Home Blog Page 473

बिबवेवाडीत मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ: 60 वाहनांची तोडफोड

पुणे – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर इंदिरानगर परिसरात एका गुंडांच्या टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या नागरिकांच्या कार, टेम्पाे, दुचाकी अशा 50 ते 60 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकाराने नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला असून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात येऊन तीन आराेपींना अटक करण्यात आली आहे.

अंडी ऊर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे व गणराज सुनील ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदर आराेपींनी गुन्हयात वापरलेली वाहने देखील पोलिसांनी जप्त केली असून त्यांच्या विराेधात कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर भागात बुधवारी मध्यरात्री एका टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग करुन लावण्यात आलेल्या दुचाकी,कार, टेम्पो, रिक्षांची लाकडी दांडक्याने तुफान तोडफोड करत शिवीगाळ करुन टाेळक्याने दहशत पसरवली.वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर टोळके घटनास्थळावरुन दुचाकीवर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच, बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरु केला.तीन आराेपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपींचे अन्य साथीदार यांचा देखील शाेध घेण्यात येत आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुबईहून सोन्याची स्मगलिंग: मुंबई विमानतळावर सव्वादोन कोटीचे सोने पकडले

मुंबई-

मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी, 03-04 फेब्रुवारी 2025 च्या रात्री,  2.21 कोटी रुपये किमतीचे 2.830 किलो वजनाचे सोने जप्त केले. या प्रकरणी 04 जणांना अटक करण्यात आले आहे.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुबईहून मुंबईला येणारे 03 प्रवासी आणि याच विमानतळाच्या डिपार्चर हॉल येथे काम करणाऱ्या एका खाजगी विमानतळ कर्मचाऱ्याला रोखले आणि त्यांच्याकडून वॅक्स मध्ये मिसळलेली 24 कॅरेट शुद्धतेची गोल्ड डस्ट जप्त केली. या सोन्याचे एकूण वजन 2.966 किलो तर निव्वळ वजन 2.830  किलो आहे  आणि त्याचे अंदाजे मूल्य 2.21 कोटी रुपये आहे.

या प्रवाशांनी पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये हे सोने लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने नंतर दुकानात लटकवलेल्या ब्रँडेड ज्यूट बॅगमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर, तीच बॅग त्या दुकानात काम करणाऱ्या खाजगी विमानतळ कर्मचाऱ्यांनी उचलली होती.सीमाशुल्क कायदा,1962 अंतर्गत 04 जणांना अटक करण्यात आली.

संगमावर स्नान हा दिव्य संयोगाचा क्षण: पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. 

एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे:

“प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कोट्यवधी जनांप्रमाणे मी सुद्धा येथील दिव्यत्वाच्या अनुभूतीने भारून गेलो आहे.

शांती, शहाणीव, उत्तम आरोग्य आणि सुसंवाद यांचा  आपणा सर्वांना माता गंगेचा आशीर्वाद लाभो.”

प्रयागराज महा कुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा अर्चा करण्याचे  परम भाग्य लाभले. माता गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने अतिशय शांत वाटते आहे. संपूर्ण देशाला सुख शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा अशी कामना मां गंगेकडे केली. हर – हर गंगे

प्रयागराज मधल्या दिव्य भव्य महा कुंभामध्ये श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम प्रत्येकाला भारावून टाकत आहे. पावन पूर्ण कुंभातील स्नानाची काही क्षणचित्रे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रयागराजला पोहोचले. महाकुंभमेळ्यादरम्यान त्यांनी संगमात स्नान केले. भगव्या रंगाचे कपडे परिधान करून, हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून त्यांनी सूर्याची प्रार्थना केली आणि सुमारे 5 मिनिटे मंत्रांचा जप करत राहिले.संगम नाक्यावर गंगा पूजेदरम्यान पंतप्रधानांनी माता गंगेला दूध आणि साडी अर्पण केली. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीचा प्रवासही केला. मोदींचा महाकुंभ दौरा सुमारे 2 तास चालला.

पाकीट अन मोबाईल चोरून रात्रीत २६ लाख लांबविले

पुणे-रात्री सवा बारा ते सकाळी साडेआठ च्या दरम्यान झोपलेल्या ३६ वर्षीय युवकाचे पाकीट आणि मोबाईल चोरून भामट्याने तब्बल २६ लाख ३५ हजार रुपये लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विमानतळ पोलीसांनी अज्ञात चोर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील फिर्यादी प्रोसिडा हॉटेल , संजय पार्क येथे झोपले असताना अज्ञात चोरट्याने हि चोरी करून रात्रीतून क्रेडीट कार्ड ,आणि मोबाईलचा वापर करून विविध बँकेतून २६ लाख ३५ हजार काढून पोबारा केला. फौजदार हर्शल घागरे अधिक तपास करत आहेत.

‘देवेंद्र हे बाहुबली’ असा उल्लेख केला अन आ.धस म्हणाले,’ ,मेरे पास देवेंद्र है…

‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’….देवेंद्र फडणवीस यांनी मला भरपूर काही दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम राहील, असेही सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी यावेळी ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील डायलॉगचा दाखला दिला. लोक विचारतात ‘तेरे पास क्या है’. मात्र ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस है’, असे ते म्हणाले. यावेळी आपल्या आईची आठवण काढताना सुरेश धस हे भाऊक देखील झाले होते.


बीड- जिल्ह्यातील आष्टी येथे उपसा सिंचन योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बहुप्रतिक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथील समाधी मंदिराचे भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख केला. आम्हाला केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा आहे, असे सुरेश धस म्हणाले.

सुरेश धस म्हणाले, आष्टी तालुक्यातील या योजनेला विरोध करण्यात आला होता. आता आष्टी सिंचन योजनेचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ होत आहे. मात्र ही योजना सुरू होत असताना येथील नागरिकांनी मला दगड मारले. अनेकांना हा प्रकल्प नको होता. मात्र, मी ठाम राहिलो आणि त्यासाठी नागरिकांचे मने वळवली. या योजनेसाठी रामदास कदम, प्रवीण दरेकर, प्रीतम मुंडे आणि नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी आम्हाला मदत केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना सुरेश धस यांनी अध्यक्ष महोदय असा उल्लेख केला. मात्र यावर एकच हशा पिकला. कधी कधी आम्हाला सभागृहातच बोलत असल्याचे वाटते, असे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवींचा ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख केला. सुरेश धस म्हणाले, 2014 मध्ये मी पडल्यानंतर 2024 पर्यंत खुंटेफळ साठवण तलावाचे केवळ 2 टक्के काम झाले. मी निवडून आल्यानंतर आतापर्यंत 23 टक्के काम झाले. देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या पंपींग मशिनरीची एका दिवसात परवानगी दिली. त्यामुळेच हे काम शक्य होऊ शकले.

23.66 पैकी केवळ 7 टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले आहेत. त्यातील 1.68 टीएमसी आम्हाला आले. 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवले आहे. ते 7 टीएमसी आणि आणखी 9.66 टीएमसी पाणी दिले, तर बीड जिल्हा, बीडमधील आष्टी तालुका आणि धाराशीवमधील 5 तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. ही आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे, असे सुरेश धस म्हणाले. आम्हाला इतर कुणाकडूनही अपेक्षा नाही. इतरांकडून मिळणारही नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात.

फडणवीस माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे माझे भाग्य आहे, परमभाग्य आहे 1999 ते 2004 या कालावधील साहेबांच्यासोबत बसण्याची संधी मला मिळाली, त्यांच्या मागे-पुढे मी असायचो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राजकीय कटकारस्थान करुन त्रास देण्याचा प्रयत्न झाला. पण, आपण माझ्या पाठीमागे दत्त बनून उभे राहिलात, असेही धस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री आणि सभागृहात माझे नाव घेऊन या योजनेसाठी 300 कोटी रुपये दिले असल्याची माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. प्रशांत बंब यांची योजना एका झटक्यात मंजूर केली. ते तुमचे लाडके आहेत, तसा मी देखील लाडका आहे. मला जायकवाडीतून 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली.

सध्या बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असे काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील निवडून दिले, बबनराव ढाकणे दिले, प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा माणूस दिला. गोपीनाथराव मुंडे एवढा पहाडासारखा माणूस दिला, आज ज्या जमिनीवर ह्या कामाचा शुभारंभ होतोय, प्रकल्प उभारतोय ती जमीन रक्षा विभागाकडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नांडिस हे रक्षा मंत्री होते, मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे सुरेश धस यांनी सांगितले.

मी जिवंत असेल किंवा नसेल. मात्र या मतदारसंघात कायम भाजपचा आमदार निवडून येईल, असे देखील सुरेश धस ठामपणे म्हणाले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, ठराविक राजकारणांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या तुमच्या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे धस यांनी म्हटले आहे. राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी विनंती सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केली.

2019 मध्ये बहुमत येऊन सुद्धा मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजुने होता. पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्यासाठी कटकारस्थाने आखली गेली. परंतु, आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोडच नाही. बिनजोड पैलवान म्हणतात तो पैलवान आहात तुम्ही, असे सुरेश धस म्हणाले.

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या

पुणे-प्रसिद्ध शिवव्याख्याते ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हे वृत कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजलेले नाही.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुध्दा झाला होता. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत होते. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरण या सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते.

अभिजीत पवार, पांडुरंग बलकवडे, डॉ. किरण ठाकूर यांना यंदाचा गुरु महात्म्य पुरस्कार

 कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा
पुणे :  शतकोत्तर रौप्यमहोत्सव संपन्न झालेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारे अत्यंत मानाचे गुरु महात्म्य पुरस्कार यंदा विज्ञाननिष्ठ अध्यात्माचे प्रणेते अभिजीत पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहेत. रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील, अशी माहिती दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारांचे हे तीसावे वर्ष असून मंदिराचे यंदा १२७ वे वर्ष चालू आहे
कार्यक्रमात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. किरण ठाकूर हे लोकमान्य चे संस्थापक असून सुरुवातीपासून त्यांनी समावेशक विकासाच्या तत्वज्ञानाला पुढे नेले आहे. प्रख्यात पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून तरुण भारत च्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे.

इतिहास संशोधन क्षेत्रात तसेच मोडी लिपीच्या अभ्यासात भरीव योगदान देत, इतिहासातील अनेक संदर्भ समोर आणून सामान्यांपर्यंत आपल्या इतिहास पोहोचविणा-या पांडुरंग बलकवडे यांना गुरुमहात्म्य पुरस्काराने गौरवण्यात येईल. तसेच, अभिजीत पवार यांनी उद्योग, प्रसार माध्यम व सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून बहुमूल्य योगदान दिले आहे. गेली अनेक वर्ष विज्ञाननिष्ठ अध्यात्म व प्राचीन भारतीय तत्वज्ञान, वेद उपनिषद व धर्मग्रंथांचा सखोल अभ्यासक म्हणून त्यांची ओळख युवा पिढीला आहे. अध्यात्मिक पुनरुत्थानाच्या भरीव कार्यासाठी त्यांचा ट्रस्टतर्फे गौरव करण्यात येणार आहे.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने स्मार्ट पेन्शन;सिक्युअर प्लॅन प्रस्तुत केला: आधुनिक युगात सेवानिवृत्तीनंतरच्या गरजांसाठी एक खास सोल्युशन

मुंबई, 5 फेब्रुवारी 2025: करियरमध्ये होत जाणारे नवनवीन बदल आणि वाढते आयुर्मान यांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक युगातील सध्या नोकरी, व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना अशा योजना हव्या असतात ज्या पारंपरिक सेवानिवृत्ती नियोजनाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या गरजा, इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकतील. FIRE (फायनान्शियल इंडिपेन्डन्स रिटायर अर्ली) पिढी असो, महत्त्वाकांक्षी उद्योजक असोत किंवा करियरमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या व्यक्ती असोत, रियरमेंट प्लॅनर्स एक प्रभावी रिटायरमेंट कॉर्पस सुरक्षित करण्याच्या स्मार्ट पद्धतींना प्राधान्य देत आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी (GBD) २०२१ मधील अनुमानांनुसार, २०५० पर्यंत भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान सरासरी ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते सरासरी ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील. त्यामुळेच आजच्या काळात नवीन, लवचिक आणि विकासोन्मुख आर्थिक योजनांची आवश्यकता पहिल्यापेक्षा खूप जास्त वाढली आहे.

ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन लॉन्च केला आहे. हा एक नवीन युनिट-लिंक्ड पेन्शन प्लॅन (ULIP) आहे आणि नव्या काळातील रिटायरमेंट आवश्यकतांनुसार डिझाईन करण्यात आला आहे. दुसरा स्वतंत्र उत्पन्न स्रोत तयार करण्यापासून सेवानिवृत्ती काळासाठीची बचत सुरक्षित ठेवण्यापर्यंत, ही योजना डिजिटल सॅव्ही आणि आर्थिक सुरक्षा व स्वातंत्र्य हव्या असणाऱ्या आधुनिक प्रोफेशनल्सच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करते.

आजच्या काळात स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनिंग महत्त्वाची का आहे:

  • वाढते आयुर्मान: भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील अशी अपेक्षा आहे (जीबीडी स्टडी २०२१), सेवानिवृत्त लोकांना दीर्घकाळपर्यंत स्थिर उत्पन्नाची आवश्यकता असणार आहे.
  • डेमॉग्राफिक्समध्ये बदल: भारतातील लोकसंख्येमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त मिलेनियल्स (४४० मिलियन) आहेत, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना वाढलेले आयुर्मान आणि पारंपरिक पेन्शन लाभांची कमतरता या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल.
  • उद्योजक मानसिकता: करियरमध्ये बदल करण्याकडे कल वाढत आहे, जास्तीत जास्त लोक आपले स्वतःचे स्टार्टअप व्यवसाय सुरु करत आहेत. असे करत असताना ते आपल्या सेवानिवृत्तीसंबंधी गरजा देखील पूर्ण करू इच्छितात.
  • जीवनशैलीशी संबंधित इच्छाआकांक्षा: आधुनिक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते की सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांची जीवनशैली पूर्वीप्रमाणे कायम राखली जावी. त्यांच्यासाठी मार्केट-लिंक्ड विकासाच्या संधी आणि लवचिक योजना आवश्यक असतात. उदाहरणार्थ, अनेक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते, लक्झरी कार खरेदी करावी किंवा कार अपग्रेड करावी किंवा परदेशात सुट्टीसाठी जावे, ज्या गोष्टी ते काम करत असताना करत होते त्याच त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील करत राहायच्या असतात. त्यासाठी स्मार्ट आर्थिक योजना आणि गुंतवणुकीची गरज असते, जेणेकरून त्यांच्यासाठी हे सर्व संभव होऊ शकेल.
  • जीवनावश्यक खर्च वाढत आहेत: वैद्यकीय महागाईचा दर १०% च्या आसपास आहे आणि जीवनावश्यक खर्च वाढत आहेत. सेवानिवृत्ती योजनांमध्ये विकासाच्या शक्यतांबरोबरीनेच नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या तरतुदींची देखील आवश्यकता आहे.   

१. स्मार्ट पेन्शन सिक्युअर: फंड-स्विचिंगमध्ये लवचिकता आणि मजबूत डेथ बेनिफिटसह मार्केट-लिंक्ड गुंतवणुकीवर केंद्रित.

२. स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लस: पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास योजनेची सुरक्षा कायम मिळत राहावी यासाठी यामध्ये प्रीमियममध्ये सूट लाभ देखील आहे.

योजनेची लवचिकता

  • योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा: ३५ ते ७५ वर्षे (पेमेंट कालावधीप्रमाणे वेगवेगळी आहे)
  • वेस्टिंग वय: ४५ व्या वर्षापासून सुरु होते, ज्यामध्ये सिंगल/लिमिटेड पेसाठी जास्तीत जास्त ८५ वर्षे आणि रेग्युलर पेसाठी ७५ वर्ष आहे.
  • पॉलिसी कालावधी: १० वर्षांपासून जास्तीत जास्त वेस्टिंग वयापर्यंत.

टाटा एआयएची स्मार्ट पेन्शन सिक्युअर योजना मिलेनियल्सना हे अंतर दूर करण्यात आणि निवृत्तीनंतरचे जीवन चिंतामुक्त करण्यात सक्षम बनवते.

पॉलिसीबझार हे कंपोझिट ब्रोकर म्हणून नोंदणीकृत आहे. नोंदणी क्रमांक ७४२नोंदणी कोड क्रमांक IRDA/DB 797/19, 09/06/2027 पर्यंत वैधपरवाना श्रेणी- कंपोझिट ब्रोकर

फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड IRDAI डायरेक्ट ब्रोकर (लाइफ आणि जनरल) रजिस्टर ७६६ आणि ब्रोकर रजिस्ट्रेशन कोड IRDA/DB 822/20 10/08/2027 पर्यंत वैध आहे.

टाटा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड [TFPL] ही टाटा डिजिटलची उपकंपनी आहे जी टाटा नेउ ऍपवर विमा उत्पादने ऑफर करते. टाटा फिनटेक हा टाटा एआयएचा कॉर्पोरेट एजंट आहे. नोंदणी क्रमांक – CA0818.

कर्करोग विरोधातील लढ्यात योगदान देणाऱ्या संस्थांचा गौरव

– प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचा उपक्रम
पुणे:- कर्करोगाविरोधातील लढ्यात मोलाचे योगदान देत असंख्य रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांना पुण्यातील प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट कडून एका विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून मंगळवारी या गौरव समारंभाचे आयोजन करणात आले होते.
प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टीट्यूटचे प्रमुख डॉ. सुमित शहा यांच्या हस्ते या संस्थाचालकांना स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देवून गौरविण्यात आले. गौरव करण्यात आलेल्या संस्थांमध्ये कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या श्रीमती सप्रू मॅडम, नाग फाऊंडेशनचे डॉ. इनामदार, मुकुल माधव फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव, जगेश रोकडे , केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या श्रीमती तस्लिमा मॅडम, हेल्पिंग हँड संस्थेच्या शैला नाईक , मुदिता – ॲन अलायन्स फॉर गिव्हिंग संस्थेचे माधव चव्हाण यांचा या गौरवमूर्तीमध्ये समावेश आहे. 
या संस्था आणि संस्थाचालकांनी कॅन्सर विरोधातील लढाईमध्ये अमूल्य योगदान देत असंख्य रुग्णांना नवजीवन देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळली याबद्दल प्रो लाईफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट स्वतःला धन्य समजते अशा भावना डॉ. सुमित शहा यांनी यावेळेस व्यक्त केल्या.

जमीन व्यवहाराचे धोरण बिल्डरांना पोषक; गरीबांना मारक-डॉ.हुलगेश चलवादी

गुंठेवारीच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी
दिनांक ५ फेब्रुवारी २०२५, मुंबई:-

राज्यातील जमीन खरेदी-विक्रीसंबंधीचे सरकारी धोरण बिल्डरांसाठी पोषक असून गरीब; मध्यमवर्गीयांसाठी मारक आहे, असा थेट आरोप बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.५) केला. सर्वसामान्यांना त्यांचे स्वप्नातील घर बांधता यावे याकरिता शहर, उपनगरांमध्ये गुंठे-दोन गुंठे जमीन खरेदी नियमांत बदल करा, अशी मागणी डॉ.चलवादींनी यानिमित्त केली. केवळ विकासकांना लाभ पोहोचवण्याकरिता आणि त्यांच्या सदनिका विक्रीत वाढ करण्याच्या हेतूने विद्यमान प्रक्रिया कार्यान्वित असल्याचा आरोप डॉ.चलवादी यांनी केला.

कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती ११ गुंठे जमीन खरेदी करून शकत नाही. गुंठे-दोन गुंठे जमीन घेवून ही मंडळी आपल्या स्वप्नातील घर उभारतात. पंरतु, तुकडाबंदी कायदा आणल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहार सुरु असले तरी जमिनीचे तुकडे ‘नियमित’ होत नव्हते. अशात ‘पॉवर ऑफ अटर्नी’ अथवा ‘करारनामा’ करीत जमीन खरेदी करण्याशिवाय कुठला पर्याय सर्वसामान्यांसमोर उरलेला नाही.या प्रक्रियेमुळे खरेदीदाराचे सात बाऱ्यावर नाव चढत नाही.जमिनदार याचा फायदा घेत एकच जमीन अनेकांना विक्री करीत त्याची फसवणूक करतात. आयुष्याची कमाई घर बांधण्यासाठी लावणार्यांचे अनेकांचे स्वप्न अशा प्रकारांमुळे भंगले आहे.

गुंठेवारीचे नियम शिथिल केले, तर लोक जास्त जागा घेतील. सदनिकांमध्ये त्यामुळे नागरिक वळणार नाहीत. विकासकांचे महसूल वाढावे आणि त्यांच्या घश्यात पैसे ओतण्यासाठी गुंठेवारीत नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप डॉ.चलवादी यांनी केला.२००१ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना गुंठेवारी प्रक्रियेतून घर बांधलेल्यांना माफक दंड आकारून त्यांना नियमित केले. आता जागेपेक्षा दंड दुप्पट आकारला जातो.पूर्वी २० रूपयानूसार दंड आकारला जायचा. आता मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातोय. गुंठेवारी कायद्याचा लाभ केवळ विशिष्ट वर्गाचे पोट भरण्यासाठी आणण्यात आला आहे, बहुजनांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

सरकारने १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार एक, दोन, तीन अशा गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घातले होते. पंरतु, तीव्र विरोधानंतर यात सुधारणा करीत जिरायत जमिनीसाठी २० गुंठे, तर बागायत जमिनीसाठी ११ गुंठे अशी मर्यादा ठरविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी,घरांसाठी किंवा इतर काही कारणांसाठी एक दोन गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येत नव्हती. त्यावर राज्य सरकारने १४ मार्च २०२४ च्या अधिसूचनेनुसार तकुडेबंदी कायद्यात सुधारणा करीत काही बाबींसाठी गुंटेवारीची अट शिथिल केली होती. तरीही राज्यात या कायद्यास विरोध होतोय, कायद्यात सुधारणेस बराच वाव असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. त्यामुळे या मुद्दयाकडे सरकारने तात्काळ लक्ष घालत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन डॉ.चलवादींनी केले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या ‘सह्याद्रि फॉर लाइफ’ मोहिमेचा शुभारंभ,अनिल कपूरचा मोहिमेला पाठिंबा

मोहिमेत पहिल्यांदाच देशातील हॉस्पिटल्सच्या ब्रँडमध्ये, ‘VK- विचार कर‘ हे काल्पनिक पात्र (ब्रँड मॅस्कॉट) सादर

खास पुणेरी ट्विस्ट असलेल्या या पात्रासह श्री. अनिल कपूर आरोग्यसेवेशी संबंधित संवाद साधणार

पुणे, 05 फेब्रुवारी, 2025 – महाराष्ट्रातील रुग्णालयांची सर्वात मोठी शृंखला असलेल्या सह्याद्रि हॉस्पिटलने नव्या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. ‘सह्याद्रि फॉर लाइफ’ असे या मोहिमेचे नाव आहे. राज्यभरातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्याच्या हेतूने व सह्याद्रि रुग्णालय समूहाला ‘सह्याद्रि २.०’ च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या महत्त्वकांक्षी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते श्री. अनिल कपूर यांनी मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. श्री. अनिल कपूर यांच्या सहकार्याने आता ही मोहिम आरोग्यसेवा व्यवसायातील ब्रॅण्ड-सेलिब्रिटी भागीदारीचा नवा मापदंड प्रस्थापित करणारी ठरेल, असा विश्वास रुग्णालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. श्री. अनिल कपूर आणि व्ही.के. (V.K.) या काल्पनिक पात्रातील संवाद हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य असेल. व्ही.के. या पात्राचे पूर्ण नाव ‘विचार कर’ असे आहे. हे पात्र सामान्य मराठी माणसाच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करते. व्ही. के. विनोदी तर आहेच पण बुद्धिवान आणि विचारवादीही आहे. हे पात्र टिपिकल मराठी माणसाच्या स्वभावगुणांचे दर्शन घडवते. या मोहिमेत  एके – व्हीके (AK-VK) ही डिजीटल मालिका प्रसारित केली जाईल. या मालितेक श्री. अनिल कपूर व्ही.के.शी आरोग्यविषयक चर्चा करताना दिसतील. या चर्चेत गंभीर आणि अतिशय गुंतागुंतीचे वाटणारे विषय साध्या, आकर्षक आणि प्रभावीपणे चर्चिले जातील. ही आरोग्यविषयक चर्चा सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून प्रभावीपद्धतीने मांडली जाईल. 

या मोहिमेला सर्व माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी जाईल. प्रिंट, रेडिओ, ओटीटी प्लेटफॉर्म, डिजीटल चॅनल्स आदी माध्यमांवर या मोहिमेचा प्रचार केला जाईल.  ही मोहिम सह्याद्रि रुग्णालयांच्या राज्यभरातील आरोग्यसेवा उंचावण्याच्या कृतीची वचनबद्धता दर्शवते हा संदेश या मोहिमेच्या प्रचारातून दिला जाईल.  रुग्णांशी संपर्क साधणे, रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचार देणे, रुग्ण प्रथम हे रुणालयाचे प्रमुख उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केले जाईल.

‘सह्याद्रि फॉर लाइफ’ या मोहिमेबद्दल बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अब्रारअली दलाल यांनी सांगितले की, ‘‘सह्याद्रि हॉस्पिटल्स लोकांना उत्तम आरोग्यवान  आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सह्याद्रि फॉर लाइफ’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्हांला राज्यभरातील रुग्णांच्या आरोग्याचे खंबीर साथीदार म्हणून काम करायचे आहे. रुग्णांच्या आजारपणातील प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांना साथ देऊरुग्णांना उपचारातून पूर्णपणे बरे करण्यासाठी त्यांना सर्वोत्तम उपचार दिले जातील. या मोहिमेला श्री. अनिल कपूर यांनी पाठिंबा दिल्याने आम्ही ख-या अर्थाने उत्सुक आहोत.’’

सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री. मनिष राय यांनीही या मोहिमेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ या मोहिमेला बॉलिवूड आयकॉन श्री. अनिल कपूर यांनी सहकार्य केल्याने आम्हांला वेगवेगळ्या प्रेक्षकांशी जोडून घेणे शक्य होणार आहे. श्री. अनिल कपूर यांनी फिटनेस आणि निरोगी आरोग्याला कायमच महत्त्व दिले आहे. सह्याद्रि हॉस्पिटल्सने हीच भावना आपल्या रुग्णांविषयी जपली आहे. आम्हां दोघांचेही समान विचार आहेत. या मोहिमेतील ही भागीदारी जास्त महत्त्वाची ठरते. ही मोहिम म्हणजे सर्वांची निरोगीचैतन्यपूर्ण जीवनाच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून हाती घेतलेली एक चळवळ आहे. मोहिमेत श्री. अनिल कपूर यांचा सहभाग निश्चितच प्रेरणादायी आणि सर्वांवर प्रभावशाली ठरेल. लोकांशी सहजरित्या रमरस होणारे व्हीके (VK) पात्र रंगवण्यात आले आहे. या पात्रातून तुम्हांला आरोग्य सेवेतीत तत्परतावचनबद्धता आणि नावीन्यपूर्णतेचाही परिचय होईल. व्हीके आणि श्री. अनिल कपूर यांच्या संवादातून सर्वसामान्यांना समजेल अशी उपयुक्त माहिती दिली जाईल. या मोहिमेतून आम्हांला केवळ आमचा प्रचार करायचा नसून आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णांचा विश्वास कमावणेजनजागृती करणे तसेच सक्रिय कार्यक्रम राबवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.’’

या मोहिमेतून ‘तुम्ही आणि आम्ही’ (You & Us) हा महत्त्वाचा संदेशही दिला जाईल. आरोग्य तसेच स्वतःचे हित जपणे हे खरे तर दोघांची समान जबाबदारी आहे, असा संदेश मोहिमेच्या मदतीने दिला जात आहे. म्हणजे तुमचे आरोग्य जपण्याची जबाबदारी एकाची नव्हे तर दोघांची आहे. म्हणून ‘तुम्ही आणि आम्ही’ या संदेशाचा प्रचार केला जाईल. सह्याद्रि रुग्णालयातील जगप्रसिद्ध डॉक्टर्स, सर्जन्स तसेच जागतिक मानांकनाच्या वैद्यकीय तंत्रज्ञनाच्या मदतीने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा मथितार्थ या संदेशातून दिला जात आहे. हा संदेश प्रत्येकाने स्वतःची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करतो. प्रत्येक रुग्ण निरोगी राहील याकरिता सह्याद्रि रुग्णालयाची टीम सर्वोत्कृष्ट रुग्णसेवा पुरवेल.

इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती


मुंबई, दि. ४ प्रतिनिधी
‘राष्ट्र प्रथम’ ही भावना समोर ठेऊन भाजपा राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले

आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. याप्रसंगी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहून भाजपा परिवारात सामील झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना उबाठा गटाचे संबंधित असलेल्या भारतीय कामगार सेनेचे संलग्न असलेल्या तर युनियन मध्ये कर्मचाऱ्यांनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला
यामध्ये युनिट अध्यक्ष करण कांबळे, युनिट सरचिटणीस दिनेश शेवाळे, युनिट उपाध्यक्ष सिराज हाश्मी, युनिट कोषाध्यक्ष चंदन कांडू, संयुक्त खजिनदार मोहम्मद शाहिद हुसेन, युनिट सेक्रेटरी रणजीत नरे, युनिट सेक्रेटरी राकेश कदम, युनिट सेक्रेटरी लक्ष्मण सुरवसे, युनिट सेक्रेटरी विजय यादव, युनिट समिती सदस्य अंकुश निकम, सुनील लोखंडे,अंकुश इंगळे, संदीप कांबळे, शैलेश पवार, सचिन काटकर, सचिन आग, सचिन कांबळे, श्रीनाथ पाडेकर, महबूब पाशा, हर्षद अहिरे, रोहित चतुर्वेदी, ओंकार नाईक, विक्रांत डोईफोडे, विनीत पाटील, संदीप सानप, पूजाताई तांडेल, सपनाताई गोडक्या आदी सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी उपस्थित होते.

राहूल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहरातर्फे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी बुधवार पेठेतील समाधान चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करून बेताल वक्तव्ये करणाऱ्या सोलापूरकर याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि सोलापूरकर याच्या प्रतिमेला जोडे मारत त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे यांनी केले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेधाच्या घोषणानी परिसर दनाणून सोडला. यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, पुणे शहर महिला अल्पसंख्याक अध्यक्ष नूरजहां शेख, शहर सरचिटणीस शीतल जवंजाळ, शहर दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे,ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, कसबा अध्यक्ष सुप्रिया कांबळे, कसबा कार्याध्यक्ष गोरखनाथ भिकूले, कसबा उपाध्यक्ष संतोष हत्ते, कसबा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अभिषेक बोके, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, पुणे कँन्टोमेंट अध्यक्ष नरेश जाधव, पुणे कँन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, ओबीसी अध्यक्ष अतुल जाधव, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, मारुती आवरगंड, नेईम शेख, सुनीता चव्हाण, संजय लाड,शाम शेळके, विजय जाधव, अतुल जाधव, सादिक पटेल, अमूल कलाल, रोहिदास जोरी, फाय्याज खान, प्रदीप चोपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? कलाकार असला म्हणजे शिंगे फुटली काय?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणा-यांचा बंदोबस्त करा!

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी २०२५
भाजपा युती सरकारच्या काळात महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हे सरकार पाहत आहे हे दुर्दैवी आहे. सरकारच जर महापुरुषांचा अपमान करु लागले तर राहुल सोलापुरसारखे त्याच पद्धतीने सरकारच्या मागे भुंकत असतात. सरकारच्या मानसिकतेचा परिणाम लोकांवरील झाला आहे, म्हणूनच ते महापुरुषांचा अपमान करण्याची हिम्मत करु शकतात. कलाकार असला म्हणजे त्याला काय वेगळी शिंगं नाही फुटत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला पायबंद घातलाच पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे . ते म्हणाले.
महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकारचे मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी, खुनी आहे, एका मंत्र्यांवर न बोलता सगळ्यांवरच बोलले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते निश्चितच चिंताजनक आहेत पण हे सर्व भाजपाच करत आहे, भाजपाचाच आमदार खुलेआमपणे मुंडेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल दररोज करत आहे. पण मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. भारतीय जनता पक्ष, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील अंतर्गत वादाचा हा परिणाम आहे का? काँग्रेस पक्षाला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचे नाही. राज्यात जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, शेतकऱ्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, सोयाबीन, धान, कांदा उत्पादक शेतकरी बरबाद झाला आहे. सरकारने बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शिर्डीत कालच दोन हत्या करण्यात आल्या, महिला सुरक्षित नाहीत. परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची हत्या पोलीसांनी केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला, ही सर्व गंभीर प्रकरणे सरकार लपवत आहे पण विरोधी पक्ष म्हणून या मुदद्यांवर गप्प बसणार नाही, सरकारला या सर्वांची उत्तरे द्यावी लागतील.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार देशात आल्यापासून मांत्रिक व्यवस्था देशात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्या मांत्रिक व्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टी घडत आहेत आणि तोच प्रकार राज्यात आला आहे का? नरेंद्र मोदी सारखे आपणही पुढे येऊ म्हणून त्यांनी काही केले असेल आणि हे फडणवीसांना कळले असेल म्हणून ते वर्षा वर रहायला जात नाहीत का? माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा केला आणि तो कायदा असताना असे प्रकार घडत असतील तर लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार होत असतील गंभीर आहे, असेही पटोले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे काँग्रेस व मविआने आधीच उपस्थित केले आहेत. या प्रश्नी काँग्रेस पक्षाने निवणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे. निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला आहे. प्रकाश आंबेडकर याच प्रश्नी कोर्टात गेले असतील पण राहुल गांधी यांनीही लोकसभेत काल हीच भूमिका मांडली. आता हे प्रकरण न्यायालयाकडे गेलेले आहे, यातून न्याय मिळेल अशी अपेक्षा करू असेही पटोले म्हणाले.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचा ‘वसंतराव काणे’ आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरव

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ४ फेब्रुवारी २०२५) सेलू येथे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुकाध्यक्षांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार ‘पिंपरी चिंचवड पत्रकार संघाला देऊन गौरविण्यात आले.
मराठी पत्रकार परिषद आयोजित रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध निवेदक विशाल परदेशी, स्वागताध्यक्ष विनोद बोराडे, परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सुनील वाळुंज, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष दीपक कैतके, अक्रिटेशन कमिटी राजा आदाते, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, अध्यक्ष डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड विनय सोनवणे, महावीर जाधव, राकेश पगारे, कार्याध्यक्ष अविनाश आदक, संतोष गोतावळे, रामकुमार शेडगे यांसह राज्यभरातून सर्व जिल्हा व तालुका पत्रकार संघ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यभर पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार – एस. एम. देशमुख
पत्रकारांच्या प्रश्नासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. अखेर सरकारने २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला. पण प्रत्यक्षात या कायद्याची अंबलबजावणी होत नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशन निघाले नाही. पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी यावेळी दिला.