पुणे-– सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड ने रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आपला बहुप्रतिक्षित असा “नर्स ३६०° मास्टर क्लास” यशस्वीपणे पार पाडला. नवा पायंडा पाडणाऱ्या या कार्यक्रमाची रचना नर्सिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या गरजांचे पूर्वानुमान आपणहून काढता यावे, नवनव्या आरोग्यसमस्या हाताळता याव्यात आणि धोके दूर ठेवता यावेत यासाठी त्यांना अत्यावश्यक कौशल्यांनी सुसज्ज बनविण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. आरोग्यसेवेशी निगडित सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षितता, सर्वोत्कृष्टता आणि परिवर्तनात्मक देखभालीच्या संस्कृतीची जोपासना करण्यावर या कार्यशाळेमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले.
प्रमुख इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजिशियन व आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप डिकोस्टा यांच्या नेतृत्वाअंतर्गत काम करणाऱ्या समर्पित टीमने नर्सिंग विभागाच्या उप महासंचालक श्रीम. आर्या कुलकर्णी व सह्याद्रि हॉस्पिटल्सची आयसीयू टीम यांच्या साथीने अत्यंत काटेकोरपणे या उपक्रमाचे आयोजन केले. या मुख्य टीमला आयोजक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी पाठबळ पुरविले, ज्यात चीफ पॅट्रन म्हणून संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री अब्रारअली दलाल यांचा समावेश होता. को- पॅट्रन म्हणून समूहाचे सीओओ व वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक डॉ. सुनिल राव आणि वैद्यकीय सेवा विभागाचे प्रमुख डॉ. भारत सिंग यांचा समावेश होता. त्याचबरोबर सायन्टिफिक कन्टेन्ट समितीचे सदस्य डॉ. विक्रम आमले, डॉ. प्रतिभा पटेल, डॉ. मनिषा पवार आणि डॉ.राजेश गावडे तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. सुयश गंधे, श्री. निलेश चिले, श्रीम. मोनाली जाधव, श्री. विशाल शेडगे आणि श्री. कलीम यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात आपले योगदान दिले.
प्रमुख इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजिशियन व आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप डिकोस्टा “क्रिटिकल इंटेग्रिटी – एथिक्स इन एक्शन” या विषयावरील यावेळी बोलताना म्हणाले, “नर्स 360oमास्टर क्लासने नर्सिंगच्या शिक्षणाचा एक नवा मापदंड निश्चित केला आहे. दैनंदिन नर्सिंग कार्यपद्धतींमध्ये अँटिसिपेटरी कौशल्यांना समाविष्ट करत, आपण रुग्णाची सुरक्षितता आणि त्याला मिळणारे परिणाम यांत लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतो. या परिवर्तनकारी दृष्टिकोनामुळे नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती सक्रिय रुग्णसेवा पुरविण्यासाठी केवळ सुसज्जच नव्हे, तर इतरांच्या पुढे राहतील याची हमी मिळते”
या मास्टरक्लासमध्ये कार्यशाळांचा एका सर्वसमावेशी संच प्रस्तुत केला गेला, ज्यात तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यक्ष कामाचा अऩुभव देणारी वर्कस्टेशन्स, सामूहिक उपक्रम आणि ईसीजी चॅलेंज व एबीसी चॅलेंजसारख्या रोचक आव्हानात्मक स्पर्धांचा समावेश होता. यामध्ये इन्ट्युबेशनच्या प्रगत पद्धती आणि संकटकालीन व्यवस्थापनापासून ते आयसीयूमध्ये उद्भवणाऱ्या नैतिक पेचांपर्यंत विविध विषय हाताळण्यात आले. सहभागींना अनुकरणीय रुग्णसेवा पुरविण्यासाठी आवश्यक त्या दूरदृष्टी व कौशल्यांनी सुसज्ज करण्याच्या हेतूने या सर्व विषयांची आखणी करण्यात आली होती.
कार्यक्रमाचा समारोप काही मौजमजेच्या व शैक्षणिक आव्हानांच्या मालिकेने झाला, ज्यातून शिकलेल्या गोष्टींची उजळणी तर झालीच पण त्याचबरोबर सांघिक सहकार्य आणि परस्परांच्या कामांची समज वाढण्यासही प्रोत्साहन मिळाले. य उपक्रमाला सहभागींकडून मिळालेला उदंड सकारात्मक प्रतिसाद म्हणजे हा उपक्रम प्रगत अँटिसिपेटरी कौशल्यांच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देण्याचा आपले हेतू साध्य करण्यात यशस्वी झाल्याचे द्योतक होता.
