Home Blog Page 457

कोल्हापूर, पुणे नाही ओ … नागपुरातील फिल्मसिटीची जागा ठरली!

0

नागपूर-नागपुरातील फिल्मसिटीच्या संदर्भात या ठिकाणी अनेक विभागांची संयुक्त बैठक होऊन रामटेकजवळ १२८ एकर जागा फिल्मसिटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. विदर्भात चित्रपटनिर्मितीला चालना मिळावी यासाठी चित्रपट नगरी निर्माण करण्याचा निर्णय घेतला असल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

रामटेकजवळील १२८ एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आगामी पंधरा दिवसांत जिल्हाधिका-यांकडे सादर केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील फिल्मसिटी यशस्वी व्हावी, यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय झाला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते नागपूर येथे बोलत होते.

दरम्यान, आरबीआयने नियम आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई केली आहे. या दृष्टीने लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत, यासाठीच ही कारवाई केली आहे. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री यावर चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतील, लोकांना पैसे परत मिळतील याची काळजी घेतील, अशी माहितीही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिली आहे.

वाढती बेरोजगारी: युवक कॉंग्रेस करणार हल्लाबोल आंदोलन

पुणे-देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात युवक कॉंग्रेस हल्लाबोल आंदोलन सुरु करणार आहे अशी माहिती येथे पुणे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे यांनी पत्रकार परिषदेतून दिली .

ते म्हणाले,’महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात विविध प्रकारचे अंमली पदार्थ खुले आम पणे विक्री होत आहे‌. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील व प्रामुख्याने महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे.वाढती महागाई, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि भविष्याची अनिश्चितता यातून बरेच युवक गुन्हेगारीकडे वळत असून यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.

अनेक विविध स्थानिक पातळीवरील विषयांवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक आंदोलनात सामील‌ होणार असून या आंदोलनाबाबत महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सहप्रभारी एहसानखान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया चेअरमन अक्षय जैन, प्रदेश सचिव विवेक कडू आणि पुणे युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे यानी हि माहीती दिली उद्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कॉंग्रेस भवन पुणे येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात होतं आहे.या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सहप्रभारी एहसानखान, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया चेअरमन अक्षय जैन , प्रदेश सचिव विवेक कडू , प्रदेश सचिव प्रथमेश आबनावे ,अमोल दौंडकर आणि पुणे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते

त्रिवेणी संगमावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेही अमृत स्नान

“संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण” – डॉ. नीलम गोऱ्हे

प्रयागराज, दि. १४ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात पवित्र अमृत स्नान करून आध्यात्मिक परंपरेचा अनोखा अनुभव घेतला. त्यांनी पितृऋण, परिवार ऋण आणि सर्व देवदेवता ऋण स्मरून, विष्णु, शिव आणि कृष्ण यांना अर्घ्य अर्पण करत विशेष प्रार्थना केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने भव्य नियोजन करून त्रिवेणी संगम परिसरात उत्कृष्ट व्यवस्था केली होती. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या व्यवस्थेसाठी सहकार्य केल्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने शिक्षण विभाग अधिकारी अजय प्रताप सिंह आणि क्रीडा विभाग अधिकारी विजय श्रीवास्तव यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे औपचारिक स्वागत केले.

यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “या पवित्र संगमावर स्नान करणे हा केवळ विधी नाही, तर तो एक आध्यात्मिक आणि भावनिक ऊर्जा मिळवण्याचा अनमोल क्षण आहे. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या भव्य नियोजनामुळे हा अनुभव अधिक सुंदर आणि अविस्मरणीय ठरला. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानते.”

