Home Blog Page 736

शहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाची निदर्शने….

पुणे : परभणी येथे संविधानाच्या अवमानानंतर घडलेल्या घटने संदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला.  शहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे; दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कोंबींग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि  आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनाची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने  प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.   

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या अवरामध्ये संविधानाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी व त्या मागील कटकारस्थान करणारे यांना कठोर शिक्षा करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या हेतुने मोठे जनअंदोलन केले गेले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील मूळचा पुणे जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी  मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने  प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने  करण्यात आली. यावेळी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर,  माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शहराध्यक्ष  महेंद्र कांबळे, संगीता आठवले, विशाल शेवाळे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, बसवराज गायकवाड,  शाम सदाफुले,  राहुल डंबाळे, निलेश अल्हाट, बापूसाहेब भोसले, यशवंत नडगम, मिना मालटे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, चांदणी गायकवाड, मिनाज मेनन, माहादेव कांबळे, संतोष खरात, मुन्ना बक्षशेख, मंगल रासगे, राजेश गाडे, एस.  बी. गायकवाड, भारत भोसले, विनोद टोपे, आशीष भोसले, विरेन साठे, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, अमित सोनवणे, सुन्नाबी शेख, संतोष गायकवाड, सुरज गायकवाड, रामभाऊ कर्वे, शंशाक माने, करण सोरटे, रविन्द्र कांबळे, सुशील मंडल, रोहित कांबळे, उमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.         

परशुराम वाडेकर म्हणाले, परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या कॉबिंग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जे कॉबिंग ऑपरेशन केले ते केवळ दलित व बौद्ध वस्ती असलेल्या ठिकाणी ठरवून केलेले आहे. जय भीम लिहिलेल्या गाड्या पोलिसांनी फोडलेल्या आहेत. कॉबिंग ऑपरेशन दरम्यान जखमी झालेल्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात न नेता पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने न होता पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे पोलिस कोठडीतच झाला. मात्र सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे सांगावे. तसेच अशा प्रकारे कायदे हातात घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा वाडेकर यांनी दिला.  

शहराध्यक्ष संजय सोनावणे म्हणाले, परभणीतील पोलिसांच्या कोंबीग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सुर्यवंशी हा सुशिक्षित तरूण मृत्यूमुखी पडला. पुण्यात त्याला लॉ कॉलेजला प्रवेश  न मिळाल्याने तो परभणी येथे लॉ चे शिक्षण घेत होता. अशा भविष्यात वकील होवू पाहणाऱ्या मुलाचाच कायद्याच्या रक्षकांनी  बळी घेतला आहे. ही शोकांतिका आहे. या कोंबीग ऑपरेशन चे आदेश देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा भविष्यात आम्ही महाराष्ट्र बंद करू असा इशारा त्यांनी दिला.

सोमनाथ सूर्यवंशी LLB चा विद्यार्थी होता :पुण्याहून परीक्षेसाठी परभणीला आला अन् जीव गमावला; पोलिस कोठडीत झाला मृत्यू

0

परभणी- शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण आता पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी एक विद्यार्थी होता. त्याने परभणी येथील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. त्यासाठी तो पुण्याहून परभणीत आला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोमनाथ हा एलएलबीच्या तिसऱ्या वर्षात होता.

पोलिसांच्या हाती सोमनाथचे आधार कार्डही लागले आहे. त्यावर त्याची जन्मतारीख 23 जुलै 1989 अशी नमूद आहे. तर पत्ता पुण्यातील भोसरी भागातील दाखवण्यात आला आहे. यावरून तो मूळचा पुण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची आई व भावाने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिस कारवाईचा निषेध करत आपल्याला न्याय हवा असल्याचा आकांत केला.

माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात आली? याविषयी अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई ही समन्वयित होती का? हे ही समजत नाही. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मल्टिपल इंज्युरिज म्हणजे मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आहे. मी परभणीत अंत्यविधी होईपर्यंत थांबणार आहे. हे सर्वकाही शांतेत पार पडण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.

पोलिस कारवाईत जी घरे फोडण्यात आली, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. आरोपींवर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास झालेला लाठीचार्ज पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कुणी केला? याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना मारहाण झाली त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना सर्व वकिलांना देण्यात आल्यात, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख; पोलिस कोठडीत घेतला होता अखेरचा श्वास

0

परभणी -येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परिणामी, आंबेडकरी अनुयायांत संतापाची तीव्र लाट उसळली आहे.परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक गेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. त्यात त्यांना पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती देण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले.

सोमनाथचे पार्थिव पोलिसांनी अडवले, आंबेडकरांचा हस्तक्षेप

दुसरीकडे, पोलिस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे नेताना रस्त्यात पाचोड येथे रोखून धरला आहे. अॅडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून परभणीला घेऊन जात होतो. आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेची सूर्यवंशी यांच्यावर परभणीत अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा आहे. पण पोलिस व प्रशासन आम्हाला रस्त्यात अडवून मृतदेह लातूरला नेण्याचे सांगत आहेत, असे तेलंग यांनी सांगितले आहे.

