Home Blog Page 629

महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘स्व’ चा पुरस्कार करा- डॉ. विनय सहस्रबुद्धे

  • आयबीसी, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकाउंट्स’ संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र व्हिजन २०४७’ कार्यक्रम
  • लोकप्रियतेपेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे मोदी सरकार

पिंपरी, पुणे (दि. २३ ऑक्टोबर २०२४) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वराज्य, स्वदेश, स्व भूषा, स्व भाषा, स्व संस्कृती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. आता सर्व नागरिकांनी सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
इंडियन बिझनेस कौन्सिल, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकौंटंट आणि कंपनी सेक्रेटरी संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र व्हिजन – २०४७’ या संवाद कार्यक्रमाचे आयोजन ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी उपस्थित यांची संवाद साधला व अखेरच्या टप्प्यात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. व्यासपीठावर वरिष्ठ चार्टर्ड अकौंटंट नंदकिशोर लाहोटी, उद्योजक मनोज फुटाणे उपस्थित होते.
महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठे योगदान दिले आहे. तसेच राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये येथील उद्योगांचाही मोठा वाटा आहे. ज्याचा फायदा आर्थिक आणि सामाजिक आघाडीवर झालेला आहे. प्रगतीपथावर जात असताना विकासाला चालना देणारे सरकार आवश्यक असते २०१४ नंतर भारताच्या विकासाला आणि प्रगतीला भरपूर चालना मिळाली आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प उभे राहिले आहेत तर काही प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताचा दबदबा वाढला आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायलाच पाहिजे. महायुतीच्या नेतृत्वात सध्या राज्यात शेती, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे हे त्यांनी आकडेवारीसह मांडले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रात गतिमान सरकार असल्याने राज्यात डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे, राज्यातील सरकारने सर्वच क्षेत्रात चांगले काम केले असून अनेक विकासाभिमुख प्रकल्प, योजना सुरू आहेत त्यामुळेच विकासाला चालना देण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हे धोरण महत्त्वाचे आहे, असे डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले.
भारताने संघराज्य व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. देशांमध्ये ठराविक कालावधीनंतर निवडणुका होत असतात‌‌. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असा कार्यक्रम चालू असतो. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मनुष्यबळ खर्ची पडते. याबाबत विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक निवडणूक’ अशी संकल्पना मांडली आहे. यावर राजकीय पक्षांबरोबरच सर्वसामान्यांनीही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आर्थिक आणि मनुष्यबळावर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येईल. हे देशाच्या दृष्टीने फायद्याचे आहे, असे मत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राहुल चिंचोलकर यांनी मानले. या कार्यक्रमास इंडियन बिझनेस कौन्सिल, पिंपरी चिंचवड चार्टर्ड अकौंटंट आणि कंपनी सेक्रेटर सदस्य, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.


सामाजिक ऐक्य आवश्यक –
जातीपातीतील द्वेष संपवून आपली ओळख, सभ्यता, हिंदुत्व, संस्कृती, नीती टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. हे टिकवून ठेवणाऱ्या तसेच महिला सक्षमीकरण, उद्योगाला चालना देणाऱ्या व संविधानाला अभिप्रेत सामाजिक ऐक्याचा पुरस्कार करणाऱ्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे. हे सरकार लोकप्रियतेपेक्षा लोकहिताला प्राधान्य देणारे सरकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा

सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत अल्पसंख्याकांसह सर्व धर्म प्रतिनिधींची भूमिका

पिंपरी, पुणे (दि. २३ ऑक्टोबर २०२४) मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आगामी विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत घेण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बिशप सॅम्युअल साखरपेरकर, पास्टर नितीन काळे, शौल विश्वास कांबळे आदींसह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासात पिंपरी चिंचवड कामगार नगरीचे उल्लेखनीय योगदान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी राखीव मतदार संघातून नवीन, सुशिक्षित युवकाला संधी मिळावी अशी मागणी या सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत करण्यात आली. यामध्ये पैलवान दीपक सौदागर रोकडे या सुशिक्षित व स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या उमेदवाराला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
पैलवान दीपक रोकडे हे विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट, महिला बचत गट यांच्याशी उत्तम समन्वय व संपर्क साधून आहेत. युवकांमध्ये सामाजिक प्रबोधन व्हावे त्यांनी व्यसनापासून दूर राहावे, यासाठी रोकडे यांनी डॉ. अनिल अवचट यांच्या संस्थेच्या माध्यमातून पिंपरी, आकुर्डीतील विविध महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती, जनजागृती शिबिर आयोजित केली आहेत. आपले सण, उत्सव, संस्कृती याची जपवणूक व्हावी व बालवयातच याविषयी विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत, म्हणून विविध शाळांमधून बालसंस्कार शिबिरे, किल्ले बनवा स्पर्धा असे उपक्रम शिव वंदना ग्रुपच्या वतीने आयोजित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच फुले, शाहू, आंबेडकर जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन रोकडे यांनी केले आहे. भारत विकास परिषदेच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच शिवकालीन मर्दानी खेळांना प्रोत्साहन देत युवक, युवतीचे सक्षमीकरण करीत समाज प्रबोधन करण्याचे उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत. महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी या उद्देशाने महिला बचत गटांना सण, उत्सव काळात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देऊन त्यांना मदत व प्रोत्साहन दिले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा उत्तम संपर्क आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक, तुळापूर ते पिंपरी पर्यंत शक्ती शौर्य ज्योत यात्रा काढून त्यांनी युवक संघटन उभारले आहे. शिवजयंती, तथागत गौतम बुद्ध जयंती ते महात्मा जोतीराव फुले जयंती या काळात नवभारत युवक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.
पैलवान दीपक सौदागर रोकडे हे बूस्ट एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच निसर्गधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष आहेत. दीपक रोकडे यांची जन्मभूमी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर असून कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे. स्वच्छ चारित्र्य आणि आश्वासक नेतृत्व म्हणून उच्चशिक्षित दीपक रोकडे यांना महाविकास आघाडीने पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असे आवाहन खासदार शरदचंद्र पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

ज्योतिष वास्तुविद्या शास्त्राचा व्यापक प्रसार ही काळाची गरज-ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर

ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्रातर्फे पुरस्कार वितरण आणि पदवी प्रदान समारंभ उत्साहात
पुणे : ज्योतिष आणि वास्तुविद्या हे विज्ञान नाही किंवा त्याला कोणताही ठोस आधार नाही, हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. ज्योतिष वास्तुविद्या शास्त्र विज्ञानाला धरूनच असून दैनंदिन जीवनात त्याची आवश्यकता आहे. या शास्त्राचा व्यापक प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्याची आज आवश्यकता असल्याचे मत ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांनी व्यक्त केले.
ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्रातर्फे आयोजित पुरस्कार वितरण आणि पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. पुण्यातील पद्मावती भागातील विणकर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ज्योतिष शास्त्रातील भरीव योगदानासाठी रत्नमाला रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते अनिल चांदवडकर यांना रत्नमाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ॲड. सुनिता पागे यांनी संस्थेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यावेळी उपस्थित होते.  उमेश कुलकर्णी म्हणाले, वास्तुशास्त्र चार भिंतीचे शास्त्र नसून वास्तुशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. आपण लाखो, करोडो रुपयांचे घर विकत घेऊन समस्या विकत घेतो. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक लाख वास्तुतज्ञ घडवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या शास्त्राचा उपयोग करून आपले जीवन सुखी, निरोगी, आनंदी बनविण्यासाठी प्रत्येकाने हे शास्त्र शिकणे गरजेचे आहे. अथर्ववेदाचे उपवेद असलेल्या स्थापत्यशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राचा समावेश होतो. त्यामुळे वैदिक संस्कृती वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा उचित सन्मान व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लेखिका प्रिया मालवणकर शारदा पुरस्कार, ज्योतिष व काव्य पुस्तक लिखाणासाठी अंजली पोतदार यांना अक्षरलक्ष्मी पुरस्कार, वेदमूर्ती अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ, उज्वला संख्ये यांना वास्तु विशारद, सागर घोडेराव यांना वास्तुभूषण, महेश कुलकर्णी यांना लोलक विशारद, सिद्धांत ओझरकर यांना अंक विशारद तर नितीन पेंडसे, श्रुती पिसे यांना वास्तुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रिया मालवणकर, अनिरुद्ध इनामदार व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्र, ज्योतिष, लोलक विद्या यांमुळे आपल्या जीवनात कसे परिवर्तन झाले तसेच, आपल्या मार्गदर्शनाने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातही झालेल्या अमुलाग्र बदलांची माहिती उपस्थितांना दिली. त्यातून या शास्त्रांचा उपयोग जीवनातील समस्या सोडविण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे पटवून दिले. त्यामुळे या शास्त्रांचे महत्त्व किती मोठे आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आले.

वास्तूशास्त्राचा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रासह देशभरातील तसेच परदेशातील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची परांजपे यांनी केले. कार्यक्रमाची  सांगता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वास्तूचे प्रात्यक्षिक करवून पसायदानाने करण्यात आली.

दिवाळी सरंजाम भेटीच्या जोरदार कार्यक्रमाने गहिवले ग्रामस्थ

पुणे : दहा वर्षांपूर्वी डोंगर कोसळून संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच दरड कोसळण्याची भिती उराशी बाळगून पुनर्वसनाची वाट पाहत जीवन व्यथीत करणाऱ्या माळीणच्या पसारवाडी आणि उंडेवाडी या वाड्यांमध्ये यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानची दिवाळी भेट स्विकारताना, ”आमच्या पिढ्यांनी अशी दिवाळी अनुभवली नाही”, अशी भावूक प्रतिक्रिया वयोवृद्धांनी व्यक्त केली.

दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता. २०) डिंभे धरणाच्या कुशीत वसलेल्या पसारवाडी, उंडेवाडी (ता. आंबेगाव) या दुर्गम गावातील ३० आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, दोन महिन्याचा किराणा व नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.

गावातील ३० कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक ५३ वस्तूंसह तीनशे वह्या, ४०० पुस्तके, ३० कंपास, ३० दप्तरे, वाटप करण्यात केले. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्या उजळून निघणार आहेत. गावातील ५० महिलांना साड्या, ४० मुलामुलींना, तसेच १४ ज्येष्ठ नागरिक, ३२ पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांच्या स्मृती जागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मृती स्तंभाला फुलांची आरास करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावात पोचताच गावकऱ्यांनी ढोल, झांज, लेझीम वाजवत पारंपरिक नृत्य करत मिरवणुकीने सर्वांचे स्वागत केले. गावकऱ्यांनी पुणेकरांच्या स्वागतासाठी पानाफुलांच्या मदतीने स्वागत कमान उभारली. घरोघरी रांगोळ्या काढून आकाश कंदील लावण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, विजया पोतदार यांनी आजी-आजोबांचे औक्षण केले.

‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे गणेश काळे, अमोल कुटे, स्वाती सेठ, श्रीकांत मोरे, रविंद्र पठारे, अॅड. प्रमोद पवार, कविता शिंदे, संजय ऐलवाड, सुनिल जगताप, माधवी येलारपूरकर, निलेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमासाठी माजी आमदार प्रकाश देवळे, श्रीप्रसाद गिरी, रवि जाधव, राजूशेठ गिरे, अॅड. शिवराज कदम, नितीन शहा, प्रकाश जाधव, संतोष कस्पटे, सचिन झेंडे, सुरेश मांदळे, विनायक अवसरे, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, प्रशांत पेंडसे, सिद्धेश जाधव, त्याच बरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, सुनंदा मोरे, अपर्णा शेठ, नीलम खंडागळे, योगिणी परदेशी, रेष्मा मोरे, पूनम देशमुख, श्रृती जाधव, समृद्घी सेठ, सलोनी सेठ, सखी ग्रुप, आधार ग्रुप आदींनी सहकार्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 उमेदवारांची घोषणा; बारामतीमधून अजित पवार,हडपसर मधून चेतन तुपे पाटलांना उमेदवारी

या यादीमध्ये नवाब मलीक आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही

येवल्यातून छगन भुजबळ,तर परळीत धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात, आंबेगाव मधून दिलीप वळसे पा.,पिंपरीत अण्णा बनसोडे तर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती बारामती विधानसभा मतदारसंघाची. आता अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून एनसीपीचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली. याबरोबरच येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या या यादीमध्ये नवाब मलीक आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही. तर विद्यमान आमदार आणि मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा येवला मतदार संघातून निवणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वास्तविक राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील वाद समोर आला होता. त्यामुळे आता या मतदार संघातून भुजबळ यांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असेल. तर दुसरीकडे राज्यातील विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

इन्कम टॅक्सरेड ने भाजपा बॅकफुट वर..भाजपमध्येच नाराजी

पैलवान कटके यांच्यावरील इन्कम टॅक्स रेडने निश्चित अन्य बंडखोरांना चाप बसला असेल…पण या रेड चे परिणाम मतदानात दिसणार नाहीतच असा दावा कोणी करू शकणार नाही.विरोधात जाणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा चेहरा पुण्यातून सामान्य कार्यकर्त्याला हि दिसल्याने तो आता हबकला आहे.भले तो राहील पक्षात,पण पक्षाचे काम मनापासून करेल कि वरवर दिसण्या पुरते करेल हा खरा प्रश्न आहे. इच्छुक असले तरी डोक्यात हवा कोणी भरल्याने अमोल बालवडकर यांनी चंद्रकांतदादांना ज्या शब्दात आव्हान द्यायला नको होते त्या शब्दात दिले…बालवडकर चुकलेच ..पण ते चुकले म्हणून पक्षाने आणखी मोठी चूक करायची काय ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला तर नवल वाटणार नाही. एकूणच कोथरूड मधील विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नगरसेवक पदाच्या काळात काहीच काम केले नाही आणि त्यांचा जन संपर्कच नाही असाही दावा कोणी करू शकणार नाही.आणि ते शांत बसले.एवढेच नव्हे तर राजकारणातून जरी बाहेर पडले तरी या इन्कम टॅक्स रेडचा विचार कार्यकर्ता आणि मतदार या दोहोंच्या स्तरावर झाल्याशिवाय राहणार नाही.