वाहतूक कोंडी अन प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मोफत E रिक्षा सेवा सुरू करावी “आप”ने सुचविला पर्याय

पुणे-जुन्या महापालिका हद्दीत नित्याने होणारी वाहतूक कोंडी आणि वायू व ध्वनी प्रदूषण कमी करायचे असेल तर महापालिकेने बॅटरीवरील छोट्या रिक्षा ,बस मोफत उपलब्ध करून द्याव्यात आणि खाजगी वाहनांना या परिसरात NO ENTRY करावी असा पर्याय आम आदमी पक्षाने सुचविला आहे.महापालिकेला आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणाऱ्या राज्य सरकारला हे अवघड नाही असेही म्हटले जाते आहे.

पुणे शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असून त्याबरोबर वाहनांची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात वाढत आहे आणि या सर्व प्रकारामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत अनेक बाजारपेठा असल्याने शहराच्या उपनगरातून अनेक नागरिक खरेदी करता आपले वैयक्तिक वाहन घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात येत असतात, त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अरुंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व त्यातून वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पार्किंगची दुरावस्था यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. पुणे महानगरपालिकेला सध्या तरी या समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नसून भविष्यात देखील या सर्व समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली जावी ज्यात छोट्या बस तसेच ऑटो रिक्षा यांचा समावेश केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना ऑटोरिक्षा मोफत उपलब्ध करून दिल्यास अनेक नागरिक पी एम पी एम एल ने प्रवास करून मध्यवर्ती भागापर्यंत येऊ शकतात व मध्यवर्ती भागातील प्रवास हा महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षाने करू शकता. आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष चेंथिल अय्यर म्हणाले, मोफत ऑटो रिक्षा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ऑटो रिक्षाचे मीटर प्रमाणे दर ठरवून त्यांची महानगरपालिकेच्या माध्यमातून नेमणूक करावी. जेणेकरून रिक्षा चालकांना देखील मारलेल्या फेऱ्या प्रमाणे योग्य मोबदला महिन्याकाठी मिळू शकेल व रोजगाराची संधी उपलब्ध होईल, तसेच नागरिकांना देखील चांगला प्रवास मिळाल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

वाढत्या शहरीकरणामुळे प्रवासाचे वेगवेगळे उपाय शोधणे गरजेचे असून त्याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी बस जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी मोफत रिक्षा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

सदर सुविधा ही नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात उपलब्ध करून दिल्यास त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून शहराच्या इतर भागात देखील हा प्रकल्प राबवता येऊ शकतो. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या या मागणीचा पुणे महानगरपालिकेने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर इलेक्ट्रिक रिक्षा किंवा सीएनजी रिक्षा नागरिकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून द्याव्यात, या सर्व सेवांसाठी महापालिकेने एक ॲप तयार करावे ज्याच्या अनुषंगाने प्रत्येक ट्रीप ची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचली जाऊ शकेल. वाढत्या वाहतूक समस्येला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय शोधणे जरुरी असल्याने आम्ही ही मागणी करत आहोत असे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

पीएम सूर्यघर योजनेच्या जागरासाठी सौर रथाद्वारे महावितरणचा ५० हजारांवर वीजग्राहकांशी थेट संवाद

पुणे: सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल सौर रथाच्या माध्यमातून आठवड्याभरात तब्बल ५० हजारांवर वीजग्राहकांशी महावितरणकडून थेट संवाद साधण्यात आला तसेच डिजिटल स्क्रीनद्वारे संवाद, सादरीकरण व माहिती पत्रकांद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली.

घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने सौर रथाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते सौर रथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे अध्यक्ष श्री. शशिकांत वाकडे, खजीनदार श्री. समीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सौर रथाच्या डिजिटल स्क्रिनद्वारे योजनेची माहिती देताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे श्री. समीर गांधी यांनी नागरिकांशी आठवडाभर संवाद साधला. तसेच उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी या योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज, मिळणारे अनुदान आदींचे संगणकीय सादरीकरण केले. हीच माहिती पत्रकांद्वारे देखील देण्यात आली.

