Home Blog Page 474

पाणीपुरी विक्रेत्याचा मुलगा बनला आयआयटीयन

अकरावी नापास, रेक्टल प्रोलॅप्सचे निदान होणे ते आयआयटी रुरकीपर्यंतचा प्रवास;

कल्याण:
कल्याण येथील 19 वर्षीय विद्यार्थी हर्ष गुप्ताने हलाखीची आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक अडथळे आणि आजारपणाला
तोंड देत प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रुरकी येथे प्रवेश मिळवला आहे. त्याचा हा प्रवास
परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो किती सक्षम आहे, हे दाखवतोच पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील प्रतिभा पुढे
आणण्यात कोटा येथील मोशन एज्युकेशनने बजावलेली परिवर्तनकारी भूमिका देखील प्रामुख्याने सांगतो.
हर्ष हा सामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडिलांची पाणीपुरीची गाडी आहे. त्यांचे सहा जणांचे कुटुंब ठाणे
जिल्ह्यातील कल्याण येथे एका लहान दोन खोल्यांच्या चाळीत राहते. मर्यादित साधने आणि स्पर्धा परीक्षांची फारशी
माहिती नसल्याने, कोविड-19 च्या काळात दहावी पास झाल्यानंतरच हर्षला आयआयटीबद्दल पहिल्यांदा माहिती
मिळाली. पण, त्याने मोशन एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला होता झाला तोवर अकरावीचा अभ्यासक्रम जवळजवळ पूर्ण
झाला होता. त्यामुळे तो हाच अभ्यास पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होता.
एवढे प्रयत्न करूनही तो अकरावीच्या परीक्षेत नापास झाला, ज्यामुळे नातेवाईकांकडून त्याच्यावर टीका झालीच पण
कुटुंबाने देखील त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, मोशन एज्युकेशन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्याला
पुन्हा विश्वास देत, त्याच्यातील आत्मविश्वास जागवत शैक्षणिकदृष्ट्या त्याला लागेल ती मदत आणि वैयक्तिक
मार्गदर्शन केले.
अभ्यास जोमाने सुरू असतानाच, हर्षला रेक्टल प्रोलॅप्स, हा एक त्रासदायक आणि वारंवार उद्भवणारा आजार
असल्याचे निदान झाले. उपचारांसाठी सातत्याने रुग्णालयात जावे लागत असल्याने याचा परिणाम त्याच्या
अभ्यासावर झाला. आजारपणामुळे त्याचा विश्रांतीचा कालावधी देखील वाढला. हर्षसाठी अत्यंत अवघड असलेल्या
या काळातही, मोशनच्या प्राध्यापकांनी, विशेषतः जेईई विभागाचे प्रमुख आरआरडी सरांनी त्याला सातत्याने
भावनिक आधार दिला आणि शैक्षणिक मार्गदर्शन केले.
या सगळ्यावर मात करून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असतानाच मोठ्या परीक्षांपूर्वी त्याला पुन्हा एकदा एका
संकटाला तोंड द्यावे लागले. परीक्षा तोंडावर असतानाच त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन झाले. तरीही हर्षने
अभ्यासावरील आपले लक्ष ढळू दिले नाही. एका वर्षाचा ड्रॉप घेऊन पुन्हा मोशन एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर,
त्याने जेईई ऍडव्हान्समध्ये दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले आणि आयआयटी रुरकीमध्ये प्रवेश मिळवला. विशेष
म्हणजे, त्याने जेईई मेनमध्येही 98.9 टक्के गुण पटकावले होते.
“आयुष्यात मी अशा काही प्रसंगांना तोंड दिले जेव्हा मी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकलो होतो. पण मोशनने
कधीही माझा हात सोडला नाही. कित्येकदा तर मी आत्मविश्वास गमावला तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला,”
असे हर्ष सांगतो. मोशन एज्युकेशनच्या विद्यार्थी-प्रथम दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर समाजाच्या सर्व
स्तरातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर सगळ्या संकटात पाठिंबा देण्याच्या मोशनच्या ध्येयाचे हे
एक प्रभावी उदाहरण आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षक एन.व्ही. सर (नितीन विजय) यांच्या नेतृत्वाखाली, मोशन एज्युकेशनने पुन्हा एकदा स्पर्धात्मक
परीक्षेच्या क्षेत्रातील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे आणि जेईई ऍडव्हान्स्ड 2025 मध्ये उत्कृष्ट निकाल आणले आहेत.
शैक्षणिक उत्कृष्टता दाखवत, मोशनच्या 6 विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम 100 मध्ये स्थान मिळवले, 23 विद्यार्थ्यांनी टॉप

500 मध्ये आणि 47 विद्यार्थ्यांनी टॉप 1000 मध्ये स्थान मिळवले. संस्थेची शिकवण्याची
पद्धत, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी-प्रथम दृष्टिकोनाचे हे एक शक्तिशाली प्रमाण आहे.
परीक्षेला बसलेल्या मोशनच्या 6,332 विद्यार्थ्यांपैकी 3,231 विद्यार्थी पात्र ठरले. ज्यामुळे संस्थेचे पात्रता गुणोत्तर
51.02% होते – जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. राष्ट्रीय आकडेवारीशी याची तुलना केली तर : अंदाजे 1.9 लाख
विद्यार्थ्यांपैकी फक्त 45,000 (23.68%) विद्यार्थी पात्र ठरले.
हा उत्कृष्ट निकाल मोशन एज्युकेशनच्या मजबूत शैक्षणिक परिसंस्थेवर आणि कोचिंग उद्योगात नवीन मानके स्थापित
करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.

जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगालापुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पुण्यात होणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग, जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार

मुंबई, दि. ३ राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुरच्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे या भव्य स्पर्धेमुळे शक्य होणार आहे. पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितचं जागतिकस्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पुणे आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफ आय ) यांच्यात पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर २०२६ च्या आयोजना साठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुख्य सचिव राजेश कुमार, सीएफ आयचे अध्यक्ष पंकज सिंघ, जनरल सेक्रेटरी महिंद्र पाल सिंघ यांच्या सह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासीक वारसा लाभलेली, परंपरा, संस्कृती आणि निसर्गसौंदर्यासह राज्याचे उत्पादन आणि तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यात या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील संधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यासोबतच राज्यात पर्यटकांची संख्या अधिक वाढण्यास आणि त्याद्वारा राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळण्यासाठी देखील ही स्पर्धा सहाय्यक ठरणारी आहे. पुण्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करणे यातुन शक्य असून जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव या स्पर्धैमुळे स्थापित होणार आहे, ही निश्चितच खुप आनंदाची बाब आहे. जगभरातील दोनश देशातून या सायकलिंग क्रीडा प्रकाराचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत या स्पर्धैच्या निमित्ताने पुणे येथील निसर्गसौंर्दय, संस्कृती,परंपरा या सर्व गोष्टी पोहचण्यास मदत होणार असून त्यातुन पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होण्याची संधी आहे. तसेच ग्रामीण पुण्यात शाश्वत विकास आणि कनेक्टिव्हिटी, तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेची संस्कृती वाढवण्यास सहायक असलेली ही सायकलिंग स्पर्धा लोकांना एक आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्यास प्रोत्साहन देणारे पूरक वातावरण निर्माण करणारी आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सायकलिंगचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न या करारातून होईल. आंतरराष्ट्रीय सायकलिंग साठी पुणे शहराचे योगदान मोठे राहिलं, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पर्धैच्या आयोजनाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. या स्पर्धैस सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांची मान्यता प्राप्त असून युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (UCI), स्वित्झर्लंड यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. UCI च्या मान्यतेनंतर लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी पात्रता स्पर्धा म्हणून नामांकनास पात्र ठरणार आहे. या स्पर्धैच्या माध्यमातून सह्याद्री पर्वत, किल्ले, ग्रामीण निसर्ग, जलाशय आणि वन्यजीव यासारख्या कमी परिचित तालुक्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचारास मदत होणार आहे.

पुणे जिल्ह्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती व साहसी खेळांसाठी (ADVENTURE SPORTS) पुरक वातावरण निर्मितीस चालना मिळेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिक समुदायांसाठी रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास यातुन साध्य होणार आहे.

यावेळी नियोजन अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव क्रीडा अनिल डिग्गीकर, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस फक्त उद्धव ठाकरे, पवार यांच्याशी करणार चर्चा:राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आघाडी शक्य नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

मुंबई-राज्यात सध्या ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास काँग्रेससाठी आघाडी ठेवणं अवघड होईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीच आघाडीबाबत चर्चा करेल. राष्ट्रवादी जर एनडीएसोबत गेली, तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी त्यांच्यासोबत आघाडी कायम ठेवणे शक्य नाही, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हा कौटुंबिक मुद्दा आहे. मात्र ते एकत्र आल्यास शिवसेनेच्या पारंपरिक मतांची एकजूट होऊ शकते आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत, मात्र त्यांच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. म्हणूनच सध्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही.

राष्ट्रवादीच्या गटविलीनीकरणावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, तोही त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. पण जर हा गट एनडीएमध्ये सामील झाला, तर काँग्रेसला त्यांच्याशी आघाडी शक्य होणार नाही. त्यामुळे आघाडी तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हा सुद्धा कौटुंबिक मुद्दा आहे. कोणी कोणात विलीन व्हायचे आणि त्या पक्षाचा प्रमुख कोण असेल, हे तेच ठरवतील.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शशी थरूर हे परदेशात पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीमंडळाचा भाग होते आणि एक सदस्य म्हणून सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणे, त्यांचे कर्तव्य होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत विशेष आर्थिक समावेशन मोहीम

पुणे, दि. ३ : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत जिल्हा प्रशासन व अग्रणी बँक व्यवस्थापनाच्या समन्वयाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबविण्यात येत आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कळविले आहे.

ही मोहीम भारत सरकार, अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीक विशेषतः ग्रामीण व मागास भागातील महिला, वृद्ध नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यात वित्तीय जागरूकता निर्माण करणे आहे. या उपक्रमात महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम बनवणे तसेच डिजिटल साक्षरता याच्याकडे विशेष लक्ष देणेत येईल.

डिजिटल आर्थिक साक्षरता, जबाबदारीने कर्ज घेणे व परतफेड, ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, जनधन खात्याचे केवायसी नूतनीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती दिली जाणार आहे. अनेकदा नागरिकाना या योजनविषयी माहिती नसते किंवा ते सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सहभागी झालेले नसतात. मेळाव्यादरम्यान सामाजिक सुरक्षा योजनामध्ये सहभाग न घेतलेल्या नागरिकांचे अर्ज भरून घेऊन त्यांना योजनेत समाविष्ट केले जाईल.

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या ग्रामीण शाखा या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतील. सर्व बँक शाखांमार्फत गावोगावी जनजागृती शिबिरे आणि प्रचार कार्यक्रम राबविले जातील. दुर्गम व दुर्लक्षित भागांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाईल. सर्व बँका त्यांना नेमून दिलेल्या गावात मेळावे घेणार आहेत. मेळावे आयोजनासाठी व गावामध्ये माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी यांनी बँक प्रशासनाला मदत करावयाची आहे.

सर्व नागरिक, स्वयं-सहायता समूह, ग्रामस्तरीय अधिकारी, पंचायत प्रतिनिधी आदींना या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी किंवा आपल्या परिसरातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नजीकच्या बँक शाखेशी किंवा पुणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

अनिल अंबानींच्या कंपनीवर एसबीआयची मोठी कारवाई-31,580 कोटी कर्ज फ्रॉड घोषित

कंपनी-संचालकांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई शक्य, सीबीआय-पोलिस केसही:स्टेट बँक २१ दिवसांच्या आत ही फसवणूक रिझर्व्ह बँकेकडे अहवाल स्वरूपात सादर करेल. नंतर प्रकरण सीबीआय किंवा पोलिसांकडे दिले जाईल. त्यानंतरची कारवाई रिझर्व्ह बँक करेल.

मुंबई-उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या कर्ज खात्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ‘घोटाळा’ म्हणून घोषित करणार आहे. बँकेने कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नाव रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) कळवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आरकॉमने शेअर बाजाराला सांगितले की त्यांना एसबीआयकडून २३ जून २०२५ रोजी हे पत्र मिळाले.एसबीआयने म्हटले की, आरकॉमने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. रकमेचे संशयास्पद हस्तांतरण आढळले. कर्जाचा मोठा भाग अनधिकृत कामासाठी वापरला होता. हे कर्ज ऑगस्ट २०१६ पूर्वीचे आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी एसबीआयनेही कंपनीचे खाते फसवणूक म्हणून घोषित केले. सुप्रीम कोर्टाने २७ मार्च २०२३ रोजी ते रद्द केले. डिसेंबर २०२३ मध्ये, बँकेने पुन्हा कारवाई सुरू केली. एखादी बँक एखाद्या खात्याला घोटाळा म्हणून घोषित करते, तेव्हा त्याची माहिती २१ दिवसांत आरबीआयला द्यावी लागते.

कंपनी आणि तिच्या संचालकांना पुढील पाच वर्षांपर्यंत बँका, आर्थिक संस्था किंवा निधीपुरवठा करणाऱ्या अन्य संस्था कर्ज देणार नाहीत. कंपनीने फसवणुकीची रक्कम परत केली, तर कर्जयोग्यतेची पत परत मिळू शकते.

कंपनी व संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकते.नादारी आणि दिवाळखोरी प्रक्रिया कायदा २०१६ नुसार आधीच दिवाळखोरीत आहे. मात्र फसवणुकीचे प्रकार ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचे असल्याने फौजदारी कारवाई शक्य आहे. रिझर्व्ह बँकेचे २०१६ मधील परिपत्रक यासंदर्भात मार्गदर्शन करते. अशाच प्रकारच्या प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात कारवाई झाली होती.

अनिल अंबानी यांच्या वकिलाने एसबीआयच्या निर्णयाला एकतर्फी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन म्हटले आहे. वकिलाने म्हटले की, हे सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाचे निर्णय आणि आरबीआयच्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. ही नोटीस अवैध आहे.

आरएचएफमधून निधी वळवल्याबद्दल सेबीने अनिलना २०२४ ते २०२९ पर्यंत बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली आहे. २०२० मध्ये त्यांनी यूकेच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले. आरकॉमचा चिनी बँकांकडून ७,७०० कोटी रुपयांचा कर्जाचा खटला हरल्यानंतर त्यांनी असे केले.​​​​​​​

एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या रांगेत ६ व्या क्रमांकावर असलेल्या अनिल अंबानींवर देश-विदेशात पैैसे वळवणे, बनावट हमी, कर्ज थकबाकी आदी आरोप आहेत. आरकॉम दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. कंपनीवर ४०,४१३ कोटींचे कर्ज (व्याजासह ७० हजार कोटी रु.) थकीत आहे. बीएसईनुसार रिलायन्स एडीए समूहाच्या चार सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४,५९६ कोटी रुपये आहे. तथापि, रिलायन्सने २०२५ मध्ये ८०० कोटी रु. आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ३३०० कोटींचे कर्ज चुकते करून स्टँडअलोन कर्जमुक्तीचा दावाही केला आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अलीकडेच फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत भारतात फाल्कन २००० जेट विमाने निर्मितीसाठी भागिदारी केली आहे. दसॉल्टने २०२८ पर्यंत भारतात निर्मिती झालेल्या पहिल्या फाल्कन विमानाची डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

महाराष्ट्रात 3 महिन्यांत 767 शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त आणि सरकार गप्प,शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही अन मित्रांना हजारो कोटीची माफी

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात 3 महिन्यांत 767 शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त आणि सरकार गप्प,शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही अन मित्रांना हजारो कोटीची माफी अशा शब्दात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सरकारला प्रश्नार्थक पद्धतीने विचारले की, हा फक्त एक आकडा आहे का? यावेळी राहुल गांधींनी कर्जमाफी बाबतही सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा फक्त एक आकडा आहे का? नाही. ही 767 उध्वस्त घरे आहेत. 767 कुटुंबे कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार गप्प आहे. ते दुर्लक्षित पणे पाहत आहे. शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते आणि डिझेल महाग आहेत पण सरकारी एमएसपीची हमी नाही. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

उद्योजकांच्या कर्ज माफीवरून राहुल गांधींनी सरकारवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या बातम्या पहा, अनिल अंबानींचा 48000 कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलले होते पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्य अर्धे होत चालले आहे. ही व्यवस्था शांतपणे शेतकऱ्यांना मारत आहे. पण मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटूनही सरकारला हे आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. मात्र, या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेची वाट पाहण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत. त्याच वेळी, एकनाथ शिंदे म्हणाले की, जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याबाबत सरकार सतर्क आहे. केवळ कर्जमाफीच नाही तर प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट


मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
दिशा सालियन हिची हत्या व लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. यासंदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शवविच्छेदन अहवालात दिशाच्या शरीरावर कोणताही लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार झाल्याचे संकेत नाहीत. तिच्या मृत्यूचे कारण डोक्याला जबर मार लागल्यामुळे झालेलं आहे.

पोलिसांनी हेही नमूद केलं की, दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या आरोपांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिका फेटाळण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहेदिशा ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती, आणि सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन्ही प्रकरणांना जोडून काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मात्र, आता पोलिसांच्या सखोल तपासानंतर त्या आरोपांना अधिकृतरीत्या खोटं ठरवलं गेलं आहे.

कुरिअर बॉय बनून सोसायटीत घुसला:तोंडावर स्प्रे मारून तरूणीवर अत्याचार; आक्षेपार्ह फोटो काढून पळाला

पुणे: कोंढवा मध्ये एक उच्चभ्रु सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत घरात शिरलेल्या एका 22 वर्षीय तरुणाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची दहा पथके कार्यरत झाली आहे.
याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार एका 28 ते 30 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मूळ अकोलाची रहिवासी असून मागील दोन वर्षापासून पुण्यात भावासोबत राहते.तरुणी कल्याणीनगर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भावा सोबत राहते. तिचा भाऊ परगावी कामानिमित्त गेला होता. बुधवारी (2 जुलै) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी फ्लॅट जवळ दारात आला आणि त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने घराचे सेफ्टी डोअर उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले आणि बँकेचे कुरिअर आहे असे सांगितले.तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले आणि दरवाजा उघडण्यास भाग पाडले .तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अचानक स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिचे डोळे जळजळले त्यानंतर आरोपी तरुण घरात बळजबरीने शिरला.

त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा मेसेज देखील मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत सांगितले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसरात भीतीचे असुरक्षित वातावरण आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. तरुणीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. त्याआधारे आरोपीचा शाेध घेण्यात येत आहे.

अभिनेत्रीच्या मुलाची 57 व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या

0

मुंबई- टीव्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे कांदिवली परिसर चांगलाच हादरला आहे. मुलाने ट्यूशनला जाण्यास नकार दिल्यानंतर देखील आईने त्याला ट्यूशनला जाण्यास सांगितल्याने सदरील मुलाने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

किरकोळ कारणामुळे अनेकदा आत्महत्यांच्या घटना या आधी देखील समोर आल्या आहेत. त्यातच आता मुलाला ट्यूशनला जाण्यास आईने जबरदस्ती केल्याने मुलगा आणि आई मध्ये वाद झाला होता. त्यामुळे मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या 57 व्या मजल्यावरून खाली उडी टाकली. इतक्या उंचीवरून खाली पडल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करणारा मुलगा हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गुजराती सिरियलमध्ये काम करत होती. त्यामुळे कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मुलाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? त्याला उडी मारताना कोणी पाहिले का? या प्रश्नांची उत्तर पोलिस तपासत आहेत. मुलाने रागाच्या भरात सदरील कृत्य केले की, आणखी काही नवीन माहिती समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

राज्यात तणावामुळे 427 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू…

मुंबई–राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्यूटीदरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या ड्यूटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्यूटी व प्रवासात जातात. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग, आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. यात कार्डियाक अरेस्टमुळे ७५ मृत्यू, कर्करोगामुळे ६ मृत्यू झाले आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात २७० हॉस्पिटल्ससोबत टायअप केले आहे.

राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यभरात पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत. तालुकास्तरावरही काम वेगाने सुरू आहे. पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे काम अभूतपूर्व असल्याचे त्यांनी नमूद केले. डीजी लोन योजनेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, गृहमंत्रिपद आल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली असून आता बॅकलॉग निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पद्म पुरस्कार – 2026 या वर्षासाठी नामांकनाची मुदत 31 जुलै 2025 पर्यंत

नवी दिल्ली-प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार-2026 साठी नामांकने/शिफारशी 15 मार्च, 2025 पासून सुरू झाली आहेत. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची शेवटची तारीख 31जुलै 2025 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली  जातील.

पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री, हे पद्म  पुरस्कार,देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार  आहेत. 1954 मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर केले जातात. हे पुरस्कार ‘विशिष्ट कार्याची’ ओळख करून देण्यासाठी प्रदान केले जात असून  कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये/विषयांमध्ये केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि नेत्रदीपक  कामगिरी/सेवेसाठी दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. परंतु डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नसतात.

हे पद्म पुरस्कार “जन पद्म पुरस्कार” म्हणून दिले जाण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्याकरिता, सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नामांकन/शिफारशी कराव्यात,ज्यामध्ये स्व-नामांकनाचाही समावेश आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची ओळख देशाला करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.

पुढे दिलेल्या विशिष्ट पोर्टलवरील उपलब्ध विहित नमुन्यातच ही नामांकने/शिफारशी  उपलब्ध करावी; ज्यात आवश्यक ती  सर्व संबंधित माहिती असणे आवश्यक आहे तसेच त्यात आपण निवडलेल्या व्यक्तीच्या/त्याच्या संबंधित क्षेत्रात/विषयात विशिष्ट आणि अपवादात्मक  कामगिरीविषयी माहिती कंपनी/सेवा स्पष्टपणे (जास्तीत जास्त 800 शब्द)  समाविष्ट करणे आवश्यक  आहे.

या संदर्भातील सर्व तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह निर्दिष्ट संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत विकसित केलेल्या चित्रपट पुनर्संचयित सुविधांचा संजय जाजू यांनी घेतला आढावा

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडिया (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट

“एफ टी आय आय आणि एन एफ ए आय या दोन अशा संस्था आहेत ज्या देशातील चित्रपट आणि मनोरंजन परिसंस्थेला आकार देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एफटीआयआय प्रतिभेला आकार देते, तर एन एफ ए आय त्यांचे काम सर्वोत्तम परिस्थितीत जतन केले जाईल याची खात्री करते” : माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू

पुणे-

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) भेट दिली. ‘विशिष्ट श्रेणी’ अंतर्गत पुण्यातील एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ही त्यांची पहिली भेट होती.

एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

संजय जाजू यांनी एफटीआयआय परिसराचा मार्गदर्शित दौरा केला व त्यादरम्यान त्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध विषयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गतिमान बदल तसेच एफटीआयआयसारख्या संस्थांचे भविष्य घडवण्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलचे आपले विचार मोकळेपणाने आणि अंतर्दृष्टीने मांडले.

भारताच्या सांस्कृतिक आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी चित्रपट व माध्यम शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवोन्मेष आणि शिस्त या दोन्हींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांना संस्थात्मक प्रगती आणि धोरणात्मक संवादाच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या एफटीआयआयच्या सक्रिय शैक्षणिक वातावरणाचे प्रतिबिंब या संवादात दिसून आले. 

या भेटीतून संस्थेला नव्याने प्रदान करण्यात आलेल्या विद्यापीठ दर्जाच्या पार्श्वभूमीवर, व्यापक शैक्षणिक विस्तार, संस्थात्मक स्वायत्तता तसेच सर्जनशील उद्योगांमध्ये राष्ट्रीय योगदानाच्या दिशेने विकसित होत असलेले ध्येय अधोरेखित झाले.

एफटीआयआयला भेट दिल्यानंतर जाजू यांनी एनएफएआयच्या डिजिटायझेशन, पुनर्संचयन आणि संग्रहण सुविधेलाही सविस्तरपणे भेट दिली. त्यांना संपूर्ण प्रक्रियेच्या प्रक्रियात्मक, तांत्रिक आणि इतर पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या संवादादरम्यान ते म्हणाले:

“एफटीआयआय आणि एनएफएआय या दोन अशा संस्था आहेत ज्या देशातील चित्रपट आणि मनोरंजन परिसंस्थेला आकार देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एफटीआयआय प्रतिभेला आकार देत असते तर एनएफएआय त्यांचे काम सर्वोत्तम परिस्थितीत जतन केले जाईल याची खात्री करते. या संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू आहेत कारण मंत्रालय त्यांना सर्व शक्य मार्गांनी पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांची जोपासना करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी),राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) पुणे येथे, संजय जाजू यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. ही मोहीम जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट जतन करणाऱ्या प्रकल्पांपैकी एक आहे.

त्यांनी पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा  अशा दोन्ही विभागांची पाहणी केली. दुसऱ्या टप्प्यामध्ये एनएफएचएम अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक जतन व पुनर्संचय सुविधा आहेत.

सचिवांनी जुन्या चित्रपट रील्सची दुरुस्ती व रासायनिक प्रक्रिया, हाय-रिझोल्युशन स्कॅनिंग आणि भारतीय क्लासिक चित्रपटांच्या पुनर्संचयाचे काम प्रत्यक्ष पाहिले. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि संग्रहण कौशल्य यांचे संयोजन दिसून आले. त्यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी भारताच्या चित्रपट वारशाचे जतन करण्याच्या कामाबद्दल संग्रहालयाच्या भूमिकेचे कौतुक केले.

तसेच त्यांनी सार्वजनिक प्रदर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या थिएटर आणि प्रोजेक्शन रूम, तसेच अभिलेखागार वाचनालयाची सुद्धा पाहणी केली. जिथे त्यांनी चित्रपटपूर्व काळातील दुर्मिळ पोस्टर्स, मासिके आणि काचेच्या प्लेट्सवर छायाचित्र किंवा दृश्यमान माहिती असलेली स्लाईड्स पाहिल्या. त्याचबरोबर त्यांनी स्क्रिप्ट्स, लॉबी कार्ड्स, छायाचित्रे आणि मासिके यासारख्या साहित्याचे सुरू असलेले डिजिटायझेशनची देखील पाहणी केली, जे भारताच्या चित्रपट इतिहासाचे सर्वांगीण व सुलभ दस्तऐवजीकरण सुनिश्चित करत आहे.

शेवटी, संजय जाजू यांनी खात्री दिली की, मंत्रालय भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था आणि एनएफडीसी,एनएफएआय या दोन्ही संस्थांतील उन्नती आणि आधुनिकीकरण प्रकल्पांचे वेळेच्या चौकटीत निरीक्षण करत राहील. या उच्चस्तरीय भेटीद्वारे सरकारच्या गुणवत्तापूर्ण चित्रपट शिक्षण व  भारतीय चित्रपट वारशाच्या जतनासाठी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार झाला.

सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल: रिझर्व्ह बँकेने दूरसंचार विभागाचे आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (एफआरआय) एकत्रित करण्याचा बँकांना दिला सल्ला

नवी दिल्ली-

दूरसंचार विभागाने 30 जून 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले आहे. यामध्ये सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, पेमेंट बँका आणि सहकारी बँकांना दूरसंचार विभागाने विकसित केलेल्या आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (एफ आर आय) त्यांच्या प्रणालींमध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सायबर-सक्षम आर्थिक फसवणुकींविरुद्धच्या लढाईतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आंतर-एजन्सी सहकार्याच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. यामुळे एपीआय-आधारित एकत्रीकरणाद्वारे बँका आणि डॉटच्या डीआयपी दरम्यान आकडेवारीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्याचे धोरणात्मक महत्त्व देखील अधोरेखित होते, ज्यामुळे फसवणूक जोखीम प्रारूप अधिक परिष्कृत करण्यासाठी रिअल-टाइम प्रतिसाद आणि सतत अभिप्राय उपलब्ध होतो.

“आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक” म्हणजे काय आणि तो सायबर फसवणूक रोखण्यासाठी बँकांना कशी मदत करेल?

मे 2025 मध्ये दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजेंस युनिटने (डीआययु) सुरू केलेला आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक (एफ आर आय) हे एक जोखीम-आधारित मोजमाप आहे, जो एखाद्या मोबाइल क्रमांकाला आर्थिक फसवणुकीच्या मध्यम, उच्च किंवा खूप उच्च जोखमीशी संबंधित असल्याचे वर्गीकृत करतो. हे वर्गीकरण विविध भागधारकांकडून मिळालेल्या माहितीशी निगडित आहे, ज्यामध्ये इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय4सी) नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी), दूरसंचार विभागाचा चक्षु मंच तसेच बँका आणि वित्तीय संस्थांनी सामायिक केलेल्या गुप्तचर माहितीचा समावेश आहे. हे भागधारकांना – विशेषतः बँका, एनबीएफसी आणि यूपीआय सेवा प्रदात्यांना – मोबाइल क्रमांक उच्च जोखमीचा असल्यास अंमलबजावणीला प्राधान्य देण्यास तसेच अतिरिक्त ग्राहक संरक्षण उपाययोजना करण्यास सक्षम करते. दूरसंचार विभागाचे डिजिटल इंटेलिजेंस युनिट (डीआययु) नियमितपणे भागधारकांसोबत मोबाइल क्रमांकांची निरस्त यादी (एमएनआरएल) सामायिक करते, ज्यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या लिंक्समुळे खंडित झालेले क्रमांक, अयशस्वी पुनर्पडताळणी किंवा गैरवापर यांचा तपशील असतो – ज्यापैकी बरेच क्रमांक आर्थिक फसवणुकीशी निगडित असतात.

संशयास्पद व्यवहार नाकारणे, ग्राहकांना सावध करणे किंवा इशारे देणे तसेच उच्च जोखीम म्हणून चिन्हांकित व्यवहारांना विलंब करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था रिअल टाइममध्ये एफआरआयचा वापर करू शकतात. फोनपे, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पेटीएम आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासारख्या आघाडीच्या संस्थांनी या प्लॅटफॉर्मचा सक्रियपणे वापर करून या प्रणालीची उपयुक्तता आधीच दाखवून दिली आहे. यूपीआय ही संपूर्ण भारतात सर्वात पसंतीची पेमेंट पद्धत असल्याने, हिच्या हस्तक्षेपामुळे लाखो नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकतात. एफआरआयने टेलिकॉम आणि वित्तीय अशा दोन्ही क्षेत्रातील संशयित फसवणुकीविरुद्ध जलद, लक्ष्यित आणि सहयोगी कारवाई करण्यास अनुमती दिली आहे.

अधिक तपशीलासाठी DoT Handles फाॅलो करा: –

X – https://x.com/DoT_India

Insta  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb –  https://www.facebook.com/DoTIndia

प्रवाश्यांची झाली हवा टाईट..जेव्हा विमानाच्या खिडकीची निसटली चौकट..

पुणे -एकीकडे विमानाने प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल प्रचंड वाढला असला तरी दुसरीकडे अनेक घटनांवरून अलीकडच्या २ वर्षात विमानाचा प्रवास काही सहज सोपा राहिलेला नाही हेही दिसून येऊ लागलेले आहे. विमान मंत्रालय याबाबत किती गंभीर आहे याबाबतही काही समजू शकत नाही अशी अवस्था आहे.कधी प्रवासी मुंबईला त्यांच्या बॅगा दुबईला ..लेट होणारी विमाने..रद्द होणारी उड्डाणे ..विमानात होणाऱ्या चोर्या अशा अनेक बातम्या अलीकडे वाचनात येत असताना आता गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-१०८०) २३ हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याच्या बातमीची त्यात भर पडल्याने विमान प्रवास किती कठीण झालाय याची जाणीव होऊ लागली आहे.

त्याचे असे झाले ...गोव्याहून पुण्याला येणारे विमान (एसजी-१०८०) २३ हजार फूट उंचीवर असतानाच एका खिडकीची आतील चौकट निखळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खिडकीला बाहेरचा (आउटर) व मधला (मिडल) असे आणखी दोन प्रकारची आवरणे असल्याने खिडकीतून बाहेरील हवा विमानात शिरली नाही.त्यामुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले.

मात्र संबंधित विमान कंपनीने याची दुरुस्ती न करताच लगेच पुण्याहून जयपूरसाठी उड्डाण केल्याने हवाई वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.विमानातील हवेचा दाब नियंत्रित करण्यासाठी खिडकीच्या ‘आउटर’ व ‘मिडल’ अशा प्रकारच्या आवरणाचा उपयोग होतो. यात ‘इनर’ प्रकारचे आवरण निघाले. याचा विमानाला तत्काळ धोका पोचत नसला तरीही विमानाच्या संरचनेला बाधा निर्माण होऊ शकते.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व संरचनेच्या एकात्मतेसाठी हे आवरण निघणे योग्य नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. संबंधित स्पाइस जेट कंपनीने मात्र त्याची दुरुस्ती न करताच पुण्याहून जयपूरला हे विमान नेले. रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी या विमानाचे जयपूर विमानतळावर सुखरूप लँडिंग झाले.

स्पाइस जेटच्या विमानातील एका खिडकीवरील शोभेची चौकट उड्डाणादरम्यान सैल झाली. ही चौकट ही संरचनात्मक भाग नसून केवळ सावलीसाठी बसविलेली आहे. त्यामुळे विमानाच्या सुरक्षिततेवर किंवा संरचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. उड्डाणादरम्यान केबिनमधील हवेचा दाब पूर्णतः सामान्य होता, असे कंपनीचे म्हणणे आहे

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारला

मुंबई -भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज बुधवारी महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे , रवि अनासपुरे, विजय चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते .