Home Blog Page 637

डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्ला, पण मला हराम्यांना घालवायचे आहे:अँजिओप्लास्टीनंतर ठाकरे कडाडले; तेली, साळुंखेचा ठाकरे गटात प्रवेश

रत्नागिरी– मध्यंतरी हॉस्पिटलची वारी करावी लागली . डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, पण हराम्यांना घालवायचे असल्यामुळे आराम तरी किती दिवस करणार असे विधान येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली आणि सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सिल्लोड मतदारसंघातील भाजपचे नेते सुरेश बनकर यांनीही हाती शिवबंधन बांधले. बनकर हे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उभे राहणार आहेत.
काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिटोप्लास्टी करण्यात आली होती. अँजिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोर आले असून अॅक्शन मोडमध्ये पहायला मिळत आहेत.

अजित पवार गटाचे सांगोल्याचे माजी आमदार दिपक साळुंखे पाटील ह्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.


उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यंतरी हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले होते, पण हराम्यांना घालवायचे असल्यामुळे आराम तरी किती दिवस करणार, असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली. दीपक साळुंखे आणि राजन तेली यांच्या पक्षप्रवेशामुळे कामाला मुहूर्त चांगला मिळाला आहे. यंदाची निवडणूक सोपी नाहीये. दीपक साळुंखे शिवसेनेत आले म्हणजे आपला विजय नक्की हे माहीत आहे. पण तुम्ही आजपासून मतदारसंघातील घराघरांत आपली मशाल पोहोचवली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.खोकेवाले मशाल आणि धनुष्यबाण यामध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शिवसेनेची निशाण मशाल असून ती घराघरांत न्यावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. दीपक साळुंखे यांच्या हातात मशाल दिली आहे, त्या मशालीची धग दाखवून द्यायची आहे. मतदारसंघात सभेला आल्यानंतर सविस्तर बोलेन, असेही ठाकरे म्हणाले. सांगोल्याचा निवडून आलेला आमदार जरी गद्दार झाला, तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहात हे दाखवून द्याल आणि आपला आमदार निवडून आणाल अशी खात्री आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.राजन तेली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, महायुतीमध्ये ही जागाा शिवसेना शिंदे गटाकडे असणार आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी तेली यांनी भाजपकडे केली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे राजन तेली यांनी संधी मिळण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे राजन तेली यांनी गुरुवारी भाजपचा सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची माहिती आहे.राजन तेली एकेकाळी नारायण राणेंसोबत होते. राजन तेली आणि नारायण राणे दोघांनी सोबतच शिवसेनेला रामराम ठोकला होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. तसेच नारायण यांच्याकडून भाजपमध्ये माझे खच्चीकरण होत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास सांवतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत पाहायला मिळेल.2019 मध्ये भाजप शिवसेना युती असल्यामुळे सावंतवाडीमधून दीपक केसरकर उभे होते. तर राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत त्यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत केसरकर यांना 69 हजार 784 मते मिळाली होती, तर राजन तेली यांनी 56 हजार 556 मते मिळवली होती. त्यामुळे यावेळी ठाकरे गटाने राजन तेली यांना संधी दिल्यास केसरकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

निवडणूक साहित्य रहदारीस अडथळा होईल असे लावण्यास निर्बंध-

खासगी, सार्वजनिक जागेवर निवडणूक प्रचारसाहित्य लावण्यास निर्बंध

पुणे, दि. १८: जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही निवडणूक संबंधी साहित्य रहदारीस अडथळा होईल व अपघात होईल असे लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल व अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावर निर्बंध घाण्यात आले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

खासगी, सार्वजनिक जागेवर निवडणूक प्रचारसाहित्य लावण्यास निर्बंध

विधानसभा निवडणूक कालावधीत खासगी व्यक्तींच्या जागेवर व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जागेवर संबंधितांच्या परवानगी शिवाय निवडणूक प्रचाराचे साहित्य लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकीच्या परवानगी शिवाय व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

आचारसंहिता कालावधीत धरणे, आंदोलने, निदर्शनांना निर्बंधजात, भाषा, धर्मावर शिबिरांचे आयोजन करण्यासही निर्बंध

पुणे, दि.१८ : आदर्श आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यात धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर तसेच जात, भाषा, धर्मावर शिबिरांचे आयोजन करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंधाचे आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -२०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान अधिकारानुसार डॉ. दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत.

जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने अथवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक कालावधीकरीता निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे जात, भाषा व धर्मावर शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध

पुणे, दि. १८: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी दहा पेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.

हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतले तरी कोणते निर्णय ?

मुंबई- मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतले तरी कोणते निर्णय ? या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सणसणीत उत्तरच दिले आहे . श्रीकांत शिंदे यांनी या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहेकी,’ ,’राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषगाने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांसाठी भरून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात शिक्षणाच्या योजनांना सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याने मराठा समाजातील नवी पिढी घडण्यास निश्चितच मदत होणार आहे. शासनाकडून या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी होत आहे.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतले. प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ७४ हजार ८७३ लाभार्थ्यांना ५ हजार ६५९ कोटी बँक कर्ज मंजूर त्यावरील ६०८.१२ कोटी रूपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. महामंडळाकडून ३५ गट प्रकल्पांना ३.३५ कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे. सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि ६ विभागीय कार्यालये आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. बांधकामासाठी रु.१ हजार १८८.८२ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेंतर्गत ३ लाख ७९ हजार ३७३ विद्यार्थ्यांना १ हजार २९३ कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रु.१ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले आहे . छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी ३२ हजार ६३९ विद्यार्थ्यांना रु. ३१ कोटी वितरित करण्यात आले आहेत. तसेच यावर्षी ४४ हजार १०२ विद्यार्थ्यांना रु.४२ कोटी रुपये मंजूर केले .मराठा समाजाच्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रु.२१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच ह्या योजनाचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थाना मिळतो आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष ६० हजार महानगराच्या ठिकाणी, रु.५१ हजार विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी, रु.४३ हजार जिल्ह्याच्या ठिकाणी आणि रु.३८ हजार तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आले.

मराठा समाजातील १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिंदे म्हणाले कि,’ विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-१९ मुळे नोकरभरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एम. पी. एस. सी. व अन्य शासकीय सेवेत ३ हजार २०० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय, अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या ५८ विद्यार्थ्यांची यू. पी. एस. सी. (१२ आय. ए. एस., १८ आय. पी. एस., ८ आय. आर. एस., १ आय. एफ. एस., २ भारतीय वन सेवा, ५ सी. ए. पी. एफ. व इतर सेवा १२) तर ३०४ विद्यार्थ्यांची एम. पी. एस. सी. मार्फत निवड झाली आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत (पी. एच. डी. करीता) मराठा समाजाच्या २ हजार १०९ विद्यार्थ्यांना रु.११६.३४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली .सारथीमार्फत ३६ हजार ७२६ विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध योजना राबवताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही याबाबत सातत्याने आढावा घेत असतात त्यामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीत गती निर्माण झाली आहे.
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. हे सारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे होऊ शकले आहे.असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा तृतीय पदवी प्रदान सोहळा रविवारी

पुणे : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे या संस्थेतर्फे तृतीय पदवी प्रदान सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक २० आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. पद्मावती येथील विणकर सभागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अंक ज्योतिष अभ्यासक प्रसाद शिरोडकर उपस्थित होते.
मुख्य पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. त्यामध्ये वास्तुविशारद, लोलक विशारद, अंक विशारद, वास्तुभूषण वर्गाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी दत्त उपासक गुरुश्री प्रिया मालवणकर, ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तृतीय पदवी प्रमाणपत्र सोहळ्याअंतर्गत विविध वयोगटातील व विविध अभ्यासक्रमा अंतर्गत तब्बल १५० विद्यार्थ्यांना  पदवी प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, रविवारी दुपारी २ वाजता वास्तू रत्न, विशेष लक्षवेधी, अचिव्हमेंट आॅफ द इयर आणि इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी रमलगुरु चंद्रकांत शेवाळे, अ‍ॅड. सुनिता पागे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिष शास्त्री अनिल चांदवडकर , श्रौतस्मार्त अभ्यासक अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांसह इतरही मान्यवर उपस्थित राहतील.
ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांना रत्नमाला पुरस्कार, गुरुश्री प्रिया मालवणकर यांना शारदा पुरस्कार, अंजली पोतदार यांना अक्षरलक्ष्मी पुरस्कार आणि अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात येईल. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच संस्थेतर्फे सुरू असलेल्या अभ्यासक्रमात पारंगत होऊन अनेक विद्यार्थी आज यशस्वीरित्या समाजात कार्यरत आहेत.

महिलांनी संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे – सुलभा यादव

0

जिजाऊ ब्रिगेड भोसरी विभाग पदाधिकाऱ्यांची निवड जाहिर

पिंपरी, पुणे ( दि. १८ ऑक्टोबर २०२४) महिला या अबला नसून सबला आहेत. महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सामुदायिकपणे लढा देता आला पाहिजे यासाठी जिजाऊ ब्रिगेड राज्यात सर्वत्र विविध अभियानातून संघटन उभे करत आहे. यामध्ये भोसरी सह इतर सर्व विभागातून युवती, महिलांना जिजाऊ ब्रिगेड मध्ये सहभागी करून घेऊन आपले संघटन मजबूत करावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी केले.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने शहरात विविध ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून ‘नारी शक्ती जनजागृती अभियान’ आयोजीत करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप नुकताच रामनगर, भोसरी येथे करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सभासद महिलांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुलभा यादव बोलत होत्या.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड शहर कार्याध्यक्षा रेखा गुळवे, जिल्हा कार्याध्यक्षा अश्विनी पाटील यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या भोसरी विभाग अध्यक्ष सीमा गणेश मनस्कार, कार्याध्यक्ष मंगल बाबुराव पडवळ आणि लता प्रकाश खैरे यांची निवड करण्यात आली. तसेच जयश्री भगत, प्रतिभा लवाळे, माधुरी ढाके, नंदा निबळे यांची जिजाऊ ब्रिगेड भोसरी विभाग उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. जोतसना दुगाणे सचिव, कमल ताठे सहसचिव पदी तर रविशा तांबे, शिला कोठे, सिंधु संभारे, भारती गव्हाणे, रसिका खामकर, शिला काळे, रूपाली वाघमारे, मनिषा हिंगे, शारदा मोरे, माधवी जगताप, मंगल चिमटे, मिरा पवार, मंदाकिनी पाटील, वर्षा दातकर यांची भोसरी विभाग संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी महिलांचा नियुक्तीपत्र व जिजाऊ चरित्र पुस्तक भेट देऊन सुलभा यादव, रेखा गुळवे, अश्विनी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोसरी विभाग जिजाऊ ब्रिगेड संचलन करणे, वार्ड स्तरावर शाखाविस्तार करण्याची जबाबदारी रेखा गुळवे यांच्याकडे देण्यात आली. रेखा गुळवे आणि श्री नवदुर्गा महिला मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी आयोजनात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन अश्विनी पाटील तर आभार रविशा तांबे यांनी मानले

अजितदादांनी काढली मानकर आणि रुपाली पाटलांची समजूत,म्हणाले,पुढच्या वेळी नक्की न्याय देऊ…

पुणे- राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर आणि रुपाली पाटील या दोहोंनी आज मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली यावेळी तुमची नाराजी माझ्या लक्षात आली आहे, यावेळी मला जमले नाही पण पुढच्या वेळी आपणास नक्की न्याय दिला जाईल असे आश्वासन देत या दोहोंची अजित पवार यांनी समजूत काढल्याचे येथे वृत्त आले आहे.

दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला होता. त्यानंतर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी मागील 40 वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात कार्य करत आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदं भूषवली आणि पदांना न्याय देण्याच काम केलं . गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लोकसभेवेळी देखील त्यांनी मोठी मेहनत केल्याचे सांगितले. तर रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात आली आणि माझा मात्र विचार केला नाही अशी त्यांची तक्रार होती.

या संदर्भात दीपक मानकर यांनी असे म्हटले आहे कि,’माझ्यावर विश्वास ठेऊन पुणे शहरातील ८५० पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसात पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री.अजितदादा पवार यांनी आज, शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे वेळ देत माझी भेट घेऊन शहराध्यक्ष या नात्याने पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला.अजितदादा हे पुणे शहर कार्यकारणीच्या कार्यावर अत्यंत समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असे अजितदादांनी ठामपणे जाहीर केले आहे.शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी उपयोगी होणाऱ्या विधानपरिषदेसाठी आपण मागणी केली होती. परंतू काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. परंतू येत्या काळात आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दादांनी यावेळी दिली. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत दादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल असा ठाम विश्वास मला दिला आहे.पुणे शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून पक्षाची ताकद दाखवून देऊया, मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द अजितदादानी यावेळी दिला.तरी आमची एकी अशीच ठेऊन आम्ही येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाणार आहोत.यामुळे १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे पक्ष कार्यालय, गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे होणारी बैठक रद्द करत आहे. विधासभा मतदारसंघ नियोजनासाठी लवकरच पुढच्या बैठकीचा तपशील जाहीर केला जाईल.असेही मानकर यांनी म्हटले आहे.