पीआयसीटी महाविद्यालयात iDosT प्रकल्पासाठी सामंजस्य करार

पुणे:पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या E&TCE विभागाने क्रिस्टल इंडिया LLP, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत iDosT नावाचा वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प विकसित केला जात आहे. हा प्रकल्प डॉ. शिव वर्मा यांच्या अमेरिकन पेटंटवर आधारित असून वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल घडविण्याची क्षमता आहे.
नुकतीच, प्रकल्पाचे प्रणेते डॉ. शिव वर्मा,करुणाकर नामपल्ली
यांनी PICT महाविद्यालयाला भेट देत iDosT प्रकल्पाची प्रगती पाहिली. डॉ. वर्मा हे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील PhD पदवीधारक असून, दूरसंचार व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नावावर 12 पेक्षा जास्त अमेरिकन पेटंट्स असून ते भारत आणि अमेरिकेतील स्टार्टअप कंपन्यांशी संबंधित आहेत.
या प्रकल्पासाठी डॉ. संदीप गायकवाड, प्रा. ललित पाटील, आणि प्रा. सुनील खोत यांचा सक्रिय सहभाग असून, प्रा. एम. व्ही. मुनोत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेतली असून Robotics Club च्या विद्यार्थ्यांनीही आपले योगदान दिले आहे.
पीआयसीटीचे प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे आणि संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ दिले आहे. iDosT प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

गुरुवारी‘विश्वगुरू भारत‌’ विषयावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌व्याख्यान

पुणे : भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्षे, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवावकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌‘विश्वगुरू भारत‌’ या विषयावर गुरुवारी (दि. 19) जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवर दरवर्षी सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. सहकारनगर येथे आयोजित करण्यात येत असलेली व्याख्यानमाला यंदा 23व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यंदाही नियमित व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. 23व्या वर्षातील व्याख्यानाचे पुष्प डॉ. मोहन भागवत गुंफणार असून व्याख्यान गुरुवार, दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता फुलोरा प्ले ग्राऊंड, दशभुजा गणपती जवळ, सहकारनगर क्र. 2 येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, रवींद्र खरे, विजय ममदापूकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत आयोजित व्याख्यानमालेत अरुण साधू, चंदू बोर्डे, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अविनाश धर्माधिकारी, बाबासाहेब पुरंदरे, ले. जनरल डी. व्ही. शेकटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रा. शिवाजीराव भोसले, डॉ. बालाजी तांबे, प्रा. मनोहर जोशी, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, निळू फुले, द. मा. मिरासदार, जगद्गुरू शंकराचार्य (करवीर पीठ), डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. मोहन धारिया, सिंधुताई सपकाळ, हृदयनाथ मंगेशकर, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, तात्याराव लहाने, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, हभप चारुदत्त आफळे, डॉ. श्रीकांत परांजपे, राज ठाकरे, डॉ. कल्याणी नामजोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांनी हजेरी लावली असून 125 पेक्षा जास्त व्याख्याने झाली आहेत. सुमारे 47 वर्षांपूर्वी तत्कालिन सरसंघचालक बाळसाहेब देवरस यांचे सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान झाले होते. त्यानंतर सहजीवन व्याख्यानमालेत सरससंघचालकांचे व्याख्यान आयोजित करण्याचा योग दुसऱ्यांदा जुळून आला आहे. गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“मेरी रातें, मेरी सड़कें!”महिला हिंसाचाराच्या विरोधात ‘जागर मोर्चा’ला उत्सफूर्त प्रतिसाद

पुणे: “हम भारत कि नारी है, फुल नही चिंगारी है”, “महिला शक्ती आयी है,  नई रोशनी लायी है” असे म्हणत हातात घुंगराच्या काठ्या घेऊन महिला हिंसाचाराच्या विरोधात घोषणा देत, महिला सक्षमीकरणाची गाणी गात, पुण्यातील महिला-मुली शनिवारी रस्त्यावर उतरल्या. कित्येक वर्षापूर्वी १६ डिसेंबरला दिल्लीतील निर्भया प्रकरण झाले . त्यानिमित्ताने शहरातील महिला जागर समितीच्या वतीने या ‘जागर मोर्चा’चे आयोजन करण्यात आले  होते.

रविवारी संध्याकाळी महात्मा फुले वाड्यातील समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख उपस्थिती आमदार नितीन राऊत यांची होती. महिला जागर समितीला त्यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या व सतत त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची हमी दिली. मासे अळी–फडगेट पोलीस चौकी–चिंचेची तालीम–बाजीराव रोड–शनिपार चौक–अप्पा बळवंत चौक–शनिवार वाड्याजवळून हा मोर्चा लाल महालात पोहचला. या दरम्यान रस्त्यात महिला सक्षमीकरणावर, महिला हिंसाचाराच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या, गाणी, कविता सादर केल्या. त्यानंतर लाल महालातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करून या मोर्चाची सांगता करण्यात आली.
तसेच देशातील ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली व हिंसेच्या विरोधात आम्ही उभे राहू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. मेणबत्त्या लावून त्या ज्योतीच्या प्रकाशाने अंधारावर मात करत, आम्ही एक दिवस नक्की एक न्यायपूर्ण आणि निर्भय समाज बनवण्याचा प्रयत्न करू, या निर्धाराने ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाऊन जागर मोर्चाची सांगता झाली.