पुणे-पुणे स्टेशन येथील पीएमपीएलच्या एका महिला वाहकाला डेपाे मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. सदर महिला शरीरसुख देत नसल्याने डेपाे मॅनेजर याने तिचा वारंवार मानसिक व शारिरिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने तिने डेपाे मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या केबीन मध्ये अंगावर पेट्रोल आेतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
याप्रकरणानंतर संबंधित ३३ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुनील धाेडीभाऊ भालेकर (वय- ४४, रा.चऱ्हाेली,पुणे), सुनील कुसाळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला पीएमपीएमएल मध्ये वाहक पदावर काम करत असून सन २०१८ पासून ती कार्यरत आहे. सध्ये पुणे स्टेशन आगार मध्ये ती काम करत आहे. सदर ठिकाणी सुनील भालेकर हा पुणे स्टेशन आगार मध्ये कामास असल्याने तिच्या आेळखीचा आहे. परंतु ताे महिलेचा पाठलाग करुन त्रास देत असल्याने याबाबत महिलेने बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल केली हाेती. त्यानंतर सदरची केस मागे घण्यासाठी भालेकर याने महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली. त्यामुळे त्याची महिलेच्या तक्रारीनुसार खातेनिहाय चौकशी हाेऊन त्याची बदली न.ता.वा.डी डेपाेला करण्यात आली.
त्यानंतर महिलेने डेपाे मॅनेजर संजय कुसाळकर यांचेकडून हाेत असलेल्या त्रासाबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात अर्ज दिला हाेता. त्याअनुषंगाने तिला बंडगार्डन पोलिस स्टेशनला बाेलवले असता ती दाेन मित्रांसाेबत गेली हाेती. त्यावेळी एका हॉटेल मध्ये ती जेवणास गेली असता, भालेकर याने तिचा पाठलाग केला. ‘कुसाळकर आमचा बाप आहे, कसा गुन्हा दाखल करताे ते बघुन घेताे’ असे बाेलुन त्याने तिला डाेळा मारुन तेथून निघून गेला. सदरचा प्रकार सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. तिने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच याबाबत राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार दिली. त्यामुळे कुसाळकर याने महिलेस निलंबित केले. महिला शरीर सुख देत नसल्याने संजय कुसाळकर त्रास देत असल्याने त्याच्या कार्यालयात जाऊन महिलेने अंगावर पेट्रोल आेतून गोंधळ घातल्यावर याबाबत वरिष्ठांना जाग येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: संत तुकाराम महाराजांचे ऐतिहासिक ‘आजोळ’ असलेल्या श्री क्षेत्र लोहगाव येथे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
श्री क्षेत्र लोहगाव हे संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण असून, आषाढी व कार्तिकी एकादशीसह विविध धार्मिक उत्सवांमध्ये येथे मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. या पार्श्वभूमीवर हरणतळे लगत असलेल्या शासकीय जागेत संत तुकाराम महाराजांचे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मारकाच्या उभारणीमुळे भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, तसेच या स्थळाची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून अधिक दृढ होईल. यासह, राज्यभरातील भाविक आणि पर्यटकांना येथे येण्यास प्रवृत्त करता येईल. विशेष म्हणजे श्री क्षेत्र लोहगाव गावास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असल्याने, या स्मारकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचा वारसा उजळण्यास आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
या महत्त्वपूर्ण मागणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लोहगाव येथे भव्य स्मारक आणि पर्यटनस्थळ उभारणीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे, असे आमदार पठारे यांनी सांगितले.
मुंबई: पुणे महानगरपालिका हद्दीतील थकीत मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन या मागणीसंदर्भात आमदार बापुसाहेब पठारे यांच्यातर्फे निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई येथे काल (दि. २५) आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान, पुणे महापालिका हद्दीतील थकित मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. अजित पवार यांनी संबंधित मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांमुळे मिळकतकर भरला नाही, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात व्याज व दंड आकारला जात आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असून नागरिक ती भरण्यास तयार नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे महापालिकेला कर संकलन करण्यास अडचणी निर्माण होत आहे. या करामुळे थकीत मिळकतधारक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे थकीत करदात्याला न्याय देण्यासंबंधी शासनाने ‘अभय योजना’ आणल्यास गोर- गरीब नागरिक संबंधित योजनेच्या माध्यमातून मिळकत कर भरतील व त्यामुळे महापालिकेलाही जास्तीत- जास्त कर संकलन प्राप्त होण्यास मदत होईल असे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
“या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या मागणीवर योग्य पाऊल उचलले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या योजनेला राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे” असे आमदार पठारे म्हणाले.
मुंबई–महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे नेते संजय निकम व पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगार युनियनच्या शेकडो माथाडी कामगारांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला . प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. श्री. बावनकुळे आणि श्री. चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार मनोज घोरपडे ,.माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात गोपाळ समाजहित महासंघ अध्यक्ष संजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी श्री. निकम, श्री. गव्हाणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. देव,देश, धर्म तसेच हिंदुत्व रक्षणासाठी या सर्वांनी भाजपाला साथ देण्याचा निश्चय केला . कामगार कल्याणाचे कार्य करणारी भारतीय जनता पार्टी नव्याने पक्षात आलेल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेल ही ग्वाही श्री. बावनकुळे यांनी दिली. श्री. निकम यांच्या प्रवेशामुळे २९ हजार माथाडी कामगारांची कुटुंबे भारतीय जनता पार्टी शी जोडली गेली आहेत. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले. श्री. चव्हाण म्हणाले की, कष्टकरी वर्गासाठी मोदी सरकारने काम केले आहे. फडणवीस सरकार माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी झटत आहे. आता गोपाळ समाज ही मुख्य प्रवाहात आला असून या कामगारांच्या सर्व समस्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवू असा शब्द त्यांनी दिला. राज्य गोपाळ समाजहित महासंघाचे महासंघाचे पदाधिकारी गजानन महाजन, बालाजी घोडके, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष विष्णू नवघरे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता लोणारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.
पुणे-खेडमध्ये अनधिकृत बांधकाम आणि विनापरवाना असलेल्या एका रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.विशेष म्हणजे काही महिला अधिकारी यात न्र्त्यावर ठेका धरताना दिसत असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे ही घटना समोर आली असता संताप व्यक्त केला जात आहे.
जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात, असा आरोप वडेट्टीवार यांनी करत पार्टीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार सारख्या पदावरील अधिकारी नृत्यात सहभागी झाले असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात!
पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले.
विजय वडेट्टीवर यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी?? जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात!
पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पार्टी रंगली, आणि त्यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी XXXXX आणि तहसीलदार XXXXX डान्स करत सहभागी झाले.
ही पार्टी ज्या रिसॉर्टमध्ये झाली, ते रिसॉर्टच अनधिकृत असल्याचा आरोप आहे! एकीकडे सामान्य नागरिकांवर लहानसहान कारणांसाठी कारवाई केली जाते, अनधिकृत बांधकामे तोडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मजा करत आहेत.
महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे, याकडे लक्ष आहे का?
मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२५ भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची कामे ठप्प पडली आहेत, त्याविरोधात ४ मार्चला महापालिका क्षेत्रात आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे आज प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात आली. ८ व ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात सद्भावना पदयात्रा काढण्यात येत आहे, त्यासंदर्भात तसेच पक्ष संघटना बळकट करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील भाजपा युतीचे सरकार शेतकरी विरोधी व भांडवलदार धार्जिणे आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावात ४ हजार रुपये क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. कांदा, हरभरा, कापूस या पिकांनाही भाव नाही. आता शेतकऱ्याची तूर बाजारात येत आहे, तर केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून तूर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, भाजपा सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीला सरकार जबाबदार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयी ३ मार्च रोजी राज्यभर आंदोलन करून सरकारला जागे करण्याचे काम केले जाणार आहे.
राज्यात तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. तारीख पे तारीख आणि सत्ता आपल्या खिशात असा खेळ सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यातील सर्व सत्ता आपल्या हाती हवी आहे आणि केंद्रात पंतप्रधानांना सर्व सत्ता हाती हवी आहे. यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणालाच भाजपा सरकारने हरताळ फासला आहे. मुदत संपूनही निवडणुका घेतल्या नसल्याने लोकप्रतिनिधींमार्फत नगर सेवकांमार्फत जनतेची जी कामे होत होती ती आता होत नाहीत. प्रशासन, पालकमंत्री, आमदार यांची ठेकेदारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून घेणार आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मंत्र्यांचे पीए, पीएस नियुक्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १०६ जणांना क्लिन चिट देत मान्यता दिली तर १६ जण फिक्सर होते म्हणून त्यांना नियुक्ती दिली नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री यांनी त्या १६ फिक्सर अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत व त्या फिक्सर मंत्र्यांचीही नावे जाहीर करावीत ज्यांच्याकडे हे अधिकारी काम करत होते. फक्त अधिका-यांचा बळी घेऊन चालणार फिक्सर मंत्र्यांवरील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सपकाळ यांनी केली.
जनतेची कामे होत नाहीत, प्रशासन ठप्प आहे या निराशेतूनच एका तरुणाने मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या निर्ढावलेपणामुळे जनता त्रस्त आहे. महसूल विभागाचे अधिकारी बेकायदेशीर रिसॉर्टमध्ये पार्टी करतात, सर्व बेताल कारभार सुरु असून अधिकारी सैराट आणि मंत्री बेफिकीर आहेत, असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे.असा आरोप करत संजय राऊत यांच्या निषेधार्थ आज अलका टॉकीज चौक, डेक्कन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. असंख्य घोषणांनी शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला.संजय राऊत कायम खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत टीका करत असतात. उबाठाच्या या वाचाळवीर संजय राऊत ला वेळीच आवर घाला नाहीतर यापुढे जर शिवसेनेच्या नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत काही बोलला तर प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक संजय राऊतला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.असाही इशारा यावेळी देण्यात आला या निषेध आंदोलनात शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, बारामतीचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना ताई त्रिगुनाईत,उपशहर प्रमुख विकास भांबुरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी,आकाश रेणुसे, युवराज शिंगाडे,मार्तंडराज धुंदुके, कामगार सेना शहर प्रमुख संदीप शिंदे,गणेश काची,निलेश जगताप,श्रुतीताई नाझीरकर, रंजना कुलकर्णी, चैत्राली गुरव व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना,अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भल्या भल्या राजकीय नेत्यांना जमले नाही ते अधिकाऱ्यांनी करून दाखविले …
शहरातील बहुचचित कात्रज चौकातील संजय गुगळे यांच्या मालकीच्या जागेचे भुसंपादन होण्यासाठी माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख अनिरूध्द पावसकर , भुसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. गुगळे यांच्या ४० गुंठासाठी जागेचे भुसंपादन करण्यात आले. त्यासाठी जागा मालकांला २१ कोटी ५७ लाख ६० हजार रूपये देण्यात आले.