आठवडाभर प्रामुख्याने दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत या सौर रथासोबत संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहायक अभियंते व जनमित्रांनी सोसायट्या, अपार्टमेंट्समधील नागरिकांशी संवाद साधला. योजनेची माहिती दिली. यात शिवाजीनगर, बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, काळेवाडी, भोसरी, मोशी, चऱ्होली, वारजे, कोथरूड, स्वारगेट, धनकवडी, पद्मावती, पर्वती, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, हिंगणे, धायरी, नऱ्हे, एरंडवणे आदी भागात या सौर रथाद्वारे जागर करण्यात आला. या सौररथाच्या जागर मोहिमेत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. शेखर मुरकुटे यांच्यासह अभियंते, जनमित्रांसह ‘मास्मा’चे रोहन उपासनी, संदीप गदबरे, नरेंद्र पवार, स्वप्निल बाथे आदींनी सहभाग घेतला.

बनावट गुडनाइट उत्पादने पुरविणाऱ्या नकली उत्पादन युनिटवर मुंबई पोलिसांचा छापा,आशिष अंदाभाई चौधरीला पकडला ..

0

मुंबई : बनावट गुडनाइट फ्लॅश उत्पादने तयार करून ती मुंबईतील विविध किराणा दुकानांना पुरविणाऱ्या आशिष अंदाभाई चौधरीवर कारवाई करण्यात आली आहे. गुडनाइटसारखा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या आणि घरगुती कीटकनाशक श्रेणीतील आघाडीचा ब्रँड असलेल्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी महाराष्ट्रातील वसईजवळील उत्पादन केंद्रावर छापा टाकला आणि कारवाई केली.

या छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे 50,000 गुडनाट फ्लॅशच्या रिकाम्या बाटल्या, 50,000 गुडनाट फ्लॅशच्या पॅकिंग कार्टन्स आणि 16,000 गुडनाट विक्स यांचा समावेश आहे. या प्रकरणी 1957 च्या कॉपीराइट कायद्याच्या कलम 63 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये बनावट उत्पादन निर्मिती आणि कॉपीराइट उल्लंघनाचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांचा तपास सुरू असून, या बनावट उत्पादनांच्या वितरण जाळ्याचा शोध घेऊन संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ठोस कारवाईमुळे भविष्यात बनावट उत्पादनांची विक्री रोखली जाईल आणि ग्राहकांना केवळ अस्सल व सुरक्षित गुडनाइट उत्पादने मिळावित याची खात्री केली जाईल.

या प्रकरणावर भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या होम केअर विभागाच्या मार्केटिंग प्रमुख शिल्पा सुरेश यांनी सांगितले की, बनावट उत्पादनांचा प्रसार हा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच FMCG उद्योगाच्या विश्वासार्हतेसाठी मोठा धोका आहे. अशी नकली उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर ती मानवी आरोग्यास हानिकारकही ठरू शकतात. GCPL आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अस्सल व सुरक्षित उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही आमच्या वितरण जाळे, स्थानिक प्रशासन आणि ग्राहकांच्या सहकार्याने नियमित गुणवत्ता तपासणी करतो. मुंबई पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे बनावट उत्पादनांविरोधातील आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ मिळाले आहे आणि ग्राहकांचा गुडनाइट ब्रँडवरील विश्वास दृढ राहील.”

बाजारात बनावट गुडनाइट उत्पादने आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, GCPL ग्राहकांना सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करते. ग्राहकांनी खरेदीच्या दरम्यान खरी विक्री पावती (Sales Invoice) घ्यावी आणि बनावट गुडनाइट उत्पादने आढळल्यास किंवा असे उत्पादने विकणारे घाऊक/किरकोळ विक्रेते दिसल्यास त्वरित GCPL कडे तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविण्यासाठी care@godrejcp.com वर ईमेल पाठवा किंवा 1800-266-0007 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

