Home Blog Page 536

अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्याबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला: नाना पटोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी.

नागपूर, दि. १८ डिसेंबर २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

विरोधी पक्षनेते पदाबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.

विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे व ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

परभणी व बीड प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करा – रमेश बागवे

परभणी दलित युवक सोमनाथ सूर्यवंशी व बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा – रमेश बागवे
पुणे – परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे .
आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले .
येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला .
या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली .
१) मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे.२) संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

३) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.
वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते .यावेळी अंकल सोनवणे,अरुण गायकवाड सरचिटणीस
रमेश सकट ,कार्याध्यक्ष ,पुणे शहर,विठ्ठल थोरात समन्वयक मा.ए.आ. म. राज्य ,मिलिंद अहिरे,दयानंद अडागळे उपाध्यक्ष पुणे शहर ,राजश्रीताई अडसूळ,महिला अध्यक्ष पुणे शहर,रवी पाटोळे,सुरेखा खंडाळे अध्यक्ष महिला आघाडी पुणे शहर व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

पुणे, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२५ मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या mpsc.gov.in व mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव र.प्र. ओतारी यांनी कळविली आहे.

शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-२०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आयोगाच्या व विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवून याबाबत दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे, दि. १८ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी (MPSC CID & JMFC) यांची निवड केली जाते. त्यातील काही दंडाधिकाऱ्यांना कालांतराने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळते. मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना ११ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु.१० हजार मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन व आकस्मिक खर्च म्हणून एकवेळ रु.१२ हजार अदा करण्यात येणार आहेत. तसेच प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यासंदर्भात संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ११४ विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. हे प्रशिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, स्पेक्ट्रम अकेडमी, नाशिक व संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण वर्गामार्फत राबविले जाणार आहे.

महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करण्यासाठी “सारथी” ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्याच्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण तुकडीस सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री अजित निबाळकर, भा.प्र.से. (से.नि.) यांनी शुभेच्छा दिल्या असून सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याबाबत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा

0

ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना

मुंबई, दि. १८  डिसेंबर २०२४ : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन  वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांना लकी ड्रॉव्दारे  स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे  दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम रु. १००/- असणे आवश्यक आहे. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम रु.१०/- पेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र असेल.

मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी..

छगन भुजबळ यांचा OBC एल्गार पुकारण्याचा निर्धार

‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’

नाशिक – मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी… मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी… अशी शायरी म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.राज्यमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात राज्यभरात रान पेटवण्याचे संकेत दिलेत. माझ्या मनात अवहेलनेचे शल्य डाचत आहे. त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आपल्यावर अनेक संकटे येतील, पण आपल्याला सावधपणे पुढे जावे लागेल, असे ते म्हणालेत. भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

छगन भुजबळ समर्थकांचा बुधवारी नाशिकच्या येवल्यात मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल. हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल. त्यात मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे आपले प्रश्न असतील, तिथे आपण एकजुटीने राहू. मी कायम तुमच्यासोबत असेल. हिंमत ठेवा. वाटा पाहा. तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा. कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल.

मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी प्रफुल पटेल यांनी पराकाष्ठा केली. सुनील तटकरेंनीही केली. एवढेच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असा आग्रह धरला. ते सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते. हे चुकीचे आहे असे करू नका असे ते म्हणाले. पण शेवटी मला घेतलेच नाही. आता हे झाले ते झाले, कुणी केले, याने केले, त्याने केले असे काही नाही. कोणत्याही बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही. प्रत्येक पक्षाचा नेता, विधिमंडळाचा नेता तोच त्या पक्षातील निर्णय घेत असतो, असे सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.

भुजबळ पुढे म्हणाले, हा माझ्या मंत्रि‍पदाचा प्रश्न नाही, समाजाचे जे प्रश्न उभे राहतील त्यावेळी संरक्षणाची ढाल कोण उभी करणार? हा खरा प्रश्न आहे. मंत्रि‍पदे किती वेळा आली आणि गेलीत. विरोधी पक्षातही बसावे लागले, पण त्याचे दु:ख नाही. ओबीसींनी महायुती सरकार आणले मग असे का? यामागचा हेतू काय? असा प्रश्न आहे. मंत्रिपद नसले तरी रस्त्यावर लढू, सभागृहात भांडू पण थेट अवहेलना करण्याचे शल्य मनात डाचत आहे.

