Home Blog Page 535

गोदरेज प्रोफेशनलची पहिली ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून शर्वरी त्याचा चेहरा बनली आहे

·  हेअर स्टायलिस्टमधील उत्कृष्टता ब्रँड साजरा करतो आणि गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट अवॉर्डच्या विजेत्यांची घोषणा करतो

मुंबईगोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (GCPL) केसांची निगा राखणारा आणि हेअर कलरचा एक अग्रगण्य व्यावसायिक हेअर ब्रँड, गोदरेज प्रोफेशनलने बॉलीवूडची उगवती स्टार शर्वरी हिची पहिली ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटच्या ग्रँड फिनालेमध्ये हा खुलासा झाला. हेअर स्टायलिस्टना राष्ट्रीय मंचावर व्यासपीठ निर्माण करून देणारा हा उपक्रम आहे. मुंज्या, महाराज आणि वेदा यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली गेलेली शर्वरी ही ब्रँडची शैली, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाची वचनबद्धता उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. तिचे फॅशन-फॉरवर्ड व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये गोदरेज प्रोफेशनलशी अखंडपणे जुळतात, ज्यामुळे ती ब्रँडचा आदर्श चेहरा बनते.

या नवीन घडामोडीबद्दल, अभिनव ग्रांधीमहाव्यवस्थापकगोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL), म्हणतात, “शर्वरी गोदरेज प्रोफेशनलची पहिली ब्रँड ॲम्बेसेडर ठरल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. फॅशन आणि लाइफस्टाइल आयकॉन असल्याने, शर्वरी तिची स्वतंत्र शैली आणि ग्रेससाठी ओळखली जाते. केस आणि सौंदर्य उद्योगात आम्ही आमचा प्रगती तसेच विस्तार करत असतानाच गोदरेज प्रोफेशनलशी तिचा संबंध आला आहे.”

या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना शर्वरी म्हणाली, “गोदरेज प्रोफेशनलची पहिली ब्रँड ॲम्बेसेडर बनणे हा सन्मान आहे. 120 वर्षांहून अधिक काळ गोदरेज हे भारतीय कुटुंबांमधील एक विश्वासार्ह नाव आहे आणि देशातील हेअर कलरच्या क्षेत्रात त्यांनी खऱ्या अर्थाने क्रांती केली आहे. ते त्यांच्या डायमेंशन आणि कलरप्ले, या नावीन्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेच्या हेअर कलरसाठी ओळखले जातात. केस हा माझ्या शैलीचा नेहमीच एक निर्णायक भाग राहिला आहे—मग मी पडद्यावर एखादे पात्र साकारत आहे किंवा रेड कार्पेटवरील कार्यक्रमात सहभागी होत असो. त्यामुळेच गोदरेज प्रोफेशनलचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जेव्हा मला संपर्क साधण्यात आला, तेव्हा मला खूप आनंद झाला कारण ते माझ्या वैयक्तिक शैलीशी जुळते.”

2025 चे ट्रेंडिंग हेअर कलर आणि स्टाइलिंगचे शोस्टॉपरने अनावरण केल्यानंतर शर्वरी देखील चकित झाली. गोदरेज प्रोफेशनलचे  डायनॅमिक त्रिकूट – यियान्नी त्सापाटोरी, क्रिएटिव्ह डायरेक्टर – हेअर; शैलेश मूल्या, राष्ट्रीय टेक्निकल प्रमुख; आणि नजीब-उर-रहमान, टेक्निकल अँबेसेडर, या तिघांनी हे आकर्षक शोकेस तयार केले आहे. गोदरेज प्रोफेशनलने त्याच्या केसांच्या रंगांची परिमाणे आणि कलरप्ले श्रेणी देखील प्रदर्शित केली.

केशरचनाकारांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ, गोदरेज प्रोफेशनलने आपल्या ब्रँड ॲम्बेसेडरच्या अनावरणासोबतच स्पॉटलाइटच्या विजेत्यांची घोषणा केली. यासाठी आलेल्या 400+ प्रवेशांपैकी; 30 अंतिम स्पर्धकांनी एका भव्य हेअर शोमध्ये क्युरेटेड हेअर कलरचे प्रदर्शन केले. राजकोट येथील बोनान्झा ब्युटी लाउंजमधील भाविन बावलिया यांनी प्रथम स्थान पटकावले, त्यांना 5 लाख रु. आणि एका सेलिब्रिटीसोबत सहयोग करण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या करिअरमधील नक्कीच महत्त्वाचा टप्पा आहे. कोलकाता येथील कैक्सो अकादमीच्या प्रियांका सिन्हा यांनी INR 2.5 लाखांसह दुसरे स्थान पटकावले, तर बेंगळुरू येथील लालटलान किमी – लव सलोनने INR 1.5 लाखासह तिसरे स्थान पटकावले. ख्यातनाम स्टायलिस्ट यियान्नी त्सापाटोरी, (क्रिएटिव्ह डायरेक्टर – हेअरगोदरेज प्रोफेशनल)मोनिका बहल (सीईओ ऑफ ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल)आणि कनिष्क रामचंदानी (संपादकव्यावसायिक सौंदर्य हेअरड्रेसर्सचे जर्नल इंडिया); विशेष ज्युरीसह – अभिनेत्री अदा खान आणि हेली शाह यांनी विजेत्यांची निवड केली.

स्पॉटलाइटद्वारे निवडलेल्या 30 हेअर स्टायलिस्टने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (NCVET) साठी राष्ट्रीय परिषद (NCVET) च्या ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (B&WSSC) कडून ‘रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ प्रमाणपत्र मिळवले होते. राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) भारत सरकारसोबत जोडलेले असून या कार्यक्रमाद्वारे केशरचनाकारांना त्याचे प्रमाणपत्र मिळाले. 30 हेअर स्टायलिस्ट व्यावसायिक प्रयत्नांसाठी कर्ज मिळविण्यासाठी प्रमाणपत्राचा वापर करू शकतात. गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटला ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (B&WSSC) द्वारे इंडस्ट्री ट्रेड पार्टनर आणि प्रोफेशनल ब्युटी हेअरड्रेसर्स जर्नल इंडिया ट्रेड मीडिया पार्टनर म्हणून पाठबळ आहे.

ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (B&WSSC) च्या सीईओ मोनिका बहल यांनी या उपक्रमाच्या प्रभावावर भर देताना सांगितले की, “कौशल्य विकास आणि उद्योगातील भागीदारी भारतभरातील हेअरस्टायलिस्ट्सची प्रगती तसेच ओळख जागतिक स्तरावर कशी नेऊ शकते याचे गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट हे एक उत्तम उदाहरण आहे. गोदरेज प्रोफेशनलसोबत भागीदारी करून, आम्ही भारतीय प्रतिभा जागतिक स्तरावर नेत आहोत आणि सलून व्यावसायिकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या संधी निर्माण करत आहोत.”

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) चे अभिनव ग्रांधी म्हणाले, “गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइटला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचा आम्हाला अभिमान वाटतो. प्रतिभावान केशरचनाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची हे व्यासपीठ केवळ संधीच देत नाही तर शिक्षण आणि प्रशिक्षणाप्रती आमची बांधिलकी देखील दर्शवते. या उपक्रमाद्वारे, वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि एक्सपोजरसह स्टायलिस्टला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील सलून व्यावसायिकांचे पालनपोषण आणि उन्नती करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेच्या दिशेने हे आमचे एक पाऊल आहे.”

गोदरेज प्रोफेशनल स्पॉटलाइट इव्हेंटमध्ये केसांची कलात्मकता आणि फॅशनची सांगड घातली गेली. यात 300 हून अधिक हेअर स्टायलिस्ट सहभागी झाले होते. याच्या ग्लॅमरमध्ये भर घालत, प्रख्यात अभिनेता करणवीर बोहरा याने या कार्यक्रमाचे आयोजन केले, ज्यामुळे तो प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा एक संस्मरणीय उत्सव बनला.

पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद संपन्न 

महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ;  आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक यांची उपस्थिती
पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद ‘स्पेक्ट्रम २०२४’ चे आयोजन महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे करण्यात आले होते. परिषदेच्या उद््घाटन सोहळ्यास आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल  सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक, ज्येष्ठ नेत्रचिकीत्सक पद्मश्री तात्याराव लहाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.राधिका परांजपे, डॉ. नितीन कोलते, डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. वृषाली वरद आदींनी या परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बंगळुरु, ओडिसा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ञ सहभागी झाले होते.

