Home Blog Page 491

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. २१: योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवीत करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.

योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते.

यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक भूमी, एक आरोग्य’ हा संदेश कृतीतून देणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणे ही एकप्रकारे आनंदाची पर्वणी आहे. आज सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी योगासन करत आहेत. तसेच ७०० महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील योगासनात सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे. आयोजकांनी आरोग्य वारी हे नवीन रिंगण दिले असून ते पुढे कायम चालत रहावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दीन साजरा केला जातो. आज एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास १० कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे. ५ हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा, ध्यान, यज्ञाचे महत्त्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आले असून यातील विज्ञानाचे सर्व जग अनुसरण करत आहे. आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला जावा अशी संकल्पना समोर आली, त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला. पुणे शहरातील १८७ महाविद्यालये, प्राचार्य, सुमारे १ हजार २०० प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी या योग दिनाचे नियोजन करत होते. प्रशासन, शासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.

योग कार्यक्रमात आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे आदी सहभागी झाले. परदेशी नागरिक, विद्यापीठातील अधीष्ठाता, प्राचार्य, विद्यार्थी आदी योगात सहभागी झाले.

जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले.
0000

सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

  • ‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • देशात २ लाख नव्या प्राथमिक कृषी पतसंस्था

मुंबई, दि. २० : “सहकार से समृद्धी” या आधारावर ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक गावात सहकारी संस्थांची माहिती डिजिटल डाटाबेसद्वारे संकलित करण्यात आली आहे. पॅक्स संस्थांना केवळ कृषीपुरते मर्यादित न ठेवता, २२ नव्या सेवा क्षेत्रांशी जोडण्यात येत आहे. यामध्ये जनऔषधी केंद्रे, गॅस वितरण, पेट्रोल पंप, रेल्वे तिकीट सेवा, टॅक्सी सेवा अशा सेवा क्षेत्रांचा समावेश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केले.मुंबईतील हॉटेल फेअरमोंट येथे ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोईर, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, महाव्यवस्थापक अमित गोयल, व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, अन्नदाता शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी देशात पहिल्यांदाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. युनोने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले. संपूर्ण जगासाठी सहकार ही आर्थिक व्यवस्थेची संकल्पना म्हणून पाहिले जाते. परंतु, भारतासाठी सहकार पारंपारिक जीवनशैलीत रुजलेले तत्वज्ञान आहे. एकत्र येणे, विचार करणे, काम करणे, समान ध्येयाकडे पुढे जाणे, आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, हा भारतीय सहकाराचा आत्मा आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘नॅशनल टॅक्सी’ या आगामी सहकारी उपक्रमात टॅक्सी चालक हेच वाहनाचे मालक असतील आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सहकाराच्या माध्यमातून महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, देश सहकाराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार हा प्रमुख आधारस्तंभ ठरेल, असेही केंद्रीय सहकार मंत्री शाह यांनी सांगितले.

‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहकारातून समृद्धीकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून राज्यात ‘पॅक्स’(प्राथमिक कृषी पतसंस्था) आणि ‘एफपीओ’(शेतकरी उत्पादक संस्था)च्या माध्यमातून विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ साखळी उपलब्ध होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट महाराष्ट्राने अधिक कार्यक्षमतेने पूर्ण केली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करताना महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक भूमी असूच शकत नाही.  महाराष्ट्राला १२० वर्षांची सहकाराची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. भविष्यातही केंद्र सरकारने ठरवलेली सर्व मानके पूर्ण करण्याचा निर्धार महाराष्ट्र करेल. देशात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी दिली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात नवकल्पनांचे पर्व सुरू झाले आहे. पॅक्स (प्राथमिक कृषी पतसंस्था), एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) यांच्या माध्यमातून सहकार गावागावात पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात नव्या आर्थिक संधी आणि रोजगारनिर्मितीस चालना मिळत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

धान्य, सोयाबीन आदी खरेदीत नाफेडने उत्तम कामगिरी केली आहे. परंतु, खरेदीच्या वेळी अनेकदा पोत्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात, यासंदर्भात नाफेडने योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

यावेळी ‘सहकार क्षेत्रातील नाफेडचे योगदान आणि सहकार चळवळीचे महत्त्व’ या विषयावर आधारित लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पाच पॅक्स संस्थांना ‘नाफेड बाजार’ फ्रँचायझी सुरू करण्यासाठी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच पाच एफपीओंना इक्विटी अनुदानाचा धनादेश देण्यात आला.

 पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७,  सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २,  सातारा २६.५,  सांगली ५.४,  कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८,  लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७,  परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.       पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे  चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

स्विस बँकेतील काळा पैसा तिपटीने वाढला:आता आपल्याला 15 ऐवजी 45 लाख मिळणार, अंजली दमानिया यांचा पंतप्रधान मोदींना टोला

मुंबई-स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशांत तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख रुपये मिळणार, असा उपरोधिक टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपला हाणला आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा आणून भारतातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा करण्याचे कथित आश्वासन दिले होते. या माध्यमातून त्यांनी परदेशात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पण कालांतराने त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी एका बातमीचा दाखला देत पीएम मोदींचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर उपरोक्त टीका केली आहे.

भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेला पैसा 2024 मध्ये तिपटीने वाढला. मग आता आपल्याला 15 लाखांऐवजी 45 लाख मिळणार. मोदींचे आणखी एक खोटे आश्वासन, असे अंजली दमानिया शुक्रवारी एक इंग्रजी बातमी पोस्ट करत म्हणाल्या.

काय आहे बातमीत?

अंजली दमानियांनी दाखला दिलेल्या बातमीत नमूद आहे की, 2024 मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिपटीने वाढून 3.5 अब्ज स्विस फ्रँक अर्थात 37,600 कोटींवर पोहोचला. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरूवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली. स्थानिक शाखा व अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा फुगला आहे, असे या बँकेने म्हटले आहे.

स्विस बँकेच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये स्विस बँकांतील भारतीय ग्राहकांच्या खात्यांतील रकमेत 11 टक्क्यांची (3,675 कोटी) वाढ झाली. यापूर्वीच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतीयांचा पैसा 70 टक्के घसरून केवळ 1.04 अब्ज स्विस फ्रँक एवढाच राहिला होता. हा 4 वर्षांचा नीचांक होता. तत्पूर्वी, 2021 मध्ये भारतीयांचे 3.83 अब्ज स्विस फ्रँक स्विस बँकांत पडून होते. हा 14 वर्षांचा उच्चांक ठरला होता. त्यानंतरचा सर्वाधिक पैसा 2024 साली भारतातून स्विस बँकांच्या खात्यांत पोहोचला होता.

महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात पाच आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई दि. 20 : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून उद्या, २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध पाच आर.जे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

उद्या, 21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे दुपारी 2.00 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण आशा भोसले, प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासह रेडिओ आणि गीत संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून प्रथमच अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होणार असून रेड एफएमचे आरजे सिद्धू, मॅजिक एफएमचे आरजे अक्की, रेडिओ सिटीच्या आरजे अर्चना, रेडिओ मिर्चीच्या आरजे प्रेरणा आणि बिग एफएमचे आरजे अभिलाष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाचे समन्वय हेनल मेहता करणार आहेत.

यावेळी प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात आली होती. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामुल्य आहे. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड.शेलार यांनी केले आहे.

स्वतःपेक्षा लहान व्यक्तीला पॉवरफुल म्हणणे हा शरद पवारांचा मोठेपणा – चंद्रकांत पाटील

पुणे-आगामी मनपा निवडणुकीत महाआघाडी म्हणून निवडणुकीस सामाेरे जाणार असून मुंबईत उद्धव ठाकरे हेच शक्तीशाली नेते असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिका करत सांगितले की, पवार यांना त्यांच्यापेक्षा आणखी काेणीतरी पाॅवरफुल आहे हे म्हणावे लागते. त्यांच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तीला पाॅवरफुल म्हणावे लागणे पवार यांचा मनाचा माेठेपणा आहे असेही म्हटले आहे.