याप्रसंगी बोलताना महिलांसाठी स्त्री-पुरुष समानतेची व्यवस्था निर्माण करून विकासाची समान संधी निर्माण करणे, त्याचबरोबर समान प्रतिष्ठा, दर्जा, निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे यांनी व्यक्त केले.  महिलांवर होणारे अत्याचार संपवायचे असतील तर मुलींवर बंधन आणण्यापेक्षा आपल्या घरातील मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवायला पाहिजे, असे प्रतिपादन अभिव्यक्ती संघटनेच्या समन्वयक अलका जोशी यांनी व्यक्त केले. तर महिलांनी स्वतःच स्वतःसाठी उभं राहिल पाहिजे, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविषयी स्वतःच आवाज उठवला पाहिजे, असे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकील असुंता पारधे (चेतना महिला विकास संस्था) यांनी व्यक्त केले. स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे. असे कार्यक्रम महिलांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळवून देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मृणालिनी वाणी म्हणाल्या. आजही स्त्री आर्थिकदृष्ट्या उदासीन, शिक्षणात दुर्लक्षित, कुटुंबात दुय्यम, समाजात उपभोगाची वस्तू बनलेली आहे. देश एकविसाव्या शतकाच्या भौतिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असला, तरी स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, ही खंत रंजना पासलकर यांनी व्यक्त केली.  महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळते, तेथे तेथे त्या आपल्या संधीचे सोने करत असतात, त्यामुळे महिलांचा प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे मत प्रियंका रणपिसे (ओजस्वी बहुउद्देशीय संस्था) यानी व्यक्त केले. शाळामधून गुड टच-बॅड टच सारखे उपक्रम तर व्हायला पाहिजेत पण घरकामात वडिलांनी जर हातभार लावला तर आपसूकच लहानपणापासून मुल संवेदनशील पध्द्तीने विचार करायला लागतात, असे मत शारदा नितनवरे (कौरंग फाउंडेशन) यांनी मांडले. याप्रसंगी गुलाबो गँगच्या संगीत तिवारी, नीता रजपूत, वारसा सोशल फाउंडेशनच्या प्राची दुधाने मिळून साऱ्याजणीच्या स्मिता शेट्टी, संगीत पटणे आदी उपस्थित होत्या. यावेळी ‘ओय नजर संभाल’, ‘महिलांवरील हिंसाचार आता बस’ असा सामाजिक संदेश देणारे टि-शर्टही बनविण्यात आले होते.

‘महिला जागर समिती’च्यावतीने सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘हे रस्ते रात्रीच्या वेळी जसे पुरूषांचे आहेत, तसेच आमचे (महिलांचे) आहेत’, हे सांगण्यासाठी ‘मेरी रातें, मेरी सड़कें’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध फुटपाथवर महिलांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेतले. महिला हिंसाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या महिला जागर समितीमध्ये राज्यभरातील 50 हून अधिक संस्था, संघटना सहभागी आहेत.

सहभागी संस्था-संघटना: अभिव्यक्ती, वारसा सोशल फाउंडेशन, हम भारत के लोग, गुलाबो गॅंग, ओजस्वी बहुउद्देशीय संस्था, चेतना महिला विकास संस्था, सगुणा महिला संघटना, संयुक्त स्त्री संस्था, वाचनसाधना ग्रंथालय, अक्षरा केंद्र (मुंबई), पेहेल फाउंडेशन, मिळून सार्‍याजणी, ज्ञानभारती प्रतिष्ठान, रुक्माई भजनी मंडळ, महाराष्ट्र महिला विकास मंच, कौरंग फाउंडेशन, राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडी (RMS), स्व. श्री. सुरेंद्र आनंद मेमोरियल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य भूमाता संघटना, मनस्विनी मंच (वर्धा), महाराष्ट्र महिला परिषद, बोधिसत्व बहुउद्देशीय विकास सोसायटी (बडनेरा), संघर्ष बहुउद्देशीय संस्था (अमरावती), क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन (अमरावती), स्त्री आधार महिला संस्था (मुंबई), युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (लातूर), आम्ही भारतीय महिला मंच (कोल्हापूर), मनस्विनी महिला विकास सेवाभावी संस्था (अंबाजोगाई), सत्यशोधक महिला आघाडी (नांदेड), स्त्री सोशल फाऊंडेशन, विचारधन, संगम वर्ल्ड सेंटर, सीवायडीए, ग्रीन तारा फाऊंडेशन, महिला कल्याण केंद्र, शांताई संस्था, इंडिया स्पॅान्सरशिप कमिटी, निर्भय युवा प्रतिष्ठान, संकल्प सखी, भटके विमुक्त संघटना, परिवर्तन, निर्भय विद्यार्थी अभियान, एकजुट महीला संस्था (खराडी), वात्सल्य सुरक्षा ऑर्गनायझेशन (केशवनगर), सहेली ग्रामीण बहुउद्देशीय महिला संस्था (नाशिक), विद्यादान व सामाजिक सेवा भाव ट्रस्ट (मुंबई) या संस्थांचा समावेश आहे.

