Home Blog Page 467

’जावे त्या देशा’ पुस्तकातून जीवनविषयक तत्त्वज्ञानाची मांडणी : शेफाली वैद्य

मंदार काशीनाथ वाडेकर लिखित ‌‘जावे त्या देशा‌’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : ’जावे त्या देशा’ या पुस्तकातून मंदार वाडेकर यांची तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, मानसिक संवेदनशीलता आणि रसिकता यांचे दर्शन घडते. लेखकाने केलेल्या प्रवासात घडलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनविषयक तत्त्वज्ञान अतिशय मार्मिकपणे मांडलेले दिसते. एखाद्या देशाचा, ठिकाणाचा इतिहास, संस्कृती, काळी सत्ये, माणसे याविषयीच्या लेखनातून त्या त्या ठिकाणचे पैलू वाचकांपर्यंत नक्कीच पोहोचतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका, वक्त्या शेफाली वैद्य यांनी केले.
झंकार स्टुडिओ प्रकाशित आणि मंदार काशीनाथ वाडेकर लिखित ‌‘जावे त्या देशा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी वैद्य बोलत होत्या. सेवा भवन, नळस्टॉप जवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. झंकार स्टुडिओचे सत्यजित पंगू, उद्योजक राजेश मंडलिक व्यासपीठावर होते.
वैद्य पुढे म्हणाल्या, पर्यटक म्हणून एखाद्या ठिकाणाच्या, देशाच्या चांगल्या गोष्टीच जाणवतात; परंतु अनेक काळाच्या वास्तव्यानंतर त्या जागेचे कंगोरे टोचायला लागू शकतात. यातून शहरांचे, भवतालाचे नाते प्रगल्भ होत जाते तसेच देशात, संस्कृतीत रुळायला मदत होते. वाडेकर यांच्या लेखन प्रवास हा त्या त्या ठिकाणांमध्ये रुजत आणि रुजवत चाललेला असल्याचे जाणवते. लेखकाचा प्रवास आणि त्याविषयीचे लेखन हे संवेदनशीलतेने बारकावे शोधत, ते नाजूकपणे टिपून ठेवत लिहिले आहे हे जाणवते. ‌‘जावे त्या देशा‌’ या ऑडिओ बुक आणि ई-बुकचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले.
मंदार वाडेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, एखाद्या ठिकाणाचा इतिहास, भूगोल, दु:ख, आनंद, माणसे समजून घ्यायच्या आवडीतून माझा लेखन प्रवास घडला. कोकणातून आलेल्या माझा नोकरीच्या निमित्ताने अनेक देशांमध्ये प्रवास घडला. त्यावेळी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणातून आणि आलेल्या अनुभवांतून माझ्या विचार शैलीचे प्रकटीकरण या पुस्तकाच्या माध्यमातून घडले आहे. हे माझ्या अंतरीचे प्रकटीकरण आहे.
प्रवास हे एक विद्यापीठच असते असे सांगून राजेश मंडलिक म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाची निरिक्षण शक्ती, संवदेनशील मन, माणसांविषयी-निसर्गातील घटकांविषयी औत्सुक्य असल्याचे जाणवते.
प्रास्ताविकात सत्यजीत पंगू म्हणाले, हे पुस्तक म्हणजे फक्त प्रवासवर्णन नव्हे तर हा एक प्रवाही प्रवास आहे.
मान्यवरांचे सत्कार मंदार वाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिल्पा देशपांडे यांनी केले.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ सेवा कार्यान्वित !

  • प्रवाशांना मोठा दिलासा, वेळेची होणार बचत
  • ⁠धावपट्टीचा विस्तार वेगाने करणार; मोहोळ यांची माहिती

पुणे :
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ या चेक इन प्रणालीचे लोकार्पण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. डिजियात्रा’ सुरु झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून तर विमानात बसेपर्यंतची प्रक्रिया सुलभ, सहज आणि सोपी झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या रांगा टळणार असून वेळेची बतच होणार आहे.

देशांतर्गत प्रवाशांसाठी विमानतळ प्रवास सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी डिजीयात्रा सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कायापालट होत असून हे विमानतळ अधिकाधिक अद्ययावत सोईसुविधांयुक्त करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु आहे. डिजीयात्रा प्रणाली कार्यान्वित करणे हा त्यापैकीच एक भाग आहे. डिजी यात्रा पूर्णपणे बायोमेट्रिक सेल्फ-बोर्डिंग सिस्टम देते, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून विमानात पोहोचेपर्यंत सर्व प्रक्रिया पेपरलेस आणि डिजिटल पद्धतीने पार पाडता येते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे आणि सीआयएसएफचे अधिकारी उपस्थित होते.

देशभरात १ डिसेंबर २०२२ पासून डिजीयात्रा सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रणाली अंतर्गत दीड कोंटींहून अधिक उपभोक्ते जोडले गेले आहेत. तसेच ४ कोटींहून अधिक वेळचा प्रवास या सेवेतून झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या डिजीयात्राचे वापरकर्ते वाढत आहेत. पुणे विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या डिजीयात्री वापरकर्त्यांची संख्या अधिक असल्याने याचा मोठा फायदा पुणेकरांना विमान प्रवाशांना होणार आहे.
धावपट्टीचा विस्तार वेगाने करणार …

पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणे, आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलत कामे सुरू केली आहेत. नुकताच ओएलएस सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाल्यावर आम्हाला येथे किती जागेचे भुसंपादन करावे लागेल, याची माहिती मिळणार आहे. माहिती मिळल्यावर खासगी जागा किती भुसंपादन करायची आणि डिफेन्सची किती जागा घ्यायची, यादृष्टीने कामे होती. जागा मिळाल्यावर लगेचच धावपट्टीचे विस्तारीकरण केले जाईल, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

सामान्य जनतेपर्यंत वेळेत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-डॉ नीलम गोऱ्हे

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी आयोजित कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागांना सामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा वेळेत लाभ पोहचवा असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व शासनाचे इतर विभाग तसेच महानगरपालिका यांचे समन्वयाने आयोजित शासन आपले दारी या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता म्हणुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनमानसात लोकप्रिय आहेत.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेचे प्रश्न संबंधित विभागांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गी लावावेत.

यावेळी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थ्यांना लाभाचे आदेश वाटप,विविध दाखले वाटप,क्षयरोग पीडितांना कीट वाटप,पिंक रिक्षा लाभार्थ्यांना रिक्षा वाटप,मतदार ओळखपत्र वाटप,इत्यादी लाभ वाटप करण्यात आले.विविध विभागांच्या सुमारे २० स्टॉल मार्फत दिवसभर जनतेकडून माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात आले.या शिबिरामध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला व एक ते दीड हजार नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व अर्ज दाखल केले.या कार्यक्रमासाठी श्री धनंजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच तहसिलदार पुणे शहर श्री सुर्यकांत येवले ,पुणे शहर उपायुक्त श्री अविनाश संकपाळ,निवडणूक नायब तहसीलदार सायली धस,आरोग्य विभाग पर्यवेक्षक श्री प्रशांत कुलकर्णी,समाज कल्याण अधिकारी रामदास चव्हाण,परिमंडळ अधिकारी श्री ओव्हाळ यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात सहभाग सी नोंदवला.या कार्यक्रमास पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह , उपशहर प्रमुख संजय डोंगरे, संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ,पुणे शहर समन्वयक संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मणिपूर लोकसभा खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोईजम यांची काँग्रेस भवनला भेट.

पुणे-मणिपूर लोकसभेचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोईजम यांनी आज काँग्रेस भवनला भेट दिली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा तिरंगी मफलर, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोईजम यांनी उपस्थितांसाठी मार्गदर्शनपर भाषण केले. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी काँग्रेस भवन विषयी माहिती सांगितली.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, लता राजगुरू,अजित दरेकर, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, संतोष पाटोळे, राजू ठोंबरे, सुजित यादव, विशाल जाधव, अक्षय माने, रविंद्र माझीरे, गुलाम हुसेन खान, राजेंद्र भुतडा, राज अंबिके, संदिप मोकाटे, प्राची दुधाणे, सीमा सावंत, सुरेश नांगरे, ज्योती परदेशी, सुंदरा ओव्‍हाळ, लतेंद्र भिंगारे, समीर शेख, प्रकाश पवार, देवीदास लोणकर, वैभव डांगमाळी, फैयाज शेख, प्रदिप परदेशी, रवि पाटोळे, नुर शेख, रमाकांत साठे, सचिन दुर्गोडे आदी उपस्थित होते.

ज्ञानाची खोली, अनुभवाचे संचित मिळवण्यासाठी शिकत राहासीए भरत फाटक यांचा सल्ला

‘आयसीएआय’च्या दीक्षांत सोहळ्यात ११०० स्नातकांना पदवी प्रदान
पुणे: “शिक्षण ही अविरत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे सनदी लेखापाल ही पदवी हा एक टप्पा आहे, असे मानून ज्ञानाची खोली आणि अनुभवाचे संचित मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानशाखेशी संबंधित विशेष प्राविण्य प्राप्त करत राहावे,” असा सल्ला ज्येष्ठ सनदी लेखापाल, वेल्थ मॅनेजर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक भरत फाटक यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने आयोजित दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून फाटक बोलत होते. म्हात्रे पुलाजवळील सिद्दी बॅन्क्वेट येथे आयोजित सोहळ्यात भरत फाटक व आर्थिक सल्लागार सीए रचना रानडे यांच्या हस्ते ११०० स्नातकांना सीए (सनदी लेखापाल) पदवी प्रदान करण्यात आली. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए उमेश शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, ‘आयसीएआय पुणे’च्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए हृषीकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत, सीए राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

सीए भरत फाटक यांनी स्नातकांना व्यावसायिक जीवनाचे कानमंत्र सांगितले. “सनदी लेखापाल हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे. इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अवघड असतो, पण सीए अभ्यासक्रमातून बाहेर पडणे, अवघड असते. एका टप्प्यापर्यंतचा तुमचा प्रवास आणि विशिष्ट अभ्यासक्रमाचा पाठपुरावा आता पूर्ण झाला आहे. तुम्ही आता व्यावसायिक जीवनाचा प्रारंभ करणार आहात. मात्र, शिक्षण कधीच संपत नसते. शिवाय व्यावसायिक आयुष्यात तुम्ही प्रतिदिवशी काही ना काही शिकतच असता. त्यामुळे सतत शिकत राहिले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

सीए रचना रानडे म्हणाल्या, “सीए झाल्यावरही कष्ट घेत राहिले पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात, त्यामध्ये आपण समर्पित भावनेने काम केले पाहिजे. सतत नवी कौशल्ये आत्मसात करत राहावे. करिअरला नैतिकतेची जोड असल्यास आपण अधिक यशस्वी होतो. त्यामुळे कठोर परिश्रम, कौशल्य विकास, समर्पण आणि नैतिकता या गोष्टींना आपण आयुष्यभर प्राधान्य द्यायला हवे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “तीस टक्के स्नातक विद्यार्थिनी आहेत, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. तुम्ही सारे नव्या युगाचे प्रतिनिधी आहात. जागतिक पातळीवर ऑडिटच्या संधी तुमच्यासमोर आहेत. युरोप, कॅनडा, सिंगापूरसह सारे जग कामासाठी खुले आहे. भारतीय सनदी लेखापालांच्या दर्जाविषयी जगभरात अतिशय गौरवपूर्ण बोलले जाते. तो लौकिक कायम राखा.”

सीए उमेश शर्मा यांनी दर्जा, सातत्य आणि नैतिकता ही त्रिसूत्री जपण्याचे आवाहन केले. पदवी मिळणे, हा फक्त एक टप्पा आहे. खरी परीक्षा व्यावसायिक जीवनात समोर येणार आहे. त्यामुळे अभ्यासाची सवय कायम ठेवा. कामातील अचूकता जपा. कृत्रिम बुद्धीमत्तेसह अन्य तांत्रिक, यांत्रिक कौशल्ये काळानुसार आत्मसात करा”, असे शर्मा म्हणाले.

सीए ऋता चितळे यांनी मनोगत मांडले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी सर्व स्नातकांना शपथ दिली. सीए अमृता कुलकर्णी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सीए सारिका दिंडोकर व सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनियार यांनी आभार मानले.

नामदार चंद्रकांतदादा पाटील संचालित ‘सुखदा’ची पहिली ‘लक्ष्मी’आली अंगणी

पुणे- गरोदर महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे; यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन, गर्भवतीस पोषक आहार, प्रसूतीनंतर योग सराव; तसेच गर्भधारणेपासून ते‌ प्रसूती औषधोपचाराचा खर्च यासर्व सुविधा मोफत करुन देणाऱ्या सुखदा या उपक्रमांतर्गत पहिले बाळंतपण सुखरूप पार पडले आणि पहिली ‘लक्ष्मी’ अंगणी आली. या उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या एका गर्भवतीस कन्या रत्न प्राप्त झाले आहे. दैनंदिन तपासणीसाठी केळेवाडीत सुखदाचे अद्ययावत केंद्र सुरु आहे. आज या उपक्रमाचा पहिला प्रसाद लक्ष्मीच्या रुपाने मिळाला आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.हिंदू धर्मात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळेच नवरात्रोत्सव काळातही तिची मनोभावे पूजा केली जाते. तिच्या जन्मानंतर अनेक कुटुंबांमध्ये मोठा आनंद साजरा केल्याचे आपण नेहमीच पाहतो. असाच काहीसा आनंद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरु केलेल्या ‘सुखदा’ उपक्रमाचा भाग असलेल्यांना झाला आहे.‌

वास्तविक, आपल्याकडे गर्भसंस्काराला प्राचीन  काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या महिलेच्या गर्भधारणेपासून सुदृढ आणि बुद्धिमान अपत्यप्राप्तीसाठी गर्भसंस्कार हा अतिशय आवश्यक मानला जातो. कारण याच काळात तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच बाळंतपणासाठी सक्षमपणे समोर जाता यावं. योग्य आहार, योग्य व्यायाम व सर्वासाठीचे समुपदेशन याची नितांत आवश्यकता असते.

पुण्यासारख्या महानगरात प्रत्येक कुटुंबाला हे शक्य असतं असं नाही. आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात गर्भधारणेपासून ते प्रसूती हे मोठं दिव्यच असतं. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात.

त्यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्माला येणारं बाळ हे सुदृढ असावं; यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मतदारसंघामध्ये ‘सुखदा’ उपक्रम कार्यान्वित झाला. या उपक्रमाचा वस्ती भागातील असंख्य महिलांना लाभ होत आहे. आज याच उपक्रमात सहभागी सौ. रजनी दिघे या महिलेची प्रसूती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाली. यावेळी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे याचा आनंद केवळ दिघे कुटुंबियच नव्हे; तर सुखदा उपक्रमाशी जोडलेला प्रत्येकजण व्यक्त करत आहेत.

या आनंदाच्या क्षणाबाबत सुखदा उपक्रमाच्या चेअरमन स्मीता पाटील म्हणाल्या की, आपल्याकडे मुलीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात भरभराट होत असते. आपल्याकडे गर्भसंस्कार हा अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.‌ यातील गर्भसंस्काराचा अर्थच हा आहे की, गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे. त्यामुळे कोथरूडचे संवेदनशील आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘सुखदा’ हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाअंतर्गत गरोदर महिलांचे बाळंतपण सुखकर व्हावे; यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन, गर्भवतीस पोषक आहार, प्रसूतीनंतर योग सराव; तसेच गर्भधारणेपासून ते‌ प्रसूती औषधोपचाराचा खर्च यासर्व सुविधा मोफत करुन दिल्या आहेत आहे. तसेच, दैनंदिन तपासणीसाठी केळेवाडीत सुखदाचे अद्ययावत केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज या उपक्रमाचा पहिला प्रसाद लक्ष्मीच्या रुपाने मिळाला आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे.”

यावेळी सुखदा उपक्रमातील योग शिक्षिका मुग्धा भागवत, स्त्रीरोग तज्ज्ञा अपूर्वा देशपांडे, धनश्री चितळे, भाजपा नेत्या स्वातीताई मोहोळ, सुरेखा जगताप उपस्थित होते.

राष्ट्रीय आमदार संमेलन आपल्या क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 8: राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून युवकांचे राजकारणातील ध्येय, त्यांच्या मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यसाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (दूरदृष्यप्रमाणाली), तर व्यासपीठावर लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सुमीत वानखेडे, विविध राज्यातील आमदार, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी.जोशी, राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाचे संस्थापक राहूल कराड आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, राजकारणात प्रशिक्षित नागरिक सहभागी व्हावे तसेच देशाच्या लोकशाहीत गुणात्मक परिवर्तन होण्यासोबतच त्यांच्या मुल्यातही वाढ व्हावी, यादृष्टीने एमआयटी स्कुल ऑफ गर्व्हमेंटच्या माध्यमातून राष्ट्रीय आमदार संमेलन, महिला प्रतिनिधी संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, यामुळे लोकप्रतिनिधी तसेच शासनात विविध पदावर काम करणारे चांगले अधिकारी, कर्मचारी मिळाले आहेत. खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची सेवा आहे. देशाच्या विकासाच्या कार्यात इतरांपेक्षा वेगळे काम करणाऱ्या व्यक्तीलाच लक्षात ठेवले जाते.

आपले राजकारणातील स्थान, ध्येय आणि नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याकरीता नागरिक आपल्याला विधीमंडळात पाठवतात, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, नागरिकांच्या विश्वास सार्थ ठरविण्यासोबतच प्रेरणादायी काम होत असल्याचे कामाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये प्रतिबिंबीत झाले पाहिजे. भारतीय संविधानाला अनुरुप काम करण्याकरीता आपण राजकारणात आल्याची भावना डोळ्यासमोर ठेवावी.

विधीमंडळात लोकप्रतिनीधींच्या सहभागातून कायदे निर्मिती हे प्रमुख काम आहे, यामध्ये रुची वाढविली पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकांला प्रतिबिंबीत करण्याकरीता सभागृहातील कामकाजात सहभागी झाले पाहिजे. नागरिकांच्या कामात आणि विधानमंडळ कामात समान न्याय दिला पाहिजे. विधीमंडळात विविध सकारात्क आयुधाचा वापर करुन नागरिकांचे प्रश्न, आशा, अपेक्षा पूर्ण करण्याकरीता प्रमाणिक प्रयत्न करावे. प्रशासनाचे लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर लक्ष असते, त्यामुळे तेदेखील आपली कार्यक्षमता व सर्वांगिण विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या कामात सहभागी होवून आपल्याला मदत करीत असतात.

लोकप्रतिनिधींनी बदलत्या काळानुरुप नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे. देशातील गावागावापर्यंत तंत्रज्ञान पोहचले असून यामाध्यमाद्वारे अधिकाधिक नागरिक व्यक्त होण्याबरोबरच आपल्या कामाचे मुल्यमापन करीत असतात. राजकारणातही मोठ्याप्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञानातील बदलावर विचारमंथन करावे, असेही श्री. फडणवीस म्हणाले

श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतांना म्हणाले, लोकशाहीत गुणात्मक परिवर्तनाचे आवाहन स्वीकरुन त्यादृष्टीने या संमेलनाच्यामाध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन नागरिक, समाज, देशाचे हीत डोळ्यासमोर ठेवून काम करावे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याकरीता प्रयत्न करावे.यामुळे लोकप्रतिनिधीवरील विश्वास वाढण्यास मदत होईल. शाश्वत विकासाची ध्येय गाठण्याकरीता प्रयत्नशील राहावे तसेच या संमेलनाच्या माध्यमातून प्रबोधन व प्रशिक्षण,आणि संशोधन व विकास या त्रीसुत्रीवर काम करावे, असे श्री. गडकरी म्हणाले.

श्री. महाना म्हणाले, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जबाबदारी पार पाडावी, देशात गुणात्मक परिवर्तन आणि काळानुरुप जागतिक पातळीवरील होणारे नाविन्यपूर्णबदल लक्षात घेता त्याप्रमाणे कामे करावे, याकरीता अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन करावे. राजकीय व्यवस्थेत आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यासोबतच नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याबाबत दक्षता लोकप्रतिनिधींनी घ्यावी, असे श्री. महाना म्हणाले.

श्रीमती महाजन म्हणाल्या, देशाच्या विकासाकरीता शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, धोरणे, प्रकल्प समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्याकरीता पक्षभेद विसरुन सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करावे. देशात सकारात्मक बदल घडविण्याकरीता राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनात देशाच्या विविध भागातून लोकप्रतिनिधी येत असल्याने हे संमेलन महत्वपूर्ण आहे, असे श्रीमती म्हणाल्या.

आपल्या प्रास्ताविकात डॉ. कराड म्हणाले, विकासात्मक राजकारण काळाची गरज लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागातील युवकांना राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सामाजिक सुरक्षतिता, यशस्वी योजना, धोरण आदी महत्वपूर्ण बाबींचे आदान-प्रदान होण्याच्या दृष्टीने आदर्श आचारसंहिता करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. देशातील विविध राज्यातील सहा विधानसभेसोबत युवकांना प्रशिक्षण व शिक्षण देण्याबाबत विद्यापीठाने करार केला आहे, असे डॉ कराड म्हणाले.

यावेळी आर्वी विधानसभेचे आमदार तथा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी सुमीत वानखेडे यांचा लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गाडी अडवुन लुटणा-या चोरांना केली अटक


पुणे-गाडी अडवुन लुटणा-या २ चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये सॅलेसबरी पार्क, पुणे येथे एका चारचाकी इसमास दोन अनोळखी इसमांनी अडवुन त्याच्याबरोबर वाद करुन त्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेतली म्हणुन स्वारगेट पोलीस ठाणे गु. र. नं. ४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३५१ (३),१२६(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्हात अज्ञात आरोपी व चोरीस गेला मुद्देमाल यांचा शोध घेणे कामी पोलीस उप निरीक्षक, संतोष तानवडे, पोलीस अंमलदार असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे यांच्या आदेशाने स्वारगेट पोलीस ठाणे हददीत रवाना झालो असताना पोलीस अंमलदार सुजय पवार यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हे डायसप्लॉट चौक गुलटेकडी पुणे येथे थांबले आहेत. अशी माहीती मिळाली असता आम्ही लागलिच सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता दोन संशयीत इसम आम्हास पाहुन पळुन जावु लागले असता त्यांना सदर पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ते १) रोहीत सुर्यकांत कांबळे वय २१ वर्ष रा. गल्ली नं. १ औदयोगिक वसाहत, व्हेईकल डेपो पुणे २) सागर शिवानंद जळकुटे वय २४ वर्ष रा. गल्ली नं. १ औदयोगिक वसाहत, व्हेईकल डेपो, पुणे असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, दि. ०६/०२/२०२५ रोजी श्रीसुविधा दर्शन बंगल्याजवळ, सॅलेसबरी पार्क समोर, पुणे येथे आमच्या गाडीच्या अपघातावरुन एका चार चाकी चालकाशी वाद झाला व आम्ही त्यांच्या गळातील चेन हिसकावुन घेऊन आलो आहे असे सांगितले व सदर इसम दाखल गुन्हयातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या कडुन दाखल गुन्हात चोरीस गेलेला मुददेमाल व गुन्हात वापरलेली दुचाकी असा एकुण १,००,०००/- रु. कि.चा मुद्देमाल पंचनामाने जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रविण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त, परि.०२ पुणे अतिरिक्त कार्यभार, विवेक मासाळ, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक संतोष तानावडे, रविद्र कस्पटे, पोलीस अंमलदार नितीन वाघेला, सुजय पवार, संदिप घुले, दिपक खेदाड, फिरोज शेख, शैलेश वाघमोडे, हनुमंत दुधे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळेंचे राहुल गांधींना खुले आव्हान:म्हणाले – हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा, चितपट केल्याशिवाय राहणार नाही

पुणे:राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना आवाहन केले. 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीच्या विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे.
राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेत गडबड झाली आहे. त्यामुळे माझे राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन असे बावनकुळे म्हणाले. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहे. राहुल गांधी जर लढायला तयार झाले, तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

काँग्रेस स्वकर्तृत्वाने हरली, आता ईव्हीएमला दोष देईल
बावनकुळे म्हणाले, डबल इंजिन सरकार विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्वीकारले आहे. मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे देशाच्या 75 टक्के भूभागावर भाजपचे सरकार आहे. दिल्लीतील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेस स्वकर्तृत्वाने दिल्लीत हरली आहे. काँग्रेसने जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. आता काँग्रेस मतदान यंत्राला दोष देईल. सकाळचे नऊचे महान प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील, असे म्हणत बावनकुळे यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत. महायुती सरकार व्यवस्थित सुरू आहे. एकनाथ शिंदे चार खात्याचे मंत्री असून चांगले काम करत आहेत. पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात महायुती सरकार चालवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही. मी आणि माझा मुलगा यात ठाकरे फसल्याने वाटोळे झाले, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला cm फडणविसांनी दिली भेट

पुणे, ८ फेब्रुवारीः हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुकक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यकाळामध्ये होणार्‍या एशियाड, ऑलंपिक्स् गेम्स्, कॉमनवेल्थ गेम्स्, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्याचे पहिली महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार, महाराष्ट्र केसरी २०२५ पै. पृथ्वाराज मोहोळ आणि पहिल्या खो-खो विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक व पुण्याचे शिरीन गोडबोले, शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पै. सिकंदर शेख याच्या थरारक सामन्याचा आनंद देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धीरज घाटे यांचे थोरले बंधू स्व. धनंजय घाटे यांना आदरांजली वाहीली.

कुस्तीपटूंना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुस्ती क्रीडा प्रकार भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून लोकप्रिय असून त्याला एक पारंपारीक वारसासुद्धा आहे. राज्य तसेच पुणे जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिले महाराष्ट्र केसरी पै. रघुनाथ पवार यांचा सन्मान आपण आज केला असून ही जी परंपरा आपण पुढे नेली पाहीजे. त्यासाठी अशा भव्यदिव्य कुस्ती स्पर्धा आयोजनांची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये कुस्ती खेळासाठी आणि कुस्तीपटूंसाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा अशा वेगवेगळ्या स्तरांवर होणार्‍या स्पर्धांमध्ये राज्यांच्या कुस्तीपटूंची वाढ झाली पाहीजे, असा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकामध्ये पाहिजे त्या प्रमाणात राज्याचे कुस्तीपटू जिंकत नाहीत. त्या दृष्टीने अजुन काय प्रयत्न करावे लागतील, उत्तम प्रशिक्षण कसे करता येईल, याचा विचार करावा लागेल, त्यासाठी राज्याचे सरकार पुढाकार घ्यायला तयार आहे. यासाठी राज्यातील कुस्ती तज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यकाळामध्ये होणार्‍या एशियाड, ऑलंपिक्स् गेम्स्, कॉमनवेल्थ गेम्स्, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुतण्यानेच काकांचा केला खून

पुणे: पुतण्याने काकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना पाषाण गावातील कोकाटे आळीमध्ये शनिवारी(८ फेब्रुवारी) सकाळी घडली आहे. हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुतण्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पाषाण गावात पुतण्याने काकावर मालमत्तेच्या वादातून धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. महेश जयसिंगराव तुपे (वय ५६, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण गाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, तिघे रा. पाषाण गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तुपे यांचा मुलगा वरद (वय १९) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी शुभम महेंद्र तुपे (वय २८) हा मयत महेश तुपे यांचा पुतण्या आहे. त्यांच्यामध्ये मालमत्तेवरुन वाद सुरू होता. महेश आणि शुभमची आई या दोघांचे एकत्र बँक खाते आहे. या बँक खात्यातील पैशांची मागणी शुभम काका महेश तुपे यांच्याकडे करत होता. नंतर यावरुन काका पुतण्यात वाद झाला.दरम्यान, शुभमने त्याचा मित्र रोहन आणि ओम या दोघांची मदत घेऊन काका महेश यांचा खून करण्याचा कट रचला. शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश पाषाण गावातील कोकाटे आळीतून दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. आरोपी शुभम आणि त्याचे मित्र आळीतील गणपती मंदिराजवळ लपून बसलेले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यानंतर महेश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपाचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, चतु:शृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे घटनास्थळी तातडीने पोहचले. या खून प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कागदीपुऱ्यात वाहनांची मोडतोड करणाऱ्या गुंडांची काढली धिंड

पुणे :शहराच्या कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरामध्ये गुरुवारी मध्यरात्री(6 जानेवारी) वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर गणेश अडागळे (वय १९), मंथन प्रकाश सकट (वय १९, दोघे रा. पीएमपी काॅलनी, कागदीपुरा, कसबा पेठ), ओम देविदास शिंदे (वय १९, रा. शिंदे वाडा, पारगे चौक, मंगळवार पेठ), सोहम राजेंद्र हराळे (वय २०, रा. दुर्गामाता मंदिर, कवडेवाडी, कोरेगाव पार्क) यांना अटक करून फरासखाना पोलिसांकडून चौघांची धिंड काढण्यात आली आहे. या प्रकरणी यासीन इम्तियाज शेख (वय २९, रा. राम-रहिम मित्र मंडळशेजारी, कागदीपुरा, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहराच्या कसबा पेठेतील कागदीपूरा परिसरामध्ये गुरुवारी मध्यरात्री(6 जानेवारी) वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. फिर्यातदार इम्तियाज शेख यांचे गेल्या वर्षी आरोपी अडागळे यांच्यासोबत भांडण झाले होते. याचा राग धरून गुरुवारी (6 जानेवारी) मध्यरात्री आरोपी अडागळे, शिंदे, हराळे आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनी कागदीपुरा भागात कोयत्याद्वारे दहशत माजविली होती. यात तक्रारदार शेख यांच्या रिक्षाची काच फोडली. त्याचबरोबर रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक करून ज्या ठिकाणी त्यांनी वाहनांची तोडफोड केली होती त्याच भागातून त्यांची धिंड काढली. याबाबत अगोदरच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तोडफोड करणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचा आदेश पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.

गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे पुण्यात अपहरण करून लुटमार


पुणे:गुजरातमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करुन त्याला नदीपात्रात धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बलभद्रसिंग नटवरसिंग जाडेजा (वय २५, सध्या रा. नलावडे सदन, गावकोस मारुतीजवळ, कसबा पेठ, मूळ रा. कच्छ, गुजरात) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलभद्रसिंग याचे वडील अहमदाबाद पोलीस दलात आहेत. तो आठवड्यापूर्वी पुण्यात फिरायला आला होता. त्याचा चुलतभाऊ कसबा पेठेत राहायला आहे. शुक्रवारी रात्री त्याचे पोट दुखू लागल्याने तो घराबाहेर पडला. तो सोडा पिण्यासाठी निघाला असताना गावकाेस मारुतीजवळ त्याने एका दुचाकीस्वाराला थांबविले. सोडा कुठे मिळतो, अशी विचारणा त्याच्याकडून करण्यात आली. दुचाकीस्वाराने त्याला दुकान दाखवितो, असे सांगून त्याला दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवरुन आणखी दोघे जण आले. काही अंतरावर दुचाकी थांबविण्यात आली. बलभद्रसिंग याच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली होती.

त्याला दुचाकीवरुन नदीपात्रात नेण्यात आले. तिघा जणांनी त्याला धमकावून त्याच्याकडील दहा हजार रुपये आणि मोबाइल संच काढून घेण्यात आले तसेच त्याला मारहाण करुन आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तेव्हा पैसे नसल्याचे त्याने सांगितले. चोरट्यांनी त्याच्या चुलतभावाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पैशांची मागणी केली. चुलतभावाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला दारुवाला पूल परिसरातील देवजीबाबा मंदिराजवळ सोडून चोरटयांनी पलायन केले. घाबरलेला बलभद्रसिंग चुलतभऊ जयेंद्रसिंग याच्याकडे परत जाऊन त्याला या घटनेची माहिती दिली.

सत्ता म्हणजे अहंकार नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्याचा मार्ग -लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन

एमआयटी डब्लयूपीयूत १४ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन
उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे, दि.८: आयुष्यभर साधी जीवनशैली आत्मसात करून, वाटचाल करणारे राजकारणी देशात कमी आहेत. सत्ता म्हणजे अहंकार करणे नाही, तर तो लोकांसाठी कामे करण्याचा आणि समस्या सोडविण्याचा एक मार्ग आहे, हे लक्षात घेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी यशस्वी होतात, असे मत लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. राजकारणाचा मार्ग रेड कार्पेटसारखा दिसत आला, तरी खाचखळग्यांनी भरलेला असतो. यावर विचारपूर्वक मार्गक्रमण करणारे लोकप्रतिनिधी राजकारणात योग्य पदांवर जातात, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.
  याप्रसंगी उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी, बोट कंपनीचे सहसंस्थापक आणि उद्योजक अमन गुप्ता, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, विद्यार्थी प्रतिनिधी पृथ्वीराज शिंदे, अपूर्वा भेगडे, नितीश तिवारी उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात ’बेल ऑफ डेमोक्रसी’चा घंटानाद केला. या समारंभात लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, आपण जीवनात कधीच परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी राहायला हवे आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान घ्यायला हवे. देशातील नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी ध्येयधोरणे ठरविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यायला हवा. देशातील नागरिक हुशार असून, त्यांना बर्‍या-वाईट गोष्टी कळतात. सतीश महानासारख्या राजकारणातील चांगल्या लोकांना ओळखून, त्यांचा सन्मान करणे, ही अत्यंत चांगली बाब आहे.
सतीश महाना म्हणाले, भारतीय छात्र संसदेत सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते सत्कार होणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. निवडणुकीच्या दिवशी नागरिकांनी आपण लोकप्रतिनिधी का निवडत आहोत, याचा विचार करायला हवा. निकालानंतर लोकांनी आपल्याला का निवडून दिले, याचा आमदारांनी विचार केल्यास आदर्श लोकप्रतिनिधी तयार होण्याची प्रक्रिया घडेल. चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी छात्र संसदेत उपस्थित असलेल्या युवा प्रतिनिधींची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक काम केल्यास  आपला देश नक्कीच विकसित भारत होईल.
डॉ.सी. पी. जोशी म्हणाले, चांगल्या व्यक्तींना निवडून त्यांना सन्मानित करणे ही बाब समजासाठी प्रेरणादायी असते. सात वेळा एकाच विधानसभा क्षेत्रातून निवडून येणे ही फार कठीण बाब आहे. उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचा सन्मान करून भारतीय छात्र संसदेने चांगले काम केले आहे. देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी सुरू केलेल्या, भारतीय छात्र संसदेमुळे आज युवा पिढीला देशभरातून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. याचा उपयोग चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी होत आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, जगात भरपूर तणाव आणि अशांतता आहे. अशावेळी जगातील देशांचे लक्ष आपल्या भारताकडे लागले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. नागरिक म्हणून आपल्यालाही यात पुढाकार घेऊन काम करायचे आहे. भारताला विश्वगुरू होण्यासाठी आपल्याला जाती-पातींच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. जगाला शांततेचा मार्ग दाखविण्यासाठी अध्यात्म आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची सांगड घालून आपल्याला पुढे जावे लागेल.
डॉ. राहुल कराड म्हणाले, या संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे बळकटीकरण होत असून, समाजामध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. राजकारण दिसते तेवढे सोपे नाही. त्यामध्ये राजकारणी लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. राजकारणात उच्च शिक्षित युवा प्रतिनिधी यायला हवे, या उद्देशाने छात्र संसदेची सुरुवात झाली आहे. प्रत्येक राज्याच्या सरकारने युवा छात्र संसदेची सुरुवात करायला हवी. त्यामुळे देशातील भेदभाव दूर होऊन, सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल आणि आपल्या देशाची प्रगती होण्यास मदत होणार आहे.
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
सन्मान मागितल्याने नाही, तर व्यवहाराने मिळतो
लोकप्रतिनिधीने आपण काय बोलावे आणि काय बोलू नये, याचा अभ्यास करायला हवा.त्याचप्रमाणे कसे बोलावे आणि मत व्यक्त करावे, हेही शिकणे गरजेचे आहे. ध्येयधोरणे आखण्यासाठी त्यावर मते मांडण्यासाठी चांगले वकृत्व आवश्यक आहे. सन्मान मागितल्याने नाही, तर आपल्या व्यवहाराने मिळतो, असे सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या एका उदाहरणाद्वारे सांगितले.

जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कसपुण्यात सिंहगड रोड येथे दिमाखात सुरु !!सर्कस मध्ये प्रथमच डिजिटल हत्ती !!

पुणे-आंतरराष्ट्रीय सर्कस नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे नोंदवणारी जागतिक कीर्तीची रॅम्बो सर्कस पुण्यात सिंहगड रोड येथे फनटाईम थिएटरच्यामागील मैदानात शनिवार दि. ८ फेब्रुवारीपासून सूरु होत आहे. सर्कसचे रोज दुपारी ४.३० आणि सायंकाळी ७.३० असे शो आयोजित केले जाणार असून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी दुपारी १.३० ,४.३० व सायंकाळी ७.३० असे ३ शो होणार आहेत. तिकीट दर : ७५० रु + जीएसटी, ५०० रु, ३५० रु, २०० रु आहे. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत आगाऊ बुकिंग उपलब्ध असून सर्व प्रेक्षकांकडून डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट स्वीकारले जाईल.  www.rambocircus.in अथवा 9611554897 वर कॉल केल्यास बुकिंग उपलब्ध होईल. तसेच Instagram: weloverambocircus, Facebook : /rambocircus.india अँड Subscribe us on Youtube: rambocircus सर्कस प्रेमींना सर्कसला फोलो करता येईल. सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन वर्षा खालील बालकांना प्रवेश मोफत आहे. तसेच, अपंग, अंध, मतीमंद मुलामुलींच्या संस्थांनी संपर्क साधल्यास त्यांना मोफत सर्कस दाखवली जाईल. सैनिकांच्या कुटुंबियांना देखील सवलतीच्या दारात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी दिली.

कोरोनाच्यानंतर नव्या जोमाने सुरु झालेल्या रॅम्बो सर्कसमध्ये १२०० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. यामध्ये १२५ हून अधिक स्त्री-पुरुष कलावंत असून, सर्कसचा स्वतःचा स्वतंत्र बँड आहे. यामध्ये डिजिटल हत्ती हे विशेष आकर्षण असणार आहे. शिवाय मृत्युगोलात मोटार सायकलवरून चित्तथरारक कसरती, व्हील ऑफ डेथ, फ्लायिंग ट्रपिझ, स्वॉर्ड बॅलन्स, जग्लिंग, नवर्पट्टी, क्विकचेंज, इ-स्केटिंग, कॅण्डल, वाॅटर शो, इ-स्कीप्पिंग जंप, रोलाबोला , बेबी रोप, ग्लोब, रिंग डान्स, जर्मन वेल्स, रिंग ऑफ डेथ, सायकल मनोरा आदि. कलाप्रकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. सर्कसमध्ये ५ विदुषक असून वैविध्यपूर्ण करामतींच्या द्वारे ते बच्चे कंपनीला आनंद  देतील.सर्कासचा मुक्कम एक महिना आहे.