Home Blog Page 476

वाघोलीतील मतदारांचे मताधिकार हिरावले जात आहेत? – वाको वेल्फेअर असोसिएशनचा शिरूर निवडणूक विभागावर गंभीर आरोप

पुणे : निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, म्हणून सरकारकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जाते. परंतु याच्या उलट, वाघोलीतील शेकडो नागरिकांचे मतदार ओळखपत्र अर्ज सातत्याने व योजनाबद्ध पद्धतीने शिरूर निवडणूक विभागाकडून नाकारले जात आहेत. हा लोकशाही व्यवस्थेवर घातक आघात असून, नागरिकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप वाको वेल्फेअर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी सांगितले की, गेल्या ४–५ महिन्यांपासून वाघोलीतील नागरिकांनी फॉर्म ६ (नवीन नोंदणी) व फॉर्म ८ (सुधारणे/पत्ता बदल) अर्ज सादर केले. परंतु ठोस कारण न देता हे अर्ज शिरूर तहसील कार्यालयात प्रत्यक्ष हजेरीसाठी पाठवले जात आहेत. हे कार्यालय वाघोलीपासून सुमारे ५० किमी अंतरावर असल्याने, अनेक नागरिक, विशेषतः वयोवृद्ध, महिला व नोकरदार वर्ग, प्रत्यक्ष हजेरी लावू शकत नाहीत. परिणामी, मोठ्या प्रमाणात अर्ज फेटाळले जात आहेत.

वाघोलीत मागील १५ वर्षांपासून स्थानिकांनी शासनाचे सर्व प्रकारचे कर, शुल्क आणि सेस वेळेवर भरले असूनही मूलभूत नागरी सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. येथे अनेक नागरिक महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील वेगवेगळ्या भागांतून स्थलांतरित होऊन स्थायिक झाले आहेत.

निवडणूक अधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना मतदार यादीत समाविष्ट करणे, आणि प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क सुनिश्चित करणे. परंतु, कायदेशीर रित्या सादर केलेल्या अर्जांवर सुनावणी घेण्यासाठी लोकांना जबरदस्तीने ५० किमी दूर शिरूर येथे बोलावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन आहे. प्रत्यक्षात, ही पडताळणी प्रक्रिया वाघोली किंवा जवळच्या परिसरातच राबवली पाहिजे.

यामुळे केवळ वेळ आणि पैशांची नासाडी होत नाही, तर नागरिकांचा मूलभूत हक्क डावलला जातो. निवडणूक अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत का, हेही एक गंभीर प्रश्न आहे.

मुख्य समस्या:

  1. मोठ्या प्रमाणावर अर्ज फेटाळणे — अर्जांना एकतर्फी नकार.
  2. अन्यायकारक पडताळणी प्रक्रिया — अपारदर्शक, पक्षपाती आणि अमानवी.
  3. नागरिकांचा मताधिकार डावलला जातो — शेकडो युवक, महिला, वयोवृद्ध यांना यादीतून वगळणे.

वाको वेल्फेअर असोसिएशनच्या मागण्या:

  1. शिरूर निवडणूक विभागातील प्रक्रियेची तात्काळ चौकशी व्हावी.
  2. वाघोली परिसरातच स्थानिक पडताळणी सुविधा उपलब्ध करावी.
  3. व्हिडिओ कॉल किंवा डिजिटल पडताळणीसारख्या पर्यायी सुविधा लागू कराव्यात.
  4. अन्यायकारक पद्धतीने नाकारलेले अर्ज पुन्हा तपासून मंजूर करावेत.

या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाघोलीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जर हा अन्यायकारक प्रकार तात्काळ थांबवला गेला नाही, तर नागरिकांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे, असा इशारा वाको वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा गौरव

पुणे : ज्ञान आणि संघर्ष सेवेचा सुगंध म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. त्यांनी सद्गुणांची पेरणी करत उपेक्षित, कष्टकरी, दुर्लक्षित, वंचित बहुजनांसाठी कार्य केले. ते क्रांतिकारक वृत्तीचे तसेच संवाद आणि संघर्षाचे प्रतिक होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श ठेवून डॉ. बाबासाहेब कांबळे संतांच्या समतेचा समर्पणातून विचार करत कार्य करत आहेत, अशा शब्दात डॉ. सबनीस यांनी त्यांचा गौरव केला.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा आज (दि. 2) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य आशा कांबळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नेते विलास लेले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख, कार्याध्यक्ष विलास पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे ,ज्येष्ठ सल्लागार कुमार शेट्टी, सचिव अविनाश वाडेकर उपाध्यक्ष प्रवीण शिखरे ,
मंचावर होते. पंचशील शाल, संविधान ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब कांबळे यांचे कार्य संत आणि परिवर्तनाच्या परंपरांची पेरणी करणारे आहे. त्यांचे कार्य फक्त संतत्वापर्यंत पोहोचलेले नसून ते छत्रपती शाहूंच्या कार्यापर्यंत पोहोचले आहे. समाजात वाईट कृती घडत असताना सेवा आणि समर्पण भावाने केलेले कार्य गौरवास्पद आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, रिक्षाचालक, फेरीवाले, गोरगरीबांकरीता डॉ. कांबळे यांनी संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब कांबळे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील ज्या वंचित, बहुजन, कष्टकरी समाजासाठी कार्य केले त्याच समाजासाठीच मी 25 वर्षे अविरतपणे कार्य करत आहे. त्यामुळे माझा हा सन्मान कष्टकऱ्यांना अर्पण करतो. घरात वारकरी परंपरा असल्यामुळे आजोबांनी हरिपाठ हाती देऊन माझ्यावर अध्यात्माचे संस्कार केले. त्यातूनच मीही वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ झालो. प्रवचन, कीर्तन करू लागलो. माळकरी असूनही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो.

माता रमामाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पतीच्या मागे खंबिरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पतीच्या कार्याचा अभिमान आहे, असे आशा कांबळे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार आणि आभार प्रदर्शन लता राजगुरू यांनी केले. कवी भगवान धेंडे यांनी गायलेल्या संविधान गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहसचिव निशांत भोंडवे, सचिव विल्सन मस्के, संघटक अंथोनी फ्रान्सिस अण्णा, संघटक आनंद वायदंडे, उपाध्यक्ष अमीर हमजा, सहकार्यध्यक्ष अल्ला बकश शेख, मध्यवर्ती विभाग अध्यक्ष विजय पाटील व त्यांचे सर्व सहकारी, राजू शेख, गणेश कांबळे रमेश इंगळे फिरोज यांनी परिश्रम घेतले.

सरकारला मुलांचे मानसशास्त्र कळत नाही

प्रख्यात बालशिक्षणतज्ञ रमेश पानसे यांचे मत : रोटरी क्लब पर्वती, पुणे तर्फे उत्कृष्ट कृतज्ञता पुरस्कार प्रदान

पुणे: दोन भाषांसह तिसरी भाषा पहिलीलाच मुलांवर लादणे हा सरकारचा मूर्खपणा आहे.  त्यांना मुलांचे शिक्षण, मेंदू, मानसशास्त्र कळत नाही, असे जर आपले राजकीय पुढारी कर्ते करविते झाले तर देशाचे फार काही बरे होईल असे वाटत नाही. देशामध्ये मुले रोज शाळेत जातात असे, आदर्श वातावरण असले तरी ६५ टक्के विद्यार्थी तिसरी-चौथीत जाऊन ही पुरेसे लेखन वाचन त्यांना येत नाही. हा पायाभूत पातळीवरचा फार मोठा प्रश्न आहे, असे मत प्रख्यात बालशिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब पर्वती, पुणे तर्फे उत्कृष्ट कृतज्ञता पुरस्कार रमेश पानसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पर्वतीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली खिरे, सचिव मानसी कऱ्हाडकर, ज्ञान प्रबोधिनीचे गिरीश बापट, श्री देव देवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत उपस्थित होते. सन्मानपत्र, पुणेरी पगडी, उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.

रमेश पानसे हे महाराष्ट्राचे एक नामवंत बाल-शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पदवीधर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून केली. महाराष्ट्रातील मुलांचे भविष्य शास्त्रीय बाल शिक्षणाने आकारास यावे यासाठी अर्थशास्त्र सोडून बाल शिक्षणात ते कार्यरत झाले. आदिवासी भागात बालशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. शिक्षण आणि आनंद वेगवेगळे नसून एकच आहेत, ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. भारतातील प्रचलित शिक्षण पद्धती आणि बाल मानसशास्त्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यातील तफावत कमी करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमेश पानसे म्हणाले, लहान मुलांचे शालेय शिक्षणाचे शास्त्रीय महत्त्व वेगाने समजू लागले आहे. शास्त्रीय बाल शिक्षणात जास्तीत जास्त गुंतवणूक फायद्याची असते असेही त्यांनी सांगितले. शालेय काळ हा मुलांची प्रतिभा वृद्धिंगत करण्याचा काळ असतो. जेव्हा त्या काळात मुलांना काहीच मिळत नाही अशी मुले मागासलेली राहतात.

गिरीश बापट म्हणाले,  मुलांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचे शिक्षण त्यांना द्यायला पाहिजे. बालशिक्षणातील हिरकणी हा प्रयोग सध्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू आहे.  घरातील वस्तू वापरून कसे शिक्षण देता येईल, हे मातेला सांगितले जाते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून  बालशिक्षण प्रयोग केले जात आहेत.

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियाअर्जाच्या वेबसाईटची क्षमता वाढवा

प्रवेश रखडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्या-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : राज्य शासनाची वेबसाईट बंद असल्याने सुमारे १५हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली असून त्यांचे महाविद्यालयीन प्रवेश मार्गी लावून त्यांना प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज (बुधवारी) विधानसभेत मांडली.

पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मे,जून,जुलै महिन्यांमध्ये सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू होते. या प्रवेश प्रक्रियेसाठी विविध दाखले जसे की रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, इत्यादी काढण्यासाठी विद्यार्थ्यांना राज्याच्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात. पण यावर्षी राज्याची वेबसाइट दि. २५ मे २०२५ ते 3 जून २०२५ पर्यंत बंद होती, परिणामी पुणे शहरातील १५हजार विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले नसल्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली गेली, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

मे, जून, जुलै महिन्यात जेव्हा दाखले काढण्याची वेळ येते तेंव्हा वेबसाईट बंद पडते आणि विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडते. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप होतो. यासाठी राज्य शासनाने या वेबसाईटची तांत्रिक क्षमता वाढवणे गरजेचे असून विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी अलका कांबळे.

पुणे (दि.१) रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी अलका कांबळे यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष भारती डोळे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.अभिषेक जाधव यांची सचिवपदी निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क इन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, सहाय्यक प्रांतपाल संजीव कारंजकर आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष अलका कांबळे आगामी काळात एकांकिका स्पर्धा, पर्यावरण आरोग्य या विषयी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी–उपमुख्यमंत्री अजित पवार

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये
-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 2 :- शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत म्हणाले की, विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतंच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी


पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराज बंजारा कल्याण समितीच्या वतीने त्यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्याचप्रमाणे लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी रमेश चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सुनील राठोड, रविराज राठोड, स्वप्नील चव्हाण, राहुल चव्हाण, निशिकांत चव्हाण, तुषार चव्हाण, गोविंद चव्हाण, अक्षय चव्हाण, भारत पवार, विग्नेश राठोड, देवन चव्हाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मॅटर ऐरा पुण्यात लॉंच — भारताच्या दुचाकी राजधानीत पहिली गिअर इलेक्ट्रिक बाईक, सणासुदीच्या तोंडावर दमदार आगमन

पुणे, २ जुलै २०२५ – भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कंपनी मॅटर ने आज आपल्या क्रांतिकारी इलेक्ट्रिक बाईक ऐरा च्या पुणेतील अधिकृत लॉंचची घोषणा केली. अभियांत्रिकी परंपरा, समृद्ध उत्पादन तंत्र आणि मोटरसायकलप्रेमींच्या जोशात असलेल्या समुदायामुळे, पुणे — भारताची दुचाकी राजधानी — हे मॅटरसाठी या भविष्यकालीन बाईकच्या प्रवासाची योग्य सुरुवात ठरते.
भारताची पहिली गिअर इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून ओळखली जाणारी ऐरा आता पुण्यात उपलब्ध झाली आहे. परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेल्या या शहरासाठी, ही एक प्रेरणादायी आणि प्रतीक्षित भेट ठरली आहे.

ऐरा ची बुकिंग्स आता www.matter.in वर सुरू झाल्या आहेत. पुण्यात, ऐरा 5000+ ही बाईक ₹1,93,826 (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ‘इलेक्ट्रिक फ्युचर’चा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

“पुण्यातील राईडर्स मोबिलिटीचं भविष्य स्वीकारण्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मॅटरसारख्या टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन ब्रँडसाठी पुणे हे केवळ बाजारपेठ नाही, तर एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आमची हायपरशिफ्ट गिअरबॉक्स प्रणाली, लिक्विड-कूल्ड ड्राइव्हट्रेन आणि रायडर-फर्स्ट टेक प्लॅटफॉर्म हे केवळ वैशिष्ट्ये नाहीत — ती एका नव्या युगाची सुरुवात आहेत. यांच्याद्वारे आम्ही मोटरसायकलिंगचा अनुभव नव्याने परिभाषित करत आहोत.”
— अरुण प्रताप सिंग, फाऊंडर आणि ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मॅटर

लवकरच पुण्यात मॅटरचं ‘एक्सपीरियन्स हब’ देखील सुरू होणार आहे, जिथे राईडर्सना ऐरा ची टेस्ट राइड घेता येईल, उत्पादन तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येईल आणि ब्रँडच्या तंत्रज्ञान व विचारधारेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. हे हब मोटरसायकलप्रेमींसाठी एक प्रेरणादायी आणि सामूहिक जागा ठरेल.

MATTER AERA 5000+ – पॉवर. प्रिसीजन. प्रगती.
AERA 5000+ ही केवळ भारताची पहिली गिअर इलेक्ट्रिक बाईक नाही – तर ती एक संपूर्ण नवीन रायडिंग श्रेणी तयार करते. स्थानिक संशोधन व विकासातून साकारलेली ही बाईक, शक्ती, नियंत्रण आणि कनेक्टेड बुद्धिमत्ता यांचा अद्वितीय संगम सादर करते, जो आजपर्यंतच्या कोणत्याही ईव्हीमध्ये दिसलेला नाही.
मुख्य वैशिष्ट्ये:
● HyperShift ट्रान्समिशन – जगातील पहिली ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली इलेक्ट्रिक बाईक, ज्यामध्ये ३ राइड मोड्स व १२ एकूण कॉम्बिनेशन्स
● लिक्विड-कूल्ड पॉवरट्रेन – भारतीय रस्ते व हवामान लक्षात घेऊन डिझाइन केलेली, उत्कृष्ट थर्मल एफिशिएन्सीसह
● स्मार्ट ७” टचस्क्रीन डॅशबोर्ड – नेव्हिगेशन, राइड डेटा, म्युझिक कंट्रोल आणि OTA अपडेट्ससह
● ५kWh हाय-एनर्जी बॅटरी पॅक – IP67 रेटिंगसह, प्रमाणित १७२ किमी (IDC) पर्यंतची रेंज
● त्वरित अ‍ॅक्सेलरेशन – ० ते ४० किमी/ता फक्त २.८ सेकंदांत; प्रचंड टॉर्क व जलद प्रतिसाद
● प्रगत सुरक्षा व आराम – ड्युअल डिस्क ब्रेक्ससह ABS, ड्युअल सस्पेन्शन आणि स्मार्ट पार्क असिस्ट
● MATTERVerse अ‍ॅप – राइड अ‍ॅनालिटिक्स, रिमोट लॉक/अनलॉक, लाईव्ह लोकेशन, जिओ-फेन्सिंग इत्यादी
● स्मार्ट की – कीलेस रायडिंगचा अनुभव
● अत्यल्प ऑपरेटिंग खर्च – केवळ २५ पैसे/किमी; तीन वर्षांत ₹१ लाखांपर्यंतची बचत

About MATTER
MATTER Motor Works, an electric mobility startup founded in January 2019 in Ahmedabad, is redefining the future of mobility with its “Innovate in India” approach. Committed to building an independent EV ecosystem, MATTER explores every facet of electric mobility to drive India towards a sustainable future.
Its flagship product, AERA, World’s first manufactured geared electric motorbike, has been recognized as the “Editors’ Choice Electric Motorcycle of the Year” by Top Gear India, alongside prestigious accolades like “EV Bike of the Year 2025” by ACKO Drive and “Innovation Startup of the Year” at the Outlook Business Spotlight Awards.
Powered by a team of over 600 innovators, MATTER is at the forefront of cleaner mobility through in-house technology and groundbreaking innovations. With over 350 patent filings and 75 granted patents, spanning powertrain, liquid cooling, battery management, gearbox technology, charging infrastructure, and manufacturing automation, MATTER is shaping the evolution of India’s EV landscape—driving the nation towards energy independence.

१०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई-नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. २ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील कुर्ला (पश्चिम) एल.बी.एस. रोड व साकीनाका या परिसरात १ जुलै ते ३० जून या कालावधीत १०८ अनधिकृत हॉटेल्स आणि ८१ लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, या अनधिकृत हॉटेल्स आणि लॉजिंगनी पुन्हा बांधकाम करू नये, यासाठी त्यांच्या पाण्याच्या आणि ड्रेनेजच्या लाइन्स तोडण्यात आल्या आहेत. तथापि यापैकी ७३ जण न्यायालयात गेल्याने त्यांच्यावरील कारवाई थांबली आहे. या सर्व प्रकरणी दोन स्वच्छता निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर एक कनिष्ठ अभियंता आणि एक मुकादम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी महानगरपालिकेचे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेला कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील हॉटेल सिटी किनारामध्ये लागलेल्या आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येकी ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल आणि ही रक्कम हॉटेल मालकाकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. या प्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. अनधिकृत बांधकामांबंधीच्या कारवाईबाबतचा अहवाल आठ दिवसात मागवून त्याबाबत सभागृहाला अवगत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकशाही, सुशासन व शांततेसाठी डॉ. राहुल कराड ‘एक्सलन्स अवार्ड’ ने सन्मानित.

पुणे दि.२ जुलै: ‘लोकशाही, सुशासन आणि शांतते’च्या क्षेत्रात अनुकरणीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल आणि पुणे बार असोसिएशनच्या वतीने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना ‘एक्सलन्स अवार्ड’ ने सन्मानीत करण्यात आले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष अ‍ॅड. विठ्ठल बी. कोंडे-देशमुख आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत डी. झंजड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल (बीसीएमजी) ने पुणे बार असोसिएशनच्या सहकार्याने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. अभय एस. ओक यांच्या सन्मानार्थ कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकांनद सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. राहुल कराड यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमात देशभरातील १५०० पेक्षा अधिक न्यायाधीश, वकिल आणि बॅरिस्टर यांनी उपस्थिती दर्शविली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्य न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान हे उपस्थित होते. तसेच न्या. महेश सोनक, न्या. संदीप मारणे, न्या. आरिफ एस.डॉक्टर, मुंबई उच्च न्यायालयच्या न्या. रेवती मोहिते-डेरे व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचे अनिल सी.सिंह हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना राहुल कराड म्हणाले,” राजकारणात सुशिक्षित नागरिकांनी येणे गरजेचे आहे. कास्टिझम, करप्शन आणि कम्यूनिझम सारख्या गोष्टींना तिलांजली देऊन लोकशाही बलशाली करण्यासाठी देशातील हजारो लॉ मेकर्स कार्य करीत आहेत. गव्हर्नस आणि राजकीय पार्ट्यांमध्ये कसे अनुकलनीय बदल घडविता येईल यावर विचार विमर्श होणे गरजचे आहे. यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पुढाकाराने देशात प्रथमच १८०० पेक्षा अधिक आमदारांच्या संमेलनाचे आयोजन ही करण्यात आले होते.”
न्या. उज्वल भुयान म्हणाले,” लोकशाहीचा पाया म्हणजे कायद्याचे राज्य असते. त्यासाठी राजकीय हस्तक्षेपापासून स्वतंत्र निर्णय घेऊ शकतील अशा न्यायाधीशांसह स्वतंत्र न्यायव्यवस्था गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये न्यायिक पारदर्शकता व न्यायालयीन जबाबदारी महत्त्वाची आहे.”
न्या. अभय ओका म्हणाले,” न्यायाधीशांची संख्या कमी असल्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेत खटले निकाली काढण्यात विलंब होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विशिष्ट क्षेत्रांच्या लोकसंख्येचा विचार करून न्यायाधीशांची नियुक्ती करावी.

टाटा नेक्सॉन आणि हंटर ने जायचे अन घरफोड्या करायचे,कल्याणी,दुधानी,पुरी गजाआड

पुणे-चार चाकी गाडीमध्ये येवून घरफोडी करणारे आरोपीना जेरबंद करून त्यांचेकडून सोन्या-चांदिचे दागिने असा एकुण ३७,००,०००/-रू. कि. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . गणेश अर्जुन पुरी वय ३३ वर्षे रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी झेड कॉर्नर मांजरी पुणे. मुळ ममदापुर पाटी हनुमान मंदिराजवळ, ता. लातुर जि. लातुर ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याआधारे रविसिंग शामसिंग कल्याणी वय २७ वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी हडपसर पुणे. निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी वय ४४ वर्षे रा.मु.पो. वांगणी ता. अंबरनाथ जि. ठाणे अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी सांगितले कि,’दि.१४/०६/२०२५ रोजी फिर्यादी हे राहते घराला लॉक करुन तूळजापूर अक्कलकोट येथे गेलो असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि. (गुन्हे), निलेश जगदाळे, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवण्यात आली. हडपसर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार दिपक कांबळे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोढे, यांनी फिर्यादी यांचे सोसायर्टी मध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीकरून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त केले.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. त्या दरम्यान अधिक प्राप्त झाले फुटेज मधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. संशयीत इसमांचे प्राप्त फुटेज आधारे सदर भागात केलेल्या अधिक तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहीती हडपसर तपास पथकास मिळून आली. त्याआधारे संशयीत १) गणेश अर्जुन पुरी वय ३३ वर्षे रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी झेड कॉर्नर मांजरी पुणे. मुळ ममदापुर पाटी हनुमान मंदिराजवळ, ता. लातुर जि. लातुर ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याआधारे २) रविसिंग शामसिंग कल्याणी वय २७ वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी हडपसर पुणे. ३) निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी वय ४४ वर्षे रा.मु.पो. वांगणी ता. अंबरनाथ जि. ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडे गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता तपासातील हकीगत अशी पुढे आली की, आरोपी यांनी गुन्हा करण्या करीता टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला. सदर गाडी ही सुमारे ८-१० महिन्यापुर्वी आरोपी याच्या भावाने विकत घेतो असे सांगून घेतली होती परंतु सदरगाडी ही नावावर केली नव्हती. तसेच आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्त करून बनावट नंबर प्लेट गाडीला लावली होती.तसेच तपासा मध्ये माग लागू नये या करीता घरफोडी करून दिशाभूल करण्यासाठी आरोपी हे वरिल मार्गाने गेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांचे कडून १) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५७०/२०२५ भा. न्या. सं. कलम ३३१ (३),३०५,३१७(२), ३ (५),२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५६९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३),३०५,३१७ (२), ३ (५) ३) कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गु.र.नं ५८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४),६२,३ (५) ४) सीडको पोलीस स्टेशन संभाजी नगर शहर ४४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) असे गुन्हे उघडकीस आले आहेत.अशा चार घरफोड्या उघडकीस आल्या आहेत
आरोपींकडून आता पर्यंत एकुण ३७,००,०००/-रू. किं. चा माल जप्त केला असून त्यामध्ये किं. रू २२,५०,०००/-रू.किं.चे सोन्या-चांदीचे दागिने तसेच १४,५०,०००/-रू. किं.ची गुन्ह्या करीता वापर केलेली नेक्सॉन गाडी, हंटर मोटारसायकल असा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले, पोनि (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेड, व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, अमोल जाधव यांचे पथकाने केली आहे.

लोहियानगर मध्ये पकडला सुमारे ५ लाखाचा गुटखा

पुणे- खडक पोलिसांच्या हद्दीत लोहीयानगर मध्ये छापा मारून ४,८७,२०४ रुपयांचा अवैध गुटखा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आणि रियाज नुर खान, वय ४० वर्षे, रा. ५४ ए.पी. लोहीयानगर, गल्ली नं ०१, राममंदीर, पुणे याला अटक केली .

पोलिसांनी सांगितले कि,’ खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम_यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने लोहियानगर गल्ली नं-०१ राम मंदिर जवळील पठाण पान शॉप मध्ये अवैद्य गुटखा विक्री चालु असल्याचे निदर्शनास आल्याने दुकानावर छापा घातला असता सदर दुकानामध्ये प्रतिबंधीत गुटखा पान मसाला असे एकुण ४,८७,२०४/- रु. किं. चा मुद्येमाल प्रतिबंधीत पदार्थाची विक्री करीता साठवणूक करून ठेवलेला मिळून आला. त्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशनला दि.२५/०६/२०२५ रोजी गुन्हा रजि. नं. ३२४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५,३ (५) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२) (अ), ३१ (१),२६ (२) (१) २६ (२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियगन २.३.४ चे उल्लंघन केले आहे. तसेच सह वाचन ३(I) ZZ चे उल्लंघन केल्याने ५९ चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्हयात गुटखा धारक आरोपी रियाज नुर खान, वय ४० वर्षे, रा. ५४ ए.पी. लोहीयानगर, गल्ली नं ०१, राममंदीर, पुणे, यांचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याने गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, व पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजून कोणाकडे अवैध गुटखा सुरू आहे सदर आरोपी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ०२ दिवस पोलीस कस्टडी दिली होती. सध्या आरोपी याला कोर्टाने न्यायालयीन कस्टडी दिली आहे. तरी याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
नमूद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे ,पोलीस उप-आयुक्त परि ३. पुणे शहर अति. कार्य परि.१ ,संभाजी कदम ,सहा. पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अनिल फरांदे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, विश्वजित गोरे, योगेश चंदेल, निलेश दिवटे, शोएब शेख, मयूर काळे यांचे पथकाने केली आहे.

भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार

भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची
सूत्रे


मुंबई, 01 जुलै 2025भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.
वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.
या पुढील काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावयाची आहे. भाजपाची विचारधारा निर्मळ आणि प्रवाही आहे. देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आपणा सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत. आता 2029ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला पायाला भिंगरी लावून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनविण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली त्यावेळी ही जबाबदारी आपल्याला पेलवेल की नाही असे वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. दीड कोटी सदस्य नोंदणीचा विक्रम सर्वांच्या सहकार्याने करता आला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही याची खंत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या.
51 टक्के मते घेऊन सर्वाधिक संख्येने महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा संकल्प रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साध्य करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सर्व प्रदेश सरचिटणीस, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी सांगितले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पक्षाची भक्कम बांधणी करत पक्षाला विजयपथावर नेले. रवींद्र चव्हाण हे आगामी निवडणुकीत सर्व ताकदीने काम करून सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.
हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात, वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी मुंबईत घोषित केली.
श्री. चव्हाण यांची निवड जाहीर केल्यानंतर श्री. किरण रिजीजू यांनी त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले. मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा. रविंद्र चव्हाण यांना पक्षाचा ध्वज देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पर्यावरण मंत्री व राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते.

भाजपा हीच माझी ओळख – रवींद्र चव्हाण

नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की भारतीय जनता पार्टी हीच माझी ओळख आहे. कारण मला पक्षानेच घडवले आहे. मला घडविणाऱ्या पक्षासाठी काहीही करण्याची आपली तयारी आहे.

राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!

राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’

रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’

चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ” चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून माझी अशी इच्छा होती की, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे यावेत आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. ‘येरे येरे पैसा’ला रोहित शेट्टी आले होते आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे यावेळीही त्यांनी यावे, असे मनात होते. ‘येरे येरे पैसा ३’मध्ये आमची जबाबदारी तिपटीने वाढली होती. तिसरा भाग बनवताना आम्ही हेच लक्षात घेतलं आणि त्यामध्ये हसवणं, विचार करायला लावणं आणि गुंतवून ठेवणं, या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. मला खात्री आहे, तिसऱ्या भागावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील.”

निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणतात, “येरे येरे पैसा’ ही फक्त मालिका नाही, ही मराठी सिनेमाच्या कमर्शिअल यशाची ओळख आहे. यावेळी आम्ही या या यशाची उंची आणखी वाढवली आहे. मराठी प्रेक्षक आता केवळ कौटुंबिक कथा पाहात नाहीत, त्यांना वेगळा अनुभव हवा असतो आणि ‘येरे येरे पैसा ३’ हा एक अफलातून अनुभव देईल, याची खात्री आहे.”

धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता यांनी सांगितले, “मराठी सिनेमा आता खूप वेगाने बदलत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट त्याचेच एक उदाहरण आहे आणि आम्हाला अशा दमदार मराठी चित्रपटाचा भाग होता आलं, हे भाग्य वाटतं.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

मुंबई-महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत.यावेळी आशिष शेलार म्हणाले, रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही.मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद अशा विविध स्तरांवरील निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणून भाजपला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आता चव्हाण यांच्यावर असणार आहे.

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला. ओबीसी चेहरा असणाऱ्या बावनकुळेंच्या नेतृत्वात पक्षाने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. बावनकुळे यांनी भाजपची स्थानिक पातळीवरील रचना मजबूत केली. 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य व 5 लाख सक्रिय कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवले. बूथ स्तरापासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका आणि नियुक्त्यांचे नियोजन केले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असल्या तरी, बावनकुळेंनी त्यातून धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत बूथस्तरीय व्यवस्थापन करून भाजपला यश मिळवून दिले.