Home Blog Page 491

 वॅसकॉनमूर्ती स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे,सुमारे चार दशकांचा वारसा लाभलेल्या EPC आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील लिस्टेड नेतृत्व असलेल्या वॅसकॉनइंजिनीअर्स लि.ने कल्याणी नगर, पुणे येथील आपल्या वॅसकॉनमूर्ती स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन साजरा केला.

60 आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वॅसकॉनमूर्थी फाउंडेशनने गेल्या वर्षी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम सुरू केले. हे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समविचारी लोकांशी जोडण्यास मदत करते. सेवा आणि समाजबंधाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमाला सर्व सदस्य, पाठीराखे आणि हितचिंतकांनी आनंदाने हजेरी लावली.

वॅसकॉनमूर्थी स्नेहधामचा पहिला वर्धापन दिन सोहळा हा आनंद, सौहार्द आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने भरलेला एक हृदयस्पर्शी कार्यक्रम होता. प्रख्यात मराठी गायिका राजश्री ताम्हणकर यांनी त्यांच्या प्रतिभावान सहगायकांसोबत सादर केलेला कार्यक्रम हे या संध्याकाळचे खास आकर्षण. त्यांच्या भावपूर्ण स्वरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले, ज्यात श्रोते देखील रंगून गेले. हा कार्यक्रम गेल्या वर्षभरात वॅसकॉनमूर्थी स्नेहधामने ज्येष्ठांसाठी किती महत्त्वाचे आणि प्रेरणादायी काम केले आहे, याचा पुरावा होता. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समाजात राहण्याचा आनंद तर मिळालाच पण सारखेच वय असलेल्या वृद्धांचा सहवास आणि पाठिंबा मिळाला. या कार्यक्रमाची सांगता टाळ्यांच्या गजरात झाली आणि आगामी वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याच्या नवीन वचनबद्धतेने आणि ऊर्जेने संध्याकाळची सांगता झाली.

यावेळी वॅसकॉनग्रुपच्या रम्या मूर्ती आणि स्नेहधामच्या संस्थापक डॉ. सविता नाईकनवरे यांनी समाजाकडून मिळालेला पाठिंबा तसेच पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. नाईकनवरे म्हणाल्या, “हा प्रवास अतुलनीय आहे. केवळ एका वर्षातआम्ही अनेकांचे जीवन स्नेहाने उजळून टाकले. वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम हे ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी समर्पित आहे. या माध्यमातून वृद्धांना समृद्ध सामाजिकवैचारिक आयुष्य उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.

वॅसकॉनइंजिनीअर्स लिमिटेडचे अध्यक्ष एमेरिटस श्रीआरवासुदेवन पुढे म्हणाले: “समाजातील ज्येष्ठांसाठी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम आनंद देणारा आणि काळजी घेणारा बनला आहेहे पाहून मला खूप आनंद होतोहे केंद्र केवळ मजामस्करी करण्याचे ठिकाण नाही तर एक अशी संस्था आहेजिथे आपल्या ज्येष्ठांना आनंदसहवास आणि काळजी मिळतेआमच्या सर्व सदस्यांना हे घरच वाटेलअशी जागा निर्माण करण्याचा आमचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

60 आणि त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वॅसकॉनइंजिनीअर्सचा सीएसआर उपक्रम वॅसकॉनमूर्थी फाउंडेशनने गेल्या वर्षी वॅसकॉनमूर्थी स्नेहधाम सुरू केले. 58 नोंदणीकृत सदस्यांसह, हा उपक्रम मनोरंजन आणि आरोग्यसेवा मार्गदर्शनाचे एक अनोखे मिश्रण देते, ज्यामुळे परस्परांची सवय होतानाच एकीची भावना, समाज भावना वाढीस लागते. कला आणि संगीत वर्ग, ज्येष्ठांसाठी तयार केलेले फिटनेस कार्यक्रम, व्होकल आणि कराओके परफॉर्मन्स, फेस्टिव्हल सेलिब्रेशन आणि मूव्ही स्क्रीनिंग यांसारख्या पर्यायांसह विविध अनोख्या गोष्टींमध्ये सदस्य सहभागी होतात. चेअर योगा आणि डान्स थेरपी यांसारख्या वेलनेस ॲक्टिव्हिटी शारीरिक आणि भावनिक सक्रियता वाढवतात तर नृत्य परफॉर्मन्स, स्टोन पेंटिंग कार्यशाळा आणि नॉस्टॅल्जिक बायोस्कोप सत्रे असे सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहधामच्या समृद्ध अनुभवांमध्ये सर्जनशीलता जोडतात.