काकडे,मानकर, रुपाली पाटलांसारख्यांची नाराजी महायुतीला मानवेल काय ?

पुणे- मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आणि आता निवडणुकीतही जरांगे पाटलांची चळवळ सुरु असताना भाजपमधील माजी खासदार संजय काकडे,तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दीपक मानकर आणि रुपाली पाटील अशा रथी महारथींची नाराजी महायुतीतील भाजपा आणि अजितदादा गटाने ओढवून घेतल्याने पुण्यातील निवडणुकीत महायुतींच्या उमेदवारांना फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय समीक्षकांनी वर्तविला आहे.

भाजपा सहयोगी राज्यसभा सदस्य अशीच गणना असतानाही माजी खासदार संजय काकडे यांनी गेल्या १० वर्षात अगदी नोटबंदी पासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत आणि महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक वेळी भाजप मध्ये हिरारीने उभे राहून पक्षासाठी झोकून काम केले.पण प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आली असा त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून दावा केला जातोय आता अजितदादा देखील रुपाली चाकणकर यांची तत्परतेने फेर निवड झाल्याने नाराजीचे बळी ठरत आहेत. दीपक मानकर यांनी अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष पद घेऊन शरद पवार गटाशी वाईट पणा स्वीकारत अजितदादांचा गट सक्षम करण्यासाठी जोरदार मेहनत घेतली. मनसेची वाघीण अशी प्रतिमा असलेल्या रुपाली पाटील अजितदादा गटात येऊन अनेक वर्षे झाली पण त्यांच्या ही पदरी निराशाच पडल्याचा समीक्षकांचा दावा आहे. एकीकडे भाजपा च्या विद्यमान आमदारांच्या बद्दल असलेली नाराजी त्यात संजय काकडे यांना कायमच २ हात दूर ठेवणारी राजनीती आता निवडणुकीत मतदारांच्या करवी आपले रंग निश्चित दाखवेल असे म्हटले जाते आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे कायम काकडे यांचे समर्थक राहिले आहेत पण त्यांनी देखील आयत्या वेळी सोयीस्कर भूमिका घेतल्याची टीका होते आहे. एकूणच मराठा आणि बहुजन समाजाची भाजपा आणि आता अजितदादा गटाच्या बाबतीतली नाराजी देखील वाढत चालल्याचे चित्र आहे.या सर्वांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे आता मतदानापूर्वीच दिसणार आहे हे निश्चित .

निवडणुक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना बदलले; मग रश्मी शुक्लांना का हटवित नाही?

मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट.

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर आरोप करून रडीचा डाव खेळू नका, हिम्मत असेल तर आमने सामने लढा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
शिवालय येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष पराभवाच्या भितीने षडयंत्र करत आहेत. निवडणूक आयोग मोदीशाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. हे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. सरकारी योजनांची माहिती देण्याच्या नावाखाली राज्यात ५० हजार योजना दूतांना ५० हजार रुपयांवर नियुक्त केले असून हे योजनादूत भाजपा विचारांचे आहेत व ते भाजपाचा प्रचार करत आहेत. जनतेच्या पैशाने सुरु असलेला हा भाजपचा प्रचार तात्काळ बंद करा.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती व त्यांना दिलेली मुदतवाढ ही असंवैधानिक व बेकायदेशीर आहे त्यांना हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली पण त्यांना बदलू शकत नाही असे आयोग सांगतो पण याच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी मात्र तिथल्या पोलीस महासंचालकांना बदलले. पश्चिम बंगाल व महाराष्ट्रासाठी वेगळे कायदे आहेत का, असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात मविआला जास्त मते पडली त्या मतदारसंघात साधारणपणे १० हजारावर मते कमी करण्याचे षडयंत्र सुरु आहे. भाजपा युती विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून फॉर्म–७ चा गैरवापर केला जात आहे म्हणून फॉर्म ७ घेणे बंद करा व पुन्हा असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्या. मतदार ओळखपत्रातही अनेक चुका आहेत. मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करावी, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे. निवडणुका जाहिर झाल्या त्यावेळी सरकारने काढलेले सर्व जीआर व महामंडळाच्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
शिवसेनेचे खा. अनिल देसाई यावेळी म्हणाले की, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरातच मतदान करु देण्याचा निर्णय योग्य आहे पण त्यात पारदर्शकता असली पाहिजे. हे मतदान होताना सर्व पक्षाचे बीएलए असल्याशिवाय मतदान घेऊ नये. जागरुकतेने मतदानाचा हक्क बजावावा, कोणाच्याही दबावाखाली मतदान होऊ नये. मुंबईत प्रत्येक मतदारसंघात ४५०० हजार असे ज्येष्ठ मतदार आहेत तर इतर शहरात ते ६ हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे हे मतदान योग्य पद्धतीने व पारदर्शक झाले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले की, फॉर्म नंबर ७ ऑनलाईन भरण्याची पद्धतच चुकीची आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातून ५ हजार मतदारांची हेराफेरी केली जात आहे. जिवंत असलेले मतदार मृत दाखवले आहेत. निवडणूक ज्या पद्धतीने राबविली जात आहे तेच मुळात संशयास्पद आहे. एका घरातील पाच माणसांची नावे वेगवेगळ्या मतदारसंघात दाखवली आहेत. मतदार यादीची प्रिंट अत्यंत खराब आहे, त्यात अनेक चुका आहेत. डीजिटल इंडिया म्हणता आणि साधी मतदारयादी सुद्धा स्वच्छ व सुबक छापता येत नाही असे आव्हाड म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विधानसभा विजय वडेट्टीवार, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी ऊर्फ पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आ. जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खा. अनिल देसाई, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांचा समावेश होता.

संवादिनी वादनातून उमटले बंदिशीचे बोल

पुणे : गायकी अंगाने सादर झालेल्या बंदिशी आणि विविध रागांनी परिपूर्ण संवादिनी वादनाने रसिकांची सायंकाळ सुरांच्या वर्षावात चिंब झाली. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे अंतर्गत असलेल्या संवादिनी प्रेमी मंडळातर्फे (सप्रेम) आयोजित संवादिनी वादनाच्या विशेष मैफलीचे.
या मैफलीत गोवा येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित राया कोरगावकर आणि बंगळुरू येथील सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित रवींद्र कातोटी यांचे एकल संवादिनी वादन झाले. कार्यक्रमाचे आयोजन गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक संजय चितळे यांच्यासह गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परीणिता मराठे, विश्वस्त अच्युत मेढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संवादिनी वादन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या मैफलीत आवर्जून उपस्थिती लावली.
मैफलीची सुरुवात राया कोरगावकर यांनी राग गावतीमधील पंडित रामाश्रय झा यांनी रचलेल्या ‌‘आस लागी तुम्हारे चरण‌’ आणि ‌‘हमरी पार करो साई झांझरी नैय्या‌’ या बंदिशी गायकी अंगाने सादर करून केल्या. संवादिनीतून फक्त सुरच नव्हे तर शब्दही उमटतात हे ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर राया कोरगावकर यांनी स्वत: रचना केलेला आडाचौताल रागातील तराणा अतिशय प्रभावीपणे सादर केला. ठुमरी वादनाने कोरगावकर यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. त्यांना गोवा येथील तुकाराम गोवेकर (तबला), सुनाद कोरगावकर (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित रवींद्र कातोटी यांनी मैफलीची सुरुवात श्याम कल्याण राग ऐकवून केली. रागाचा विस्तार त्यातील बारकावे संवादिनी वादनातून सहजपणे उलगडून दाखवित कातोटी यांनी रसिकांची वाहवा मिळवली. राग जयजयवंतीचे बहारदार सादरीकरण रसिकांना विशेष भावले. पुरंदरदास यांच्या कर्नाटकी रागसंगीतात स्वरबद्ध केलेल्या रचनेचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित स्वरार्थ सादर करून पंडित कातोटी यांनी रसिकांना मोहित केले. पंडित कातोटी यांनी आपल्या मैफलीची सांगता सुरेल भैरवी वादनाने केली. ऋषिकेश जगताप (तबला) तर तेजस कातोटी (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार संजय चितळे, अच्युत मेढेकर यांनी केला. कलाकारांची ओळख व निवेदन पंडित प्रमोद मराठे यांनी केले तर संजय चितळे यांचा सन्मान प्रसिद्ध संवादिनी वादक सुधीर नायक यांनी केला.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले मोरगावच्या श्री मयुरेश्वर गणपतीचं दर्शन

