Home Blog Page 488

मनोहर जोशी,पंकज उधास,शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार

मुंबई: केंद्र सरकारने शनिवारी (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. याद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला आहे.
या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी एकूण १३९ जणांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. तर, ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, या १३९ दिग्गजांच्या यादीत महाराष्ट्रातील १४ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण व ११ दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. तसेच शैली होळकर, डॉ.नीरजा भाटला, भीमसिंह भावेश, थविल वादक पी.दत्चनमूर्ती, शेखा एजे अल सबा, एल हँगथिंग, भैरूसिंग चौहान, जगदीश जोशीला, सेनानी लिबिया लोबो सरदेसाई, हरविंदर सिंग यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार
पद्मभूषण

  1. मनोहर जोशी – मरणोत्तर
  2. ⁠पंकज उधास – मरणोत्तर
  3. ⁠शेखर कपूर (कला)
    ११ जणांना पद्मश्री पुरस्कार

पद्मश्री

  1. अच्युत पालव (कला)
  2. ⁠अरुंधती भट्टाचार्य (व्यापार आणि उद्योग)
  3. ⁠अशोक सराफ (कला)
  4. ⁠अश्विनी भिडे देशपांडे (कला)
  5. ⁠चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
  6. ⁠जसपिंदर नरुला (समाजसेवा)
  7. ⁠अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
  8. ⁠राजेंद्र मुजुमदार (कला)
  9. ⁠सुभाष शर्मा (कृषी)
  10. ⁠वासुदेव कामत (कला)
  11. ⁠डॉ. विलास डांगरे (औषधी)
    113 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

अद्वैत चरण गडनायक (कला)
अच्यूत रामचंद्र पालव (कला)
अजय भट्ट (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अनिल बोरो (साहित्य आणि शिक्षण)
अरिजित सिंह (कला)
अरुंधती भट्टाचार्या (व्यापार आणि उद्योग)
अरुणोदय साहा (साहित्य आणि शिक्षण)
अरविंद शर्मा (साहित्य आणि शिक्षण)
अशोक महापात्रा (वैद्यकीय)
अशोक सराफ (कला)
अशुतोष शर्मा (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
अश्विनी भिडे देशपांडे (कला)
बैजनाथ महाराज (अन्य)
बॅरी गॉडफ्रे जॉन (कला)
बेगम बाटोल (कला)
भारत गुप्त (कला)
भेरू सिंह चौहान (कला)
भीम सिंह भावेश (समाजकार्य)
भिमाव्वा शिल्लेकयाथारा (कला)
बुधेंद्रा कुमार जैन (वैद्यकीय)
सी एस वैद्यनाथ (सार्वजनिक व्यवहार)
चैतराम देवचंद पवार (समाजकार्य)
चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)
चंद्रकांत सोमपुरा (अन्य)
चेतन चिटणीस (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
डेव्हिड सैयामलीह (साहित्य आणि शिक्षण)
दुर्गा चरण रणबीर (कला)
फारुख अहमद मीर (कला)
गणेश्वर शास्त्री डेव्हिड (साहित्य आणि शिक्षण)
गीता उपाध्याय (साहित्य आणि शिक्षण)
गोकुळ चंद्र दास (कला)
गुरुयावूर देवराय (कला)
हरचंदन सिंह भट्ट (कला)
हिरामन शर्मा (अन्य-शेती)
हरजिंदर सिंह श्रीनगरवाले (कला)
हरविंदर सिंह (खेळ)
हसन राहू (कला)
हेमंत कुार (वैद्यकीय)
हृदय नारायण दीक्षित (साहित्य आणि शिक्षण)
ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) (साहित्य, पत्रकारिता, शिक्षण)
इनीवालाप्पील मिनी विजयन (खेळ)
जगदीश जोशिला (साहित्य आणि शिक्षण)
जपिंदर नारुला (कला)
जोनास मासेट्टी (अन्य- अध्यात्म)
जयोनाचंद्रम बथारी (कला)
जुमदे योमगम गॅमलीन (समाजकार्य)
के दामोदरन (अन्य)
के एल कृष्णा (साहित्य आणि शिक्षण)
के ओमानाकुट्टी अम्मा (कला)
किशोर कुणाल (मरणोत्तर) (प्रशासकीय सेवा)
एल हँगथिंग (अन्य- शेती)
लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर (शिक्षण, पत्रकारिता, साहित्य)
ललित कुमार मांगोत्रा (साहित्य आणि शिक्षण)
लांबा लोबझांग (मरणोत्तर) (अन्य- अध्यात्म)
लिबिया लाबो सरदेसाई (समाजकार्य)
एम डी श्रीनिवास (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
मदुगुला नागपाणी शर्मा (कला)
महाबीर नायक (कला)
ममता शंकर (कला)
मंदा कृष्णा मडिगा (सार्वजनिक व्यवहार)
मूर्ती भूजंगराव चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) (कला)
नागेंद्र नाथ रॉय (साहित्य आणि शिक्षण)
नारायण (भूलाई भाई) (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)
नरेन गुरुंग (कला)
नीरजा भाटला (वैद्यकीय)
नीर्मला देवी (कला)
नितीन नोहरिया (साहित्य आणि शिक्षण)
विनायक लोहाणी – सामाजिक कार्य
विलास डोंगरे – आरोग्य क्षेत्र
विजयलक्ष्मी देशमाने – आरोग्य क्षेत्र
विजय महाराज – अध्यात्मिक क्षेत्र
वेनकप्पा सुगतेकर – कला
वेनु असान – कला
वासुदेव कामथ – कला
वदिराज पंचमुखी- साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
तुषार शुक्ला – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
थियम देवी – कला
तजेंद्र मुजुमदार – कला
सईद हसन – साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्र
स्वामी कार्तिक महाराज – अध्यात्म
सुरेंद्र कुमार वसल – विज्ञान आणि अभियांत्रिकी
सोनिया नित्यानंद – आरोग्य
श्याम अग्रवाल – कला
सुरेश सोनी – सामाजिक कार्य
सुभाष शर्मा – कृषी
स्टीफन कानप – साहित्य आणि शिक्षण
शाईन निझाम – साहित्य आणि शिक्षण
शेख अली अल जाबेर – साहित्य आणि शिक्षण
सेथुरमन पंचनाथम -विज्ञान
सीनी वैश्वनाथन – विज्ञान
सत्यपाल सिंग – क्रीडा
संत राम देसवल – साहित्य आणि शिक्षण
सॅली होळकर – उद्योग
सज्जन भजंका – उद्योग
रिकी केज – कला
रबा महांता – कला
रतन परिमाऊ – कला
राजेंद्र मुजुमदार – कला
रामदर्श मिश्रा – साहित्य आणि शिक्षण
राधाकृष्णन – कला
सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार

धुव्वूर नागेश्वर रेड्डी (वैद्यकीय)

न्यायमूर्ती (निवृत्त) जगदीश सिंह खेहार (सार्वजनिक व्यवहार)

कुमुदिनी रजनिकांत लाखिया (कला)

लक्ष्मीनारायणा सुब्रमणियम (कला)

एम टी वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

ओसामू सुझीकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)

शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला)

19 जणांना पद्मविभूषण

सूर्य प्रकाश (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता

आनंत नाग (कला)

बिवेक देबरोय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण)

जतीन गोस्वामी (कला)

जोश चाको पेरियापूरम (वैद्यकीय)

कैलाश नाथ दीक्षित (पुरातत्त्व)

मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यवहार)

नाल्ली छेट्टी (उद्योग, व्यापार)

नंदमुराई बलकृष्णा (कला

पी आर श्रीजेश (खेळ)

पंकज पटेल (उद्योग, व्यापार)

पंजक उधास (मरणोत्तर) (कला)

रामबहादुर राय (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)

साध्वी ऋतंभरा (समाजकाय)

एस अजिथ कुमार (कला)

शेखर कपूर (कला)

शोबाना चंद्रकुमार (कला)

सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक व्यावरहार)

विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी)

माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर, ४-५ वर्षांपासून होते कारागृहात

पुणे:माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर झाला आहे. पुण्यातील शिवाजी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल भोसले यांच्या जामीन याचिकेला मंजूरी दिली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून भोसले कारागृहात होते .

अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. २०१० ते २०१६ या काळात ते राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. ते शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक होते.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये तब्बल ७२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी या दोन्ही विभागांनी भोसले यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही गुन्ह्यांत त्यांना जामीन मिळाला आहे.

२०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी अनिल भोसले यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका बनू इच्छित होत्या. पण उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचा पाठिंबा घेत त्या नगरसेविका बनल्या. यानंतर भोसले कुटुंब आणि पवार यांच्यात वितुष्ट आले होते. पुढे २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनिल भोसले यांना घोटाळ्याच्या अंतर्गत अटक झाली होती.

महाराष्ट्र पोलीस दलाला 43 राष्ट्रपती पदकं जाहीर; IG सुनिल फुलारींसह 4 अधिकारी ठरले विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी…

प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण (एचजी अँड सीडी) आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 942 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेतशौर्य पदके (पोलीस सेवा-78 आणि अग्निशमन सेवा-17)

जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी, गुन्हेगारांना अटक करताना, संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा योग्य विचार करून जोखीम मोजली जाते आणि त्या आधारावर असामान्य शौर्य आणि शौर्य पदके (जीएम) प्रदान केली जातात. 95 शौर्य पुरस्कारांपैकी नक्षलवाद प्रभावित भागातील 28 कर्मचारी, जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील 28 कर्मचारी, ईशान्येकडील राज्यांतील 03 कर्मचारी आणि इतर प्रदेशातील 36 कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी सन्मानित केले जात आहे.

शौर्य पदक (GM) :- 95 शौर्य पदकांपैकी 78 पोलीस कर्मचारी आणि 17 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सेवा पदके : सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदक (PSM) तर साधनसंपत्ती आणि कर्तव्यनिष्ठेने केलेल्या विशिष्ट सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) प्रदान केले जाते. सेवेतील विशेष विशिष्ट कार्यासाठी देण्यात आलेल्या 101 राष्ट्रपती पदकांपैकी (PSM) 85 पोलीस सेवेला, 05 अग्निशमन सेवेला, 07 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि 04 सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत. यावर्षी देण्यात आलेल्या 746 गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकांपैकी (MSM) 634 पोलीस सेवेला, 37 अग्निशमन सेवेला, 39 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेला आणि 36 सुधारात्मक सेवेला देण्यात आले आहेत.
विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी (PSM – PRESIDENT’S MEDAL FOR DISTINGUISHED SERVICE ) :

  1. डॉ. रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र
  2. दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  3. सुनील बळीरामजी फुलारी, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  4. रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट, महाराष्ट्र
    गुणवत्तर सेवेसाठी पदक (MSM-MEDAL FOR MERITORIOUS SERVICE)
  5. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  6. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  7. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  8. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक, महाराष्ट्र
  9. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र
  10. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र
  11. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र
  12. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र
  13. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र
  14. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक, महाराष्ट्र
  15. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक, महाराष्ट्र
  16. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र
  17. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र
  18. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र
  19. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  20. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  21. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  22. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  23. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  24. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  25. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक, महाराष्ट्र
  26. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  27. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

24.दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

  1. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  2. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  3. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  4. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  5. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  6. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  7. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  8. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  9. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र
  10. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र
  11. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  12. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र
  13. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र
  14. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र
  15. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन

काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत आंदोलन

ठाणे, दि. 25 :
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या गैरकृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी ठाण्यात शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य मो. नसीम खान, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस व ठाणे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा, हिंदूराव गळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभाग झाले होते.
नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानादिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुस-या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
25 जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यानंतर काँग्रेस कार्यालय पत्रकार परिषद झाली. प्रदेश कार्याध्यक्ष मो. नसीम खान यांनी या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडणुका या निष्पक्षपाती व पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे, ही संवैधानिक संस्था स्वायत्त आहे पण मोदी सरकारने सर्वच संवैधानिक संस्थामध्ये हस्तक्षेप केला आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत असा आरोप करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या निष्पक्षपातीपणे व पारदर्शकपणे झालेल्या नाहीत असा आरोप केला. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला असे सांगून निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असल्याचे सांगितले.

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवोदित वकिलांनी कायम शिकत राहणे गरजेचे – न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न

पुणे, दि. २५: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम जेष्ठ वकिलांकडून शिकत आणि अभ्यास करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. ‘सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय’ अर्थात ‘ॲक्सेस टू जस्टिस फॉर ऑल’ या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या. इंदापूर येथील या न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी आगामी अर्थसंकल्पात अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, खासदार सुप्रिया सुळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश इंदापूर यू. एम. मुधोळकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. जे. तांबे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. ए. यु. पठाण, ॲड. राजेंद्र उमाप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गिरीश शहा आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या याकडे जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.

नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे, असा सल्ला देऊन त्या म्हणाल्या, यशाला कोणताही जवळचा मार्ग असू शकत नाही हे कायम लक्षात ठेवावे. कोर्टाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रयत्न करा. कायम व्यावसायिकता बाळगावी. लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करा.

बारामती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथून सुमारे ३ हजार न्यायालयीन प्रकरणे इंदापूर येथील न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत. ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा गरिबांचा खटला मोफत चालविण्यासाठी प्रयत्न करा असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी आणखीन ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदापूर येथील आज उद्घाटन झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी अतिरिक आठ कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच येथे वकिली करणाऱ्या वकीलांसाठी कोर्टाच्या इमारतीशेजारी नवीन तात्पुरते लोखंडी बांधकाम उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून वीस लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले जातील, असेही ते म्हणाले.

आपल्या देशात, राज्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयांचं खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे न्यायालयांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने राज्यात आवश्यक येथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरीष्ठस्तर दिवाणी न्यायालय झाल्यामुळे सुमारे शंभर ते सव्वाशे वकील, ५०० ते हजार पक्षकार यांना बारामती येथे जावे लागायचे ते वाचले.

न्यायालयीन इमारती आणि निवासस्थानांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. पुणे येथील राणीचा बाग येथे न्यायाधीशांठी ३२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत. इंदापूर येथील न्यायालयाच्या इमारतीशेजारील पंचायत समितीची दोन एकर जागा न्यायालयाच्या ताब्यात मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मुंबई येथे उच्च न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी बीकेसी येथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आवश्यक तितका खर्च करण्यात येईल. मुंबई येथे २ हजार कोटी रुपये खर्च करून जीएसटी भवन उभारण्यात येत आहे. तेथे भाड्याच्या इमारतीत असलेली शासकीय कार्यालयेही स्थलांतरित करण्यात येणार असल्याने प्रचंड भाडे वाचणार आहे. एअर इंडियाची इमारत शासनाच्या ताब्यात मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर तेथेही राज्य शासनाची कार्यालये स्थलांतरित करता येतील,

यशदाचा विस्तार करून उर्वरित १०० एकर जागेवर मसुरीच्या धर्तीवर अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, राज्यात जनतेची, तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची सोय व्हावी अशा देखण्या इमारती उभ्या करण्यासाठी प्रयत्न असतो. सारथीची चांगली वास्तू पुण्यात उभी केली असून सामाजिक न्याय विभागाची इमारत उभारण्याचे निश्चित केले असून
शालेय शिक्षण भवन, नोंदणी भवन, कृषी भवन, जमाबंदी आयुक्तालय भवनाची कामे सुरू आहेत. जीएसटी भवनाचे काम संपत आले आहे. कामगार भवन, पणन आणि सहकार भवन, साखर भवन शेजारी एक नवे भवन, नगर विकास भवन, महिला व बाल विकास आयुक्तालयासाठी भवन, बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे महानगर पालिका इमारत आधी भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोनाच्या संकटाच्या काळातही या इमारतीच्या कामासाठीचा निधी कमी पडू दिला नाही आणि इमारतीचे काम थांबले नाही. इंदापूर येथील वकील हे एकविचाराने काम करतात त्यामुळे त्यांनी हे न्यायालय सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने या न्यायालयाला मंजुरी दिली, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती श्री. मारणे म्हणाले, न्यायालयीन व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाकडे मार्गक्रमण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पक्षकारांना न्यायासाठी पुणे शहरात यावे लागू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यात शिवाजीनगर येथे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात वकील आणि पक्षकार येत असल्याने मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये उभारण्यात येत आहेत. सध्या बारामती, खेड राजगुरुनगर, वडगाव मावळ आणि आज इंदापूर येथे ही न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. लवकरच जुन्नर येथे न्यायालयाचे काम सुरू करण्यात येत आहे. लवकरच शिरूर येथेही सुरू करण्यात येईल. पुणे हा देशातील सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा असून एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आजच्या घडीला प्रलंबित असलेल्या ५४ लाख खटल्यांपैकी ७ लाख १० हजार खटले एकट्या पुणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. हे साठलेले खटले निकाली काढण्यासाठी नवीन न्यायालयीन सोयी सुविधा उभारणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेत पुण्यापासून बाजूला झाल्यामुळे वकिलांनी स्वतःचा दर्जा, वकिलीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर म्हणाले, या भागात न्यायालयीन व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या इमारतीमुळे तातडीने न्यायव्यवस्थेकडे न्यायासाठी येता येणार आहे. इंदापूरला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकार, पोलीस, वकील यांचा अमूल्य वेळ वाचणार असून या क्षेत्राच्या प्रगतीला मोठी संधी मिळणार आहे. सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळवा यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

न्यायाधीश श्री. महाजन म्हणाले, पुणे जिल्ह्यात देशात सर्वाधिक १५३ न्यायाधीश असून एकट्या पुणे शहरात ८० न्यायाधीश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरू करण्यात येत आहेत. इंदापूर येथे हे न्यायालय झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील काही दूर अंतरावरील भागातून बारामती येथे न्यायालयीन कामासाठी जावे लागण्याचा त्रास वाचणार आहे, असे सांगून पुणे शहर व जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक ॲड. गिरीश शहा यांनी केले.

कार्यक्रमास माजी आमदार विजय मोरे, यशवंत माने, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा आदी तालुक्यातील न्यायाधीश, विविध वकील संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
0000

.. तरच मुले सुजाण नागरिक घडतील : मृणाल कुलकर्णी

राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ जल्लोषात

पुणे : शाळा, अभ्यास या व्यतिरिक्तच्या वेळात आपण मुलांना काय देतो याकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे. चांगले शिक्षण, खाणे-पिणे या बरोबरच मुलांना चांगल्या गोष्टींची ओळख करून देणे, चांगले कला प्रकार दाखविणे, चांगल्या लोकांना भेटविणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांच्या वाढीच्या वयात पालकांनी त्यांना वेळ देऊन या गोष्टी केल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आज (दि. 25) भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, स्पर्धेचे परीक्षक अरुण पटवर्धन, देवेंद्र भिडे आणि संगीता पुराणिक मंचावर होते.
स्पर्धेत राजा नातू करंडक पटकाविणाऱ्या आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीच्या ‌‘गोष्टींची गोष्ट‌’ आणि नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक मिळालेल्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या ‌‘गेम ओव्हर‌’ या एकांकिकांचे सुरुवातीस सादरीकरण झाले.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने एका क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना चांगले ते निवडायला शिकवणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. मुलांशी कनेक्ट होणे, त्यांना पुरेसा वेळ देणे हे पालकांपुढे आव्हान आहे. मात्र आपल्या मुलांचे भवितव्य चांगले व्हावे यासाठी पालकांनी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

परीक्षकांच्या वतीने बालताना देवेंद्र भिडे म्हणाले, स्पर्धा हे बालरंगभूमी जीवंत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात बालरंगभूमीला अतिशय चांगले दिवस येतील. मात्र त्यासाठी नाटक किंवा कला पाहणे, तिचा आस्वाद घेणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पालक, शिक्षक यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी मुलांना पुस्तके वाचायला उद्युक्त केले पाहिजे. शाळांमध्ये शिक्षकांसाठीही येत्या काळात नाट्य प्रशिक्षण वर्ग व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी केले तर आभार अमृता पटवर्धन यांनी मानले. निकालपत्राचे वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.

मुलाला लिखाणाची सक्ती..
मुलगा विराजस याला वाढवताना कोणत्या गोष्टी केल्या या विषयी कुलकर्णी म्हणाल्या, विराजस लहान असताना त्याला मी न चुकता रोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या 10 ओळी लिहायला लावायचे. ते लिहिल्याशिवाय त्याला जेवण मिळणार नाही असा शिरस्ता पालक म्हणून मी पाळला. त्याचाच परीणाम म्हणजे आता तो उत्तम नाट्यलेखन करू शकतो. याबरोबरच त्याला उत्तमोत्तम वाचायला, पाहायला मिळेल याची काळजीही आम्ही घेतली.

घोषणांनी परिसर दुमदुमाला
“हॅट्रीक, हॅट्रीक…आवाज कुणाचा” अशा घोषणांनी भरत नाट्य मंदिरचा परिसर दुमदुमून गेला होता. राजा नातू करंडक स्पर्धेत आर्यन्स पब्लिक स्कूलने सलग तिसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावल्याने या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्साह पाहण्याजोगा होता. तर रमाणबाग, सेवासदन, कलमाडी हायस्कूल या शाळांनाही वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिके मिळाल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहात आपल्या शाळेच्या नावाने घोषणा देत होते

विस्तार केवळ बहिर्गत नको तर आंतरिक देखील हवा-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पिंपरी (पुणे) 25 जानेवारी 2025: ‘‘विस्तार केवळ बहिर्गत नको तर तो आंतरिक देखील हवा. प्रत्येक कार्य करत असताना या निराकार प्रभु परमात्माची जाणीव ठेवता येते; परंतु अगोदर याची ओळख होणे गरजेचे आहे. याला जाणून मनुष्य आपल्या अंतर्मनाला आध्यात्मिक आधार देऊ शकतो.’’ असे उद्गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनीे महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या प्रथम दिनी उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. सतगुरु माता सुदीक्षाजी आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या तीन दिवसीय संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले असून सतगुरुंच्या दिव्य दर्शनाचा व प्रवचनांचा लाभ प्राप्त करत आहेत.

सतगुरु माताजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये पुढे सांगितले, की भक्तीचे कोणतेही निश्चित स्थान किंवा समय असत नाही. ती जीवनाच्या प्रत्येक क्षणी करता येऊ शकते. उदाहरण देताना त्यांनी सांगितले, की ज्याप्रमाणे फूल आपला सुगंध कोणत्याही प्रयासाविना चहुदिशेला पसरवत असते तद्वत भक्तीचा वास्तविक अनुभव कोणत्याही दिखाव्याविना आत्मसात केला जाऊ शकतो. भक्ति म्हणजे एखादी विशिष्ट क्रीया नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमात्म्याची जाणीव ठेवणे होय.

सतगुरु माताजींनी स्पष्ट केले, की भक्ति बरोबरच मानवतेची सेवा आणि सामाजिक कर्तव्यांचे पालनदेखील परमात्म्याच्या निराकार स्वरुपाशी निगडित आहे जो सर्वत्र आणि सदासर्वदा विद्यमान आहे. त्या म्हणाल्या, की जर कोणी केवळ बाह्य दिखाव्यापुरता सत्संग करत असेल तर तो खÚया भक्तीपासून दूरच राहतो. खरी भक्ती तेव्हाच सुरु होते जेव्हा मन-वचन-कर्माने आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो ज्यायोगे सहजपणेच जीवनात प्रेम आणि सेवेचा भाव उत्पन्न होतो. भक्तीच्या माध्यमातून केवळ मनुष्याचे व्यक्तिगत जीवनच बदलून जात नाही तर समाजामध्येही सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. सतगुरू माताजी म्हणाल्या, की आत्मिक उन्नतीसाठी परमात्म्याच्या भक्तीची प्रेरणा मानवमात्राला प्राप्त व्हावी हाच या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.

सतगुरु माताजींनी समाजामध्ये एकात्मता कायम टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि मानवतेची सेवा करणे हेही भक्तिचे अभिन्न अंग असल्याचे सांगून जीवनात भक्तीला सदैव प्राथमिकता द्यायला हवी असे म्हटले. त्यांनी भक्तगणांना आवाहन केले, की त्यांनी आपल्या जीवनात जीवंतपणीच भक्ती आणि आत्मसुधार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे आपण क्षणोक्षणी परमात्म्याच्या उपस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे.

समागमाच्या प्रथम दिनी बाल कवी दरबार विशेष आकर्षणाचे कारण ठरला ज्यामध्ये बाल संतांनी ‘विस्तार असीम की ओर’ (विस्तार – अनंताच्या दिशेने) या विषयावर आधारित आपापल्या कविता सादर केल्या. त्यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी रचनांचा समावेश होता.

समागमाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित झाली सेवादल रॅली

निरंकारी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी व निळ्या वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांचे रॅलीमध्ये आगमन होताच मिशनच्या सेवादल अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. त्यानंतर या दिव्य युगुलाने सेवादल रॅलीचे अवलोकन केले आणि सतगुरु माताजींनी शांतीचे प्रतीक स्वरूप मिशनच्या श्वेत ध्वजाचे आरोहन केले.

या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकांचे सादरीकरण सेवादल सदस्यांकडून करण्यात आले ज्यांच्या माध्यमातून भक्तीमध्ये सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. काही प्रमुख नाटिकांमधून विवेकाच्या दिशेने प्रवास तसेच सेवेमध्ये कर्तव्याची भावना इत्यादि शिकवणूकींची प्रेरणा देण्यात आली. या व्यतिरिक्त शारीरिक व्यायाम आणि मल्लखांब यांसारखे साहसी खेळ सादर करण्यात आले ज्यायोगे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यात आला. या प्रस्तुती सादर करण्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील, जसे कोकण, मराठवाड़ा, खान्देश, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सेवादल यूनिट्सचा समावेश होता.

रॅलीमध्ये सेवादल बंधु-भगिनींना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवादलाचे सदस्य २४ तास सेवेमध्ये असतात. त्यांनी अहंकाररहित होऊन मर्यादा व अनुशासनाचे पालन करत सेवा करत जायचे आहे. प्रत्येक सेवादल सदस्याने निरंकार परमात्माच्या सेवेला प्राथमिकता देत याच मार्गावर आपले जीवन व्यतीत करावे. जेव्हा मानवाला निराकार परमात्म्याचा बोध होतो तेव्हा त्याचे मन मानवतेच्या सेवेमध्ये प्रेरित होते. वर्दी परिधान करुन किंवा वर्दी शिवायही सेवा करता येते, तथापि, वर्दी परिधान केल्यानंतर जबाबदारी वाढते. सेवा सदोदित पूर्ण तन्मयतेने आणि समर्पित भावनेने निर्धारित आदेशांचे पालन करत करावी. अशी सेवाच आनंददायक ठरते आणि अशा सेवेलाच आपण विस्तार द्यायचा आहे.

बाल प्रदर्शनी

58व्या निरंकारी संत समागमाचे एक मुख्य आकर्षण ठरली आहे ‘बाल प्रदर्शनी’. महाराष्ट्राच्या जवळपास 17 शहरांतून या प्रदर्शनीमध्ये प्रेरणादायी मॉडेल्स मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये विस्तार अनंताच्या दिशेने या मॉडेलमधून जीवनाला असीम परमात्म्याच्या दिशेने विस्तारित करण्याची प्रेरणा प्राप्त होत असून चायनीय बांबूच्या मॉडेल्स मधून ही शिकवण दिली जात आहे, की ज्याप्रमाणे बांबूची लागवड केल्यानंतर जवळपास चार वर्षे त्याला खतपाणी घालावे लागते मात्र पाचव्या वर्षापासून ते बांबू शीघ्र गतीने वाढू लागतात तद्वत जीवनात कोणतेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असतेच शिवाय संयम व विश्वासाने योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते. अशाच प्रकारे अनेक मॉडेल्स मधून मुलांनी मोठ्या कल्पकतेने मिशनकडून दिली जाणारी मौलिक शिकवण प्रस्तुत केली आहे. सुंदर शिकवण देणाऱ्या मॉडेल्सद्वारे मुलांनी तयार केलेली ही प्रदर्शनी पाहणारे भाविक भक्तगण तसेच पुणे व पिंपरी शहरातील अनेक शाळांतून आलेल्या विद्याथ्र्यांनी प्रदर्शनी तयार करणाऱ्या बाल संतांचे कौतुक केले.

“पुणे रिंगरोड प्रकल्पबाधित शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विकास आराखड्यात बदल करावा – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तयार करण्यात येणाऱ्या १३७ किमी लांबीचा पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या विकास आराखड्यात अंशत: बदल करून प्रकल्पबाधित शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, पालकमंत्री नामदार अजितदादा पवार, व्यवस्थापकीय संचालक-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयुक्त- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांना निवेदन देत मागणी केली आहे .
या निवेदनात असे म्हटले आहे कि,’ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) १३७ किलोमीटर लांबीचा पुणे रिंगरोड प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्याबाबतचा विकास आराखडा तयार होत आहे. या रिंगरोडच्या आजूबाजूच्या भागात पद्धतशीर नियोजन आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने हवेली, भोर, पुरंदर, मुळशी आणि वेल्हे या तालुक्यातील ११७ गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून नियुक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सदर रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून कॉरिडॉरच्या बाजूने दोन प्रमुख विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या विकास केंद्रांमुळे प्रकल्पबाधित गावांच्या आजूबाजूच्या भागातील पायाभूत सुविधांच्या वाढीवर आणि शहरी विकासावर भर पडणार आहे. तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लँडस्केप वाढवणे, पर्यटनाला चालना देणे, भूसंपादन आणि प्रकल्प अंमलबजावणीसाठी आर्थिक गरजा पूर्ण करणे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नाविन्यपूर्ण निधी मॉडेल लागू करण्यात येणार आहे. प्रकल्पबाधित गावांचा कायापालट करण्यासाठी, उत्तम कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी आणि शाश्वत वाढीसाठी संधी निर्माण करण्यासाठी हा रिंगरोड तयार करण्यात येणार आहे.
पुणे रिंगरोड प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील अनेकांच्या रोजगारामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गावातील ग्रामस्थांना जमीन संपादित केल्यामुळे दुसरीकडे स्थलांतर व्हावे लागले, स्वतःचा असलेला व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता जास्त असणे. आपल्या विभागामार्फत होणाऱ्या रिंग रोडच्या कामामध्ये भू संपादन करणे, रस्ता बनविणे,त्यामध्ये बांधकामास आवश्यक वस्तू, रस्ता खोदाई करण्यासाठी जेसेबी सारखी मोठी वाहने व वेळोवेळी करावयाची कामे या कामांमध्ये स्थानिक युवा व्यावसायिक, नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा, स्थानिक नागरिकांचा निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न सुद्धा सुटण्यास मदत होऊ शकेल, असे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी सांगितले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १३७ किमी लांबीचा पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या विकास आराखड्यात अंशतः बदल करून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा प्रकल्पबाधित गावांमधील स्थानिक तरुणांना सोबत घेऊन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एक लक्षणीय आंदोलन करण्यात येईल, असा सूचना-वजा इशारासुद्धा शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी दिलेला आहे.

76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज


इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

या सोहळ्यात भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवण्यात येणार ; राज्यघटना स्वीकृतीच्या  75 वर्षांवर विशेष भर दिला जाणार

संचलन पाहण्यासाठी  विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 विशेष अतिथी उपस्थित राहणार

‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ या संकल्पनेवरील 31 चित्ररथ कर्तव्य पथावर पहायला मिळणार, प्रथमच तिन्ही सेनादलांचा चित्ररथ सशस्त्र दलांमधील एकजुटता आणि एकात्मतेची भावना प्रदर्शित करणार

प्रथमच संपूर्ण कर्तव्य पथावर  5,000 कलाकार सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करणार

नवी दिल्ली–

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी, 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व करतील. राज्यघटनेच्या स्वीकृतीची  75 वर्षे आणि जन भागिदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा  भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण असेल. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘जन भागीदारी’ वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून सुमारे 10,000 विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच  सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.

संचलन

प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे  चालेल.  या सोहळ्याच्या  सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील आणि शहीद झालेल्या वीरांना संपूर्ण देशाच्या वतीने पुष्पचक्र  अर्पण करून श्रद्धांजली वाहतील.  त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावरील सलामी मंचाकडे रवाना होतील.

राष्ट्रपतींचे अंगरक्षक जे भारतीय सैन्यातील सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे त्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात  राष्ट्रपती आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष  यांचे आगमन होईल. दोन्ही राष्ट्रपती ‘पारंपारिक बग्गी’ मधून दाखल होतील.  40 वर्षांच्या कालावधीनंतर 2024 मध्ये ही प्रथा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली.

परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. 105-मिमी लाइट फील्ड गन या स्वदेशी शस्त्र प्रणालीचा वापर करून 21 तोफांची  सलामी दिली जाईल.

देशाच्या विविध भागांमधील संगीत वाद्यांसह  300 सांस्कृतिक कलाकार ‘सारे जहाँ से अच्छा’  ची धून वाजवत या संचलनाला प्रारंभ करतील.

ध्वज संरचनेअंतर्गत हेलिकॉप्टर युनिट 129 मधील Mi-17 1V या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती मानवंदना स्विकारतील आणि नंतर संचलनाला सुरुवात होईल. या पाठोपाठ सर्वोच्च शौर्य पुरस्कारांच्या  गौरवशाली विजेत्यांचे आगमन होईल. यामध्ये परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन), योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार (निवृत्त) तसेच अशोक चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल जस राम सिंग (निवृत्त) यांचा समावेश आहे.

भारतीय लष्कराचे पथक

कर्तव्य पथावर T-90 भीष्म रणगाडा, नाग क्षेपणास्त्र प्रणालीसोबत बीएमपी-2 सरथ, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका बहुप्रक्षेपी रॉकेट प्रणाली, अग्निबाण बहुआवर्त रॉकेट प्रक्षेपक, आकाश शस्त्र प्रणाली, एकात्मिक रणांगण निरीक्षण प्रणाली, सर्व-भूप्रदेशानुकुल वाहन (चेतक), हलक्या स्वरुपाचे विशेष वाहन (बजरंग), वाहन युक्त पायदळ तोफ प्रणाली (ऐरावत), शीघ्र प्रतिसाद दलातली वाहने (नंदिघोष आणि त्रिपुरांतक)  तसेच अल्पावधीत पूल उभारणारी प्रणाली अशा लष्कराच्या असंख्य प्रणालींही प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

तीनही दलांचा चित्ररथ

कर्तव्य पथावर पहिल्यांदाच तिन्ही दलांचा चित्ररथ सादर केला जाणार असून, त्यामाध्यमातून तीनही दलांमधील एकजीनसीपणा आणि एकात्मतेच्या भावनेचे दर्शन घडवले जाणार आहे.

माजी सैनिकांसाठी चित्ररथ

शिस्त, लवचिकता आणि अढळ निष्ठेचे प्रतीक असलेल्या आपल्या माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने  ‘विकसित भारताच्या दिशेने सदैव अग्रेसर’ या संकल्पनेअंतर्गतचा चित्ररथ हे या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे. 

क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवर दिग्गजांची उपस्थिती हा या सोहळ्यातला आणखी एक अभिमानास्पद घटक असणार आहे. यात चंदू चॅम्पियन या बॉलिवूड चित्रपटामागची प्रेरणा असलेले पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुभेदार मुरलीकांत पेटकर आणि कॅप्टन जितू राय (मानद) यांचा समावेश असणार आहे.

लेफ्टनंट कर्नल रविंदरजीत रंधावा, लेफ्टनंट कमांडर मणी अग्रवाल आणि फ्लाइट लेफ्टनंट रुची साहा या तिन्ही दलांच्या माजी महिला अधिकारी नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित असतील. त्यांची ही सन्माननीय उपस्थिती आपल्या सशस्त्र दलांना आकार देण्यात महिला बजावत असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतील

भारतीय नौदलाचे पथक

भारतीय नौदलाच्या पथकात 144  जवानांचा समावेश असेल, त्यानंतर नौदलाचा चित्ररथ प्रदर्शित केला जाईल. यात भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याच्यादृष्टीने सक्षम असलेल्या मजबूत ‘आत्मनिर्भर’ नौदलाच्या क्षमतांचे दर्शन घडवले जाईल

भारतीय हवाई दलाचे पथक

भारतीय हवाई दलाच्या पथकात चार अधिकारी आणि 144 जवानांचा समावेश असेल.

भारतीय तटरक्षक दल

डेप्युटी कमांडंट नविता ठकरान या भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करतील. त्यानंतर सागरी किनारपट्टी सुरक्षा आणि सागरी प्रदेशातील शोध आणि बचाव यासंबंधीच्या घटकांचा अंतर्भाव असलेला भारतीय तटरक्षक दलाचा देखावा सादर केला जाणार आहे. ‘स्वर्णिम भारत : वारसा आणि प्रगती’ ही या देखाव्याची संकल्पना आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा देखावा आणि उपकरणे

या संचलनाच्या दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने  राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने निर्मित काही पथदर्शी उपकरणे आणि साधाने प्रदर्शित केली जाणार आहेत. या निमित्ताने रक्षाकवच – बहुपक्षीय धोक्यांसाठी – बहुपदरी संरक्षण कवच या संकल्पनेवर आधारीत देखावा सादर केला जाणार आहे. यात जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या क्षमतेच्या शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या क्षेपणास्त्रांसह इतर साधने आणि उपकरणांचा अंतर्भव असणार आहे.

याशिवाय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 2024 मध्ये साध्य केलेल्या महत्वाच्या यशाचे दर्शनही यानिमित्ताने घडवले जाणार आहे.

निमलष्करी दल आणि इतर सहाय्यक नागरी दलांचे पथक

कर्तव्य पथावर संचलन करणाऱ्या तुकड्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाची 148 सदस्यीय महिलांची संचलन तुकडी असेल.

राष्ट्रीय छात्र सेना – वरिष्ठ तुकडी (मुली) च्या संचलन तुकडीचे नेतृत्व जम्मू काश्मीर आणि लडाख संचालनालयाच्या वरिष्ठ अंडर ऑफिसर एकता कुमारी करतील. मुलांच्या संचलन तुकडी- राष्ट्रीय छात्र सेना – वरिष्ठ तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्र संचालनालयाचे वरिष्ठ अंडर ऑफिसर प्रसाद प्रकाश वायकुळ करतील.

चित्ररथ

16 राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारच्या 10 मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ या वर्षी संचलनात सहभागी होतील. हे चित्ररथ ‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ ही संकल्पना अधोरेखित करणारे आहेत. हे चित्ररथ एका गौरवशाली भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या देशाची विविध शक्तीस्थाने आणि सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतिक समावेशकतेचे दर्शन घडवतील.

सांस्कृतिक कार्यक्रम

यावर्षी, ‘जयती जय ममः भारतम्’ या शीर्षकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात 5,000 कलाकार 11 मिनिटांत देशाच्या विविध भागातील 45 हून अधिक नृत्यप्रकार सादर करतील.

मोटारसायकल प्रदर्शन

‘द डेअर डेव्हिल्स’ म्हणून प्रसिद्ध असलेली कॉर्प्स ऑफ सिग्नल्स मोटरसायकल रायडर डिस्प्ले संघ मोटारसायकल प्रदर्शनादरम्यान चित्तथरारक कवायती सादर करेल.

फ्लाय-पास्ट

सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या संचलनातील कार्यक्रमांपैकी एक, ‘फ्लाय-पास्ट’मध्ये भारतीय हवाई दलाची  40 विमाने/हेलिकॉप्टर – 22 लढाऊ विमाने, 11 वाहतूक विमाने आणि सात हेलिकॉप्टर – यांचा श्वास रोखून धरणारा एअर शो पाहायला मिळेल. यामध्ये राफेल, एसयू-30, जग्वार, सी-130, सी-295, सी-17, एडब्ल्यूएसीएस, डॉर्नियर-228 आणि एएन-32 विमाने तसेच अपाचे आणि एमआय-17 हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

राष्ट्रगीत झाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे प्रतीक म्हणून अधिकृत बोधचिन्ह असलेले फुगे आकाशात सोडल्यानंतर समारंभाचा समारोप होईल.

या उत्सवाचा भाग म्हणून अनेक अनोखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

विशेष पाहुणे

या वर्षी हे संचलन पाहण्यासाठी 34 श्रेणींमध्ये सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख सरकारी योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावातील सरपंचांचा समावेश आहे.

बीटिंग रिट्रीट सेरेमनी

प्रजासत्ताक दिन उत्सवाचा समारोप 29 जानेवारी रोजी, विजय चौकात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभाने होईल.

भारत पर्व

पर्यटन मंत्रालयाकडून 26 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.

पंतप्रधानांची राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) रॅली

‘युवा शक्ती-विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित पंतप्रधानांची राष्ट्रीय छात्र सेना रॅली 27 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्टोमेंट येथील करिअप्पा परेड ग्राउंड येथे आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतील.

पिंपरीत आठवे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन १ व २ फेब्रुवारीला

शास्त्रज्ञ डॉ. टोनी नेडर, आयपीएस महेश भागवत व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स’

पुणे: डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ संचालित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित आठव्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे (आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन) आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय आयुर्वेद संमेलन पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात दि. १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. जगभरातून आयुर्वेदातील तज्ज्ञ, संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होतील. आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व विचार मंथन होणार आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
प्रसंगी ब्राझील येथील आयुर्वेदाचार्य डॉ. जोस रोगे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गुणवंत येवला, संशोधन संचालक प्रा. डॉ. अस्मिता वेले, कायाचिकित्सा विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. जी. दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश कुट्टे आदी उपस्थित होते. ब्राझिलमधील आयुर्वेदाचे १६ विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनासाठी दाखल झाले आहेत.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “या दोन दिवसीय आयुर्वेद संमेलनास भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाय योजना आणि अनेक विकार आणि चिकित्सा या विषयावर विचारमंथन होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आणलेली ‘एकात्मिक आरोग्य योजना’, ‘हील इन इंडिया’ या योजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन महत्वपूर्ण ठरेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी जाणून घेण्याची संधी अशा संमेलनातून विद्यार्थ्यांना मिळते. संशोधन वृत्ती वाढून इनोव्हेशन, स्टार्टअप्स संस्कृतीला चालना मिळते.”
प्राचार्य डॉ. गुणवंत येवला  म्हणाले, “संमेलनात पहिल्या दिवशी विशेष पदवीप्रदान सोहळा होणार असून, या कार्यक्रमात अमेरिकेतील ग्लोबल ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टोनी नेडर, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत आणि वाघोली येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष, आयुर्वेदतज्ज्ञ प्रा. डॉ. सदानंद सरदेशमुख यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव व प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, खजिनदार डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत.”
संमेलनात दुसऱ्या दिवशी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांचे विशेष संबोधन असणार आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे चेअरमन वैद्य जयंत देवपुजारी, ‘आयुष’चे नॅशनल रिसर्च प्रोफेसर डॉ. भूषण पटवर्धन, ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेसचे चेअरमन वैद्य देवेंद्र त्रिगुणा, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेदाचे प्रा. डॉ. सुभाष रानडे, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशनचे चेअरमन डॉ. रेनर पिचा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात दहा देशातील १०० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि १२०० हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होत आहेत. देश-परदेशातील आयुर्वेदाशी निगडित ५०० हुन अधिक विद्यार्थी, डॉक्टर व संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.

विक्रांत सिंग यांच्या उपस्थितीत V I T कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केली स्वच्छता अभियानाची सुरुवात

पुणे- महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आज दिनांक 25/1/25 रोजी सकाळी 8-11 वाजता स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर विक्रांत सिंग यांनी आयोजित केलेल्या V I T कॉलेज च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली
शनिवार वाडा, ओंकारेश्वर मंदिर ते टिळक पूल, लाल महाल परिसर नाना वाडा परिसर शिवाजी रस्ता, दगडूशेठ गणपती मंदिर परिसर या ठिकाणी V I T कॉलेजचे 400 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान घेण्यात आले.
घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम ,परिमंडळ 5 या विभागाचे उपायुक्त डॉ चेतना केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे महानगरपालिकेचे ब्रँड अॅबेसीडर विक्रांत सिंग यांच्या उपस्थितीत कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव , प्रमुख आरोग्य निरीक्षक बाबा इनामदार, DSI महेंद्र सावंत, कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सर्व आरोग्य निरीक्षक , मुकादम उपस्थित होते, या अभियानात एक टन सुका कचरा गोळा करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत प्रचंड वाढलेले मतदार केंद्र सरकारने बांग्लादेशातून आणले ?: नाना पटोले

मतदार याद्यातील घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा लढा.

लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदार जागृतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. २५ जानेवारी २०२५
भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले आहे, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? मतदानादिवशी संध्याकाळी जाहीर केलेली ५८ टक्के मतदान दुसऱ्या दिवशी ६६.५ टक्के कसे वाढले? लाडकी बहिण योजनेचा लाभ बांग्लादेशींनी घेतल्य़ाचे सरकार सांगत आहे तसे विधानसभेला वाढलेले हे मतदार केंद्रातील भाजपा सरकारने बांग्लादेशातून आणले का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
लोकशाहीचे रक्षण व मतदारांची जागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून राज्यभर आंदोलन करून पत्रकार परिषदा घेतल्या. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मतमोजणीवेळी एक-दोन मतदार वाढले तरी निवडणूक रद्द होते पण विधानसभेला ६० लाख मतदार वाढले पण त्यावर निवडणूक आयोग काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या अंधारत ७६ लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने अजून दिलेले नाही. पण हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करत त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांना ती स्क्रिप्ट नरेंद्र मोदी, अमित शाह, का निवडणूक आयोगाने दिली होती, अशी विचारणा पटोले यांनी केली.
लोकसभा निवडणूक २०१९ ते २०२४ या पाच वर्षात राज्यात ५० लाख मते वाढली तर लोकसभा निवडणूक २०२४ व विधानसभा निवडणूक २०२४ या सहा महिन्यात ४६ लाख मते वाढली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार वाढले कसे, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही, आता तर निवडणूक आयोगावने त्यांच्या वेबसाईटवरून सर्व डेटाच डिलीट केला आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मतदीने दिवसाढवळ्या लोकशाहीचा गळा घोटत आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या रक्षण व निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर व न्यायालयीन लढा देत आहे.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आदी उपस्थित होते.

लोकशाहीच्या रक्षणासाठी व मतदार जागृतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आदोलन केल तसेच पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली. मुंबईत प्रोफेशनल काँग्रेसचे प्रविण चक्रवती व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यवतमाळमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापुरात खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून निवेदन देण्यात आले. अहिल्यानगर मध्ये प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. पुणे, सोलापूर, नाशिक, नांदेड, बीड, जालना, लातूर, वाशीम, पैठण, ब्रम्हपुरी सह जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.

विधानसभेत पराभूत झालेल्या मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका: पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या: प्रविण चक्रवर्ती

महाराष्ट्रात १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या ९.५४ कोटी असताना मतदार ९.७ कोटी कसे?

निवडणूक आयोगाने ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ बनवले.

मुंबई, दि. २५ जानेवारी २०२५
लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक ते २०२४ ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात ३२ लाख मतदार वाढले तर मग अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती यांनी केली आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रविण चक्रवर्ती पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७ कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? मतदारयाद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर ५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली, या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवाशी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवाशी नसल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर १३२ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २० ते २५ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील ६२ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती पण विधानसभेला याच १३२ मतदारसंघातून ११२ जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्वाचे आहे. मतदार याद्यातील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे, त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावी ही काँग्रेसची मागणी आहे. २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे पण निवडणूक आयोगाने या ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ केले आहे, असेही चक्रवर्ती म्हणाले.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील मविआच्या १०० पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते, निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘अवघा रंग एक झाला’ रंगावली प्रदर्शनात रंग आणि कलांचा आविष्कार

राष्ट्रीय  कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रंगावली प्रदर्शन
पुणे : महाकुंभमेळ्यातील साधू….वंदे मातरम ची भव्य रांगोळी… विटी दांडू, झोका, भवरा असे रांगोळीतून दाखविलेले पारंपरिक खेळ…जोडवी, मासोळी, पैंजण या पारंपरिक साजाची रांगोळी… अशा एकाहून एक सरस मनमोहक गालिचा रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना राष्ट्रीय कला अकादमी च्या ‘अवघा रंग एक झाला’  या प्रदर्शनातून मिळाली.
राष्ट्रीय  कला अकादमी (न्यास) आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अमोल कदम स्मरणार्थ अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. प्रशालेत ‘अवघा रंग एक झाला’ या गालिचा रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक मिलिंद सबनीस आणि मुुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी  राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक अतुल सोनवणे, रोमा लांडे, मंदार रांजेकर, सुनील सोनटक्के, योगेश गोलांडे, अमर लांडे आणि सर्व प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय कला अकादमीचे २७ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या कला साधकांच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा ६ वे वर्ष आहे. विविध विषयांवर २५ रंगबेरंगी रांगोळ्या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. सोमवार दि. २७ जानेवारीपर्यंत  पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे.

कोरेगाव पार्कमधून 67 लाखांचा तर लोणी काळभोरमधून 16 लाखांचा गांजा, कोकेन जप्त

पुणे:कॅम्पमधील चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. कोरेगाव पार्क, बंडगार्डन सारख्या पॉश एरियात राहणारे, महागडे आयफोन घेऊन वडिलांच्या महागड्या गाड्यातून फिरायचे. बारावीनंतर शिक्षण सुटले. अन ते अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकले. पण, पोलिसांची गाडी पाहून बावरले आणि गाडीतून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन , गांजा, मिनी कुपर व ग्रँड व्हीटारा अशा दोन महागड्या कार असा ६७ लाख ८ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोरमध्ये दुसरी कारवाई केली. पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरुन लोणकर वस्ती, येथील सार्वजनिक रोडवर भरतकुमार दानाजी राजपुरोहित (वय ३५) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. जि. जालोर, राजस्थान) यांच्या ताब्यातून १६ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये ४० किलो ३९०ग्रॅम गांजाचा समावेश आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनिल नागलोट, प्रदिप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख, नुतन वारे यांनी केली आहे.