घाईघाईत प्रश्न सुटत नाही. विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी मला तुमची साथ हवी. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, शक्ती एकटवण्यासाठी निदर्शने सुरू राहतील. संयमाने सगळे करावे लागेल. जिथे जिथे मला आमंत्रण येणार तिथे मी जाणार आहे. मंत्रि‍पदावर नसलो तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत, शेवटचा श्वासापर्यंत मागासवर्गीयांसाठी लढणार आहे. कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाही. मी तुमच्यासोबत राहणार आहे. अनेक राज्यातील, देशातील लोक आपल्यासोबत आहेत. हिंमत ठेवा, वाट पाहा. पुढे आणखी काही संकटे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पेटवावा लागेल, असे नमूद करत भुजबळांनी यावेळी स्वपक्षालाच आव्हान देण्याचे संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आले. पण आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, असे म्हणत छगन भुजबळांनी यावेळी राष्ट्रवादीसह महायुतीलाही सूचक इशारा दिला.

छगन भुजबळ म्हणाले, आमदार होणे किंवा मंत्री होणे हे माझे काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबरला इकडे आलो नसतो. मी राजीनामा दिला होता, पण त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण मला तसे सारखे फोन येत होते. त्यानंतर अडीच महिन्यांनी मी राजीनामा दिल्याचे उघड केले होते. माझ्याविरोधात अर्वाच्य बोलण्यात आले तेव्ही मी ती गोष्ट उघड केली.

आता प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसे आपल्याकडे आहेत. पण कुणीही दुःखात राहण्याचे कारण नाही. ‘कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर’, असे ते उपस्थितांचे मनोबल वाढवताना म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे व मराठा आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातील इतर राज्यांतील आंदोलने शमली होती. पण मराठा समाज हा ईडब्ल्यूएसमध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे हे माझे नव्हे तर त्यांचेच म्हणणे आहे. मी मार्ग काढण्यास तयार आहे, पण तुमच्याशी चर्चा करण्यास नाही.

आपण कुणीही मराठा विरोधी नाही. पण आपल्यावर कुरघोडी करण्याचा जो कुणी प्रयत्न करत आहे, त्यांना विरोध करणे हे तुमचे व माझे काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरे जाळा, शिक्षणसंस्था जाळा या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडले आणि मी त्या संकटात उभा राहिलो होतो. तेव्हा जनताच नव्हे तर नेतेही घाबरले होते. पण त्यावेळी हा छगन भुजबळ एकटा उभा टाकला होता.

छगन भुजबळ म्हणाले, आपण सर्वजण एकजूट झालो. ओबीसी मंडळी एकजूट झाली. त्यामुळे एक है तो सेफ है हे आपल्याला अशाही पद्धतीने समजले. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी आरक्षण मिळाले तेव्हा त्यात 250 जाती होत्या, आता हा आकडा 375 वर गेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

आपली माणसे राजकारणात अजूनही कच्ची आहेत. जे निवडून येतात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचे काही चुकत आहे असे मी म्हणणार नाही. पण माझ्याही मतदारसंघात एक सलाईन लावलेला महाशय आला होता. माझे काय होणार हे मला माहिती नाही पण या माणसाला पाडा म्हणजे पाडा असे तो म्हणाला होता. त्यामुळे माझी 60 ते 70 हजार मते कमी झाली. हिंदू – मुस्लिम या सर्वांची मते कमी झाली. दलित, ओबीसी, गुजराती आदी सर्वच समाज एकत्र आले आणि मला निवडून दिले, असे ते म्हणाले.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद अधिवेशन व साहित्य संमेलन पुण्यात 

परिषदेचे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलन भव्य शोभायात्रेने होणार गुरुवारी (दि.१९) प्रारंभ
पुणे : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि.१९ ते २२ डिसेंबर दरम्यान स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले असून चार दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व साहित्य मंचचे श्याम भुर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला स्वागताध्यक्ष अजय कारेकर, उदयराव गडकरी,संजय चाचड, रवींद्र महिमकर, यजमान संस्थेच्या चिटणीस अरूणा गडकरी,रत्नाकर काकतीकर,कुमार अणवेकर आदी उपस्थित होते.

गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रेने सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.   नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक  जनजागृती करण्यात येणार आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन देखील होईल. नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट,डॉ आनंद पेडणेकर आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित रतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता पहिल्या सत्रामध्ये समाजकार्यातील ज्ञातीचे योगदान या विषयावर चर्चा होणार आहे. तर, दुपारी ४.३० वाजता नोकरी की सुवर्णकारागिरी आणि सामाजिक कार्यात युवांची वानवा याविषयावर तज्ज्ञ आपले विचार व्यक्त करणार आहेत. तिसऱ्या सत्रात ज्ञाती पत्रके व समाजप्रबोधन यावर मार्गदर्शन करण्यात येईल.

शनिवार, दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चौथ्या सत्रात कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग आणि वधूवर मेळाव्यातील आजची वास्तवता यावर विचारमंथन होणार आहे. तर शेवटच्या पाचव्या सत्रात  महिलांनो सावधान, महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा व मान्यवर विचार मांडतील.

दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नाथमाधव साहित्य पुरस्कार वितरण व विविध पुस्तकांचे प्रकाशन होईल. सायंकाळी ६ वाजता कविसंमेलनाचे देखीलh आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी, दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मन शांतीसाठी संत साहित्य याविषयावर मार्गदर्शन करण्यात येईल. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांची ग्रंथतुला होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथहंडी अंतर्गत या बाळांनो वाचू या आदि साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या कार्यक्रमाबरोबर मान्यवर आपले विचार मांडतील. तसेच कार्यकर्ता गौरव सोहळा होणार आहे. दुपारी ३ वाजता खुले अधिवेशन व समारोप होणार असून यावेळी नियामक समितीकडून आलेले लेखी ठराव व त्यावर चर्चा होणार आहे. अधिवेशन व संमेलनाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पुण्यधाम आश्रमात १५ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

पुणे-पुण्यधाम आश्रमात ‘सामुहिक विवाह’ हा भव्य वार्षिक कार्यक्रम १५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला होता. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या या १५ जोडप्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेल्या सर्वांसाठी हा खरोखरच एक हृदयस्पर्शी अनुभव होता. पुण्यधाम आश्रमाने आपल्या समाजातील अत्यंत गरजू वर्गासाठी आयोजित केलेला एक विशेष सामूहिक विवाह सोहळा, तोही कोणताही खर्च किंवा हुंडा न घेता. या अनोख्या सोहळ्याचे हे 9 वे वर्ष असून आजपर्यंत दीडशेहून अधिक जोडप्यांनी नम्र कुटुंबातून विवाहसोहळा पार पाडला आहे.

2500 हून अधिक लोकांचा उत्साह, उत्साह आणि अपेक्षा हा संसर्गजन्य होता, त्यासोबतच पुण्यधाममध्ये सर्वत्र लग्नसंस्थेची धांदल, शहनाईचा नाद, फुलांची सजावट आणि उत्सवाचे वातावरण होते.

सोनेरी-लाल साड्या, सुंदर सजवलेले दागिने आणि ‘शेरवानी, फेटे आणि मोजरी’ घातलेल्या नववधू चमकदार दिसत होत्या . वरांची बारात मिरवणूक सर्व बाराती नाचत नाचत दाखल झाली, तर वधूचे कुटुंबीय त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी, वरांनी सुंदर सजवलेल्या मंडपात आपापल्या नववधूंना सामील केल्यानंतर, विद्वान पंडितांनी लग्नाच्या विधींना सुरुवात केली. हा विवाह सोहळा पारंपारिक महाराष्ट्रीय अंतरपटात पार पडला, त्यानंतर आदरणीय पाहुण्यांच्या उपस्थितीत फेरा आणि कन्यादान समारंभ पार पडला.

