वीपणे समाविष्ट केले आहे आहे. पुढेवाटचालकरताना  आम्ही व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम, मेंटॉरशिप संधी आणि सहायक कामकाजाच्या वातावरणाद्वारे प्रतिभेत गुंतवणूक सुरू ठेवण्यासाठी बांधील आहोत.”
ॲक्सिस बँक यंग बँकर्स प्रोग्राम हा एक व्यापक एक वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये बंगळुरू मधील MABFSI कॅम्पसवर बँकिंगच्या मूलतत्त्वांवरील चार महिन्यांचे क्लासरूम प्रशिक्षण, भारतातील ॲक्सिस बँक शाखांमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप आणि पाच महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधरांना मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE) कडून बँकिंग सेवा क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पदव्युत्तर पदविका)प्रदान केला जातो. त्यामुळे त्यांना उद्योगाशी संबंधित ज्ञान व कौशल्य मिळते. ॲक्सिस बँक MABFSI सोबतच्या सहकार्याने आगामी बॅचेसमध्ये 50% विविधता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

रसिकांच्या प्रतिसादात रंगली मनीषा नृत्यालयाची कथक नृत्यसंध्या !

0

मनीषा नृत्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण 

पुणे : 

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं.मनीषा साठे यांनी स्थापन केलेल्या मनीषा नृत्यालयाचा  ‘कथक नृत्यसंध्या’ हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला.हा ४९ वा वार्षिक कार्यक्रम होता.या कार्यक्रमाद्वारे मनीषा नृत्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले.पं.मनीषा साठे यांच्यासह त्यांच्या  २०० विद्यार्थीनींनी विलोभनीय  कथक  नृत्याचा आविष्कार  सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.पुण्याचे  पोलिस आयुक्त  अमितेश कुमार,’भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्ट ‘चे संचालक डॉ.शारंगधर साठे,स्वाती पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर  कार्यक्रमाला उपस्थित होते.पं.मनीषा साठे यांनी सादर केलेल्या कृष्णवंदनेने,श्रीकृष्ण स्तुतीने कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. त्यांच्या मनमोहक एकल नृत्यप्रस्तुतीनंतर त्यांनी १० ज्येष्ठ विद्यार्थीनींसह  १६ मात्रांचा त्रिताल सविस्तरपणे ,अतिशय लालित्यपूर्ण आणि जोशपूर्ण पद्धतीने सादर केला.राम भजन,त्रिवट,सरगम, तराणा अशा सुंदर रचनांबरोबर, लहानग्या शिष्यांनी  विविध नृत्यप्रकार सादर केले.ते सर्वांच्या मनाला आनंद देऊन गेले. सर्वात लहान शिष्यांनी  रिंग चे प्रॉपस् वापरून कल्पक आणि छंदबद्ध नृत्य सादर केले.शंकराच्या स्तुतीपासून शिवाजी महाराजांच्या वीरगाथेपर्यंत सर्व विषय या ३ तासाच्या कार्यक्रमात सुंदर  नृत्य संरचनांमधून मांडले गेले.उपस्थित रसिकांची या सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली.
पूनम गांधी,वल्लरी आपटे यांनी प्रास्ताविक केले. गुणी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.मनीषा नृत्यालयाच्या वतीने आणि  शांभवी दांडेकर (एसआयएसके,अमेरिका), मीनल चक्रदेव(एमएपीए,अमेरिका), पूर्वी भट (अमेरिका) यांच्या सहकार्याने  राधा ठकार,ग्रीष्मा वसंत,श्रेया जाधव,स्वरा राऊत,मैथिली पुंडलिक या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने मनीषा नृत्यालयाची वेबसाईट व लोगो पुन्हा नव्याने तयार करण्यात आला असून त्याचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. जयदीप वैद्य आणि अर्पिता वैशंपायन(गायन),आकाश तुपे(पखवाज),कौशिक केळकर(तबला),यशवंत थिटे(हार्मोनियम),धवल जोशी(बासरी)ओंकार उजागरे (सिंथेसायझर)यांनी सुरेल साथसंगत केली.स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
 मनीषा नृत्यालयाची १९७५ मध्ये स्थापना झाली. मनीषा नृत्यालयाने  सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने  पुढच्या वर्षी प्रत्येक महिन्यात एक उपक्रम, विविध कार्यक्रम, कार्यशाळा राबविण्यात येणार आहेत, अशी घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.

डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडचा आयपीओ गुरुवारी, खुला होणार

·         डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडच्या, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी प्राईस बँड २६९ रुपये ते २८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

·         अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख – बुधवार, १८ डिसेंबर २०२४

·         बोली/ऑफर खुली होणार – गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ आणि बोली/ऑफर बंद होणार – सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

·         कमीत कमी ५३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास ५३ च्या पटीत बोली लावावी लागेल.

·         आरएचपी लिंक:

https://www.damcapital.in/files/investorrelation/638698141609926454_DAM_Capital_Advisors_Limited_-_RHP.pdf

मुंबई, १६ डिसेंबर, २०२४:  डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडने आपला आयपीओ गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ रोजी खुला होणार असल्याची घोषणा केली आहे. ही बोली सोमवार २३ डिसेंबर, २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजे बुधवारी, १८ डिसेंबर, २०२४ रोजी बोली लावता येतील.

या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी शेयरसाठी २६९ रुपये ते २८३ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ५३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास ५३ च्या पटीत बोली लावावी लागेल.

या आयपीओमध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे 29,690,900 इक्विटी शेयर्स आहेत. यामध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 8,714,400 पर्यंत इक्विटी समभाग मल्टिपल्स अल्टरनेट ऍसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे 7,042,400 पर्यंत इक्विटी समभाग नरोत्तम सत्यनारायण सेखसरियाकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 5,771,000 पर्यंत इक्विटी समभाग आरबीएल बँक लिमिटेडकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 5,064,250 पर्यंत इक्विटी समभाग ईजीऍक्सेस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून, (हे सर्व समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) आणि प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 3,098,850 पर्यंत इक्विटी समभाग धर्मेश अनिल मेहताकडून (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) यांचा समावेश आहे.

या ऑफरमध्ये प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹[●] मिलियनपर्यंत, ७०००० पर्यंत इक्विटी समभाग राखून ठेवण्यात आले आहेत. (पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या [●]%, पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रिप्शनसाठी) हा भाग वगळता उर्वरित ऑफर “नेट ऑफर” आहे. ही ऑफर आणि नेट ऑफर यामध्ये आमच्या कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या अनुक्रमे [●]% आणि [●]% यांचा समावेश आहे.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेयर्स हे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 15% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. इक्विटी समभाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येतील, ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या बोली येणे आवश्यक आहे. सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. बुक बिल्डिंग प्रक्रिया आणि ऑफर प्रक्रिया यांच्याशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी कृपया आरएचपीमधील पान क्रमांक 341 वरील “ऑफर प्रोसिजर” हा भाग वाचावा.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे आहेत.

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडची प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) गुरुवारी सुरू होणार

●       दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे.

●       बोली/ऑफर कालावधी गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल.

●       अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.

●       बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.

●       आरएचपी लिंक : https://ingaventures.com/docs/offer-docs/TLL_RHP.pdf

●       संपूर्ण तपशिलासाठी, कृपया 16 डिसेंबर, 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या पृष्ठ 24-25 वर प्रकाशित झालेल्या कायदेशीर जाहिराती पाहून घ्याव्या. 

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडच्या (“TLL” किंवा “कंपनी”) समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) संदर्भातील बोली/ऑफर गुरुवारी, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.

प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹4,000 मिलियनपर्यंत नव्या समभागांचा समावेश आहे, तसेच कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (“प्रवर्तक विक्री शेअरधारक”) 10,160,000 समभागांच्या “विक्रीचा” समावेश आहे.

कंपनीला यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग (i) कंपनीच्या वाढत्या कार्यशील भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, (ii) कंपनीच्या भांडवली खर्चासाठी आणि (iii) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.

दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.

कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) यांसारख्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”). ऑफरसाठी, BSE हे नामांकित स्टॉक एक्सचेंज असेल.

इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

येथे वापरलेले सर्व संज्ञांकित शब्द, जे परिभाषित केलेले नाहीत, त्यांना रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थानेच समजले जाईल.

ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, जी SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 यांच्याशी संबंधित आहे व SEBI ICDR नियम 6(1) च्या अनुपालनात आहे, ज्यामध्ये नेट ऑफरचा 50% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“QIBs”) प्रमाणिक पद्धतीने वाटला जाईल (“QIB Portion”), हे मान्य करताना की, कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने QIB भागापैकी 60% पर्यंत एंकर गुंतवणूकदारांना, SEBI ICDR नियमांनुसार, एक पर्यायी पद्धतीने वाटू शकते (“अँकर गुंतवणूकदार पोर्शन”), ज्यामध्ये एक तृतीयांश भाग देशी म्युच्युअल फंडसाठी राखीव असेल, याची अट आहे की देशी म्युच्युअल फंडकडून वैध बोली मिळाल्यावरच ते अँकर इन्व्हेस्टरसाठी असलेल्या किमतीत किंवा त्यापेक्षा अधिक किमतीवर दिले जातील. जर अधिक सब्सक्रिप्शन न मिळाल्यास किंवा अँकर गुंतवणूकदार पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास, शिल्लक समभाग QIB पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील (“नेट QIB पोर्शन”).

तद्नंतर, नेट QIB पोर्शनचा 5% भाग केवळ म्युच्युअल फंडसाठी प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल आणि नेट QIB पोर्शनचा उर्वरित भाग सर्व QIBs, म्युच्युअल फंडसह, प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी नेट QIB पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनसाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक समभागांना उर्वरित नेट QIB पोर्शनमध्ये समाविष्ट करून, सर्व QIBs साठी प्रमाणिक पद्धतीने वाटप केले जाईल.

तद्नंतर, नेट ऑफरचा किमान 15% भाग गैरसंस्थात्मक बोलीदारांना आणि नेट ऑफरचा किमान 35% भाग किरकोळ व्यक्तिगत बोलीदारांना SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर उपलब्ध असेल. गैरसंस्थात्मक पोर्शनचा एक तृतीयांश भाग ₹0.20 लाखांपेक्षा जास्त आणि ₹1.00 लाखांपर्यंत बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल व दोन तृतीयांश भाग ₹1.00 लाखांपेक्षा जास्त बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, हे मान्य करताना की, या दोन्ही उपवर्गांमध्ये कोणत्याही गैरसंस्थात्मक पोर्शनमध्ये अधिक सब्सक्रिप्शन झाल्यास, शिल्लक समभाग त्या उपवर्गात गैरसंस्थात्मक बोलीदारांना दुसऱ्या उपवर्गात, SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर वाटप केले जाऊ शकतात.

सर्व संभाव्य बोलीदात्यांना (अँकर गुंतवणूकदार वगळता) ऑफरमध्ये अनुप्रविष्ट होण्यासाठी Application Supported by Blocked Amount (“ASBA”) प्रक्रियेच्या माध्यमातून भाग घेणे अनिवार्य आहे. त्यांना त्यांच्या संबंधित ASBA खात्यांचे तपशील आणि UPI बोलीदात्यांच्या बाबतीत UPI ID प्रदान करणे आवश्यक आहे, जे यथावकाश त्यांच्या संबंधित बोली रकमेची अडथळा Self Certified Syndicate Banks (“SCSBs”) किंवा UPI यंत्रणेत असलेल्या प्रायोजक बँकांद्वारे बोली रकमेच्या प्रमाणात ब्लॉक केली जाईल, तसेच योग्य कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरक्षण पोर्शनअंतर्गत बोली देण्यासाठी प्रमाणिक पद्धतीने समभाग वाटप केले जातील, त्यांच्याकडून ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त झाल्यास. अँकर गुंतवणूकदारांना ASBA प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. तपशिलांसाठी, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या पृष्ठ 401 वर “ऑफर प्रक्रिया” पाहा.

कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार,19 डिसेंबर 2024 पासून सुरू

· प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 665 रुपये ते 701  रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.  

· बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे.

· बोली किमान 21 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

·  आरएचपी लिंक:  https://www.concordenviro.in/investors.php

· जोखीम घटकांसह संपूर्ण तपशिलासाठी 16 डिसेंबर 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये पान क्रमांक 12-13 वर प्रसिद्ध झालेली वैधानिक जाहिरात पाहा.

राष्ट्रीय, 16 डिसेंबर 2024: कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्सलिमिटेड (“CESL”  or “The Company”) ने गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. (“Bid Details”)

प्रति इक्विटी शेअरसाठी 665 रुपये ते 701 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 21 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Lot”).

कंपनी निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: (i) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, कॉनकॉर्ड एन्व्हायरो FZE (“CEF”)मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे पाणी, सांडपाणी आणि संबंधित मेम्ब्रेन मॉड्युल्सच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा व प्रकल्प एकत्र करण्यासाठी असेंब्ली युनिट विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 250 दशलक्ष रु. [25.00 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे; (ii) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, रॉकेम सेपरेशन सीस्टिम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (“RSSPL”) मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ब्राउनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादन सुविधा, साठवणूक आणि सहायक क्रिया विस्तारण्यात येणार आहेत. त्यासाठी अंदाजे 105.05 दशलक्ष रु. [10.50 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे. (iii) कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी, प्रकल्प व यंत्रसामग्री खरेदीसाठी अंदाजे 32.07 दशलक्ष रु. [3.21 कोटी रु.] निधी पुरविणे;
(iv) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, CEF मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश CEF कडून घेतलेल्या विशिष्ट थकबाकी असलेल्या कर्जांच्या पूर्ण किंवा अंशतः आगाऊ परतफेडीसाठी किंवा परतफेडीसाठी अंदाजे 500 दशलक्ष रु. [50.00 कोटी रु.] निधी पुरविणे;

(v) CEF च्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी अंदाजे 200 दशलक्ष रु. [20.00 कोटी रु.] निधी पुरविण्यासाठी CEF मध्ये गुंतवणूक;

(vi) कंपनीचा पे पर यूज / पे अॅज यू ट्रीट व्यवसाय वाढविण्यासाठी आपली संयुक्त कंपनी Roserve Enviro Private Limited मध्ये अंदाजे 100 दशलक्ष रु. [10.0 कोटी रु.] गुंतवणूक.

(vii) नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी तंत्रज्ञान व अन्य विकास उपक्रमांमध्ये अंदाजे 235 दशलक्ष रु. [23.50 कोटी रु.]ची गुंतवणूक, तसेच उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरणे. (“ऑफरचे उद्देश”).

या ऑफरमध्ये 1,750.00 दशलक्षपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत, तसेच विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये AF होल्डिंग्स (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) यांच्याकडून 4,186,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रयास गोयल यांच्याकडून 150,600 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेरक गोयल यांच्याकडून 150,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (प्रयास गोयल यांच्यासह मिळून “प्रवर्तक विक्री समभागधारक”), पुष्पा गोयल यांच्याकडून 92,420 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निधी गोयल यांच्याकडून 31,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि नम्रता गोयल यांच्याकडून 29,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (पुष्पा गोयल, निधी गोयल यांच्यासह “प्रवर्तक समूह विक्री समभागधारक” आणि गुंतवणूकदार विक्री समभागधारक, प्रवर्तक विक्री समभागधारक मिळून “विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे.

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 14 डिसेंबर 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून, महाराष्ट्रामधील मुंबई येथे कंपनी नोंदणी कार्यालय (ROC) येथे दाखल करण्यात आला आहे.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव असून, एक्स्चेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”) आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज हे BSE असेल. (The “Listing Details”)

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).

येथे वापरल्या गेलेल्या, परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपीमध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (रेग्युलेशन) नियम 1957च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार (the “SCRR”) आणि 2018 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”)  वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किमतीइतक्या किंवा अधिक किमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शांपैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

त्याचप्रमाणे, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात, त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उपश्रेणीतील सबस्क्राइब नसलेला भाग दुसऱ्या इतर उपश्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार, ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलासाठी 501 पानावरील “ऑफर प्रोस्युजर” बघा.

झागराम, वाॅल्ट एसेस, मावेरिक्सची बाजी ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉनहार्डवेअर स्पर्धेचा समारोप


पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर झागराम007 (कोळसा मंत्रालय ), वोल्ट एसेस (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय), मावेरिक्स (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. तर द ऑलिम्पियन्स,पॅराडॉक्स इनोव्हेटर, रेल मॅनिक्स, निदान 7.0 (सर्व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला.एसआयएच-2024 या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे निवड झालेले महाराष्ट्रातील एकमेव नोडल केंद्र होते. ज्यात, देशातील ३० राज्यांतील जसे की, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २८ संघांची निवड झाली होती. या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालय, रेल्वे व मेट्रो, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयांसमोर असणाऱ्या विविध समस्यांवर पर्यायी उपाय देण्याचे काम केले. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून प्रत्येकी एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेचा समारोप समारंभ तथा बक्षीस वितरणासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार, डसॉल्ट सिस्टिमचे कार्याध्यक्ष सलीम हुझेफा, भारत सरकारच्या इनोवेशन सेलचे संचालक योगेश ब्राम्हणकर, ‘एआयसीटीई’चे उपसंचालक डाॅ.प्रशांत खरात, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डाॅ. मोहित दुबे,  कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन, डाॅ.निशांत टिकेकर, प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त डाॅ.पुलकुंडवार यावेळी बोलताना म्हणाले, एसआयएच-2024 ही केवळ स्पर्धा नव्हती तर विद्यार्थ्यांच्या इनोवेशनचा एक मेळा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनेतून भारत सरकारच्या विविध मंत्रालयांसमोरील समस्यांवर सुचवलेले उपाय पाहताना, आपण विकसित भारताच्या संकल्पनेपासून आता फार दूर नाहीत याचा प्रत्यय आला. आपल्या देशातील युवा पीढी ही आपल्या विकसित होण्याच्या वाटचालीत अत्यंत महत्वाची भूमिका बजाविणार आहे, आणि अशा या युवकांना त्यांच्या नवकल्पना जगासमोर मांडण्यासाठी एसआयएच-2024 सारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारचे खूप अभिनंदन व आभार. तसेच, या स्पर्धेच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनतही उल्लेखनिय आहे, असेही ते पुढे म्हणाले.
योगेश ब्राम्हणकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या विविध समस्यांचा आढावा घेताना, भारताला विकसित होण्यासाठी एआय, स्मार्ट अॅटोमेशन सारख्या गोष्टींचे महत्व अधोरेखित केले. तसेच, त्यांनी स्पर्धेच्या अचून आयोजनसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कौतुक आणि आभारही मानले.    विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले. 
चौकट
स्पर्धेचा निकाल

  • कोळसा मंत्रालय-  झागाराम007 (श्री साईराम इंजिनिअरिंग महाविद्यालय, कांचीपूरम, तामिळनाडू)    
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- वाॅल्ट एसेस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर) 
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय – मावेरिक्स (राष्ट्रीय इंजिनिअरिंग संस्था, म्हैसूर, कर्नाटक)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय –  द ऑलिम्पियन्स (स्वामी केशवनंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, जयपूर, राजस्थान)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय –  पॅराडॉक्स इनोव्हेटर (हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तर परगणा, पश्चिम बंगाल)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- रेल मॅनिक्स (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- निदान 7.0 (मुजफ्फरपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिहार)

टायटनने ४० व्या वर्धापन दिनी ‘युनिटी वॉच’ सादर करून विंग कमांडर राकेश शर्मा यांना केले सन्मानित 


बेंगलोर – उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात अभिमानास्पद टप्प्याचा सन्मान करून साजरा करत आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक सफारीचा सन्मान टायटन वॉचेस आपल्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त करत आहे. १९८४ साली सोविएत अंतराळयान सोयूझ टी-११ मधून अंतराळात झेप घेऊन श्री शर्मा यांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले, अंतराळातून भारत कसा दिसतो आहे याचे उत्तर देताना त्यांनी उच्चारलेले “सारे जहाँ से अच्छा” हे शब्द म्हणजे जणू देशाच्या शिरपेचावरील मानाचा तुरा आहेत. त्यांचे हे एक उत्तर कोट्यावधी देशवासियांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले, या एका वाक्याने अवघ्या जगाला एकजूट भारताचे दर्शन घडवले. ४० वर्षांनंतर स्वतःचा कारीगरी आणि नाविन्याचा वारसा साजरा करत असताना, टायटन ब्रँडने लॉन्च केले आहे ‘युनिटी वॉच’, सेलेस्टीयलपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा लिमिटेड-एडिशन मास्टरपीस भारताची ही अतुलनीय गाथा सन्मानपूर्वक आपल्यासमोर मांडतो. एकता आणि अमर्याद संधी – अंतराळामधून पृथ्वीकडे पाहताना श्री शर्मा यांच्या मनात उमटलेल्या या भावनांपासून प्रेरणा घेऊन टायटनने ‘युनिटी वॉच’ तयार केले आहे. मानवतेची स्वप्ने आणि एकतेने गुंफलेले भविष्य यांनी एकत्र आलेल्या जगाचे व्हिजन या नावामधून दर्शवण्यात आले आहे.

लिमिटेड एडिशन युनिट वॉचचे फक्त ३०० पीस बनवण्यात आले आहेत. लुपा, बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या, एका विशेष हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये टायटनने या कलेक्शनमधील पहिले युनिटी वॉच विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिले. यावेळी श्री शर्मा यांनी अंतराळवारीच्या थरारक आठवणी सांगितल्या, अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या  विहंगम रूपाचे पुन्हा वर्णन केले. सीमांच्या पलीकडे जाऊन ‘वसुधैव कुटुम्बकम’ या विचाराची आठवण करून देणारा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना प्रेरित करणारा ठरला. टायटनच्या डिझाईन टीमने हे विशेष घड्याळ तयार करण्यामागची नाजूक, तपशीलवार प्रक्रिया समजावून सांगितली. अंतराळ यात्रा आणि घड्याळ बनवण्याची प्रक्रिया या दोन्हींमध्ये अचूकता व अभियांत्रिकी ज्ञान, कौशल्ये अत्यंत गरजेची असतात. या सर्व चर्चांनी अवघे वातावरण प्रेरणादायी बनले, सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. टायटनचे वॉचमेकिंग आणि अंतराळ संशोधनात भारताने केलेली अचाट प्रगती या दोन्हींमधून “मेक इन इंडिया” अधोरेखित झाल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.

टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीएसएमओ श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, गेली चार दशके टायटनने तयार केलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये “भारत” अंतर्भूत आहे. यावर्षी आम्ही विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत, एकजूट भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा दर्शवणारी ही घटना देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आमच्या इन-हाऊस टीमने तयार केलेले युनिटी वॉच नावीन्य आणि ‘मेक इन इंडिया’ ची कलात्मकता दर्शवते. हे घड्याळ अंतराळ, विज्ञान यांचा सन्मान करते, समृद्ध भारतीय परंपरा दर्शवणारी घड्याळे तयार करण्यात उचललेले पुढचे पाऊल म्हणजे हे घड्याळ आहे. हे कलेक्शन लॉन्च करून आम्ही भारताच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षा दर्शवणारी घड्याळे तयार करण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.”

