Home Blog Page 55

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आता १ कोटी पर्यंतची विकास कामे करता येणार,त्यापुढील कामांवर वित्तीय समिती निर्णय घेणार

पुणे -महापालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘वित्तीय समिती’ वादावर अखेर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी तोडगा काढला आहे. ही समिती बरखास्त करण्याची नगरसेवकांची तीव्र मागणी नाकारताना , आयुक्तांनी १ कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांना या समितीच्या जाचातून मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी असे म्हटले आहे कि,’ आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो. विकासकामांना विलंब होऊ नये ही लोकप्रतिनिधींची भावना रास्त आहे, मात्र महापालिकेचे आर्थिक हित जपणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. १ कोटींच्या मर्यादेमुळे कामांना वेग येईल आणि मोठ्या खर्चाचे नियोजन मात्र समितीमार्फत राहील.

कोरोना महासाथीच्या काळात महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी आणि अनावश्यक खर्चाला लगाम घालण्यासाठी तत्कालीन प्रशासनाने ‘वित्तीय समिती’ची स्थापना केली होती. या समितीचे मुख्य काम म्हणजे प्रत्येक कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि खर्चाला मंजुरी देणे. मात्र, प्रशासक राज संपून लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर, ही समिती डोकेदुखी ठरत असल्याचा दावा काही नगरसेवकांनी केला आहे.
“आम्ही प्रभागातील नागरिकांना उत्तरदायी आहोत. छोट्या-छोट्या ड्रेनेज लाईन किंवा रस्ते दुरुस्तीच्या १० ते २० लाखांच्या कामांसाठीही समितीच्या तारखांची वाट पाहावी लागते. यामुळे विकासकामांना ६ ते ८ महिने विलंब होतो. वित्तीय समितीच्या मान्यतेमुळे कामांना उशीर होत असल्याची तक्रार करत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच ही समिती बरखास्त करण्याची मागणी केली. मात्र, आयुक्तांनी नगरसेवकांची समिती बरखास्तीची मागणी फेटाळली आहे.

काही दिवसांपूर्वीच स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावरून मोठा गदारोळ झाला होता. नगरसेवकांच्या दबावामुळे स्थायी समितीने क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावरील २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना वित्तीय समितीच्या मान्यतेतून सूट देण्याचा ठराव केला होता. मात्र, प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी संथ गतीने सुरू होती, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आयुक्तांविरुद्ध नाराजी वाढत होती.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मिळाले निर्णय घेण्याचे अधिकार

नगरसेवकांची वाढती नाराजी लक्षात घेता, आयुक्त नवल किशोर राम यांनी केवळ २५ लाखांची मर्यादा न ठेवता, ती थेट १ कोटी रुपये केली आहे. प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुधारणा, उद्यानांची देखभाल आणि दुरुस्तीची बहुतांश कामे १ कोटींच्या मर्यादेत येतात. आता या कामांसाठी फाईल्स मुख्य इमारतीतील समितीकडे पाठवण्याची गरज उरणार नाही.विभाग प्रमुखांना आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आता त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. १ कोटींच्या वरील निविदा आणि प्रकल्पांसाठी अजूनही वित्तीय समितीची परवानगी अनिवार्य असेल. यामुळे उड्डाणपूल किंवा मोठ्या योजनांमधील निधीच्या वापरावर आयुक्तांचे नियंत्रण कायम राहील.

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय आढावा बैठक संपन्न

पुणे-आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन आगामी विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना कचरा संकलनासाठी लागणाऱ्या वाहनांची संख्या, चालकांची उपलब्धता तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापन (RDM) अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला. महसूल वाढीसाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन प्रभावी बजेट नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील पार्किंग व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करून ऑनलाइन प्रणालीद्वारे नियंत्रण वाढविण्यावर भर देण्यात आला. मल्टी-लेव्हल पार्किंग प्रकल्प राबवून नागरिकांना अधिक सोयीस्कर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

पायाभूत सुविधांच्या दृष्टीने जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच नवीन इमारती उभारण्याबाबत चर्चा झाली. विविध प्रकल्पांच्या खर्च व व्यवहार्यता तपासून नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील रस्ते व काँक्रीट पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.

आरोग्य क्षेत्रात मेडिकल कॉलेजमधील सुविधांचे उन्नतीकरण, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच पीपीपी (PPP) मॉडेलवर हॉस्पिटल प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी PET Scan सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर देण्यात आला.

तसेच पीएमसी कॉलनी विकास (राजेवाडी, भवानी पेठ परिसर), बस थांबे आधुनिकीकरण तसेच विविध नागरी सुविधा विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ग. दि. माडगूळकर सभागृह, भिडे वाडा, बाळासाहेब ठाकरे बाल नाट्यगृह तसेच सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे ऑडिओ-व्हिडिओ सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले.

या बैठकीत झोपडपट्टी निर्मूलन, वाहतूक सुधारणा तसेच विविध विभागांमध्ये समन्वय वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

महापौर यांनी सर्व विभागांना नागरिकाभिमुख, पारदर्शक व वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे आवाहन केले.

विकसकांकडून ताब्यात न आलेले गाळे, सदनिका ताब्यात घ्या- शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे आदेश

पुणे- महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून पुणे शहरात विविध ठिकाणी विकसकांना त्यांच्या प्रस्तावांना Accommodation Reservation च्या तरतुदी नुसार मंजुरी देण्यात आलेल्या आहेत. आता पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या ज्या प्रस्तावांना भोगवटा पत्र अदा करण्यात आलेले आहेत, अश्या सर्व प्रस्तावांमधील पुणे महानगरपालिकेला देय असलेले गाळे, सदनिका इ. चे ताबे पुणे महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र पुणे महानगरपालिकेला काही प्रकल्पामधील गाळे अद्याप ताब्यात आलेले नाहीत अश्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सर्व अभियंत्यांना सूचित केले आहे की, अशा सर्व प्रस्तावांची छाननी करून, कोणत्या प्रकल्पामधील गाळे, सदनिका, इ. मनपाच्या ताब्यात आलेल्या नाहीत याची माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ मे पूर्वी सादर करावी. तसेच अश्या ताब्यात न आलेल्या जागा त्वरित ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी.

१२९० कोटी रुपये केंद्र सरकार महापालिकेला देणार: १२ गावांमधील पाणी पुरवठा आणि शहरातील पूरनियंत्रणाच्या कामासाठी

पुणे- “अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे शहराच्या १२ गावांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यासाठी ८९० कोटी आणि शहरातील पूरनियंत्रण प्रकल्पांसाठी ४०० कोटी असे एकूण र.रु.१२९० कोटी रुपये महापालिकेला देण्यास केंद्र शासना मार्फत मंजुरी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकल्पांचे सादरीकरण करून सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले आहे.
शहरी विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ (UCF) अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व पूरनियंत्रण या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना आज, दिनांक ११ मे २०२६ रोजी गृहविकास व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्या सचिवांच्या अध्यक्षते खाली आयोजित पहिल्या Apex Committee बैठकीत मंजुरी प्राप्त झाली आहे. या बैठकीत १२ गावांसाठी र.रु.८९० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पास तसेच पुणे शहरातील पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी र.रु. ४०० कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण र.रु.१,२९० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.


१२ गावांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प र.रु.८९० कोटी – पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे ८५% काम पूर्ण झाले असून, संपूर्ण प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याचे नियोजन आहे. सध्या ७ गावांमध्ये पाणीपुरवठा कामे प्रगतीपथावर असून २५ गावांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार आहे. तसेच Guillain-Barré syndrome (GBS) प्रभावित खडकवासला, नांदेड, नांदोशी, सनसनगर, किरकीटवाडी, धायरी, नऱ्हे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी या १२ गावांसाठी र.रु.८९० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून २०० MLD जलशुद्धीकरण प्रकल्प, ७१ कि.मी. ट्रान्समिशन मेन लाईन, ३९० कि.मी. वितरण व्यवस्था आणि SCADA/AMR आधारित स्मार्ट मीटरिंग प्रणालीद्वारे २०५२ पर्यंत ७.७८ लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुणे शहरातील पूरनियंत्रण उपाययोजना र.रु.४००कोटी – पुणे शहरातील ३३५ महत्त्वाच्या पूरग्रस्त ठिकाणी पावसाळी जलनिस्सारण उपाययोजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक उपक्रमांमुळे नागरिक व त्यांची मालमत्ता सुरक्षित राहणेस आणि सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होणेस मदत होणार आहे. SCADA आधारित स्मार्ट जलव्यवस्थापन व AMR/NRW नियंत्रणामुळे पाणी गळती कमी होऊन २०५२ पर्यंत पुण्यात सक्षम, शाश्वत आणि आधुनिक पाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे-पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एका ३० वर्षीय तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंडगार्डन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.राम शिवाजी पाचकाळे (वय ३०, रा. भोर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने राजगड पोलीस ठाण्यात एका प्रकरणाबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी ती ‘अदखलपात्र’ गुन्हा म्हणून नोंदवली होती. आपली तक्रार दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवली जावी, या मागणीसाठी तो सातत्याने पाठपुरावा करत होता.

न्याय मिळत नसल्याच्या निराशेपोटी सोमवारी त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचा पाचवा मजला गाठला आणि तेथील सुरक्षा जाळीवर जाऊन बसला.

घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणाशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांच्या आश्वासनानंतर राम पाचकाळे याचे समाधान झाले आणि त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला. त्याला सुरक्षितपणे जाळीवरून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात नेले. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

पुणे-पिंपरीत ४१ हजार झाडे लावण्याच्या महामेट्रोच्या “टेंडरमध्ये पारदर्शकता हवी” माजी विरोधी पक्षनेत्यांचे श्रवण हर्डीकर यांना पत्र


पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत तब्बल ४१ हजार झाडे लावून त्यांची सात वर्षे देखभाल करण्याच्या महामेट्रोच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले असले, तरी या संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांना सविस्तर पत्र पाठवून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

महामेट्रोकडून या संदर्भातील निविदा २५ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदांद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात ४१ हजार झाडे लावणे आणि पुढील सात वर्षे त्यांची देखभाल करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक निर्णय असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या प्रकल्पाबाबत अनेक मूलभूत बाबी स्पष्ट झालेल्या नसल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. महामेट्रोच्या बांधकामादरम्यान हटविण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात ही झाडे लावली जाणार आहेत का, असा पहिला प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाने ज्या प्रमाणात झाडांचे वय आणि संख्या विचारात घेऊन पुनर्लागवडीचे निर्देश दिले होते, त्या निकषांनुसारच ही प्रक्रिया होत आहे का, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.याशिवाय ही झाडे नेमकी कोणत्या भागात लावली जाणार आहेत, त्याचा काही नकाशा किंवा आराखडा उपलब्ध आहे का, याची माहिती मागविण्यात आली आहे. या कामासाठी कोणत्याही हॉर्टिकल्चर किंवा लँडस्केप सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.पत्रामध्ये टेंडरमधील तांत्रिक तपशीलांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कोणत्या प्रकारची झाडे लावली जाणार, त्यांची उंची किती असेल, ती किती वर्षांची असतील आणि कोणत्या भागात कोणती झाडे लावली जाणार, याबाबत निविदेमध्ये स्पष्ट माहिती नसल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी, हे निर्णय संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात आले आहेत का, अशी शंका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

“केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त मालकी असलेल्या महामेट्रोच्या या प्रकल्पात करदात्यांचा पैसा गुंतलेला आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. महामेट्रोने यासंदर्भात सविस्तर निवेदन आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे,” अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हरितक्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याचे नमूद करताना, शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. “ही ४१ हजार झाडे योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावली जावीत तसेच त्यांची सातत्याने देखभाल व्हावी, यासाठी सर्वांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे,” असेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी

पुणे, दि.११: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात पुणे जिल्ह्यातील चार प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते.

जिल्हा स्तरावर येणाऱ्या तक्रार अर्जांवर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात उचित कार्यवाही होणे आवश्यक असून त्यासाठी निर्णय देताना नियम व कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे, अशा सूचना डॉ.पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल चार प्रकरणांचा समावेश होता. या अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच्या कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन श्री. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

पिंपळे गुरव येथे १४ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पुणे, दि. ११: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे तथा प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १४ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, समर्थ नगर, एस.बी.आय. बँकेसमोर, नवी सांगवी, पुणे येथे होणार असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती (Walk-in-Interview) घेण्यात येणार आहेत.

मेळाव्यात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लि., कमिन्स इंडिया लि., फोर्स मोटर्स लि., हुंदाई मोटर्स इंडिया लि. यांसह पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांच्या माहितीसाठी व ऑनलाइन अर्जासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in महा स्वयंरोजगार संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो व Resume च्या किमान १० प्रती सोबत आणाव्यात.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. सु.रा. वराडे यांनी केले आहे.

‘गदिमां’च्या प्रॉपर्टीवरून सोशल मिडियावर मायलेकांचे वाद चव्हाट्यावर

पुणे-कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘गीतरामायणा’ची आणि अनेक अजरामर कलाकृतींची साक्ष असलेली पुण्यातील शिवाजीनगर येथील ‘पंचवटी’ ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा घाट घातला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पैशांच्या लालसेपोटी घरातील मंडळींकडूनच ही वास्तू बिल्डरला विकण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी आपली आई शीतल माडगूळकर यांच्यावर केला आहे. सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून त्यांनी हे आरोप केलेत.

सुमित्र माडगूळकर यांच्या या आरोपाला त्यांची आई शीतल माडगूळकर यांनीही तसेच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. तसेच हे सारे आरोप खोटे असून, तू ते पैशांच्या लालसेपायी करतो आहेस, असा आरोपही केला आहे. आईच्या या पोस्टलाही सुमित्र माडगूळकर यांनी पुन्हा एक पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे. हे सगळे आरोप-प्रत्यारोप आपण जाणून घेऊयात….


गदिमांची पवित्र वास्तू “पंचवटी” पाडण्यास विरोध करीत आल्यामुळे मी व माझ्या कुटुंबाच्या (मी,माझी बायको व छोटी मुलगी) जीवाला धोका व माझी खोटी बदनामी करण्याचे कुभांड.

…श्री. सुमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू)

गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील.गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून (अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत).माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मी माझ्या जीवात जीव असे पर्यंत विरोध करतो आहे विरोध करणार आहे.गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही.केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत.
ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे.गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत.यात माझा जीव गेला तरी बेहत्तर.

या लोकांनी आता माझी बदनामी सुरू केली आहे मी व माझ्या कुटुंबावर खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे.आमच्या कुटुंबातील ज्या बायका संसारात सुखी नाहीत त्यांनी खोट्या नाट्या पोस्ट टाकून माझी बदनामी सुरू केली आहे.

ज्या आजीवर आपल्या सख्ख्या नातीचा लैंगिक छळ केल्याच्या गुन्हा दाखल आहे व पंचवटीवर जिने भलेमोठे पुस्तक लिहिले आहे त्या बाईंचा दाखला देऊन तिचा आम्ही छळ करतो असा खोटा आरोप मी केवळ गदिमांची पवित्र वास्तू पाडायला विरोध करतो आहे म्हणून मी व माझ्या पत्नीवर करत आहेत.माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठले आहेत.खोटे नाटे कितीही ओरडून सांगितले तरी ते सत्य नसते हे आज न उद्या समोर येईलच.
गेली १० वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे,आतल्या कामाला आता सुरुवात होईल.गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे तितकीच गदिमांची पंचवटी माझ्या साठी एक देऊळ आहे,या लोकांनी माझी कितीही बदनामी केली,माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही. माझी कितीही बदनामी करा माझ्यावर कोर्ट केसेस करा पण मी लढत राहीन पण तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही,गदिमांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे व मी ही वास्तू बिल्डर ला विकू देणार नाही हे या सर्व केवळ गदिमांचे खोटे नाव घेऊन वारसा सांगणाऱ्या लबाड लांडग्यांनी म्हणजेच पडद्यामागे कारवाया करणाऱ्या नातेवाईकांनी समजावे, हिम्मत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लाऊन दाखवा.तुम्हाला माझे चॅलेंज आहे.

गदिमांच्या वर अतोनात प्रेम करणाऱ्या मराठी रसिकांचे आम्हाला आशिर्वाद मिळतीलच ही खात्री आहे.
शीतल माडगूळकर यांचे पोस्टमधून उत्तर

सुमित्र माडगूळकर यांच्या आरोपाला त्यांची आई शीतल माडगूळकर यांनी एक पोस्ट लिहून उत्तर दिले. ही पोस्ट जशीच्या तशी…

तेव्हा तू कुठे होतास ? @ सुमित्र श्रीधर माडगूळकर

1) जेव्हा पंचवटीला रंग द्यायला हवा होता तेव्हा बाबांना पैसे तर दिले नाहीसच पण विरोधच केलास. तेव्हा तुला असे वाटले नाही का की आपलेही काही कर्तव्य आहे.

2) पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला होता.

3) अजूनही पंचवटीच्या अंगण झाडण्याचे आणि रक्षणाचे काम करण्याचे पैसे मी आणि काकू देतो.

4) पंचवटीसाठी बिल्डर बघायला तूच पुढे होतांस.जेव्हा तुला कळले की बाबांनी wiil माझ्या नावावर केले आहे तेव्हा तू 50 % तुला हवेत आणि लीनताला जिने तुला वेळोवेळी मदत केली तिला नंतर द्यावेत असे तू सांगितलंस.

5) पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला, बहिणीला आणि मेव्हण्याला वापरलीस की ज्यांनी तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदत केली.
6) बाळा, आता तरी सुधार. खोटे वागण्याचे बंद कर. अजून वेळ गेलेली नाही. शेवटी सत्याचा विजय होतो आणि प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगायला लागते हे लक्षात असू दे.

7) आज पैशाच्या लोभाने तू आपली माणसे दूर करत आहेस. पण हीच माणसे तुझ्या प्रत्येक अडचणीला उभी राहिली आहेत हे कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या हे लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झाला असेल. वेळीच सावर.

8 ) आत्ता तुझ्या चुकीच्या वागण्याचे समर्थन तू पंचवटीच्या पाडण्याच्या पोस्टने केले आहेस. लोकांच्या गदिमांविषयीच्या प्रेमाचा, आदराचा गैरफायदा घेण्याचा तुझा हा प्रयत्न चुकीचा आहे.

9) गदिमांच्या आणि रामरायाच्या खालच्या हॉलमधल्या फोटोसमोरच्या टेबलवर, बाहेर जाताना पादत्राणे ठेवताना आपल्या आजोबांच्या थोरपणाची जाणीव कुठे जाते? कोणी पाहुणे आले की आम्हाला उचलून ठेवायला लागतात.

10) जेव्हा ड्रेनेज नको त्या वस्तू टाकल्यामुळे तुंबते, पाणी तुळशीकट्ट्यापर्यंत जाते ते तुला कधीच दिसत नाही. मी आणि काकूच ते उभे राहून करून घेतो.

11) नामुष्कीची वेळ तुझ्या वागण्यामुळेच माझ्यावर आली आणि तो घाणेरडा आरोप तू माझ्यावर करतोस याला काय म्हणू ?

असो .परमेश्वर सारे बघत असतो आणि सत्याचा विजय होतो असा माझा विश्वास आहे. तुला लिहिलेली ही शेवटची पोस्ट!

  • तुझी दुर्दैवी आई (????)
    आईच्या पोस्टला सुमित्र यांचे उत्तर…

आई शीतल माडगूळकर यांच्या या पोस्टलाही सुमित्र माडगूळकर यांनी पुन्हा एक पोस्ट लिहून उत्तर दिले आहे. ते उत्तर जसेच्या तसे…

प्रिय आई शीतल श्रीधर माडगूळकर,

Shital Shridhar Madgulkar

तुम्ही गदिमांचे घर पाडणार आहात यावर माझी पोस्ट जाताच तू भली मोठी माझ्या विषयी पोस्ट लिहिलीस, त्यात तुम्ही घरात किती खर्च केलात व मी कसा केला नाही ह्याचा हिशोब मांडला आहेस.

आता सत्य परिस्थित मी लोकांसमोर ठेवत आहे सोबतचे फोटो बघा ही आहे पंचवटीतील गदिमांची खोली ज्या खोलीची तुम्ही अडगळीची खोली करून टाकली आहे. याच खोलीत गदिमांचे २४ वर्ष वास्तव्य होते.
बाहेरून दार बंद करून कुलूप लावले आहे, आता प्रचंड धूळ, मोडके फर्निचर अशी वाईट अवस्था गदिमांच्या खोलीचीच तू व गदिमांचे सुपुत्र आनंदी आनंद यांनी करून ठेवली आहे. आम्ही ती साफ करायला गेलो तर तुमच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करू असे तुम्ही सांगता. गदिमांच्या खोलीची ही अवस्था तुम्ही केली आहे. याची जरातरी लाज असेल तर माझ्याविरुद्ध अशा खोट्या पोस्ट टाकू नकोस, यावरूनच हे लोक गदिमांच्या घराची किती काळजी घेतात हे समोर येतेच. दुर्दैव की हे मला आज लोकांसमोर आणावे लागत आहे व माझी मनापासून इच्छा असूनही आम्हाला काहीही घरात करू देत नाहीत व गदिमांचे घर मुद्दामून वाईट अवस्थेमध्ये ठेऊन कुजून ते पडावे म्हणजे तुम्ही ते बिल्डर ला विकायला मोकळे. हे लोग गदिमांच्या घराची वाट लावत आहेत..माझ्यावर खोटे आरोप करताना जरा तरी लाज बाळगा.

गदिमांचा दुर्दैवी नातू

सुमित्र श्रीधर माडगूळकर

राहुल म्हणाले- देश चालवणे मोदींच्या आवाक्यात नाही:सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका यासारखी 7 आवाहने उपदेश नाहीत, अपयशाचे पुरावे

नवी दिल्ली- राहुल गांधींनी सोमवारी पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ‘सात आवाहनांवर’ पलटवार केला. त्यांनी याला अपयश म्हटले. ते म्हणाले की, आता देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

X वरील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिले, ‘काल मोदीजींनी जनतेकडून त्याग मागितला. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत. हे अपयश आहे.’