पुणे- कोथरूड तसा भाजपचा बालेकिल्ला,गेल्या विधानसभेला अगदी मुरलीधर मोहोळ,मेधा कुलकर्णी सारख्या नेत्यांना डावलून इथे पक्ष श्रेष्ठींनी कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांना उमेदवारी दिली. रुसत फुगत का होईना काहींनी दादांचे तेव्हाही काम केले आणि काहींनी तेव्हा तर केले पण ५ वर्षे हिरारीने दादांची सोबत करत त्यांना कणखर साथ दिली.आणि दादा पुणेकरच नाही तर कोथरुडकर देखील बनले. पण दुर्दैवाने आज त्यातील कितीजण चंद्रकांत पाटलांच्या बरोबर होते त्याच उत्साहात आहेत ? असा प्रश्न विचारावा लागेल. कोथरूड मधून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळणार होती हे निश्चितच होते.मोहोळ यांना महापालिकेतील ५ हि वर्षे स्थायी समिती आणि महापौर पदावर सत्ता गाजविता आली त्यानंतर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना राज्यसभा देण्यात आली. पुन्हा मोहोळ यांना लोकसभा देऊन त्यांनाही खासदारकी आणि केंद्रात मंत्रीपद दिले गेले.मोहोळ यांची झपाट्याने झालेली प्रगती पाहून अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित होणे यात नवल कसले ? त्या प्रमाणे अनेकांनी मोहोळ यांना मंत्रीपद मिळाल्यावर आपल्याला विधान परिषद मिळावी, विधानसभा मिळावी म्हणून प्रयत्न केले पण भाजपकडे मोजक्या जागा होत्या.आणि विद्यामानानी त्या अगोदरच अडवून ठेवल्या होत्या या पार्श्वभूमीवर आता आम्हालाही संधी द्या म्हणून हटवादी भूमिका कोणी घेणे यातही फारसे नवल नाही पण त्यांना सांभाळणे,योग्य पद्धतीने प्रवाहात घेऊन समजूत काढणे न प्रदेशाध्यक्षांना जमले ना खुद्द चंद्रकांत पाटलांना जमले.आणि मग आयकर विभागाने मारली रेड…

इथे आणखी मोठी चूक झाली,स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि विद्यामानाना आव्हान देणाऱ्यांना हा मोठा इशारा जरी ठरला. तरी याच इशाऱ्याने कार्यकर्त्याची पक्षावरील श्रद्धा आणि निष्ठा आता ढळू लागली आहे. एवढेच नव्हे तर पक्षाच्या मतदारांनाही हि बाब फारशी आवडणारी नाही.आणि म्हणूनच पुण्यात या निवडणुकीत इन्कम टॅक्स रेड ने भाजपा बॅकफुट वर..गेली तर नवल वाटणार नाही. आता मतदान होईपर्यंत तसा पक्षाला वेळ आहेच.मतदानापूर्वीच पैलवान कटके यांच्या आयकर कारवाईची तपशील जो असेल तो जाहीर करणे मतदारांच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे अन्यथा हि निव्वळ झाकी होती असे मानयला कोणी नाही म्हणार नाही आणि बालवडकर आणि त्यांच्यासारखे अन्य इच्छुक यांचे पुनर्वसन करत त्यांची समजूत काढणे हेही पक्षापुढे आव्हान असणार आहेच.ठराविक व्यक्तींना सारे काही आणि काहींना वर्षानवर्षे काहीच नाही,आणि आवाज उठवला तर कारवाई हि पक्षाची होत चाललेली प्रतिमा या निवडणुकीत पक्षाला हानिकारक ठरू शकते याचा विचार नेत्यांनी केलेला नसावाहे आश्चर्यकारक आहे.

विद्यमान आमदार सुनील टिंगरेंच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यास विलंब:सस्पेन्स वाढला

मुळीकांना उमेदवारी दिली तर पठारेंचा विजय सहज सोपा

 पुणे  :’पोर्शे प्रकरणात करायला गेले एक अन झाले एक ‘ यामुळे आमदार बॅकफुटवर गेलेले दिसताच त्या संधीचा फायदा जरी भाजपने घेतला आणि मुळीकांना उमेदवारी दिली तरी मुळीकांना तर आपण लीलया लोळवू असे विधान शरद पवार गटाचे बापू पठारे यांनी माय मराठी शी बोलताना केले आहे. दरम्यान टिंगरे कि मुळीक या वादातच अडकून राहिलेल्या वडगावशेरी मतदार संघात महायुतीला आता फारच कमी अवधी मिळणार असल्याचे दिसते आहे जो त्यांच्या विजया पर्यंत पोहोचण्यास धोकादायी ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वडगावशेरी मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती मधील भारतिय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन  प्रमुख पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 99 जणांना उमेदवारी जाहीर केली, मात्र या यादीत पुण्यातील तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे नाहीत, यामुळे या तीनही मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यातच वडगाव शेरीच्या जागेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे या मतदारसंघात सस्पेन्स वाढला आहे. 

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान आमद़ार सुनील टिंगरे आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यात जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा प्रवेश झाला आहे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र शिवसेना ठाकरे गट या जागेबाबत आग्रही आहे. महायुती कडून इच्छुक असलेले आजी – माजी आमदार आपल्या मतांवर ठाम असल्याने मुळीक जर रिंगणात उतरले तरी शरद पवारांच्या बापू पठारेंना निवडणूक अवघड जाणारी नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे

महायुतीमध्ये वडगावशेरीची जागा अजित पवार गटाला जाणार असल्याचे संकेत आहेत. अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचे टिंगरे सांगत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून आपली उमेदवारी पक्की असल्याचे मुळीक सांगत आहेत. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना ए, बी फॉर्म दिल्याची चर्चा सोमवारी रंगली असली तरी अधिकृत उमेदवार यादी राष्ट्रवादी कडून जाहीर झालेली नाही. यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ महायुती मध्ये नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला गेला याचा सस्पेन्स कायम आहे. 

गुजरातेत कशात नाही मिलावट..५ वर्षे सुरु असणारे संपूर्ण न्यायालयच निघाले बनावट..

अहमदाबाद-छत्तीसगडमध्ये ‘एसबीआय’च्या बनावट शाखेचा भंडाफोड झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघड झाला होता. आता तर गुजरातेत बनावट न्यायालयाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हुबेहुब न्यायालयासारखे वातावरण, आदेश पारित करणारे न्यायाधीश, फरक एवढाच की हे खरेखुरे न्यायालय नव्हते तर न्यायालयापासून न्यायाधीशापर्यंत सर्व काही बनावट, सर्वसामान्यांसह प्रशासन, पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकत हे न्यायालय पाच वर्षे सुरू होते. हे विशेष.
या बनावट न्यायालयातील बनावट न्यायाधीशांचे मॉरिस सॅम्युएल ख्रिश्चन असेनाव असून त्याने २०१९ मध्ये सरकारी जमिनीबाबतचा निर्णय आपल्या अशिताच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यावरून हे बनावट न्यायालय गेली पाच वर्षे सुरू असल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मॉरिस खिश्चन अहमदाबादेतील दिवाणी न्यायालयात जमिनीसंदर्भातील खटले प्रलंबित असणाऱ्या पक्षकारांना हेरून आपल्या जाळ्यात ओढायचा. खटला निकाली काढण्यासाठी तो अशिलांकडून शुल्कही घ्यायचा. सुरुवातीला त्याने आपली न्यायालयाने अधिकृतरीत्या मध्यस्थी म्हणून नियुक्ती केल्याचेही सांगितले. त्यानंतर गांधीनगरमधील हुबेहुब न्यायालयासारखी रचना केलेल्याकार्यालयातही अशिलांना बोलाविण्यास सुरुवात केली. त्यानंतर न्यायाठ्याचा पीठासीन अधिकारी म्हणून अशिलांच्या बाजूने निर्णय देण्यासही सुरुवात केली. न्यायालयीन प्रक्रिया आणि सुनावणी खरीखुरी वाटावी म्हणून त्याचे साथीदार न्यायाठ्याचे कर्मचारी म्हणून उपस्थित असतं.
दिवाणी न्यायालयाच्या निबंधकांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या बनावट न्यायालयाचा पोलिस तपासात भांडाफोड झाला. पोलिसांनी आरोपी ख्रिश्चनला लवादाचा न्यायाधीश असल्याचे भासवून न्यायालयाने मध्यस्थी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली.
खिश्वन याने २०१९ मध्ये हीच मोडस ऑपरेंडी वापरत शासकीय जमिनीच्या खटल्यात बनावट आदेश पारित केला होता. हे प्रकरण जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीतील सरकारी जमिनीशी संबंधित होते. खिश्वनच्या अशिलाने जमिनीवर दावा केला होता. त्यानंतर बनावट न्यायालयात सुनावणी घेत जमिनीच्या रेकॉर्डवर अशिलाचे नाव लावण्याचा आदेश पारित केला होता. एवढेच नव्हे, व अंमलबजावणीसाठी दिवाणी न्यायालयान वकिलामार्फत त्याने बनावट आदेशाची प्रतही जोडली होती. मात्र, हा खऱ्या न्यायाधीशांचा आदेश नसून दिवाणी न्यायालयाने खिश्चनची मध्यस्थ म्हणू नियुक्ती केली नसल्याचेही निबंधकाच्य निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर: शिंदे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून लढणार

मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

महायुतीमधील भाजप पक्षाने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली होती. तसेच अजित पवारांनी देखील काही उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे आता जागावाटपावरील मतभेद निवळण्यास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. काही जागांवर महायुतीमध्ये मतभेद होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जागा त्याग करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपने दावा सांगितला आहे.

माहिममधून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे.

राजापूर – किरण सामंत , उदय सामंत यांच्या बंधूंना संधी

पैठण – खासदार संदिपन भुमरे यांच्या मुलाला विलास भुमरे यांना तिकिट

एंरडोल – माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील

शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी

  1. एकनाथ शिंदे – कोपची पाचपाखाडी
  2. साक्री – मंजुळा गावीत
  3. चोपडा – चंद्रकांत सोनवणे
  4. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
  5. पाचोरा – किशोर पाटील
  6. एरंडोल – अमोल पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा – संजय गायकवाड
  9. मेहकर – संजय रायमुलकर
  10. दर्यापूर – अभिजीत अडसूळ
  11. आशिष जयस्वाल – रामटेक
  12. भंडारा – नरेंद्र भोंडेकर
  13. दिग्रस – संजय राठोड
  14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
  15. 15.कळमनुरी – संतोष बांगर
  16. जालना – अर्जुन खोतकर
    17.सिल्लोड – अब्दुल सत्तार
    18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
  17. छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
  18. पैठण – रमेश भूमरे

21.वैजापूर – रमेश बोरनारे
22.नांदगाव – सुहास कांदे

  1. मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
  2. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
  3. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
  4. जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
  5. चांदिवली – दिलीप लांडे
  6. कुर्ला – मंगेश कुडाळकर
  7. माहीम – सदा सरवणकर
  8. भायखळा – यामिनी जाधव
  9. कर्जत महेंद्र थोरवे
  10. अलिबाग – महेंद्र दळवी
  11. महाड – भरत गोगावले
  12. उमरगा – ज्ञानराज चौगुले
  13. सांगोला – शहाजीबापू पाटील
  14. कोरेगाव – महेश शिंदे
  15. परांडा – तानाजी सावंत
  16. पाटण – शंभूराज देसाई
  17. दापोली – योगेश कदम
  18. रत्नागिरी – उदय सामंत
  19. राजापूर – किरण सामंत
  20. सावंतवाडी – दीपक केसरकर
  21. राधानगरी – प्रकाश आबिटकर
  22. करवीर – चंद्रदीप नरके
  23. खानापूर – सुहास बाबर

खडी मशीन चौक ते कात्रज सुप्रिया सुळेंनी अनुभवला रस्त्यावरच पाण्याचा महासागर

पुणे- रात्री साडेदहा वाजता पुण्याला बोपदेव घाटातून येताना खासदार सुप्रिया सुळे यांना खडी मशीन चौक ते कात्रज दरम्यानच्या रस्त्याचे अकराल विक्राळ स्वरूप दिसले . अल्प काळ झालेल्या पावसाने या रस्त्यांना कसे महासागराचे रूप प्राप्त झाले ते त्यांनी याची देही याची डोळा अनुभवले , आणि दुचाकीस्वारांची अशा रस्त्यांवरून होणारी जीवघेणी कसरत देखील पाहिली . पण महापालिकेच्या प्रशासकाला काही त्यांनी शिव्या घातल्या नाहीत … पुण्याच्या या अवस्थेबाबत त्यांनी दुखः आणि खंत मात्र व्यक्त केली .

मनसे कडून हडपसरला साईनाथ बाबर,कोथरूडला किशोर शिंदे तर खडकवासल्यात मयुरेश रमेश वांजळे

पुणे- मनसे कडून विधानसभेसाठी हडपसरला साईनाथ बाबर,कोथरूडला किशोर शिंदे तर खडकवासल्यात मयुरेश रमेश वांजळे उमेदवारी जाहीर झाली असून आज एकूण ४५ उमेदवारांची नावे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी घोषित केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधी बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमवारी मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत रंगणार आहे.दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. काही उमदेवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर कोणत्याही पक्षाला देणार नसल्याचे राज ठाकरे यांनी मागेच जाहीर केले. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाच्या विधानसभेला महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती या तीन मोठ्या आघाड्या असून इतर काही पक्ष एकटे लढत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

शिवडी – बाळा नांदगावकर
वणी – राजू उंबरकर
चंद्रपूर – मनदीप रोडे
राजुरा – सचिन भोयर
लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
हिंगोली – प्रमोद कुटे
पंढरपूर – दिलीप धोत्रे
कल्याण ग्रामीण – राजू पाटील
माहिम – अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम – शिरीष सावंत
वरळी – संदीप देशपांडे
ठाणे शहर – अविनाश जाधव
मुरबाड – संगीता चेंदवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर – साईनाथ बाबर
खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे
मागाठणे -नयन कदम
बोरिवली – कुणाल माईणकर
दहिसर – राजेश येरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सोवा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व – महेश फरकासे
गोरेगाव – विरेंद्र जाधव
चारकोप – दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
विक्रोळी – विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे
चेंबूर – माऊली थोरवे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
मानखुर्द शिवाजीनगर – जगदीश खांडेकर
ऐरोली – निलेश बाणखेले
बेलापूर – गजानन काळे
मुंब्रा कळवा – सुशांत सूर्यराव
नालासोपारा – विनोद मोरे
भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी
मीरा भाईंदर – संदीप राणे
शहापूर – हरिश्चंद्र खांडवी
गुहागर – प्रमोद गांधी
कर्जत जामखेड – रविंद्र कोठारी
आष्टी – कैलास दरेकर
गेवराई – मयुरी बाळासाहेब म्हस्के
औसा – शिवकुमार नागराळे
जळगाव शहर – अनुज पाटील
वरोरा – प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण – महादेव कोनगुरे
कागल – रोहन निर्मळ
तासगाव कवठे महांकाळ – वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा – संजय शेळके
हिंगणा – विजयराम किनकर
नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर उत्तर – परशुराम इंगळे

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 1 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करणार


देशभरातील 800 जिल्हे/शहरांमध्ये शिबिरांचे आयोजन, आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2024

निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. निवृत्तीवेतन  आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 1 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करणार असून देशभरातील 800 जिल्हे/शहरांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. विभागाने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भातील कार्यालयीन निवेदन जारी करून मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत.

ही मोहीम निवृत्तीवेतन वितरक बँका, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटना, संरक्षण खात्यांचे महानियंत्रक, दूरसंचार विभाग,  रेल्वे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांच्या हितासाठी आयोजित केली जाईल.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 2.0 नोव्हेंबर 2023 मध्ये देशभरातील 100 शहरांमध्ये 597 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, त्या अंतर्गत एकूण 1.47 कोटी डिजिटल जीवन प्रमाणपत्रे  तयार करण्यात आली, त्यापैकी 45.46 लाख इतके केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारक होते. फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा वापर करून 25.41 लाख डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्यात आली आणि 90 वर्षांवरील 30,500 पेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारकांनी त्याचा लाभ घेतला.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपल्या 1.8 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या विशाल नेटवर्कद्वारे 785 जिल्ह्यांमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक अगदी घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र वितरित करते. निवृत्तीवेतनधारकांची  निवृत्तीवेतन खाती वेगवेगळ्या बँकेत असली तरीही ही सुविधा देशभरातील सर्व श्रेणीतील निवृत्तीवेतनधारकांना लागू होईल. इंडिया पोस्ट पेमेंट बँके द्वारे “डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी घरोघरी सेवा” या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना  ippbonline.com वर तपशीलवार माहिती मिळू शकेल.  डिजिटल जीवन प्रमाणपत्र  निर्मितीसाठी वापरले जाणारे फिंगर बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्र अंतर्भूत असणारे मोबाईल फोन सर्व  पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांना देण्यात आले आहेत.निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या19 बँका, 150 शहरांमध्ये 750 हून अधिक ठिकाणी शिबिरे आयोजित करतील. वृद्ध/अपंग/आजारी निवृत्तीवेतनधारकांच्या  घरी/रुग्णालयांत जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या जातील, जेणेकरून त्यांन हयात असल्याचे प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सादर करणे सुलभ जाईल. या उपक्रमाचा उद्देश सर्व निवृत्तीवेतनधारकांना अशा  मोहिमेचा लाभ मिळावा हा आहे तसेच  विशेष करून अधिक वयोवृद्ध गटातील वरिष्ठ निवृत्तीवेतनधारकांसाठी हा उपक्रम अधिक उपयुक्त आहे.

आयपीपीबी आणि निवृत्ती वेतन वितरण करणाऱ्या बँकांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत डीओपीपीडब्ल्यूकडे नोंदणीकृत असलेल्या, 57 निवृत्ती वेतन कल्याणकारी संस्था, निवृत्तीवेतनधारकांना एकत्रित करून ही शिबिरे आयोजित करण्यात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

यंदाच्या वर्षी चेहऱ्यावरून ओळख पटविण्याच्या (फेस ऑथेंटिकेशन) तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यावर भर दिला जाईल. या मोहिमेसाठी  MeitY आणि UIDAI संपूर्ण तांत्रिक सहाय्य प्रदान करतील. वृद्ध निवृत्तीवेतन  धारकांसाठी फेस ऑथ अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यात आले आहे.

दूरदर्शन(DD),आकाशवाणी(AIR),आणि पत्र सूचना कार्यालय (PIB)  या मोहिमेला श्राव्य, दृक्श्राव्य आणि छापील प्रसिद्धी देऊन  पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.या  मोहिमेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी एसएमएस, ट्विट (#DLCCampaign3), प्रचारकाव्य आणि लघुपट सादर करत ही मोहीम सर्वदूर पोहोचण्यासाठी अधिक पूरक प्रयत्न केले जातील.

दिवाळी सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

पुणे, दि.२२ : दिवाळी सणानिमित्त पुणे शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठांमध्ये खरेदीकरीता ग्राहकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

याअंतर्गत शिवाजीनगरवरून शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स. गो. बर्वे चौकातून जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता- टिळक चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

स्वारगेटवरून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौक मार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रोडने एस. पी. कॉलेज अलका चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. ही वाहने बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

फुटका बुरूज वरून जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. त्यासाठी इच्छितस्थळी जाण्यासाठी शिवाजी रोडवरुन सरळ पुढे जाणारा पर्यायी मार्ग राहील. शनिपार चौकाकडून तसेच कुमठेकर रोडवरून मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. याकरिता पर्यायी मार्ग म्हणून बाजीराव रोडने सरळ पुढे जाता येईल.

पार्किंग व्यवस्था
दिवाळीसणानिमित्त बाजारपेठेत बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाबू गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ याठिकाणी पार्क करावीत, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी दिल्या आहेत.

महाविकास आघाडीतील वाद निवळला:बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुंबई-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील काही जागांवरून तिढा असून तो देखील आता निवळला असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे समजत आहे.

महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस 100 ते 105 जागांवर, शिवसेना 96 ते 100 जागांवर, तर शरद पवारांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 80 ते 85 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. तसेच मुंबईमधील बहुतांश भागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षातील वाद मिटला असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये शिवसेनेलाच जास्त जागा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाला 18 जागा, कॉंग्रेसला 14 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला केवळ 2 जागा मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, महाविकास आघाडीमधील जागावाटपावर आजच्या बैठकीनंतर शंभर टक्के तोडगा निघणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जागावाटपावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत, तिकडे महायुतीमध्ये तर जागेसाठी एकमेकांचे कपडे फाडणे सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

दोडकेंना बाळा धनकवडेंचे आव्हान – तापकीरांना नागपुरेंचे…खडकवासला चित्र स्पष्ट होण्यास विलंब

पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपा आणि भाजपा विरोधी आघाडी दोघेही उमेदवार देण्याबाबतच गॅसवर असल्याने येथील उमेदवार ठरविण्यास विलंब होत असल्याने खुद्द शरद पवार यांनी आज रात्री ११ वाजता मोदीबागेत उमेदवार निवडी साठी विचार विनिमय,चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलविली आहे सचिन दोडके कि बाळासाहेब धनकवडे याबाबतचा निर्णय याचवेळी होईल असे सूत्रांकडून समजते आहे.सुप्रिया सुळे,आणि अन्य नेते यावेळी प्रत्येक इच्छुकांशी संवाद साधतील असे समजते.दरम्यान येथील भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनीही आज मुंबई गाठली होती तर त्यांच्या उमेदवारीला शह देणाऱ्या मंजुषा नागपुरे यांनीही मुंबईत तळ ठोकला होता.उमेदवारीस उशीर होत असल्याचे तापकीर यांचे म्हणणे फडणवीस यांनी ऐकून घेतल्याचे वृत्त आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठीच भाजप ची 99 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली.या 99 जणांमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र खडकवासला मतदार संघातील विद्यमान आमदारांना भाजपने होल्डवर ठेवलं असल्यानं खडकवासल्यातील सस्पेन्स कायम आहे, या विधानसभा मतदारसंघात कोणाच्या गळ्यात विधानसभेची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती बरोबरच महाविकास आघाडी मध्ये तिढा कायम असून जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार हा सस्पेन्स कायम राहणार आहे.

महायुतीचा गट पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी महापौर दत्तात्रय धनकवडे निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या उठत आहेत.मात्र हि भाजपच्या वाट्याची जागा भाजपा सोडेल कशी हा साधा प्रश्न आहे. तरीही अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी आग्रही मागणी करणारे पत्र दत्तात्रय धनकवडे यांनी अजित पवारांना दिले आहे.माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) सचिन दोडके, बाळा धनकवडे, काका चव्हाण, यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघातून विकास दांगट यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. मागील चार सहा महिन्यांपासून त्यांनी गाठी भेटी आणि संवाद दौऱ्या तून विकास दांगट यांनी संपूर्ण खडकवासला मतदारसंघ पिंजून काढला आहे.