पुणे- राजकीय सुंदोपसुंदी त अडकवीला गेलेला कात्रज – कोंढवा रस्त्याच्या प्रारंभाच्या चौकातला भूसंपादनाचा प्रश्न महापालिकेच्या प्रशसकीय कारकिर्दीत अखेरीस मार्गी लागला . आज हि जागा महापालिकेने गुगळे नामक मालकाला योग्य मोबदला देऊन ताब्यात घेतली आता कात्रजच्या मुख्य चौकातील वाहतूक बऱ्याच अंशी सुरळीत होण्यास या मुळे मार्ग मोकळा होणार आहे.
वर्षानुवर्ष म्हणजे जवळ जवळ तब्बल २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या कात्रज मुख्य चौकामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या स.नं.१/२ ब (पैकी) येथील ६०० मीटर डी.पी. रस्त्याने बाधित मिळकतीचे भूसंपादन कायद्यान्वये ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालीका आयुक्त डॉ.राजेन्द्र भोसले व अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांचे मार्गदर्शनाखाली भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीमती प्रतिभा पाटील, उपअभियंता दिंगबर बीगर, शाखा अभियता रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे तसेच मा. विशेष भूमि संपादन अधिकारी क्र १६ पुणे हर्षद घुले व अजिक्य पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे आज दिनांक २५/०२/२०२५ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. सदरची मुख्य चौकातील जागा पुणे मनपाच्या ताब्यात आल्यामुळे कात्रज – कोंढवा या मुख्य रस्त्यावरील तसेच कात्रज मुख्य चौकातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.महापालिकेच्या अनेक मुख्य सभेत या प्रश्नावरून रणकंदन पेटत असत . पण आता प्रशासकीय कारकिर्दीत हा प्रश्न सुटल्याने इथल्या राजकीय सुंदोपसुंदीचा मुखवटा देखील चाणाक्ष नागरिकांच्या समोर आला आहे.
पुणे-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणेच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांना शरण आल्यानंतर गजानन मारणेला आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. 3 मार्चपर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे.
गजानन मारणेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आला आहे. यावेळी मारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला. माझ्या क्लाइंटला खाली मांडी घालून बसवलं आणि फोटो व्हायरल केला. हा अत्यंत बालिशपणा आहे. फरार आरोपी हजर होतं नाही म्हणून यांना पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रेशर मध्ये येऊन काम केलं आहे. या प्रकरणात 307 कलम कसं काय लागू होऊ शकतं? काल पर्यंतच्या रिमांड कॉपीमध्ये असा उल्लेख केला आहे की, ए त्या माणसाला मारा असं कुठेही नाहीये. नाकावर फ्रॅक्चर असल्यावर 307 कलम कसं लागू होऊ शकतं.या वातावरणात माझ्या क्लाइंटला कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला आहे.
मी रिट पेटिशन देखील दाखल करणार आहे. तोंडावर काळा कपडा बांधून नेण्यात येतं, खाली बसवून फोटो व्हायरल करण्यात येतो. पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही. गजा मारणे हा शुगर पेशंट आहे. पोलिसांनी फोटो व्हायरल केला, चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला आहे, अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलाची कोर्टाकडे केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजा मारणेविरोधात 28 गुन्हे दाखल आहेत. सखोल तपास करण्यासाठी कस्टडी असणं अत्यंत महत्वाची आहे. सीसीटीव्ही CCTV फुटेज आहे, त्याचाही सखोल तपास करायचा आहे असही इंगळे यावेळी म्हणाले.
मुंबई, 25फेब्रुवारी 2025: सेवानिवृत्ती नियोजन हे आता फक्त बचत करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सुज्ञपणे गुंतवणूक करणे हा देखील निवृत्ती नियोजनाचा एक मोठा भाग आहे. आजच्या काळात निवृत्त होऊ इच्छिणारे लोक आर्थिक स्वातंत्र्याची एक नवी व्याख्या रचत आहेत, त्यांची बदलती जीवनशैली, करिअर महत्त्वाकांक्षा आणि धनाविषयीची दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करणारे उपाय शोधत आहेत. FIRE (आर्थिक स्वातंत्र्य, लवकर निवृत्त) पिढी असो, करिअरमध्ये बदल करणारे व्यावसायिक असोत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणारे उद्योजक असोत, त्यांना आर्थिक सुरक्षा आणि संपत्ती निर्माण करण्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या गुंतवणूक योजना हव्या असतात.
लोकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढत आहे आणि डिजिटल पोहोच वाढल्यामुळे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे, त्यामुळे नवीन, लवचिक व विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या रिटायरमेंट योजनांची गरज वाढत आहे. पारंपारिक बचत साधने सुरक्षित आहेत परंतु आधुनिक गुंतवणूकदारांच्या गतिशील गरजा पूर्ण करण्यात अनेकदा अपयशी ठरतात. याच बाबतीत पुढील पिढीची वित्तीय उत्पादने, जसे की टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा (टाटा एआयए) नवीन एनएफओ, मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंड, उपयोगी ठरतो. लोकांना मार्केट-लिंक्ड, स्मार्ट योजना उपलब्ध करवून देऊन सक्षम बनवण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे, हा फंड त्यांना आपल्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण ठेवून एक मजबूत रिटायरमेंट कॉर्पस बनवण्यात मदत करतो.
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजन करणाऱ्यांसाठी हा फंड एक आदर्श पर्याय का आहे
सेवानिवृत्तीचे नियोजन हे फक्त बचत करण्यापुरते नाही तर जोखीम हाताळून तुमची संपत्ती वाढवणे देखील या नियोजनामध्ये असले पाहिजे. टाटा एआयएचा नवीन फंड क्वांट-आधारित गुंतवणूक धोरणाद्वारे पोर्टफोलिओ स्थिरता सुनिश्चित करताना बाजारातील वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या फंडात गुंतवणूक करून, पॉलिसीधारक पुढील फायदे मिळवू शकतील:
दीर्घकालीन भांडवल वाढ – मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सच्या गुंतवणुकीच्या तत्त्वांशी सुसंगत धोरणे, कामे करणाऱ्या, उच्च क्षमता आणि संभावना असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
स्मार्ट डायव्हर्सिफिकेशन – संतुलित वाढीसाठी मोठ्या, मध्यम आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करतो.
जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधून गुंतवणूक – मूलभूतपणे मजबूत, उच्च-वाढीची क्षमता असलेले स्टॉक निवडण्यासाठी गती आणि गुणवत्ता घटकांचा वापर.
लवचिक सेवानिवृत्ती नियोजन – टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनद्वारे उपलब्ध, जो पेन्शन लिंक्ड फायदे देतो.
सुलभ पोहोच: टाटा एआयएची वेबसाईट आणि पॉलिसीबझार, टाटा नेउ आणि फोनपे सहित टाटा एआयएच्या डिजिटल पार्टनर इकोसिस्टिममार्फत ऑनलाईन, कोणत्याही वेळी, कुठूनही, कोणत्याही अडचणीविना गुंतवणूक करता येते.
फंडबद्दल मुख्य माहिती
गुंतवणूकफोकस: मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सप्रमाणे धोरणे असलेल्या आणि कामे करणाऱ्या कंपन्या.
मालमत्तावाटप: इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये 80% -100%, रोख आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये 0% -20%
जोखीमप्रोफाइल: व्यवस्थापित जोखमीसह उच्च परतावा देण्यासाठी डिझाइन केलेले, ज्यामुळे स्थिरता सुनिश्चित होते.
फंडव्यवस्थापनशुल्क (FMC): 1.35% प्रतिवर्ष
नवीनफंडऑफर (NFO) विंडो: 21 फेब्रुवारी 2025 रोजी उघडेल, 28 फेब्रुवारी 2025 रोजी बंद होईल.
ग्राहकांनी मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक का करावी:
हा फंड लार्ज-कॅप्सच्या स्थिरतेचा आणि मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांच्या उच्च वाढीच्या क्षमतेचा फायदा घेऊन मार्केट कॅप विभागात गुंतवणूक करतो.
पोर्टफोलिओची मूलभूत ताकद सुनिश्चित करताना परतावा अनुकूल करण्यासाठी, विशिष्ट दिशेने मजबूत गती दाखवून देणाऱ्या, दर्जेदार स्टॉकवर लक्ष केंद्रित करते.
हे इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये 80%-100% आणि रोख आणि मनी मार्केट साधनांमध्ये 0%-20% गुंतवणूक करते, ज्यामुळे वाढ आणि लिक्विडिटी यांच्यात प्रभावी संतुलन राखता येते.
हा फंड मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्सशी अलाइन्ड आहे, जो शिस्तबद्ध, नियम-आधारित गुंतवणूकीच्या तत्त्वांचे पालन करतो.
तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा एक स्मार्ट मार्ग
टाटा एआयएचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री हर्षद पाटील म्हणाले: “आज सेवानिवृत्ती नियोजनासाठी अधिक चांगल्या, अधिक धोरणात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंड अशा गुंतवणूकदारांसाठी डिझाइन केले आहे ज्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करताना भारताच्या आर्थिक विकासाचा लाभ घ्यायचा आहे. गती आणि दर्जेदार गुंतवणूक यांचे संयोजन करून, आमच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या निवृत्तीच्या वर्षांत आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करून, जोखमीचे संतुलन साधून परतावा मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे.”
भारताची अर्थव्यवस्था दीर्घकालीन विस्तारासाठी सज्ज आहे. हा फंड पॉलिसीधारकांना त्यांच्या सेवानिवृत्तीची उद्दिष्टे पूर्ण करताना देशाच्या विकासात सहभागी होण्यास सक्षम करतो. तुम्ही नुकतेच नियोजन करायला सुरुवात करत असाल किंवा सेवानिवृत्तीच्या जवळ येत असताना जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, हा फंड तुमची संपत्ती वाढवण्याचा एक प्रभावी मार्ग प्रदान करतो.
पॉलिसीबझारचे लाईफ इन्श्युरन्सचे चीफ बिझनेस ऑफिसर, श्री संतोष अगरवाल म्हणाले, “भारतात, निवृत्तीचे नियोजन दीर्घकाळापासून केलेली वैयक्तिक बचत वापरण्यावर किंवा कुटुंबाच्या आधारावर अवलंबून राहण्यावर केंद्रित आहे, परंतु आता हे झपाट्याने बदलत आहे. हे परिवर्तन सुलभ करण्यासाठी आम्ही सहजसोप्या योजना आणण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही टाटा एआयएसोबत आम्ही एक पेन्शन फंड सादर करत आहोत जो केवळ संपत्ती निर्मितीवरच लक्ष केंद्रित करत नाही तर पोर्टफोलिओ स्थिरता देखील सुनिश्चित करतो आणि गुंतवणूकदारांच्या विविध गरजा पूर्ण करतो. आर्थिक नियोजनासाठी हा एक दूरदर्शी दृष्टीकोन आहे जो गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या विकासाचा फायदा घेण्यास सक्षम बनवतो.”
टाटा डिजिटलचे इन्श्युरन्स विभागाचे चीफ बिझनेस ऑफिसर, श्री. अमरीश खेर म्हणाले, “निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीला योग्य दिशा देणे, पुढे नेणे अवघड वाटू शकते. युजर्ससाठी अनुकूल प्लॅटफॉर्म टाटा नेउ ही प्रक्रिया सहजसोपी बनवतो, याठिकाणी तुम्ही मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडच्या नवीन फंड ऑफरसोबत टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनचा लाभ घेऊ शकता. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या विकास गाथेमध्ये सहभागी होण्याची एक धोरणात्मक संधी प्रदान करतो, ज्यामध्ये जोखीम आणि रिटर्न्स संतुलित करणारे क्वान्टवर आधारित धोरण असते. फंडाचे तपशील समजून घेण्यापासून केवळ काही क्लिक्समध्ये गुंतवणूक सुरु करण्यापर्यंत, टाटा नेउ तुमच्या आयुष्याच्या सोनेरी वर्षांसाठी नियोजन करणे खूपच सोपे बनवू शकतो.”
स्वतःची रिटायरमेंट ग्रोथ जर्नी आजच सुरु करा!
टाटा एआयएच्या स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅनमार्फत मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही केवळ निवृत्तीसाठी बचत करत नाही, तर आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त भविष्यासाठी तुमची संपत्ती सुज्ञपणे वाढवता.
मुख्य वैशिष्ट्ये:
स्मार्टपेन्शनसिक्युअरप्लॅनअशा प्रकारे कस्टमाइज केला आहे की तो ग्राहकांना चिंतामुक्त जीवन जगण्यात मदत करतो. या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
लवकरसेवानिवृत्तीयोजना: वयाच्या ४५ व्या वर्षी पूर्ण सेवानिवृत्तीची सुविधा!
मार्केट–लिंक्डरिटर्न्स: ॲसेट क्लासमध्ये बरेच फंड आहेत आणि 100% फंड इक्विटीमध्ये वाटप करण्याचा पर्याय देखील आहे. कोणत्याही शुल्काशिवाय अनेक वेळा फंड स्विच करू शकतो, त्याची कोणतीही मर्यादा नाही.
परवडणारीयोजना: तुमचा संपूर्ण प्रीमियम तुमच्या आवडीच्या फंडात गुंतवला जातो, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या इच्छित निवृत्तीचा मार्ग मोकळा होतो.
गुंतवणुककरतराहिल्याबद्दलबक्षिसे: ऑनलाइन खरेदीबरोबरीनेच अतिरिक्त फंड बूस्टर आणि लॉयल्टी ॲडिशन्ससह येतात.
टाटाएआयएहेल्थबडी: आनंदी आणि “निरोगी” सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी, टाटा एआयए हेल्थ बडी ही एक पूरक सेवा आहे जी ग्राहकांच्या सोयीनुसार फार्मसी खरेदी आणि निदान चाचण्यांवर आकर्षक सवलत देते. हेल्थ सिक्युअर रायडरची निवड करून ग्राहक ओपीडी सेवा देखील घेऊ शकतात.