विंग कमांडर राकेश शर्मा म्हणाले, “अंतराळातून जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा काळाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा वरून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा मला कोणत्याच सीमा दिसून आल्या नाहीत, दिसली ती एक सुंदर, एकजूट पृथ्वी. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या सुंदर घराचे संरक्षण करण्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाला प्राधान्य देणारे सामाजिक मॉडेल कालबाह्य झाले आहे, ते बाजूला सारण्याची वेळ आली आहे. युनिट वॉचेसमध्ये टायटनने हा विचार इतक्या चपखलपणे आणि कुशलतेने मांडला हे पाहून मला खूप आनंद झाला. याच्या सेलेस्टीयल डायलमध्ये मला आपला प्रिय भारत दिसतो, घड्याळावरील कोरीवकाम आठवण करून देते की, आपण वेळ सेकंदांमध्ये मोजतो पण प्रगतीचे मोजमाप हे आपल्याला लाभलेल्या शांततेतून केले पाहिजे. हे घड्याळ अंतराळातील प्रवासाची आठवण करून देते, इतकेच नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये असलेली, ताऱ्यांना कवेत घेण्याची क्षमता देखील दाखवून देते.”

युनिटी वॉचमध्ये टायटनने कलात्मकता आणि नावीन्य यांची नवी व्याख्या रचली आहे, पहिले कन्सील्ड ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे अतुलनीय शान आणि क्रांतिकारी डिझाईनचा मास्टरपीस आहे. आकर्षक मिडनाईट ब्ल्यू रंगाची डायल अतिशय बारकाईने चित्रित करण्यात आलेला भारत दर्शवते, विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतराळातून दिसलेल्या भारताचे विहंगम दृश्य इथे पाहायला मिळते. देशभक्तीचे तीन रंग केशरी, सफेद आणि हिरवा काट्यांवर ठळकपणे दिसतात. सेकंद काट्याचा आकार रॉकेटसारखा आहे, श्री शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीचे आणि निग्रही शोधाचे हे प्रतीक आहे. या सगळ्याचा मानबिंदू आहे श्री शर्मा यांचे ऐतिहासिक वाक्य “सारे जहाँ से अच्छा” या घड्याळाच्या मागे कोरण्यात आले आहे. त्यासोबतच ती ऐतिहासिक तारीख देखील नमूद करून भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा व यश यांचा सन्मान करण्यात आला आहे.

निवडक टायटन स्टोर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदीसाठी हे घड्याळ उपलब्ध असल्याची घोषणा करून टायटनने देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण कायम आपल्यासोबत ठेवण्याची संधी घड्याळप्रेमींना दिली आहे.

रिंगोस्टिक आणि रस्सीखेच स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

मएसो सीनियर कॉलेज, पुणे आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे: मएसो सीनियर कॉलेजमध्ये क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या सहकार्याने रिंगोस्टिक आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन सुदाम शेळके आणि शंतनु लामधाडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय भालेराव होते. यावेळी मंचावर क्रीडा भारतीचे शैलेश आपटे, केशव राज चौधरी, विजय पुरंदरे, शकुंतला खटावकर आणि मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, पंच आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत  १५ महाविद्यालयांमधून एकूण ६० संघांनी भाग घेतला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अभिजीत गर्ग यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी विजय पुरंदरे, विजय रजपूत, जयसिंग जगताप उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

रिंगोस्टिक मुली

  • प्रथम क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
  • द्वितीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची सैनिकी शाळा
  • तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप ज्युनियर कॉलेज, पुणे

रिंगोस्टिक मुले

  • प्रथम क्रमांक – मएसो वाघिरे कॉलेज, पुणे
  • द्वितीय क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
  • तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे

रस्सीखेच मुली

  • प्रथम क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ ब), पुणे
  • द्वितीय क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ अ), पुणे
  • तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची शाळा, पुणे

रस्सीखेच मुले

  • प्रथम क्रमांक – आबासाहेब गरवारे कॉलेज (संघ ब), पुणे
  • द्वितीय क्रमांक – मामासाहेब मोहोळ कॉलेज, पौड रोड, पुणे
  • तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे

प्रा. नेहा कुलकर्णी आणि रवींद्र गोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्या डॉ. पूनम रावत यांनी आभार मानले.