Home Blog Page 518

207 वा शौर्य दिन:आंबेडकरी अनुयायांकडून कोरेगाव भीमात अभिवादन

पुणे-पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनाचा उत्साह मंगळवारपासूनच सुरू झाला आहे. दरवर्षी एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी परराज्यातून तसेच राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी येत असतात. यंदाही ३१ डिसेंबरपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची गर्दी सुरू झाली. आज लाखोंच्या संख्येने येथे अनुयायी दाखल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थंभाला अभिवादन केले. या नंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना एक कविता देखील सादर केली.

भिमा कोरोगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा,
उंच होतो आमचा माथा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता आणि
जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा
कोरेगाव स्तंभाला मी सलाम करतो जाता जाता

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जयस्तंभास अभिवादन केले. भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या – एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन

पुणे,दि.१: पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

मंत्री श्री. भरणे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आदी उपस्थित होते.

अनुयायांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतील त्या भविष्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासन काम करेल, असेही श्री. भरणे यावेळी म्हणाले.

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून विजयस्तंभास अभिवादन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले.

पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समाधान व्यक्त केले.

वाल्मीक कराड:कोर्टात 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादी, देशमुखांचा मारेकरी सुदर्शन घुलेअसल्याचा दावा

सुदर्शन घुले महाराष्ट्रातच लपल्याची शक्यता-तपास यत्रणांच्या मते, सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच कुठेतरी, तर कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे राज्याबाहेर लपल्याचा संशय आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा शोध घेतला जात आहे. सीआयडीची टीम बुधवारी सकाळीच सुदर्शन घुलेच्या केज तालुक्यातील टाकळी गावात पोहोचली आहे.

बीड- मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड अखेर सीआयडीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा केज कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. यावेळी झालेल्या युक्तिवादात सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादी सादर केली. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे.

वाल्मीक कराड मंगळवारी दुपारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर त्याला रस्ते मार्गाने बीडच्या केज कोर्टापुढे हजर करण्यात आले. यासंबंधी रात्री 11 च्या सुमारास न्यायमूर्ती एस व्ही पावसकर यांच्या न्यायदालनात सुनावणी झाली. त्यात वाल्मीकला 14 दिवसांच्या सीआयडी कोठडीत पाठवण्यात आले.

तत्पूर्वी सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी वाल्मीकच्या कोठडीसाठी या प्रकरणाशी निगडीत काही मुद्दे मांडले. यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचाही समावेश होता. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या निर्देशांनुसार काम करत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराडच्या कोठडीची आवश्यकता आहे, असे सरकारी वकील म्हणाले.

सरकारी वकिलांच्या या युक्तिवादावर बचाव पक्षाच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. आपल्या अशिलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे नमूद करत त्यांनी त्याच्या जामिनाची मागणी केली. त्यावर सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादीच कोर्टापुढे सादर केली. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या सीआयडी कोठडीत पाठवले.

माझ्या अशिलाविरोधात खंडणीची तक्रार आहे. पण त्यात कुठेही 2 कोटी रुपये मागितल्याचा उल्लेख नाही. विष्णू चाटेचा मोबाईल नाशिकमध्ये आढळला. त्याने वाल्मीक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचे सांगितले, पण केव्हा हे स्पष्ट झाले नाही. आमचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण आला. त्यामुळे त्याच्या 15 दिवसांच्या कोठडीची गरज नाही, असे वाल्मीक कराडचे वकील म्हणाले.

सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. आज त्याच्या चौकशीचा पहिला दिवस आहे. बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत सीआयडीचे अधिकारी त्याची झाडाझडती घेत आहेत. सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.
सीआयडी सुदर्शन घुलेच्या मागावर

संतोष देशमुख हत्येप्रकरणात सीआयडी आता मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या मागावर आहे. सुदर्शन घुले या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यासह त्याचे 2 साथीदार सध्या पसार आहेत. गेल्या 22 दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले सापडल्यास या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. विशेषतः संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींना कुणाला व्हिडिओ कॉल केला? हे ही स्पष्ट होईल. त्यामुळे त्याचा आता कसून शोध घेतला जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराडने शरण येण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला होता की, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.

आयटी पासून मॅन्यूफॅक्चरिंग पर्यंत सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची असेल रेलचेल

दाऊदी बोहरा समाजाचा ४ ते ६ जानेवारी पुण्यात भव्य बिझनेस एक्सपो

पुणे : दाऊदी बोहरा समाजातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान येरवडा स्थित डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर भव्य चौथे सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांमधील लोकांना एकदुसऱ्यांशी कनेक्ट करून व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुर्तजा जसदानवाला यांनी दिली. 
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, तीन दिवस आयोजित या एक्स्पोमध्ये एमएसएमईज, मॅन्यूफॅक्चरर्स, स्टार्टअप्स, आयटी कंपन्या, वुमेन एन्टरप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स सह विविध क्षेत्रातील दाऊदी बोहरा समाजाचे उद्योजक आणि व्यावसायिकांचे जवळपास १७० स्टाॅल्स येथे असणार आहेत. एक्सपो मध्ये देश-विदेशातून येणाऱ्या दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांसह हजारो नागरिक यामध्ये सामिल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
दाऊदी बोहरा समाज व्यापार-उद्योग करताना आपली सामाजिक जबाबदारीदेखील चांगल्याप्रकारे निभावत असतो. त्यामुळे बिघडत्या पर्यावरणाला सावरण्यासाठी एक्स्पोमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला एक रोपटे भेट दिले जाणार आहे. अशाप्रकारे या एक्स्पोदरम्यान सुमारे ५० हजार झाडांचे वितरण करण्यात येणार आहे. 
महोत्सवासाठी अनेक गणमान्य व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, महेंद्र पितालिया, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह उद्योग-व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील हजारो मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये नागरिकांनी लाखोंच्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन मुर्तजा जसदानवाला यांनी केले आहे. 

496 कोटींचा जीएसटी बुडविला:कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात २ राजस्थानी व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे-बनावटी जीएसटी फर्म, बनावट आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून 54 कंपन्या स्थापन करून तब्बल 496.27 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी डायरोक्टारेट जनरल ऑफ जीएसटी विभागाने (डिग्गी) दिलेल्या तक्रारीवरून कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश कुमार (26,रा. देवडा जालोर, राजस्थान) आणि विरेंद्र कुमार (26, रा. मुर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत डीजीजीआयचे पुणे विभागाचे विभागीय माहिती अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डीजीजीआयने केलेल्या तपासामध्ये त्यांना सुरवातीला बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्डच्या आधारे बनावट जीएसटी नंबर घेऊन कंपन्या स्थापन झाल्याची माहिती मिळाली होती. या कंपन्या मार्फत गुड्स आणि सर्व्हीस पुरवत असल्याचे भासवले जात होते. यामध्ये डीजीजीआय विभागाला यामध्ये काही तरी मोठा घोटाळा असल्याचा संशय आला. गोवा स्थित तीन कंपन्या आर. के. इंटरप्रायझेस, एस. के. इंटरप्रायझेस आणि महालक्ष्मी इम्पॅक्ट या कंपन्यामार्फत जीएसटी चुकविला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तपासात ह्या बनावट कंपन्या व त्या संबंधीत कंपन्याचा जीएसटी एकाच ठिकाणहून म्हणजे राजस्थान येथून भरला गेल्याचे निदर्शनास आले.

अधिक तपासामध्ये ही फसवणूक दिनेश कुमार नावाच्या एका आरोपीकडून होत असल्याचे निदर्शनास आले. तो राहुल कुमार नावाने ह्या कंपन्या चालवत असल्याचे नंतर तपासात समोर आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या अधिक तपासामध्ये त्याचा साथीदार विरेंद्र कुमार असल्याचे निदर्शनास आले. विरेंद्र हा कल्पेश कुमार नावाने बनावट कंपन्या चालवत असल्याचे निदर्शनास आले. अशा पध्दतीने त्यांनी तब्बल 54 बनावट कंपन्या स्थापन करून 496.27 कोटींचा कर बुडविला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 दरम्यान घडला असून गुन्ह्याचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला करत आहे.

जीएसटी चुकवणाऱ्या वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेन्जवर मुंबई जीएसटी आयुक्तालयाची कारवाई

0

व्याज आणि दंडासह 49.20 कोटी रुपयांच्या रोख रकमेची वसुली

मुंबई, 31 डिसेंबर 2021

मुंबई झोनच्या पूर्व मुंबई जीएसटी आयुक्तालयाने  40.5 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे प्रकरण उघडकीला आणले असून वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर कारवाई केली आहे.  जीएसटी कर,व्याज आणि दंडाची रक्कम म्हणून आयुक्तालयाने 49.20 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वसूल केले आहेत.

वझीर एक्स हे विनिमय केंद्र  मेसर्स झानमाई लॅब्ज प्रा लि. कडून चालवले जाते तर डब्लूआरएक्स हे क्रिप्टोकरन्सी चलन मेसर्स बिनान्स इन्वेस्टमेंट कंपनी लिमिटेड या सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे आहे. झानमाई लॅब्जने डिसेंबर 2017 मध्ये स्थानिक क्रिप्टोकरन्सी स्टार्ट अप म्हणून वझीर एक्सची नोंदणी केली होती.  

हे विनिमय केंद्र व्यापाऱ्याला रुपये किंवा डब्लूआरएक्समध्ये व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. वझीरएक्स प्लॅटफॉर्मकडून डब्लूआरएक्स खरेदी करावे लागते. या विनिमय केंद्राकडून ग्राहक आणि विक्रेता या दोघांकडूनही कमिशनची आकारणी केली जात होती आणि रुपयावरील व्यवहारावर 0.2 टक्के तर डब्लूआरएक्स वर 0.1 टक्के आकारणी होत होती.

ट्रेडींग शुल्क, डिपॉझिट शुल्क आणि विथड्रावल शुल्क म्हणून ही कंपनी कमिशनमधून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा करत होती असे चौकशीत आढळले. ही कंपनी रुपयावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत होती मात्र डब्लूआरएक्स चलनावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत नसल्याचे दिसून आले.

या व्यवहारावरील शुल्क म्हणून 18 टक्के दराने जीएसटी लागू होतो. अशा प्रकारे सुमारे 40.5 कोटी रुपयांचा जीएसटी भरला गेला नव्हता. हा कर आणि व्याज आणि दंडासह एकूण 49.2 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वझीरएक्सकडून जागीच वसूल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुंबई झोनच्या सीजीएसटी  विभागाचे अधिकारी ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंग, नॉन फंजीबल टोकन आणि इतर उदयोन्मुख क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व्यवहारांचा तपास त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य करचुकवेगिरीची शक्यता लक्षात घेऊन अधिक काळजीपूर्वक करत आहेत.

मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सी विनिमय केंद्रांची तपासणी सीजीएसटी विभाग करणार असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.

वाल्मिक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी कोणी साथ दिली ह्याची चौकशी करावी यासाठी पुणे पोलिसांना शिवसेनेचे निवेदन .

पुणे :- बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेमधे मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मागील २२ दिवस महाराष्ट्र सरकारला , मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस प्रशासनाला गुंगारा देत फिरत होता, त्यावेळी तो मागील बरेच दिवस पुण्यात असल्याचे त्याच्या सोबत असलेल्या बिडच्या नगरसेवकाच्या मीडियासोबत बोलतानाच्या स्टेटमेंट वरून सिद्ध झाले आहे, ह्याचा अर्थ आरोपी वाल्मिक कराड हा पुण्यात वास्तव्यास होता. त्यामुळे पुण्यात त्याला कोणी मदत केली ह्याची पण सखोल चौकशी व्हावी आणि त्यांनाही सदर विषयात सहआरोपी करन्यात यावे. पुणे शहरातील व इतर भागातील किती समर्थक त्याच्या संपर्कात होते व त्याला साथ देत होते याची चौकशी करण्यात यावी. तसेच पुणे शहर हे गुन्हेगारांना वास्तव्यासाठी सुरक्षित का वाटत आहे ? पुणे शहरातील गुन्हेगार इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांना सहकार्य करतात असा संशय येतो म्हणून या विषयाचा तपास होणे आवश्यक वाटते. महाराष्ट्रातील गुन्हेगारी समूळ नष्ट व्हावी यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहील असे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले .

वाल्मिक कराड आज पोलिसासमोर हजर होणार हे पोलिसां व्यतिरिक्त इतर लोकांना अगोदर माहिती असते, सरकारवर उपकार केल्यासारखा आरोपी सीआयडी समोर हजर होतो मग आरोपी अनेक दिवस बीडच्या गाड्या घेऊन समर्थकांसह पुण्यात असून सापडत नाही हे पुणेकर नागरिकांना पटण्याजोगे नाही.
या विषयाची सखोल चौकशी व्हावी यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने पुणे पोलिस विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांना पत्र देण्यात आले .

यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेना समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी, उपविभाग प्रमुख अनिल परदेशी, सुरेश घाडगे, संजय साळवी उपस्थित होते.

२०२४:शरद मोहोळ,वनराज आंदेकर हत्या..पोलिसांनी पकडले ४००० कोटींचे ड्रग्ज,पोर्शे अपघात,वाघोली पदपथावर झोपलेल्यांना डंपरने चिरडले, बोपदेव घाटात बलात्कार अन कोयता गँग. बंदुकींचा सुळसुळाट

पुणे – २०२४ आता मावळलंय.. २०२५ च्या सुर्योदयाकडे आशेने पाहत असताना गुन्ह्यांनी काळवंडलेल्या २०२४ कडे खरे तर मागे वळून पाहण्याची आवश्यक्यता नाहीच . कारण

नैनों से नैना जो मिला के देखे
मौसम के साथ मुस्कुरा के देखे
दुनिया उसीकी है जो आगे देखे
मुड़ मुड़ के न देख …

असे म्हणतात पण तरीही २०२५ च्या आगमनापूर्वीच २०२४ वर हलकीशी का होईना नजर गेल्याशिवाय राहत नाही . या वर्षात पुण्यानं अल्पवयीन मुले मोठ्या संख्येने गुन्हेगारीकडे वाळलेली पाहिली . कोयता गँग, पिस्टल, गावठी कट्टे अशा बंदुकांचा सुळसुळाट पुण्याला भयावह आहेच त्याबरोबर शहरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न, महिलांविषयक गुन्हे , खुलेआम ड्रग्सची विक्री असे अनेक प्रकार सरत्या वर्षात पुणेकरांनी पाहिले . इतकंच नाही तर अशा अनेक घटना सुद्धा अधोरखित झाल्या की जिथे पुणे पोलिसांनी जिवाचं रान करून आरोपींच्या वेळीच मुसक्या आवळल्या तर कधी रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची परेड काढली गेली. पुण्यातील पोर्श अपघातासह अशा अनेक घटना घडल्या ज्याने संपूर्ण शहर हादरून गेलं. सरत्या वर्षातील कुठल्या अशा घटना आठवतात ते पहा

२०२४ ची सुरुवातच पुण्यातील या खळबळजनक घटनेने घडली. एकेकाळी कुख्यात गुंड मानला जाणाऱ्या शरद मोहोळ यांची त्यांच्याच घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येने २०२४ हे वर्ष गुन्हेगारीचे असणार की काय याची चाहूल लागली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या मात्र शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवशी त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली आणि पुण्यातील गँग वॉर आता डोकं वर काढणार अशी भीती संपूर्ण शहराला बसली

१ सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेत डोके तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा धारधार शस्त्राने वार करत आणि गोळीबार करत खून करण्यात आला. सुरुवातीला वनराज याचा खून कौटुंबिक कारणांनी आणि संपत्तीच्या वादातून झाला असं समजलं मात्र वर्चस्व वादातून हा सगळा प्रकार घडल्याचे पोलीस तपासातून समोर आलं. या घटनेने पुणे शहरात टोळी युद्ध पुन्हा जोर धरणार अशी चर्चा शहरातील प्रत्येक चौका चौकात ऐकायला मिळाली.

पुणे पोलीस आयुक्त पदाचा अमितेश कुमार यांनी स्वीकारला आणि पहिला दणका दिला. पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी थेट पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १०,२० नव्हे तर तब्बल २६७ गुन्हेगारांची एकत्रित परेड काढली. फोफावलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांची परेड काढण्याची नामी शक्कल लढवली.पण …

पुण्यातील विश्रांतवाडी भागात मिठाच्या पुड्यात सापडलेले २ किलो ड्रग्स थेट एका अंतराष्ट्रीय ड्रग्स तस्कर आणि त्याच्या रॅकेट पर्यंत पोहचलं. राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून ४००० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलं. या संपूर्ण ड्रग्स तस्करीचा मास्टरमाईंड भारतात जन्मलेला मात्र परदेशात स्थायीत असलेला संदीप धूनिया हे स्पष्ट झालं. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे तयार झालेले ड्रग्स हा धूनिया फूड पॅकेट मधून लंडन आणि इतर ठिकाणी तस्करी करायचा. केंद्रीय यंत्रणांनी इंटरपोल ची मदत घेत धूनियावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

१८ मे २०२४, फक्त पुणे शहर च नव्हे तर देश, विदेशात ही तारीख ओळखली जाईल ती म्हणजे पोर्शे अपघातामुळे. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन तरुणाने त्याच्याजवळलील भरधाव पोर्शे गाडी ने २ तरुणांचा जीव घेतला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली पण बाल न्यायलयाने या अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांच्या निबंध लिहिण्याच्या अटी वर त्याची सुटका केली. आणि संपूर्ण देश पेटून उठला. यातील अनेक कंगोरे जसे जसे बाहेर आले तशी ही घटना गंभीर होत गेली. स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव, आरोपींचे रक्ताचे नमुने बदलणे, ससून रुग्णालयातील डॉक्टर यांनी आरोपींना केलेली मदत यामुळे या घटनेकडे एक चिड येणारी घटना म्हणून पाहायला गेलं. या प्रकरणात पैश्याचा जोरावर सगळं जिंकता येईल असं मानणारे अनेक जण आज ही येरवडा कारागृहात आहेत.माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरण

पुण्यातील चंदननगर भागातून वाहणाऱ्या मुठा नदीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे केले होते. ओळख पटू नये म्हणून या मृतदेहाचे शिर, धड वेगळं करून नदीत फेकलं होतं. पावसाळ्याच्या दिवसात नदीचा पाण्याचा वेग आणि व्याप्ती याचा फायदा घेत भावानेच अवघ्या १० बाय १० च्या रूम वरून स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा निर्घृण खून केला. तांत्रिक विश्लेषण आणि ह्युमन intelligence या दोन गोष्टींच्या जोरावर पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास अतिशय शिताफीने केला.

ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती पसरली हे ही तितकंच खरं. विरोधकांनी तर राज्याचे गृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी अनेक आंदोलन उभी केली. निर्जळ भाग असल्यामुळे घटनास्थळी न सी सी टिव्ही न कुठले तांत्रिक विश्लेषण. खरा कस लागणाऱ्या या केस मध्ये पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केलं.

लहान मुलींवर अत्याचार झालेले बदलापूर प्रकरण ताजे असताना पुण्यामध्ये देखील असाच संतापजनक प्रकार घडला. वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील 8 वर्षांच्या दोन मुलींवर व्हॅनमध्ये व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आणि पुणे शहर अक्षरशः पेटलं. सर्व स्तरातून टीका झाली, इतकंच काय तर काही तरुणांनी तर पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केलेली ती बस फोडली. पोलिसांनी चालकाला अटक केली मात्र या घटनेमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसच्या नियमांच्या उल्लघंनाचा प्रश्न देखील समोर आला.

पुण्यातील वाघोली परिसरात एका फुटपाथ वर झोपलेल्या ९ कामगारांना एका मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत असलेल्या डंपर चालकाने चिरडलं. या अपघातात ९ जणांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये एक अवघ्या १ वर्षाची मुलगी आणि २ वर्षांचा चिमुरडा होता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी डंपर चालकाला तात्काळ अटक केली. अमरावती वरून पुण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला.

या साऱ्या गुन्हेगारीच्या छायेकडे मागे वळून न पाहता

दुनिया के साथ जो बदलता जाये
जो इसके ढाँचे में ही ढलता जाये
दुनिया उसीकी है जो चलता जाये…

असे म्हणतच आता पुण्याला पुढे वाटचाल करत राहायची आहे.मागे झालेल्या दुर्घटना कशा टाळता येतील , गुन्हेगारीला पायबंद कसा घालता येईल, यश अपयश याची परवा न करता हे प्रयत्न चालूच राहतील
आये गये मंज़िलों के निशाँ
लहरा के झूमा झुका आसमाँ
लेकिन रुकेगा न ये कारवाँ…

म्हणत २०२५ ला आता प्रारंभही होईल .. तेव्हा …. गुन्हेगारीचा बिमोड करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना …नवीन वर्षाच्या शुभेछ्या …

उरुळी कांचन: खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे-उरुळी कांचन येथे 2016 ला झालेल्या अमोल कोतवाल याच्या खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पूणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. टिकले यांच्या कोर्टाने हा निकाल दिला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अँड. नितीन भालेराव यांनी दिली.

राजेश लोंढे, महादेव अदलिंगे, अक्षय रेडे अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील चौथा आरोपी स्वागत खैरे मयत झाल्याने त्याला वगळून 3 आरोपींच्या विरुद्ध खटला चालवला गेला होता. याप्रकरणी मयत अमोल कोतवाल यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 मे 2016 रोजी मयत अमोल कोतवाल याचा आरोपी राजेश लोंढे याचे बरोबर बॅनर फडण्यावरून वाद झाला होता. या कारणावरून मनात राग धरून चार आरोपींनी मयत अमोल कोतवालचा खून केला होता. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपितांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.गुन्ह्यातील चौथा आरोपी, स्वागत खैरे, हा उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणात मयत झाल्याने त्याला वगळून 3 आरोपींच्या विरुद्ध खटला चालवला होता. सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपी तर्फे अँड. विपुल दुशिंग आणि अँड. नितीन भालेराव यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पूणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने सर्व आरोपीना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. या कामी अँड. मयूर चौधरी यांनी मदत केली

कॉमन मॅन ने दिला ‘दारू नको दूध प्या’ संदेश

आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजन ः दूध वाटप करून दिला संदेश
पुणे: दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… बाटली फोडा, दूध जोडा… दारुचा पाश जीवनाचा नाश… दारु सोडा आनंद जोडा… अशा संदेश देत कॉमन मॅन च्या साथीने तरुणाईने व्यसनमुक्तीचा संदेश दिला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत मद्यधुंद होऊन न करता चांगले विचार आणि संकल्प ठेवून करा, असे सांगत दूध वाटप करण्यात आले.

डेक्कन जवळील गुडलक चौक येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि  आपलं फाऊंडेशन यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, ऋषिकेश इंगळे,कृष्णा बाटाणे, विशाल शिंदे, सागर कांबळे, राहुल बॉम्बे, अनिरुद्ध आळंदी,  संजय हिरवे, प्रकाश पवार, अमित शिंदे,  कात्रज डेअरीचे चेअरमन बापू पासलकर, पांडुरंग कोंढाळकर, कुमार मारणे, मनोज लिमये, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, अशोक टिहाळे, दीप गाठोळे, सिद्धी सावंत, एकता बोंबले, समृद्धी मैत्री, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे दशरथ गावीत, प्रा. पुनम शिंदे, सिंहगड विधी महाविद्यालयाचे नितीन भंडारी, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे डॉ. गजेंद्र ढमाले यावेळी उपस्थित होते.

डाॅ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवसाची सुरुवात चांगले संकल्प करून करायला हवी. परंतु व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण बघता तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत ही दारू पिऊन करताना दिसते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.

 मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्समधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. तर दारु नको दूध प्या, हा संदेश देत दूध वाटप देखील केले.

बेकायदा फलक आणि होर्डिंग लावणाऱ्या ११० जणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी महापालिकेने पोलिसांना दिली नावांची यादी

पुणे- शहरातील बेकायदा फलक आणि होर्डिंग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी पोलिसांना ११० जणांच्या नावांची यादी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ अभियान’ अंतर्गत भारत सर्वंकष स्वच्छता मोहिमेसाठी एकाच वेळी सर्वच विभागांच्या टीम रस्त्यावर उतविल्या जात आहेत.

या टीमकडून स्वच्छता, अतिक्रमण हटविणे तसेच बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई केली जात आहे. काही भागांत ही कारवाई झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी खांबांवर आणि चौकांमध्ये पुन्हा जाहिरात फलक लावले जातात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच पोलिसांना देखील पार्टी करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावल्याबद्दल संबंधितांवर विदूपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रे दिली आहेत. पोलिसांना नुकतीच ११० जणांच्या नावांची यादी दिली आहे. परंतु, पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे. पोलिसांनी महापालिकेच्या पत्रानुसार संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलिस आयुक्तांसोबत महापालिकेचा पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

अभिनेता आदित्य श्रीवास्तव म्हणतो, “अशीही मुले होती ज्यांना CID बघून पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली”

(Sharad Lonkar)

क्लासिक क्राइम ड्रामा CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परतत आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या जुन्या आठवणी चाळवल्या आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही मालिका आता या वाहिनीवर दर शनि-रवी रात्री 10 वाजता प्रसारित होत आहे. या मालिकेत शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी हे लोकप्रिय त्रिकुट अनुक्रमे ACP प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत आणि दया यांच्या रुपात पुन्हा एकत्र आले आहे. आदित्य श्रीवास्तव म्हणजे सीनियर इन्स्पेक्टर अभिजीतच्या मुलाखतीत त्याने त्याची व्यक्तिरेखा, नव्या सीझनसाठी शूटिंग करण्याचा अनुभव आणि या नवीन सीझनमध्ये या शोच्या चाहत्यांसाठी काय काय आहे, याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.
या मालिकेचा वारसा आणि भारतीय टेलिव्हिजनवरील या मालिकेचा प्रभाव याबद्दल तुला काय वाटते?
CID च्या वारशाचा मला नितांत अभिमान वाटतो. CID ने प्रेक्षकांशी कीती घट्ट नाते जोडले आहे, हे पाहताना मी नतमस्तक होतो. या मालिकेचा परिणाम, त्यात आम्ही जे प्रकरण सोडवतो, तेवढ्या पुरताच मर्यादित नसून मालिकेतील पात्रे, त्यांची नाती आणि प्रेक्षकांशी जवळीक साधण्याची त्यांची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून CID हे नाव घराघरात पोहोचले आहे. त्यातील व्यक्तिरेखा, त्यांचे अद्याप वापरले जाणारे संवाद प्रेक्षकांच्या मनात रुतून बसले आहेत. हा सांस्कृतिक प्रभाव या मालिकेची ताकद आहे.
नवीन सीझनचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा तुला काय वाटले? जुन्या दिवसांच्या आठवणी मनात जाग्या झाल्या का?
हे शब्दांत सांगणे कठीण आहे, पण इतक्या वर्षांनी CID चे पडद्यावर पुनरागमन होताना बघणे हा आम्हा सर्वांसाठीच एक भावुक करणारा क्षण होता. जुन्या मित्रांना भेटल्याचा आनंद आम्हाला झाला. पहिला एपिसोड प्रसारित झाला, तेव्हा मला हे जाणवले की, या शोमध्ये कीती स्थित्यंतर आले आहे, पण त्याच वेळी, त्यातील मूळ गाभा मात्र तोच आहे. नव्या पिढीचे प्रेक्षक ही मालिका बघत असल्याचे पाहून खूप बरे वाटले. त्यामुळे हे पुनरागमन विशेष महत्त्वाचे आहे.
मधल्या विश्रांतीनंतर पुन्हा अभिजीतच्या भूमिकेत शिरणे तुझ्यासाठी सोपे होते का? की, या व्यक्तिरेखेचे काही पैलू पुन्हा नव्याने शोधावे लागले?
ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी माझ्या मनात, शरीरात आणि आत्म्यात भिनली आहे. इन्स्पेक्टर अभिजीतला इतकी वर्षे जे प्रेम आणि कौतुक मिळाले आहे ते धन्यता देणारे आहे. मी जेव्हा पुन्हा या भूमिकेत शिरलो, तेव्हा असे वाटलेच नाही की एका विश्रांतीनंतर आपण हे करत आहोत. अगदी कालच तर एक एपिसोड केला होता आणि उद्याच्या एपिसोडसाठी आपण काम करत आहोत, असेच वाटले.
जुने प्रेक्षक आणि नवीन पिढीचे प्रेक्षक या दोघांना CID आवडेल का? तुला काय वाटते?
आमच्या समस्त टीमने एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवून काम केले आहे – सर्वांचे मनोरंजन झाले पाहिजे! मग ते आजी-आजोबा असोत, त्यांची नातवंडं असोत, भावंडं असोत, सासरची मंडळी असोत, मित्र असोत किंवा गृहिणी. सर्वांना एकत्र बसून ही मालिका बघता यायला हवी. जेन-झी साठी आम्ही काही नवीन शब्द, कल्पना आणि सादरीकरणाची शैली दाखल करत आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांना ते आवडेल. आमच्या समस्त टीमला ही जाणीव आहे की काळ खूप बदलला आहे, अभिरुची बदलली आहे आणि नवीन प्रेक्षकवर्ग समोर आहे. मालिकेचा मूळ गाभा तसाच ठेवून नवीन गोष्टी अंगिकारण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत.
अभिजीत आणि दया यांच्यातील नात्याचे CID च्या चाहत्यांनी नेहमी कौतुक केले आहे. तुम्हा दोघांमधील तसेच क्षण आम्हाला पुन्हा बघायला मिळतील का?
मी त्याला अगदी सुरुवातीपासून, एक अभिनेता म्हणून मोठा होताना बघितले आहे. त्याच्यात झालेले बदल मी पाहिले आहेत आणि तो खूप नैसर्गिक आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. पडद्यावर आमच्यात जी मैत्री दिसते, तशीच खरीखुरी मैत्री आमच्यात आहे. आमचे जणू एकच कुटुंब आहे. या मालिकेत आम्ही 20 वर्षे एकत्र काम केले आहे. आम्ही इतकी वर्षे एकमेकांसोबत राहू शकलो, कारण आम्हाला एकमेकांची सोबत आवडते. एकमेकांसोबत वेळ व्यतीत करणे आवडते. आमच्या कामाबाबात आम्ही सगळे खूप गंभीर आहोत आणि स्टारडमची आम्ही पर्वा करत नाही. आमच्या कामाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि एकमेकांबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ आम्ही एक टीम म्हणून काम करू शकलो.
CID चे निष्ठावान चाहते आहेत. तुमच्या चाहत्यांकडून आलेल्या अशा काही प्रतिक्रिया किंवा संदेश आहेत का, जे तुमच्या लक्षात राहिले आहेत?
असे अनेक लोक आहेत, विशेषतः लहान मुले, जी आम्हाला सांगायची की, CID बघितल्यानंतर त्यांना पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. अनेक लोकांना आम्ही फॉरेन्सिकचा परिचय करून दिला. त्यावेळी लोकांना त्याविषयी फारशी माहिती नव्हती. अनेक मुलांना फॉरेन्सिक सायन्समध्ये रुची निर्माण झाली आणि पुढे त्यांनी अभ्यासासाठी आणि करकीर्दीसाठी तो विषय निवडला. अनेकदा असे होते की, चाहत्यांना वाटू लागते की, आम्ही खरोखरच पोलीस खात्यात काम करतो. असे अनेकदा झाले आहे की, लोक त्यांच्या वैयक्तिक समस्या घेऊन आमच्याकडे येत आणि ती सोडवण्याची आम्हाला विनंती करत. दिल्ली विमानतळावर घडलेला एक प्रसंग मला आठवतो. एक महिला माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की तिची पर्स चोरीस गेली होती. तिला माझी मदत हवी होती. मी तिला सांगितले की आम्ही शोमध्ये जे काही करतो, ते वास्तवापेक्षा वेगळे असते. पण मी तिला CCTV फूटेज तपासायला सांगून मदत केली. मी तिला गुन्हा नोंदवायला सांगितले, कारण CCTV मध्ये सारे काही रेकॉर्ड होत होते. तर, अशा प्रकारच्या परिस्थितींमध्ये मी शक्य तशी मदत केली आहे.
CID दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत आहे !

सत्यशोधक विचारांची पारायणे गावागावातून होण्याची गरज- न्यायाधीश पाटील

महात्मा फुले साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

सासवड : ” अंधश्रद्धा आणि अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला सत्याची वाट दाखविण्याचे महान कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गावोगावी पारायणे होण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन न्यायाधिश वसंतराव पाटील यांनी केले.
सतरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या उत्साहात झाले, त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री पाटील बोलत होते.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे माजी पोलीस अधिक्षक सुरेश खोपडे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाले. यावेळी पुणे केंब्रिज स्कूल चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुंजीर, पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते गौरव कोलते, सासवडच्या माजी नगराध्यक्षा लताताई दिवसे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ लक्ष्मण हेंबाडे, सीताराम नरके, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष उत्तम कामठे, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, एम जी शेलार, खानावडीचे माजी सरपंच चंद्रकांत फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, शरद यादव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश ढोले, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
”पुरोगामी विचारांचा जागर झाल्याशिवाय समाज समृध्द होणार नाही, असे सांगून श्री पाटील म्हणाले, ” इंग्रज राजवटीत महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि मनुस्मृती च्या विरोधात घेतलेली भूमिका क्रांती करणारी आहे. भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून ज्ञानाची कवाडे खुली केली. पुरंदरची भूमी क्रांतीकारकांची आहे.

श्री सुरेश खोपडे म्हणाले, ” सद्या समाजमन अस्वस्थ असून, शिक्षणाचं खेळखंडोबा झाला आहे. जगण्यासाठी उपयुक्त असे शिक्षण मिळाले पाहिजे. माणूस शिकला तर शहाणा होईल. शिक्षणाचे महत्त्व ओळखून महात्मा फुले यांनी दोनशे वर्षा पूर्वी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. सध्याचे शिक्षण महाग आहे, गरीब लोक शिक्षणापासून वंचित राहावी जणू असेच धोरण राज्यकर्ते राबवीत आहेत. स्वस्त शिक्षणासाठी कुडाची शाळा हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले,” महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून सुरू केलेले हे संमेलन सतराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, पुरंदर ही शूरवीरांची भूमी आहे. येथील माती इतिहासाने मंतरलेली आहे. शासनाने अशा साहित्य संमेलनाला अनुदान देण्याची गरज आहे. बांधावरच्या कवी, लेखकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन साहित्य चळवळ उभी केली आहे.
यावेळी गौरव कोलते, उत्तम कामठे, निमंत्रक सुनील धीवार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता निकम यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या संयोजनासाठी राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, श्यामकुमार मेमाणे, गंगाराम जाधव, अरविंद जगताप, दीपक पवार, संजय सोनवणे, मुकुंद काकडे, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, देविदास झुरुंगे आदीनी सहकार्य केले.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी सहभागी झाले होते. .
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष रवींद्र फुले यांनी केले. आभार निमंत्रक छायाताई नानगुडे यांनी मानले.

महात्मा ज्योतिबा फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असा ठराव संमेलनात मांडण्यात आला. तसेच खानवडी गावात सत्यशोधक विद्यापीठाची स्थापना करून महात्मा फुले स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा. अशी मागणी दशरथ यादव यांनी केली. कवी, लेखक व साहित्यिकांना शासनाने मानधन व एस्टी बस प्रवास मोफत करावा अशी दशरथ यादव यांनी केली.

माजी सैनिकांनी उद्योजक व्हावे – सतीश हंगे

भारतीय माजी सैनिक संस्थेची आकुर्डीत वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२४) माजी सैनिकांनी ज्याप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा केली. त्याचप्रमाणे सैनिकांनी सेवा निवृत्तीनंतर उद्योजक म्हणून कार्य करत; देशाचा आर्थिक विकास, सामाजिक उन्नती, प्रगती मध्ये हातभार लावावा असे मत जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे अधिकारी सतीश हिंगे यांनी व्यक्त केले.
भारतीय माजी सैनिक संघ, पुणे जिल्हा केंद्राची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, आकुर्डी खंडोबा मंदिर, सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि.२९) झाली. यावेळी बँक ऑफ बडोदाचे अधिकारी प्रवीण याज्ञिक, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, ब्रिगेडियर डॉ. संजीव देवस्थळी (नि) बँक ऑफ बडोदा डिफेन्स बँकिंग ॲडवायसर , आयइएसएल, पीडीसी अध्यक्ष सुभेदार मेजर (नि) वाय. एस. महाडिक, उपाध्यक्ष डी. आर. पडवळ, सचिव डी. एच. कुलकर्णी, सहसचिव बी. एच. अबनावे, खजिनदार एम. एन. भराटे, सहसचिव व्ही. व्ही. निकम सदस्य डी. डी. लोहोकरे एस. डी. राजाराम, यु. डी. सुर्वे, कर्नल आर. ई. कुलकर्णी (नि), ले. कर्नल व्ही. व्ही. वेसविकर, श्याम परसोळकर वर्धा, कर्नल साहेबराव शेळके, कैलास जाधव, कमांडर (नि) रामसींग आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत परंतु याची माहिती बहुतांश माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाही. ही माहिती माजी सैनिक संस्थेच्या वतीने सदस्यांपर्यंत पोहोचवावी. उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मोठे स्वप्न बघून एकत्र येत उद्योग व्यवसायाची उभारणी केल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. माजी सैनिकांच्या बचत गटामार्फत अनेक व्यवसाय सुरू करता येतील. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या योजनांचा अधिकाधिक निवृत्त माजी सैनिक कुटुंबीयांनी फायदा घ्यावा असे आवाहन सतीश हंगे यांनी केले.
प्रारंभीच्या सत्रात संस्थेची ४१ वी वार्षिक सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत माजी सैनिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, त्यांना येणाऱ्या अडचणींची योग्य प्रकारे सोडवणूक व्हावी, संरक्षण विभागाच्या खडकी रूग्णालयात जाण्या – येण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची सुविधा मिळावी, घर बांधणी, पाल्यांचे शिक्षण, आरोग्य यासाठीच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत आदी बाबत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आले.
भारतीय माजी सैनिक संघ ही माजी सैनिकांसाठी कार्य करणारी देशातील सर्वात जुनी नोंदणीकृत राष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचे उद्घाटन १९६४ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तसेच जनरल थिमया व फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कार्यालय मुंबई आझाद मैदान येथे कार्यरत असून पुणे जिल्ह्यातील कार्यालय १९७८ पासून निगडी प्राधिकरण, सेक्टर २८ येथे संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून वृध्द माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा पत्नी, वीर माता-भगिनी तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय त्यांची मुले त्याच्या अनेक विविध प्रश्नांचे विनामूल्य निराकारण करण्यात येते, अशी माहिती सचिव डी. एच‌‌. कुलकर्णी यांनी दिली.
या सभेस निवृत्त सैनिक त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत राजे, आभार खजिनदार सार्जंट एम. एन. भराटे यांनी मानले.

डिसेंबरमध्ये ७१ कोटीची वसुली- पुणे महापालिका मिळकतकर थकबाकीदारांचे नळजोड तोडणार

पुणे-या डिसेंबर महिन्यात मिळकतकर थकबाकीदारांकडून ७१ कोटीची वसुली केल्यावर आता सन २०२४ च्या अंतिम सूर्यास्ताच्या समयी पुणे महापालिकेने नव्या वर्षात मिळकत कर थकबाकीदारांचे नळजोड तोडणार असा स्पष्ट इशारा दिला आहे.

या संदर्भात मिळकतकर विभागप्रमुख महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी म्हटले आहे कि,’मिळकत कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असून, त्यातूनच शहरातील विकास कामे होत असतात. कर आकारणी व कर संकलन खात्यास सन २०२४-२५ मध्ये दिलेले मिळकत कर जमा करण्याचे उद्दीष्ट पुर्ततेसाठी थकवाकी वसूलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने दि. २/१२/२०२४ पासून मिळकत कर वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून, त्यांचे मार्फत दररोज निवासी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकतकर वसूलीची कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुषंगाने दि. ०२/१२/२०२४ पासून मिळकत कर बमुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून त्यांचे मार्फत दररोज निवानी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकत कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. आज मितीस र.रु.७१,४१,८५,३९३/- एवढी मिळकतकराची थकबाकी या पथकाद्वारे वसूल करण्यात आली आहे.
परंतू अद्यापही नागरीकांचा/व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येत नाही. त्या अनुषंगाले ‘उद्या दि १/१/२०२५ रोजी पासून मध्यवर्ती वसूली पथकांसोबत १ प्लंबर, ३ बिगारी सेवक व त्या-त्या विभागातील विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक तमेच प्रत्येक झोन निहाय एकूण ५ पथके यांचे मार्फत थकबाकीदार मिळकतीचे नळजोड तोडण्याची कार्यवाही करण्यात येणार असून मिळकत कराच्या थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्या नंतरच सदरचे नळजोड पूर्ववत करण्यात येणार आहेत.
तरी सर्व निवासी/बिगर निवासी मिळकतधारकांस याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मिळकत कराची थकवाची त्वरीत भरून नळजोड तोडण्याची कारवाई टाळावी व प्रशासनास मिळकत कराचे उदिष्ट साध्य करणेसाठी सहकार्य करावे,