हिंसेला उत्तर प्रेमानेच…महिला जागर समिती आयोजित निर्भीड साऱ्या बनू ग ओपन माईक कार्यक्रमात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे 15: महिलांवरील वाढत्या हिंसाचाराला लक्षात घेता हिंसेला प्रेमानेच उत्तर दिले जाऊ शकते, हा संदेश देत सर्व व्यक्ती एकमेकांच्या व्हॅलेंटाइन्स आहेत, हे सांगत निर्भीड साऱ्या बनू ग… या थीमवर ओपन माईक सेशनमध्ये तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याला निमित्त होते 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर संध्याकाळी 6 वाजता रंगलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजक समितीच्या सदस्य संगीता पाटणे यांनी सांगितले की हे रस्ते आमचेही आहेत, मात्र संध्याकाळ झाले की ते भेदभाव करायला लागतात. हे मोडीत काढत स्त्री पुरुष दोघांनीही हिंसेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, तेव्हाच ही परिस्थिती बदलेल. श्रद्धा रेखा राजेंद्र यांनी सांगितले की ‘वन बिलियन रायझिंग’ म्हणजे ‘हिंसेच्या विरोधात 100 कोटी’. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासानुसार जगभरात प्रत्येक तीनपैकी एक स्त्री हिंसा सहन करते. म्हणजेच जगभरात 100 कोटी महिला हिंसा सहन करतात. म्हणून महिलांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात जगभरातून आपण 100 कोटी उभे राहू या-One Billion Rising! हिंसामुक्त आणि न्यायपूर्ण समाजासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणींनी आपल्या वैयक्तिक अनुभवांपासून, नाटक, कविता, डान्स, ग्रुप डान्स, गाणी सादर करत हिंसेला विरोध केला. फुलपाखराच्या प्रतिकृती समोर ‘मी निर्भीड मी मुक्त’, ‘सहना नहीं, कहना सिखो’ असे संदेश देणारे प्लाकार्ड हातात घेऊन तरुणांनी सेल्फी आणि फोटो काढले. चळवळीच्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी महिला जागर समितीच्या संगीता तिवारी, शोभा करंडे, असुंता पारधे, शशिकला ढोलेपाटील, नीता रजपूत, अलका जोशी आणि इतर सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा देशपांडे आणि गीतांजली प्रकाश अंजली यांनी केले. 

‘त्या तिथे , तिकडे , पलीकडे माझिया …..

जागतिक रेडिओ दिनानिमित्त ‘नागझिरा’ अभिवाचन
‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ चा उपक्रम
पिंपरी, पुणे- १३ फेब्रुवारी या जागतिक रेडिओ दिनानिमित्त साधून ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ च्या वतीने निगडी, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यानात ‘आदिम’ प्रस्तुत व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘नागझिरा’ या निसर्गवर्णनाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी देवराई फाऊंडेशनचे संस्थापक आणि पीसीएमसी स्मार्ट सिटी कमिटीचे सदस्य धनंजय शेडबळे, पीसीईटी च्या मीडिया अँड ब्रँडिंग विभागाचे प्रमुख डॉ. केतन देसले, प्रा. आनंद बिराजदार, डेक्कन कॉलेजच्या प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. सामान्य माणसाच्या मनात निसर्गाबद्दल आपलेपणाची भावना आणि जबाबदारीची जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातल्या नागझिरा जंगलात राहून व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेल्या जंगलातले दिवस या सचित्र नोंदवहीचे हे अभिवाचन डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी केले. यासाठी चैतन्य जोशी यांनी पुरक असे पार्श्वसंगीत संयोजन केले होते. झाडावर लटकवलेला कंदील, तिरोडा ३२ किमी हा मैलाचा दगड, पितळी तांब्या भांडे, बैठकीवर टाकलेली कांबळ, नागझिरा जंगलाचा नकाशा अशा वस्तूंनी साधलेल्या वातावरणनिर्मितीने कार्यक्रमाची उंची वाढवली. विविध वयोगटातील उपस्थित निसर्गप्रेमी प्रेक्षकांनी वाचनास भरभरून प्रतिसाद दिला.
“तळ्यापलीकडे, डोंगराच्या उतारावर जी वृक्षराजी होती, तिच्यात काळ्या डोक्याचे पिवळे हळदुले पक्षी पुष्कळ होते. पिवळ्यारंजन रंगाची ही पाखरं जेव्हा या वृक्षावरून त्या वृक्षावर भरारत, तेव्हा पिवळ्या शाल्मलीच्या फुलांनाच पंख फुटले आहेत असं, वाटे.”
“समोरच्या हिरवळीवर नाना कीटक होते. हे कीटक टिपण्यासाठी नाना पाखरं येत. एक नीलकंठ पाखराचं जोडपं येई, हे नीळंगर्द पाखरू पंख पसरून अधांतरी झेप घेई तेव्हा माझ्या मनात येई, की स्वातंत्र्य या वस्तूचा रंग बहुधा निळा असावा”
अश्या अनेक मार्मिक वाक्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माणसाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातल्या अन्य घटकांवर होत असलेला परिणाम, आपल्या चुकीच्या सवयींमुळे निसर्गाची होत असलेली अपरिमित हानी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याविषयी शेडबळे यांनी मार्गदर्शन केलं.


‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ निर्मिती प्रमूख माधुरी ढमाले-कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले, निर्मिती सहाय्यक विद्या राणे यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पीसीसीओईच्या ‘आर्ट सर्कल’च्या विद्यार्थ्यांनी संयोजनात सहभाग घेतला.
पीसीईटीच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मातई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना जागतिक रेडिओ दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

स्व. संगीतकार सी. रामचंद्र यांचा दुर्मिळ पियानो राजा दिनकर केळकर संग्रहालयास भेट !

केळकर संग्रहालयामध्ये रविवारी होणार दाखल

पुणे :मराठी,हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत ३ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर संगीताने,रसिकांच्या मनावर राज्य करणारे गायक व संगीतकार स्व.सी.रामचंद्र तथा रामचंद्र नरहर चितळकर यांच्या वापरातील पियानो हा राजा दिनकर केळकर संग्रहालयात देणगी स्वरुपात दाखल होत आहे.राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सी.रामचंद्र तथा अण्णांनी अनेक गाणी याच पियानोवर बसून संगीतबद्ध केली होती.सी.रामचंद्र अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेन यांनी हा पियानो मुंबईस्थित सुरेश यादव यांच्या कुटुंबियांकडे त्याची जपणूक करण्यासाठी सुपूर्द केला. या कुटुंबानेही तो जीवापाड सांभाळला, त्याची पूजा-अर्चा केली.१९७५ मध्ये अण्णांनी सुरू केलेल्या ‘मुलाये न बने’ या वाद्यवृंदात श्री.यादव यांनी सॅक्सोफोन वाजविण्यास सुरुवात केली होती. श्री.यादव यांची दोन्ही मुले सुशांत आणि संदेश हेही याच पियानोवर शिकले.

या पियानोचे सुयोग्य जतन राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये होईल व पुढील पिढ्यांना तो पाहता येईल या स‌द्भावनेने सुरेश यादव यांनी तो संग्रहालयास सुपूर्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला. रविवार,दि.१६ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संग्रहालयामध्ये होणाऱ्या छोटेखानी समारंभामध्ये हा पियानो सुप्रसिद्ध अॅकॉर्डियन वादक इनॉक डॅनियल यांचे हस्ते स्वीकारण्यात येणार आहे. संगीत सहाय्यक रचनाकार इनॉक डॅनियल यांनी सी.रामचंद्र यांचेसह इतर विविध संगीतकारांसोबतही अप्रतिम अॅकॉर्डियन वादन केले आहे.

या छोटेखानी समारंभास सुरेश यादव हे सपत्नीक,त्यांच्या स्नेह्यांसह उपस्थित रहाणार आहेत असून संग्राहक दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, संगीत क्षेत्रातील जाणकार अभ्यासक डॉ.प्रकाश कामत , मेलडी मेकर्सचे सुहासचंद्र कुलकर्णी हे विशेषकरून उपस्थित रहाणार आहेत.

आपल्या यशस्वी हिंदी चित्रपट कारकीर्दीत पाश्चिमात्य संगीताचा उत्तम वापर करणारे सी. रामचंद्र हे पहिले संगीतकार होत. सी. रामचंद्र यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकीर्दीत ११८ हिंदी, ७ मराठी, १ तमीळ व १ तेलगू चित्रपटांना उत्तम संगीत दिले. शहनाई, आशा, अनारकली, अलबेला, आझाद अशा निवडक व लोकप्रिय चित्रपटांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.

सर्कस ची कला आणि त्यातील कलाकार जगले पाहिजेत – ना. माधुरीताई मिसाळ.

सर्कस मधील कलाकारांना शासनाने पेंशन व प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घर द्यावे – संदीप खर्डेकर

पुणे-सर्कस ही एक कला असून मनोरंजनासाठी चा एक जिवंत खेळ आहे म्हणून ही कला आणि यातील कलाकार जगले पाहिजेत असे उद्गार नगरविकास, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय व परिवहन राज्यमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ यांनी काढले. सर्कस मधील कलाकारांच्या मागण्या शासनाकडे निश्चितच मांडू असेही त्या म्हणाल्या.
आज सिंहगड रस्त्यावरील रॅम्बो सर्कस मधील अगदी खरा वाटणारा “डिजिटल हत्ती” चे व सर्कस चे औपचारिक उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.तीस वर्षांपूर्वी मी माझे पती कै.सतीशशेठ मिसाळ, संदीप खर्डेकर, रॅम्बो सर्कस व हॅन्डलूम हॅंडीक्राफ्ट फेयर चे संचालक पी. टी. दिलीप, ओमप्रकाश कोहली यांच्या सोबत सर्कस बघायला यायचे व येथे कलाकारांसोबत आम्ही जेवायचो अश्या ह्रद्य आठवणी ही त्यांनी सांगितल्या.
यावेळी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रॅम्बो सर्कस चे संचालक सुजीत दिलीप, श्री. जॉन, श्री. अरुल होरायझन,भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनाली गुप्ते,भाजपा च्या महिला आघाडी च्या उपाध्यक्ष सौ.कल्याणी खर्डेकर, प्रा. चेतन दिवाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
पूर्वी सर्कस मध्ये प्राण्यांचे विविध खेळ दाखविले जायचे आता मात्र प्राणीमित्रांच्या भूमिकेमूळे आणि कायद्यातील बदलामुळे सर्कशीतून प्राणी गायब झाले आणि आता देशातील विविध भागातील स्त्री पुरुष कलाकार जीवापाड मेहनत घेऊन आपली कला सादर करतात असे संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच पूर्वी चित्रपटांच्या बरोबरीत सर्कस बघायला गर्दी होत असे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे आता शासनाने सर्कशीतील कलाकारांकडे लक्ष देणे गरजेचे असून ह्या कलाकारांना पंतप्रधान घरकुल योजनेतून अल्प दरात घर उपलब्ध करून देणे व त्यांना पेन्शन देणे गरजेचे असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
सुजीत दिलीप यांनी सर्कशीतील जोकर व अन्य कलाकारांसोबत ना. माधुरीताईंचा सत्कार केला व येणाऱ्या काळात आमच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.सर्कस चा व्यवसाय कठीण काळातून जात असून तंबू ठोकण्यासाठी जागा मिळविण्यापासून अडचणीना सुरुवात होते असे ही सुजीत दिलीप यांनी सांगितले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे खेळ असून पुणेकर सर्कस च्या प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

लव्ह जिहादच्या विरोधात कायदा:फडणवीस सरकारचा निर्णय

मुंबई-राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येणार आहे. लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फसवणूक व बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. तसेच महाराष्ट्रात हा कायदा लागू झाल्यावर महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य असणार आहे.

पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद, फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. देशात आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याची मागणी भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्यातील विविध हिंदू संघटनांनी केली होती.
राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना या विरोधात कायदा करण्याची ग्वाही विधानसभेत दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. या समितीत महिला व बालकल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, गृहविभागाचे सचिव तसेच गृह विभागाचे (विधी) सचिव हे सदस्य असतील.

प्रयागराजमध्ये बोलेरो बसला धडकली- छत्तीसगडमधील 10 भाविकांचा मृत्यू

0

प्रयागराज:उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शुक्रवारी रात्री उशिरा २.३० वाजता एका बोलेरोची बसशी टक्कर झाली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. ज्या सर्व लोकांचा मृत्यू झाला ते बोलेरोमधून प्रवास करत होते. ते छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून महाकुंभाला येत होते. प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा परिसरात हा अपघात झाला.

बसमध्ये १९ जखमी प्रवास करत होते आणि ते मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. संगमात स्नान केल्यानंतर ते वाराणसीला जात होते. ही टक्कर इतकी भीषण होती की बोलेरोचे मोठे नुकसान झाले.

कोणाचा हात तुटला होता तर कोणाचे डोके फुटले होते. बोलेरोमध्ये बरेच लोक अडकले. बोलेरोमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले.

आयुक्त तरुण गाबा आणि डीएम रवींद्र कुमार मांधड घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

एसपी यमुनापार विवेक यादव म्हणाले की, बोलेरोमधील सर्व प्रवासी पुरुष होते. त्याचा वेग खूप जास्त होता. बस चालकाने ब्रेक लावले, पण समोरून येणारी बोलेरो बसवर समोरासमोर आदळली.

अमेरिका आज 119 भारतीयांना जबरदस्तीने बाहेर काढणार : यामध्ये पंजाबमधील 67 आणि हरियाणातील 33 लोकांचा समावेश, विमान अमृतसर विमानतळावर उतरेल

0

अमेरिकेत सुमारे ७ लाख बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित-

प्यू रिसर्च सेंटरच्या मते, २०२३ पर्यंत अमेरिकेत ७ लाखांहून अधिक बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित असतील. मेक्सिको आणि एल साल्वाडोर नंतर हे सर्वाधिक आहे. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांशी व्यवहार करणाऱ्या सरकारी संस्थेच्या (ICE) मते, गेल्या ३ वर्षांत सरासरी ९० हजार भारतीय नागरिकांना बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले आहे. या स्थलांतरितांपैकी मोठा भाग पंजाब, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून येत आहे.

अमेरिकेतून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी आज (१५ फेब्रुवारी) शनिवारी रात्री १० वाजता पंजाबमधील अमृतसर विमानतळावर पोहोचत आहे. यामध्ये ११९ भारतीयांना जबरदस्तीने परत पाठवले जाईल. यामध्ये पंजाबमधील ६७ आणि हरियाणातील ३३ जणांचा समावेश आहे. यादरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे विमानतळावर जाऊन हद्दपार होणाऱ्या पंजाबींना भेटतील. यानंतर, १६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी रात्री १० वाजता, १५७ भारतीयांना घेऊन जाणारे विमान अमृतसरला पोहोचेल.

यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबमास्टर विमानातून १०४ भारतीयांना अमृतसरला विमानाने नेण्यात आले होते. या लोकांना हातात आणि पायात बेड्या घालून आणण्यात आले. यावेळी भारतीयांना कसे हद्दपार केले जाईल आणि त्यांना पुन्हा हातकड्या आणि बेड्या घालून पाठवले जाईल का, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शुक्रवारी संध्याकाळी अमृतसरमध्ये पोहोचलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान म्हणाले, “पंजाबमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारी विमाने उतरवणे चुकीचे आहे. हे पंजाबला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत गेलेल्यांना हद्दपार केले जात आहे. यापूर्वी ज्यांना हद्दपार करण्यात आले होते त्यातही वेगवेगळ्या राज्यांतील लोक होते. मग विमाने अमृतसरमध्ये का उतरवली जात आहेत?