“प्रत्येक वर्षी पुण्यधाम आश्रम अशा मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करतो ज्यांचे कुटुंब एका विस्तृत लग्नाचा खर्च उचलू शकत नाही. मुलींना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह एक सुंदर विवाह सोहळा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. ही अनोखी संस्था हुंडा प्रथेला परावृत्त करून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे ”, असे अध्यक्ष मा कृष्ण कश्यप यांनी सांगितले, ज्यांनी ‘मानवतेच्या माध्यमातून देवाची सेवा’ हे आपले जीवनातील ध्येय बनवले आहे!

जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या कृपाळू उपस्थितीने हा दिवस आणखी खास बनला.

सर्व पारंपारिक विधींनंतर, अध्यक्ष मा कृष्ण कश्यप, अध्यक्ष सदानंद शेट्टी, विश्वस्त आणि विशेष पाहुण्यांनी तरुण जोडप्यांना भेटवस्तू आणि ट्राऊसो देऊन आशीर्वाद देण्याची वेळ आली, ज्यात घरगुती वस्तू, जेवणाचे सेट, कुकर, ब्लँकेट, नवीन वस्तू होत्या. साड्या आणि सलवार-कमीज सेट., नवविवाहित जोडप्याला त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करण्यास मदत करण्यासाठी. “आमच्या शुभेच्छा नवविवाहित जोडप्याला आहेत आणि आशा आहे की त्यांना जीवनात खरा आनंद आणि एकत्रता मिळेल”, मा कश्यप म्हणाली.

काही वर्षांपूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांना हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी एकत्र येताना पाहणे आनंददायक होते. त्यानंतर पाहुण्यांना एक भव्य महाराष्ट्रीय जेवण देण्यात आले, ज्याचा सर्वांनी मनापासून आनंद घेतला.

या अत्यंत उदात्त उपक्रमाचे संपूर्ण श्रेय माँ कृष्ण कश्यप यांना जाते, ज्यांनी या भव्य कार्यक्रमाचे अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते जे उत्तम प्रकारे पार पडले. तिच्या समर्पित पाठिंब्याशिवाय, दयाळू उपस्थिती आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमाचा कोणताही उपक्रम शक्य नाही.

शरद पवारांनी PM मोदींची घेतली भेट:मराठी साहित्य संमेलनाचे दिले निमंत्रण

0

नवी दिल्ली-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात शरद पवार यांनी मोदींना 98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. तसेच यावेळी त्यांच्याशी काही राजकीय मुद्यांवरही चर्चा केली. त्यामु्ळे या भेटीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहे.विशेष म्हणजे काँग्रेसने संसदेत अदानी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अवमाननेच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान 98 वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी, 1 दिवस अगोदर मंगळवारी त्यांनी फोनवरून मोदींशी संपर्क साधला होता. मोदींच्या भेटीनंतर शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधानांशी केवळ 5 मिनिटे भेट झाली. त्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या. त्यावर पंतप्रधानांशी चर्चा झाली. राजकीय मुद्यांवर कोणतीही चर्चा झाली. साताऱ्यातील 2 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेती केली. ते दोन्ही शेतकरीही माझ्यासोबत होते.

.

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांचे पंतप्रधान मोदींशीही सुमधूर संबंध आहेत. मोदी व पवार या दोघांनीही अनेकदा एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. मुंबईत अदानी यांच्या धारावी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. याशिवाय मंत्र्यांचे खातेवाटपही रखडले आहे. त्यामुळे शरद पवारांनी मोदींशी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्रातील बदलले समीकरण, शिवसेना नेत्यांची विधाने व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर उभयंतांत झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राहुल म्हणाले- मनुस्मृती मानणाऱ्यांना आंबेडकरांची अडचण:शहा म्हणाले होते- काँग्रेसने आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान सांगितले-

(कॉंग्रेसने X वर प्रसारित केलेला हा व्हिडीओ आहे. )

आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर… देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात मिळाला असता.

काँग्रेसने अमित शहांचे हे वक्तव्य आंबेडकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे- मनुस्मृती मानणाऱ्यांना आंबेडकरांचा नक्कीच त्रास होईल.