अजूनही रस्ते, गल्ली, कॉलेज, बस, बाजार, घर, कामाचे  ठिकाणी अथवा खेळाच्या मैदान हे महिलांसाठी असुरक्षित आहेत आकडेवारीनुसार देशात आज दर 16 मिनिटाला एक बलात्कार होत आहे. परंतु, ही फक्त नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. दिवसेंदिवस वाढते हिंसाचार पाहून मन सुन्न होतं. या वर्षी निर्भया घटनेला 12 वर्ष पुर्ण होत आहे व बदलापूर घटनेला 1 महिना पुर्ण होत आहे यामुळे महिला हिंसाचाराच्या विरोधात व महिलांना समाजामध्ये सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे म्हणून 21 सप्टेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत, 12 रात्री महिलांनी निर्भयपणे रस्त्यावर येऊन जगण्यासाठी व स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी  पुण्यामधील ‘महिला जागर समिती’ मार्फत ‘मेरी रातें, मेरी सड़कें!’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असं जीविका उथडा यांनी सांगितले.
या अंतर्गत पहिला कार्यक्रम हा 21 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत सावित्रीबाई फुले पुतळासमोरील फुटपाथ, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आलेला आहे. हे रस्ते जेवढे तुमचे आहेत तेवढेच आमचेही आहेत हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर सात रात्री उतरलो! त्यात एकमेकींशी मनातलं बोललो, परखडपणे मते मांडली, मुक्तपणे नाचलो-गायलो, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागी स्त्रियांचा इतिहास सांगितला, चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मान केला त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली. यातून नक्कीच आधीपेक्षा बिनधास्त झाल्या, स्वतःसाठी काही क्षण जगल्या, तसा हा संघर्ष चालूच राहणार! तर 16 डिसेंबर 2024 च्या 12व्या रात्री महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात महिला जागर मोर्चा काढून या कार्यक्रमाचा समारोप होईल.  
हिसेंच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, स्वतःचे आणि इतर सख्यांचे भय घालवण्यासाठी, रस्त्यावर निर्भयपणे चालण्यासाठी, एकमेकींची सुख-दु:खे समजून घेण्यासाठी, एक निर्भय मनमोकळा श्वास घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला शोधण्यासाठी मुलीनीं व महिलांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन प्राची दुधाने यांनी केले. तर नीता रजपूत यांनी या अभियानात पुण्यातील विविध बचतगट, विविध शिक्षण संस्थामधील कॉलेज मधील विद्यार्थिनी व कमर्चारी तसेच सोसायटी मधील महिलांना सहभागी करून घेण्याबाबतची माहिती दिली.
या सर्व अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देताना नीलिमा राऊत यांनी संगितले कि यात गाणी, नृत्य, चर्चा अशा सर्जनशील पद्धतींचा समावेश असेल. तसेच मुख्य सहभाग हा मुली, महिला आणि त्यांची लहान मुलं यांचा असेल तर यात पुरुषांचे सहकार्य ही स्वागतार्ह असेल.  
या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता. या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता: गुड्डी: 77380 82170  श्रद्धा: 92704 78335

सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा-डॉ.हुलगेश चलवादी

न्यायालयीन कोठाडीतील मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी

पुणे दिनांक १६ डिसेंबर २०२४,

देशाचा पवित्र ग्रंथ ‘संविधान’ प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना धक्कादायक असून चळवळीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सुर्यवंशी कुटुंबियांच्या पाठिशी उभी राहण्याची ही वेळ आहे, अशी भावना बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१६) व्यक्त केली.

“सोमनाथ सुर्यवंशी यांनी चळवळीच्या लढ्यात प्राण अर्पण केले.त्यांच्या त्यागाला वाया जाऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत डॉ.चलवादी यांनी सरकारला आवाहन केले की, सुर्यवंशी कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे व त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.”

सोमनाथ यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की , त्यामागे कुठले षडयंत्र आहे ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी अंती दोषीविरोधात कारवाई करावी.या मृत्यूप्रकरणी सरकारने त्यांची बाजू स्पष्ट करण्याची गरज असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.“बहुजन समाज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सुर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. आम्ही त्यांना फक्त सांत्वन देणार नाही, तर संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत राहू,” अशी ठाम भूमिका घेत, लवकरच कुटुंबीयांना भेटून पक्षाच्या वतीने मदत करणार असल्याचे आश्वासन डॉ.चलवादी यांनी दिले.

सोमनाथ यांच्या आत्मत्याग हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर न्याय आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.त्यांच्या बलिदानाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे, अशा शब्दात डॉ. चलवादी यांनी श्रद्धांजली अर्पित केली.सोमनाथ यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने त्यांचे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. या संकटसमयी बहुजन समाज पक्ष सुर्यवंशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. 

सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने लोकभावना लक्षात घेता घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी बसपची भूमिका असल्याचे डॉ.चलवादींनी स्पष्ट केले.परभणीत आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील आंदोलकांची मुक्तता करण्यात यावी तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचा देखील पुनरोच्चार डॉ.चलवादी यांनी यानिमित्ताने केले.

आता थांबायचं नाय!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!
‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने.
सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय ‘झी स्टुडिओज’ ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत, या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत,
आज सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते निधी परमार – हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.

“मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट ‘झी स्टुडिओज’साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे.”

  • उमेश के बन्सल, चिफ बिझनेस ऑफिसर, झी स्टुडिओज

“मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून, मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे, त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत.”

  • बवेश जानवलेकर, बिझनेस हेड, झी स्टुडिओ

“साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला दैंनदिन सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा, शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात, चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करीत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अश्या प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच मला महापालिकेच्या वतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय. मी सर्वांचे अभिनंदन करतो.”
*भूषम गगराणी – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त *

“मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी खरंच काय करू शकतात, याची चुणूक दाखवणारी आमच्या गुणी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणारी कलाकृती तयार होतेय, याचा आनंद आहे.”

  • किरण दिघावकर – उपायुक्त, मुंबई महापालिका

“प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे.”

  • उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी

“मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा, त्यासाठी झी स्टुडिओ, सहकारी आणि मुंबई महानगर पालिका यांचे योगदान असल्यानेच ‘आता थांबायचं नाय’, शक्य झाले आहे.”

  • क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी
    चित्रपट – ‘आता थांबायचं नाय’
    दिग्दर्शक – शिवराज वायचळ
    निर्माते :
    झी स्टुडिओज – उमेश के बन्सल आणि बवेश जानवलेकर
    चॉक अँड चीज प्रॉडक्शन – निधी परमार – हिरानंदानी
    क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी
    फिल्म जॅझ – धरम वालीया
    लेखक – शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप
    कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे
    आणि आशुतोष गोवारीकर

एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा !!

गुजरातच्या टीम-२ संघाला स्पर्धेचे ‘टिम चॅम्पियनशीप’ !!

राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद, आसिफ अलि सय्यद यांचा गट-विजेतेपद !!

पुणे, १६ डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली होणार्‍या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेत गुजरातच्या टीम-२ संघाने राष्ट्रीय सांघिक विजेतेपद संपादन केले. राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद आणि आसिफ अलि सय्यद यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले.

पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे झालेल्या निर्णायक फेरीमध्ये साडेपाच किलोमीटरच्या धावपट्टीमध्ये रॅली-रेसर्सच्या दोन शर्यती घेण्यात आल्या. या दोन्ही शर्यतीं मिळून सरासरीतील सर्वोत्तम वेळची नोंद करण्यात आली. ओपन अपटू ५०० सीसी ग्रुप सी१ क्लास मध्ये राजेंद्र आरई याने पहिला क्रमांक मिळवला. क्लास सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट) मध्ये सिनान फ्रान्सीस याने सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद यांनी आपापल्या गटामध्ये सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. महिला गटामध्ये रेहान बी. हिने, प्रौढ गटामध्ये एम.डी. सईद आणि स् कूटर २१० सीसी क्लास मध्ये आसिफ अलि यांनी विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘युरोग्रीप’ टायर उत्पादक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक फराझ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना उपस्थित होते. सर्व विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या फेरीमध्ये देशातील ७० रायडर्सनी सहभाग घेतला होता. चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले होते.

स्पर्धेचा सविस्तर निकालः (प्रथम, दुसरा, तिसरा क्रमांक; नोंदवलेली वेळ या क्रमानुसार)ः
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसीः राजेंद्र आर.ई. (१२.४०.७०० मि.); नटराज आर. (१२.५०.३०० मि.); नरेश व्हि.एस. (१३.०६.५०० मि.);
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट)ः सिनान फ्रान्सीस (१२.३१.४०० मि.); नटराज आर. (१२.५८.१०० मि.); नरेश व्हि.एस. (१२.५९.७०० मि.);
ग्रुप बीः सी३-१३१ सीसी अपटू १६५ सीसीः वरूण कुमार (१३.४५.६०० मि.); स्टिफन रॉय (१३.४६.२००); भरथ एल. (१४.१४.४०० मि.);
ग्रुप बीः सी४-१६६ सीसी अपटू २६० सीसीः डी. सचिन (१२.५८.१०० मि.); संजय सोमशेखर (१२.५८.६००); करण कुमार (१३.१३.६०० मि.);
ग्रुप बीः सी५-२६१ सीसी अपटू ४०० सीसीः हेमंत गोड्डा (१३.२५.००० मि.); रोहीत शिंदे (१३.२८.५०० मि.); राजेश स्वामी (१३.३९.१०० मि.);
ग्रुप बीः सी६-बुलेट- सीएल अपटू ५५० सीसीः सुहेल अहमद (१३.१८.७०० मि.), सिनान फ्रान्सीस (१३.२५.००० मि.); सुहास एस.एस. (१४.१३.५०० मि.);
ग्रुप बीः सी७-स्कूटर- अपटू २१० सीसीः आसिफ अलि सय्यद (१३.४५.२०० मि.); शमिम खान (१४.२९.८०० मि.); एन. कार्थिक (१४.५५.१०० मि.);
ग्रुप बीः सी८-महिला- अपटू २६० सीसीः रेहान बी. (१५.४३.४०० मि.); स्नेहा सी.सी. (१७.२९.८०० मि.); तनया सिंग (१७.४०.६०० मि.);
ग्रुप बीः सी९-प्रौढ गट (५० वर्षावरील) अपटू २६० सीसीः एम.डी. सईद (१४.३८.१०० मि.); ए.जे. जोस (१५.०७.८०० मि.); अमरेंद्र साठे (१५.१३.५०० मि.);
ग्रुप डीः सी१०- अपटू २६० सीसीः संजय सोमशेखर (१३.३६.८०० मि.); योगेश पी. (१४.०८.६०० मि.); नावेद खान (१४.३१.८०० मि.);

शांत झोप लागणारीच माणसे असतात श्रीमंत – आमदार बापूसाहेब पठारे

पुणे : वडगावशेरी मतसंघ हा आपला एक परिवार आहे. याच परिवाराची एकजूट विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने दिसून आली. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला असेल चुकीचे, त्यांना सत्य काय ते समजले. खरेपणा सोबत असला की मनात कोणती भीती राहत नाही. ज्यांना शांत झोप लागते तीच खरी श्रीमंत माणसे असतात. असे वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी खराडीत सत्कार समारंभाप्रसंगी मत व्यक्त केले.

खराडीतील थिटे वस्ती, थिटे नगर आणि काळूबाई नगर या परिसरातील नागरिकांनी नवनिर्वाचित आमदारपदी निवड झाल्याबद्दल पठारे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पठारे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पठारे म्हणाले, ”काही जण खोटी माहिती देवून आपण कामच केल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी पडू नका. काही जणांना दुसऱ्याचे काम बघून स्वत: श्रेय घेण्याची सवय असते. आयुष्यात कधी कोणी खोटे वागू नये. खोटे कधी टिकून राहत नाही. सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी एकत्रित येवून हा सत्कार सोहळा आयोजित करून नागरिकांनी एकी दाखविली. गेल्या पंधरा दिवसात सत्कारासाठी घरी गर्दी केली जात आहे. यात अनेकजणांनी विरोधात प्रचार केलेला आहे, याची मला माहिती आहे. परंतु त्यांनाही सोबत घेवून पुढच्या काळात काम करायचे आहे. मतदारसंघ आपले कुटुंब आहे. त्यामुळे कोणी चुकले असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. जे कोणी चुकले असतील, त्यांनी सोबत येवून एकत्रित काम करावे.

मुलांवर चांगेल संस्कार केले पाहिजेत. तरुण पिढीला घडविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मुले शिक्षण घेत असताना त्यांना चांगले शिक्षण मिळते का याची आपण तपासणी केली पाहिजे. तरुण पिढी शिकली तर त्यांचे भविष्य चांगले होणार आहे. अन्यथा ते चुकीच्या मार्गावर जातील. असे सांगून तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या काळात काम केले जाईल. असे आश्वासन पठारे यांनी यावेळी दिले.

महेंद्र पठारे म्हणाले की, ”खराडी गावात विकास कामे करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आपले गाव ज्याप्रमाणे वेगाने वाढले आहे, त्याच्या दुप्पट वेगाने विकास कामे झाली आहेत. या निवडणूकीत मतदारांनी एकजूट दाखविली आहे. त्यामुळेच हा विजय आपल्याला साजरा करायला मिळत आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत.”

मधुकर चौधरी, तनुजा बेलोटे, भास्कर बेलोटे, अमित शेळके, शांताराम म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक वैभव भोसले यांनी केले. सुत्रसंचालन अमोल अवचिते यांनी केले. सत्कार सोहळ्यासाठी राजेश चव्हाण, बाळासाहेब आहिरे, आप्पा आहिरे, अर्जुन गवळी, रतनसिंग राठोड, शिवाजी कांबळे, विश्वास खुरंगुळे, संजय शेजवळ, रामदास गव्हाणे, पोपट क्षीरसागर, भास्कर साळवी आदींनी परिश्रम घेतले.

संतोष देशमुख हत्याकांडाचा वाल्मिक कराड मास्टरमाइंड:आम्ही न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, संदीप क्षीरसागर यांचा निर्धार

नागपूर- बीड जिल्ह्यात माजलगाव येथील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून केल्याची घटना उघडकीस आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेवर संदीप क्षीरसागर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपली भूमिका मांडली आहे. अतिशय दुर्दैवी घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

संदीप क्षीरसागर म्हणाले, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. सर्व महाराष्ट्र या घटनेचा साक्षीदार आहे. मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी बोललो तसेच पूर्ण परिसरातील लोकांशी बोललो. अतिशय दहशतीचे वातावरण या गावात आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झाले आहेत या संदर्भातली, यामधले काही गुन्हेगरांना तर अटकच झालेली नाही. ज्यांना अटक झाली ते काही प्रमुख गुन्हेगार नाहीत. यांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. आणि सगळ्यात प्रमुख त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे तपासची अशी दिशाभूल केली जात असल्याचे क्षीरसागर म्हणाले आहेत.

पुढे बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, खंडणीचा गुन्हा ज्यांनी दाखल केला. माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुरव्यांमध्ये ज्या विंडमिलच्या अधिकाऱ्यांनी जे खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड यांचे सत्कार करतानाचे फोटो आहेत. माझी प्रमुख मागणी आहे आज 8 ते 9 दिवस उलटले आहेत पूर्ण जिल्हा हा संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बघत आहे.

पुढे रामकृष्ण बांगर यांच्याविषयी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत. त्यांच्या मुलावर कलम 307 दाखल करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा जागा या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्या मुलांवर 307 दाखल केला. त्यानंतर देखील ऐकले नाही म्हणल्यावर आई वडील आणि मुलगा यांच्यावर एट्रोसिटी दाखल करण्यात आला. मुलगा आणि त्याच्या आईकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यात दिसते की मुलगा इथे नाहीये. म्हणजे हे 307 दाखल करणे अशा पद्धतीचे काम इथे सुरू आहे.

पुढे संदीप क्षीरसागर म्हणाले, इतक्या निर्दयीपणे त्यांनी संतोष देशमुखला मारले आहे. अक्षरशः त्याचे डोळे फोडले आहेत आणि कॉल रेकॉर्ड जर तुम्ही तपासले तर पूर्णपणे ते अॅंगल त्या वाल्मिक कराडकडे जाईल. पण का ही सरकार न्याय देण्यासाठी मागे सरकत आहे हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे. जिल्ह्यातले लोक आमच्याकडे फार आशेने बघत आहेत. त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिले. आम्ही संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगर यांना न्याय भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही संदीप क्षीरसगर यावेळी म्हणाले आहेत.

हा मी नाराज आहे, जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालंय … छगन भुजबळ

नागपूर :

”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं”, असं म्हणत छगन भुजबळांनी आपली नाराजी स्पष्ट जाहीर केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे

२३ मंत्र्यांवर गुन्हे, नितेश राणेंवर सर्वाधिक ३८ गुन्हे दाखल,७वकील मंत्रिमंडळात

0

सर्वात श्रीमंत : मंगलप्रभात लोढा, सर्वात गरीब : दादा भुसे
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी ९ लाख २३ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा नंबर असून त्यांची संपत्ती ३३३ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असून त्यांची संपत्ती १२८ कोटी ४१ लाख ८१ हजार रुपये इतकी आहे, तर शिवसेनेचे दादा भुसे सर्वात गरीब मंत्री असून त्यांची संपत्ती १ कोटी ६० लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.

मुंबई- काल महायुतीच्या शपथ घेतलेल्या ३९ पैकी २३ मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. यात भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक ३८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यानंतर भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यावर १२ आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यावर ९ गुन्ह्यांची नोंद आहे. १६ मंत्र्यांवर एकही गुन्ह्याची नोंद नाही.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार रविवारी उपराजधानी नागपूरमध्ये पार पडला. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळातील तब्बल २३ मंत्र्यांवर गुन्हे नोंद आहेत. ९ मंत्री बारावीपर्यंत शिकलेले आहेत, तर दोन जण दहावी पास आहेत. ५ मंत्री हे पदव्युत्तर पदवी मिळवलेले आहेत, तर चार जणांनी पदविका पूर्ण केली आहे. १८ जण पदवीधर आहेत. फक्त आठवी पास भरत गोगावले हे सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. शिंदे सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण त्यांना यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात त्यांना एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते.महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले होते. कुणाला संधी व कुणाला डच्चू मिळतो यावर चर्चा झडत होत्या. अखेर, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपराजधानी नागपूरमध्ये रविवारी मंत्रिमंडळाचा महाविस्तार पार पडला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या ३९ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. दिव्य मराठीने या ३९ मंत्र्यांच्या शिक्षण, वय, गुन्हे व संपत्तीची त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीवरून विश्लेषण केले.महायुती मंत्रिमंडळात सात वकील आहेत. मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस हे वकील असून त्यांच्याशिवाय ६ जणांनी वकिलीची पदवी घेतली आहे. पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत.

मंत्रिमंडळात १६ मंत्री साठीपार असून भाजपचे नवी मुंबईतील नेते, ७४ वर्षीय गणेश नाईक हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असणार आहेत, तर अजित पवार गटाच्या ३६ वर्षीय अदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री आहेत. तटकरे यांची मंत्रिपदाची दुसरी टर्म आहे.

नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी : प्रकाश जावडेकर

पुणे : अफाट कार्यक्षमता, कामकाजातील पारदर्शकता, सूत्रबद्ध नियोजन, दूरदृष्टी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कल्पक विचारसरणी आणि विकसित भारताचे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल सुरू आहे. गेल्या दहा वर्षात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यातही अमूलाग्र बदल झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काही काळासाठी युद्धविराम करून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणले आहे. या मुळेच नरेंद्र मोदी हे केवळ देश पातळीवरील नेते नसून जागतिक पातळीवरील मुत्सद्दी राजकारणी आहेत हे सिद्ध होते, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या ‌‘मोदी 3.0‌’ या कार्यक्रमाचे रविवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रकाश जावडेकर बोलत होते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. शंतनू देशपांडे, सचिव अमृता कुलकर्णी, माजी अध्यक्ष दीपक शिकारपूर मंचावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती, विचारप्रणाली, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, समन्वयाची भूमिका आदी वैशिष्ट्यांसह व्हिजन 2047 या विषयी प्रकाश जावडेकर यांनी मते मांडली. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नरेंद्र मोदी संन्यस्त कर्मयोगी आहेत. त्यांनी काळाची गरज ओळखून सुरू केलेला समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावी वापर, ऑनलाईन पेमेंट पद्धती, मन की बात, परीक्षा पे चर्चा, हर घर शौचालय, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, संविधान सन्मान आदी क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य या मुद्द्यांकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले.
मोदी यांच्या कार्यकाळात संविधानाचा योग्य सन्मान झाला असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 23 वर्षे कार्यरत असणारे मोदी हे एकमेव राजकीय व्यक्तीमत्व आहे. मोदींच्या पारदर्शी कारभाराची माहिती देताना त्यांच्या कार्यकालावधीत एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दैनंदिन व्यवहारात सरकारची गरज कमी करत मोदी यांच्या विविध योजनांमुळे जनतेच्या जगण्यात अमूलाग्र बदल होऊन सुलभता आली आहे. जागतिक पातळीवर घेतलेल्या आर्थिक निर्णयांमुळे देशाला झालेल्या लाभांविषयी जावडेकर यांनी माहिती दिली.
मोदी यांच्या आवडीनिवडी सांगताना जावडेकर म्हणाले, योगासने, व्यायाम, सतत कार्यमग्नता, शुद्ध शाकाहारी जेवण आवडीचे आहे. मोदी यांना गुजराती पद्धतीचे जेवण अधिक पसंत असून महाराष्ट्रातील मेतकुटही मनापासून आवडते.
व्हिजन 2047 अंतर्गत आर्थिक महासत्ता, नदी जोड प्रकल्प, सौरउर्जा, पवनउर्जा, वक्फ बोर्ड, शैक्षणिक धोरण याविषयी सुरू असलेल्या कार्याचा उहापोह केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंजिरी शहाणे यांनी तर स्वागत डॉ. शंतनू देशपांडे यांनी केले. आभार विशाल कुलकर्णी यांनी मानले.

कला जगत झाले पोरके:उस्ताद झाकीर हुसैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

झाकीर हुसैन भैया यांचे नुकतेच निधन झाले यावर विश्वासच बसत नाही. संपूर्ण कला जगत झाकीर भाईंच्या अशा अचानक जाण्याने पोरके झाले आहे . माझे व झाकीर भैयांचे संबंध १९८० साला पासूनचे. पं.बिरजूमहाराज व झाकीर भाईन बरोबर मी प्रथम कथक नृत्य सोलापूर येथे सादर केले.त्यावेळी झाकीर भाईची पत्नी टोनी भाभी पण होती. त्यानंतर बिरजूमहाराजजीं बरोबर कार्यक्रमात झाकीर भाईन बरोबर कायम भेटी होत गेल्या व झाकीर भाईन बरोबर अधिक घनिष्ठ संबंध झाले. मला ते नंदू म्हणून हाक मारत असत. १९९५ साली शिकागो येथे एका कार्यक्रमात झाकीर भाईंनी तबला वाजवला व मी नृत्य केले हे माझे खुप मोठे सौभाग्य! त्यांच्या बरोबर च्या ५० वर्षाच्या सहवासातील आठवणी आज जाग्या झाल्या आहेत.
झाकीर भाईंच्या जाण्याने कला क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती आता कधीही भरून येणार नाही. आज कला क्षेत्रातील लखलखता ध्रुव तारा गळुन पडला आहे. ईश्वर झाकीर हुसेन भाईन च्या आल्यास शांती दे!

जेष्ठ कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते