Home Blog Page 524

वाल्मीक कराडच्या मुलाच्या कंबरेला पिस्तूल:अंजली दमानियांनी पोस्ट केला फोटो; म्हणाल्या – याच्याही नावावर कोणता शस्त्र परवाना नाही

मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारीसंबंधी आणखी एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये सुशील वाल्मीक कराड नामक तरुणाच्या कंबरेला पिस्तुल असल्याचे दिसत आहे. दमानिया यांनी या तरुणाच्या नावावर कोणताही शस्त्र परवाना नसल्याचा दावा केला आहे. हा तरुण मस्साजोग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मीक कराड यांचा मुलगा असल्याचे समजते.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आले आहे. यामुळे त्याची संवेदनशीलता वाढली आहे. विशेषतः या हत्याकांडामुळे हादरलेल्या बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी संपवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी सुशील वाल्मीक कराडचा फोटो ट्विट केला आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशील वाल्मिक कराडचा फोटो ट्विट केला आहे. फोटोत सुशील कराड हा एका आलिशान कारच्या समोरील भागाला टेकून उभा आहे. त्यात त्याच्या कंबरेला पिस्तुल असल्याचे दिसून येत आहे. दमानिया यांनी अन्य एका फोटोद्वारे सदर गाडीची मालकी वाल्मीक बाबुराव कराड यांच्या नावे असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली आहे. दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘हा सुशील वाल्मीक कराड. याच्या नावावर कुठलाही शस्त्र परवाना नाही.’

उल्लेखनीय बाब म्हणजे, अंजली दमानिया यांनी अन्य एका ट्विटद्वारे डिगोळआबा गावचे सरपंच जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे यांचाही एक पिस्तुल असणारा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सोनवणे हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटोत असल्याचेही दिसून येत आहेत. ‘पिस्तूलंच पिस्तुलं… डिगोळआबा गावचा सरपंच याचे नाव जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे असे आहे. मला कळवण्यात आले आहे की ह्यांच्यावर खंडणी, अपहरण असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. SP नवनीत कावत यांनी गुन्हे अहेत की नाही याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा’, असे दमानिया यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दमानिया यांनी सोनवणे यांचा गोळीबार करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.


अंजली दमानिया यांनी माणिक फड यांचेही काही फोटो ट्विट केलेत. त्या या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मार्किंग केलेली व्यक्ती माणिक फड हे धनंजय मुंडे समर्थक समर्थक आहेत. मला कळवण्यात आले आहे की, हे हप्ते गोळा करणे, गरीब लोकांना त्रास देणे, ही कामे परळी लगत गाव आहे तिथे करतात. एसपी नवनीत कावत यांनी तपासून घ्यावे.’

बीडमध्ये एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन:व्यवहारात ‘आका’चा हात, BJP आमदार सुरेश धस यांचा आरोप

महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठा घोटाळाआकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या

बीड-भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीड एसपींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. बीडमधील टेंभूर्णी गावाच्या तिकडे एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले असल्याचा त्यांनी दावा केला आहे. 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झॅक्शन एका व्यक्तीच्या नावावर जर झाले असेल तर याच्यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे तुम्हीच सांगा, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रकरणात काम करणारे दोन अधिकारी होते, मी काही नाव सांगत नाही. एसपी साहेबांना मी नावे सांगितली आहेत. एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचशे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयात घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात झालेला आहे. यावर चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले आणि निष्क्रिय अधिकारी यात आणले, आरोपींचे जामीन करून देणे वगैरे काम सुरू आहे. तसेच या प्रकरणाची मलेशियामध्ये सुद्धा लिंक आहे. अशा गंभीर गुन्ह्यात सुद्धा अतिशय चुकीचे वागणारे पोलिस ठेवण्यात आले आहेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलिस दल हे निष्क्रिय स्वरूपाचे दाखवले गेले.

आमदार सुरेश धस म्हणाले, मी माझे लेखी पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील पोलिस दलातील पोलिसांची यादी मला द्या आणि त्यात यादीमध्ये बीड जिल्ह्यातील पोलिसांची संख्या बिंदु नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर हे चूक आहे, हा अन्याय आहे आणि हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल. त्याच्यावर योग्य ती कारवाई मुख्यमंत्री करतील. पुढे ते म्हणाले कोणी तरी यांच्या पाठीमागे आहे. आका सोडून कोण आहे यांच्या मागे. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या त्यात आका.

आमदार सुरेश धस पुढे म्हणाले, आकाने गरिबांच्या जमिनी सुद्धा नावावर केल्या आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. शिरसाळा येथे सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधण्यात आले आहेत म्हणून त्याचे अद्याप उद्घाटन होऊ शकले नाही. कोणी जर त्यावर तक्रार केली तर ते सगळे डीमोलिश होऊ शकते. माझ्या मते 1400 एकर आसपास गायरान जमीन शिरसाळा गावात आकांचे बगलबच्चे आहेत. 600 विटभट्ट्या तिथे आहेत त्यातील 300 वीटभट्ट्या या अनधिकृत असून गायरान जमिनीवर आहेत. तिथे एक मंदिर आहे देवीचे. तिथे आता जायलाच जागा राहिली नाही. तिथे बंजारा समाजाची जमीन होती, त्यांना तिथून उठवून यांनी तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले आहे.

महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड

0

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश

मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४
देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत इच्छामरणाची भावना व्यक्त केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांना मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

पुणे, दि. २५ : मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे सध्या गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. त्यांच्या तब्येतीसंदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या व्यथा ऐकून मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांना दिलासा दिला आहे. ‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असे म्हणत सामंत यांनी घाटे यांना मानसिक आधार दिला.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक व विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे हे घाटे सरांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करायला गेले असता त्यांनी सामंत यांची घाटे सरांशी फोनवर बातचीत करून दिली. त्यावेळी महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.

एका बैठकीसाठी डॉ. शामकांत देवरे पुण्यात आले असता ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्त सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांच्याकडून ज्येष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाली. जगण्याचा कंटाळा आला असून इच्छामरणाची भावना घाटे यांनी व्यक्त केल्याचे नहार यांनी देवरे यांना सांगितले असता तत्परतेने संजय नहार आणि शामकांत देवरे यांनी घाटे यांची भेट घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. त्यावेळी घाटे म्हणाले, ”आजारपणामुळे फक्त पडून राहावे लागते. घरातल्या घरात हिंडु शकत नाही. रोजचा खर्चही दोन – अडीच हजार रुपये इतका आहे. मध्यंतरी पाच दिवस रुग्णालयात होतो, त्याचा २० हजार दिवसाला इतका खर्च झाला. वर्षाला अंदाजे ६० हजार रॉयल्टी वगळता दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. या सगळ्याला मी कंटाळलो आहे.” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर पास करा. असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले असून अशाप्रकारे हतबल होण्याची वेळ कोणत्याही लेखकावर येऊ नये यासाठी विशेष धोरण राबविण्याची गरज असल्याचे सामंत सांगितले, अशी माहिती यावेळी देवरे यांनी दिली.

मराठीतले ज्येष्ठ विज्ञानलेखक म्हणून महाराष्ट्र घाटे सरांना ओळखतो. मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या लेखकाला सर्वतोपरी आधार देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. याच भावनेतून आम्ही सरांच्या सोबत आहोत. तसेच कोणताही टोकाचा निर्णय न घेता हक्काने आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, असे घाटे सरांना सामंत यांनी सांगितले असल्याची माहितीही देवरे यांनी यावेळी दिली.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग तर्फे विविध संस्थांना उपयोगी वस्तू भेट – संदीप खर्डेकर.

देव जेव्हा आपल्या खात्यात अतिरिक्त पैसे देतो तेव्हा ते व्याज म्हणून समाजाला परत दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले.
पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि वेस्टर्न इंडिया फोर्जिंग तर्फे नवरत्न वृद्धाश्रम आणि स्वामीआंगण वृद्धाश्रम या स्वयंसेवी संस्थांना तीन महिने पुरेल इतके धान्य तर शांतिबन वृद्धाश्रमाला गिझर भेट देण्यात आले त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वस्त देवेंद्र भाटिया,सतीश कोंडाळकर, विनायक काटकर, प्रतीक खर्डेकर,राजेंद्र गादिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून सुरु असलेले समाजकार्य मी अनेक वर्ष बघत आली आहे, अनेक कार्यक्रमात ही माझी उपस्थिती राहिली आहे,त्यांचे कार्य समजोपयोगी असल्याचे ही ना. माधुरी मिसाळ म्हणाल्या. देवाने आपल्याला जे जास्तीचे धन दिले आहे ते समाजाला परत केले तर तो आपल्याला अजून देत राहतो पण जर आपण त्याचा सदुपयोग केला नाही तर आपल्याला येणाऱ्या निधीचा ओघ थांबतो असे सांगतानाच कार्यकर्त्यांनी समाजकार्य करत रहावे असेही नामदार माधुरी मिसाळ म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच निस्पृहपणे समाजकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या शोधात असते आणि मग अश्या संस्थांना जे हवं ते उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
वारजे येथील शांतिबन वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिता देवधर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी गिझर व डायपर ची गरज असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना त्या वस्तू देण्यात आले.
तर वडगाव धायरी येथील नवरत्न वृद्धाश्रम च्या संचालिका अनिता राकडे आणि डोणजे येथील स्वामी आंगण च्या संचालिका आनंदी जोशी यांनी धान्याची गरज असल्याचे सांगितले. ह्या संस्थांना 360 किलो गहू,180 किलो तांदूळ, 60 किलो साखर यासह तूरडाळ,तेल, रवा, पोहे, स्वच्छता साहित्य व अन्य किराणा माल देण्यात आला असे संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच कार्यक्रमात सत्कार रूपाने मिळालेल्या 60 शाल देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आल्याचे ही खर्डेकर म्हणाले. पुण्यात वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, ग्लोबल ग्रूप यासारख्या अनेक श्रीमंत कंपन्या गरजुंना मदत करण्यासाठी तत्पर असतात, अश्या दानशूर व्यक्ती आणि गरजू संस्था यांच्यातील पूल म्हणून क्रिएटिव्ह फाउंडेशन काम करते असेही संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.
नवीन वर्षात अधिकाधिक गरजू संस्थांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना यथायोग्य मदत करण्याचा आमचा संकल्प असून अश्या संस्थांनी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच आम्ही रोख मदत करत नसून उपयुक्त वस्तुरूपीच मदत करतो असेही सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
सौ. कल्याणी खर्डेकर यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.

“गांधी, नेहरूंचे महत्त्व राखण्यासाठी डॉ. आंबेडकरांना डावलल्याचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप.. ‘असत्य, अतार्किक व बौद्धिक दिवाळखोरी’ दर्शवणारा ..!

  • काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
  • *निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मोदी सरकार कडून हत्या…

पत्रकार परीषदेत.. काँग्रेस प्रवक्त्यांचा घणाघाती आरोप

पुणे: दि २६ डिसें –
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी काँग्रेसने सतत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डावलण्याची भूमिका घेतली.. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप म्हणजे “असत्य, अतार्किक व वैचारिक दिवाळखोरी दर्शवणारा” आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी घेतलेल्या “पत्रकार परिषदेत” बोलताना केला.,!
यावेळी जेष्ठ काँग्रेसजन सुभाषशेठ थोरवे, उमेश चाचर, रामचंद्र उर्फ भाऊ शेडगे , भोला वांजळे, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, गणेश शिंदे, एड स्वप्नील जगताप, राजेश सुतार इ उपस्थित होते.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत जननायकांची भूमिका निभावणाऱ्या थोर राष्ट्रनेत्यां विषयी .. असत्य, अतार्किक बोलतांना शरम वाटली पाहिजे. केवळ सतत राजकीय असत्य विधाने करून देशांत बहुतांश वेळा जनतेचा कौल मिळालेल्या कांँग्रेस विषयी असत्य विधाने करून प्रतीमा डागाळण्याचा प्रयत्न करू नये..
पुढे बोलताना गोपाळदादा म्हणाले, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी अशी विधाने करण्यापूर्वी आपल्या किमान सत्य वास्तवतेप्रती संविधानीक शपथेची बांधिलकी व पदाच्या गरीमेचा व सन्मानाचा विचार करावा..!
ज्या काँग्रेसने मुंबईतुन बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन डॉ. आंबेडकर यांना लोकसभेत पाठवले व सन्मानाने घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष केले या सत्य वास्तवतेची जाणीव आरोपकर्त्यांनी ठेवावी.
डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभव केल्याचा आरोपही काँग्रेसवर केला जातो. मात्र, या आरोपाला कोणताच अर्थ नाही. डॉ आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये यावे असा काँग्रेसचा नेहमीच प्रयत्न राहिला. मात्र, डॉ आंबेडकर यांनी. शेड्युल कास्ट फेडरेशन आणि नंतर आरपीआय च्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र राजकिय पक्षाचे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. त्या काळात ज्याप्रमाणे काँग्रेसने डॉ आंबेडकर यांना पाठिंबा दिला नाही त्याचप्रमाणे जनसंघाने देखील त्यांना कुठे पाठिंबा दिला वा त्यांना समर्थन देऊन त्यांचा प्रचार केला काय (?) असा संतप्त सवाल ही गोपाळदादा तिवारी यांनी केला.
हिंदू कोड बिलाला होणाऱ्या विरोधामुळे उद्विग्न होऊन डॉ आंबेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी देखील प्रत्यक्षात या बिलावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकर यांच्यामध्ये वाद नव्हता व पं नेहरू हिंदू कोड बिलावर डॅा आंबेडकरांच्या ठाम पाठीशी होते.. हे सर्वश्रुत सत्य असल्याचे देखील तिवारी यांनी निदर्शनास आणून दिले. 
पंजाब- हरियाणा ऊच्च न्यायालयाने, ‘निवडणूक केंद्रातील’ फॅार्म १७ सी व सीसीटीव्ही फुटेज याचिकाकर्त्यांस देण्याचे आदेश निवडणूक आयोगास दिल्यानंतर.. आयोगाने ते देऊकेले असतांना.. २० डिसेंबर रोजी रात्री मोदी सरकारने अशी माहिती देण्यास मज्जाव करणारा एकतर्फी तुघलकी आदेश काढणे म्हणजेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची सरकारने केलेली हत्या असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेतील माहिती व सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वातील नियमा प्रमाणे देण्यास मज्जाव करणाऱ्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आव्हान देत आहे मात्र जनतेत देखील या विषयी माहिती होण्या करीता सदर पत्रकार परीषदेचे आयोजन केल्याचे गोपाळदाद् तिवारी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शी कारभाराचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शक आणि प्रभावी काम केल्याचे प्रमाणपत्र त्यांना दिले. 
तर मग पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी वेगळा आदेश काढून, ‘निवडणूक आयोगास’
माहिती देण्यापासून रोखण्याचे प्रायोजन काय..? असा सवाल ही त्यांनी केला..! फॉर्म १७ सी आणि सीसीटीव्ही चित्र उपलब्ध करून देण्यास मनाई म्हणजे भाजपने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेची मागील दाराने केलेली हत्याच आहे असा घणाघाती आरोप ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदाद् तिवारी यांनी केला…!

बलूनमुळे प्रदूषणाचा धोका: पुणेकरांनी केली कारवाईची मागणी

पुणे: पुणे शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर बलून सोडण्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.

पर्यावरणप्रेमी अनंत रामचंद्र घरत, अध्यक्ष- माय अर्थ संस्था आणि सदस्य- एन्वायरनमेंट क्लब ऑफ इंडिया, यांनी एका सविस्तर पत्राद्वारे प्रशासनाकडे ही तक्रार नोंदवली. त्यांनी बलून सोडण्याच्या प्रथेमुळे जलप्रदूषण, वन्यजीवांना धोका, नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा, हवामान प्रदूषण, आणि कचरा निवारणाच्या समस्या यावर भर दिला आहे.

पत्रात नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार, बलून हवेत सोडल्यावर अनेकदा जलाशयात किंवा जमिनीवर पडतात. यामुळे जलचर प्राण्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. बलूनचे तुकडे गिळल्याने मासे, पक्षी, आणि प्राणी मृत्युमुखी पडतात. लॅटेक्स किंवा फॉयल बलूनच्या विघटनास अनेक वर्षे लागतात, त्यामुळे हे कचऱ्याचे प्रमाण वाढवतात.

बलून सोडणे हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ आणि पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या नियमांचे उल्लंघन असल्याचेही या पत्रात नमूद आहे. याशिवाय, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, ज्यावरही बलून सोडण्यामुळे विपरित परिणाम होतो.

सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये बलून सोडण्यावर प्रतिबंध. पर्यावरणीय परिणामांविषयी जनजागृती मोहिम. पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार, जसे बायोडिग्रेडेबल सजावट. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची काटेकोर अंमलबजावणी. बलून सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या घरत यांनी प्रशासनालाकडे केल्या आहेत.

तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, पुणे महानगरपालिका या समस्येवर तातडीने कार्यवाही न केल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (NGT) दाद मागण्यात येईल.

हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी… इतिहास माझ्यासाठी उदार राहील

0

सितारों के आगे जहां और भी हैं… संसदेत या ओळी वाचणारे करणारे डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या अखेरच्या प्रवासाला निघाले आहेत.
आजी-आजोबांनी वाढवले, कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला:मनमोहन सिंग पाकिस्तानातून विस्थापित झाल्यानंतर हल्द्वानीला आले होते. लहानपणीच आई वारली. आजी-आजोबांनी वाढवले. गावात कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी प्री-मेडिकल कोर्सला प्रवेश घेतला. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी अभ्यासक्रम सोडला.

उर्दूमध्ये भाषणाच्या स्क्रिप्ट लिहून घ्यायचे
मनमोहन सिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण उर्दूमध्ये झाले. पंतप्रधान असतानाही ते उर्दूमध्येच भाषणाच्या स्क्रिप्ट लिहून घ्यायचे. गुरुमुखीमध्येही अनेक वेळा लेखन केले.1948 मध्ये मॅट्रिक झाले. केंब्रिज आणि ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली. 1971 मध्ये ते वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.1985 ते 1987 पर्यंत ते नियोजन आयोगाचे प्रमुख होते आणि 1982 ते 1985 पर्यंत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. पीव्ही नरसिंह राव यांनी 1991 मध्ये त्यांना अर्थमंत्री केले. 2018 मध्ये काँग्रेसने राज्यसभेत पोहोचवले. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपला.

हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी… 27 ऑगस्ट 2012 रोजी संसदेच्या संकुलात ही कविता वाचणारे मनमोहन कायमचे नि:शब्द झाले. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉ. मनमोहन सिंग यांनी 26 डिसेंबर रोजी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.
नेहमी आकाशी निळा पगडी घालणारे मनमोहन यांनी 22 मे 2004 रोजी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर असे संबोधण्यात आले, पण मनमोहन यांनी केवळ 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही तर पुढच्या वेळीही सरकारमध्ये परतले.प्रगल्भ अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग राजकारणी बनले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक न पाहिलेले पैलू समोर आले. व्होटच्या बदल्यात नोटचा मुद्दा लोकसभेत चर्चिला जात होता. विरोधकांच्या प्रश्नांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उत्तर देत होते.

यादरम्यान विरोधी पक्षनेत्या सुषमा यांनी त्यांच्यावर टीका करत म्हटले होते- तू इधर उधर की न बात कर, ये बता के कारवां क्यों लुटा; मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है।

यावर प्रत्युत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले होते – ‘माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो देख।’

मनमोहन सिंग यांच्या या उत्तरावर सत्ताधारी पक्षाने बराच वेळ टेबल थोपटले, तर विरोधक गप्प राहिले.संसदेचे अधिवेशन चालू होते. मनमोहन सरकारवर कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की, कोळसा खाण वाटपाबाबत कॅगच्या अहवालात करण्यात आलेले अनियमिततेचे आरोप वस्तुस्थितीवर आधारित नाहीत आणि पूर्णपणे निराधार आहेत.

लोकसभेत निवेदन दिल्यानंतर त्यांनी संसद भवनाबाहेर माध्यमांनाही निवेदन दिले. त्यांच्या ‘मौना’वर टोमणा मारणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी ‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’… हा शेर म्हणून दाखवला.

2010 मध्ये टोरंटोमध्ये जी-20 शिखर परिषद झाली. यामध्ये ओबामा यांनी द्विपक्षीय बैठकीपूर्वी मनमोहन सिंग यांचे कौतुक केले होते. ओबामा म्हणाले होते- मी तुम्हाला सांगू शकतो की येथे जी-20 मध्ये पंतप्रधान बोलतात तेव्हा लोक ऐकतात. कारण त्यांना आर्थिक प्रश्नांची सखोल माहिती आहे. जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाची गुंतागुंत जाणून आहेत.

यानंतर 27 सप्टेंबर 2013 रोजी मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भेट झाली. याबाबत बराक ओबामा म्हणाले होते – पंतप्रधान सिंग हे सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट भागीदार आहेत.

जेव्हा बराक ओबामा यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावर ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक लिहिले तेव्हा त्यात त्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये आपल्या भारत भेटीचा 1400 शब्दांत उल्लेख केला होता. या काळात मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते.

ओबामा यांनी लिहिले होते – मनमोहन सिंग हे एक वयस्कर शीख नेते होते, ज्यांना राष्ट्रीय राजकीय आधार नव्हता. अशा नेत्याकडून सोनियांना त्यांचा 40 वर्षांचा मुलगा राहुलला कोणताही राजकीय धोका दिसला नाही, कारण त्यावेळी त्या त्यांना मोठ्या भूमिकेसाठी तयार करत होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएच्या पराभवानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून शेवटच्या वेळी देशाला संबोधित केले. ते म्हणाले- मला जे काही मिळालं आहे, ते या देशाकडूनच मिळालंय…

आपल्या भाषणात ते म्हणाले- 10 वर्षांपूर्वी ही जबाबदारी स्वीकारताना मी पूर्ण मेहनत घेऊन सत्याच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, जेव्हा पायउतार होण्याची वेळ आली आहे, तेव्हा मला जाणवते की देवाच्या अंतिम निर्णयापूर्वी, सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या कार्याचा न्याय जनमत न्यायालयाद्वारे केला जातो.

मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे माझे सार्वजनिक जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मी नेहमी माझ्या क्षमतेनुसार आपल्या महान राष्ट्राची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानपद सोडल्यानंतरही तुमच्या प्रेमाच्या आणि आपुलकीच्या आठवणी माझ्या मनात ताज्या राहतील. मला जे काही मिळाले आहे, ते मला या देशाकडूनच मिळाले आहे.

एक असा देश ज्याने फाळणीनंतर एका बेघर मुलाला एवढ्या मोठ्यावर पदावर नेले. हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. हादेखील एक सन्मान आहे ज्याचा मला सदैव अभिमान वाटेल.

राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस

0

-खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या ,सरदार मनमोहन सिंग यांचा ज्या प्रकारे आदर केला जातो , तो आदर राजकारणातील फार कमी लोकांना मिळतो ,त्यांच्यापासून प्रेरणा मिळते प्रामाणिक पणाची .त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी राहील , जे त्यांच्या विरोधकांकडून अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत स्थिर राहिले.ते खऱ्या अर्थाने समतावादी, हुशार , प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते . राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस.

PMमोदी म्हणाले- सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य
मनमोहन सिंग यांनी आर्थिक संकटाने घेरलेल्या देशात नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांची जनतेशी आणि देशाच्या विकासाची बांधिलकी नेहमीच आदराने पाहिली जाईल. डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. त्यांची नम्रता आणि सौम्यता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य ठरले.पक्षीय राजकारणाच्या वर उठून त्यांनी प्रत्येक पक्षातील लोकांशी संपर्क ठेवला आणि ते सहज उपलब्ध राहिले. इथे दिल्लीत आल्यानंतरही मी त्यांना भेटायचो, बोलायचो. त्यांच्यासोबत झालेल्या माझ्या भेटीगाठी आणि चर्चा मला नेहमी आठवतील. या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी सर्व देशवासियांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो.

राज ठाकरे म्हणाले,भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं. जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ” डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच. डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन…

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेला डॉ. मनमोहन सिंह यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने ते एक महान नेते बनले. त्यांचं योगदान देशाच्या कायम स्मरणात राहील.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. जगाशी स्पर्धा करणारा मजबूत भारत घडविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत. सन 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मनमोहन सिंग यांना प्रथमताच अर्थ खात्याची जबाबदारी मिळाली. याच काळात आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून त्यांनी अर्थव्यवस्थेची दिशा बदलून दाखविली. आज जो सामर्थ्यशाली भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा वाटा आहे.पंतप्रधान म्हणून सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. सामान्य माणसांच्या हक्कांचे रक्षण करून, त्यांचा आवाज बुलंद केला. सन 2008 मध्ये राष्ट्रव्यापी शेतकरी कर्ज माफी जाहीर करून त्यांनी देशातील शेतकऱ्यांना धीर दिला. याशिवाय राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र अर्थात आधार, लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळवून देणे, अन्नसुरक्षा कायदा यासारखे धाडसी निर्णय त्यांनी केले.राजकीय हेतूने मनमोहन सिंग यांच्यावर टीका झाली असली, तरीही इतिहास मात्र त्यांची नोंद अत्यंत सकारात्मक घेईल.एक सामर्थ्यशाली देश घडविणाऱ्या कणखर आणि खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात

मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार; 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

0

नवी दिल्ली-माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान दीर्घकाळ आजारी होते. घरीच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये आणण्यात आले.रुग्णालयाच्या बुलेटिननुसार, त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी रात्री 9:51 वाजता अखेरचा श्वास घेतला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनमोहन सिंग 2004 मध्ये देशाचे 14 वे पंतप्रधान बनले. या पदावर त्यांनी मे 2014 पर्यंत दोन टर्म पूर्ण केल्या होत्या. ते देशातील पहिले शीख आणि सर्वाधिक काळ सेवा करणारे चौथे पंतप्रधान होते.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

बेळगावीहून रात्री उशिरा दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे थेट मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी गेले. राहुल यांनी X वर लिहिले- मी माझे मार्गदर्शक आणि गुरु गमावले.

दरम्यान, कर्नाटकातील बेळगावी येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. पक्षाचे कार्यक्रम ३ जानेवारीनंतर सुरू होतील.
मनमोहन सिंग ३ एप्रिल रोजी राज्यसभेतून निवृत्त झाले. 1991 मध्ये ते पहिल्यांदा आसाममधून राज्यसभेत पोहोचले. त्यानंतर ते सुमारे ३३ वर्षे राज्यसभेचे सदस्य राहिले. सहाव्या आणि शेवटच्या वेळी ते 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार झाले.3 जानेवारी 2014 रोजी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून शेवटची पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी 100 हून अधिक पत्रकारांच्या 62 प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात मनमोहन सिंग म्हणाले की, समकालीन माध्यमांपेक्षा इतिहास माझ्यासाठी अधिक उदार असेल, असा माझा प्रामाणिक विश्वास आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हटले जाते. त्यांनी सुचवलेल्या धोरणांमुळे आर्थिक सुधारणांची दारे खुली झाली. खरे तर १९९१ मध्ये पी.व्ही.नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा डॉ.मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. देशाची आर्थिक स्थिती बिकट होती. परकीय चलनाचा साठा १ अब्ज डॉलर इतका कमी झाला. पूर्वीच्या चंद्रशेखर सरकारने तेल आणि खतांच्या आयातीसाठी ४० कोटी डॉलर उभे करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये ४६.९१ टन सोने गहाण ठेवले होते. याच काळात मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण आणले.