‘हे सुरांनो चंद्र व्हा’ संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न.

पुणे-९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना अंतर्गत सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर निंबाळकरवाडी शाळेचा, कात्रज येथील सरहद संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये भावगीत, गवळण, नाट्य गीत, अभंग, लावणी या गीत प्रकारांनी नटलेला *हे *सुरांनो चंद्र व्हा** हा संगीतमय कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या मुख्य गायिका सौ .मनिषा वाडेकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.हे सुरांनो चंद्र व्हा या शिर्षक गीताने वातावरण संगीतमय झाले.सहगायक अशोक लांडगे ,मोना भोरे, सुदाम कुंभार, अर्पिता कठाळे, इरा देशपांडे, राजू चांदगुडे यांनी विविध प्रकारची भक्तिगीते , भावगीते, गवळण व युगल गीते सादर केली. रोहित ठाकूर व आदेश जाधव यांची तबल्याची जुगलबंदी रसिकांना आवडली..या अप्रतिम संगीताच्या मेजवानीने व गायकांच्या बहारदार सादरीकरणाने स्वरसाज चढविला. हा स्वर मनात रुंजी घालून गेला. वाद्यवृंदांमध्ये संगीतकार अजय कांबळे व अनिकेत नलावडे यांनी की बोर्ड, राजू चांदगुडे यांनी हार्मोनियम, रोहित ठाकूर व आदेश जाधव यांनी तबला साथसंगत केली. प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सरहद संस्थेने साहित्य संमेलनाचा आयोजक पद स्वीकारल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले, तसेच भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या . कर्तव्य दक्षतेची भूमिका पार पाडत असताना व्यस्त जीवनशैलीत आज सुरेल गीतांनी मन प्रफुल्लित झाले असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी गोपाळ कांबळे, संस्थापक स्वरगंधार, पुणे, तसेच धनंजय पुरकर संचालक डीएसपी प्रोडक्शन व संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर , अनुज नहार, अभय नहार, शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नलावडे, प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सचिव सुषमा नहार यांनी मार्गदर्शन केले. निवेदन शितल सदामते व श्रीराज भोर यांनी केले .माऊली माऊली या सामूहिक गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी व निसर्गास बाधक बाबी दूर करा.”- डॉ. मेधा कुलकर्णी.

पुणे: पुण्यातील नदी सुधार योजनेच्या 44 किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहाणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित केली होती. मनपा आयुक्त, श्री. राजेंद्र भोसले यांच्यासह मनपा अधिकारी, जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून 44 किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे 4700 कोटी रुपये निधी आवश्यक आहे.
या कामाचा एकंदरीत DPR झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे व 200 वर्षांचे जुनी वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री, श्री. सी. आर. पाटील यांच्याकडे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

या व्यतिरिक्त ज्या स्ट्रेच मध्ये अद्याप काम चालू नाही व सर्वे करून झाडांवर क्रमांक टाकले आहेत. भराव टाकण्याबाबत DPR तयार होत आहेत अशा स्ट्रेचेस मधील कामे त्वरित थांबवावीत. यासाठी जीवित नदी सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

या अनुषंगाने ही जागा पहाणी आयोजित केली होती. राम नदी, मुळा नदी संगम औंध येथे राम नदीवरील भराव टाकणे, मुळा नदीपात्रात 300 ट्रक राडारोडा टाकणे, झाडांवर क्रमांक टाकणे, PCMC हद्दीत भराव टाकण्याचे कंत्राटद्वारामार्फत चालू असलेली काम अशा बाब उघड झाल्या.
” नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नयेत असा आमचा आग्रह आहे.” असे डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. यासंदर्भात नजीकच्या काळात विभागीय आयुक्त डॉ. महेश पुलकुंडवार यांच्याकडे PMC व PCMC च्या आयुक्तांसह व पर्यावरण स्नेही संस्थांना घेऊन बैठक आयोजित करणार असून तोवर चालू काम थांबवण्यात आल्याचे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात PCMC आयुक्त श्री. शेखर सिंग यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली .

नदीपात्रात भराव टाकल्याने नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मिती अडथळे व पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक रहिवासी संस्थांमध्ये पाणी शिरते व जीवनमान विस्कळीत होते. नदीला नैसर्गिक सुंदरता आवश्यक असून भराव सारख्या अनैसर्गिक गोष्टींची बाधा, वृक्षतोड, पक्षांच्या अधिवासाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

यावेळी पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, पर्यावरण विभाग प्रमुख श्री. संजय शिंदे, पर्यावरण अधिकारी श्री. मंगेश दिघे, प्रकल्प विभागचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप. अभियंता मुकुंद शिंदे, महापालिका परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री. अविनाश संकपाळ, प्रकल्प सल्लागार एचपीसी यांचेकडून अर्चना कोठारी, अरबाज, औंध क्षेत्रीय कार्यालय सहा आयुक्त गिरीश दापकेकर, पुढे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे रिव्हर रिव्हावल समूहाकडुन श्रीमती शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, मुकुंद मालवणकर व इतर (जीवीतनदी), रुपेश केसेकर, चैतन्य केट, मेघना भंडारी (पुणे संवाद), ऍड. अमेय जगताप, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, ऍड पी. डी. तारे (बाणेर बालवाडी नागरिक मंच), वेताळ टेकडी बचाव समिती प्राजक्ता पणशीकर, पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.

विमानतळ सल्लागार समितीत पाच जणांच्या नियुक्त्या !

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विमानतळ प्राधिकरणाकडे पाच नावे सुपूर्द

पुणे :
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सल्लागार समिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाच जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात सुधीर मेहता, अभिजीत पवार, अखिलेश जोशी, अमित परांजपे आणि अनिल टिंगरे यांचा समावेश आहे. मोहोळ यांनी खासदार या नात्याने या सर्वांची नावे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कळवली होती.

विमानतळावरील सेवा आणि सुविधा या प्रवासी केंद्रीत असाव्यात या उद्देशाने विमानतळ सल्लागार समिती कार्यरत असते. केंद्रीय मंत्री मोहोळ यांना या समितीसाठी पाच नावे सुचवण्याचा अधिकार असून या अधिकाराद्वारे मोहोळ यांनी ही नावे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालकांकडे सुपूर्द केली आहेत.

या निवडीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारे अमित परांजपे म्हणाले, पुणे विमानतळावर सोईसुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून येत्या वर्षभरात धावपट्टीचा विस्तारही होत आहे. या पार्श्वभूमीवर या समितीत काम करण्याची संधी मिळणे निश्चितच महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या समितीत कार्यरत राहणार असून ही संधी दिल्याबद्दल मोहोळ यांचे मनःपूर्वक धन्यवाद

पुणे बांबू महोत्सव-चा प्रारंभ

बांबूत उद्योगक्रांती घडवण्याची क्षमताअजित ठाकूर

पुणे: “पुणे बांबू फेस्टिव्हल हा केवळ उत्सव नाही; तर तो हरित आणि शाश्वत भविष्याकडे एक पाऊल आहे. बांबूमध्ये उद्योगांमध्ये क्रांती घडवण्याची आणि समाज सशक्त करण्याची क्षमता आहे,” असे विचार बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे संचालक अजित ठाकूर यांनी मांडले. 

स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे बहुप्रतीक्षित पुणे बांबू महोत्सव २०२५ च्या तिसऱ्या हंगामाचे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. महाराष्ट्र चॅप्टरच्या बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने व येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित हा ‘ग्रीन गोल्ड’ महोत्सव २३ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान रोज सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत पुणेकरांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे. 