ते म्हणाले, ’12 वर्षांत देशाला अशा टप्प्यावर आणले आहे की जनतेला सांगावे लागत आहे. काय खरेदी करावे, काय नाही. कुठे जावे, कुठे नाही.’ खरेतर, रविवारी सिकंदराबाद येथील एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवर भर दिला होता, जेणेकरून परकीय चलनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
पंतप्रधानांनी म्हटले होते- भारतात तेलाच्या विहिरी नाहीत, पेट्रोल कमी वापरा

पंतप्रधान मोदींनी रविवारी सांगितले होते की, ‘आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शेजारील युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम झाला आहे, कारण आपल्याकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत.’
पेट्रोल, गॅस आणि डिझेल वाचवण्यासाठी आपल्याला वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे.
अनावश्यक वाहन वापर कमी करा. मेट्रोने प्रवास करा आणि कारपूलिंग करा. जास्तीत जास्त लोकांना त्यात बसवून घेऊन जा.
प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर थोडा कमी केल्यास परकीय चलनाची बचत होईल आणि लोकांचे आरोग्यही सुधारेल.
देशाने रासायनिक खतांचा वापर अर्धा करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे आणि नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल केली पाहिजे.
लग्नसमारंभ, सुट्ट्या आणि इतर कारणांमुळे परदेश प्रवास काही काळासाठी पुढे ढकलणे देशहिताचे ठरेल.
सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. देशहितासाठी लोकांनी एक वर्षापर्यंत सोने खरेदी करणे आणि दान करणे टाळावे.

नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’ : हर्षवर्धन सपकाळ.

देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा परिपाक, देश चालवण्यात ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल.

जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन करत असताना मोदी सरकार निवडणुका, जाहिराती व धर्मांधता पसरवण्यात व्यस्त होते..

मुंबई, दि. ११ मे २०२६.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का ? असा संतप्त प्रश्न विचारून, प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’, ही १४० कोटी जनतेची भावना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा: PM मोदींचे आवाहन, भारतात मोठ्या तेलाच्या विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज

पंतप्रधान मोदींचे ५ महत्त्वाचे मुद्दे…..

एक वर्षासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन – सोन्याच्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. राष्ट्रीय हितासाठी, लोकांनी एक वर्ष सोने खरेदी करणे किंवा दान करणे टाळावे.
पेट्रोल आणि डिझेल वाचवा, कारपूलिंग करा – वाहनांचा अनावश्यक वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि कारपूलिंग करा. या मार्गांवर शक्य तितक्या जास्त लोकांना घेऊन प्रवास करा.
खाद्यतेलाचा वापर कमी करण्यावर भर – जर प्रत्येक कुटुंबाने खाद्यतेलाचा वापर कमी केला, तर परकीय चलन वाचेल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल.
रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीचा अवलंब करा – देशाने रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगाने नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे.
परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन – जागतिक परिस्थिती आणि महागड्या इंधनामुळे भारत वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करत आहे. त्यामुळे, लग्न, सुट्ट्या आणि इतर कारणांसाठीचा परदेश प्रवास काही काळासाठी पुढे ढकलणे हे राष्ट्रहिताचे ठरेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले- आपण एकजूट होऊन राष्ट्रहितासाठी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.

हैद्राबाद/बेंगळूरू -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शेजारील युद्धामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत.पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये सांगितले की, भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम जास्त आहे, आपल्याकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत.ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. कारपूलिंग करावे. आज वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे.यापूर्वी पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये सांगितले की, DMK ने नेहमीच काँग्रेसच्या हितासाठी काम केले, परंतु सत्तेचे समीकरण बदलताच, काँग्रेसने पहिल्याच संधीवर DMK च्या पाठीत खंजीर खुपसला.
पश्चिम आशियाई संघर्षाच्या परिणामाचा संदर्भ देत नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा पुरवठा साखळी सतत संकटात असते, तेव्हा कितीही उपाययोजना केल्या तरी अडचणी वाढतच जातात. त्यामुळे, देश आणि भारतमातेला सर्वोच्च स्थानी ठेवून आपण आता एकजुटीने लढा दिला पाहिजे.

ते म्हणाले की, देशभक्ती म्हणजे केवळ देशासाठी प्राण देणे नव्हे. देशासाठी जगणे आणि आपली कर्तव्ये पार पाडणे ही सुद्धा देशभक्तीच आहे.

मोदी म्हणाले- जनता आता घराणेशाहीला नव्हे, तर विश्वासार्हतेला पसंती देत ​​आहे.

सिकंदराबाद येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, भाजपचा आसामपासून ओडिशापर्यंत आणि बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत झालेला विस्तार हा केवळ एक निवडणुकीतील विजय नाही, तर देशाच्या राजकीय विचारांमधील बदलाचे ते एक चिन्ह आहे. जनता आता घराणेशाही आणि कुटुंबवादाला नव्हे, तर विश्वासार्हतेला पसंती देत ​​आहे.

ते म्हणाले की, १० वर्षांपूर्वी आसाममध्ये भाजपचे केवळ काही आमदार होते, पण आज तिथे तिसऱ्यांदा भाजप-एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. दहा वर्षांपूर्वी बंगालमध्ये भाजपचे केवळ तीन आमदार होते, पण आज पक्षाने २०० चा आकडा पार केला आहे. जिथे भाजपचा झेंडा फडकवणारे कोणी नव्हते, तिथे आज भाजपची सरकारे स्थापन होत आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले- बंगालच्या जनतेने गुलामगिरीच्या राजकारणाचा पराभव केला आहे.

हैदराबादमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, बंगाल म्हणजे केवळ राजकीय पक्षांचा जय-पराजय नाही, तर राज्यातील जनतेने लोकांना गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडून ठेवणाऱ्या राजकारणाचा पराभव केला आहे.

ते म्हणाले की, काँग्रेसने देशात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याचे काम केले. जेव्हा टीएमसीची स्थापना झाली, तेव्हा तिने काँग्रेसकडून या वाईट गोष्टी शिकल्या आणि डाव्यांच्या वाईट सवयीही अंगीकारल्या. यानंतर टीएमसीने भारतीय राजकारणात सर्वात घृणास्पद आणि धोकादायक मॉडेल विकसित केले.

पंतप्रधान म्हणाले- तेलंगणाच्या जनतेला येथेही भाजपचे सरकार हवे आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भाजप सरकारने आसाममध्ये हॅट-ट्रिक साधली आहे. पुदुचेरीमध्येही भाजप-एनडीए सरकार सत्तेवर परतले आहे. भाजपच्या या विजयानंतर मी तेलंगणाच्या जनतेच्या भावनाही पाहत आहे. तेलंगणामध्ये प्रत्येकजण एकच गोष्ट म्हणत आहे: यावेळी तेलंगणामध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले पाहिजे, मोदींचे सरकार स्थापन झाले पाहिजे.

काल मी बंगालमध्ये होतो. तिथे पहिल्यांदाच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. बंगालमध्ये पहिल्यांदाच प्रचंड बहुमताने भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मला दिसते आहे की, या ऐतिहासिक विजयाचा उत्साह तेलंगणामध्येही स्पष्टपणे दिसत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले- तुम्ही गुजरातइतका निधी दिलात, तर तेलंगणाचा वाटा निम्मा होईल.

हैदराबादमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले, आमचे रेवंतजी म्हणाले होते की तुम्ही राजकारणावर चर्चा करणार नाही, म्हणून मीही राजकारणावर चर्चा करणार नाही.

मला रेवंतजींना सांगायचे आहे की, गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने गुजरातला जेवढे दिले आहे, तेवढे तेलंगणाला द्यायला मी तयार आहे. परंतु असे केल्याने, तुम्हाला जे मिळत आहे ते निम्मे होईल आणि तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथे तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्यामुळे, तुम्ही फक्त माझ्याशीच संपर्क साधावा हेच उत्तम आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले- केंद्र सरकार तेलंगणाच्या विकासासाठी वेगाने काम करेल.

नरेंद्र मोदी म्हणाले, मी तेलंगणातील प्रत्येक कुटुंबाला आश्वासन देतो की, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार अधिक वेगाने काम करत राहील.

ते म्हणाले की, केंद्र सरकार ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. मलकापूर येथील नवीन इंडियन ऑइल टर्मिनलचे उद्घाटन हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे तेलंगणाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल.

गेल्या १२ वर्षांपासून आधुनिक कनेक्टिव्हिटी हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानतळांसह दळणवळणाच्या सर्व माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. या संदर्भात अंदाजे १.७५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

हैदराबादमधील मोदींच्या भाषणातील 3 महत्त्वाच्या गोष्टी…

आजच्या काळात पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर मोठ्या संयमाने केला पाहिजे. आपण आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे.
कोरोना काळात देशाने वर्क फ्रॉम होमची जी व्यवस्था विकसित केली. आज काळाची मागणी अशी आहे की, जर आपण या व्यवस्था पुन्हा सुरू केल्या तर ते देशाच्या हिताचे ठरेल.
75 वर्षांनंतर आसाममध्ये भाजप सरकारने हॅट्ट्रिक साधली आहे. पुद्दुचेरीमध्येही भाजप-एनडीए सरकार पुन्हा सत्तेत परतले आहे. या विजयानंतर मी तेलंगणाच्या लोकांच्या भावनाही पाहत आहे.
बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आदिवासी कल्याण, आरोग्य आणि डिजिटल साक्षरतेशी संबंधित ९ नवीन सेवा प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात मध्यप्रदेशसह अनेक राज्यांतून हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. यामध्ये तरुण, डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

गुरुदेव म्हणाले- भारतात नवीन आत्मविश्वास दिसत आहे

आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशात आत्मविश्वास वाढला आहे. भारत जागतिक स्तरावर मजबूत झाला आहे.

ते म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानानंतर देश अधिक स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसतो.

संस्थेने 90 लाख रोपे लावली, 550 कारागृहांमध्ये कार्यक्रम राबवणार

आर्ट ऑफ लिविंगने सांगितले की, मिशन ग्रीन अर्थ अंतर्गत गेल्या एका वर्षात 19 राज्यांमध्ये 90 लाखांहून अधिक रोपे लावली आहेत. संस्था आता 45 लाख शेवग्याची रोपे आणि 87,500 पवित्र वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करत आहे.

संस्थेने हे देखील सांगितले की, कारागृह सुधार कार्यक्रमांतर्गत 550 कारागृहांमध्ये 1,000 कार्यक्रम राबवले जातील. तसेच, महिला आणि युवा नेतृत्व कार्यक्रमांद्वारे हजारो लोकांना प्रशिक्षण दिले जाईल.

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार

ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत

  • १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन.
  • लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन.
  • भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

मुंबईमे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने भारताच्‍या ऊर्जा भविष्‍याला प्रबळ करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे. ‘पॉवरिंग अ नॉन-स्टॉप इंडिया’ या आपल्या ब्रँड वचनाला अनुसरून कंपनी विविध उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये स्थिर, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा परिसंस्था विकसित करत आहे.

भारताच्या प्रगतीसाठी ऊर्जेची स्थिरता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असलेल्‍या काळात लॉरिट्झ क्नुडसेन लो-व्होल्टेज प्रोटेक्शनपासून ते इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि कनेक्टेड लिव्हिंग तंत्रज्ञानापर्यंत सर्वच क्षेत्रांत प्रगत सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहे. ही सर्व सोल्यूशन्स कामकाज विनासायास, सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

ही कटिबद्धता सिद्ध करत, कंपनीने नुकतेच मुंबईत ग्राहक, भागीदार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणून आपल्या विस्तारित पोर्टफोलिओचे प्रदर्शन केले. याद्वारे भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान भारताच्या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रांच्या अधिक जवळ नेणे आणि उद्योगांना अधिक स्मार्ट व ऊर्जा-क्षम बनवण्यासाठी सक्षम करणे, हा यामागचा उद्देश होता.

ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडेंट दीपक शर्मा म्हणाले, “भारताच्या विकासाची गाथा स्थिर, बुद्धिमान आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेवर आधारलेली आहे. लॉरिट्झ क्नुडसेन या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही अशी सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहोत, जी जागतिक मानकांनुसार असण्‍यासह भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांशी खोलवर जोडलेली आहेत. आम्ही भारतासोबत मोठे झालो आहोतभारताकडून शिकलो आहोत, उत्पादनेही भारतातच तयार केली आहेतआता आम्ही अशा विश्वसनीय, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा यंत्रणा सुनिश्चित करत आहोत, ज्या देशाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याला बळ देतील आणि या माध्यमातून आम्ही नव्या भारताची उभारणी करत आहोत.”

लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे सीओओ नरेश कुमार म्हणाले, “लॉरिट्झ क्नुडसेनमध्ये आमचा दृष्टिकोन ‘भारतासाठी डिझाइन आणि निर्मिती’ यावर ठामपणे आधारलेला आहे. आम्ही अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहोत, जे भारतातील वातावरणातील वास्तवाशी जुळणारे आहे, मग ते शेतकऱ्याला दूरवरून सिंचन व्यवस्थापित करण्यास सक्षम करणे असो किंवा एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे असो. आमचे वेगळेपण हे मेड-इन-इंडिया नाविन्‍यतांचे रूपांतर मोठ्या प्रमाणावरील वास्तव परिणामांमध्ये करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आहे. आम्ही उत्पादने बाजारपेठेत आणण्‍यासह ऊर्जा सुलभता वाढवून आणि कार्यक्षमता वाढवून भारताच्या औद्योगिक व ऊर्जा परिवर्तनाला मोठ्या प्रमाणावर सक्षम करत आहोत.”

या इव्‍हेण्‍टमध्‍ये लॉरिट्झ क्नुडसेनने भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एका विस्तारित राष्ट्रीय धोरणाची रूपरेषा मांडली. या वर्षाच्या सुरुवातीला, ब्रँडने १०० हून अधिक शहरांमध्ये ‘टेक्नॉलॉजी डे’ उपक्रम राबवण्यास सुरुवात केली, ज्याचा उद्देश उदयोन्मुख औद्योगिक क्लस्टर्समध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा आहे. या प्रयत्‍नातून लॉरिट्झ क्नुडसेन अत्याधुनिक लो-व्होल्टेज, ऑटोमेशन, पॉवर क्वालिटी आणि सोलर सोल्यूशन्स प्रत्‍यक्ष भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आणत आहे. यामुळे फक्त महानगरांपुरते मर्यादित न राहता भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध करून देण्याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.

टेक्नॉलॉजी शोकेसची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:

हे प्रदर्शन तंत्रज्ञानाच्या चार मुख्य स्तंभांमधील (pillars) नवनवीन संशोधनांवर आधारित आहे:

प्रोटेक्‍शन आणि स्विचगियर

लॉरिट्झ क्नुडसेन त्यांच्या ७० वर्षांहून अधिक काळाचा अभियांत्रिकी वारसा आणि संशोधन व विकास (आरअँडडी) क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतिबिंब असलेल्या लो-व्होल्टेज आणि मिडियम-व्होल्टेज संरक्षण, तसेच स्विचगियर सोल्यूशन्सचा अत्याधुनिक पोर्टफोलिओ प्रदर्शित करत आहे.

  • ओमेगा युझेड एसीबी: हे नेक्‍स्‍ट-जनेरशन एअर सर्किट ब्रेकर आहे, ज्याची रचना अशा वातावरणासाठी केली गेली आहे, जिथे बिघाड होणे परवडणारे नाही. युझेड सिस्टम पारंपारिक संरक्षणाला पॉवर नेटवर्कमधील एका बुद्धिमान आणि कनेक्‍टेड पार्टनरमध्ये रूपांतरित करते. यामध्ये रिअल-टाइम सिस्टम मॉनिटरिंगसाठी इंटेलिजेंट हेल्थिनेस इंडिकेटर, अडॅप्टिव्ह एनर्जी रिडक्शन अँड इंटेलिजेंट सेफ्टी (एईआरआयएस) आणि जलद निदानासाठी एम्बेड केलेल्या क्‍यूआर कोडद्वारे इन्स्टंट ट्रिप इनसाईट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हे मोडबस टीसीपी/आयपी, एथरनेट आयपी, प्रोफायनेट आणि आयईसी ६१८५० द्वारे रिडंडंट कम्युनिकेशन, तसेच क्लास १ अचूकतेचे एनर्जी मीटरिंग प्रदान करते, ज्यामुळे वेगळ्या एमएफएमची गरज उरत नाही. १५० केएपर्यंत ब्रेकिंग क्षमतेसह युझेड कमी मालकी खर्च आणि पायाभूत सुविधांची दीर्घकालीन सुसंगतता सुनिश्चित करते.
  • एक्‍सोरा.एन डिस्ट्रिब्युशन बोर्ड: ही एक मागणीवर आधारित, मॉड्युलर डिस्ट्रिब्युशन बोर्ड यंत्रणा आहे, जी निवासी, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधांच्या वापरासाठी ३० हून अधिक कॉन्फिगरेशनसह विद्युत वितरणाची नवीन व्याख्या करते. आयईसी ६१४३९-१ आणि ३ चे पूर्णपणे पालन करणारे हे बोर्ड आयपी५४ प्रोटेक्शन, ऑफ-साइट वायरिंगसाठी रिमूव्हेबल चेसिस आणि लोडमधील बदल किंवा अपग्रेड स्वीकारणारी भविष्यासाठी सज्ज रचनायांसह येते. यामध्ये ईव्ही चार्जिंग, वाय-फाय/ओएनटी आणि मिवान बांधकामासाठी विशेष प्रकार उपलब्ध आहेत.
  • टीएमझेड: हे एक बुद्धिमान, रिअल-टाइम तापमान देखरेख सोल्यूशन आहे, जे इलेक्ट्रिकल स्विचबोर्डची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. बसबार आणि जॉइंट्स यांसारख्या गंभीर ठिकाणांवरील तापमानाची सतत नोंद ठेवून टीएमझेड ओव्हरलोडिंग किंवा सिस्टममधील त्रुटींमुळे होणाऱ्या ओव्हरहीटिंगची सुरुवातीची चिन्हे शोधण्यात मदत करते. आठ एनटीसी थर्मिस्टर्सनी सुसज्ज असलेले आणि झेडजी१००० गेटवे द्वारे वायरलेस कम्युनिकेशनची सुविधा असलेले हे साधन  मोडबस टीसीपी/आयपी/एथरनेट द्वारे कंट्रोल रूमला डेटा विनासायासपणे पाठवते. तापमान निरीक्षणाचे रूपांतर एका निरंतर, डिजिटल आणि भविष्यवेधी क्षमतेत करून टीएमझेड संस्थांना केवळ बिघाड झाल्यावर दुरुस्ती करण्याऐवजी जोखमींचा अंदाज घेण्यास, बिघाड रोखण्यास आणि विनाव्‍यत्‍यय कामकाज सुनिश्चित करण्यास सक्षम करते.
  • न्‍यूमरल रिलेज: न्‍यूमरल सिरीजमधील ड्रॉ-आउट न्यूमेरिकल प्रोटेक्शन रिलेज आधुनिक पॉवर सिस्टमसाठी सर्वसमावेशक संरक्षण, नियंत्रण आणि देखरेख प्रदान करतात. बुद्धिमान संरक्षण अल्गोरिदमद्वारे समर्थित न्‍यूमरल रिलेज उत्कृष्ट संवेदनशीलता, अचूक निवड आणि हाय-स्पीड फॉल्ट क्लिअरन्स सुनिश्चित करतात. यामुळे विविध औद्योगिक आणि युटिलिटी उपयोगांमध्ये विश्वासार्ह आणि समन्वित पॉवर सिस्टम संरक्षण मिळते. या उत्पादन श्रेणीमध्ये फीडर प्रोटेक्शन रिलेज, मोटर प्रोटेक्शन रिलेज आणि प्रतिबंधित अर्थ फॉल्ट (आरईएफ), न्यूट्रल डिस्प्लेसमेंट, रिव्हर्स पॉवर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी प्रोटेक्शन यांसारखी समर्पित संरक्षण सोल्यूशन्स समाविष्ट आहेत.

ऊर्जा आणि नवीन ऊर्जा

भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्याउद्दिष्टांशी सुसंगत राहून लॉरिट्झ क्नुडसेन आपला न्यू एनर्जी पोर्टफोलिओ सादर करत आहे. यामध्ये सौर ऊर्जा, डीसी पोर्टफोलिओ आणि ईव्ही चार्जिंग तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे सर्व विशेषतः भारतात डिझाइन केलेले आणि उत्पादित केलेले आहे.

  • सोलर इन्व्हर्टर्स: हे मेड-इन-इंडिया सोलर स्ट्रिंग इन्व्हर्टर भारतातील ग्रिड आणि हवामानाचा विचार करून तयार केले आहेत. यामध्ये प्रगत एमपीपीटी तंत्रज्ञानासह उच्‍च ऊर्जा रूपांतरण कार्यक्षमता आहे. तसेच, दिवसा जास्त वेळ वीज निर्मिती करण्यासाठी ४५ व्‍होल्‍ट इतका कमी स्टार्टअप व्होल्टेज, आरएस४८५/वाय-फाय/जीएसएमद्वारे रिमोट मॉनिटरिंग, स्थानिक डेटा स्टोरेज आणि १० वर्षांची वॉरंटी दिली जाते. याला ४० गिगावॅटहून अधिक सौर क्षेत्रातील अनुभवाचे पाठबळ आहे.
  • डीसी पोर्टफोलिओ: सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज अशा डीसी पॉवर प्रोटेक्शन आणि डिस्ट्रिब्युशन सोल्यूशन्सद्वारे अक्षय ऊर्जा, विद्युतीकरण, ऊर्जा साठवणूक आणि ग्रीन हायड्रोजनकडे होणाऱ्या जलद संक्रमणास मदत करण्यासाठी याची रचना केली आहे. आधुनिक ऊर्जा प्रणालींमध्ये डीसी हा मुख्य आधार बनत असताना हा पोर्टफोलिओ ग्राहकांना पारंपारिक एसी-केंद्रित डिझाइनकडून उच्‍च कार्यक्षमता, सुधारित सुरक्षा आणि अधिक विश्वासार्हता देणाऱ्या उच्‍च-कार्यक्षमता डीसी आर्किटेक्चरकडे वळण्यास सक्षम करतो. उच्‍च फॉल्ट करंट्स, सातत्यपूर्ण आर्शिंग आणि संवेदनशील पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या डीसी पॉवरच्या आव्हानांना हाताळण्यासाठी हे सोल्यूशन्स तयार केले गेले आहेत, ज्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये अखंडित कार्यक्षमता सुनिश्चित होते.
  • ईव्ही चार्जर्स: लॉरिट्झ क्नुडसेनचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स भारतातील परिस्थितीसाठी डिझाइन केलेली एक अखंड, स्केलेबल आणि विश्वासार्ह परिसंस्‍था प्रदान करतात. स्मार्ट एसी/डीसी चार्जर्स, एकात्मिक चार्जिंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आणि वापरण्यास सुलभ मोबाइल अॅप्लिकेशन यांचा समावेश असलेला हा पोर्टफोलिओ फॅसिलिटी मॅनेजर्सना निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी कार्यक्षम तैनाती, सुलभ ऑपरेशन आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्‍यास सक्षम करतो.

ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन

लॉरिट्झ क्नुडसेन आपला डिजिटल आणि ऑटोमेशन पोर्टफोलिओ सादर करत आहे, जो उद्योगांना केवळ बिघाड झाल्यावर दुरुस्ती करण्याच्या पद्धतीकडून भविष्यवेधी आणि माहितीवर आधारित कार्यप्रणालीकडे वळण्यास सक्षम करतो.

  • आयएमएमआर – इंटेलिजेंट मोटर मॅनेजमेंट रिले: हे इंटेलिजेंट मोटर कंट्रोल सेंटर (आयएमसीसी) मधील मुख्य बुद्धिमत्ता आहे. आयएमएमआर इलेक्ट्रिक मोटर्सचे सर्वसमावेशक संरक्षण, देखरेख आणि व्यवस्थापन करते. बिघाड लवकर ओळखण्यासाठी,प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स’साठी आणि अचानक येणारा डाउनटाइम कमी करण्यासाठी हे सतत रिअल-टाइम ऑपरेशन्स आणि निदानाचा डेटा संकलित करते. मोडबस आरटीयू, मोडबस टीसीपी/आयपी, एथरनेट आयपी, प्रोफायनेट आणि प्रोफायनेट डीपीच्या पाठिंब्यासह हे पीएलसी, डीसीएस आणि एससीएडीए सिस्‍टममध्‍ये विनासायासपणे जोडले जाऊ शकते. याची संक्षिप्त रचना आणि प्री-प्रोग्राम्ड स्टार्टर लॉजिकमुळे पॅनेल वायरिंगमधील गुंतागुंत आणि कार्यान्वित करण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.
  • स्‍मार्टकॉम डिजिटल ट्विन: ही प्रत्‍यक्ष स्विचबोर्डची एक अत्यंत अचूक आणि रिअल-टाइम डिजिटल प्रतिकृती आहे, जी सेन्सर्सच्या माध्यमातून वास्तविक ऑपरेटिंग परिस्थितीचे प्रतिबिंब दाखवते. हे प्रेडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स सक्षम करते, जे बिघाडाचा प्रकार, त्याची तीव्रता आणि अचूक स्थान ओळखते, ज्यामुळे दोष निवारणाचा वेळ आणि अनपेक्षित डाउनटाइम कमी होतो. डिजिटल ट्विन फॉरवर्ड-लुकिंग सिम्युलेशनची सुविधा देते, ज्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष ऑपरेशन्सवर कोणताही परिणाम न करता, बदलता लोड, तापमान किंवा कार्यात्मक ताण या परिस्थितीत स्विचबोर्डच्या वर्तनाचे मूल्यमापन करता येते.
  • अॅग्री ऑटोमेशन पोर्टफोलिओ: ही एक बुद्धिमान, एकमेकांशी जोडलेली आणि शेतकरी-केंद्रित ऑटोमेशन परिसंस्‍था आहे. यामध्ये सिंचन ऑटोमेशन, फर्टिगेशन (खत आणि पाणी व्यवस्थापन), मोटर आणि पंप ऑटोमेशन, सेन्सर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. वेळ-आधारित, प्रमाण-आधारित आणि सेन्सर-आधारित ऑटोमेशनची सांगड स्‍मार्टकॉम प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल आणि क्लाउड कनेक्टिव्हिटीशी घालून हा पोर्टफोलिओ संपूर्ण भारतातील लहान, मध्यम आणि मोठ्या कृषी उद्योगांसाठी डेटा-आधारित आणि शाश्वत शेती सक्षम करतो.

होम आणि बिल्डिंग टेक्नॉलॉजीज (गृह आणि इमारत तंत्रज्ञान)

लॉरिट्झ क्नुडसेन या प्रदर्शनात प्रीमियम स्मार्ट होम आणि बिल्डिंग ऑटोमेशन तंत्रज्ञान सादर करत आहे, जे एकमेकांशी जोडलेली आणि ऊर्जा-कार्यक्षम राहणीमान व कामाची ठिकाणे सक्षम करतात.

  • एनकनेक्‍ट होम ऑटोमेशन: हे एक वायरलेस आणि वाय-फाय सक्षम होम ऑटोमेशन सोल्यूशन आहे, जे स्पर्श , मोबाइल अॅप किंवा व्हॉइस कमांडद्वारे दिवे, पंखे, एअर कंडिशनर्स आणि पडद्यांचे अखंड नियंत्रण देते. हे मॉड्युलर असून सर्व प्रकारच्या घरांसाठी ‘रेट्रोफिट-कंपॅटिबल’ (जुने बदल न करता बसवता येणारे) आहे, ज्यासाठी कोणत्याही नवीन वायरिंगची आवश्यकता नसते आणि कोणताही स्थानिक इलेक्ट्रिशियन ते बसवू शकतो. भविष्यासाठी सज्ज प्लॅटफॉर्म म्हणून डिझाइन केलेले एनकनेक्‍ट, सोलर इन्व्हर्टर आणि स्मार्ट लॉकशी जोडले जाऊ शकते. एनकनेक्‍टमध्ये स्‍मार्ट डीबी देखील समाविष्ट आहे, जे लॉरिट्झ क्नुडसेनचे एक बुद्धिमान फायनल डिस्ट्रिब्युशन बोर्ड आहे. हे औद्योगिक, पायाभूत सुविधा आणि घरगुती वापराच्या दैनंदिन इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये संवाद आणि रिमोट मॅनेजमेंटची क्षमता प्रदान करते.

हे टेक्नॉलॉजी शोकेस भारतातील उद्योग, युटिलिटीज, पायाभूत सुविधा विकासक आणि बिल्डिंग प्रोफेशनल्ससाठी एक धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदार म्हणून लॉरिट्झ क्नुडसेनचे स्थान अधिक मजबूत करते. सात दशकांहून अधिकचा अभियांत्रिकी वारसा, मेक-इन-इंडियाचा मजबूत उत्पादन पाया आणि वाढता डिजिटल पोर्टफोलिओ यासह लॉरिट्झ क्नुडसेन भारताच्या इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन परिसंस्‍थेच्या भविष्याला आकार देणे सुरू ठेवत आह

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : तुमच्या बालसाहित्याला पुरस्कार मिळाला आणि तुम्ही समाधानी असाल, तर प्रॉब्लेम आहे. असे करू नका, तुमच्या लिखाणात विविधता आणा, विविध प्रयोग करा. सिंदबादच्या सात सफरी आल्या पण पुढच्या कोणी का लिहिल्या नाहीत याचा विचार करणे आवश्यक आहे. आज बालसाहित्यिकांनी तीन पातळीवर काम करायला हवे. मराठीत काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय आहे, हे सर्व अभ्यासून लिखाण करणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी दिला.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी (दि.१०) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे मंचावर होते. क्षिप्रा शहाणे यांना लोखंडे-जोशी पुरस्कार, प्रिया फुलंब्रीकर यांना कवी ग. ह. पाटील पुरस्कार, डॉ. प्रतिमा जगताप यांना वा. गो. आपटे पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांना आनंद मासिक पुरस्कार, संध्या देवरूखकर यांना रा. वा. शेवडे गुरूजी पुरस्कार, पुंडलिक वझे यांना सर्जेराव जगताप पुरस्कार, संजय काकडे यांना बा. रा. मोडक पुरस्कार, बाबूराव शिरसाट यांना दयार्णव कोपर्डीकर पुरस्कार, डॉ. प्रसन्न दाभोळकर यांना सुधाकर प्रभू पुरस्कार आणि बबन शिंदे यांना अमरेंद्र गाडगीळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजीव तांबे म्हणाले, मुलांना भविष्यात काय पहायचे आहे त्यावर लिहा. नाविन्यपूर्ण काम करा. आपल्या दृष्टीकोनाचा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाला, एआयला विरोध करून चालणार नाही. त्याच्या मदतीने पुढे जायला हवे. आपण अपडेट व्हायला हवे. आपण लिखाणात कमी पडतो; मुलांत मिसळायला कमी पडतो. मूल्ये जुनीच आहेत, पण ती नव्या पद्धतीने लिहायला हवीत. लेखक म्हणून जेवढे असमाधानी असू तेवढे अधिक चांगले काम होईल.

पंडित विद्यासागर म्हणाले, बालसाहित्य म्हणजे जादू, चेटकीण अशा गोष्टी. पण आता नवीन पिढीला काही तरी वेगळे हवे आहे. वेगळेपण दिले तर ते मुलांना आवडते. इंग्रजी भाषेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना मराठी वाचायला आवडत नाही. त्यामुळे नवीन प्रयोग करायला हवेत. सरकारचे धोरण निराशाजनक आहे.‌ त्यामुळे लेखकांना त्यांचा मार्ग शोधावा लागेल.

प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी म्हणाले, बालकुमार साहित्याला पुरस्कार देणारी बालकुमार ही एकमेव संस्था आहे. याची दखल सरकारने देखील घेतली आणि पुरस्कार देणे सुरू केले. संस्थेचे १९ पुरस्कार आहेत; पण सर्व प्रकारात लेखक लिहित नाहीत ही आमची खंत आहे. मुलांना वाचनाची गोडी कशी लागेल याचा विचार व्हायला हवा.

प्रसाद भडसावळे म्हणाले, परीक्षणासाठी बरीच पुस्तके आली. पण त्यात कवितेची अधिक होती. बालसाहित्यात वास्तववाद अधिक होता. मुलांसाठी एवढा वास्तववाद योग्य आहे का याचा विचार लेखकांनी करावा.

माधव राजगुरू म्हणाले, आज मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य लिहिले जाते. पण ही संख्यात्मक वाढ आहे. दर्जा राहिलेला नाही. बालसाहित्याचा मूळ झरा आटत चालला आहे का अशी स्थिती आहे. बालसाहित्यात संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ व्हायला हवी.

वर्षा तोडमल म्हणाल्या, मराठी भाषेत ९४ हजार मुले नापास होतात, ही बातमी वाचली आणि हळहळ वाटली. इंग्रजीचा प्रभाव हे एक कारण आहे. भाषेच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रम आखले गेले नसावेत‌. मुलांच्या हातात पुस्तके हवीत; पण त्यांच्या हातात मोबाईल आहे. यावर जाणिवपूर्वक काम केले पाहिजे. भाषिक संस्कार हरवलाय‌.

सूत्रसंचालन प्रज्ञा देशपांडे यांनी केले, आभार संदीप तापकीर यांनी मानले.

हिंदुत्वाच्या स्पष्टतेतूनच राष्ट्रीय एकता निर्माण होईल-सुनील आंबेकरअखिल भारतीय प्रचार प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पुणे
“विश्वकल्याणाचा भाव असलेले हिंदुत्व हीच या राष्ट्राची खरी ओळख आहे.हिंदुत्वाच्या विचारात स्पष्टता आली,तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकता निर्माण होईल आणि त्यातूनच राष्ट्राची पुढील दिशा स्पष्ट होईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

कर्वेनगर येथील कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातील के बी जोशी सभागृहामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजी भागाच्या वतीने आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ भूषण पटवर्धन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क विभागाचे कार्यालय प्रमुख प्रणव पवार आणि छत्रपती संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास यांची उपस्थिती होती.

समाजाचा पाठिंबा हाच संघकार्याचा आधार असल्याचे नमूद करून सुनील आंबेकर म्हणाले, “संघ स्वयंसेवकांची साधना ओळखून समाजाने विपरित परिस्थितीत संघाला साथ दिली.आता व्यक्ति निर्माणाचे कार्य प्रत्येक कुटुंबात पोहोचणे आवश्यक आहे.केवळ संघाच्या भरवशावर समाजपरिवर्तन शक्य नाही; त्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे.समाजाचे अवलंबित्व कमी करून स्वावलंबी व्यवस्था निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे.” मुस्लिम प्रश्न हा संघाच्या स्थापनेपूर्वीपासून असून,संघ तो सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतीय ज्ञानाचे पुनरुज्जीवन : डॉ. पटवर्धन
डॉ भूषण पटवर्धन यांनी शिक्षण पद्धतीवर भाष्य करताना भारतीय ज्ञानावर विश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “सध्या शिक्षणात पाश्चात्य ‘मोनोकल्चर’चा प्रभाव वाढला असून,आहार,विहार आणि विचारांतून भारतीयत्व हरवत चालले आहे.भारतीय ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून जगासमोर मांडण्याची गरज आहे. मानव्यशास्त्रात जागतिक दर्जाच्या संस्था भारतात उभ्या राहायला हव्यात आणि डेक्कन कॉलेजमध्ये ते सामर्थ्य आहे.”

सुनील आंबेकर म्हणाले :

  • लोकशाही रक्षण : आणीबाणीच्या काळात स्वयंसेवकांनी संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी मोठे योगदान दिले.
  • मतांतरण व जागृती : लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि मतांतरण रोखण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर हिंदू समाजाने संघटित आणि जागृत राहणे गरजेचे आहे.
  • युवा संवाद : नवीन पिढीशी प्रभावी संवाद साधून त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत त्यांना राष्ट्रकार्यात सोबत घ्यायला हवे-