त्याचवेळी जयराम रमेश बुधवारी म्हणाले – शहा यांनी संसदेत बाबासाहेब आणि आंबेडकरांचा अपमान केला. पीएम मोदीही आंबेडकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्यासाठी खोटे बोलणे सर्वोच्च आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे भाजप आणि आरएसएसच्या तिरंग्याच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला. पहिल्या दिवसापासून संघ परिवारातील लोकांना भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती.

आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही, त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रचंड द्वेष आहे. ते दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांचे मसिहा आहेत आणि राहतील.

वन नेशन वन इलेक्शन विधेयक म्हणजे हुकुमशाहीचा प्रारंभ :नेत्यांमध्ये भीती राहणार नाही, ते मनमानी करतील : आप खासदार

नवीदिल्ली-संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज, बुधवारी १८ वा दिवस आहे. वन नेशन वन इलेक्शन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. त्याला विरोधक सातत्याने विरोध करत आहेत.आप खासदार संजय सिंह म्हणाले- वन नेशन वन इलेक्शन विधेयक देशात हुकूमशाही आणेल. तोडफोडीतून सरकारे स्थापन होतील. नेत्यांना निवडणुकीत जायचे असेल तर त्यांच्या मनात एक भीती असते- ते महागाई कमी करतात.ते लोकहिताचे निर्णय घेतात. पण 5 वर्षात निवडणुकीला जाण्याची भीती राहणार नाही, तेव्हा वाटेल ते करतील.

दुसरीकडे आंबेडकरांच्या अपमानावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात जय भीमच्या घोषणा दिल्या.

गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. एक दिवस आधी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानावर चर्चा केली होती. आंबेडकरांचे नाव जितक्या वेळा काँग्रेसने घेतले तितक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते, असे ते यावेळी म्हणाले होते.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू राज्यसभेत म्हणाले – बाबासाहेब आंबेडकर हयात असताना काँग्रेसने किती अपमान केला. काँग्रेसने त्यांना किती वर्षे भारतरत्न दिला नाही? 1952 मध्ये काँग्रेसने एका षड्यंत्राखाली बाबासाहेबांचा पराभव केला.

भीमरावांसारख्या माणसाला पराभूत करून त्यांनी देशाशी खेळ केला आहे. आज ते त्यांचा नावावर फसवणूक करत आहेत. मी बौद्ध आहे, मी बाबासाहेबांच्या मार्गावर चालतो. मोदीजींनी एका बौद्ध धर्मीयाला कायदामंत्री बनवले होते. हे लोक ढोंग करत आहेत, व्होट बँकेसाठी बाबासाहेबांचे नाव घेणे निषेधार्ह आहे.

कारागृह सुरक्षा व्यवस्था आधुनिकीकरण योजना:येरवड्यात कैद्यांच्या हालचालीवर देखरेखीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची बायाेमेट्रिक व्यवस्था

पुणे-कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरण याेजनेंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृहात कैद्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फुल हाईट टर्नस्टील गेट (बायाेमेट्रिक अ‍ॅक्सेस सिस्टीम), पॅनिक अर्लाम सिस्टीम व पब्लीक अ‍ॅड्रेसिंग सिस्टीम प्रणाली हरियाणातील गुरगाव येथील कंपनी इनव्हेडर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. यांचे मार्फत बसविण्यात आली आहे. सदर प्रणालीचे उदघाटन राज्य कारागृह विभागाचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांचे हस्ते करण्यात आले.

सदर प्रणाली कारागृहाचे अपर पाेलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आली. सदर उदघाटनाप्रसंगी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, इनव्हेंडर टेक्नाॅलाॅजी कंपनीचे संचालक शशांक मिश्रा, अति.अधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक डाॅ.बी.एन.ढाेले, आर.ई,गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए.एस.कांदे उपस्थित हाेते.

फुल हाईट टर्नस्टील गेट (बायाेमेट्रिक अ‍ॅक्सेस सिस्टीम) माध्यमातून बंदी, कर्मचारी व अभ्यागंताच्या हालचालीचे नियमन करता येणार आहे. त्यात केवळ अधिकृत व्यक्तींनाच कारागृहात प्रवेश करु शकतात. कैद्यांच्या मुक्त हालचाली प्रतिबंधीत हाेतील व बंदी पलायन करण्याच्या घटनांवर अंकुश लावता येईल. कैद्यांच्या व अभ्यांगतांच्या हालचालीचा मागाेवा घेता येणार आहे. कारागृह भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांचे याेग्य स्क्रीनिंग हाेईल. व्यस्त काळात व्यवस्थित हालचाल सुलभ हाेईल. उदा. राेल काॅल, देखरेखीसाठी बायाेमेट्रिक्स आणि कॅमेरे यासारख्या इतर सुरक्षा प्रणाली साेबत काम करता येईल.

पॅनिक अर्लाम सिस्टीम द्वारे आप्तकालीन परिस्थितीला जलद प्रतिसाद देण्याकरिता अधिकारी, कर्मचारी आणि बंद्यांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणाचा वापर केला जाईल. धाेक्याच्या बाबतीत त्वरीत मदतीसाठी अर्लट करता येऊ शकेल. दंगल किंवा हिंसाचाराच्या वेळी अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क करण्यासाठी पॅनिक बटणचा वापर हाेईल. वैद्यकीय मदतीसाठी त्वीत सूचना पाठविण्याची सुविधा कैद्यांना उपलब्ध हाेईल. बंदी पलायनाचा प्रयत्न व इतर अनुचित प्रकार वेळेत राेखता येतील. विशेषतः सायलेंट अर्लाममुळे अधिकाऱ्यांना गुप्त सूचना मिळतील. पब्लिक अ‍ॅड्रेसिंग सिस्टीमद्वारे प्रभावी संवाद, सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी उपयाेगी आहे. अधिकाऱ्यांना घाेषणा करण्यास आणीबाणी सूचना जारी करण्यास व कैद्यांचे वर्तन व्यवस्थापनासाठी उपयाेगी ठरणार आहे.

एका रात्रीत क्लबमध्ये खर्च केले होते ४० लाख : चॅम्पियन्स का टशन” मध्ये हनी सिंह ने सांगितली दुबईतील जुनी गोष्ट

(Sharad Lonkar)

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॉरमॅटमध्ये या वीकएंडला ख्रिसमसच्या मोसमाची मस्ती असणार आहे. या वीकएंडला रात्री 7 वाजता विशेष अतिथी म्हणून यो यो हनी सिंहचे या शोमध्ये स्वागत करतील, रेमो डिसूझा, मलाइका अरोरा, गीता कपूर आणि होस्ट हर्ष लिंबाचिया. यावेळी आव्हाने पण अनोखी असतील. सांता कलॉज मंचावर एंट्री घेईल आणि त्याच्या पोतडीतून स्पर्धकांसाठी वेगवेगळी आव्हाने निघतील, ज्यातून त्यांच्या सर्जनशीलतेची, कौशल्याची आणि टीमवर्कची कसोटी होईल.
‘बेस्ट फुट फॉरवर्ड’ चॅलेंजमध्ये अरशिया आणि अनुराधा आपले कौशल्य दाखवतील; ‘अदला बदली’ चॅलेंजमध्ये परी + फ्लोरिना आणि विवेक + अकीना यांच्या टीममध्ये अंतर्गत अदलाबदली होऊन विरोधी डान्स शैलीत ते डान्स करताना दिसतील; ‘डान्स ऑफ’ या चॅलेंजमध्ये टीम SD मधून निवडलेल्या रुपसा आणि वर्तिका टीम IBD मधून निवडलेल्या शिवांशु आणि अनिकेतशी टक्कर घेतील. त्यांच्या डान्स दंगलीत इतर अतिरिक्त कोणतेही तत्व नसेल. ‘देसी प्रॉप’ चॅलेंज गंमतीदार असेल. त्यात गीता तेजस आणि आकाशला पाठवेल, तर मलाइका देबपर्णा, प्रतीक आणि सौम्याला पाठवेल. हे सगळे स्पर्धक प्रॉप वापरण्याचे कसब दाखवतील. धमाल ‘मेरी मर्जी 2.0’ मध्ये संचित आणि अनिकेत परीक्षकांनी दिलेल्या वेगवेगळ्या गाण्यांवर झटपट, सहज शैलीत बदल करून ठेका धरतील. अकीना आणि अरशिया यांच्यातील अंतिम लढत जबरदस्त असणार आहे, ती अवश्य बघा.
मजेदार प्रश्नोत्तरीत होस्ट हर्ष लिंबाचिया हनी सिंहला त्याच्या भपकेदार जीवनशैलीविषयी, भूतकाळातील प्रेम-संबंधांविषयी आणि गाजलेल्या गाण्यांविषयी प्रश्न विचारेल. एका पार्टीसाठी एका रात्रीत 40 लाख रु. खर्च केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हनी सिंहने सांगितले, “ती दुबईमधली जुनी गोष्ट आहे. जेव्हा नवी नवी प्रसिद्धी, नवे नवे पैसे मिळाले होते.. अशा वेळी मग चुका होतात. बिल आले, तोपर्यंत तो क्लब किती महागडा आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. मुली आमच्या टेबलापाशी येत होत्या, आम्हाला वाटत होते की त्या आमच्यासाठी येत आहेत. नंतर हे समजले की त्यांचे बिल देखील त्या आमच्यावर थोपत होत्या.” हर्षने त्याला विचारले, “तो कभी ऐसा हुआ कि आपका दिल टूटा हो, या आपने कभी किसी का तोड़ा है?” यावर हनी सिंह म्हणाला, “मुझ से बहुत टूटे हैं, हर 3-4 मन्थ्स में टूटते रहते हैं.” आपल्या ब्राऊन रंग या गाजलेल्या गाण्याबद्दल हनी सिंहने हसत हसत सांगितले की, “या गाण्याची प्रेरणा दुसरी तिसरी कुणी नसून मलाइका होती!”
हनी सिंहने थट्टा करत रेमोला विचारले की, ही आव्हाने खरी होती का. त्यावर रेमोने आकाश, अनिकेत आणि तेजस या स्पर्धकांना बोलावले आणि हनी सिंहला गायला सांगून त्यावर परफॉर्म करायला सांगितले आणि हे सिद्ध करून दिले की, प्रत्येक अॅक्ट अगदी अस्सल होता.

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन रात्री 7 वाजता काही अविस्मरणीय क्षण दोन टीम्सच्या दंगलीत, “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये प्रदर्शित होतील .

गदिमांच्या ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन

गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट आयोजित उपक्रमाला रसिकांची दाद

पुणे : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन्‌‍ डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला.
‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीत नाटकांच्या दरबारामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी साकारलेल्या या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. यातील नाट्यपदे, संवाद वेगळ्या धाटणीचे असून त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या नाटकामधून त्या काळातील समाजव्यवस्था, एकोपा, वर्णव्यवस्था, शिक्षण, कौटुंबिक रचना तसेच सावकारी पाशानी पिचलेला समाज या वास्तवतेचे अनुरूप दर्शन घडते.
या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‌‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे‌’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत असलेल्या वर्षा जोगळेकर यांनी नाटकाचे कथानक गोष्टी रूपाने उलगडत नेले. ‌‘खेळीमेळीने करू न्याहरी‌’, ‌‘परतल्या घरट्याला पक्षीणी‌’, ‌‘त्या ओढ्याच्या पैलथडी एक असावी झोपडी‌’, ‌‘सुटला गं सांजवारा‌’, ‌‘परतेल शिपाई माझा‌’, ‌‘हरि तुझे नाम गायीन अखंड‌’, ‌‘उजळले भाग्य आता‌’ ही पदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली.

सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी अभिवाचन केले तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ लाभली. नाटकातील पदांच्या मूळ चाली उपलब्ध न झाल्याने निनाद जाधव यांनी पदांना नव्याने समर्पक चाली लावल्या आहेत. या अनोख्या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

राम शिंदे यांनी भरला विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज; मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती

विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक 19 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. विधानसभा अध्यक्षापाठोपाठ या पदावरही भाजप दावा केला आहे. भाजप नेते नेते राम शिंदे यांचे नाव भाजपने जाहीर केले असून त्यानुसार आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड निश्चित मानली जात आहे.