पंजाबची बदनामी
पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या अमेरिकन विमानाच्या पंजाबमध्ये लँडिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ‘असे करून केंद्र सरकार पंजाबला बदनाम करू इच्छित आहे. ते गुजरात, हरियाणा किंवा दिल्लीत विमान का उतरवत नाहीत?भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी शेवटचे अमेरिकन लष्करी विमान ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथून निघाले. अमेरिकेने स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी लष्करी विमानांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी, वेगवेगळ्या वृत्तांत असे दावे केले जात होते की अमेरिकेने एकूण २०५ बेकायदेशीर भारतीयांना हद्दपारीसाठी ओळखले आहे.

अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून…

२० जानेवारी रोजी, पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच, ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घालणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हाकलून लावण्याचे आश्वासन दिले होते.त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हद्दपारीची हाक दिली. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की इतर देशांतील लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करतात आणि गुन्हे करतात. येथील नोकऱ्यांचा मोठा भाग स्थलांतरितांनी व्यापलेला आहे, ज्यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळण्यापासून रोखले जाते.ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला कायदा ‘लेकन रिले कायदा’ वर स्वाक्षरी केली. या कायद्यानुसार, कोणत्याही गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना ताब्यात घेण्याचा आणि त्यांना देशाबाहेर काढण्याचा अधिकार संघीय अधिकाऱ्यांना आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे पालकत्व

पुणे-सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन; शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच, मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

महाराजांच्या अकस्मिक जाण्याने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्याने केवळ वारकरी संप्रदायाचे नव्हे; तर समस्त हिंदू समाजाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशी भावना व्यक्त करत त्यांच्या संपूर्ण पालकत्व घेतले.

दरम्यान, महाराजांच्या लहान भगिनी यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत करण्यासह विवाहाची सर्व जबाबदारी घेत असल्याचे पाटील यांनी मोरे कुटुंबियांना आश्वास्त केले‌‌.

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत

0

महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आढावा बैठक

कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये

महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय
प्रणाली स्थापन करावी

सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा
जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत

मुंबई, दि १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसेच केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मोदी सरकार देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्यायव्यवस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे आणि एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये.
महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्यांच्या धर्तीवर एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली विकसित करावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. पोलिस, सरकारी वकील आणि न्यायपालिका यांनी समन्वय साधून दोषींना शक्य तितक्या लवकर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, संगठित गुन्हेगारी, दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवली पाहिजे, जेणेकरून या तरतुदींचा गैरवापर होऊ नये. तसेच, कारागृहे, सरकारी रुग्णालये, बँका आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदविण्याची प्रणाली विकसित करावी.
गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रला CCTNS 2.0 आणि ICJS 2.0 प्रणाली स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआरचे हस्तांतर सहज करता यावे यासाठी CCTNS प्रणाली विकसित करावी, असे सुचवले.
गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. तसेच, राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता आहे.
गृहमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, प्रत्येक पोलीस उपविभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅन्स उपलब्ध असाव्यात आणि फॉरेन्सिक तज्ञांची भरती वेगाने करावी. यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील फिंगरप्रिंट ओळख प्रणालीला ‘राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली (NAFIS)’ शी जोडावे, असेही निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. तसेच, नवीन फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हेगारांकडून जप्त केलेली संपत्ती त्वरित मूळ मालकाकडे परत करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले.
गृहमंत्र्यांनी पोलीस ठाण्यांचे सौंदर्यीकरण आणि सुधारणांवर भर देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा दर पंधरवड्याला एकदा आढावा घ्यावा, तर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांनी आठवड्याला एकदा याचा आढावा घ्यावा.