२४ जुलै १९९१ हा दिवस भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने भारतातील नव्या उदारमतवादी अर्थव्यवस्थेचा पाया घातला. डॉ.सिंग यांनी अर्थसंकल्पात परवाना राज संपवले होते. अनेक निर्बंधांतून कंपन्या मुक्त झाल्या. आयात-निर्यात धोरण बदलले. ज्याचा उद्देश आयात परवाना शिथिल करणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे हा होता. परकीय गुंतवणुकीचे मार्ग खुले झाले. इतकेच नाही तर आयकर कायद्याच्या कलम ८० एचएचसीअंतर्गत सॉफ्टवेअर निर्यातीसाठी कर सूटही जाहीर केली. डॉ. मनमोहन सिंग यांची आर्थिक धोरणे इतकी आश्चर्यकारक होती की २ वर्षांत म्हणजे १९९३ मध्ये देशाचा परकीय चलनाचा साठा १ अब्ज डॉलरवरून १० अब्ज डॉलरपर्यंत वाढला. १९९८ मध्ये ते २९० अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते.

सिंग यांचे दुसरे मोठे यश म्हणजे अमेरिकेसोबतचा अणुकरार. जाने. २०१४ मध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही आपल्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले होते.

२ जी-कोळसा घोटाळा

यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाई, २जी, दूरसंचार, कोळसा घोटाळे समोर आले. यामुळे त्यांच्या सरकारवर टीका झाली. विरेाधकांच्या निशाण्यावर राहिले. या घोटाळ्यांमुळे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

शिक्षणाचा हक्क : ६ ते १४ वयाच्या मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला.

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार अधिनियम नागरिकांना सरकारी अधिकारी, संस्थांकडून माहिती मागण्याचा अधिकार देते. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्वाला प्रोत्साहन देणे व भ्रष्टाचार कमी करण्यात मैलाचा दगड ठरला.

रोजगार हमी योजना (मनरेगा)

जागतिक बँकेनेही कौतुक केले. याला जगातील सर्वात मोठा लाेक निर्माण कार्यक्रम जाहीर केले. यामुळे देशाच्या १५% लोकसंख्येला सामाजिक सुरक्षा मिळाल्याचे सांगण्यात आले.

ओळखीसाठी आधार

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००९ मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना केली होती. आधार योजनेचे कौतुक संयुक्त राष्ट्रानेही केले.

मार्च २००६ : अमेरिकेशी अणुकरार

आघाडी सरकारच्या विविध दबावांत भारताने भारत-अमेरिका अणुकरारावर स्वाक्षरी केली. भारत अण्वस्त्राच्या बाबतीत एक शक्तिशाली राष्ट्राच्या रूपात पुढे आला. या कराराने अमेरिकेसोबतच्या संबंधांना नवे वळण दिले.

भूसंपादन कायदा

यामुळे ज्यांच्या जमिनीचे विकास कामासाठी भूसंपादन झाले आहे, अशांना योग्य मावेजा निश्चित केला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा: या कायद्याद्वारे देशातील दोन तृतीयांश कुटुंबांना सबसिडीत धान्य उपलब्ध केले.

आजी-आजोबांनी वाढवले

मनमोहन सिंग पाकिस्तानातून विस्थापित झाल्यानंतर हल्द्वानीला आले. लहानपणीच आई वारली. आजी-आजोबांनी वाढवले. गावात कंदील लावून अभ्यास केला. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणून प्री-मेडिकल कोर्सला प्रवेश घेतला. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी अभ्यासक्रम सोडला.

मनमोहन सिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण उर्दूत झाले होते. पंतप्रधान झाल्यावर भाषणाची स्क्रिप्ट उर्दूत लिहीत होते. अनेकदा गुरूमुखीमध्येही लिहिली.

ऑक्सफर्ड ते नियोजन आयोगापर्यंत

१९४८ मध्ये मॅट्रिक झाले. केंब्रिज आणि ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली. १९७१ मध्ये ते वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले. 1985 ते 1987 पर्यंत ते नियोजन आयोगाचे प्रमुख होते आणि 1982 ते 1985 पर्यंत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. पीव्ही नरसिंह राव सरकारमध्ये (1991) अर्थमंत्री झाले. 2018 मध्ये काँग्रेसमधून राज्यसभेत पोहोचले.

लाजाळू… लांब केसांमुळे केंब्रिजमध्ये थंड पाण्याने आंघोळविदेश व्यापार विभागात सल्लागार असताना मंत्री ललित नारायण मिश्रा यांच्याशी वाद झाला. त्यांनी ललितला स्पष्टपणे सांगितले की, जर ते खूप पुढे गेले तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीवर परत जाईन.

मनमोहन लहानपणापासून लाजाळू होते. केंब्रिजमध्ये ते एकमेव शीख असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. लांब केसांमुळे त्यांना आंघोळ करताना लाज वाटायची. अशा स्थितीत सगळ्या मुलांची आंघोळ झाल्यावर आंघोळ करायचे. तोपर्यंत गरम पाणी संपून त्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती.

मंत्री एलएन मिश्रांशी अडले सिंग, म्हणाले, मी शिकवायला जाईनविदेश व्यापार विभागात सल्लागार असताना मंत्री ललित नारायण मिश्रा यांच्याशी वाद झाला. त्यांनी ललितला स्पष्टपणे सांगितले की, जर ते खूप पुढे गेले तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीवर परत जाईन.

डॉ. मनमोहन सिंग यांनी १२ ऑगस्ट २००५ रोजी लाेकसभेत १९८४ च्या शीख दंगलीसाठी माफी मागितली. ते म्हणाले होते की, देशात तेव्हा जे काही झाले,त्यासाठी मी माझी मान शरमेने झुकवताे. मनमोहन यांनी 1991 च्या अर्थसंकल्पाच्या दोन आठवड्यांपूर्वी अर्थसंकल्पाचा मसुदा घेऊन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा राव यांनी तो साफ नाकारला. म्हणाले, ‘मला हेच हवे होते तर मी तुम्हाला का निवडले?’ त्यात व्हिक्टर ह्यूगोची ओळ लिहिली होती – ज्याची वेळ आली आहे. अशा कल्पनेला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही.

डॉ. सिंग यांना ॲक्सिडेंटल प्राइममिनिस्टर म्हटले. २०१९ मध्ये “चेंजिंग इंडिया” पुस्तकाच्या प्रकाशनावर डॉ. सिंग म्हणाले, मला ॲक्सिडेंटल प्रधानमंत्री म्हटले जाते, मात्र मी ॲक्सिडेंटल वित्तमंत्रीही होतो. २०१९ मध्ये या नावाचा चित्रपट आला. हा संजय बारू यांच्या पुस्तकावर होता. 1991 मध्ये अर्थमंत्री असताना मनमोहन यांच्या अर्थसंकल्पावर तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी जोरदार टीका केली होती. वाजपेयींच्या टीकेने दुखावलेल्या मनमोहन यांनी राजीनाम्याचा विचार सुरू केला. त्यानंतर वाजपेयींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय मागे घेतला.

मनमोहन सिंग यांनी अत्यंत हुशारीने आणि प्रामाणिकपणाने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामुळे संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा मिळाली. – राहुल गांधी, काँग्रेस नेते

आरबीआयच्या गव्हर्नरपासून ते अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

स्वामित्व योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मालमत्ता पत्रक सनद वाटप कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन

पुणे दि.26: स्वामित्व योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना ‘दस्तऐवजाचा हक्क’ अर्थात सनद देण्यात येत असून याबाबतचा जिल्हास्तरीय सनद वाटप कार्यक्रम शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषद पुणे येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.यावेळी भारत सरकारचे सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या गृह (शहरे), नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्र्यांचे ऑनलाईन संबोधन दाखविण्यात येणार आहे.

राज्य महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेद्वारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक उपलब्ध करुन देताना ‘दस्तऐवजाचा हक्क’ प्रदान करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये ड्रोनद्वारे हवाई मॅपींग करून गावठाणातील मिळकतींचे नकाशे तयार करण्यात येतात. सदर नकाशांचे ग्राऊंड ट्रथींग करून हक्कचौकशी अंती मिळकतींच्या सनदा व मिळकतपत्रिका तयार करण्यात येतात.

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत मालमत्ता विषयक कागदपत्र उपलब्ध झाल्याने ग्रामीण क्षेत्रातील लोकांना सक्षम बनविले आहे. याचाच एक भाग म्हणून २७ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री हे ५० लाख मालमता पत्रकांचे आभासी (ऑनलाईन) वितरण करताना लाभार्थ्यांना संबोधित करणार आहेत.

या आभासी कार्यक्रमानंतर जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये प्रॉपर्टी कार्डचे प्रत्यक्ष वितरण करावयाचे आहे. पुणे जिल्हातील १३ तालुक्यामधील १ हजार १४९ गावांना स्वामीत्व योजना लागू करण्यात आली असून ड्रोन प्लॉयींगचे काम पूर्ण झाले आहे. ७८२ गावांच्या सनद व मिळकतपत्रीका तयार करणेत आलेल्या आहेत. त्यापैकी ७५ गावात सनद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
0000

अलंकार पोलीस ठाण्यासमोरच्या ट्रॅकवरील रिक्षा मीटर तपासणी १ जानेवारीपासून बंद

पुणे, दि.२६: अलंकार पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ट्रॅकवर ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी येणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हा ट्रॅक १ जानेवारी २०२५ पासून बंद करण्यात येणार आहे, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार असून सर्व रिक्षा संघटना, रिक्षाचालक-मालक यांनी ऑटोरिक्षा मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलीब्रेशन) करावयाचे असल्यास आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे आपली वाहने सादर करावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केल आ

रतन टाटा यांना भारतरत्न द्यावे, टीम पिंपरी चिंचवडची स्वाक्षरी मोहीम-पिंपरी चिंचवड शहरात रतन टाटा यांचे स्मारक उभारावे

पिंपरी पुणे (दि. २६ डिसेंबर २०२४) भारतीय उद्योग विश्वाचा पाया रचण्यात टाटा कुटुंबीयांचे अतुलनीय योगदान आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात टाटा मोटर्स सह टाटा कंपनीच्या इतर शाखांमुळे शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. या शहराच्या औद्योगिक पायाभरणीमध्ये उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे. कामाप्रति त्यांची निष्ठा आणि आपल्या कामगारांवर असणारे त्यांचे प्रेम यामुळे आज लाखो लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. स्व. रतन टाटा यांचे उद्योग विश्वाविषयी असणारे कार्य घरोघरी पोहोचायला पाहिजे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातून “टीम पिंपरी चिंचवड” च्या वतीने करण्यात येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्वर्गीय रतन टाटा यांचे तैलचित्र आणि शहरामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक उभारावे या मागणीसाठी टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे यांनी गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. लाखो नागरिकांचे हे स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात येणार आहे.
तसेच शनिवारी (दि. २८) स्वर्गीय रतन टाटा यांच्या प्रथम जयंती निमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सायंकाळी सहा वाजता रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रतन टाटा यांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी टीम पिंपरी चिंचवडच्या वतीने रतन टाटा यांचे छायाचित्र असणारी फ्रेम शहरातील दहा हजार कुटुंबांना घरोघरी जाऊन भेट देण्यात येणार आहे अशी माहिती टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे, सुशांत मोहिते, सोमनाथ काळभोर, अनिरुद्ध संकपाळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला पुण्यात

पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष तर विनोद जाधव स्वागताध्यक्षसाहित्यिक चर्चा, परिसंवाद, मुलाखती, गप्पांबरोबरच संगीत नाटकाचा रंगणार प्रयोग
गदिमांच्या गीतांवर ‌‘अमृतसंचय‌’ सांगीतिक कार्यक्रम
रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने शि. द. फडणीस यांचा होणार विशेष गौरव

पुणे : सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे शनिवार, दि. 4 जानेवारी आणि रविवार, दि. 5 जानेवारी 2025 रोजी पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन, समारोप समारंभासह साहित्यिक चर्चा, विविध विषयांवर परिसंवाद, मुलाखती, गप्पा, कविसंमेलन, प्रहसने, सांगीतिक कार्यक्रम तसेच संगीत नाटकाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय संमेलन होणार असून संमेनलाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, मराठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे, ती प्रवाहित राहावी या संकल्पनेतून पहिल्या रोटरी डिस्ट्रिक्ट मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी प्रांतपाल शितल शहा, संयोजन समिती कार्याध्यक्ष राजीव बर्वे, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज हे या मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य यजमान असून पुण्यातील 15 रोटरी क्लब सहयजमान आहेत. पत्रकार परिषदेला डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता बर्वे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मोहन चौबळ यांची उपस्थिती होती.
शनिवारी (दि. 4) सकाळी 9:15 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून यात रोटरियन्सचा सहभाग असणार आहे. सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी गणेशवंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, नगरसेवक जयंत भावे, उपप्रांतपाल मोहन पालेशा, डि. लर्निंग जिल्हा प्रशिक्षक पंकज शहा, संतोष मराठे, नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर सकाळी 11:30 वाजता संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून वैशाली वेर्णेकर, अभय जबडे हे विश्वास पाटील यांची मुलाखत घेणार आहेत. दुपारी 2:30 वाजता योगेश सोमण लिखित ‌‘ट्रेनिंग‌’ हे प्रहसन अविनाश ओगले आणि लीना गोगटे सादर करणार आहेत. दुपारी 2:45 वाजता ज्येष्ठ साहित्यिक शिवराज गोर्ले यांच्या अध्यक्षतेखाली ‌‘यशस्वी लेखनाची सूत्रे‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे, साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी राजेश दामले संवाद साधणार आहेत. दुपारी 4:15 वाजता संजय डोळे लिखित ‌‘मन:शांती‌’ हे प्रहसन राजेंद्र उत्तुरकर, सुनिता ओगले सादर करणार आहेत. वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरियन्सचा सहभाग असलेले निमंत्रितांचे कविसंमेलन सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आले असून यात अंकाजी पाटील, विजय पुराणिक, सुप्रिया जोगदेव, स्नेहल भट, ममता कोल्हटकर, डॉ. अश्विनी गणपुले, नीता केळकर, जयश्री कुबेर, डॉ. आनंदा कंक, राहुल लाळे, मुरलीधर रेमाणे, शशिकांत शिंदे, प्रदीप खेडकर, हर्षदा बावनकर, तनुजा खेर यांचा सहभाग आहे. संयोजन निनाद जोग करणार असून सूत्रसंचालन डॉ. अंजली कुलकर्णी करणार आहेत. रात्री 8:30 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‌‘संगीत कट्यार काळजात घुसली‌’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत असून अभय जबडे, रवींद्र खरे, अर्णव पुजारी, वज्रांग आफळे, विश्वास पांगारकर, निधी घारे, अनुष्का आपटे, ऋषिकेश बडवे आणि डॉ. चारुदत्त आफळे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, अथर्व आठल्ये, प्रज्ञा देसाई यांची साथसंगत असणार आहे.
रविवारी (दि. 5) सकाळी 9:50 वाजता पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे आणि सहकारी शिववंदना सादर करणार आहेत. सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्डने सन्मान करण्यात येणार असून पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून प्रा. मिलिंद जोशी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता सुप्रिया जोगदेव लिखित ‌‘ऑफिस ऑफिस‌’ हे प्रहसन शंतनु खुर्जेकर, अविनाश ओगले सादर करणार आहेत. माजी प्रांतपाल, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांच्या अध्यक्षतेखाली ए. आय.चा साहित्यावर परिणाम होईल का? या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे, डॉ. आदित्य अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3:45 वाजता संजय डोळे लिखित ‌‘आगलावे वि. पेटवे‌’ हे प्रहसन संजय डोळे, पूजा गिरी, राजेंद्र उत्तुरकर, मधुर डोलारे सादर करणार आहेत. दुपारी 4 वाजता ‌‘अमृतसंचय‌’ हा ग. दि. माडगूळकर यांच्या गीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुग्धा ढोले, आसावरी गोडबोले, दीपक महाजन, श्रीकांत बेडेकर गीते सादर करणार आहेत. अनिल गोडे, मिलिंद गुणे, मिहिर भडकमकर, सचिन वाघमारे, स्वयम्‌‍ सोनावणे, रोहित साने साथसंगत करणार आहेत. संयोजन मनिषा अधिकारी यांचे असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत.
सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि ‌‘असत्यमेव जयते‌’चे लेखक अभिजित जोग यांच्या समवेत मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि प्रांतपाल शितल शहा, सूर्यकांत वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न: नाना पटोले

भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४
परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही.

देशात हुकूमशाही सुरु असून सध्या देशात काय चालले आहे हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे. देशातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.