हिंदी सक्तीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याची गरज नाही. त्यातील समाजकारण सुध्दा शाेधले पाहिजे. हिंदी ही एका अर्थाने शाळेत सक्तीची करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घरफाेडीचा आराेप केला त्याबाबत ते म्हणाले, अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून उत्तमरीतीने काम करत आहे. त्यांनी काेणाचे घर फाेडलेले नाही. लाेकशाहीमध्ये काेणी काेणाचे पक्षात जावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. काेणाला मानगुटीला पकडून आणण्यात आले नाही. दांडुका काेणाला दाखवला नाही. तुम्हाला तुमची माणसे टिकवता येत नाही अशीस्थिती आगामी मुंबई निवडणुकीत येणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार मिळणे कठीण हाेईल ..जर त्यांनी मनसेसाेबत युती केली तरच थाेड्याफार जागा येतील. 92 पैकी 75 नगरसेवक त्यांचे साेडून गेलेले आहे. आणखी चार महिने असून उर्वरित किती जातील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, काॅंग्रेसला साेबत घेऊन पाहिले परंतु अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे आता मनसेला साेबत घेऊन ते पाहत आहे. लाेकशहाीत समाेर चांगले विराेधक असले पाहिजे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी मे महिन्यात भरपूर पाऊस झाला आहे. मे महिन्यात वळवी पाऊस पडत असताना यंदा खूप माेठ्या प्रमाणात पाऊस पडला. ढगफुटी मध्ये कमी वेळेत अधिक पाऊस हाेत असल्याने ज्या नियमित सुविधा त्यावर ताण निर्माण हाेताे. पुण्यात पाऊसाचे पाणी वाहून नेणारी पाईपलाइनचे दिसत नाही त्यामुळे याबाबत मनपा आयुक्त यांना सूचना दिल्या आहे. राजकारणात कधी पूर्णविराम नसताे तर स्वल्पविराम असताे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रमास आज जाणार नव्हते परंतु गेले त्यामुळे राजकारणातून निवृत्त काेण हाेते असे म्हणणे याेग्य नाही.

टाळ मृदुंगाचा गजर अन ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात पालख्या पुण्यात दाखल

पुणे- विविध दिशांनी आलेल्या दिंड्या यांनी पुण्यातील वाहतूक ठप्प केली तरी पालखीच्या मार्गावर आणि दिंड्यांच्या स्वरात वर्षानुवर्षे जोपासून येणारा ओसंडून वाहणारा भक्तीभाव देखील आज पुण्यात पावसाच्या सरींसोबत बरसत राहिला . संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालख्यांचे आज मोठ्या भक्तिभावाने आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात स्वागत झाले.

आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रन त्याचबरोबर उपायुक्त परिमंडळ क्र.१ माधव जगताप, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम , मुख्य अभियंता (प्रकल्प) युवराज देशमुख आदींनी स्वागत केले. तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी केले. यावेळी उपायुक्त परिमंडळ क्र.२ अरविंद माळी, महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर आदींनी स्वागत केले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी सारथ्य केले. सर्व दिंड्यांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने जयत तयारी केलेली होती यामध्ये पाण्याचे टँकर, स्वच्छतागृह, त्याचबरोबर पालखी मार्गावरील स्वच्छता,आरोग्य सेवा इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली होती.

भेटीलागी जीवा लागलीसे आस!’ असा भाव मनात ठेवून, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि हरिनामाच्या जयघोषात पंढरीकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीसागर शुक्रवारी (दि.२०) पुण्यनगरीत दाखल झाला आहे.संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) देहूतून आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) आळंदीतून प्रस्थान झाले. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी सायंकाळी पुण्यात आले आहेत.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे. रविवारी (ता. २२) सकाळी या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील.

हिंदीची सक्ती नको, पण तिचा द्वेषही नको:मुंबईत उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक प्राबल्य- शरद पवार

पुणे-हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.महायुती सरकारने राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली होती. पण या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेत तिसरी भाषा पर्यायी असेल असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. शेवटी त्यांनी हवे ते करावे. पालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा.कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही. संपूर्ण देशातील लोकसंख्येपैकी जवळपास 55 ते 60 टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या प्रकरणी पत्रकारांनी शरद पवारांना छेडले असता त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी विषद केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवले नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यानुसार सामान्यतः 3 महिन्यांत निवडणूक लागेल.आमच्यात मुंबईत उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे तिथे एकत्र लढायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ. या प्रकरणी आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष एकत्र बसून चर्चा करू.

शरद पवारांनी यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बँक (पीडीसीसी) रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या मुद्यावरही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीवेळीही ही बँक रात्री उघडली होती. आज या बँकेत हे दुसऱ्यांदा घडत आहे. बँक उशिरापर्यंत सुरूच का होती? बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघेडल? एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसत आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा, असे शरद पवार म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विरोध धुडकावून लावला आहे. ते नुकतेच यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले होते, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की, दोनच भाषा असल्या पाहिजेत. तिसरी भाषा असू नये. मी त्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपीमध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे. देशभरात 3 भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी संपूर्ण देशासाठी आहे. तामिळनाडूने 3 भाषांच्या सूत्राला सु्प्रीम कोर्टात आव्हान दिले. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली.

आपल्या देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय आहे? आपल्या भाषेला डावलण्यात आले असेल तर वेगळी गोष्ट? पण आपली भाषा शिकत असताना आपली मुले दुसरी एखादी भाषा अजून शिकत असतील, तर त्या भाषेतील ज्ञानही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषेचा आग्रह चुकीचा आहे. एनईपी केंद्र सरकारने एकट्याने तयार केली नाही. देशभरातील तज्ज्ञांनी मिळून ती तयार केली. ती करत असताना मुलांचा मेंदू कसा विकसित होतो, आदी बाबींचा सखोल विचार करण्यात आला. हे धोरण तयार करताना 3 वर्षे चर्चा झाली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानंतर 3 भाषेचे सूत्र स्वीकारण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला: नाना पटोले

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?

मुंबई, दि. २० जून २०२५
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला.

मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

पुनर्रचित हवामानावर आधारीत फ़ळपिक विमायोजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

पुणे :- नैसर्गिक आपती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे तसेच नुकसानीच्या कठीण परीस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य बाधीत राखणे. या उद्देशाने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. ही योजना पुणे जिल्ह्यात मृग बहार सन 2025 अंतर्गत डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या 8 फळ पिकांसाठी राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेत सहभागी होण्याकरीता अथवा न होण्याकरीता घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बैंक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील, तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी 4 हे. मर्यादेपर्यंत आहे.

केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. पुणे जिल्हयासाठी कार्यान्वित विमा कंपनीचे नाव व पता- बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे, क्षेत्रिय कार्यालय, 4 था मजला, टॉवर नं. 07, कॉमर झोन आयटी पार्क, सम्राट अशोक पथ, येरवडा जेल रोड, पुणे 411006 व टोल फ्री क्र. 18002095959 तसेच ई-मेल bagichelp@bajajallianz.co.in असा आहे.
मृग बहार सन 2025 मध्ये फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे. 1) संत्रा, पेरु, लिंबू, द्राक्ष (क) 30 जून 2025 पर्यंत, 2) चिकू, मोसंबी 30 जून 2025 पर्यंत, 3) डाळिंब 14 जुलै 2025 पर्यंत, 4) सिताफळ 31 जुलै 2025 पर्यंत राहिल. मृग बहार सन 2025 या वर्षासाठी अधिसूचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी प्रमाणे निर्धारित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय होईल. मृग बहारातील फळपिकांच्या विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरु करण्यात आले आहे.
योजनेत सहभाग घेण्यासाठी Agristak नोंदणी, आधार कार्ड, बैंक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, जिओ टॅग फोटो, ई पीक पाहणी असणे 100% बंधनकारक आहे अन्यथा विमा प्रस्ताव रद्द केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. मृग बहरातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in पाहता येईल.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करून घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

१ ऑगस्ट रोजी सुपरनॅचरल थ्रिलर ‘होली घोस्ट’ प्रदर्शित करणार 

सिनेपोलिस इंडिया १ ऑगस्ट २०२५ रोजी बहुप्रतिक्षित अलौकिक रहस्यमय पवित्र आत्मा हा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात आणण्यासाठी सज्ज आहे. मुर्शिद फेम श्रवण तिवारी दिग्दर्शित आणि एसआर अँड एचपी फिल्म्सच्या बॅनरखाली संदीप पटेल निर्मित, हा चित्रपट एका रोमांचक सिनेमॅटिक अनुभवाचे आश्वासन देतो, ज्यामध्ये एका भयानक छोट्या शहरातील अमेरिकन पार्श्वभूमीवर भयपट आणि रहस्य यांचे मिश्रण आहे.

ऑगस्टा या एका दुर्गम शहरात घडणारी ‘होली घोस्ट’ ही कथा डिटेक्टिव्ह मॅडिसन वेल्सच्या मागे लागते जिथे ती अपहरण झालेल्या मुलीच्या चमत्कारिक परतीची चौकशी करते, ग्रेस ब्राउन, जी दावा करते की तिला एका पोलिस अधिकाऱ्याने वाचवले होते – ज्याचा मृत्यू एक वर्षापूर्वी झाला होता. वास्तव आणि अलौकिकतेमधील रेषा अस्पष्ट होत असताना, वेल्स एका त्रासदायक प्रकरणात अडकते ज्यामध्ये दडलेली रहस्ये, भूतकाळातील खून आणि एका भुताटक तारणहाराची – किंवा खुनीची उपस्थिती यांचा समावेश आहे.

भारतीय चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलताना, निर्माते संदीप पटेल म्हणाले की, भारतीय प्रेक्षक मनाला आव्हान देणाऱ्या आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी तयार आहेत असे मला वाटते. होली घोस्ट हा फक्त एक चित्रपट नाही, तर तो एक अनुभव आहे – जिथे भयपट मानवतेला भेटतो आणि विश्वासू, हुशार असतो आणि प्रेक्षकांना बोलायला भाग पाडतो.

जेन ऑस्बोर्न, माया एडलर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘होली घोस्ट’ या चित्रपटात क्लीव्ह लँगडेल, डेव्हिड टिफेन डॅनियल आणि आरोन ब्लॉमबर्ग यांच्याही भूमिका आहेत. जमाल स्कॉट यांच्या छायाचित्रण आणि रे यांच्या आकर्षक संगीतासह, ‘होली घोस्ट’ हा १०० मिनिटांचा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

चित्रपटाच्या भारतात रिलीजची जबाबदारी सिनेपोलिसने घेतली आहे, ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये व्यापक नाट्यप्रवास सुनिश्चित केला जातो. त्याच्या अनोख्या कथानकासह आणि भयानक वातावरणासह, होली घोस्ट या पावसाळ्यात आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट बनण्यास सज्ज आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि. 20 : भारत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्या कडून वर्ष 2025 करिता दिव्यांगजनांच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारांकरिता ऑनलॉईन माध्यमातून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्ष 2025 करिता दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरसकारांकरिता अर्ज, नामांकन सादर करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 जुलै 2025 पर्यंत सुरु आहे.
अर्ज नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awardsgov.in वर भरण्यात यावे. पुरस्काराकरिता 15 जुलै 2025 पर्यंत प्राप्त अर्ज , नामांकनावर विचार करण्यात येईल. अर्ज केलळ राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन सादर करावेत. नामांकनामध्ये पोअर्लवर प्रारुपमध्ये निर्दिष्ट सर्व प्रासंगिक विवरण समाविष्ट असावेत. ज्यामध्ये उल्लेखनीय आणि प्रेरक कामगिरींना स्पष्टपणे समाविष्ट करावेत तसेच कामगिरींशी संबंधित सहाय्यक दस्तऐवज सुध्दाअपलोउ करावेत. भौतिक स्वरुपात किंवा कोणत्याही अन्य स्वरुपात प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. पात्रता निकष आणि इतर विवराणाकरीता विभागाची वेबसाईट www.depwd.gov.in तसेच राष्ट्रीय पोर्टलवर उपलब्ध दिव्यांग व्यक्तिंच्या सशक्तीकरणाकरिता राष्ट्रीय पुरस्कारांकरिता दिशानिर्देश पाहू शकता. असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडीया प्रा.लि. विरुद्ध कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल …

पुणे-आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडीया प्रा.लि. विरुद्ध कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलिसांनी याबाबत आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यांनी सहा पोलीस निरीक्षक सागर जानराव आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडीया प्रा.लि. यांनी सन २०२२ ते सन २०२४ या कालावधीत लोकांचा विश्वास संपादन करुन, गुंतवणूक करण्यास भाग पाडुन गुंतविलेल्या रकमेवर ८ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवुन ४३ गुंतवणुकदारांची गुंतवणुकीची रक्कम रु ३.४८.९२.५२५ /- व त्यावरील परतावा परत न देता आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडीया प्रा.लि. यांनी आर्थिक फसवणूक केलेबाबत त्यांचेचिरुध्द बंडगार्डन पो.स्टे. येथे गु.र.नं.१५३/२०२५ भा.द.वि.कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सह एमपीआयडी कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहे.
नमुद गुन्हयातील ४३ गुंतवणूकदारांव्यतिरीक्त आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडीया प्रा.लि. मध्ये कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर येथे संपर्क साधावा.


सौर ऊर्जा पंप समस्या सोडवण्यासाठी महावितरणचा​ पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध​

मुंबई , २० जून २०२५ – राज्य विविध योजनांमध्ये बसविन्यात आलेल्या एकूण सौर कृषी पंपांची संख्या ५ लाख ६५ हजार चालू आहे असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे . आणखी पाच लाख सौर कृषी पंप बसविन्यात येणारा आहेत . सौर कृषी पंप बसवि त्यात्या काही बिघाड होण्याच्या तुकड्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकर घेतला असून इतर घरबसल्या फोनवरून अथवा ऑनलाइन तक्रार करतो येइल , अशी सुविधा उपलब्ध केली आहे . चौकोन या सुविधांचा लाभ घ्यावा , असे आवहान महावितरणचे अध्याक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यानी केले आहे .

मेडेकोर्सच्या शेवटीस वादळी वाऱ्यांची मूळे आणि मुसळधार पावसाळ्यात काही ठिकाणी सौर उर्जा तयार करण्यासाठी नुकसान झाले .​ अशा विविध समस्या सोडवण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे . सौर ऊर्जा पंप बसविण्याचे पंप , सौर ऊर्जा पंप चालत नसणे , पॅनेल्सची नासधूस होणे , सौर ऊर्जा संच काम होत नाही , पॅनेल्स किंवा पंप चोरी होणे किंवा पंपातून कमी होणे अशा विविध प्रकारचे लाभ घेऊ शकत नाहीत . सौर ऊर्जा पंप संचाचा विमा उतर उतरला आहे .

लाभार्थी महावितरणच्या टोल फ्रीवर फोन करून महावितरणच्या संबंधित वेबसाईटवर संधी नोंदणी करून किंवा संबंधित नंबरदार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करून नोंदवता येईल .​​​​ तक्रार नोंदविताना सौर पंपाचा लाभार्थी क्रमांक लिहिला तर शेतकरी आहे .​ शेतकरी आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहून करू शकतात . आपला जिल्हा तालुका , नावाचे गाव , अशी माहिती सांगता येईल .​

शेतात सौर कृषी पंप बसवि पाचवीच्या देखरेखीखालील मॉडेलशी संबंधित वर्षभर त्याची उमेदवार कंपनी आहे .​ दिवसाची नोंद नोंदविण्यामध्ये तीन समस्या निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे . सर्व मदतदारांना त्यांनी ज्या पंप बसवले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी सेवा केंद्रे उभारणे बंधनकारक आहे .​ ।​​​​​​​ प्रत्येकाच्या महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची निरीक्षणे .​​​​​​​​​​

अशी करा –

महावितरणच्या खाली बसविलेल्या सौर ऊर्जा पंपांविषयी काही माहिती असल्यास ती नोंदवता येईल –​​

१ . महावितरणचा टोल फ्री क्रमांक : १८०० – २३३ – ३४३५ आणि १८०० – २१२ – ३४३५

२ . मागेल त्याला सौर ऊर्जा पंपची वेबसाईट – https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY

३ . पेटदार वेबसाईट – विरंगणाच्या समोर येता येईल महावितरण वेबसाईटवर सर्व ४४ पक्षदार कंपनीची लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत .

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू

पुणे, दि. 20: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 24 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जुलै 2025 रोजी रात्रीच्या 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू केले आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी रोखण्याबरोबरच परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या 100 मीटर परिसरात इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना प्रवेश करण्याबरोबरच केंद्राच्या परिसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी किंवा कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू राहणार नाहीत.

परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स केंद्रे, ई-मेल, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसराचे 100 मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई असेल.

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षा, कायदेशीर, दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.