डॉ. समर बसक म्हणाले, नव्या पिढीच्या तरुण डाॅक्टरांची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यांच्या विचारांना वेगळा पैलू असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पिढीच्या डाॅक्टरांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. हेच आयुष्याचे तत्त्वज्ञान आहे.  

डॉ. राधिका परांजपे म्हणाल्या, या परिषदेत नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यांवर सखोल चर्चा झाली. परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्र तज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते.

सेवाधर्म हाच मानव धर्म रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

; हिंदू सेवा महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु आहे. हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर स्वामी गोविंददेवगिरी महाराज, ज्योतिष तज्ञ लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड.एस. के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की, सेवा करताना कायम प्रसिद्धी पासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात.सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार  स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो मात्र अल्पसंख्यांकांची काय अवस्था इतरत्र आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेले शस्त्र, वाचन, इतिहास,स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत.पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे पण गृहस्थाश्रमापलीकडे आपण जे जे मिळाले आहे ते सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे.उपभोगाची वस्तू नाही  हि भावना असेल तर  परिवार समाज, गाव देश, राष्ट्र यांची  मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया असा संदेशही त्यांनी दिला.  

यावेळी स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भूमी समाज परंपरा यातून राष्ट्र बनते.पुण्याच्या भूमीची सेवा छ. शिवाजी महाराजांनी केली असून राजमाता जिजाऊ यांनी पुण्यभूमीत गणेशाची स्थापना केलेली आहे.सर्व संस्कारांचे शिखर सेवा असून सेवा हि पूजा आहे. दानाचा अर्थ माझ्याजवळ जे आहे त्यातील दान हे शेअरिंग असून उपकार नाही.नव्या पिढीत भाव जागरणाचे काम या हिंदू सेवा महोत्सवातून होणार आहे.

इस्कॉनचे प्रमुख गौरांग प्रभू यांनी हिंदू सनातन धर्माअंतर्गत परोपकार, आचारविचार आणि साक्षात्कार हे ३ मुद्दे येतात. ते एकमेकांशी एकरूप झाले की आत्मसाक्षात्कारातून आपण त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. हिंदू, जैन, बौद्ध, शीख यातील कोणीच वेगळे नाही सर्व एकच आहेत.असे सांगितले. तर लाभेश मुनी महाराज यांनी आपल्या गौरवशाली धर्माचा आत्मा एकच असून सेवाकुंभ सुरु झाला आहे.येणाऱ्या पिढ्यांना संस्कृतीची परिभाषा सांगताना हिंदू सेवा महोत्सव अग्रस्थानी असेल. असेही ते म्हणाले.

उच्च शिक्षित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे.

पुणे-परभणी येथे पोलीसांच्या मारहाणीमुळे उच्च शिक्षित सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याच्या चौकशीबाबत व केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्‍याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले.

निषेध व्‍यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘परभणीमध्ये झालेला प्रकार निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटूंब उघड्यावर पडले असून त्याच्या कुटूंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे व त्याला ज्या ज्या पोलीसांनी मारहाण केली त्याच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे कारण पोस्टमॉटम अहवालामध्ये तसा स्पष्ट उल्लेख पोलीसांनी मारहाण केल्याचा आलेला आहे तसेच आंदोलकांवर जे खोटे गुन्हे व कलमे पोलीसांनी दाखल केले आहेत ते त्वरीत मागे घेवून आंदोलकांची सुटका करावी.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या सडक्या मेंदूतून व त्यांच्या RSS च्या वळचळणीत त्यांची उठाठेव असल्यामुळे त्यांचा कायमच दलितांबद्दल आकस आहे. त्यातूनच काल राज्यसभेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्‍य केले त्याबद्दल त्यांनी त्वरीत माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’’

यानंतर माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच संपूर्ण देशात लोकशाहीचे राज्य असून सर्व जाती धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने संपूर्ण देशात राहत आहेत. बाबासाहेबांची महिमा तडीपार अमित शहाला काय कळणार असे बागवे यांनी सांगितले.’’

सदर आंदोलनात प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, प्रदेश प्रतिनिधी मेहबुब नदाफ, पुणे शहर काँग्रेस अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, प्रकाश पवार, सतिश पवार, नितिन परतानी, प्रियंका रणपिसे, राजेंद्र मोहिते, अनिल जाधव, सुनिल काकडे, लतेंद्र भिंगारे, विनोद रणपिसे, रमेश सोनकांबळे, संजय कवडे, ॲड. राजश्री अडसूळ, सुंदरा ओव्‍हाळ, माया डुरे, देविदास लोणकर, अर्चना शहा, सीमा सावंत, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, अविनाश अडसुळ, उहर्षद हांडे, सुरेश चौधरी, नुर शेख, संतोष हंगरगी, अनुसया गायकवाड,  आदीसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलना नंतर अप्पर जिल्हाधिकारी, पुणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

पुण्याचा रिंग रोड प्रकल्प लवकर मार्गी लावावा-आमदार शिरोळे यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठीरिंग रोड चा प्रकल्प राज्य शासनाने त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेत बोलताना काल (गुरुवारी) बोलताना केली.

या दोन्ही शहरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्यासाठी रिंग रोड प्रकल्प त्वरित होणे आवश्यक आहे, याकडे आ.शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

पुणे रिंग रोड संकल्पना सुमारे २७ वर्षापूर्वी, १९९७ च्या प्रादेशिक आराखड्यात मांडण्यात आली होती. २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पुणे रिंग रोडचे काम देण्यात आले. सुमारे १७० किलोमीटरचा हा रस्ता असून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या ट्रॅफिक समस्यांना आळा घालण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२ हजार कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रकल्पाकरिता लागणाऱ्या भूसंपादनाचे कामही ९०टक्के पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात काम काही चालू झालेलं नाही, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

सद्यस्थितीत पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे, उड्डाणपुलांचे आणि मेट्रोचे काम चालू असल्याने वाहतुकीमध्ये अडथळा येतो. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते, मनःस्ताप सहन करावा लागतो. प्रामुख्याने पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड ची संकल्पना मांडण्यात आली. पण ती साकारण्यास खूप वर्षांचा विलंब झाला आहे. त्यात भूसंपादन होऊनही काही कारणाने प्रत्यक्ष काम रखडत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही आ.शिरोळे यांनी उपस्थित केला.

गेली २७ वर्षे रखडलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी राज्य शासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंती आ.शिरोळे यांनी अध्यक्षमहोदयांना केली.

एयर इंडियातर्फे अमरावती,  येथे उभारल्या जात असलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग स्कूलसाठी ३४ ट्रेनर एयरक्राफ्टची ऑर्डर

·         एयर इंडियाने डायमंड एयरक्राफ्टकडे ३१ सिंगल इंजिन पायपर एयरक्राफ्ट आणि ३ ट्विन- इंजिन एयरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे.

·         एयरक्राफ्टचे वितरण २०२५ मध्ये सुरू होणार असून त्यामुळे एयर इंडियाची भविष्यात भारताच्या विमानवाहतूक क्षेत्राला बळकटी देण्याची बांधिलकी अधोरेखित झाली आहे

गुरुग्राम – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनीने ३४ ट्रेनर एयरक्राफ्टची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर अमरावतीमहाराष्ट्र येथे कंपनीतर्फे उभारल्या जात असलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) देण्यात आली आहे. हे एफटीओ नियामक मान्यता मिळाल्यावर २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत कार्यान्वित होईल.

या ऑर्डरमध्ये अमेरिकेतील पायपर एयरक्राफ्टकडून मागवण्यात आलेली ३१ सिंगल इंजिन एयरक्राफ्ट्स आणि ऑस्ट्रियातील डायमंड एयरक्राफ्टच्या ३ ट्विन इंजिन एयरक्राफ्ट्सचा समावेश आहे.

या एफटीओमुळे एयर इंडियाच्या Vihaan.AI या ट्रान्सफर्मेशन प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून देशातील प्रशिक्षण सुविधा बळकट करण्याची बांधिलकी आणखी मजबूत झाली आहे. यामुळे फ्लीटच्या विस्ताराबरोबरच मोठ्या संख्येने पायलट्स तयार केले जातील व स्वयंपूर्णता साध्य होईल. एफटीओ अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उभारले जात असून त्याद्वारे दरवर्षी १८० कमर्शियल पायलट्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘नवीन एफटीओ हे प्रशिक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधा विस्तारण्याच्या दिशेने उचललेले धोरणात्मक पाऊल असून त्याद्वारे एयर इंडिया तसेच भारतीय विमानवाहतूक उद्योगासाठी प्रशिक्षित पायलट्सची स्वयंपूर्ण यंत्रणा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. या ऑर्डरमुळे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग संस्थेसाठी ३४ ट्रेनर एयरक्राफ्टची मदत होणार आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली विमानवाहतूक कंपनी या नात्याने भारतासाठी गरजेच्या विमानवाहतूक सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावताना आणि सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाला हातभार लावताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे एव्हिएशन अकॅडमीचे संचालक सुनील भास्करन म्हणाले.

