Home Blog Page 533

मंत्री चंद्रकांत पाटील यांची सुयोग येथे सदिच्छा भेट

0

नागपूर, दि. 20 : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सुयोग पत्रकार सहनिवास येथे सदिच्छा भेट दिली व  पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, सहशिबिरप्रमुख तथा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी मंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, शिक्षण शुल्क सवलत, विद्यार्थिनींसाठीच्या योजना, केंद्र व राज्य शासनाकडून शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणारे अनेक उपक्रम आदी बाबींची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली. राज्यातील विविध विषयावर त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.

सुयोग येथे पत्रकारांसाठीच्या व्यवस्थेची पाहणी मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केली. प्रमोद डोईफोडे यांनी आभार मानले.

‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करणारच

  • उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत कडाडले

मुंबई, दि. 20 :- कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसावर झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेत “महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा ‘मान-सन्मान’ राज्यात ठेवला जाईल”, अशा कठोर आणि रोखठोक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातल्या जनतेला आश्वस्त करत, या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात म्हणाले.

कल्याण येथील योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण आणि अन्याची बाब ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या सभागृहाचे सदस्य सुनील प्रभूं यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्र ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात देण्यात आलेली माहिती तातडीने तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल, याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर साहित्य परिषदेतर्फे सन्मानित

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून, मराठी भाषेचे आणि साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. या परिषदेच्या शाखा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पसरलेल्या असून, सोलापूर ही त्यापैकी एक महत्वाची शाखा आहे. संस्थेतर्फे अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जातात. परिषदेतर्फे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक डॉ. दीपक शिकारपूर ह्यांचा गौरवपत्र प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. शिकारपूर यांचे ‌‘आधुनिक तंत्र एआय व सर्वसामान्यांवर होणारा परिणाम‌’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. मंचावर मसाप सोलापूर शाखा अध्यक्ष श्रुतीश्री वडगबाळकर, उपाध्यक्ष दत्त सुरवसे, सदस्य जे. जे. कुलकर्णी व किशोर चांडक उपस्थित होते.
डॉ. शिकारपूर गेली चार दशके माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, 59 पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते युवापिढी सक्षम व कौशल्यतेने परिपूर्ण घडवू इच्छित आहेत. दृष्टिहीन विद्यार्थीही संगणक साक्षर व्हाव्ोत यासाठी डॉ. शिकारपूर यांची विविध पुस्तके ब्रेल लिपिमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. ज्यांचा वापर राज्यभरातील अनेक दृष्टिहीन विद्यार्थी नियमितपणे करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रतर्फे डॉ. शिकारपूर यांचा जागतिक पुस्तक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.

पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची शोभायात्रा उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण
पुण्यातील विविध शाळांतील बालकांनी घेतला बालनाट्यांचा आनंद
पुणे : पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आज (दि.20) पासून बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची सुरुवात रंगतदार शोभायात्रेने झाली. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलीम शिर्के-सामंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि बालप्रेक्षकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सकाळच्या सत्रात जळगाव, नाशिक, रत्नागिरी, अहिल्यानगर येथील बालकलावंतांच्या गाजलेल्या बालनाट्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. यात म्हावरा गावलाय गो (नाट्यरंग, जळगाव), विंडो 98 (मोहिनीदेवी रुंगठा शिक्षण मंडळ, नाशिक), फुलपाखरु (नाट्यआराधना, अहिल्यानगर), दहा वजा एक (दामले विद्यालय, रत्नागिरी) यांनी सादर केलेल्या बालनाट्यांना उपस्थित बालप्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर प्रख्यात चित्रकार अरुण दाभोळकर यांच्या हस्ते कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. याव्ोळी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चित्रकार अरुण दाभोळकर यांनी सोप्या पद्धतीने चित्रे कशी काढावीत या विषयी युक्ती सांगत प्रात्याक्षिकांसह चित्रे काढून दाखविली. हा कार्यक्रम सुधा करमरकर रंगमंचावर झाला.
आकर्षक शोभायात्रा
दुपारी 3.30 वाजता शोभायात्रेचा शुभारंभ शिळीमकर विद्यालय, बिववेवाडी येथून करण्यात आला. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील बालकलावंतांसह पुणे शहरातील विविध शाळा, संस्थांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत चित्ररथांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. महापुरुषांच्या व्ोशभूषा केलेले बालकलावंत, फुगे आणि फुलांनी सजविलेला चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शोभायात्रेत लेडीज इंग्लिश मिडियम स्कूल, ठेंगोडे येथील विद्यार्थिनींनी अध्यात्म आणि ऐतिहासिक विषयांवर सादरीकरण केले, तर मावळ्यांच्या वेशभूषेत साकारलेल्या पारंपरिक चित्ररथाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. विशेष मुलांच्या सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांनी या वेळी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधले. नंदुरबार शाखेने सादर केलेल्या आदिवासी नृत्याला तसेच मंगळवेढा शाखेने सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. जळगाव शाखेच्या बालकलावंतांचे लेझीम नृत्य, तर उत्कर्ष मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. पुणे आणि नाशिक शाखांच्या विद्यार्थ्यांनी अनोखे सादरीकरण केले. रत्नागिरी शाखेने सादर केलेल्या आधुनिक भारत विषयावरील चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. बालरंगभूमी गीताला उपस्थितांनी दाद दिली. शोभायात्रेची सांगता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे झाली.

संमेलन प्रवेशद्वाराचे उद्घाटन
अण्णा भाऊ साठे स्मारक रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्या हस्ते फीत कापून संमेलन प्रवेशद्वाराचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. या व्ोळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.

तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांच्या सामुहिक वंदे मातरम् गायनातून राष्ट्रीय एकात्मतेचा अद्वितीय आविष्कार

हिंदू सेवा महोत्सवात वंदे मातरम् कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळा

पुणे : राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेले ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणागीत पुण्यातील तब्बल ३ हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित गायले. यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ चा एकच जयघोष स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर घुमला. तीन हजार विद्यार्थ्यांचा एकसंध आवाज आणि त्यातून व्यक्त झालेल्या देशप्रेमाने वातावरण भारावून गेले.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्यामध्ये सामुहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीरपत्नी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेजर जनरल अमर कृष्णा (नि.), हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, विंग कमांडर विनायक डावरे (नि.), अर्चना सिंग, माजी सैनिक सुनील काळे, यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या विविध भागातून वीरमाता, वीरपत्नी यावेळी उपस्थित होत्या. वंदे मातरम् या गीताचा इतिहास यावेळी कार्यक्रमात सांगण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगान सादर केले.

अशोक गुंदेचा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरलेल्या वंदे मातरम् या गीताच्या निर्मिती मागील संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला.

अमर कृष्णा म्हणाले, विद्यार्थ्यांनी चारित्र्य घडविण्यावर भर द्यायला हवा. चारित्र्यसंपन्न व्यक्तीच राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देऊ शकते. चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त या गुणांचा विकास करण्यावर भर दिला तरच तुम्ही देशासाठी काहीतरी चांगले काम करू शकाल.

जिम मधील तरुणांना स्टेरॉईड इंजेक्शन विक्री _ दोघांवर गुन्हा दाखल

पुणे- शहरातील विविध जिममधील व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी याकरिता स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर 14 स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी माहिती दिली की, या प्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर( वय -32 ,राहणार- खडकी, पुणे) व साजन अण्णा जाधव (वय- 25 ,राहणार- औंध,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरोधात पोलीस हवालदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे. संबंधित आरोपी हे नतावाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असताना देखील, संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याचे दिसून आले आहे.

संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते ,त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तरुणाचा मृत्यूकोंढवा परिसरातील येवलेवाडी याठिकाणी पिरॅमिड कन्स्ट्रक्शनच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सदर ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणाने कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे, ठेकेदार याच्या हाताखाली काम करणारा त्यांचा मुलगा सनी डक्टर सोनी ( वय 19) हा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून लिफ्टच्या मोकळ्या डक्टमधून खाली पडून जागीच मयत झाला आहे. सदर मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याचे वडील डाक्टर दिनेश कुमार रामसमुज द्विवेदी (वय 37 ,राहणार- येवलेवाडी ,पुणे )यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरोधात केशरीनारायण सोनी (वय 21 ,राहणार -बलरामपुर ,उत्तरप्रदेश) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपकडून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न: नाना पटोले

राहुल गांधींनी कोणालाही धक्काबुक्की केलेली नाही, भाजपाकडूनच राहुल गांधींविरोधात कुभांड, भाजपा सदस्यांनीच राहुल गांधींना अडवले.

काँग्रेस कार्यालयावर भाजपाच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस आमदारांची विधान भवनासमोर घोषणाबाजी.

नागपूर, दि. २० डिसेंबर २०२४
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. अमित शाहांचे हे पाप झाकण्यासाठी भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कुभांड रचून फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. देशाच्या एकतेसाठी काँग्रेस पक्षाचे दोन महत्वाचे नेते शहीद झाले. भाजपाने देश अदानीला विकण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. सरकार अदानीला वाचवण्यासाठी नौटंकी करत आहे. मोदी अदानींचे काय संबध आहेत ते जगजाहीर आहे. काँग्रेसने अदानी प्रश्नावर चर्चेची मागणी केल्याने सत्ताधारी भाजपाकडून खोट्या कथा रचून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाला बदनाम केले जात आहे. राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी किती घाबरतात हे यावरून स्पष्ट होते.

भारत जोडो यात्रेत नक्षलवादी विचाराच्या संघटना होत्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेंव्हा देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते. त्यांच्याकडे अशी काही माहिती होती तर त्याचवेळी त्यांनी कारवाई करायला हवी होती. कारवाई न करणारे फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री आहेत असे म्हणायचे का. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, राहुल गांधी व भारत जोडो यात्रेची लोकप्रियता भाजपाला सहन होत नाही म्हणून भाजपाकडून असा अपप्रचार केला जातो.

भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध केला.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीकरीता पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे, दि. २०: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीकरीता उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस (सी.डी.एस) परीक्षेची पूर्व तयारीच्याअनुषंगाने २० जानेवारी ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतेश हंगे यांनी दिली आहे.

प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहेत. प्रवेशाकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. लोकसंघ आयोग नवी दिल्ली मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. परीक्षेकरिता ऑनलाईनपद्धतीने अर्ज केलेला असावा. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १५ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीच्यावेळी सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in संकेतस्थळावर सीडीएस ६४ प्रशिक्षणाकरीता किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांनुसार प्रती व ते पूर्ण भरून तीन प्रती सोबत घेऊन यावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक training.pctonashik@gmail.com या ईमेल पत्त्यावर व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉटसअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल श्री. हगे यांनी केले आहे.

माजोरड्यांचा माज उतरवणार:मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला सस्पेंड, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

0

शुक्ला कुटुंबीयांवर गुन्हा

नागपूर- मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला नामक अमराठी व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून (MTDC) निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्समध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पोलिसांनी शुक्लावर गुन्हा दाखल केला. पण त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाली. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी शुक्रवारी हा मुद्दा विधानपरिषदेच्या पटलावर मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत अखिलेश शुक्ला यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सभागृहाला मुंबई व परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर व त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरची कॉपी माझ्याकडे आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलिस करतील. या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता व राहील. कधीकधी काही नमुणे अशी चुकीची विधाने करतात, माज आणल्यासारखे करतात, पण सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही.

भाजपचे सरकार आले म्हणून ही घटना घडली असे नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात मुंबईबाहेर गेला, वसई-विरारला गेला याचा शोध आपण घेण्याची गरज आहे. मराठी माणूस आज 300 चौरस फुटांच्या घरात राहतो. याऊलट मोठ्या फ्लॅटमअध्ये कोण राहतो याचाही शोध घ्यायला हवा. उत्तर प्रदेश, बिहारमधून येथे आलेले लोक आपल्यासारखे उत्तम मराठी बोलतात. आपल्यासारखेच सण उत्सव साजरा करतात. पण त्यापैकी काहीजण चुकीचे बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो. मी त्यांना ठणकावून सांगतो की, सरकार मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

संविधाने प्रत्येकाला काय खायचे याचे स्वातंत्र्य दिले आहे. घर नाकारण्याचा अधिकार कुणालाही नाही. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो, तर त्यांची संघटना तयार करू शकतो. योजना तयार करू शकतो. शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्यांचा तिरस्कार करण्याचे कोणतेही कारण नाही. पण याचा फायदा घेऊन कुणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही. अशा तक्रारी आल्या तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

ते पुढे म्हणाले, आपल्या देशात अनेक परंपरा आहेत. बंगालमधील सर्व समाज मासळी खातात. काही राज्यांत संपूर्ण शाकाहार आहे. आपल्या परंपरेने निर्गुण निराकार व सगुण साकार यांना दैवत्त्वाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आपल्या देशाचे है वैविध्य टिकले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. पण राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रिय अस्मिता आहे. त्यावर कुणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करावे; बापूसाहेब पठारे यांची नितीन गडकरींना मागणी

पुणे: “मागील काही वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघातली पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. नागरिक त्रस्त झाले असून त्यांना यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना राबवणे क्रमप्राप्त असल्याने वाघोली-शिरूर दरम्यान पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे”, अशा आशयाचे निवेदन आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान बापूसाहेब पठारे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान संवाद साधत मतदारसंघातील वाहतूक कोंडी संबंधित परिस्थीती मांडली. गडकरी यांनीही या समस्येवर उपाययोजना राबवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

येत्या फेब्रुवारी महिन्यात सदर पुलाच्या कामाचे भूमिपूजन होईल, असा विश्वास पठारे यावेळी व्यक्त केला.

बापूसाहेब पठारे मागील चार दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाला उपस्थित आहेत. अधिवेशनात त्यांनी वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्याची ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. तसेच, लोहगाव येथे ससून रुग्णालयाच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतही मागणी केली.

निवडून आल्यानंतर पठारे यांनी मतदारसंघात पाहणी दौरा करून विविध समस्यांचा आढावा घेतल्याचे दिसून येते. पठारे यांनी सुरू केलेले काम मतदारसंघाचे चित्र नक्की पालटणार, असा आशादायी सूर नागरिकांमधून ऐकायला मिळतोय.

महिला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित.

मुंबई-
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत.
१) दिपाली लालाजी मिसाल – संभाजीनगर २) आयशा अस्लम खान – ठाणे ३) डॉ. अंजली ठाकरे -अमरावती ४) सुनीता गावंडे- रामटेक ५) सीमा विनोद सहारे- गढचिरोली चिमूर ६) स्वाती राजेश जाधव – नाशिक ७) साक्षी एस. वंजारी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग ८) सीमा महेश आहूजा – कल्याण ९) सुषमा शरदचंद्र राजेघोरपडे – सातारा.

साजन विनोद शहा,आणि कुणाल शिवाजी पुरी 02 गावठी पिस्टल सह पोलिसांच्या जाळ्यात

पुणे- येथील नांदेड सिटी पोलीसांनी सराईत गुन्हेगार साजन विनोद शहा,आणि कुणाल शिवाजी पुरी यांना 02 गावठी पिस्टल व 01 जिवंत काडतूस सह पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की,पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार साजन शाहा व कुणाल पुरी यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी पिस्टल असून दोघे आंबाईदरा येथे येणार आहेत वगैरे खात्रीशीर बातमी मिळण्याने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेडसिटी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी वअंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून साजन विनोद शहा वय 19 वर्षे रा.धायरी गाव भैरवनाथ मंदिरा जवळ फ्लॅट नं.302 पोकळे क्रिस्टल बिल्डिंग धायरी पुणेकुणाल शिवाजी पुरी वय.18 वर्ष रा. फ्लॅट नंबर 2 विश्व कॉर्नर बिल्डिंग भैरवनाथ मंदिरा सामोरं धायरी पुणे
यांचेकडून कि. रु 70,500/- चे 02 गावठी पिस्टल व 01जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.आहे यातील साजन शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे एकूण 06 गुन्हे दाखल आहेत
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीणकुमार पाटील , पोलिस उप आयुक्त परिमंडळ -3 संभाजी कदम , सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार – पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे, यांच्या पथकाने केली आहे

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला ताम्हिणी घाटात अपघात

पुणे-

लोहगाव येथून महाड येथे लग्नासाठी जाणार्‍या खासगी बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला असून त्यात ५ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले आहेत.हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सर्व २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात ३ महिला व २ पुरुषांचा मृत्यु झाला आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव अशी चार मृत्यु पावलेल्यांची नावे असून एका पुरुषाचे नाव अजून समजलेले नाही.

याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांनी सांगितले की, पुण्याहून खासगी बस (एम एच १४ जी यु ३४०५) महाड येथे लग्नासाठी जात होती. ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले व बसने कठड्याला धडक दिली. त्यानंतर घाटात खाली काही अंतरावर पलटी झाली. बस पलटी झाल्याने बसखाली दबून ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. जाणार्‍या येणार्‍यांनी याची माहिती दिल्यावर पोलीस,रुग्णवाहिका व रेस्क्यु पथक तातडीने तेथे रवाना झाले. त्यांनी बसमधील २७ जखमींना माणगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

लोहगाव येथील जाधव कुटंबीय महाडमधील बिरवाडी येथे लग्न समारंभाला जात होते. त्यावेळी ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून बस पटली झाली, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यासोबत मोफत वीज योजनेची भरपाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. २० डिसेंबर २०२४ – शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच त्यांना मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. अत्यंत कमी काळात योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी ऊर्जा विभागाचे अभिनंदन केले.

       मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेज वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेचे काम सुरू केले आहे. त्या अंतर्गत एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड ही देशातील पहिली शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी स्थापन केली. कंपनीच्या अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मीतीचे सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. यामध्ये ८४२८ कृषी वाहिन्या (फीडर्स) सौर ऊर्जेवर चालवणार आहोत. आतापर्यंत ६६९ मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातून १, ३०,४८६ कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा सुरू केला आहे. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅटची कामे पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. 

त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून आगामी पाच वर्षात विजेचे बिल घ्यायचे नाही, हा निर्धार कायम आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी अर्थसंकल्पावर सध्या १५ हजार कोटी रुपयांचा भार पडतो तेवढेच पैसे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे वाचणार आहेत. सध्या आठ रुपये प्रतियुनिट दराने मिळणारी वीज शेतकऱ्यांना दीड रुपये प्रती युनीट दराने उपलब्ध केली जाते. आता हे बिलही सरकार भरते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत तीन रुपये प्रति युनिट दराने वीज मिळणार असल्याने वीज खरेदीत दहा हजार कोटी रुपये वाचतील. तसेच अनुदान आणि क्रॉस सबसिडीच्या पाच हजार कोटी रुपयांची बचत होईल. परिणामी २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासोबतच त्यांच्या मोफत वीज योजनेचे पैसेही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे वाचणार आहेत.

मा. मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीबद्दल आपण ऊर्जा विभागाचे अभिनंदन करतो. खूप कमी काळामध्ये योजनेसाठी जमीन शोधणे, त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी निविदा काढणे, विकसक निवडणे हे काम पारदर्शीपणे करण्यात आले. कमीत कमी दरात वीज उपलब्ध करण्यासाठी रिव्हर्स बिडिंग पद्धतीने काम करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे गतीने काम चालू आहे. त्यासाठी ९ लाख कृषी पंप उपलब्ध आहेत. त्यामुळे पेड पेंडिंग आता संपुष्टात येईल. आतापर्यंत २,३६,१८६ सौर कृषी पंप आस्थापित केले आहेत. जेव्हापासून सौर पंप योजना सुरू झाल्या त्या काळात जेवढे सौर पंप लावले त्यापेक्षा अधिक सौर पंप गेल्या एका वर्षात आस्थापित केल्या आहेत. या कामगिरीबद्दल विभागाचे अभिनंदन.

आपल्या सरकारने ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या आहेत. राज्याची आतापर्यंतची स्थापित वीजनिर्मिती क्षमता ४४ हजार मेगावॅटची आहे. आता ५४ हजार मेगावॅटचे वीज खरेदीचे करार झाले आहेत. सध्या वीज पुरवठ्यामध्ये १६ टक्के वीज अपारंपरिक तर ८४ टक्के पारंपरिक आहे. आपण हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज पुरवठा अपारंपरिक विजेचा म्हणजेच हरित ऊर्जेचा असेल तर ४८ टक्के वीज पुरवठा पारंपरिक असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी:कुंटुंबाला 10 लाखांची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

संतोष देशमुख प्रकरणाची पाळेमुळे खोदणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही; आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची घोषणा

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावर सविस्तर निवेदन केले. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सर्वच पाळेमुळे खोदणार असल्याचे सांगितले. आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई करण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी दिली.देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडच्या मस्साजोगमध्ये एक गंभीर घटना घडली. संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. त्यातून बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे लॉलेसनेसची परिस्थिती पहायवास मिळत आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल.

आवाडा एनर्जी कंपनीने एक मोठी गुंतवणूक हरित ऊर्जा प्रकल्पात बीड जिल्ह्यात केली आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. यामुळे काही लोक ही कामे आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि देणार नसाल तर आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकेत वावरत आहेत. साधारणतः 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मस्साजोग येथे आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आदी आरोपी चालून गेले. प्रथम त्यांनी तेथील वॉचमन अमरदिप सोनवणे याला मारहाण केली. त्यानंतर तेथील सीनिअर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ मारहाण केली. त्यानंतर वॉचमनने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली.

त्यानंतर संतोष देशमुख घटनास्थळी गेले. आपल्या गावच्या माणसांना दुसऱ्या गावची माणसे मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी आरोपींना हुसकावून लावले. यावेळी त्यांच्यात थोडीफार मारहाणही झाली. या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहे, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण कशी झाली? याचा घटनाक्रमही सांगितला. ते म्हणाले, आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर प्रथम त्यांना गाडीतच मारहाण केली. त्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या तारांची गुंडाळी करून देशमुख यांना मारहाण केली. त्यानंतर गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. ज्यावेळी देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले त्यावेळी आरोपी त्यांना सोडून पळून गेले. या सर्व प्रकरणात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या संपर्कात होता. विष्णू चाटे त्यांना 20 मिनिटांत सोडतो, 15 मिनिटांत सोडतो असे सांगत होता. पण त्यांनी त्याला सोडले नाही. त्यांनी संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अत्यंत दुर्दैवी प्रकारचा मृत्यू आहे.

संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नाही. त्यांच्या डोळ्यावर मारहाण करण्यात आली. पण ही घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी काहीजण उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 6 तारखेच्या घटनेची प्रोजेक्ट इंजिनिअर शिवाजी थोपटे यांनी दिली होती. त्यात त्यांनी स्वतःला मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर 4 दिवसांनी अतिरिक्त फिर्याद अमरदिप सोनवणे यांची दिली. सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली. या प्रकरणी गत 29 नोव्हेंबर रोजीही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची एकमेकांशी संबंध आहे. याची चौकशी केली जाईल. मी सभागृहाला आश्वस्त करतो की, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतले.वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात हात असल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यावर कारवाई होईलच. पण या गुन्ह्यातही त्याच्याविरोधात पुरावे आढळले, तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे, कुणाचा सहकारी आहे, त्याचे कुणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण, बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, विशेषतः काही सदस्यांनी सांगितले की, कुणावरीह 307 लावायच्या, कुणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या हे अतिशय चुकीचे घडत आहे. यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी या प्रकरणी वस्तुस्थिती तपासून कारवाई केली पाहिजे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाही.

बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल होईलच. पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवरही मकोका अंतर्गत लावण्यात येईल. या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणाऱ्या प्रत्येकावर त्यांनाही संघटित गुन्हेगारी समजून मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. बीड जिल्ह्यातील वाळू माफिया, भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल.

प्रस्तुत प्रकरणात सरकार दोन प्रकारची चौकशी केली जाईल. एक आयजी स्तरीय अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार करण्यात आली. ही एसआयटी या प्रकरणाचा सविस्तर तपास करेल आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी 3 ते 6 महिन्यांत पूर्ण केली जाईल. कुणाच्या जिवाचे मोल पैशांत करता येत नाही. पण मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मदत केली जाईल.