या प्रदर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या प्रथम दोन प्रेक्षक नवनीता क्रिश्नन व विकी बारवकर यांच्या हस्ते फित कापून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी, बोलताना एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ डिजाईनचे संचालक डाॅ.नचिकेत ठाकूर म्हणाले, बांबू, ज्याला ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखले जाते, जगातील सर्वात वेगाने वाढणारी गवत आहे आणि टिकाव व बहुउपयोगीपणाचे प्रतीक आहे. कचरा शून्य तत्त्वावर आधारित बांबूचा उपयोग बांधकाम, हस्तकला, पर्यावरण संरक्षण आणि खाद्यपदार्थांमध्ये देखील होतो. बांबूच्या याच उपयोगीता लक्षात घेवून नवकल्पानांना प्रोत्साहित करण्यासाठी व बांबू विश्वाची लोकांना अनूभूती घडविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

इंटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन
या महोत्सवात नेहरू सायन्स सेंटर, मुंबईतर्फे एक इंटरएक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे हे प्रदर्शन विज्ञान व टिकाव या संकल्पनांवर आधारित शैक्षणिक आणि मनोरंजक माहिती देईल.

महोत्सवाची वैशिष्ट्ये
या फेस्टिव्हलमध्ये बांबूच्या विविध उपयोगांवर आधारित कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • बांबू बांधकाम आणि डिझाइन: अभिनव बांबू आर्किटेक्चरचे प्रदर्शन.
  • हस्तकला प्रदर्शन: सुंदर बांबू कलाकृतींचा संग्रह.
  • उत्पादन विक्री: योगा वियर, इनरवियर यांसारखे अनोखे बांबू उत्पादने.
  • बांबू लागवड आणि प्रक्रिया: बांबू उगवण्याचे व प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन.
  • बांबू यंत्रसामग्री: बांबू उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे प्रात्यक्षिक.
  • सक्षमीकरण कार्यक्रम: महिलांसाठी आणि युवकांसाठी बांबू उपक्रमांद्वारे उद्योजकतेची संधी.

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून काऱ्हाटीच्या संरपच दिपाली लोणकर निमंत्रित

भूजल व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणा निमंत्ऱ्यारण सहा ‘वॉटर वारियर्स’ना

पुणे, दि. २३: अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी दिली आहे. यात बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या सरपंच दिपाली लोणकर यांचाही समावेश आहे.

राज्यातून दिपाली लोणकर, काऱ्हाटी (पुणे), सुधार मानकर, जरुडी, ता. वरुड (अमरावती), अमोल काटकर, किरकसाल, ता. माण (सातारा), सुनील गरड, खेड (धाराशिव), छायाताई कोळेकर, नानगोले, ता. कवठे महांकाल (सांगली) आणि शीतल झुंजारे, हरांगूल (लातूर) या वॉटर वारियर्सना दिल्ली येथे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्तादिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमाकरीता ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनपद्धतीने ग्रामस्थांनी एकजुटीने कामे करुन दुष्काळग्रस्त ते आदर्श पाणीदार गाव अशी गावाची ओळख निर्माण केली आहे. योजनेच्या प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून गावच्या परिसरात रिचार्ज शॉफ्ट, मल्चिंग, स्प्रिंकलर, शेडनेट, पॉलीहाउॅस आदी पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यात आल्या. गावातील पाण्याबाबत ‘जलसुरक्षा आराखडा’ तयार करण्यात आला.

जलसाक्षरतेबाबत कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती करण्यात आली. पर्जन्यमापक यंत्र, पिजो मीटर, वॉटर फ्लो मीटर, पाणी पातळी मोजण्यासाठी वॉटर इंडिकेटर यंत्र लावण्यात आले आहेत. भूजल माहिती केंद्र स्थापन करुन पाणी बचतीबाबत माहिती देण्यात आली. जलसंधारणाची विविध कामे करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शिवारात जिरविण्यात यश आले. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला मिळाले आहेत, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे.

दिपाली योगेश लोणकर, सरपंच, काऱ्हाटी: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदावर काम करताना गावाला अटल भूजल योजनेतून दीड कोटी बक्षीस स्वीकारण्याचा मान मला मिळाला. गावाने पाण्यासाठी दिलेला आजपर्यंतचा लढा यशस्वी झाला असून त्याचे श्रेय मी माझ्या गावकऱ्यांना देते. या कामाची दखल भारत सरकारने घेतली असून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण मिळाले आहे. ही माझ्यासह ग्रामस्थाकरीता खूप मोठी उपलब्धी आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, अटल भूजल पथक, बारामती एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पाणी फाऊंडेशन, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

इस्त्राईल येथील रोजगाराच्या संधींबाबत २४ जानेवारी रोजी शिबाराचे आयोजन

पुणे, दि. २३: कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्राईल देशात ‘घरगुती सहायक’ या पदाकरीता रोजगाराची संधी उपलब्ध आहे: इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली आहे.

या शिबीरात उमेदवारांना इस्राईल येथील आरोग्य क्षेत्रातील संधींबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या अर्जाबाबत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार संधींचा लाभ घेण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामध्ये आयोजित कॅम्पमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.

रोजगार संधींचा लाभ घेण्याकरीता २५ ते ४५ वयोगटातील इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे उमेदवार पात्र असून यासोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे मान्यता प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम / जीएनएम / बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान ३ वर्षे वैध असणारा पासपोर्ट असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा/तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या काम करत असू नयेत किंवा इस्राईल देशाचे रहिवासी नसावेत.

अधिक माहितीकरीता https://maharashtrainternational.com या या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हयातील वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग महाविद्यालये व संबंधित संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन अधिकाधिक उमेदवारांपर्यंत या शिबीरास उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले आहे.

ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन तर्फे चंद्रकांतदादांचा सत्कार

पुणे-ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कलाकार हे सातत्याने प्रयत्नशील असतात. ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन ही कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते, त्यामुळे अशा संस्थेला माझे नेहमीच सहकार्य असते, अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र
यांचे कार्याध्यक्ष अविनाश खेडकर, अध्यक्ष योगेश सुपेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष गणेश गायकवाड सचिव गणेश मोरे, खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझीरे, संचालक सोमनाथ फाटके प्रमुख सल्लागार संदीप पाटील, विशेष सल्लागार अभय गोखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा-नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुणे-

कोथरुड मधील सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अलंकार पोलीस स्थानकात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश दिले.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल पठारे आणि अलंकार पोलीस चौकीच्या निरिक्षक सुमिता रोकडे यांनी आरोपींची ओळख पटली असून, तपास शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

त्यावर नामदार पाटील यांनी तपासाची गती वाढवा, आणि चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश दिले. तसेच, भविष्यात ही अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

जेवढी नजाकत उर्दू भाषेत त्यापेक्षा जास्त गोडी मराठी भाषेत

ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांचे मत :  राजन लाखे लिखित ‘गझलायन’ या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा
पुणे : कविता ही गृहिणी असेल तर गझल ही सम्राज्ञी असते. कविता लिहिणे सोपे आहे, परंतु गझल लिहिणे तितके सोपे नाही. गझलेने मराठी साहित्यासाठी मोठे काम केले आहे. परंतु अनेकदा तिला परका काव्यप्रकार असे म्हटले जाते. उर्दू साहित्यात गझल हा मुख्य लिहिण्याचा प्रकार आहे. उर्दू गझलेला मोठी परंपरा आहे. ती चटकन भावते तशीच मराठी गझल देखील भावायला पाहिजे. मराठी गझल एक दिवस विश्वावर सावली धरेल. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे. असे मत ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य व कला मंडळ आयोजित आणि ज्ञानगंगा प्रकाशन पुणे प्रकाशित राजन लाखे लिखित ‘गझलायन’ या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, ज्येष्ठ गझलकार अविनाश सांगोलेकर, हिमांशू कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, लेखक राजन लाखे उपस्थित होते.

ए.के. शेख म्हणाले, चित्रपटांमुळे गझल घराघरात पोहोचली. येत्या काळात गझल सादर करण्याचे प्रमाण वाढायला हवे. ती वाटचाल राजन लाखे यांनी सुरू केली आहे. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे. 
न.म. जोशी म्हणाले, गझल करणाऱ्या नवीन पिढीला ज्येष्ठ गझलकारांनी परखड मार्गदर्शन करायला हवे. योग्य मार्गदर्शन केले तरच रसिकांसाठी चांगल्या गझलांची निर्मिती होईल.

हिमांशू कुलकर्णी म्हणाले, गझलकार व्याकरणात अडकून पडला, तर गझल लिहिता येत नाही. मनातून व्यक्त होणे म्हणजे गझल आहे. जर तुम्ही डोळ्यांनी ऐकले आणि कानांनी पाहिले तर तुम्ही कविता करू शकाल. गझल ही मनाच्या गाभ्यातून उमटलेली भावना असते.
राजन लाखे म्हणाले, प्रेम हे कविता आणि गझल या दोन्ही मध्ये असते. प्रेमामध्ये हिशोब ठेऊन चालत नाही कवितेमध्ये कधी हिशोब असतो तर कधी नाही. परंतु, गझल ला हिशोब ठेवल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. तो हिशोब शुद्धलेखन आणि मात्रांचा असतो, असे सांगत लाखे गझलेचे तंत्र स्पष्ट केले. 

कुमार करंदीकर, दयानंद घोटकर, गीतांजली जेधे, आशुतोष सुरजुसे, हेमंत साने, यांनी कार्यक्रमात गझल गायन केले. अनिल गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. रिचा राजन यांनी स्वागत गीत सादर केले.

उद्याचा भारत बालमित्रांचा; जगाला हेवा वाटेल अशी प्रगती करा : सूर्यकांत सराफ

चाळकवाडी येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

पुणे : सोन्यासारख्या मुलांना घडविण्याचे काम मला आवडते. लहान मुलांना घडविण्यासाठी मोठ्यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. उद्याचा भारत बालमित्रांचा आहे. साऱ्या जगाने हेवा करावा, अशी प्रगती तुम्ही साधणार आहात. या करीता तुमचे पालक, गुरुजन तुम्हाला मदत करतील. त्याचप्रमाणे आम्हा सारस्वतांचीही तुम्हाला मदत होणार आहे. अशा काळात हातातला मोबाईल बाजूला ठेवून बिघडत चाललेल्या जगाचे निरीक्षण करा. या कठीण काळावर मात करण्यासाठी संवादरूपी शस्त्राचा वापर करा. संवाद ही तुमच्या बदलत्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आवडलेली गोष्ट, कविता, प्रसंग तुम्ही इतरांना वाचून दाखविता त्यावेळी संवाद सुरू होतो आणि या संवादातूनच संभाषण सुरू होते. त्यातून सामाजिक स्थिरता साध्य होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेनलाचे अध्यक्ष सूर्यकांत सराफ यांनी केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 23) सायंकाळी सराफ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त-कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, संमेलन संयोजक शिवाजी चाळक, निमंत्रक शरद लेंडे, अशोक सातपुते, पिंपळवंडीच्या सरपंच मेघा काकडे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, संस्था सचिव गजानन चाळक, बाळासाहेब काकडे, महादेव वाघ, प्रवीण वायचळ, विकास माथारे आदी उपस्थित होते. कविवर्य ग. ह. पाटील यांचे नाव बालसाहित्य नगरीस देण्यात आले असून मातोश्री अलकामाई भिमाजी सोनवणे सभामंडापत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि ग. ह. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात साहित्यिक व शिक्षकांच्या प्रतिभेचा लागणार कस

अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यकांत सराफ म्हणाले, आजच्या काळात मराठी बालसाहित्यिकांसमोर वेगाने बलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आव्हान वाढत चालले आहे. तंत्रज्ञानाची ही अफाट गती मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करत आहे. वर्तमान पिढीतील या अफाट बुद्धीमान मुलांना साहित्यकृती देताना साहित्यिकांच्या प्रतिभेचा कस लागणार आहे. ज्ञान आणि रंजन देणारे शिक्षक आणि साहित्यिक यांची सध्या परीक्षा सुरू असून एक कळ दाबली की ज्ञानाचे विश्व दर्शविणारा गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर हवी तशी गोष्ट किंवा कविता लिहून देणारा चॅट जीपीटी शिक्षकांची आणि साहित्यिकांची केव्हाही जागा घेऊ शकतो. त्यामुळे सावध असणे गरजेच आहे.

प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. माधव राजगुरू यांनी सूर्यकांत सराफ यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली.
शिवांजली विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी ग. ह. पाटील यांनी रचलेले ‌‘देवा तुझे किती सुंदर आकाश‌’ हे स्वागतगीत सादर केले तर सुनील जगताप यांनी शिवाजी चाळक यांची नाणेघाटातील ‌‘मराठीचे येथे सापडते मूळ‌’ ही कविता प्रभावीपणे सादर केली. संदीप वाघोले यांनी सूत्रसंचालन केले तर शरद लेंडे यांनी आभार मानले.
साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्त कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‌‘साने गुरुजींच्या गोष्टी‌’ या पुस्तकाचे वाटप केले.
बाल साहित्यविश्वातील 14 रत्ने
संमेलनस्थळी 14 बालसाहित्यिक रत्नांची ओळख प्रदर्शनीद्वारे करून देण्यात आली आहे. यात साने गुरुजी, भा. रा. भागवत, लीलावती भागवत, राज मंगळवेढेकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगांवकर, सुधाकर प्रभू, प्रा. अनंत भावे, डॉ. अनिल अवचट, दिलीप प्रभावळकर, भारत सासणे, राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, दासू वैद्य यांचा समावेश आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरीत सोडवा-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : सातव्या वेतन आयोगाचा फरक पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मिळावा, वारसा हक्काने नोकऱ्या मिळाव्यात आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रितो पाल यांना दिले.

काँग्रेस पक्षाच्या या शिष्टमंडळात माजी नगरसेवक अविनाश बागवे, अनिता मकवाना, चंद्रकांत चव्हाण, प्रविण करपे, सुरेश कांबळे यांचा समावेश होता.

कॅन्टोन्मेंट बोर्डात कायमस्वरूपी सेवेत ३५० आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले २०० कर्मचारी सेवेत आहेत. यातील कायमस्वरूपी सेवेतील काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले असून, काहीजण सेविनिवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या ७२ वारसांनी वारसा हक्काने बोर्डात नोकरी मिळावी यासाठी आवश्यक ती वैद्यकीय प्रमाणपत्रे, कागदपत्रे बोर्डाकडे सादर केली आहेत. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. तरी वारसाहक्काने त्या ७२ जणांना बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मोहन जोशी यांनी निवेदनात केली आहे.

कंत्राटी पद्धतीच्या सेवकांना नियमित मासिक वेतन मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्या तक्रारी दूर व्हाव्यात, सात, आठ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांची नेमणूक कायमस्वरूपी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू केला जात नाही. ही तफावत दूर केली जावी. याबाबतचा निर्णय तातडीने व्हावा. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

कामगारांना न्याय देऊ अधिकाऱ्यांचे आश्वासन

शिष्टमंडळाने सुचविलेल्या मागण्यांंनुसार कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊ, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी पाल यांनी दिले.

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्राला व भारताच्या राजकारणात ऐतिहासिक योगदान – नीलम गोर्हेंचे अभिवादन

मुंबई- आज हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे आमच्या आयुष्याला कलाटणारी देणारा हा दिवस आहे. शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धैर्य आणि धाडस दाखवत ते हिंदुत्वावर शिवसेनेला घेऊन आले बाळासाहेब असते तर आज शिंदेंची पाठ थोपटली असती असे विधान विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती दिनी आज कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपसभापती नीलमताई गो-हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिक्षण मंत्री दादा भुसे,आयुष्य मंत्रालय मंत्री प्रतापराव जाधव शिवसेना नेते आनंदराव अडसूळ,दिपक सावंत व इतर शिवसेना नेते उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला नवसंजीवनी दिली.बाळसाहेबांनी हिंदुत्वासाठी त्याग केला .ज्यांना शिवसेनेत यायचं आहे ते आनंदाने आणि प्रेमाने आमच्याकडे येतील.काही समाजकंटक घुसखोरी करत आहेत बोगस आधारकार्ड तयार करत विकृती करत आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला हवी असे नीलम गो-हे म्हणाल्या आहेत.

ठाकरेंचे 4 आमदार, 3 खासदार लवकरच शिंदे गटात:उद्या रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल-म्हणाले उदय सामंत

मुंबई-ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्या या पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश रोखून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार तसेच काँग्रेसचे 5 आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार असून रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीनंतर कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. सांगलीतून सातारा आणि साताऱ्यातून पुण्यात, असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे, असे आव्हानही उदय सामंत यांनी विरोधकांना केले आहे. पुढील तीन महिन्यांत हे सगळे आमच्या पक्षात येतील. दररोज एक ब्रेकिंग न्यूज मिळेल, हा शब्द आहे, असेही ते म्हणाले.

उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातील 20 आमदार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही नेते बालिश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता न बोलले बरे, मी त्यांच्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करत आहेत. हा माझा मोठेपणा आहे. असल्या बालीशपणाने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दरी निर्माण होणार नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा मोठ्ठा प्रतिसाद!

  • तक्रारींचे प्रशासनामार्फत तात्काळ निवारण
  • कल्याणकारी सर्व योजनांची एकाच ठिकाणी महिती

पुणे – लोकप्रतिनिधी हा नागरिकांच्या तक्रारी सोडवणे इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्याने नागरिकांना भेटून त्यांची मत जाणून घ्यावीत अणि यातून नागरिकांशी संवाद कायम ठेवावा ही सर्वसामान्यांची अपक्षा असते. हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच पुण्यात दर महिन्याला “खासदार जनसंपर्क सेवा अभियान राबवण्यात येत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या या अभियाना पुणेकरांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवाजीनगर मतदारसंघात झालेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानात अधोरेखीत झाले.

पुणेकरांनी आपला खासदार म्हणून मोहोळ यांची भरघोस मताधिक्याने निवड केली. त्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियान सुरू करण्यात आले. यात खासदार मोहोळ यांच्यासह मतदारसंघाचे आमदार, माजी नगरसेवक असे स्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतात.याची सुरूवात कोथरूड मतदारसंघातून झाली. आतापर्यंत कोथरूडसह कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. हा कार्यालय तास-दोनतासांचा कार्यक्रम असणार या समजुतीला सुरूवातीपासून छेद दिला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच ते सहा तास म्हणजे अखेरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याचे समाधान करूनच कार्यक्रमाची सांगता प्रत्येक मतदार संघात झाली.

या ठिकाणी महानगरपालिका, राज्य शासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांच्या तक्रारी किंवा सूचना खासदार पहिल्यांदा ऐकून, त्यावर त्यांना योग्य अधिकाऱ्याकडे पाठवतात. तक्रारीचा निपटारा जागेवरच करण्यावर त्यांचा भर असतो. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांची महिती तेथे उपस्थित राहणार असलेले भाजपचे कार्यकर्ते करून देत नागरिकांकडून अर्ज भरून घेतात. सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना करण्यासाठी कार्यकर्ते राबत असतात.

नागरिकांच्या चहा, पाणी, नाष्टा किंवा जेवण याचीही काळजी अभियानस्थळी घेतलेली असते. या अभियानात केवळ तक्रारी सोडवल्या जात नाहीत तर नागरिकांचे कोणत्याही सार्वजनिक हिताच्या सूचना, संकल्पना ऐकून घेतल्या जातात. त्याची लिखीत नोंद घेतली जाते. चांगल्या संकल्पना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी नागरिकां इथे दिली जाते. तसेच प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी दिली जाते. शासनाच्या कामाचीही महिती देण्याचा संधी या अभियानात मिळते. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर केले जातात.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाबद्दल खासदार मोहोळ म्हणाले की, ‘हे अभियान प्रामुख्याने मतदारांशी संवाद साधण्यासाठीचे अभियान आहे. प्रत्यक्ष अभियानावेळी जे करता ते कार्यालयात बसूनही करणे शक्य होते. पण एकाच वेळी संपूर्ण मतदार संघातून नागरिक आले तर प्रत्येकाला फार वेळ देता येत नाही. म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथे नागरिकांशी संवाद साधण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांची संख्या मर्यादित राहते आणि आलेल्या प्रत्येकाशी बोलताही येते.

‘प्रशासन व नागरिक आमनेसामने असल्याने तक्रारींचा लवकर निपटारा जागीच करता येतो. यातून नागरिकांना मिळणारे समाधान आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी जास्त महत्वाचे आहे. आमचे लोकप्रतिनिधी भेटतच नाहीत या तक्रारीची संधी देऊ इच्छित नाही. या निमित्ताने कार्यकर्त्याशीही बोलता येते. शासन व प्रशासनाबद्दल नागरिकांच्या भावना समजतात. त्याचा उपयोग पक्षसंघटनेलाही होतो असा अनुभव आहे’, असेही मोहोळ म्हणाले