Home Blog Page 62

श्रावणी, अरविंदने पटकावला दुहेरी मुकुट

खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत योगासन स्पर्धेत दोन गटांत यश
पुणे, ता. ५ – श्रावणी रासकर, अरविंद सबावत यांनी केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांच्या पुढाकाराने होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवातील योगासन स्पर्धेत दोन गटांत बाजी मारून दुहेरी यश संपादन केले.
गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळ येथे ही स्पर्धा झाली. श्रावणीने पारंपरिक मुलींमध्ये एकेरीत आणि आर्टिस्टिक पेअरमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. अरविंदने पारंपरिक मुले आणि आर्टिस्टिक पेअरमध्ये बाजी मारली. विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
योगचे महत्त्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अधोरेखित केले आहे. आता योगासन या खेळाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही समावेश करण्यात आला आहे. या खेळाला उज्ज्वल भविष्य तर आहेच, शिवाय शारीरिक आणि मानसिक फायदेही खूप आहे. तेव्हा प्रत्येक शाळेतून या खेळाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.
निकाल –
पारंपरिक मुले – १४ ते २० वयोगट – अऱविंद सबावत, आय़ुष महतो, सूर्या मोहोळ, समर्थ खुले, आमव कोरडे.
पारंपरिक मुली – १४ ते २० वयोगट – श्रावणी रासकर, शरण्या देवकर, तस्मई अरगडे, रिया चोरडिया, अनुष्का कुलकर्णी
आर्टिस्टिक पेअऱ मुली – १४ ते २० वयोगट – श्रावणी रासकर-रिया चोरडिया, शरण्या देवकर-तस्मयी अरगडे, आसावरी शेळके-आर्या सातपुते, रुचा साथिया-इरा परांजपे, आर्या आनंद-शर्वरी खेडेकर.
आर्टिस्टिक पेअर मुले – १४ ते २० वयोगट –अरविंद सबाव-आय़ुष महतो, अर्चित वरगडे-संकल्प पाटील, सूर्या मोहळ-सक्षम गायकवाड.
१० ते १४ वयोगट : पारंपरिक मुली – निरल वाडेकर, अश्विका हिंगे, सोहा शहा, अदिती माने, अदिती तोरसकर.
पारंपरिक मुले – आदित्य शितोळे, लविंदरसिंग बसिन, रुद्र इंगळे, आदित्य कोंडे, तुषार दराडे.
आर्टिस्टिक पेअर – मुली : निरल वाडेकर-देलिषा, सान्वी-रिया, ऐशानी-अस्मी, अश्विका-सोहा, अदिती माने-अदिती तोरसकर.
मुले : अबीर जोशी-निधीश तरळकेर, आदित्य कोंडे-हिमांशू शिळिमकर, लविंदर-आदित्य शितोळे, शिवराज-प्रथमेश.

राजगुरूनगर बँकेचा शानदार विजय

सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन 

पुणे : राजगुरुनगर सहकारी बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेवर १७ धावांनी मात केली.  

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. राजगुरूनगर बँकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ३ बाद ९७ धावा केल्या. यात अनिकेत काहाने याने सर्वाधिक ३५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना प्रेरणा बँकेकडून तुकाराम शेळकेने अर्धशतक ठोकले. मात्र, त्याला इतरांची अपेक्षित साथ लाभली नाही. प्रेरणा बँकेला निर्धारित ८ षटकांत ४ बाद ८० धावाच करता आल्या. तुकारामचे अर्धशतक व्यर्थ ठरले.  

धावफलक
१) राजगुरूनगर सहकारी बँक – ८ षटकांत ३ बाद ९७ (अनिकेत कहाणे ३५, सागर नाईकनवरे १९, तुषार अरुडे १०, प्रवीण बेंडाळे २-२०, वैभव दसरे १-३४) वि. वि. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ४ बाद ८० (तुकाराम शेळके ५०, अभि होनराव २-१७, दीपक तनपुरे २-२०). सामनावीर –  अनिकेत कहाणे. 

२) विश्वेश्वर सहकारी बँक – ८ षटकांत २ बाद ७६ (मंदार धुमके ३२, श्रीकांत मारटकर २९, मंदार शेंडे १-१३, जय गवळी १-२१) वि. वि. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ४ बाद ६४ (उमेश नाबाद ३४, किशोर तुपे १३, श्रीकांत मारटकर १-६, राजेश कोलते १-१८). सामनावीर – श्रीकांत मारटकर. 

३) संपदा सहकारी बँक – ८ षटकांत ६ बाद ७४ (श्रेयस पाठक नाबाद ३४, भूषण शहारे १०, ऋषी पाटील २-९, श्रीकांत मारटकर १-१४, अतुल धुमाळ १-१२) वि. वि. विश्वेश्वर सहकारी बँक – ८ षटकांत ४ बाद ६७ (मंदार धुमके नाबाद ३८, श्रीकांत मारटकर १६, भूषण शहारे १-१८, श्रेयस पाठक १-७). सामनावीर – श्रेयस पाठक

४) धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत २ बाद ७३ (सचिन कडू नाबाद ३९, स्वप्नील शितोळे १४, सागर निरगुण १-२०) पराभूत वि. राजर्षि शाहू सहकारी बँक – ७.३ षटकांत ४ बाद ७४ (राहुल देशमाने १९, अजिंक्य खोपडे १७, रोहन बलकवडे १६, स्वप्नील शितोळे २-२६, सचिन कडू १-११). सामनावीर – रोहन बलकवडे. 

तळजाई माता मंदिरासमोर मॉंर्निंग वॉक करणाऱ्याची ४ लाखाची लुट,आंबेगावात अल्पवयीन मुलांनी केला खुनी हल्ला

पुणे- पुण्याचे प्रसिद्ध अशा तळजाई मंदिराच्या परिसरात मॉर्निंग किंवा सायंकालीन वॉक करायला जाताना दागिने घालून जाऊ नका असे आता सांगावे लागेल अशी स्थिती दिसते आहे . येथे सीसी टीव्ही कॅमेरे महापालिकेने बसवले होते पण ते सध्या आहेत कि नाहीत ? याचीही माहिती कोणाकडे नाही.सदू शिंदे मैदान, तळजाई माता मंदिर आणि तळजाई जंगल एकूणच व्यायामासाठी उत्कृष्ट पर्यावरणीय परिसर असल्याने येथे असंख्य लोक येत असतात . पण प्रचंड वेगाने वाहने पळविणाऱ्या टोळ्या आता येथे पुन्हा दिसू लागल्या आहेत . काल पहाटे सव्वा पाच वाजता सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी येथून तळजाई ला वॉकिंग साठी आलेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील चेन बाईक स्वारांनी जबरदस्तीने हिसकावून नेली . पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. फकीर, मो.नं. ८६६८७०००८९ हे या प्रकरणी तपास करत आहेत.
दुसर्या एका घटनेत काल आंबेगाव परिसरात एका २६ वर्षीय तरुणावर तिघा मुलांनी खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यापैकी
मृणाल दिपक जाधव, वय १९ वर्षे, रा. राज टॉवर फ्लॅट नं २ एफ विंग भाजी मंडई कात्रज पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील सी सी डीकॅफे समोर संबधित तरुण त्यांचा भाऊ आणि मित्रांसमवेत गप्पा मारत थांबलेले असताना या तिघांची गाडी त्यांच्या गाडीला धडकली असता तेव्हा ती पाहण्यासाठी गेले असताना यांना या तिघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली व लोखंडी हत्याराने वार करून जखमी केऋण लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी हत्याराने व डोक्यात बाटली मारुन जखमी केले. आणि त्यांच्याकडील लोखंडी हत्यार हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवून पळून गेले.सहा. पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी, मो.नं. ९८२२४३४५०० याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



“समाजाचे” “समाजाला” देण्याने मानसिक समाधान – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध संस्थांना वस्तू भेट !!

पुणे-आपल्याला जी संपत्ती,पद, प्रतिष्ठा मिळते ती समाजामुळे त्यामुळे समाजाने दिलेले समाजातील वंचित आणि गरजुंना दिल्याने मानसिक समाधान लाभते असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना 75 कॉफी मग,150 शाल, खेळणी व इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, दिव्यांगांसाठी 35 वर्षे काम करणाऱ्या सीमाताई दाबके,श्री. प्रतीक खर्डेकर,सौ. कल्याणी खर्डेकर,
साई सेवा मतिमंद निवासी शाळा शिवणे चे श्री. संदीप फरगडे, ज्ञान गंगोत्री मतिमंद निवासी शाळा आंबेगाव चे श्री. राजू नाईकवाडी, श्री. संतोष पोकळे,एनॅब्लेर चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र घावटे, अशोक बोत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या संस्कृतीत दानाचे महत्व खूप मोठे आहे, विशेषतः काही शुभ प्रसंगी दान दिल्याने आपल्यात ही सकारात्मक बदल घडतात असेही संदीप खर्डेकर म्हणाले. दान हे केवळ संपत्तीचे नसून अन्न, वस्त्र, सेवा, ज्ञान, वेळ, उपयुक्त वस्तू असे विविध स्वरूपात केल्याने आपल्या शास्त्रानुसार द्रव्यशुद्धी होते आणि संपत्ती अक्षय राहते त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी दाना साठी पुढे यावे व गरजुंना मदतीचा हात द्यावा असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य गरजुंपर्यंत पोहोचणे गरजेचे असून ज्या संस्थांना अश्या मदतीची गरज आहे त्यांच्यात आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मध्ये समन्वय साधण्याचे काम मी आनंदाने करेन असे सीमाताई दाबके म्हणाल्या. मी लायन्स क्लब च्या माध्यमातून 9 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कुल टिळक रस्ता, येथे दिव्यांगांच्या सर्व संस्थांचे एकत्रिकरण आयोजित केले असल्याचे व त्यात 50 संस्था सहभागी होणार असल्याचे ही सीमाताई म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही करत असलेले कार्य हे समाजसेवेचा एक छोटासा प्रयत्न असून यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला,तर याच दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती ही साजरी केली जाते त्यामुळे ह्या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याचे ही सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे हे कार्य अखंड सुरु राहणार असल्याचे वचन खर्डेकर कुटुंबियांनी दिले असून यात खंड पडू नये अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो असे संदीप खर्डेकर म्हणाले.

वाढत्या गुन्हेगारीवर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे- येथील वाढत्या गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने बुधवारी आंदोलन केले. पक्षाने सरकार विरोधात नारेबाजी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनागोंदी कारभाराचा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रिय नेतृत्वाचा निषेध व्यक्त केला. या वेळी डॉ.सुनील जगताप, किशोर कांबळे, मंजिरी घाडगे, असिफ शेख, अमोल परदेशी,अजिंकय पालकर, विष्णू सरगर, अनिता पवार, रुपाली शेलार, मदन कोठुळे, रोहन गायकवाड, फाहीम शेख, सुमित काशीद, रमीझ सय्यद ,हेमंत बधे, शिवराज मालवडकर, पुजा काटकर आणी शैलेंद्र भेलेकर उपस्थित होते.

पुणे शहरात सध्या कायदा व सुव्यवस्था औषधालाही शिल्लक नाही. भरदिवसा होणारे खून, गोळीबार, कोयत्याचे वार, लूट, टोळी युद्ध हे चित्र पुण्यात सर्वत्र दिसत आहे. पुणेकरांना दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडताना जीव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागत आहे. आपल्या परिवारातील सदस्य घराबाहेर जाताना ती जिवंत पुन्हा घरी येईल की नाही याची कोणालाही शाश्वती नाही. त्यातच मंगळवारी बाजीराव रोड येथे एका अल्पवयीन मुलाची भर दिवसा निर्घृण हत्या झाली. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिनव कला महाविद्यालय चौक येथे बुधवारी आंदोलन करण्यात आले.याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बाजीराव रोडवर भरदिवसा एका मुलाची निर्घृण हत्या झाली. गेल्या काही दिवसातील घटना पाहता, पुणे शहरात कायद्याचे नव्हे, तर गुन्हेगारांचे राज्य आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र, बिहारमध्ये स्वतःच्या पक्षाची जाहिरात करण्यात व्यस्त आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. या अनागोंदी कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पूर्ण वेळ आपल्या पक्षाच्या प्रचाराला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मुरलीधर मोहोळांच्यावर धंगेकरांची आणखी एक गंभीर पोस्ट

पुणे-भाजपचे पुण्यातील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पुणे महानगर प्रमुख पदावर असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक गंभीर पोस्ट सोशल मिडियावर FB आणि X वर अपलोड केली आहे. ज्यात असे म्हटले आहे कि,

‘पौडफाटा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहळांच्या गुंडाचा हल्ला..मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत तीस ते चाळीस साथीदारांसह मेगा सिटी वस्तीमध्ये घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांसह वस्तीतील महिलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.मी पुन्हा एकदा सांगतो,सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो बाकी गुन्हेगारीची पाळेमुळे इथेच आहेत.

या पोस्ट वर त्यंनी काही फोटो टाकलेले आहेत . तर X वरील पोस्ट मध्ये एक व्हिडीओ देखील टाकला आहे .

https://twitter.com/DhangekarRavii/status/1985757048144085265

काल रात्री ही पोस्ट करण्यात आली मात्र त्यावर भाजपा अथवा मंत्री मोहोळ यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही .

याशिवाय धंगेकर यांनी असे म्हटले आहे कि,’ कोथरूडमध्ये समाजकंटकांकडून भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या समीर चव्हाण व सनी चव्हाण यांची आपण रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून उपचाराबाबतची माहिती जाणून घेतली आहे.

PMC ची प्रभागनिहाय मतदार यादी उद्या होणार जाहीर

४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार

पुणे – महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुरुवारी (दि. ६) प्रारूप मतदारयादी जाहीर होणार आहे. मतदारयादीच्या विभाजनात प्रभाग रचनेप्रमाणेच तोडफोड झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून याद्यांची पुन्हा छाननी करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर काही मुकादम आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे लॉगइन बंद करण्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर नागरिकांना हरकती नोंदविण्याची मुदत दिली जाणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीबाबत झालेल्या आरोपांचे आणि महापालिकेच्या दाव्याचे नेमके सत्य या याद्या जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आता ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. ही रचना २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असून, १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार नोंदणी वैध धरली आहे.

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसह शिरूर, पुरंदर आणि भोर-वेल्हा या मतदारसंघांतील शहरी भागांचाही समावेश या निवडणुकीत करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेला यादी सुपूर्त केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप यादी जाहीर करण्याची मुदत देण्यात आली होती. मागील वीस दिवसांपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हे काम सुरू असून, आता स्वतंत्रपणे याद्यांची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या लाखाच्या आत ठेवण्यात आली होती. मात्र, जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार नोंदणीमुळे सध्याच्या मतदारसंख्या अनेक प्रभागांमध्ये लाखाच्या वर गेली आहे. काही ठिकाणी ही संख्या पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

अखेरीस त्या नरभक्षक बिबट्याचा शार्प शुटर च्या गोळीने केला खात्मा

पुणे- जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली आंदोलने आणि जन्क्शोब पाहता वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने संबधित बिबट्या जेरबंद करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीत त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला गेला पण तो हुकला आणि बिबट्या चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने हा नर बिबट्या ठार झाला

मौजे पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक 12/10/2025 रोजी शिवन्या शैलेश बोंबे, वय 5 वर्ष 6 महिने, दिनांक 22/10/2025 रोजी भागुबाई रंगनाथ जाधव, वय 82 वर्षे आणि रोहन विलास बोंबे वय 13 वर्षे यांचे दुर्दैवी मृत्यू वन्य प्राणी बिबट च्या हल्ल्यामध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 12/10/2025 व दिनांक 22/10/2025 रोजी पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक 3/ 11/2025 रोजी मौजे मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते तसेच दिनांक 2/11/2025 रोजी बिबट हल्ल्यात रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाणे वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केला.

दिनांक 3/11/2025 रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणे चे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोन च्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले त्यानंतर सदर शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले

सदर कार्यवाही श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस व श्री अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर श्री निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले

‘डिजिटल अरेस्ट’विरुद्ध एनपीसीआयची मोहीम

डिजिटल पेमेंट आता देशभर सहजगत्या उपलब्ध आहे. यामुळेच भारत डिजिटल-प्रथम अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे.
व्यवहारातील सुरक्षा आणि सुलभता या दोन्ही गोष्टी या माध्यमामुळे मिळतात. असे असले तरीही सुरक्षितपणे याचा
वापर करणे आणि ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षितता तसेच घोटाळ्यांची
माहिती असे यामुळे ग्राहक आणि त्यांचे निकटवर्तीय अशा गोष्टींमध्ये फसत नाहीत. पर्यायाने प्रत्येकासाठी सुरक्षित
अर्थव्यवस्था निर्माण होते.

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?
ऑनलाइन घोटाळे आता अधिकाधिक प्रगत होत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ हे त्याचे एक प्रमुख उदाहरण आहे. अशा
घोटाळ्यांमध्ये फसवणूक करणारे सरकारी अधिकारी असल्याचे भासवत पीडित किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी
संबंधित बनावट कायदेशीर प्रकरणे बनवतात. त्यातून वाचण्याचा पर्याय म्हणून पीडितांना पैसे पाठवण्यासाठी किंवा
वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडतात. ते आधी फोन करतात आणि नंतर व्हिडीओ कॉलवर स्विच करतात. कथितरित्या
आर्थिक घोटाळे किंवा इतर कायदेशीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीडितांना डिजिटल अरेस्ट वॉरंटची धमकी दिली
जाते. भीतीपोटी, पीडित अनेकदा त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतात, परिणामी आर्थिक नुकसान तर होतेच पण
आपली गोपनीय माहिती देखील चोरीला जाण्याचा धोका असतो.
संभाव्य ‘डिजिटल अरेस्ट’ घोटाळा कसा ओळखावा:
 ‘अधिकाऱ्यांकडून’ अनपेक्षितरित्या संपर्क:
पोलीस, सीबीआय, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट सारख्या
सरकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करून जर कोणी तुमच्याशी संपर्क साधत असेल तर सावध व्हा.
विशेषतः तुमच्या विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई सुरू केली जात आहे किंवा वॉरंट जारी करण्यात आले
आहे, असा दावा ते करत असतील तर सावधगिरी बाळगा. ते असा आरोप करू शकतात की, तुम्ही किंवा
तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य पैशांच्या घोटाळ्यात, कर चुकवणे किंवा ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात
सहभागी आहे.
 भीतीदायक भाषा आणि तातडी: स्कॅमर सामान्यतः व्हिडीओ कॉलवर आपल्याला गुंतवतात, विश्वास बसावा
यासाठी पोलिसांच्या गणवेशात समोर येतात, सरकारी लोगो वापरतात किंवा कायदेशीर, अधिकृत आणि भीती
वाटण्यासाठी सगळं खरं असल्याचा आभास निर्माण करतात. ते अनेकदा अटक किंवा तत्काळ कायदेशीर
कारवाईची धमकी देत लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगतात. आणि यासाठी कायदेशीर
परिभाषा वापरतात. काही प्रकरणांमध्ये, तर ते पीडितांना त्यांची विश्वासार्हता पटवून देण्यासाठी चक्क पोलीस
स्टेशनसारखा सेटअप तयार करतात.
 संवेदनशील माहिती किंवा पेमेंटची विनंती: कथित गुन्ह्यातील तुमचा सहभाग स्पष्ट होईल अशी कोणतीही गोष्ट
मागे सोडणार नाही, असे आश्वासन देऊन स्कॅमर वैयक्तिक माहिती किंवा मोठ्या रकमेची मागणी करू शकतात.
तपास पूर्ण होईपर्यंत ते तुम्हाला त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडू शकतात. “तुमचे नाव
क्लिअर करणे”, “तपासात मदत करा” किंवा “परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव/एस्क्रो खाते” यासारखे शब्द ते
विशिष्ट बँक खात्यांमध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करावेत यासाठी वापरू शकतात.
सुरक्षित राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी:
 थांबा आणि पडताळणी करा: जर तुम्हाला कायदेशीर बाबींबद्दल अनपेक्षित कॉल किंवा मेसेज आला तर त्याची
खात्री करण्यासाठी थोडा वेळ काढा. शांत रहा, कारण स्कॅमर्सना देखील भीती तसेच निकड असते. वास्तविक
सरकार तसेच कोणतीही कायदेशीर यंत्रणा कधीही फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे पैसे मागत नाहीत किंवा
प्रकरणांची चौकशी करत नाहीत. असे फोन आलेच तर कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी कॉलरची ओळख पटवून
घ्या आणि विश्वसनीय स्त्रोतांचा सल्ला घ्या.

 सपोर्ट चॅनेल वापरा: संशयास्पद क्रमांकांची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनला १९३० वर किंवा
दूरसंचार विभागाला करा. (https://sancharsaathi.gov.in/sfc/).
 नोंद ठेवा आणि तक्रार करा: मेसेज सेव्ह करा, स्क्रीन शॉट घ्या आणि कागदपत्रे गोळा करा. जर तुम्हाला तक्रार
दाखल करायची असेल तर हे अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ दत्तमंदिरात १२५ मिष्टान्नांचा फिरता अन्नकोट

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नकोट करण्यात आला. फिरता अन्नकोट हे यंदाचे प्रमुख वैशिष्टय होते. नमकीन पदार्थ, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे आणि विविध प्रकारची मिठाई अशा १२५ मिष्टान्नांचा फिरता अन्नकोट करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. अन्नकोट मांडण्यासाठी व्यवस्थापक अशोक दोरुगडे, सेवेकरी नंदू चिप्पा आणि वैभव निलाखे यांनी सहकार्य केले

अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. दत्तमंदिरातील यंदा प्रथमच साकारलेला फिरता अन्नकोट पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांच्या वतीने काका हलवाई तर्फे अन्नकोटाला विशेष सहकार्य करण्यात आले. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत.

दाही दिशा’ हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन.

मुंबई – “दाही दिशा’ हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे, आणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन (मुख्य) सभागृहात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपाले, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर,अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले. विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्ग निघाला. कितीही काटकसर असली, तरीसुद्धा जे वचन दिले आहे, जे शब्द आम्ही दिलेले आहेत, ते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, लेक लाडकी, लखपती योजना, महिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना, पिंक रिक्षा आणि सारथी, महाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचित, गोरगरीब महिलांसाठी अविरतपणे काम केले आहे. ‘दाही दिशा’ हे त्यांचं पुस्तक म्हणजे या संघर्षाची कहाणीच आहे. हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका संवेदनशील कार्यकर्त्याची अनुभव गाथाच असल्याचे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुस्तकात नीलम ताईंनी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला आलेले अनुभव अशा रीतीने मांडले आहेत की ते आपल्या हृदयाला भिडतात. नीलमताईंचा प्रवास हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे मोठे योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना असो, मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे असो, महिला सरपंचांना अधिक बळ देणं असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी ठामपणे भूमिका घेतली आहे. नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा-आजी आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते. महाविद्यालयीन जीवनात, त्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याप्रसंगी म्हणाल्या, आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या 30 वर्षांत लिहिलेली आहेत. महिला धोरणे जी वेगवेगळी झाली, त्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल, याची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत. आरक्षण मिळाले, परंतु संरक्षण मिळालं नाही. त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलं, तुम्ही मला एक कार्यक्रम सांगा, की कुठला कार्यक्रम केला, तर महिलांना फायदा होईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, की महिलांनी दारूच्या विरोधात जी आंदोलनं केलेली आहेत, त्याच्यामधल्या महिलांच्या वर जे गुन्हे दाखल झाले ते तुम्ही काढून टाका, आणि तिसऱ्या दिवशी 32,000 महिलांवरचे गुन्हे मागे घेण्यात आलीत. अशी अनेक उदाहरणं आहेत असे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण हे काम करत असताना, अनुभव येत होता, जसा संघर्ष महत्त्वाचा आहे तशी सबुरी फार महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.’दाही दिशा’ म्हणजे काय तर पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य बरोबर, ऊर्ध्व आणि अध्व या दहा दिशांनी येणारी जी संकटं आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी, आम्हाला दाही दिशांनी शक्ती दे परमेश्वरा असा त्याचा अर्थ आहे. दैनिक सकाळ मधील एका सदरामधून दर शनिवारी लेख छापून येत होते. त्याच्यातील निवडक लेख आणि साधारण १९९५ सालापासून ते २००५ पर्यंतचा कालावधीतील काही अनुभव या सर्वांचा समावेश करुन हे पुस्तक प्रकाशन झाले आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहूल गडपाले यांनी केले तर सूत्रसंचलन उतरा मोने यांनी केले.

दाही दिशा’ हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२५ : “दाही दिशा’ हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे, आणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन (मुख्य) सभागृहात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, सकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपाले, सकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर, अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले. विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्ग निघाला. कितीही काटकसर असली, तरीसुद्धा जे वचन दिले आहे, जे शब्द आम्ही दिलेले आहेत, ते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, लेक लाडकी, लखपती योजना, महिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना, पिंक रिक्षा आणि सारथी, महाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचित, गोरगरीब महिलांसाठी अविरतपणे काम केले आहे. ‘दाही दिशा’ हे त्यांचं पुस्तक म्हणजे या संघर्षाची कहाणीच आहे. हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका संवेदनशील कार्यकर्त्याची अनुभव गाथाच असल्याचे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुस्तकात नीलम ताईंनी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला आलेले अनुभव अशा रीतीने मांडले आहेत की ते आपल्या हृदयाला भिडतात. नीलमताईंचा प्रवास हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे मोठे योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना असो, मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे असो, महिला सरपंचांना अधिक बळ देणं असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी ठामपणे भूमिका घेतली आहे.

नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा-आजी आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते. महाविद्यालयीन जीवनात, त्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची

  • विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
    विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याप्रसंगी म्हणाल्या, आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या 30 वर्षांत लिहिलेली आहेत. महिला धोरणे जी वेगवेगळी झाली, त्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल, याची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत.

आरक्षण मिळाले, परंतु संरक्षण मिळालं नाही. त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलं, तुम्ही मला एक कार्यक्रम सांगा, की कुठला कार्यक्रम केला, तर महिलांना फायदा होईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, की महिलांनी दारूच्या विरोधात जी आंदोलनं केलेली आहेत, त्याच्यामधल्या महिलांच्या वर जे गुन्हे दाखल झाले ते तुम्ही काढून टाका, आणि तिसऱ्या दिवशी 32,000 महिलांवरचे गुन्हे मागे घेण्यात आलीत. अशी अनेक उदाहरणं आहेत असे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण हे काम करत असताना, अनुभव येत होता, जसा संघर्ष महत्त्वाचा आहे तशी सबुरी फार महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

‘दाही दिशा’ म्हणजे काय तर पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य बरोबर, ऊर्ध्व आणि अध्व या दहा दिशांनी येणारी जी संकटं आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी, आम्हाला दाही दिशांनी शक्ती दे परमेश्वरा असा त्याचा अर्थ आहे. दैनिक सकाळ मधील एका सदरामधून दर शनिवारी लेख छापून येत होते. त्याच्यातील निवडक लेख आणि साधारण १९९५ सालापासून ते २००५ पर्यंतचा कालावधीतील काही अनुभव या सर्वांचा समावेश करुन हे पुस्तक प्रकाशन झाले आहे असेही त्यानी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहूल गडपाले यांनी केले तर सूत्रसंचलन उतरा मोने यांनी केले.

पुणे मेट्रो टप्पा- 2:हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या उपमार्गिकांना शासनाची मान्यता

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मुंबई दि.4 : – पुणे मेट्रो टप्पा- 2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी 5 हजार 704 कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित होणार असून पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. लाखो प्रवाशांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुणे मेट्रो टप्पा-2 अंतर्गत होणाऱ्या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

भीमा कोरेगाव स्मारकाच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवा : राहुल डंबाळे

पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करावे या आंबेडकरी चळवळीच्या भावनेचा गैरफायदा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समिती सातत्याने आंबेडकरी चळवळीची विकास आराखड्याच्या नावाखाली फसवणूक गेल्या काही वर्षांपासुन करत आहे. असाच प्रकार कालच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील झाला असल्याने यापुढे अशी कोणतीही कृती करू नये अशी विनंती राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना केलेली आहे.

भीमा कोरेगाव विजय स्तंभ या ठिकाणी शूरवीर महार योद्धांच्या गौरवार्थ राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी समुदायाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती सातत्याने प्रयत्नशील आहे 2018 सालीच यासंदर्भामध्ये तात्कालिन जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय करून राज्य सरकारला सुमारे 98 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला होता. राज्य सरकारने सदर स्मारकासाठी कोणतीही रक्कम कमी पडणार नाही याबाबत वेळोवेळी अश्वस्थ केले आहे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय विभागाने या संदर्भामध्ये अधिकृत १०० कोटींच्या स्मारकाची घोषणा करून बृहत आराखडा तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला केल्या होत्या.

विद्यमान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी देखील या ठिकाणी स्मारक करण्यासंदर्भामध्ये सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केलेले आहे. असे असताना सुद्धा सन 2018 पासून ते आज तागायत एक रुपया देखील स्मारकासाठी खर्च करण्यात आलेला नाही , तसेच स्मारकासाठी ठी कोणताही कृती आराखडा तयार केलेला नाही. यासंदर्भामध्ये आंबेडकरी जनतेमध्ये नाराजगी निर्माण झाली असून सरकारने आता अधिक फसवणूक करू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे.

अजित पवार यांचे अश्वासनाची पूर्तता करा..
दरम्यान वर्षभर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना विजयस्तंभ परिसरामध्ये पिण्याचे पाणी , शौचालय, बसण्याची व्यवस्था , पार्किंग यासह इतर पायाभूत सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी भीमा कोरेगाव या ठिकाणी बैठक घेऊन तातडीने दोन महिन्यांमध्ये ज्या जागे संदर्भामध्ये न्यायालयीन वाद नाही त्या ठिकाणी या सुविधा विकसित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते व याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व जिल्हाधिकारी यांच्यावर संयुक्तरीत्या दिली होती. सुमारे एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीच कारवाई झालेली नाही याबाबत मागील आठवड्यामध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व सर्व संबंधितांना पत्राद्वारे याबाबत नाराजगी व्यक्त करून तातडीने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा कायदेशीर गुंतागुंत असलेल्या जागेवरच स्मारकासाठी आराखडा सादर केला असून तो तात्काळ होणे अशक्य असल्याने त्यावर अधिक लक्ष न देता तातडीने वादातील नसलेल्या जागेवर वर्षभर येणाऱ्या अनुयायांसाठी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केलेली आहे.

शौर्य दिनासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करावी

दरम्यान यंदाच्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमासाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांची तरतूद करावी व मागील वर्षीपेक्षा अधिक सुविधा द्याव्यात असे पत्र सुद्धा अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्याचे डंबाळे यांनी सांगितले आहे.

प्री फॅब्रिकेटेड स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे उद्घाटन

पुणे-विमान नगर येथील फिनिक्स मॉल लगत प्री फॅब्रिकेटेड स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर ,(ज) यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार बापू पठारे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, कार्यकारी अभियंता अमर मदिकुंठ ,प्रसाद जगताप ,उपअभियंता नाईकनवरे ,कनिष्ठ अभियंता चोपडे व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

सदर शौचालय हे ४४४ चौरस फूट आकारमानाचे एअर कंडिशनन्ड स्मार्ट टॉयलेट असून यातील ७० टक्के भाग शौचालयाकरिता व ३० टक्के भाग कॅफे करिता ठेवण्यात आलेला आहे. पुरुषांकरिता पाच टॉयलेट्स व मुतारी, महिलांकरिता पाच टॉयलेट्स व बेबी फीडिंग रूम /चेंजिंग रूम , तृतीयपंथीय व्यक्तिंकरिता स्वतंत्र शौचालय व अपंग व्यक्तींकरिता स्वतंत्र शौचालयाची निर्मिती केलेली आहे. सदर प्रकल्पाचे उभारणी करिता आत्ता पर्यंत सुमारे ३३ लक्ष रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे.

परोसा प्रायव्हेट लिमिटेड , ठेकेदार हे यापुढे दहा वर्षांकरिता कॅफे चालवून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर शौचालयाची देखभाल दुरुस्ती व दैनंदिन स्वच्छता करणार आहेत.