शिर्डी- येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अमित शहा यांनी अभिवादन केले.अमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठे कार्य केले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले सोबतचे घटक पक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीला देखील मोठे यश मिळाले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे.पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आपले विरोधक वाट बघत बसले होते की महाराष्ट्रात आता आपले सरकार येणार आहे. त्यांचे हे स्वप्न सुद्धा आपण सर्वांनी मिळून धुळीस मिळवले. मी जेव्हा आलो होतो साडे 9 हजार कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला होता. काही निवडणूक असे असतात जे देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. महाराष्ट्र सरकारने हे करून दाखवले आहे. या सगळ्याचे शिल्पकार म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा प्रणाम.तुम्ही पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही जणांना उमेदवारी नाही मिळाली, पण सर्वांनी मिळून महायुतीला निवडून देण्याचा निश्चय केला होता. महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले की एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला आहे.अमित शहा म्हणाले, आपल्या विजयाच्या मागे आपली एकजूट होती. 40 लाख सदस्य बनले आहेत अजून दीड करोड करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो एकही बूथ असे नसावे की जिथे अडीचशे पेक्षा कमी सदस्य असतील असा पक्ष आपल्याला बनवायचा आहे. येणाऱ्या दीड महिन्यात असे जोमाने काम करा की प्रत्येक बूथवर 250 पेक्षा जास्त सदस्य जोडले जातील. सर्व महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, यात विरोधकांना बसायला सुद्धा जागा मिळाली नाही पाहिजे याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. पंचायतमध्ये सुद्धा भाजप, तहसीलमध्ये सुद्धा भाजप, महानगरपालिकेतही भाजप, महाराष्ट्रातही भाजप आणि देशातही भाजप. पंचायत पासून पार्लियामेंटपर्यंत विजयाचे सूत्रधार बनण्यासाठी आज तुम्हाला बोलावले आहे. आभार मानायचे तर आहेत त्याच सोबत पुढील काम देखील सांगायचे आहे.
२१ व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उद्यास येईल- प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड
एमआयटी डब्ल्यूपीयूत स्वामी विवेकानंद यांची १६३वीं जयंती साजरी
पुणे, दि. १२ जानेवारी : ” २१ व्या शतकात भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणन उदयास येईल हे स्वामीजींचे वचन सत्यात उतरत आहे. १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत भाकीत केले होते की, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. त्यांनी धर्म, प्रार्थना आणि ध्यान या विषयावर सखोल ज्ञान जगासमोर मांडले. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केला.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १६३ वीं जयंती व युवादिनाचे औचित्य साधून माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणेेतर्फे विद्यापीठात ज्ञानजागर- भारतीय अस्मिता जागविण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे बोलत होते.
या प्रसंगी प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. प्रियंकर उपाध्याय, डॉ. महेश थोरवे, डॉ. मिलिंद पात्रे आणि द स्टूडेंट कॉन्सिल ऑफ एमआयटी डब्ल्यूपीयूचे पृथ्वीराज शिंदे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” बलवान आणि निरोगी शरीरात सशक्त मन नांदते. विद्यार्थ्यांनी एखादी कल्पना स्वीकारली की मग तीला आपले जीवन सर्वस्वी अर्पण करा. सतत तिचाच ध्यास घ्या. तुमच्या शरीराचा अणुरेणु त्याच कल्पनेने भरला जाऊ दया.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” केवळ जयंती साजरी करून चालणार नाही तर त्या व्यक्ती ने उच्चारण केलेल्या शब्दांना आपल्या आचरणात आणावे. विचारांचा प्रवाह सतत वाहिला पाहिजे. स्वतःतील विवेक जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” स्वामी विवेकानंद या शब्दाचे विस्तृतीकरण खूपच सुंदर आहे. विवेक म्हणजे विवेका बरोबर जगणे आणि आनंद म्हणजे स्वतःमध्ये आनंद शोधणे असा अर्थ होतो. जीवनात चारित्र्य हे सर्वात महत्वाचे असून त्याला युवकांनी सांभाळावे. शिक्षणामुळेच मानव्याच्या जीवनात प्रकाश येतो त्यामुळे नैतिक मूल्यांचे आचरण करून जीवन जगावे.”
डॉ. महेश थोरवे म्हणाले,” केवळ ३९ वर्ष जीवन जगलेले स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. शक्ती, करूणा आणि चारित्र्य या गोष्टींवर भर देणारे ते सर्व धर्म समावेशक होते. आज त्यांचाच आदर्श घेऊन डॉ. विश्वनाथ कराड आपले जीवन व्यक्तीत करीत आहेत. शिकागोला ज्या ठिकाणी स्वामीजींनी भाषण दिले हेाते त्याच ठिकाणी शेकडों वर्षांनी डॉ. कराड यांनी भाषण देऊन त्यांच्या विचारांना पुर्न जागृत केले.”
या प्रसंगी विद्यार्थी पार्थ भालेराव, आर्या केदार,वेदांग अडसरे, पियुषा पाटील, तिवारी, रुद्र बुराडे, द्विया थोरवे, मुक्ता पाटील आणि ऋग्वेद पंडीत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्वांच्या पैलूंवर विचार मांडले.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूकडून घोषणा करण्यात आली की सव्वा लक्ष विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाची पुस्तक भेट स्वरूपात देण्यात येईल.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी स्वागत पर भाषण केले.
आभार डॉ. मिलिंद पांडे यांनी केले.
लोकशाही आणि विचारांची लढाई आता उरली नाही: पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
पक्षांनी पुनर्बांधणी केली पाहिजे :डॉ.कुमार सप्तर्षी
गांधी दर्शन शिबीरास चांगला प्रतिसाद
पुणे:’निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तृळ तोडणे अवघड झाले आहे.आता ही विचारांची लढाई राहिली आहे का,हा प्रश्न आहे.पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवला गेला,सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा झाली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली.हे पाहता लोकशाही उरलेली नाही,हे स्पष्ट होते’, असे परखड प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण( सद्य राजकीय स्थिती),मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे(गांधी,आंबेडकर आणि संविधान),आणि प्रा. नितीश नवसागरे(वन नेशन,वन इलेक्शन) यांनी मार्गदर्शन केले.’ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १७ वे शिबीर होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,’ विधानसभा निवडणुकाचा निकाल धक्कादायक होता. काँग्रेससह अनेकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास उरला नाही. निवडणूक आयोग निःपक्ष असला पाहिजे. तरच लोकशाहीला अर्थ राहिल. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नसून सरकारी विभाग बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला.हे पाहता लोकशाही उरलेली नाही,हे स्पष्ट होते. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हे पैशाचे वर्तृळ तोडणे अवघड झाले आहे.आता ही विचारांची लढाई राहिली आहे का,हा प्रश्न आहे.पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवले गेला,सर्वोच्च न्यायालयाकडून निराशा केली. लोकशाहीची हत्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मदत केली.
ते म्हणाले,’पक्षांतरबंदी कायदा टाकून पक्षांतर केल्यास पक्षाचे सदस्यत्व तात्काळ रद्द होईल असा स्पष्ट कायदा केला पाहिजे. निवडणूक खर्च, निवडणूक आयोग, निवडणुक आचारसंहिता यावर गंभीर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे’.
‘घटनाकारांना अभिप्रेत लोकशाही उरली नाही,हे मान्य केले पाहिजे. संसदेत चर्चा करून बदल होत नाहीत.आता विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचे नाहीत,अशी पावले आता सत्ताधारी पक्ष उचलत आहे.राजकीय पक्षांना विरोधी पक्ष म्हणून काम करता येणे अवघड होणार आहे, महाविकास आघाडीत कुरबूर आहे. त्यातून विरोधी पक्ष संक्रमणावस्थेतून जात आहे, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे’,असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,’राजकीय पक्ष दुबळे झाले आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बनल्या आहेत. पक्षांतर्गत लोकशाही उरलेली नाही.सर्वच पक्षात अशी अवस्था आहे. लोकशाहीचा आत्मा संपण्याच्या अवस्थेत आपण पोचलो आहोत’.
‘दुसरीकडे विकसित भारताचे दावे हास्यास्पद बनले आहे.आताच्या विकासदराने ते होणे शक्य नाही. शिक्षण, आरोग्यावर खर्च न केल्याने मनुष्यबळ विकास शक्य नाही.बेरोजगारी हा भयंकर प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रात राजाश्रयाने खंडणीची व्यवस्था बनली आहे. आता उद्योग महाराष्ट्रात येणे अवघड आहे.दरडोई उत्पन्नात आपण १७ व्या स्थानावर पोचल्याची भीती आहे ‘, असेही ते म्हणाले.
डाॅ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’सामाजिक संस्थांनाच सद्यस्थितीची चिंता वाटत नसून राजकीय पक्षांनाही वाटत आहे. निराश होऊन चालणार नाही.प्रत्येक पिढीला तत्कालिन उत्तरे शोधली पाहिजेत.
हिंदूराष्ट्र येऊन प्रश्न सुटणार नाही, कारण जेव्हा हिंदूराष्ट्र होते, तेव्हाही प्रश्न सुटले नव्हते. पुराणात न जाता विवेकाने पाहिले पाहिजे.आताच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वातंत्र्य संग्रामात आहे.सद्यस्थितीत हताश न होता, विचारमंथन करत कृती करत पुढे गेले पाहिजे.पक्षांनी पुनर्बांधणी केली पाहिजे.गांधींना न विसरता वाटचाल केली पाहिजे ‘.
गांधी-आंबेडकर यांच्यात शत्रूभाव नव्हता: डॉ.आनंद तेलतुंबडे ..
आनंद तेलतुंबडे म्हणाले,’सर्वांनी विचार करुन घटना लिहिली. ही घटना सर्व मिळून विचार समूह आहे.अशी घटना पुन्हा लिहिली जाणार नाही.गांधी आणि आंबेडकर स्वतःला महामानव मानत नव्हते. दोघांचे विचार भिन्न होते. घटनेवर गांधी यांचा प्रभाव आहे.
आताच्या प्रश्नांवर विचार करताना मार्क्स, गांधी, आंबेडकर यांना समजून घेतले पाहिजे. गांधी स्थितीवादी आहेत,आंबेडकर हे सुधारक आहेत आणि मार्क्स क्रांतीकारक आहेत.त्यातील काय घ्यायचे, काय सोडायचे हे ठरवले पाहिजे. त्यांच्यात शत्रूभाव मानण्यात अर्थ नाही.काही मतभेद असले तरी दुराभाव नव्हता. आपापल्या अस्मितेचे झेंडे उंचावण्यात अर्थ नाही,असेही ते म्हणाले.
‘आंबेडकर हे कौटिल्य नंतर महान अर्थ शास्त्रज्ञ होते. गांधीजीना स्वतःची शक्तीस्थळे,दौर्बल्यस्थान माहित होते. ते स्थितीवादी होते.ते भांडवलशाहीच्या विरोधात नव्हते. समाजात कलह नसावा असे ते मानत होते. ते जाती व्यवस्थेच्याही विरोधातही नव्हते, पण त्यांना उतरंड नको होती. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर हे सुधारक होते.प्रत्येक समूहाला प्रतिनिधीत्व देणारी संसदव्यवस्था हवी आहे. जिंकणारा व्यक्ती लोकप्रतिनिधी होणे ही लोकशाही नाही. धनदांडगे,गुन्हेगार निवडून जाणे याला अचूक पर्याय दिला पाहिजे. क्रांती घडून येणे वगैरे शक्यतेच्या आवाक्यातील गोष्ट नाही’, असेही तेलतुंबडे यांनी सांगितले.
डॉ.प्रवीण सप्तर्षी,अन्वर राजन, अॅड.स्वप्नील तोंडे, कमलाकर शेटे,कॉम्रेड अॅड.सयाजी पाटील,विकास लवांडे,अजय भारदे, अरुण खोरे, मिलिंद गायकवाड, सुनीती सु.र., इब्राहिम खान,संग्राम खोपडे,अप्पा अनारसे,सुदर्शन चखाले आदी मान्यवर उपस्थित होते.
नायलॉन मांजा आणि नशिल्या गांजावर गुन्हे शाखेसह पोलिसांची धडक मोहीम सुरु-पण बडी धेंडे सापडेनात ?
पुणे– नायलॉन मांजामुळे वारंवार गंभीर घटना होत असल्याने त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांनी पतंगाचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार व वापर करणारे यांच्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने गुन्हे शाखे कडून जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे.
युनिट ४ कडील पथक येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कृत्रिम वेगवेगळ्या रंगाचा लेप लावलेला नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानदार चेक करीत असताना पोलीस अंमलदार विशाल गाडे व हरीष मोरे यांना बातमी मिळाली की शेलार चाळ, मच्छी मार्केट, येरवडा पुणे येथील सार्वजनिक बोळी मध्ये एक महिला कृत्रिम लेप लावलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता नायलॉन मांजा विक्री करणारी एक महिला वय ३७ वर्षे रा.शेलार चाळ गाडीतळ येरवडा पुणे ही मिळून आल्याने तिच्या ताब्यात ३.२००, रु कि वेगवेगळ्या रंगाच्या बंदी असलेला नायलॉन मांजाची चार चकरी मिळून आल्याने तिच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २४/२०२५ बीएनएस कलम २२३ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायलॉन मांजाची विक्री करणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात
वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट १ कडील पो. उप निरी. तापकीर, व स.पो. फौ. मखरे, पोलीस अंमलदार दरेकर, साळुंखे, जाधव, कोळगे, साबळे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंगलदार निलेश साबळे यांना मिळाल्या बातमी च्या अधारे सर्वे नं ७ तळजाई पठार पुणे येथून एका आपचारिक बालकास कि रु ४,५००/- चा नायलॉन मांजा विक्री करिता जवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध भा न्या सं कलम २२३ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ०५ प्रमाणे फिर्याद दिली असून आपचारिक बालकास सहकारनगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरोडा वाहन चोरी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना घेतले ताब्यात
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ कडील अंमलदार पश्चिम प्रादेशिक विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे व दत्तात्रय पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मित्र मंडळ चौकाकडून पर्वतीकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडचे अंतर्गत रोडवरील ठिकाणी दोन इसम नायलॉन मांजाची विक्री करिता येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे पत्ते १) शशांक चंद्रप्पा धनगर, वय १९ वर्ष, रा गणेश मळा, सिंहगड रोड पुणे २) रोहित राम शिंदे वय ३४ वर्ष रा पर्वती दर्शन, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यात विक्री करण्यासाठी आणलेल्या ४,८००/ रु किं च्या चायनीज नायलॉन मांजाच्या एकुण ६ चकरी मिळाल्या वरील नमुद दोन्ही इसमांवर पर्वती पोलीस स्टेशन येथे भान्या से कलम २२३ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ०५ प्रमाणे\गुन्हा दाखल करण्यात आला नमुद दोन्ही इसमांना पुढील योग्य त्या कारवाईकरिता पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
वरील कारवाई अपर पोलील आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे व पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या आहेत.
नायलॉन मांज्याची विक्री करणा-या इसमावर छापा टाकुन ११ नायलॉन रिळ केले जप्त.
दि.११/०१/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस स्टाफ सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिग करीत असताना मानाजीनगर न-हे पुणे येथे आलो असता, पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना त्याचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सिध्दी क्लासिक बिल्डींगचे शेजारी व अमोल दांगट याचे चाळी समोर मोकळ्या जागेत वडगाव बुगा पुणे. येथे एक इसम चोरुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नायलॉन मांज्याची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे. अशी बातमी मिळाली.
सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाता सदर ठिकाणी एक इसम उपस्थित होता. त्यास आमची व आमचे सोबतचे पोलीस स्टाफची पंचाची ओळख सांगुन सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव योगेश शत्रुध्न शहा वय २० वर्षे रा, नेवसे हॉस्पीटल जवळ, वडगाव बु पुणे, त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याचे जवळ एका खाकी रंगाचे बॉक्स मध्ये ६,५००/-रु. किं. चे ११ नायलॉन मांज्याचे रिळ आढळुन आले ते जप्त करुन त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २४/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम २२३, १२५, तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस पोलीस अंमलदार संजय शिदे हे करीत आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार_६१ गॅस टाक्या नेणारा टेम्पो पकडला
धनकवडीत दुर्लक्ष होत असल्याचे सूत्रांची माहिती
पुणे- अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणा-या आरोपीवर छापा टाकुन ६१ गॅस टाक्या व गॅस टाक्या वाहुन नेणारा टेम्पो सिंहगड रोड पोलीसांनी जप्त केला आहे.दरम्यान अशाच प्रकारचा काला बाजार धनकवडी सहकारनगर पोलिसांच्या हद्दीत होत असल्याची सूत्रांची माहिती असून येथे दुलाक्ष होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान पोलिसांनी सांगितले कि,’ काल दि.११/०१/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार सागर शेडगे व अमोल पाटील यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बु पुणे येथे एक इसम हा अनाधिकृतपणे स्वतःच्या फायद्या करीता सिलबंद घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करुन त्याची चोरुन अवैधरित्या विक्री करीत आहे. अशी बातमी मिळाली.
सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अवैधरित्या विक्री करीत असलेल्या गॅस संदर्भात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणाजवळ जावुन पाहणी केली असता दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे आतील बाजुस असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बुगा पुणे येथे एक टेम्पो उभा असलेला दिसला, सदर टेम्पो मधुन एक इसम पिवळ्या रंगाच्या गॅस टाक्याची अवैधरित्या साठा करुन विक्री करताना दिसुन आला त्यावेळी आमची व पंचाची खात्री झाल्याने वरील स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी दि.११/०१/२०२५ रोजी अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम मिळुन आला त्याला आम्ही आमचे सोबतचे पोलीस स्टाफ व दोन पंचांची ओळख करुन देवुन पोलीस कारवाईचा उद्देश सांगितला असता त्याने सहकार्य करण्याची संमती दर्शविल्याने सपोनि सचिन निकम यांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव १) विकास धोंडाप्पा आकळे वय ३१ वर्षे रा. चरवड वस्ती दत्त मंदीराजवळ, वडगाव बुद्रुक पुणे मुळ रा. डोंगरगाव ता मंगळवेढा जि सोलापुर सध्या रा. रिध्दी-सिध्दी विल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे सदर इसमाच्या ताब्यात मिळुन आलेल्या टाक्यांची पंचाची समक्ष पाहणी केली असता भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरातील एकुण ६१ टाक्या व एक टेम्पो असा एकुण ४,०९,०००/-रु. कि.चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २३/२०२५ बी.एन.एस. कलम भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७,२८८,३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उप-आयुक्त परी ३ पुणे संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, अजय परमार सिहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप दाईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.
गुरूंच्या सानिध्यात परमात्मा तत्वाची ओळख – श्री गुरुदेव व्यासजी
; श्रीदत्त तत्व (त्रिपुरा रहस्य) या सत्संगाचे आयोजन
पुणे : आत्म म्हणजेच परमात्मा आहे, हे नेहमी आपल्याला सांगितले जाते. परंतु ते कसे जाणून घ्यायचे. तर त्यासाठी आधी सत्संग ऐकावे. त्यामुळे विवेकता निर्माण होईल. विवेकता निर्माण झाल्यानंतर तुमच्या विचारांची शक्ती वाढेल त्यावेळी गुरूच्या सानिध्यात जावे. गुरूंच्या सानिध्यात गेल्यावर परमात्मा तत्वाची ओळख होईल, असे मत श्री गुरूदेव व्यासजी यांनी व्यक्त केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर यांच्या सहकार्याने दत्तमंदिर ट्रस्टच्या खजिनदार अॅड. रजनी उकरंडे यांनी श्रीदत्त तत्व (त्रिपुरा रहस्य) या सत्संगाचे आयोजन लकडी पूल विठ्ठल मंदिरात केले. श्री गुरूदेव व्यास यांनी गुरू महात्म्य, परमतत्वाची ओळख यावर मार्गदर्शन केले. सत्संग नंतर अध्यात्मिक प्रश्नोत्तरी आणि शक्तिपात ध्यानदीक्षा झाली. उपक्रमाला चंद्रहास शेट्टी यांनी विशेष सहकार्य केले.
गुरूदेव व्यास म्हणाले, गुरूची ओळख कशी करावी, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे परमात्मा तत्व आहे, तो गुरू आहे. जो भौतिक सुखातून मुक्त आहे, ज्याच्याकडे मुक्तीचे साधन आहे, तो साधूसंत. अशा संतांच्या चरणी शरण जावे. मी जे चांगले कर्म करतो, ते परमेश्वर माझ्याकडून करून घेतो हा भाव ज्यावेळी मनात येतो त्यावेळी मनुष्य कर्म सन्यासी होतो.
ते पुढे म्हणाले, तुम्ही चांगल्या गोष्टी वाचून, एकून, पाहून कर्म चांगले होणार नाहीत, तर ते सर्व आचरणात आणण्याची गरज आहे. हे ज्ञान तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सतत त्याचे चिंतन कराल. अवधूत अवस्थेत जाण्यासाठी भौतिक सुखातून मुक्त होत चांगल्या विचारांचे चिंतन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कात्रज मस्तान हॉटेल:२० वर्षीय तरुणाला पिस्टल विकताना पकडले
पुणे-कात्रज येथील मस्तान हॉटेलजवळ सहकारनगर पोलिसांनी तळजाई वसाहतीतील अवघ्या २० वर्षीय तरुणाला पिस्टल विकताना पकडले आहे .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’हा तरुण सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पोलीस असेही म्हणाले कि,’पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-या इसमांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई करणेचे आदेशीत करण्यात आले होते. त्याअनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार हददीत गस्त करीत असताना दि. ११/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव यांना गुप्त बातमीद रामार्फत माहिती मिळाली की, मस्तान हॉटेल जवळ कात्रज रोडवर एक इसम पिस्टल/अग्नीशस्त्र घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.सदर बातमी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे गुन्हेगार नामे सोहम शशिकात वाघमारे वय २० रा तळजाई वसाहत सहकारनगर पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व ०२ जिवंत काडतुसे असा ४८,८०० /- रु कि.चा माल जप्त केला आहे. त्याने सदर अग्निशस्त्र व काडतुसे हे अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विनापरवाना जवळ बाळगून विक्रीकरीता घेवून आल्याबाबत कबुली दिली आहे. त्याचेवर भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमांक ३१/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे, १ श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पो.उप.निरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, गणेश थोरात, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, विनोद चव्हाण, प्रमोद कोकणे विजयकुमार पवार, राहुल शिंदे, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, यांनी केली आहे.
हडपसरमध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या जोधपुरच्या चौधरीला पकडले
पुणे- हडपसर सय्यदनगर चिंतामणीनगर येथे अंमली पदार्थ विक्रेता असलेल्या जोधपुरच्या ३० वर्षीय चौधरीला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून ८३,०००/- रु. चे अफिम बोडयांचा चुरा (पॉपीस्ट्रा) हा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे . या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांवर कायदेशीर कारवाई करणेचे वरिष्ठांनी आदेशीत केले होते. अनुषगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ कडील अधिकारी व अमंलदार युनिट हददीत गस्त करीत असताना दि.११/०१/२०२५ रोजी पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सय्यदनगर हडपसर पुणे येथील चिंतामणीनगर येथे एक इसम अॅक्टीवा गाडीवर अफिमच्या बोंडयाचा चुरा पॉपीस्ट्रा विक्री करणेसाठी घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली.
सदर बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना दिली असता त्यांनी युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांना सापळा व छापा कारवाई करणेकामी आदेशीत केले. त्याप्रमाणे युनिट कडील अधिकारी व अमंलदार यांनी मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे काळेपडळ पोलीस स्टेशनशी संपर्क करुन संयुक्तरित्या छापा कारवाई करुन इसम नामे सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी वय ३० रा बिग मार्ट शेजारी चिंतामणी नगर हडपसर मुळ रा जोधपुर राजस्थान यास ताब्यात घेवून त्याचेकडून अॅक्टीवा गाडी, रोख रक्कम व ६१५ ग्रॅम प्रॉपीस्टा अंमली पदार्थ असा ८३,०००/ रु कि.चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि क्रमाक ३१/२०२५ एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (क) १५ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरी. प्रशांत लटपटे काळे पडळ पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, मा. सहा.पो.आयुक्त गुन्हे, १ श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पो.उप.निरी. नितीन कांबळे, पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे, राहुल शिंदे, शंकर नेवसे, ओमकार कुंभार, हनुमत कांबळे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, अमोल सरडे, गणेश थोरात विनोद चव्हाण, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख व यांनी केलेली आहे.
पतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन
पुणे, दि. १२ जानेवारी २०२५: मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी तसेच वीजतारांसह इतर वीजयंत्रणेत अडकलेल्या पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नागरिक किंवा लहान मुलांनी लोखंडी सळई, काठीच्या सहाय्याने वीजयंत्रणेमध्ये अडकलेला मांजा किंवा पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरु असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय पतंगाच्या मांज्यामध्ये धातुमिश्रीत कोटींग असल्यामुळे विजेचा धक्क्याने विद्युत अपघातामध्ये जिवितहानी तसेच वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे.
नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. कोणत्याही परिस्थितीत वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये. अतिशय सुरक्षितपणे व वीजयंत्रणेपासून सतर्क राहून सावधगिरी बाळगत पतंगोत्सव साजरा करावा तसेच तातडीच्या मदतीसाठी २४ तास सुरु असलेल्या महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही:ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठीवरून शिंदेंचा टोला
ठाणे-सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरूनही उद्धव ठाकरेंना सुनावले. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे ते म्हणाले.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या ‘सामना’मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना उपरोक्त टोला लगावला.महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थासाठी झाली होती. लोकसभा निवडणुकांमध्ये फेक नरेटीव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मते घेतली. मते मिळाल्यानंतर मतदान करणाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नागरिकांनी विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवली, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली.अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, मला शिव्या शाप आणि आरोप करण्याशिवाय त्यांनी दुसरे काही केले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. त्यांना तुरुंगात टाकण्याचे कारस्थान केले. तू राहशील नाही तर मी राहीन, अशी भाषा वापरली. मी बोलू शकत नाही, असे शब्द वापरले. मात्र, आता काय जादू झाली ते आपण पाहिले. सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून उद्धव ठाकरे यांना सुनावले. समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील. त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते, या विधानाचा शिंदेंनी समाचार घेतला. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचे स्मारक कोण बांधतोय? सरकार बांधत आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.एकनाथ शिंदे यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे. सखोल तपास सुरू आहे. संतोष देशमुख यांचा निर्घृण खून केला आहे. चुकीला माफी नाही, या प्रकरणाशी संबधितांना फासावर लटकवेपर्यंत सरकार पावले उचलेल. सरकार देश्मुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे. आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई केली जाईल. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याचे कोणासोबत कितीही लागेबंदे, असले तरी त्याला सोडणार नाही, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
बोरं, चॉकलेट, गोळ्यांनी साजरे झाले ‘विशेष बोरन्हाण’
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन ; विशेष मुलांचा सहभाग
पुणे : तरुणाईसोबत दिग्गजांनी हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन विशेष मुलांसोबत बोरन्हाण साजरे केले. सामाजिक जाणीवेचे भान राखत समाजातील विशेष मुलांना देखील सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता मकरसंक्रातीनिमित्त या आगळ्यावेगळ्या विशेष बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते.
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे स.प.महाविद्यालय प्रांगणातील वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, विद्यालयाच्या प्राचार्य संगीता शिंदे आदी उपस्थित होते. हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो. विद्यालयातील कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, देशाला सशक्त करण्यात तरुणाईचा वाटा खूप मोठा आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आजची तरुणाई काम करीत असल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. समाजातील विशेष घटकाला आपल्यासोबत घेऊन असे कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे. जोपर्यंत तरुणाई या देशात आहे, तोपर्यंत समाजात चांगल्या कार्याच्या प्रकाशवाटा उजळत राहतील, असेही त्यांनी सांगितले.
संक्रांत हा मतभेद मिटवून एकत्र येण्याचा सण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे सिमेवरील जवानांना ४०० किलो तिळगुळ
पुणे : आपण किती मोठे आहोत, याला महत्व नाही. मात्र, आपला समाजाला किती उपयोग होतो, हे बघणे गरजेचे आहे. मधुरता म्हणजे मकरसंक्रांतीचा सण. मतभेद मिटवून एकत्र येण्याचा हा सण असून भारतीय सैनिक आणि देशवासियांमधील प्रेम वृद्धीसाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे तसेच थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय आणि नू.म.वि. प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या सभागृहात ४०० किलो तिळगुळ व भेटकार्ड पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख, पृथ्वीराज धोका, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे हर्षद झोडगे, मेहुणपुरा मंडळाचे सचिन शिंदे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, अनुजा कांगणे, आनंद सराफ आदी उपस्थित होते.
साम्राज्य ज्येष्ठ नागरिक संघ, कोथरूड सांस्कृतिक मंडळ, विविध गणेशोत्सव मंडळे, मंदिर ट्रस्ट यांनी उपक्रमाला सहकार्य केले. उपक्रमाला संयोजन सहाय्य शेखर कोरडे, शाळेचे पर्यवेक्षक लालबहादुर जगताप, दशरथ राजगुरू, कलाशिक्षक दत्तात्रय वेताळ यांनी केले.
आनंद देशमुख म्हणाले, समाजाने आपल्याला दिले, त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून आपणही समाजाला विविध माध्यमातून दिले पाहिजे.देशप्रेम मनात ठेवून आपल्या सर्वांचे रक्षण सिमेवरील जवान करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे.
आनंद सराफ म्हणाले, सैनिकांविषयी कृतज्ञता म्हणजे पुस्तकातील प्रतिज्ञा जगण्याचे वस्तुनिष्ठ धडे असतात. तिळगुळाचा उपक्रम १९९८ पासून अविरतपणे सुरु आहे. आपल्या देशाच्या सीमेला २३ हजार किमी असा परीघ लाभलेला आहे. त्यावर सज्ज असलेल्या जवानांसाठी आपण दरवर्षी तिळगुळ पाठवतो. प्रत्येक सैनिक हा राष्ट्रप्रेम मनात ठेवून जगत असतो. त्यामुळे आपण सण -उत्सव साजरे करताना त्यांची कायम आठवण ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले. प्राजक्ता कारेकर यांनी सूत्रसंचालन केले.
पर्वतीवर पेशवे परिवाराची उपस्थिती:पानिपत येथील माती पूजन आणि तुळशी वृंदावन स्थापना
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड तर्फे आयोजन
पुणे : धनुर्मास निमित्त पर्वतीवरील श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पानिपत येथील मातीचे पूजन आणि तुळशी वृंदावन स्थापना करण्यात आली. पानिपत चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमात तुळशी वृंदावनात तुळस देखील लावण्यात आली.
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड तर्फे धनुर्मास उत्सव पर्वती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयमंगलादेवी पेशवे, सुचेतादेवी पेशवे , ज्येष्ठ मुर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त पुष्कर पेशवे, सुधीर पंडित , जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी, तसेच पूजा पेशवे यांसह संपूर्ण पेशवे परिवार उपस्थित होता.
पर्वतीवरील पानिपत चौकामध्ये तुळशी वृंदावनासह महाराष्ट्रातील इ.स.१ पासूनची ठळक घटनांची भित्तीचित्रे आमदार माधुरी मिसाळ यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस विकास निधीमुळे शक्य झाले आहे अशी माहिती प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी यावेळी दिली. तसेच पर्वतीवरील विविध विकासकामांच्या निमित्ताने पुणेकरांकरिता पर्वती वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री देवदेवेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे पुतळा याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर धनुर्मास निमित्त भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या एफटीआयआय’च्या चित्रपटगृहाचे तसेच सभागृहाचे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले उद्घाटन
पुणे, 11 जानेवारी 2025
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सभागृहाचे उद्घाटन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणीकृत असलेल्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेला वैष्णव यांनी पहिल्यांदाच भेट दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वैष्णव यांनी फित कापली तसेच विद्यार्थ्यांसह दीपप्रज्वलनही केले.

उद्घाटनानंतर खुल्या मंचावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी एफटीआयआय’ला जागतिक स्तरावर आणखी पुढे नेण्याचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. “भविष्यातील उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आपली परंपरा आणि वारसा एक भक्कम पाया प्रदान करतो,” असे वैष्णव यावेळी म्हणाले. वैष्णव यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आणि प्रस्तावित अभिमत विद्यापीठ दर्जाच्या विविध पैलूंचे निराकरण केले.
अश्विनी वैष्णव यांनी देशातील चित्रपट शिक्षणाबाबतचा आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी मजबूत करणे आणि त्यांना उद्योगांशी अधिकाधिक जोडणे यावर त्यांनी भर दिला. अल्पावधीतच जागतिक स्तरावर एक प्रमुख प्रतिभा प्रदाता बनलेल्या गती शक्ती विद्यापीठाचे उदाहरण वैष्णव यांनी दिले.
हे नवीन सभागृह हे केवळ एफटीआयआय’च्या अध्यापनशास्त्रासाठी एक अमूल्य सामर्थ्य नाही तर पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक क्षेत्रात भर घालणारी वास्तू आहे, असेही ते म्हणाले.

सिनेमा प्रोजेक्टर, रंगमंचावरील कलाविष्कार सादरीकरणासाठी PA सिस्टीम आणि अत्याधुनिक डॉल्बी ॲटमॉस सराउंड साऊंड सिस्टीम यासारख्या सर्व आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या सभागृहाची आसन क्षमता 586 इतकी आहे. प्रेक्षागृहाच्या सर्वात अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा नवोन्मेषी, आडवा हलवता येणारा पडदा, ज्याची रुंदी 50 फूट तर उंची 20 फूट आहे. हा अत्याधुनिक पडदा रिमोट कंट्रोल वापरून सहजतेने समायोजित करता येतो, ज्यामुळे सभागृहाचे रूपांतर चित्रपटगृहात अगदी सहजपणे केले जाऊ शकते. सभागृह रचनेत अष्टपैलुत्व आणि लवचिकता या संबंधात नवीन मानके स्थापित करणारे हे अग्रगण्य वैशिष्ट्य आपल्या प्रकारचे पहिले मानले जाते. एफटीआयआय’ने या वैशिष्ट्यासाठी पेटंट मिळावे, म्हणून आधीच अर्ज दाखल केला आहे.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संस्थेच्या विविध सुविधांना भेट दिली आणि प्राध्यापकांशी संवादही साधला. मंत्र्यांनी क्रिएटिव्ह इकॉनॉमीबद्दल आपले मत व्यक्त केले. “एफटीआयआय मधील प्रतिभावंत आणि परिसंस्थेच्या सहाय्याने आपण या क्षेत्रात मोठे यश संपादन करु,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुना गेट लॉजमध्ये तिरट जुगार; सिंहगड रोड पोलिसांनी टाकला छापा
पुणे: धानोरी, शिवणे, कोंढवा, कोथरुड, वारजे माळवाडी येथील व्यावसायिक सिंहगड रोडवरील पुना गेट लॉज येथे एकत्र येऊन तीन पत्ती (तिरट – Teen Patti) हा जुगार खेळत होते. सिंहगड रोड पोलिसांनी लॉजवर छापा टाकून जुगार खेळणार्या ६ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ७३ हजार २१० रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे.
रवींद्र गुंदीया राठोड (वय ४०, रा. श्रीरंग एंपायर, धानोरी), हनुमंत मानसिंग राठोड (वय ४०, रा. वेस्ट कोस्ट , शिवणे), रामु दासु चव्हाण (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आंबु भद्रु राठोड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, डहाणुकर कॉलनी, कोथरुड), सत्यम खिमया राठोड (वय ३८, रा. सुसरुत रेसिडेन्सी, नर्हे), मोहन हरी चव्हाण (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना त्या दिवशी अटक करण्यात आली होती.
याबाबत पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार तारु, मगर, पोलीस अंमलदार पाटील, विनायक मोहिते हे ५ जानेवारी रोजी रात्री हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करत संतोष हॉलसमोर आले. तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुना गेट लॉज येथील पाचवे मजल्यावरील रुममध्ये काही जण जुगार खेळत आहे. या बातमीनुसार पोलीस रात्री दहा वाजता पुना गेट लॉजवर पोहचले. त्यांनी पाचव्या मजल्यावरील या खोलीमध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे सहा जण तीन पत्ती नावाचा तिरट पत्त्यांचा पैसे ठेवून जुगार खेळत होते.
रवींद्र राठोड (२७९००रुपये), हनुमंत राठोड (१४०० रुपये), रामु चव्हाण(८६०० रुपये), आंबु राठोड (२९५०० रुपये), सत्यम राठोड (१००० रुपये), मोहन चव्हाण (४८०० रुपये) असे एकूण ७३ हजार २१० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत.
