Home Blog Page 492

राहुल गांधी म्हणाले- इंग्रजी लाज नव्हे तर शक्ती:गरीब मुलांनी ती शिकावी असे BJP-RSSला वाटत नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की इंग्रजी भाषा सक्षम करते. ती लज्जास्पद नाही आणि ती प्रत्येक मुलाला शिकवली पाहिजे. गरीब मुलांनी ही भाषा शिकावी असे भाजप-आरएसएसला वाटत नाही कारण त्यांना प्रश्न विचारावेत आणि समानता मिळवावी असे त्यांना वाटत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांची ही पोस्ट अमित शहा यांच्या त्या टिप्पणीनंतर आली आहे, ज्यामध्ये शहा म्हणाले होते की या देशात इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना लवकरच लाज वाटेल.

राहुल गांधींनी X वर लिहिले-अंग्रेज़ी बाँध नहीं, पुल है। अंग्रेज़ी शर्म नहीं, शक्ति है। अंग्रेज़ी ज़ंजीर नहीं – ज़ंजीरें तोड़ने का औज़ार है। BJP-RSS नहीं चाहते कि भारत का ग़रीब बच्चा अंग्रेज़ी सीखे – क्योंकि वो नहीं चाहते कि आप सवाल पूछें, आगे बढ़ें, बराबरी करें। आज की दुनिया में, अंग्रेज़ी उतनी ही ज़रूरी है जितनी आपकी मातृभाषा – क्योंकि यही रोज़गार दिलाएगी, आत्मविश्वास बढ़ाएगी। भारत की हर भाषा में आत्मा है, संस्कृति है, ज्ञान है। हमें उन्हें संजोना है – और साथ ही हर बच्चे को अंग्रेज़ी सिखानी है। यही रास्ता है एक ऐसे भारत का, जो दुनिया से मुकाबला करे, जो हर बच्चे को बराबरी का मौका दे।

इंग्रजी हे धरण नाही, ते एक पूल आहे. इंग्रजी ही लाज नाही, ती शक्ती आहे. इंग्रजी ही साखळी नाही, ती साखळ्या तोडण्याचे एक साधन आहे. भारतातील गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे असे भाजप-आरएसएसला वाटत नाही कारण त्यांना तुम्ही प्रश्न विचारावेत, पुढे जावेत, समान व्हावे असे वाटत नाही. आजच्या जगात, इंग्रजी ही तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे कारण ती रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच वेळी प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकवले पाहिजे. जगाशी स्पर्धा करणाऱ्या, प्रत्येक मुलाला समान संधी देणाऱ्या भारताचा हा मार्ग आहे.


शहा म्हणाले होते- आपल्या देशाच्या भाषांशिवाय आपण भारतीय नाही

हिंदीसह ‘भारतीय भाषांच्या भविष्या’बद्दल शाह म्हणाले, ‘कोणतीही परदेशी भाषा एखाद्याचा देश, संस्कृती, इतिहास आणि धर्म समजून घेण्यासाठी पुरेशी असू शकत नाही. अपूर्ण परदेशी भाषांमधून संपूर्ण भारताची कल्पना करता येत नाही.’

ही लढाई किती कठीण आहे हे मला चांगलेच माहिती आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय समाज ती जिंकेल. पुन्हा एकदा स्वाभिमानाने आपण आपला देश आपल्याच भाषांमध्ये चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू.

भाषिक वादात टीएमसी नेत्यांनीही उडी घेतली

भाषेच्या चर्चेदरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतात २२ घटनात्मक मान्यताप्राप्त भाषा आणि १९,५०० भाषा आणि बोली आहेत आणि हेच आपल्या देशाच्या विविधतेतील एकता आहे. ९७% लोक मान्यताप्राप्त भाषांपैकी एक भाषा त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टोळी हे कधीही समजणार नाही.

टीएमसीच्या राज्यसभा सदस्या सागरिका घोष यांनीही एक्स वर लिहिले- भारतीयांना कोणत्याही भाषेची लाज वाटू नये.