विमानवाहतूक प्रशिक्षणात गुंतवणूक करण्याच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून एयर इंडियाने नवीन एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमी सुरू केली आहे. गुरुग्राम येथे ६००,००० चौरस फुट जागेत वसलेली ही अकॅडमी दक्षिण आशियातील सर्वात मोठी आहे. त्याशिवाय एफटीओची घोषणा करणारी भारतातील पहिलीच विमानवाहतूक कंपनी असून त्यामुळे नजीकच्या भविष्यात भारताच्या विमानवाहतूक यंत्रणेला बळकटी देण्याची एयर इंडियाची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

अमरावती येथील एफटीओमध्ये एयर इंडिया १० एकर जागेवर अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. या जागेत डिजिटल तंत्रज्ञान असलेले वर्ग, जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम, हॉस्टेल्स, डिजिटाइज्ड ऑपरेशन्स सेंटर, देखभाल सुविधा यांचा समावेश असेल. हे एफटीओ सुरक्षेच्या उच्च मापदंडाचे पालन करून सर्वोत्तम प्रशिक्षण देण्याच्या हेतूने डिझाइन करण्यात आले आहे.

चव्हाणनगर कमानी जवळचे मोबाईल शॉपी फोडणारे बिहारी पकडले; ६५ मोबाईल हस्तगत

पुणे- धनकवडी चव्हाण नगर कमानी जवळ असलेली मोबाईल शॉपी फोडून असंख्य मोबाईल चोरून न्नेणारे बिहारी चोरते सहकारनगर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून ६५ मोबाईल आतापर्यंत हस्तगत करण्यात आले आहेत.

आंतरराज्यातील घरफोडी करणा-या टोळीकडुन जप्त केलेले १७,८२,४७९ /- रु. किं. चे. विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन पोलीस आयुक्त अमितेश कुमार र यांचे हस्ते फिर्यादी यांना परत करण्यात आले.
दि.१४/०७/२०२४ रोजी फिर्यादी यांचे चव्हाणनगर कमानी शेजारी असलेले मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन चोरुन नेले होते. त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २४६/२०२४ भा. न्या. संहिता कलम ३०५, ३३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात घरफोडीतील आरोपी नामे १) मोबीन मुन्ना देवान वय ३६ वर्षे रा. बिरता चौक बसननगर, ठाणा घोडासन राज्य बिहार २) अरुण किशोरी सहा वय ५२ वर्षे रा. वार्ड नं १७ मोतीहारी मठिया डीह , ठाणा छतावणी राज्य बिहार ३) शमसाद आलम सरजउल अन्सारी वय ३६ वर्षे रा. अठमुहाण जिल्हा मोताहारी ठाणा झादौखद राज्य बिहार यांना ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यात अटक करुन सदर आरोपीकडुन एकुण १७,८२,४७९/- रु.कि.चे. विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन जप्त केले आहेत. सदरचे मोबाईल फिर्यादी यांना पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांचे हस्ते परत केले आहेत.

बेकायदा पिस्टल विक्री: आर्यन बेलदरे नामक विद्यार्थ्याला आंबेगाव पोलीसांनी केले जेरबंद

पुणे-बेकायदेशीर रित्या पिस्टल विक्री साठी बाळगणाऱ्या आर्यन बापू बेलदरे, वय १९ वर्षे, रा. आई श्री व्हीला अर्पाटमेन्ट, फलॅट नंबर ३०४, तिसरा मजला, स्मा शन भुमी समोर, आंबेगाव बु, या विद्यार्थ्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

आंबेगाव पोलीस स्टेशनचे हददीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक प्रियंका गोरे हे तपास पथकासह दत्तनगर परीसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना खास बातमीदामार्फत माहिती मिळाली की, आई श्री व्हीला अपार्टमेटचे बाजुला एका गाईच्या गोठ्यामध्ये एक इसम अंगात काळ्या रंगाचा गोल गळयाचा टी शर्ट व काळी ट्रक पॅन्ट, अंगाने मजबुत असलेल्या इसमाकडे पिस्टल आहे. वरील बातमीप्रमाणे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. काही वेळातच बातमी प्रमाणे सदर ठिकाणी वरिल वर्णनाचा एक इसम मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नाव – १) आर्यन बापू बेलदरे, वय १९ वर्षे, काम शिक्षण, रा. आई श्री व्हीला अर्पाटमेन्ट, फलॅट नंबर ३०४, तिसरा मजला, स्मा शन भुमी समोर, आंबेगाव बु, पुणे. असे सांगितलेने सदर इसमांची अंगझडती घेता त्याचे ताब्यात एकुण ४०,१००/- रु.किं.चा एक पिस्टल व एक जिवंत राउंडसह अनाधिकाराने, बेकायदेशीररित्या गुन्हा करण्याचे उद्देशाने विक्री करीता बाळगल्याने मिळुन आले आहे. म्हणुन त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पो स्टे, गुन्हा रजि नं. १०५७/२०२४ भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, अन्वये गुन्हा दाखल केला असुन नमुद इसमास दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, प्रविणकुमार पाटील मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहा.पो. निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस अंगलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांचे पथकाने केली.

 वाचन संस्कृतीचा संदेश देत मध्य पुण्यात शोभायात्रा 

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद तर्फे आयोजन ; पुण्यात चार दिवसीय अधिवेशन व साहित्य संमेलनाचे आयोजन 
पुणे : जय जगन्नाथ शंकरशेट, जय विश्वकर्मा, जय दैवज्ञ… अशा घोषणा देत नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे आयोजित शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा संदेश दिला. 
परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आनंद पेडणेकर, अजय कारेकर, कुमार अणवेकर, सुरेंद्र शंकरशेठ, उदय गडकरी, मनमोहन चोणकर, सूर्यकांत कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक  जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील कलाकार घोड्यावर बसून शोभायात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखी आणि ग्रंथांचे पूजन व औक्षण नागरिकांनी केले. तसेच पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. 

श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशन व संमेलनाला प्रवेश खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: रमेश चेन्नीथला.

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती.

मुंबई, दि. १८ डिसेंबर २०२४
भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत रमेश चेन्नीथला म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचाही भाजपाने सातत्याने अपमान केला आहे. संविधानाने घालून दिलेल्या मार्गाने भाजपाचे सरकार काम करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आरएसएसचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि तो लपून राहिलेला नाही. आताही भाजपा आरएसएसचे लोक बाबासाहेबांचे संविधान बदलण्याच्या वल्गना करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच सन्मान केला आहे. व त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस सरकारांनी काम केलेले आहे. अमित शाह यांनी ज्या पद्धतीने संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विधान केले हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून आले आहे, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होतात. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनच्या उद्घाटनाला मोदी सरकारने बोलावले नाही तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रणही दिले नव्हते यातूनच भाजपाची दलित, आदिवासी समाजाबदद्ल असलेली मानसिकता दिसून येते, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

तीन वर्षातील वस्तू व सेवा कर मागण्यांवरील व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; 30 मार्च अंतिम मुदत-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

जीएसटीच्या 54 हजार कोटींच्या विवादित मागण्यांसाठी 1 लाख 14 हजार अर्ज अपेक्षित,
राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी अडीच ते तीन हजार कोटींची रक्कम जमा होणार

  • राज्याच्या महसुलवाढीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्वाचे पाऊल

नागपूर :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या करमागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किेंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना (Amnesty Scheme) राज्यात लागू करण्यात आली असून 31 मार्च 2025 ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले.

या अभय योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम 54 हजार कोटी रुपयांची आहे. त्यापैकी विवादीत कर 27 हजार कोटी रुपयांचा त च दंड व शास्तीची रक्कम 27 हजार कोटी रुपयांची आहे. यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादीत कराच्या सुमारे 20 टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5 हजार 500 कोटी ते 6 हजार कोटी रुपये विवादीत कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी अर्धी रक्क्म म्हणजे 2 हजार 700 कोटी ते 3 हजार कोटी रुपये राज्य शासनास मिळतील व उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडे जमा होईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे 5 हजार500 ते 6 हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांना, वकीलांना, चार्टर्ड अकाऊंटंट, नागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

0


 नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान
 आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त
नागपूर,दि. 18 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

राज्यसभेतील माझ्या विधानाची मोडतोड करुन ते दाखवण्यात आलं.. अमित शाह

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आंबेडकरविरोधी, संविधानविरोधी, आरक्षणविरोधी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. काँग्रेसनं देशात आणीबाणी लागू केली आणि आता हाच पक्ष संविधानाचा अपमान झाल्याची भाषा करत आहे. राज्यसभेतील माझ्या विधानाची मोडतोड करुन ते दाखवण्यात आलं. माझं पूर्ण विधान दाखवा. मग तुम्हाला सत्य समजेल, असं शहा म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.’मी कधीही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करु शकत नाही. माझं विधान तोडूनमोडून दाखवण्यात आलं. मी नेहमी आंबेडकरांच्या विचारांवर चालत आलो आहे. संविधान दिवस साजरा करण्याची सुरुवात भाजपनं केली,’ याची आठवण शहांनी करुन दिली. ‘ज्या समुदायासाठी आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, त्या समाजातून येणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांनी तरी किमान काँग्रेसच्या कुत्सित प्रयत्नांचा भाग व्हायला नको होतं. पण खरगेंनी राहुल गांधींच्या दबावाखाली येऊन पत्रकार परिषद घेतली,’ असा दावा शहांनी केला.
‘काँग्रेसकडून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आता हतबल झाली आहे. आंबेडकरांचा अपमान काँग्रेसनं कसा केला हे आता जगजाहीर आहे. भाजप कायम आंबेडकरांच्या विचारांवर चालत आलेला आहे. काँग्रेसनं आयुष्यभर आंबेडकरांचा अपमान केला. मी स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करु शकत नाही. त्यामुळे माझं विधान पूर्ण दाखवण्यात यावं,’ असं आवाहन त्यांनी केलं.

१५ कोटी रुपयांची अंडी बंदरात पडून-भारतीय अंड्यांवर प्रतिबंध

0

नवी दिल्ली: ओमान देशाने भारताकडून अंडी आयात करण्याच्या नव्या परवाना देण्यास बंद केले आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूतील नमक्कल पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान होऊ शकते. कतारने काही दिवसांपूर्वी भारतीय अंड्यांवर वजन संबंधी प्रतिबंध घातले होते. आता त्यांनी नवे प्रतिबंध घातले आहेत. डीएमके खासदार केआरएन राजेशकुमार यांनी मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

भारताकडून पुन्हा एकदा अंड्यांची आयात सुरू व्हावी यासाठी ओमान आणि कतारच्या अधिकाऱ्यांशी केंद्र सरकारने चर्चा करावी अशी मागमई राजेशकुमार यांनी सभागृहात केली. आयात बंदीमुळे पोल्ट्री चालवणारे शेतकरी आणि निर्यातदारांच्या अडचणी वाढतील. त्यांनी ओमान आणि कतारमधील भारतीय राजदूतांसोबत बैठक घेण्याचे आव्हान केले.नमक्कल हे एक अंड्याचे नियातदार आहेत. त्याच बरोबर लाइवस्टॉक अँन्ड एग्री-फार्मर्स ट्रेड एसोसिएशन (LIFT)चे जनरल सेक्रेटरी पीव्ही सेंथिलने म्हटले आहे की, ओमानने घातलेल्या बंदीमुळे कमीत कमी १५ कोटी रुपयांची भारतीय अंड्यांची पहिली खेप अडकून पडली आहे. ओमानच्या इम्पोर्टर सोहर बंदरावर भारतातून पाठवण्यात आलेली अंड्यांचे कंटेनर अद्याप तसेच आहेत. नमक्कलने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे दोन प्रमुख आयत देश असलेल्या ओमान आणि कतार या देशांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारताच्या अंडी निर्यातीच्या कारभारावर मोठी घसरण झाली आहे. भारताच्या अंडी निर्यात करणारी नमक्कल जून महिन्यापासून अनेक अडचणींना तोड देत आहेत. जून महिन्यात सर्व प्रथम ओमानने आयात परवाना देण्यास बंदी घातली होती.

तर‌ त्यांना जशास तसे उत्तर देऊ : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‌‌ दीपक मानकर यांचा ईशारा

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे जसे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, तसे ते माजी मंत्री छगन भुजबळ यांचेही नेते आहेत. असे असताना भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते अजित दादांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन करतात. अशा कार्यकर्त्यांना भुजबळ साहेबांनी समजावून सांगावे. आम्ही अजित दादांचा अवमान सहन करणार नाही. पुन्हा असे आंदोलन केले तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. अजित दादांनी भुजबळ साहेबांना खूप काही दिले आहे, त्यांच्या मुलाला काही महिन्यापूर्वीच विधान परिषदेवर संधी दिली आहे. सगळी पदे‌ त्यांच्याच घरात दिली तर इतरांनी काय कारायचे, असाही सवाल मानकर यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पुण्यातील समता परिषदेच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणाचा निषेध म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या प्रसंगी दीपक मानकर म्हणाले, ज्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोडे मारो आंदोलनाला श्री. छगन भुजबळ यांचा छुपा पाठींबा दिलेला आहे का ? कारण त्यांनी येवला येथे सांगितले की जोडे मारो आंदोलन करू नका. राजकीय जीवनात आपल्या वयाची मर्यादा देखील लक्ष्यात घेतली पाहिजे, एका बाजूला श्री. भुजबळ साहेब म्हणतात पवार साहेबांचेही देखील वय झाले आहे. या गोष्टीचा विचार श्री. भुजबळ साहेबांनी केला पाहिजे. भुजबळ साहेबांचे देखील वय झाले आहे आता त्यांनी थांबायला पाहिजे. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ साहेबांना कुठेही नाकारले नाही. चर्चेच्या माध्यमातून त्यांना कुठे संधी द्यायची , तसेच प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे साहेबांनी पण सांगितले कश्या पद्धतीने यातून मार्ग काढता येईल.या गोष्टीचा विचार करू. एवढ असूनसुद्धा ते जर असे म्हणत असतील तर ज्या ज्या वेळी संधी आली त्या त्या वेळी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादांनी महत्त्वाचे पदे श्री. छगन भुजबळ साहेबांना देत संधी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी आठवण भुजबळ साहेब विसरले आहेत का ? काही दिवसांपूर्वी श्री. पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर अजितदादांनी संधी दिलेली आहे आणि भुजबळ साहेब ओबीसीचे नेते म्हणून मिरवत असतील तर या महाराष्ट्रात ओबीसीचे नेते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ज्यांचे काम पण चांगले आहे आणि त्यांचे कर्तृत्व पण सिद्ध झाल आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी मी ओबीसीचा नेता म्हणून कोण मिरवत असेल तर याचा मी निषेध करतो. कारण की श्री. अजितदादांनी या मंत्रिमंडळात चार ओबीसी आमदारांना मंत्री पदाची संधी दिलेली आहे. म्हणजे चार ओबीसी नेते मंत्री झालेलं आहेत. संपूर्ण महायुती सरकारमध्ये १५ ते १७ ओबीसी आमदार आहेत. यापेक्षा आणखी वेगळ काय घडायला पाहिजे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचे आहे. इथून पुढे अशी चूक करू नका. श्री. छगन भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असाल तर आमचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा जर असा अवमान करीत असाल तर त्याच त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चितपणे आहे. अस चालवून घेणार नाही. ४०-४० वर्षे आम्हीसुधा रस्त्यावर येऊन चळवळीमध्ये काम करत आलो आहोत. आम्हांला माहिती आहे आंदोलन कसे करायचे ते. श्री. छगन भुजबळ साहेबांना विंनती राहील की तुमच्या कार्यकर्त्यांनापण समज द्या कारण आंदोलन करणारे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाहीत. या पद्धतीने जर तुम्ही अजितदादांचा अवमान करीत असला तर हे आम्ही कदापी सहन करणार नाही. अजितदादांनी व प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत लवकरच लवकर चांगला निर्णय घेतील कारण एवढ्या ज्येष्ठ नेत्याबाबत त्यांनी देखील मंत्रिमंडळात सातत्याने बरोबर ठेवण्याचे काम श्री.अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांनीदेखील समन्वयकाची भूमिका घ्यायला पाहिजे.