मोरगाव दि.१७: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वराचे दर्शन घेऊन श्रींची विधिवत पूजा करत महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. तसेच गणपतींची आरती करून श्रीफळांचे तोरण अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थानच्या वतीने महावस्त्र व श्री मयुरेश्वर यांची प्रतिमा देऊन डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेहलम जोशी, सुरेंद्र जेवरे शिवसेना जिल्हाप्रमुख यांसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी या सर्वांना सुरक्षित आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी प्रार्थना केली. तसेच मयुरेश्वराने याआधी अनेक संकल्प पूर्ण केलेले आहेत जे राहिले आहेत ते देखील लवकरच पूर्ण व्हावेत अशी गणराया चरणी प्रार्थना केली. याखेरीज राज्याच्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनतेने निवडणूक आयोगाला सहकार्य करावे. निवडणूक आयोगाने देखील नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळण्यासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

बोपदेव घाटातील अंधाराची अन उजेडाची डॉ. नीलम गोऱ्हेंनी केली पाहणी

आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा

पुणे दि.१७: बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. तसेच भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीसांना सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे असून याबाबत ऊर्जा विभाग, महापालिके आणि पोलीस विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील चौकीत असणाऱ्या पोलिसांकरिता मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविणे यांकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेले दहा पोलिसांचे गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.

गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार शनिवारी

पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) रंगणार आहे.
अंतिम फेरी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजेपासून डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होणार आहे. उपउपांत्य फेरीसाठी महिला गटात 11 स्पर्धकांची तर पुरुष गटात 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. उपउपांत्य फेरीतील स्पर्धकांचे सादरीकरण गुरुवारी झाले. त्यातून उपांत्य फेरीसाठी प्रत्येक गटातून सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पद्मश्री पंडित सतिश व्यास, पंडित सुहास व्यास, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी देवकी पंडित यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

महिला गटात निवड झालेले स्पर्धक : आद्या मुखर्जी, सोमदत्ता चॅटर्जी, युगंधरा केचे, नंदिनी गायकवाड, स्वाती तिवारी, तेजस्विनी वेर्णेकर

पुरुष गटात निवड झालेले स्पर्धक : इशान घोष, अथर्व वैरागकर, ऋषिकेश करमरकर, मेहेर परळीकर, दर्शन मेलमंकी, चैतन्य परब

पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण मान्यवर परीक्षकांच्या हस्ते होणार आहे.
देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या गुणीदास बंदिश स्पर्धेतील सादरीकरण रसिकांसाठी खुले असून पुण्यातील संगीतप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सीमेवरील जिल्ह्यांनी आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतूकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे: पुणे जिल्ह्यासह सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यांनी आपापल्या चेक पोस्टवर आचारसंहितेच्या कालावधीत संशयीत वाहतुकीवर कडक नजर ठेवून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केल्या.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, सातारा व रायगड या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. दिवसे बोलत होते.

पुणे जिल्ह्याच्या संदर्भात डॉ. दिवसे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके (चेक पोस्ट) लावण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा ते लावण्यात यावेत. तसेच आवश्यकतेनुसार चेक पोस्टची जागा बदलण्यात यावी. चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे, छायाचित्रीकरण अनिवार्य करावे. येणारी वाहने ज्या जिल्ह्यात प्रवेश करतील त्या जिल्ह्यातील चेक पोस्टवर तपासणी करून संबंधित चेक पोस्ट ने अंतिम कारवाई करणे अपेक्षित आहे.

पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट, भोर परिसरातील पश्चिम भागात छुप्या रस्त्याने अंमली पदार्थ, गावठी दारूची वाहतूक होऊ नये यासाठी वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच जल, वायू या मार्गानेदेखील वाहतूक होऊ नये यासाठी तपासणीच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुणे जिल्ह्यात 204 मावळ, 199 दौंड, 200 इंदापूर, 201 बारामती, 195 जुन्नर व 198 शिरूर या विधानसभा मतदारसंघाची हद्द शेजारील रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा व ठाणे या जिल्ह्याशी जोडलेली आहे.
0000