भारतीय संविधानात भाषेबद्दल काय म्हटले आहे…

संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध 22 भाषा आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू आहेत.

१९५० मध्ये जेव्हा संविधान स्वीकारण्यात आले तेव्हा कलम ३४३ मध्ये असे घोषित केले गेले की हिंदी ही अधिकृत भाषा असेल आणि इंग्रजी ही १५ वर्षांपेक्षा जास्त काळासाठी अतिरिक्त अधिकृत भाषा म्हणून काम करेल.

१९६३ च्या अधिकृत भाषा कायद्यात हिंदीसह इंग्रजीला अधिकृत भाषा म्हणून सुरू ठेवण्याची तरतूद होती. ती २६ जानेवारी १९६५ रोजी अंमलात आली. त्यात असे म्हटले आहे की संघाच्या सर्व अधिकृत कामांसाठी आणि संसदेच्या कामकाजासाठी इंग्रजीचा वापर सुरू ठेवावा.

या कायद्यात असेही म्हटले आहे की ज्या राज्यांनी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले नाही अशा संघराज्य आणि कोणत्याही राज्यामधील संवादासाठी इंग्रजी भाषा वापरली जाईल.

देशातील ३ राज्यांमध्ये भाषिक वाद सुरू आहे

महाराष्ट्र: सरकारने मे-जून २०२५ मध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदीला तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा जीआर जारी केला. राज ठाकरे, मराठी साहित्य परिषद, पालक-शिक्षक गट आणि शिक्षणतज्ज्ञांनी याला हिंदी लादण्याचा प्रयत्न म्हटले असून, निषेध तीव्र होत आहेत.
नंतर, एक सुधारणा करण्यात आली आणि हिंदी ऐच्छिक करण्यात आली, परंतु दुसरी भाषा फक्त २० विद्यार्थ्यांनी पर्याय स्वीकारला तरच शिकवता येईल, ज्याला टीकाकार मागच्या दाराने लादलेले मानत आहेत.
तामिळनाडू: NEP-2020 च्या त्रिभाषा धोरणात हिंदीचा तिसरा भाषा म्हणून समावेश करण्यास तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की याचा अर्थ पुन्हा एकदा 1950-60 च्या दशकातील चळवळीला तोंड द्यावे लागेल.
कर्नाटक: अलिकडच्या वादात, कमल हसन यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरुद्ध कन्नड भाषा समर्थक संघटनांनी हस्तक्षेप केला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला कन्नड भाषेच्या संवेदनशीलतेचा आदर करण्याचे आणि चित्रपटसृष्टीतील लोकांना त्यांचे विचार मांडण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले.

वेदांताने गेल्या दशकात सरकारी तिजोरीत दिले सुमारे 4.5 लाख कोटींचे योगदान 

पुणे-वेदांता लिमिटेडने आपल्या वार्षिक Tax Transparency Report (TTR) च्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करताना पारदर्शक आणि जबाबदार कर धोरणांबाबतची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. आर्थिक वर्ष 15-16 ते आर्थिक वर्ष 24-25 या कालावधीत कंपनीने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधून एकूण 4,48,830 कोटी रु. चे उत्पन्न शासनाकडे जमा केले. एकट्या आर्थिक वर्ष 25 मध्येच, वेदांताने थेट आणि अप्रत्यक्ष कर, रॉयल्टी, लाभांश आणि अन्य कायदेशीर देयकांच्या माध्यमातून एकूण 55,349 कोटी रु. (एकत्रित महसुलाच्या 37%) इतके योगदान दिले. यापैकी, 54,595 कोटी रु. भारत सरकारकडे जमा करण्यात आले.

भारतामध्ये, वेदांताचे कामकाज 15 राज्यांमध्ये चालते. त्यामध्ये आर्थिक वर्ष 25 मध्ये राजस्थान ऑपरेशन्सने 25,436 कोटी रु. आणि ओडिशा ऑपरेशन्सने 9,176 कोटी रु. इतके योगदान दिले आहे.

वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी भारत सरकार व सर्व भागधारकांचे कंपनीवरील विश्वासाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “राष्ट्रनिर्मिती हेच आमच्या कार्याचे केंद्र आहे. आमचे खनिज, साहित्य आणि ऊर्जा देशाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. भारतातील अग्रगण्य खनिज, धातू आणि नैसर्गिक संसाधन कंपनी म्हणून आम्ही स्वतःकडे या नव्या युगाचे लाभार्थी आणि प्रेरक अशा दोन्ही नजरेने बघतो.”

आर्थिक वर्ष 25 मध्ये कंपनीने 24,649 कोटी रु. कर रूपाने म्हणजेच उत्पन्न व भांडवली कर, शासकीय रॉयल्टी आणि अन्य कर स्वरूपात भरून योगदान दिले. त्याचप्रमाणे, अप्रत्यक्ष कर, withholding कर व इतर अप्रत्यक्ष स्वरूपातील योगदान 27,081 कोटी रु. होते. तसेच भारत सरकारला 3,619 कोटी रु. चा लाभांशही देण्यात आला. कंपनीच्या TTR नुसार, आर्थिक वर्ष 25 मध्ये झिंक विभागाचे योगदान 19,359 कोटी रु. इतके होते. हे सर्व व्यवसाय शाखांमधून सर्वाधिक होते. त्यापाठोपाठ अॅल्युमिनियम व्यवसायाचे योगदान 12,350 कोटी रु. आणि तेल व वायू व्यवसायाचे 10,195 कोटी रु. होते.

“वेदांतामध्ये आम्ही सुशासनावर खूप भर देतो. ESG मधील ‘G’ (Governance) म्हणजेच प्रशासन या घटकाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, पण तोच एका शाश्वत व्यवसायाचा कणा असतो. तत्व-मूल्य यांच्याशी निगडीत प्रामाणिकतेवर आधारित प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही बांधील असून दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित करतो. सलग दहा वर्षे हा अहवाल प्रसिद्ध करताना प्रशासनावरील आमचा विश्वास ही जबाबदारी केवळ अनुपालनापुरती मर्यादित नसून कॉर्पोरेट नागरिकत्वाचे एक मूलभूत तत्व आहे हे यातून प्रतिबिंबित होते,” असे हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्ष आणि वेदांता लिमिटेडच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रिया अगरवाल हेब्बार यांनी अधोरेखित केले.

कंपनी गेली दहा वर्षे स्वयंप्रेरणेने Tax Transparency Report प्रकाशित करत आहे. जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत राहत हा अहवाल कंपनीच्या कर धोरणांबाबत, सुशासन प्रक्रियांबाबत व देशानुसार योगदानाबाबत सखोल माहिती देतो. या अहवालात B Team Responsible Tax Principles आणि EITI या दोन प्रमुख चौकटींचा आधार घेतलेला आहे.

सैनिकांसाठी कार्यरत सौ. सुमेधाताई चिथडे यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

पुणे-

सावित्री फोरमतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘सावित्री’ पुरस्कार यंदा  सियाचिन आणि कुपवाडा येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारणाऱ्या व सैनिकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सौ. सुमेधाताई चिथडे यांना जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड येथे हा पुरस्कार समारंभ संपन्न होईल. राष्ट्रीय सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री विद्या विकास, सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नामवंत शैक्षणिक सल्लागार श्रीकांत गणपती सुतार याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.    

या कार्यक्रमात सावित्री फोरमतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विद्यानिधी योजना’ अंतर्गत हुशार आणि गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य देण्याचा उपक्रम संपन्न होईल. यंदा ५० विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.

सौ. सुमेधाताई चिथडे या SIRF (Soldiers Independent Rehabilitation Foundation) या संस्थेच्या संस्थापिका असून त्यांचे संपूर्ण कार्य हे भारतीय सैनिकांसाठी समर्पित आहे. त्यांनी स्वतःच्या स्त्रीधनातून आणि लोकसहभागातून सियाचिनसारख्या प्रतिकूल हवामानातील रणभूमीवर लढणाऱ्या जवानांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग युनिट उभारले. त्यांच्या या राष्ट्रसेवेचा लाभ आजवर ३५,००० हून अधिक जवानांनी घेतला असून, त्याच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारलेल्या युनिटमधून ६५,००० पेक्षा अधिक लाभार्थी सैनिकांना मदत पोहोचली आहे.

त्यांनी शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, अपंग सैनिकांच्या गरजा पूर्ण करणे, सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वाहने आणि सुविधांची उभारणी करणे, सैनिकी रुग्णालयासाठी सोलर प्लांट उभारणे अशा विविध उपक्रमांतून राष्ट्रसेवेला वाहिलेले जीवन जगले आहे.

सौ. सुमेधाताई या केवळ राष्ट्रभक्त कार्यकर्त्या नाहीत, तर त्या उत्तम गायिका, लेखिका आणि कवयित्रीसुद्धा आहेत. त्यांना आकाशवाणी, दूरदर्शन आणि नाट्य स्पर्धांमधून अनेक गौरव प्राप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं जीवन आदर्श मानत त्यांनी आपल्या विचारसरणीच्या धाग्यांमध्ये राष्ट्रप्रेम पेरले आहे. एक वीरपत्नी आणि वीरमाता म्हणून त्यांनी केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जे कार्य केले आहे, त्याचा गौरव सावित्री पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी पुण्यात भव्‍य दौड, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रात्‍यक्षिके

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्‍या उपस्‍थितीत रंगणार समांरभ

पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्‍या वतीने जागतिक ऑलिम्‍पिक दिनानिमित्त सोमवारी सोमवार २३ जून रोजी पुण्यात ऑलिम्‍पिक दौड, प्रात्‍यक्षिकांचे प्रदर्शन, खेळाडूंचा गौरवासह भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील ऑलिम्‍पिक दिन मुख्य समारंभ स.प. महाविद्यालयात सकाळी १० वाजता रंगणार आहे. राज्‍याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्‍या हस्‍ते ऑलिम्पियन, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्‍त खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी क्रीडामंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित रहाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना (एमओए) महासचिव नामदेव शिंरगांवकर यांनी दिली आहे.

समारंभाचा प्रारंभ सकाळी ७.३० वाजता ऑलिम्‍पिक दौडीने होईल. ऐतिहासिक लाल महाल येथील बाल शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौडीची सुरुवात होईल. मर्दानी खेळ व विविध खेळांची प्रात्याक्षिके ही लाल महालातही होणार आहे. आंतररष्ट्रीय खेळाडूंच्‍या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून ऑलिम्पिक दौडीचा प्रारंभ होईल. २३ जून रोजी जगभर ऑलिम्‍पिक दौडीचे आयोजन केले जात असते. पुण्यात २ दशकांपासून ऑलिम्‍पिक दौडची परंपरा सुरू आहे.

ऑलिम्‍पिक दौडमध्ये ऑलिम्पियन, आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहे. शिवाजी रोडने दगडूशेठ गणपती समोरून लक्ष्मी रोडने अलका टॉकीज चौक , टिळक रोडने स.प. महाविद्यालयात दौडची सांगता होईल. ढोल ताशांच्या गजरात ऑलिम्‍पिक दौडचे स्वागत करण्यात येणार आहे. त्‍यानंतर स.प.महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल.

स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये मुख्य समारंभात आजी-माजी ऑलिम्‍पिक विजेते, ऑलिम्पियन,, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार प्राप्‍त खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. गणेश वंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, किकबॉक्सिंग, मर्दानी खेळाचे प्रात्‍यक्षिक हे समारंभाचे वैशिष्ट असणार आहे.

एअर मार्शल प्रदीप बापट PVSM,VSM (निवृत्त) यांची माजी सैनिक महामंडळाच्या (MESCO) संचालकपदी नियुक्ती.

पुणे (प्रतिनिधी)
एअर मार्शल प्रदीप बापट, PVSM VSM (निवृत्त) अध्यक्ष अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद,महाराष्ट्र आणि गोवा यांची महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को) च्या संचालकपदी १८ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.मेस्को ही महाराष्ट्र शासनाची उपक्रम संस्था असून, १८ जानेवारी २००२ रोजी तिची स्थापना झालेली आहे.ह्या संस्थेचा मुख्य उद्देश माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या नियुक्तीमुळे मेस्को (MESCO) या संस्थेच्या दृष्टीकोनात नवचैतन्य निर्माण होईल,तसेच माजी सैनिकांचे सक्षमीकरण आणि मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश करण्यावर अधिक भर दिला जाईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ही संचालक पदाची प्रतिष्ठेची नियुक्ती राज्य शासनाच्या माजी सैनिकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचे व त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील आणि विकासातील योगदानाचे प्रतिक आहे.
एअर मार्शल बापट (निवृत्त), यांना यापूर्वी २६ जानेवारी २०२० रोजी परम विशिष्ट सेवा पदक व २६ जानेवारी २०१४ रोजी विशिष्ट सेवा पदक राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते.तसेच २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांना मध्यप्रदेश रत्न अलंकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन व गौरवभावना व्यक्त केली आहे.

समर्थ युवा फाउंडेशन यांच्यावतीने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने आरोग्यवारीचा शुभारंभ

पुणे : वारीची परंपरा ७०० वर्षांहून अधिक जुनी आहे. महाराष्ट्रात असे लाखो वारकरी आहेत ज्यांना वारीला न गेल्यास वर्ष पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्या आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा लाजेच्या किंवा संकोचाच्या भावनेने त्या तपासणीपासून दूर राहतात. म्हणूनच अशा आरोग्यसेवा  थेट महिलांच्या दारापर्यंत गेल्या पाहिजेत, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

समर्थ युवा फाउंडेशन यांच्यावतीने आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सहकार्याने आरोग्यवारी या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट येथे हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, एमएनजीएल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, फ्लीटगार्ड फिल्टर्सचे अध्यक्ष संजय कुलकर्णी,  वाणिज्य संचालक शंकर करजगी, स्वतंत्र संचालक बागेश्री मंठाळकर यावेळी उपस्थित होते.

राजेश पांडे म्हणाले, आजपर्यंत आरोग्य वारीच्या माध्यमातून १.२१ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, ४ लाखांहून अधिक आरोग्य तपासण्या झाल्या आहेत.  वारीच्या माध्यमातून भक्ती आणि आरोग्याचा मेळ साधण्यात येत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने तरुणाई या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आरोग्य सेवा देत आहे.

शंकर करजगी म्हणाले, या संपूर्ण उपक्रमात मुलींचा सहभाग मोठा आहे आणि अतिशय मनापासून मुली काम करत आहेत, हे अतिशय कौतुकास्पद आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याने पुण्य मिळेल आणि पुण्यापेक्षा मोठे काही नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वारकरी सेवा आणि गरजूंसाठी वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने २ मोबाईल मेडिकल व्हॅन कार्यरत राहणार आहेत. संस्थेने  ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या माध्यमातून पुणे ते पंढरपूर वारीदरम्यान ५ हजार वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्याचा संकल्प केला आहे.

पायी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आरोग्य वारीच्या माध्यमातून होणार आहे. स्तन कर्करोग तपासणी, डोळे तपासणी, तोंडाचा कर्करोग, दातांची तपासणी, रक्तदाब, रक्तातील घटकांची तपासणी, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर तपासणी या आरोग्य तपासणी आरोग्यवारीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. बागेश्री मंठाळकर यांनी निवेदन केले.

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. २० : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. https://wa.link/o93s9m यावर आपले मत नोंदवा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत@२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटावा यासाठी विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन जाहिर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगर विकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्धाटन मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी केले आहे. सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पासून गावपातळीवरील कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत यासाठी दर्शनी भागावर फलक लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही.

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

0

पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 22 जून 2025 रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे 2 वा. पासून ते 24 जून 2025 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे. 24 ते 25 जून 2025 रोजी सासवड- जेजुरी-ते वाल्हे दरम्यान जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. 24 जून रोजी पहाटे 2 वा. पासून ते 25 जून रोजी रात्री 12 वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येणार आहे. 26 जून 2025 रोजी लोणंद येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 26 जून रोजी सकाळी 2 वा. पासून ते 26 जून रोजीचे सायं. 5 वा.पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे.26 जून ते 28 जून या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:पालखी 23 जून रोजी लोणीकाळभोर ते यवत दरम्यान यवत येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 23 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे.24 जून रोजी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे मुक्कामी असणार दरम्यान 24 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.25 जून रोजी वरवंड ते उंडवडी ता. बारामती दरम्यान उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी 25 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस तसेच तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील. 26 जून रोजी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून दरम्यान 26 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील.27 जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून दरम्यान 27 जून रोजी सकाळी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे. 28 जून रोजी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून 28 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 29 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे. 29 जून रोजी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असून पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस -जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे. 30 जून रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलुज-बावडा-नातेपूते बारामती तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 30 जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गान वळविण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी इंदापूर ते सराटी दरम्यान सराटी येथे मुक्कामी असून पहाटे 2 वाजल्यापासून रात्रौ 12.00 वाजेपर्यंत तसेच 3 जुलै रोजी पहाटे 2 वा पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वारकरी सेवा प्रतिष्ठानतर्फे साकारण्यात आलेल्या भव्य विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन

0

पुणे –  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात भव्य आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ६१ फूट उंचीची श्री विठ्ठलाची भव्य प्रतिकृती व १६ फूट उंचीची तुळस, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या देखाव्याचे उद्घाटन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि यशोधा भिवाजी गदादे (पाटील) यांच्या शुभहस्ते भक्तिभावाने पार पडले. उद्घाटन सोहळ्याला विविध भजनी मंडळे, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेष उपक्रमाबद्दल माहिती देताना प्रतिष्ठानचे शिवाजी गदादे पाटील यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा हा देखावा पुणेकरांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. पंढरीच्या वारीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम भाविकांना पावन अनुभूती देणारा ठरत आहे. वारकरी सेवा प्रतिष्ठाच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. नगरसेविका प्रिया गदादे व सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे यांनी केले आहे.

प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

  • योग दिनाचे औचित्य साधून वस्ती भागातील १००० मुलींची योग प्रात्यक्षिके

पुणे – महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. मानसी उपक्रमामुळे कोथरुड मधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून, आगामी काळात पुणे शहरात ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.जागतिक योग दिनाचे औचित्य साधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या ‘मानसी’ उपक्रमातील मुलींचे एकत्रिकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते.

जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, योग गुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. स्त्रित्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना, अशा विविध आव्हानांवर मात करत, त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील १००० मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

पवार कुटुंब म्हणजे दरोडेखोरांची टोळी:त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?, लक्ष्मण हाकेंचा सवाल

पुणे-यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पवार कुटुंबियांना आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. तर मी नेहमी म्हणतो की अजित पवार हे कारखानदारांचे नेते आहेत. ही लुटारुंची टोळी आहे. यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे.लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांकडून लोकशाहीचा खून पाडण्याचे काम होत आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांना केवळ माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रस आहे. हे निवडणुका जिंकण्याचे अड्डे बनले आहेत. अजित पवार अर्थमंत्रीपदावर यासाठीच राहतात कारण ते राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकतात आणि यांच्या संस्थांना मोठे करतात.

लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत असाच गैरप्रकार झाला होता. अशाच रात्री-अपरात्री बँका उघड्या राज्याने पाहिल्या होत्या. जरी लोकं सात्यत्याने निवडून येतात ना ती जनभावनेवर नाही तर अशा काळ्याकृत्यावर निवडून येत असतात. हे पवार कुटुंब हे दरोडेखोरांची आणि कारखानदारांची टोळी आहे.लक्ष्मण हाके म्हणाले की, हा कारखाना जर ताब्यात ठेवला तर दर ठरवणे यांच्याच हातात राहते. मग त्या कारखान्यापासून जे काही रॉ मटेरियल मिळते ते यांच्या वायनरीला जाते. हा कारखाना जर यंदा पवार कुटुंबियांच्या ताब्यात गेला तर पुढल्या काळात तो खासगी कधी होईल आणि पवार कुटुंबियांच्या मालकीचा होईल हे कळणार नाही.

लक्ष्मण हाके म्हणाल की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहणे अजित पवारांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. कारखान्यांना निधी देण्यास अर्थमंत्र्यांकडे पैसा आहे. मात्र, महाज्योतीच्या संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछत्रवृत्ती देण्यास यांच्याकडे निधी नाही, ही लाजिरवाणी बाबत आहे.

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

0

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे. या दोन्ही पॅनल एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. त्यात ‘सहकार सहकार बचाव पॅनल’ने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) रात्री 11 वाजेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असताना पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली. त्यावेळी बँकेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळल्या. यावेळी अजित पवारांचे पीए सुनील मुसळे, व मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे आढळून आले. हे दोन्ही बँकेत का उपस्थित होते? व ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैशाचे वाटप होत असल्याचाही आरोप केला आहे.

सुनील मुसळे रात्री 11 वाजता बँकेत काय करत होते? ते आमच्यापुढे गाडीत बसून निघून गेले. बँकेत कारखान्याच्या सदस्यांची, त्याच्या नातेवाईकांची व जबाबदारी स्वीकारणाऱ्यांची यादी सापडली. इरिगेशनची अधिकारी डुबल यांचेही नाव यात आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकून मदत करण्यास भाग पाडले, असे ते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करताना म्हणाले.

दुसरीकडे, पीडीसीसी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जगदाळे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. बँक 5.30 वा. बंद होते. या अवधीनंतर फोन आल्यामुळे मी बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी बँकेत उशिरापर्यंत थांबले होते. पण माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या? हे मला माहिती नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांनीही व्यक्त केला संताप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बँकेची वेळ 5 वाजेपर्यंतची असते. त्यानंतरही ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या आढळल्यात. त्या याद्या तिथे कशा पोहोचल्या? सहकारी संस्था, शिक्षण संस्था याच्या याद्याही तिथे होत्या. बँकेचा लोड वाढला असावा. त्यामुळे ती रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यात आली असावी. नजिकच्या काळात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. हे राजकारण बदलले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा

पुणे : बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. या वास्तूचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.गेल्या सतरा वर्षांपासून या वास्तूचा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने ह्या वर्षी 57 वा वर्धापन दिन दिनांक 24 जून ते 26 जून 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारातील कलाविष्कार सादर होणार आहेत. अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनांक 24 जून 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्याच वेळी संगीत नाटक विभाग,गद्य नाटक विभाग,तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करून होणार आहे.या महोत्सवात अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र),आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र), चंद्रकांत दादा पाटील (उच्च शिक्षण व तंत्रज्ञ मंत्री),खासदार डॉ. अमोल कोल्हे,प्रशांत दामले (अध्यक्ष अ.भा मराठी नाट्य परिषद) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अभिनय बेर्डे, देवयानी बेंद्रे, नम्रता दास, पूजा पुरी हे नामवंत कलाकार देखील आपले योगदान देणार आहेत.

या महोत्सवाची सुरुवात दिनांक 24 जून 2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता. अंजली राऊत (नागपूर) यांच्या गणेश वंदनेने होणार आहे. संगीत नाट्यप्रवेश, कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम, “शब्दप्रभू जगदीश खेबुडकर”यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र होणार आहे, ज्यामध्ये विशेष आमंत्रित जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आहेत.

दुसऱ्या दिवशी दिनांक 25 जून रोजी सकाळी एकपात्री तसेच कलावंतांच्या दहावी / बारावी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर फक्त “महिलांसाठी लावणी महोत्सव” होणार आहे. त्यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थित आहेत.

“स्त्री आज कितपत सुरक्षित”या ज्वलंत विषयावर चर्चासत्र संध्याकाळी होणार आहे. ज्यामध्ये सहभाग अंजली दमानिया, दिपाली सय्यद, रूपाली चाकणकर, तृप्ती देसाई, होणार असून मुलाखतकार नम्रता वागळे या आहेत. संध्याकाळी लोक संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

तिसऱ्या दिवशी दिनांक 26 जून रोजी”महाराष्ट्राची लोकधारा”, दुपारी “मोगरा फुलला” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच पारंपारिक लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री”ऑल इज वेल” या चित्रपटातील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा होणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध हास्य कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव हे देखील कलाविष्कार करणार आहेत.
तीनही रात्री संगीत रजनी, मनीषा लताड, कोल्हापूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स आणि मुकेश देढिया / तेजस्विनी प्रस्तुत बॉलीवूड हिट्स”सादर होणार आहे.

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. कम ऑन किल मी असं म्हणत आव्हान देणाऱ्या ठाकरेंना मरे हुए क्या मारना असा सवाल करत शिंदेंनी विचारला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला, असा खोचक टोला शिंदेंनी लगावला. मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकसंध शिवसेना २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढली. त्यानंतर २०२४ मध्ये ठाकरेंच्या नेतृत्त्वात, शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षानं निवडणूक लढवली. याची आकडेवारी शिंदे यांनी मांडली आणि ठाकरेंवर शरसंधान साधलं. याचवेळी त्यांनी आपल्या पक्षाचा स्ट्राईक रेट आणि आकडेवारी सांगत आमचीच शिवसेना खरी असा दावा केला.
‘आणि म्हणून मी तुम्हाला थोडं गणित सांगतो. विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहीत आहे. २०१४ मध्ये सेनेने २८२ जागा लढवल्या आणि ६३ जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता फक्त २२ टक्के. २०१९ साली शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या आणि ५६ जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता ४५ टक्के,’ अशी आकडेवारी शिंदेंनी मांडली.

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

  • वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ
  • सिंबायोसिस’ व सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टतर्फे रौप्य महोत्सवी उपक्रमाचे आयोजन

पुणे: “गेल्या २५ वर्षांपासून ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्याचे सत्कर्म पुण्याचे काम आहे. टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम घेऊन निःस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’च आहेत,” अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला. यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करणार आहे. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते. पुण्यापासून जेजुरी पर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल.

सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई, ‘सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते ऍड. अविनाश साळवे, पुणे महानगर पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. रमण, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, अतुल साळवे, अक्षय साळवे, आकाश साळवे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “सलग २५ वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. वारकर्‍यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. स्वयंशिस्त असलेल्या या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वरभक्ती असते. पालखी सोहळ्यात विविध स्वरूपात सेवा देणाऱ्या संस्थांची संख्या मोठी आहे. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. “

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “एका अँब्युलन्सपासून सुरु झालेला हा प्रवास १० पेक्षा अधिक अँब्युलन्सवर गेला आहे. हा फिरता दवाखाना वारकऱ्यांचा शीण उतरण्याचे काम करतो. हा उपक्रम वारी असेल, तोवर अविरतपणे सुरु राहील. राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो.”

“वारकऱ्यांच्या सेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एका अँब्युलंसपासून सुरु झाला. पांडुरंगाच्या आशीर्वादाने २५ वर्षे सातत्याने लाखो वारकऱ्यांवर उपचार करता आले. ही वारकरी आरोग्यसेवा अव्याहतपणे सुरु राहील, असा विश्वास देतो,” असे ऍड. अविनाश साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले.