Home Blog Page 493

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

0

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळून आले आहे.आज दुपारी प्रथम ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर सुरू असणारा 1920 क्युसेक्स विसर्ग वाढवून संध्याकाळी 06:00 वा. 4345 क्यूसेक्स करण्यात आला आहे आणि अजून तासाभराने म्हणजे संध्याकाळी 07:00 वा. 8734क्यूसेक्स करण्यात आला आणि आता रात्री साडेनऊ वाजता 15 हजार क्युसेक चा विसर्ग सुरू करण्यात आला.


काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.सध्या भिडे पुलावरून वाहतूक बंद असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे दिसून येत आहे.खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या परिरसरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे दरवर्षी धरणं ही जुलै महिन्यानंतर किंवा ऑगस्ट महिन्यांत भरत असली तरी यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे धरणं लवकरच भरतील अशी आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मिटेल, असा अंदाज आहे.

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे गुरुकुल प्रवेशासाठी 30 जूनला मोफत चाचणी परीक्षा,निवास व्यवस्था मोफत : हुशार-होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दहा लाख रुपयांची तरतूद

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या बाबुराव पुसाळकर व कमल धुंडिराज मराठे स्मृती संगीत गुरुकुलामध्ये नवीन प्रवेशासाठी सोमवार, दि. 30 जून 2025 रोजी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरी-ग्रामीण भागातून पुण्यात सांगीतिक शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून ही चाचणी परीक्षा घेतली जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
गायन, वादन, नृत्याच्या क्षेत्रात पूर्णवेळ करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चाचणी परीक्षा विनामूल्य घेण्यात येते. पुण्यातील कोणत्याही महाविद्यालयात संगीत विषयात बी.ए. अथवा एम.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. चाचणी परीक्षेतून 15 मुले आणि सहा मुलींची निवड केली जाणार आहे.
सुरुवातीस विद्यार्थ्यांना आपल्या सादरीकरणाचे पाच मिनिटांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शुक्रवार, दि. 27 जूनपर्यंत गांधर्व महाविद्यालयाकडे पाठवायचे आहेत. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सोमवार, दि. 30 जून रोजी गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष परीक्षा होणार असून या वेळी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे.
पूर्णवेळ संगीत शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची रियाज, निवास व संगीत शिक्षणाची व्यवस्था करण्यात येते. त्याचप्रमाणे हुशार-होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी संस्थेमार्फत प्रतिवर्षी सुमारे दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गायन, वादन, नृत्य या मुख्य विषयांव्यतिरिक्त इतर दोन विषय संस्थेमार्फत शिकवले जातात. तसेच निवासी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्याची सोय देखील उपलब्ध आहे. हुशार व योग्य विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कमवा व शिका योजनेअंतर्गत सहायक शिक्षकपदी अथवा संस्थेच्या कचेरीत कमी वेळासाठी काम दिले जाते, असे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य परिणीता मराठे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी 7276181276 किंवा 020-24450795 या क्रमांकावर सकाळी 9:30 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधवा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था

पुणे, दि. १९ जून २०२५ :
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण प्रवासासाठी “आरोग्यवारी” या उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज श्री निवडुंग्या विठोबा मंदिर, नाना पेठ येथे पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक विशाल धनवडे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या ऑनलाइन उपस्थित होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आजच्या काळानुसार महिलांच्या गरजा बदललेल्या असून, त्यानुसार योजना आणि सेवा आखणं काळाची गरज आहे. निर्मल ग्राम संकल्पनेप्रमाणेच ‘आरोग्यवारी’ सारख्या उपक्रमातून महिलांसाठी विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे आणि पोलिसांशी समन्वय यांचे नियोजन अत्यंत सकारात्मक पाऊल आहे.”

त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी वारीमध्ये मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था आणि सुधारणा यावर भर दिला. “मी स्वतः काही वेळा या टॉयलेट्सचा वापर केलेला आहे. अजून त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे सातत्यपूर्ण सहकार्य महिलांना दिलासा देऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

वारीदरम्यान महिलांना होणाऱ्या त्रासाविरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी स्पष्ट केलं की, “जो कोणी महिलांना टार्गेट करत असेल, त्याचे गुप्त व्हिडिओ करून पोलिसांकडे पाठवा. पोलीस तत्काळ कारवाई करतील आणि अशा विकृत प्रवृत्तीला आळा बसेल.”

‘लाडकी बहीण’ योजनेवर होत असलेल्या टीकेवर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “सरकारचा निधी हा संपूर्ण समाजाचा आहे. महिलांसाठी राखीव निधी ही त्यांच्या हक्काची बाब आहे. आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी वापरला गेलेला निधी अन्यायकारक ठरू शकत नाही.”

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. गोऱ्हे यांनी संयोजिका रूपाली चाकणकर यांचं विशेष कौतुक केलं. “तंत्रज्ञानाच्या युगात महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. महिलांनी एकत्र येऊन समर्थपणे उभं राहिलं, तर कोणत्याही आव्हानाला तोंड देता येऊ शकतं,” असे त्या म्हणाल्या.

डॉ. गोऱ्हेंनी उपस्थित सर्व वारकरी भगिनींना शुभेच्छा दिल्या आणि ‘आरोग्यवारी’ उपक्रम हा समाजपरिवर्तनाच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर निर्णायक बैठक

पिंपरी (दि.१९) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसीसह इतर हद्दीत नियमांचा भंग करून बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाह खंडित केल्यामुळे हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत प्रलंबित कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले.

हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने गत आठवड्यापासून विविध कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. यात हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगत असलेला राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे आदी कामे झाल्याने बहुताश प्रमाणात अडचणी निकाली निघाल्या आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे काही कामे करण्यास वेळ लागत आहे. अशी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, यावेळी महानगर आयुक्त यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांनी दिले.

ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जवळपास १५ ठ‍िकाणी काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर स्थलांतरित केल्याचे पुढे येत आहे. अशी बांधकामे तातडीने थांबविण्याचे तसेच मनमर्जी बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक यंत्रणेने आपले काम जबाबदारीने केल्याने बहुताश प्रश्न निकाली निघालेत. या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता र‍िनाज पठाण, मुख्य अभियंता न‍ितीन वानखेडे यांच्यासह एमआयडीसी, एमपीसीबी, पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लि., सार्वजनिक बांधकाम विभाग, दोहलरसह हिंजवडीतील कंपन्यांचे प्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, हिंजवडी, मान, मारुंजी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे
१) एमआयडीसी विभागामार्फत मेट्रो मार्गिकेलगतची नाले साफसफाई.
२) एमआयडीसी विभागामार्फत डोहलर कंपनीसमोर, साई प्रोविजो इमारतीच्या ठिकाणी, मेट्रो स्थानक क्र.२ येथील वनविभागाच्या जागेलगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची स्वच्छता.
३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या मुख्य रस्त्यावरील मेट्रो स्थानक क्र. १ येथील अनधिकृत स्टॉल काढले.
४) प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागामार्फत विलास जावडेकर यांचे प्रकल्पास काढली नोटीस. स्थानक क्र. ३ येथील जावडेकर इमारत भागातील अनधिकृत रॅम्पचे न‍िष्कासन. हिंजवडी फेज – २ येथील पांडवनगरातील राडारोड्याची विल्हेवाट.
५) एमआयडीसी, प्राधिकरण आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत पथदिवे हस्तांतरणासंबंधी संयुक्त पाहणीनंतर दुरुस्तीचे काम सुरु.
६) मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत मेट्रो स्थानक भागातील राडाराडा उचलण्याचे काम प्रगतीपथावर.
७) टाटा कंपनीमार्फत स्टेशनच्या ठिकाणी दिशादर्शक, माहितीफलक लावले.
८) मेट्रो सवलतकार कंपनी, एमआयडीसीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर.
९) मेट्रो मार्गिकेलगत ज्याठिकाणी ड्रेन ब्लॉक झाली, त्याठिकाणी एमआयडीसी व टाटा कंपनीमार्फत साफसफाई.
१०) नांदे चांदे रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले. यासह इतर आवश्यक ती कामे सुरु आहे.

नागरिकांकडून जाणून घेतल्या समस्या
पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत हिंजवडीसह परिसरातील काही नागरिकांना देखील बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. गत आठवड्याभरापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांवर लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

‘बाप बदलतात, आणि राजकारणात त्यांना पोरं होत नाही,दुसऱ्याची पोरंही आमिषं देऊन पळवतात , कीव येते’, ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई- : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. “मला खरंच कीव येते जे आपला बाप बदलतात, आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाही, अशी लोकं जेव्हा आपल्या घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते. अरे तुला राजकारणात पोरं होत नाहीत तर मी काय करु. आमच्याकडे आहेत, घ्यायची असेल तर घे. किती पाहिजेत? कारण भाजप पक्ष असाच आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“आपण सत्य नाकारतो का कधी? त्यामुळे त्यांनी हे सत्य स्वीकारलं पाहिजे की, त्यांना आजपर्यंत पोरं झाली नाहीत म्हणून त्यांनी दुसऱ्यांची नेते स्वीकारायचे, ते मोठे करायचे, दुर्दैव असं ज्या सरदार पटेल यांनी संघावर बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून जगातला सर्वात मोठा पुतळा बांधण्याची वेळ ह्यांच्यावर आली. हे ह्यांचं कर्तृत्व आणि आपल्याला शिकवतात हिंदुत्व”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आज सगळीकडे लागलेल्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचे फोटो आहेत. जे आपला बाप बदलाल आणि ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, अशी लोक आपल्या घराणेशाहीवर टीका करतात, तेव्हा मला त्यांची कीव येते. तुला राजकारणात पोरं होत नाहीत, त्याला आम्ही काय करू. आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे. किती पाहिजेत? कारण भाजप असाच आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.शिवसेनेचा पहिला शिवतीर्थावर झाला होता. शिवाजी पार्क प्रचंड भरले होते. पैसा फेको तमाशा देखो तसे तेव्हा काहीच नव्हते. व्यासपीठावर माझे आजोबा, शिवसेनाप्रमुख होते. मी माझ्या आईच्या मांडीवर मैदानात बसलो होतो. आज ज्यांना दाढी फुटली आणि दाढी खाजवत आहेत, ते तेव्हा कुठे असतील याची मला कल्पना नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

कुणाला वाटत असेल की, शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसुन टाकाल, तर तुमचे नामोनिशाण महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसुन टाकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे या महाराष्ट्रातून नामोनिशाण पुसुन टाकू. आज तर मी तयारीने उभा आहे, असे ते म्हणाले. तसेच नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातील कम ऑन किल मी… डॉयलॉग मारला. ते पुढे म्हणाले, असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल, तर अॅम्ब्युलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याला, जाताना आडवे होऊन जाल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला जाहीर आव्हान दिले.

पहलगामचे अतिरेकी कुठे गेले? अजून का मिळत नाहीत? भाजपात गेले का?

तुम्ही सैन्याचे पाय बांधले. नाही तर पाकिस्तान घेतलाच असता. पण ट्रम्पचा फोन आल्यावर आवाजच गेला. काय करायचे असे पंतप्रधान. काय करायचे असे गृहमंत्री. युक्रेन की वार रुकवादी पापा. चार अतिरेकी आलेच कसे. अतिरेकी गेले कुठे. पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपात गेले. अजून मिळत कसे नाही. सांगता येत नाही. गेले असतील घेतले असतील. आता फक्त दाऊदला घ्यायचे बाकी आहे. बाकी सर्व झाले आहे. भाजपने नवीन सदस्य नोंदणी सुरू केली. जेलच्या तुरुंगाबाहेरच स्टॉल टाकले. इथे येतो की तिथे जातो. लोकांना आयुष्यातून उठवायचे. भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायचे. एसआयटी लावू हे लावू ते लावू. मग एसआयटीची एसटी झाली का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0

महिला आयोगाने महिला वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत घेतलेला पुढाकार स्तुत्य- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १९: राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून राज्य महिला आयोगानेही वारीदरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीतील अडचणीला लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, नष्टीकरणासाठी इन्सीनरेशन यंत्रे आदी उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सुनील बल्लाळ, माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते.

वारीसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान दिले आहे. पंढरपूर येथे दर्शनबारी उभी करण्यासाठी ७३ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. या बारीत एकाच वेळेस ६ हजार लोक या दर्शनबारीत असतील तसेच या इमारतीमध्ये बारीमध्ये असताना बाकडे, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आदी सुविधा उपलब्ध असतील. पूर्वी पालखीच्या मार्गावर शौचालयांची सुविधा खूप कमी असल्याने अस्वच्छता होत असे. मात्र मोठ्या प्रमाणात फिरत्या स्वच्छतागृहांची मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे.

शहरात सॅनिटरी नॅपकीन विक्रीसाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी पुढाकार घ्यावा
आयोगाने सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड याप्रमाणे १० उत्कृष्ट गुणवत्तेच्या पॅडचे पाकीट १० रुपयाला देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी ५ रुपयांना एक पाकीट आपल्या भागातील महिलांना विकल्यास त्यांना अडीच रुपयांना हे पॅक देऊ. त्यासाठी पुढाकार घेईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन न वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील महिलांपर्यंत ते पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलांनी संघटित होण्यासाठी महिला आयोगाने सुरू केलेला हा आरोग्य वारीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. राज्य शासनाने वारीसोबत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये अजून बदल करता येऊ शकतील. वारकरी महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टारगटपणा करणाऱ्यांचे छोटे १ मिनिटांचे व्हिडिओ काढून पाठवावेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाही करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

स्त्रिया आणि पुरुष अशा सर्वांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून महिलांची विशेष गरज ओळखून लाडकी बहीण योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेविषयी गैरसमज पसरवले जाऊ नयेत. पीएमपीएमएल बसमध्ये टारगट लोक महिलांची, मुलींची नावे टोकदार वस्तुने कोरतात. ती तत्काळ मिटविण्यासाठी व्यवस्था केली जावी. तसेच अशा लोकांचे व्हिडिओ काढून लोकांकडून प्रशासनाकडे पाठविले जातील यासाठी प्रयत्न करा, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली ४ वर्षे हा उपक्रम राबविला जातो. देहू आळंदीची वारी २२ दिवस तर मुक्ताईनगर येथून ३० दिवस चालते. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न निर्माण होत असतो. हे लक्षात घेऊन आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

३ हजार ५०० न्हाणीघरे पालखी मार्गावर सुविधा केली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीट मार्शल सोबत ठेवले आहेत. टोल फ्री क्रमांक चे फलक लावले आहेत. टारगट लोकांकडून त्रास झाल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भक्तिमय वारी आरोग्याची वारी व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे झाल्यास पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार करता येईल. कौटुंबिक हिंसाचार च्या अनुषंगाने भरोसा सेल काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांना सुरक्षिततेचा, प्रगतीचा विश्वास देण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. मुलींचा बालविवाह करू नका. त्यासाठी आई म्हणून महिलांनी भूमिका बजावावी, स्त्रीभ्रूणहत्या होऊ देऊ नये, अनिष्ट रूढी परंपरांविरोधात उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार श्री. तुपे म्हणाले, महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षित आणि स्वच्छ सोहळ्याची जोड या पालखी सोहळ्याला आयोगाने दिली आहे. अनेक महिला वडकी नाका आणि काही महिला दिवे घाटापर्यंत पालखीला पोहोचविण्यासाठी जातात. त्यामुळे या महिलांना परत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्याचा पीएमपीएमएलने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

श्रीमती दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, मागच्या चार पाच दिवसापासून आळंदी आणि देहूला जाण्या- येण्यासाठी जादा बसेसची सुविधा केली आहे. सासवड येथून ११ नियमित बसेस शिवाय ६० जादा बसेस सुरू केल्या आहेत. गर्दीच्या कालावधीत महिलांसाठी विशेष बस सोडण्यात येत आहेत.

प्रास्ताविकात श्रीमती आवडे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून महिला वारकरी देखील आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. राज्य महिला आयोग महिला भगिनीसाठी विविध उपक्रम राबवित असते. आरोग्य वारी या उपक्रमाच्या माध्यमातून वारी मार्गावर, विसाव्याचे ठिकाण, मुक्कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामाजिक समतेचा, समाजाला एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील बल्लाळ म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिका हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २२ ठिकाणी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी १८ ठिकाणी वैद्यकीय पथकांची सुविधा करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. पंढरपूरपर्यंत एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
0000

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरती झाली.

यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले.

देहू नगरीत सकाळपासूनच पावसाचा जोर होता. वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणाने देहू नगरी भारून गेल्याचा अनुभव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यास मिळत होता. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. इनामदार वाड्यातून पालखीच्या प्रस्थानापूर्वीच वारकऱ्यांचे आकुर्डी मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होते.
0000

राजनीश गुर्बानीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्सना एमपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश

0

कर्णधार राहुल त्रिपाठीची फटकेबाजी आणि थेंग, डांगी व गुर्बानी यांच्या धारदार माऱ्याने पावसाने खंडित झालेल्या मोसमात कोल्हापूरने बाद फेरी गाठली

१९ जून २०२५, पुणे: शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने २०२५ महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये सलग तिसऱ्यांदा प्रवेश मिळवला आहे. ९ कठीण गुण मिळवत त्यांनी अखेरचा प्लेऑफ स्थान मिळवले. सततच्या पावसामुळे आणि अतिशय थोडक्याच फरकामुळे निर्णय होत असतानाही, कोल्हापूरच्या गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावत प्रतिस्पर्धी संघांना रोखले आणि महत्त्वाची गडी बाद करत सामने आपल्या बाजूने फिरवले.

रत्नागिरी आणि रायगड यांच्यावर निर्णायक विजय मिळवत आणि पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांतून मिळालेले मुद्दे महत्त्वाचे ठरले. संपूर्ण साखळी टप्प्यात संघाने सातत्य आणि संयम दाखवला. प्रत्येक सामना दबावाखाली खेळला गेला आणि टस्कर्सच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःला टिकवले.

राजनीश गुर्बानी आणि स्थानिक खेळाडू आनंद थेंग हे संघाचे प्रमुख मारा करणारे गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी ८ बळी घेतले आणि विरोधी भागीदाऱ्या मोडत रन्सच्या गतीवर नियंत्रण ठेवले. डावखुरा चेंडू फिरवणारा दीपक डांगी हा आक्रमणात संतुलन आणणारा गोलंदाज ठरला. त्याने ७ बळी घेतले आणि ६.२१ च्या अर्थपूर्ण इकॉनॉमी रेटसह मोसमातील सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले.

पीबीजीचे मालक आणि पॅरिट बलान ग्रुपचे अध्यक्ष पॅरिट बलान म्हणाले, “तरुण भारतीय खेळाडूंना संधी देण्यावर आणि भितीविरहित खेळसंस्कृती घडवण्यावर आमचा विश्वास आहे. पावसामुळे सतावलेल्या या अनपेक्षित मोसमात आमच्या खेळाडूंनी दाखवलेली झुंज हीच आमच्या दृष्टीकोनाची ताकद आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणे ही केवळ सुरुवात आहे—आता आमचा उद्देश केवळ सहभागी होणे नाही, तर जिंकणे आहे.”

कर्णधार राहुल त्रिपाठीने फलंदाजीतूनही पुढाकार घेतला, १५५ धावा १५५ च्या स्ट्राइक रेटने फटकावत मधल्या फळीत स्थैर्य दिले आणि निर्णायक टप्प्यांमध्ये जबाबदारी घेतली.

प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर राहुल त्रिपाठी म्हणाला, “हा मोसम खडतर पण समाधानकारक ठरला. आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, पण आमचा दृष्टिकोन, शिस्त आणि एकमेकांसाठी खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं. संघाने ज्या पद्धतीने एकत्र राहून खेळ केला, त्याचा मला अभिमान आहे. आता आम्ही उपांत्य फेरीसाठी सज्ज आहोत.”

मुख्य प्रशिक्षक अक्षय दरेकर म्हणाले, “या संघाने खरी मानसिक ताकद दाखवली. पाऊस, दबाव, अपयश—कशानेही लक्ष विचलित झाले नाही. आमच्या गोलंदाजांनी जबाबदारी घेतली, फलंदाजांनी योग्य वेळी प्रतिक्रिया दिली. आता एलिमिनेटर सामन्यासाठी आम्ही आमच्या प्रक्रियेत आणि खेळाडूंवर विश्वास ठेवून उतरू.”

रायगडविरुद्धच्या थरारक २ गडी राखून मिळालेल्या विजयामुळेच त्यांना बाद फेरीत स्थान निश्चित करता आले, जो या मोसमातील निर्णायक क्षण ठरला.

आता एलिमिनेटर सामन्यात उतरणाऱ्या कोल्हापूर टस्कर्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी फक्त दोन विजय हवे आहेत. एकसंधपणा, विश्वास आणि अंमलबजावणीच्या जोरावर त्यांनी इथवरचा प्रवास केला आहे आणि आता इतिहासाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

एअर इंडिया ड्रीमलायनरचा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवला जाणार

अहमदाबाद -१२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला.

विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो तपासासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे.

१२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला.अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अमेरिकेला जाणार
ब्लॅक बॉक्सचे दोन भाग – कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) – उष्णता आणि आगीमुळे खराब झाले. देशात अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही जिथे डेटा पुनर्प्राप्त करता येईल.

या कारणास्तव, आता त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (NTSB) प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी सरकारी अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतील.’ब्लॅक बॉक्स’ नावाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. एक मत असे आहे की पूर्वी त्याचा आतील भाग काळा असायचा, म्हणून त्याला हे नाव मिळाले. दुसरे मत असे आहे की अपघातानंतर आगीत जळल्यामुळे त्याचा रंग काळा होतो, म्हणून लोकांनी त्याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणायला सुरुवात केली.

अहमदाबाद विमान अपघात – २११ डीएनए जुळले, १८९ मृतदेह सुपूर्द

आतापर्यंत अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २११ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे आणि १८९ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. ही माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी गुरुवारी दिली.सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी म्हणाले की, आतापर्यंत सुपूर्द करण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये १३१ भारतीय नागरिक, ४ पोर्तुगीज, ३० ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन आणि ६ अन्य लोक आहेत. अपघातानंतर ७१ जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी फक्त ७ रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एअर इंडिया उद्यापासून १५% आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी करणार
एअर इंडिया आंतरराष्ट्रीय वाइडबॉडी विमान उड्डाणांची संख्या १५% ने कमी करणार आहे. ही व्यवस्था २० जूनपासून लागू होईल आणि जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहील. AI171 विमान अपघातानंतर सहा दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.विमानांच्या ताफ्याची सुरक्षा तपासणी आणि तांत्रिक तपासणी करणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे कंपनीकडे आंतरराष्ट्रीय राखीव विमानांची उपलब्धता सुनिश्चित होईल, जेणेकरून कोणत्याही अनपेक्षित व्यत्ययाला तोंड देता येईल.कंपनीने म्हटले आहे की, ज्या प्रवाशांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे त्यांना पर्यायी विमानांनी पाठवले जाईल किंवा त्यांना पूर्ण परतफेड केली जाईल.

‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर यांनी व्यक्त केला.

आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटातून प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की, त्यांच्या आयुष्यात खळबळ उडते. मात्र न डगमगता हे तीनही मित्र परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील मैत्री जपत फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटामधून दाखविली आहे.

‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

तरुणाईची कथा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधूर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला आहे.

विद्यार्थ्यांमधील कल्पक कलागुणांना वाव देण्यासाठी,सामाजिकता जपत होणारा ‘ला क्लासे’ फॅशन शो महत्वाचा-प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे १३ व्या वार्षिक फॅशन शोचे आयोजन

पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एसआयएफटी), पुणे यांच्या वतीने १३वा वार्षिक फॅशन शो ‘ला क्लासे’ ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पस येथे मोठ्या उत्साहात झाला. ‘फ्युजन ऑफ कल्चर्स’ या संकल्पनेवर आधारित ‘एसआयएफटी’च्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेल्या हटके पोशाखांचे सादरीकरण केले. कपड्यांच्या आकर्षक डिझाइन्स आणि मनमोहक रॅम्पवॉकने उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर्यदत्त’च्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मॉडेलिंग करत आपली आत्मविश्वासपूर्ण कला सादर केली.

फॅशन शोचे उद्घाटन ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा श्रीमती सुषमा चोरडिया, सह-उपाध्यक्षा श्रीमती स्नेहल नवलखा, ज्युरी सदस्य एस. एन. अंजली, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, महासंचालक डॉ. एस. रामचंद्रन, प्राचार्या डॉ. सायली पांडे आणि विभागप्रमुख पूजा विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत झाले. ‘सूर्यदत्त’च्या सर्व शाखांचे प्राध्यापक, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एसआयएफटी) आयोजित भव्य ‘ला क्लासे’ फॅशन शोमध्ये उत्साहाने सहभाग घेत रॅम्पवर आत्मविश्वासाने आपली कला, कल्पकता आणि शैली सादर केली. या शोमध्ये परिधान केलेले सर्व कपड्यांचे डिझाइन्स ‘एसआयएफटी’च्या विद्यार्थ्यांनी केले होते.

भारतीय पुराणकथा आणि जागतिक लोककथांचा संगम, आदिवासी भारत आणि जागतिक स्ट्रीटवेअर यांचा मिलाफ, भारतीय सणांचे नव्या रूपात सादरीकरण, भारताची जागतिक स्तरावर भेट, बॉलीवूड आणि हॉलिवूड यांचा फ्युजन, राजघराण्याची परंपरा – एक जागतिक मिश्रण, परंपरागत हस्तकला – आधुनिकतेच्या रूपात या सात प्रकारे कलेचे सादरीकरण झाले. प्रत्येक कलेक्शनमागे संशोधन, सांस्कृतिक विविधतेचे सुंदर कथन आणि सर्जनशीलता यांचा सुरेख संगम दिसून आला. सूर्यदत्त पब्लिक स्कूलमधील वयोगट ५ ते ९ मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात रॅम्पवर मनमोहक प्रस्तुती दिली. या भागाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व आनंद त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतिबिंब होते.

‘भारताची जागतिक स्तरावर भेट’ संकल्पनेला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचा प्रथम पुरस्कार, तर ‘भारतीय पुराणकथा आणि जागतिक लोककथांचा संगम’ संकल्पनेला दुसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट डिझाइनर म्हणून सोनल भोऱाडे, गौरी शेवाळे, वैश्नवी भांडारे, अंजली जीवणे, शुभांगी कराळे, पूर्णिमा कांबळे यांना गौरविण्यात आले. डॉ. सायली पांडे यांच्या संकल्पनेतून हा फॅशन शो साकारला.पूजा विश्वकर्मा आणि खुशबू गजबी यांनी फॅशन शोच्या यशस्वितेत मोलाची भूमिका बजावली. सहायक प्राध्यापक मोनिका कर्वे व शिखा शारदा यांनी प्रशिक्षण व कोरियोग्राफीचेही नेतृत्व केले. ग्रंथपाल छाया माने, क्रीडा संचालक शुभम शिंदे आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख अखिला मुरमट्टी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अखिला मुरमट्टी व सूर्यदत्त विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृष्णा यांनी केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. त्यामुळे त्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षण देण्याला आम्ही प्राधान्य देतो. फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कपड्यांचे कलाकुसरीचे काम, आकर्षक व संकल्पनेवर आधारित डिझाइन्स तयार करण्याचे आणि त्यांना परिधान करून रॅम्प वॉक करण्याच्या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून ‘ला क्लासे’ वार्षिक फॅशन शोचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘ला क्लासे’ फॅशन शो महत्वाचा आहे.”

‘मातोश्री’वर सध्या बंगाली बाबाचा वावर:संजय शिरसाट यांचा मोठा आरोप

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदास संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेला अघोरी पूजेचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भरत गोगावले हे पूजापाठ करणारे आहेत. पण मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय आहे हे संजय राऊतांनी सांगावे. मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. या बाबाच्या सूचनेनुसार उद्धव ठाकरे यांचे सर्वकाही ठरते, असे शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

सध्या भरत गोगावले यांचा एक अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी वसंत मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. संजय राऊत यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. अघोरी विद्येमध्ये रममान असणारे मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. पत्रकारांनी याविषयी गुरूवारी संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी गोगावलेंवरील टीका धुडकावून लावली. तसेच संजय राऊतांना मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन सांगण्याचे आव्हानही दिले.

संजय शिरसाट म्हणाले, व्हायरल व्हिडिओद्वारे भरतशेठ गोगावले हे पूजापाठ करणारे असल्याचे महाराष्ट्राला कळले. अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत व जंगलात होते. हे मदारीचे खेळ बंद करावेत. टीका करणाऱ्या संजय राऊतांना हे कळले पाहिजे. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा मातोश्रीचे बंगालीबाबा कनेक्शन काय आहे हे सांगावे. त्याची मीडियानेही माहिती घ्यावी. कारण, मातोश्रीवर रोज एका बंगालीबाबाचा वावर असतो. तो यांना काय करायचे आणि काय करायचे नाही हे सांगतो. आज-काल उद्धव ठाकरेही त्यांचेच फार ऐकतात. मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय हे शोधा.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे वाटचाल करत आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत, असे ते म्हणाले.

संजय शिरसाट यांनी यावेळी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. तसेच युतीसाठी आवश्यक असणारा संवाद या दोन भावांमध्ये नसल्याचा दावाही केला. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवर आताच काही बोलणार नाहीत. कारण, त्यासाठी आवश्यक असणारा संवाद त्यांच्यात नाही. हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीतून भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा आहे, असेही संजय शिरसाट यावेळी बोलताना म्हणाले.

खडकवासल्यातून मुठेला पाणी सोडले

पुणे- यंदा पाउस लवकरच सुरु झाला , जोरदार पाउस झालेला असला तरी धरण क्षेत्रात मात्र त्यामानाने पाण्याचा साथ झाल्याचे जाणवले नाही . आता मात्र आज खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले जाऊ लागले आहे आज दुपारी प्रथम ठीक दुपारी . 1.00 वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 1920 क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर सुरू असणारा 1920 क्युसेक्स विसर्ग वाढवून संध्याकाळी 06:00 वा. 4345 क्यूसेक्स करण्यात आला आहे आणि अजून तासाभराने म्हणजे संध्याकाळी 07:00 वा. 8734क्यूसेक्स करण्यात येणार आहे,

धरण साखळीत एकूण २९.७८ टक्के एवढाच पाणी साठा झालेला आहे. जो गेल्या वर्षी आजच्या दिवशी १२. ४३ टक्के एवढाच होता . मात्र खडकवासला 83.95% भरले आहे. पानशेत 23.13% तर वरसगाव 32.45% आणि टेमघर अवघे 10.84% भरले आहे. आजतागायत सर्व धरणात मिळून 08.68 TMC पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी तो 03.62 TMC एवढाच होता , यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे महिनाभर अगोदर पाउस लवकर सुरु झाला. हे महत्वाचे आहे.

एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी:ठाकरे गटाच्या नेत्याची जहरी टीका

शिंदेंवर दुसऱ्यांचा माल विकत घेऊन स्वतःचा पक्ष चालवण्याचा आरोप-बाजारात शिंदे गटाच्या दलालांचा सुळसुळाट
मुंबई-सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी असल्याची जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यात स्वतःच्या पक्षातला किंवा स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची ताकद नाही. ते नपुंसक राजकारणी आहेत, असे ते म्हणालेत. विनायक राऊत यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. त्यातच काल उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या दोन नगरसेवकांनी आज शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आहे. यामुळे संतापलेल्या विनायक राऊत यांनी गुरूवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, आमच्या 22 नगरसेवकानी उद्धव ठाकरे याना आपल्याला शिंदे गटाकडून वेगवेगळे आमिष दाखवले जात असल्याचे सांगितले. बाजारात शिंदे यांचे काही दलाल गिऱ्हाईक शोधत फिरत आहेत.

दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि स्वतःचा पक्ष चालवयाचा असे त्यांचे काम सुरू आहे. आज शिंदे गटात जाणाऱ्या लोकांनी अगोदरच आपला निर्णय घेतला असेल. ते केवळ उद्धव ठाकरे काय बोलतात? हे पाहण्यासाठी त्यांच्या बैठकीला आले होते. ते शिंदे गटात जाणार हे आम्हाला यापूर्वीच समजले होते. शिंदे गटाच्या दलालांमध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. नीमेश रेवडेकर असे त्याचे नाव आहे. हा अधिकारी विविध नगरसेवकांच्या घरी जातो. त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो. साहेब तुमच्या आयुष्याचे भले करणार असल्याचे सांगतो, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांच्यात स्वतःच्या पक्षातला, स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची ताकद नाही. विकत घेतलेल्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवता येत नाही. याऊलट उद्धव ठाकरे सर्वच माजी नगरसेवकांशी संवाद साधण्याचे काम करतात. ते शिंदेंसारखे कुणालाही कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवत नाहीत. आमचे दलालही बाजारात फिरत नाहीत. एक माजी नगरसेवक, एक विभाग प्रमुख आज जात आहे. आजचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला आहे. शिंदे गटाच्या तुडतुड्यांचे आज केवळ नाटक आहे, असेही विनायकर राऊत यावेळी सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान साधताना म्हणाले.

महावितरणच्या सुरक्षा साधनांसाठी ‘ऑलाइन मॉ ड्यूल ‘ चे सीएमडी लोकेश चंद्र यांच्याहस्ते उद्घाटन

मुंबई,  : वातावरण सुरक्षितपणे देखरेख करण्यासाठी आणि दुस्तीचे सेनानी राबवण्यासाठी १९ महावितरण २० ते २५ वैयक्तिक आणि कॉमन सुरक्षा साधने त्यांना देण्यात आली. ही साधने साधने आवश्यक आहे आणि महिलांसाठी संबंधित स्वच्छता तात्काळ तयार केली आहे स्वतंत्र ‘टी ऍण्ड पी रिजिट मॉड्यूल’ चे उद्घाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते नाशिक येथे (दि. १८) दोन. वीज प्रत्यक्ष पाहणी करताना कोणत्याही शक्तीनिशी सुरक्षा कार्याचा वापर आणि सुरक्षिततेची पूर्ण देखरेख करून दुरूस्तीचे निश्चित असे साधन त्यांनी सांगितले.

महाएम्प्लॉईविट या स्वतंत्र मॉड्यूलमध्ये सुरक्षेचे सर्व साधने आणि साहित्य तसेच चाचणी उपकरणे उपलब्धता, वितरणाच्या, तंत्रज्ञानाच्या व प्राप्ताची नोंदवही लेखाजोगा ऑनलाइन उपलब्ध आहे. नाशिक विभागीय कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते हे मॉड्यूल कार्यान्वित करण्यात आले. कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प) श्री. सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद रेशमे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) श्री. अरविंद भादिकर नियंत्रण होती.

महावितचे, शहरी ग्रामीण शाखा कार्यालये, वीज उपेंद्र, चाचणी विभाग, भरी एलबूडी फिल्टरमोड ऑफिसर तंत्र तंत्र चाचणीर, स्क्रिप्टी ड्रायव्हर, रबर हातजे, गमट, रेवोट, से बेल्ट, झुला, एचडी एडिॲलिसिस तसेच शिटी व चेटी फोडेबल डिस्चार्ज रॉ बॉक्स स्पॅनर, टॉर्च, मेगर, ड्रिल मशीन आदि कॉमन सुरक्षा साधने आणि चाचणीसाठी काही उपकरणे, उपलब्ध. आपुलकी या लेखांची मांडणी करणे, स्वतःला स्वीकारणे, मंडल कार्यालय ते उपलब्ध होणे ही परंपरागत प्रक्रिया सुरू होती.

तथापि, तंत्रज्ञान संपूर्ण प्रक्रिया सुरक्षा साधने आवश्यकतेनुसार तात्काळ उपलब्ध व्हावीत यासाठी ही स्वतंत्र मॉड्यूलद्वारे ऑनलाइन सूचना करण्याचे अध्यक्ष व प्रशासकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केली होती. प्रशिक्षण आणि सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान संयुक्तपणे या मॉड्यूलची निवड केली आहे. या उपलब्धतेद्वारे आता एका क्लिकद्वारे तंत्र तंत्र आवश्यक आहे. आरोग्यच स्तराकडे व प्रत्येक मंडलावर सर्व सुरक्षा साधनांचा लेखाजोगा या मॉड्यूलवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन ‘टी ऍण्ड पी रिझर्व्हमेंट मॉड्यूल’ मूलभूत सुरक्षा साधनांचे वितरण पारदर्शक तसेच तत्परतेने होणार आहे. तसेच खरेदी प्रक्रिया करून आवश्यक सुरक्षा साधने भांडार उपलब्ध करून ठेवता येतील. प्रत्येक गुणासाठी वापरण्याची स्वतंत्रता आहे. स्वत: मध्ये बदलण्यात वीरा किंवा आधिच खराब झाल्यानंतर त्याची देखील त्याला साथ दिली जाते.