करलाभ: कलम 80CCC अंतर्गत कर वाचवा आणि मॅच्युरिटीवर एकरकमी 60% करमुक्त लाभ मिळवा.
अतिरिक्तसंरक्षणकव्हरेज: संकटाच्या वेळी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रीमियममध्ये सूट देण्याचा पर्याय.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या इतर युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) द्वारे फंड कामगिरीमध्ये मापदंड स्थापित केले आहेत. कंपनीच्या फंडांनी मार्केट बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे.
टाटा एआयए फंडांची कामगिरी: गेल्या पाच वर्षांचे रिटर्न्स* (सीएजीआर)
टाटाएआयएफंड्स
फंड रिटर्न (%) **
बेंचमार्क रिटर्न (%) **
मल्टी कॅप फंड
25.32%
16.17%
टॉप २०० फंड
25.80%
16.17%
इंडिया कन्झम्पशन फंड
24.16%
16.17%
** ३१ जानेवारी २०२५ पर्यंतचा डेटा. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील कामगिरीचे सूचक नाही.
स्थापनेची तारीख: टॉप 200 फंड: 12 जानेवारी 2009, मल्टी कॅप फंड: 05 ऑक्टोबर 2015, इंडिया कन्झम्पशन फंड: 05 ऑक्टोबर 2015.
31 जानेवारी 2025 पर्यंत, टाटा एआयएने व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) 1,18,721 कोटी रुपयांपर्यंत लक्षणीयरीत्या वाढवली आहे, म्हणजेच वार्षिक 27.36% ची वाढ झाली आहे. हे मजबूत वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम उत्पन्न आणि अपवादात्मक गुंतवणूक कामगिरीमुळे शक्य झाले आहे.
टीप: गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे, कारण फंडामध्ये उच्च जोखीम प्रोफाइल आहे. मागील कामगिरी भविष्यातील परिणामांचे सूचक नाही.
पुणे २५ फेब्रुवारी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघातर्फे आचार्य रतनलाल सोनग्रा लिखित अण्णाभाऊंच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन अण्णाभाऊंचे मित्र सुप्रसिद्ध चित्रकार नाथ वैराळ यांच्या पत्नी सौ. कुसमताई वैराळ यांच्या हस्ते करण्यात आले. या नगरपालिकेत सफाई कामगार होत्या. या प्रसंगी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, बिहारच्या भागलपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता साहित्यिक लखनलाल सिंह आरोही, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दादासाहेब सोनावणे व शाहिर जाधव हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,”अण्णाभाऊ साठे यांनी भारतातील प्रगतीशिल साहित्य परंपरेचे ओळख करून देऊन प्रेमचंद पासून तर शाहीर लुधियानी पर्यंत या लेखकांनी पुरोगामी विचारांची क्रांती साहित्यात केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे देखिल याच परंपरेचे जागतिक कीर्तीचे महत्वाचे सहित्यीक होते. त्यांच्या कादंबर्या आणि कथा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झाले आहे.” आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,”संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून माझ्या त्यांच्याशी संबध आला. त्यांचा कलापथकांचे पप्रययोग आणि प्रसार अहमदनगरजिल्ह्यात करण्यात माझा सहभाग होता. फकीरा चित्रपटाच्या वेळी अकोला गावात मी आणि माझे सहकारी संपूर्णपणे अण्णाभाऊंच्या बरोबर होतो. चित्रकार एकनाथ वैराळ अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अण्णाभाऊंच्या बरोबर होते. शेवटचा टाटा करीत अण्णाभाऊंनी जो निरोप घेतला तो देखील त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.” हे पुस्तक दलित सेवक संघाचे अध्यक्ष आणि मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्त मा. दादासाहेब सोनावणे यांना अर्पण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नटश्रेष्ठ कुमार अहेर यांनी केले. भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाल. या कार्यक्रमात शाहीर जाधव, शाहीर गायकवाड, लेखिका सुमा लोंढे, चार्लीन चापलीनची भूमिका करणारे आयुष्यमान वनप्रभ, बौद्ध नेते अशोक प्रियदर्शी, सौ. सुशील सोनग्रा, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे : वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या शिवरामदादा तालीमचा मल्ल शुभम सिदनाळेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित पहिल्या वरिष्ठ ग्रिको रोमन राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
लोणीकंद येथील हिंद केसरी मैदानात ही दोन दिवसीय स्पर्धा झाली. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ, पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाउंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे , सरचिटणीस योगेश दोडके, उपाध्यक्ष विलास कथुरे, सुनिल देशमुख , नामदेव बडरे , मेघराज कटके, नवनाथ घुले, पांडुरंग खानेकर, हनुमंत कंद, निळोबा कंद , सुधीर शिंदे, निलेश झुरुंगे, सोहम शिंदे. स्वप्निल कंद, सागर शिंदे उपस्थित होते. स्पर्धा आयोजक ओंकार कंद यांच्या शुभहस्ते चांदिची गदा प्रदान करण्यात आली .
या स्पर्धेत सहा महानगरपालिका व ३६ जिल्हे असे एकूण ४२ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी झाले होते.
ग्रिको रोमन महाराष्ट्र केसरी किताबी लढत (१३० किलो वजनी गट) चंद्रपूरचा शुभम सिदनाळे आणि कोल्हापूरचा राष्ट्रीय पदक विजेता रोहन रंडे यांच्यात झाली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला. यातच रोहनने हाप्ते डाव टाकला. त्याने शुभमची पकड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरभक्कम ताकदीच्या शुभमने त्याचा हा डाव हाणून पाडला. त्याने रोहनला कुस्ती झोनच्या बाहेर ढकलून दोन गुणांची वसुली केली. यानंतर शुभमने हाप्ते डाव टाकून रोहनची मजबूत पकड करून चार गुण वसूल केले. यानंतर शुभमने पकड थोडीही सैल न होऊ देता रोहनला चीतपट करून महाराष्ट्र केसरी किताब आणि चांदीची गदा उंचावली.
पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे आयोजन : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार आयुक्त दीपक तावरे यांची उपस्थिती ; महाराष्ट्रातील ३५० बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग पुणे : पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) च्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ‘सहकारी बँकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता- एक गेम चेंजर’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत हॉटेल शेरेटन ग्रँड, पुणे येथे ही परिषद होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील ३५० बँकांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेमध्ये असणार आहे, अशी माहिती पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संचालक विजय ढेरे, रमेश वाणी, बाळकृष्ण उंदरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत पहिल्या सत्रात आयटी सल्लागार मिलिंद आंबेकर, संगणक तज्ञ श्वेता ढमाळ, कॉसमॉस बँकेचे जतीन सातपुते, रुबीस्केपचे संस्थापक डॉ. प्रशांत पानसरे, टीजेएसबी बँकेचे उपसरव्यवस्थापक हरप्रीत छाब्रा हे सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन या विषयावर बोलणार आहेत.
तर दुस-या सत्रात ‘सायबर सुरक्षेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर पुणे पीपल्स बँकेचे कैलास पवार, कॉसमॉस बँकेच्या आरती ढोले, बीएफएसआय च्या संचालिका अनिता श्रेयकर, विश्वगुरू इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगर्डे, सायबरतज्ञ अॅड. आशिष सोनवणे यांचे सादरीकरण होणार आहे. ‘सहकारी बँकांमध्ये नातेसंबंध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर भारतीय रिझर्व बँकेचे डॉ. अजित कुमार मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेच्या तिस-या सत्रात ‘नफा वाढीसाठी क्षमता विकास’ या विषयावर बिग कॅथलिस्टचे विक्रांत पोंक्षे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर मार्गदर्शन करणार आहेत.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता हे बँकिंग क्षेत्रासाठी परिवर्तनकारी तंत्रज्ञान ठरत आहे. सुरक्षित व्यवहार, वैयक्तिक सेवा आणि कार्यक्षम बँकिंग यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक आहे. डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि सायबर सुरक्षा यांचा समतोल राखून बँकांनी व्यवसाय वाढवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, सहकारी बँकांचे डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षेतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नफा वाढीसाठी क्षमता विकास या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी असोसिएशनने या परिषदेत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे.
ही परिषद सहकारी बँकांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक सक्षम आणि सुरक्षित बनण्यास मदत करेल. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, अकोला, जळगाव, अहमदनगर , धुळे, बीड, नाशिक, रत्नागिरी, महाड, रायगड, संभाजी नगर, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नागपूर या भागातून बँकांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत.
पुणे-मित्राच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर राजस्थान येथून पसार झालेल्या महिलेला व तिच्या मित्राला बंडगार्डन पोलिसांनी पुणे स्टेशन भागातून अटक केली. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सोजत सिटी या गावात (दि.२०) ही घटना घडली होती. घटनेनंतर दोघेही पसार झाले होते.
सुखीदेवी कमलेश मेवाड (३०, रा. सोजत सिटी, राजस्थान), अशोक काळुराम राठोड (२५, रा. सोजत सिटी, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, कमलेश जेठाराम मेवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत जेठाराम मेवाड यांनी सोजत सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जेठाराम यांचा मुलगा कमलेश हा काही दिवसांपासून बेपत्ता होता. २० तारखेला एका शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. दाखल गुन्ह्याच्या तपासात हा खून कमलेश याची पत्नी सुखीदेवी व तिचा मित्र अशोक यांनी संगणमताने केल्याची माहिती सोजत सिटी पोलिसांना मिळाली. तेव्हापासून ते आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, खून प्रकरणातील आरोपी महिला व तिचा मित्र हे पुणे स्टेशन भागात असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. त्यानूसार पथकाने स्टेशनजवळील जयप्रकाश गार्डन येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली.
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
आरोपी सुखीदेवी वय ३० या विवाहितेचा मित्र अशोक काळूराम राठोड वय २५