माध्यम प्रतिनिधींना चित्रपटांची सखोल जाण देण्याचा पीआयबीचा स्तुत्य उपक्रम
#IFFIWood,SHARAD LONKAR 19 नोव्हेंबर 2025
56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या- इफ्फीच्या पार्श्वभूमीवर, पत्र सूचना कार्यालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाने एफ टीआय आय- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या सहकार्याने अधिकृत माध्यम प्रतिनिधींसाठी एका विशेष चित्रपट रसास्वाद शिबिराचे आयोजन केले. मंगळवारी गोव्यात हा कार्यक्रम पार पडला. महोत्सवाचे वार्तांकन अधिक अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार होण्यासाठी पत्रकारांना चित्रपट माध्यामाचे अधिक सखोल भान देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिराचे संचालन एफटीआयआय चे प्राध्यापक डॉ. इंद्रनील भट्टाचार्य (चित्रपट अभ्यास आणि संशोधन) आणि सह प्राध्यापक वैभव आबनावे (चित्रपट दिग्दर्शन) यांनी केले. व्याख्याने, चित्रपटांचे प्रदर्शन, चर्चासत्रे आणि विश्लेषणात्मक अभ्यासाद्वारे तज्ज्ञांनी सहभागींना चित्रपटाचे स्वरूप, चित्रपट माध्यमाचा इतिहास आणि जागतिक चित्रपट निर्मितीला आकार देणाऱ्या सौंदर्यशास्त्राची ओळख करून दिली.
या सत्राला पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम हे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी चित्रपटकर्ते आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणून सुजाण माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पत्रकारांना चित्रपट कलेचे बारकावे समजल्यावर ते अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण विश्लेषण करु शकतात, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी, प्रभात कुमार, प्रकाश मगदूम आणि स्मिता वत्स शर्मा यांच्या हस्ते सहभागी माध्यम प्रतिनिधींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या शिबिरामुळे चित्रपटांकडे पाहण्याचा एक नवीन आणि चिकित्सक दृष्टीकोन मिळाल्याने, हे प्रतिनिधी आता 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विविध चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे वार्तांकन करण्यासाठी आणखी सज्ज झाले आहेत.
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) सुरुवात एका भव्य आणि चित्तथरारक ‘उद्घाटन परेड’ने होणार आहे. ही परेड महोत्सवांच्या शुभारंभाची परिभाषाच बदलून टाकणारी असेल. इफ्फी प्रथमच प्रेक्षकांचे एका अशा चालत्या-बोलत्या सोहळ्याच्या माध्यमातून स्वागत करेल, जिथे कथांचा प्रवास उलगडेल, संगीताचे सूर निनादतील, पडद्यावरील पात्रे प्रत्यक्षात अवतरतील आणि भारत लय, रंग, अभिमान आणि कल्पकतेद्वारे स्वतःला व्यक्त करेल. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 03.30 वाजता ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या कार्यालयापासून ‘कला अकादमी’पर्यंत ही परेड आयोजित करण्यात आली आहे. ही अद्वितीय परेड गोव्याच्या रस्त्यांना भारताच्या सिनेमॅटिक आणि सांस्कृतिक वैभवाच्या जिवंत कॅनव्हासमध्ये रूपांतरित करेल.
या परेडचे नेतृत्व आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा या राज्यांचे भव्य चित्ररथ करतील, जे आपली ओळख आणि कल्पकता प्रभावीपणे मांडतील. आंध्र प्रदेशचा चित्ररथ विशाखापट्टणमच्या सोनेरी समुद्रकिनाऱ्यांची मोहिनी, अराकूच्या गूढ दऱ्या आणि टॉलिवूडचा उत्साह घेऊन येईल. हरियाणा लोककथा, रंगभूमी, संस्कृती आणि सिनेमॅटिक अभिमानाचा रंगीबेरंगी संगम सादर करेल. महोत्सवाचे यजमानपद भूषवणारे गोवा हे या मिरवणुकीचे ‘भावनिक हृदय’ असेल, जे आपल्या बहुभाषक संस्कृतीचे आणि जागतिक सिनेमाशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवेल.
राज्यांच्या चित्ररथांसोबतच, भारतातील आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसचे भव्य सिनेमॅटिक चित्ररथही यात सहभागी होतील. ‘अखंडा 2’ची पौराणिक शक्ती, राम चरणच्या ‘पेड्डी’ची भावनिक खोली, ‘मैत्री मूव्ही मेकर्स’ची सर्जनशीलता, ‘झी स्टुडिओ’चा प्रतिष्ठित वारसा, ‘होम्बाळे फिल्म्स’चा जागतिक दृष्टिकोन, ‘बिंदुसागर’चा ओडिया वारसा, गुरु दत्त यांना ‘अल्ट्रा मीडिया’ने वाहिलेली शताब्दी श्रद्धांजली आणि वेव्ह्ज ओटीटीचे कथाविश्व — हे सर्व भारतीय सिनेमाची अमर्याद विविधता दर्शवण्यासाठी एकत्र येतील. या परेडमध्ये एक ऐतिहासिक आयाम जोडणारा घटक म्हणजे ‘एनएफडीसी ची 50 वर्षे’ हा चित्ररथ. हा चित्ररथ चित्रपटकर्ते घडवण्याच्या आणि देशभरात सिनेमॅटिक नवनिर्मितीला चालना देण्याच्या पाच दशकांच्या प्रवासाचा सन्मान करेल.
केंद्रीय संचार ब्युरोच्या “भारत एक सूर” या लोक गीताच्या तालावर परेडची सुरुवात होईल. यात सोळा राज्यांमधील शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असेल. भांगडा आणि गरबा, लावणी आणि घुमर, बिहू, छाऊ आणि नाटी, या लोक नृत्यांचे सादरीकरण होईल, आणि भारताच्या एकसंध संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भव्य तिरंगा ध्वजाच्या आकारात या परेडची सांगता होईल.
सोहळ्याच्या आनंदात भर घालण्यासाठी, आकर्षण, आठवणी आणि आनंद वाढवणाऱ्या भारतातील आवडत्या अॅनिमेशन पटांमधली, छोटा भीम आणि चुटकी, आणि मोटू पट्टू आणि बिट्टू बहानेबाज ही पात्र चित्रपटाच्या पडद्याबाहेर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधतील आणि खेळकर वातावरणात त्यांचा हशा आणि प्रेम मिळवतील.
इफ्फी 2025 च्या उद्घाटन सोहळ्याची परेड, त्याहून अधिक आहे, ती सिनेमातून मिळणारी प्रेरणा आणि सांस्कृतिक आश्वासन आहे. ही विलक्षण सफर घडवण्यासाठी गोवा सज्ज होत असताना, इफ्फी, जगाला भारताकडे केवळ कथांचा देश म्हणून नव्हे, तर एका अविस्मरणीय लयीत पुढे जात असलेले एक राष्ट्र म्हणून पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे.
कारण, भारत पुढे जात आहे, हे जग पाहत आहे!
इफ्फी IFFI
1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे, जिथे पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे जातात, आणि सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इफ्फी ला खऱ्या अर्थाने झळाळी देणारी गोष्ट म्हणजे, विविध कार्यक्रमांचे अद्भुत मिश्रण- इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, सौदे आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात.
20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56 व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, याचा चमकदार मेळ पाहायला मिळेल, आणि जागतिक मंचावर भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा हा अविस्मरणीय सोहळा असेल.
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार
#IFFIWood SHARAD LONKAR, 19 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ) बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या,आव्हान देणाऱ्या आणि प्रेरित करणाऱ्या कहाण्यांच्या माध्यमातून बाल्यावस्थेच्या विविध छटा, त्यातील नवल, त्यांचे संघर्ष आणि त्यांची अतूट लवचिकता साजरी करणार आहे!
युनिसेफ एक्स इफ्फी यांचे सहयोगपूर्ण नाते 2022 मध्ये पहिल्यांदा सुरु झाले. आता या सहयोगाच्या चौथ्या वर्षी, लहान मुलांचे हक्क आणि चित्रपट महोत्सव यांच्या जगातील दोन प्रख्यात ब्रँड्स एकत्र येऊन एक असा अवकाश उभारत आहेत जेथे चित्रपट विश्वाची विवेकाशी सांगड घातली आहे. इफ्फीच्या 56 व्या वर्षीच्या कार्यक्रमात, लहान मुलांचे धैर्य, सर्जनशीलता आणि आशावाद साजरे करतानाच, विविध संस्कृतींमध्ये मुलांना भेडसावणाऱ्या वास्तवाला भिडणारे चित्रपट एका मंचावर एकत्र होत आहेत. युनिसेफच्या मानवतावादी संकल्पनेला चित्रपटाच्या अभिव्यक्ती सामर्थ्यासह एकत्र जोडून ही भागीदारी, अधिक उत्तम विश्व अनुभवायला मिळण्याचा प्रत्येक मुलाचा हक्क मिळवून देण्यासाठी सहानुभूतीला जाग आणण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची प्रेरणा देण्याची चित्रपट माध्यमाची शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित करते.
पाच चित्रपट, एक वैश्विक कहाणी
यावर्षी या विभागाच्या शृंखलेत- जगभरातून कोसोव्हो, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि भारत या देशांतील पाच विलक्षण चित्रपट सादर होणार आहेत. यापैकी प्रत्येक चित्रपट आपल्यासमोर बालपणातील – मालकीचा शोध, सन्मानासाठीचा लढा, प्रेमाची आस आणि स्वातंत्र्याचे स्वप्न- अशा वेगवेगळ्या संकल्पनांचे वास्तव उभे करतो. एका सूत्रात गुंफलेल्या या कथा, युनिसेफ आणि इफ्फीची सामायिक भावना, हृदयाची दारे उघडण्याच्या बाबतीत कथाकथनाच्या सामर्थ्यावरील विश्वास आणि प्रत्येक बालकासाठी अधिक न्याय्य, करुणामय विश्वाला आकार देण्याच्या इच्छेचे मूर्त रूप साकार करणारे एक मर्मभेदक चित्रपटीय वस्त्र तयार करतात.
1. हॅपी बर्थडे (इजिप्त/ इजिप्शियन अरेबिक भाषा)
इजिप्तच्या चित्रपट निर्मात्या सारा गोहर यांचा हॅपी बर्थडे हा पदार्पणातील मर्मभेदक चित्रपट त्रिबेका चित्रपट महोत्सव 2025मध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि तो इजिप्ततर्फे ऑस्कर पारितोषिकासाठी देखील नामनिर्देशित झाला आहे. हा चित्रपट आजूबाजूचे विश्व पराकोटीचे प्रतिकूल असूनही, सर्वात आवडती मैत्रीण नेली हिच्या वाढदिवसासाठी एक उत्कृष्ट समारंभ आयोजित करण्याचा निश्चय केलेल्या आठ वर्षांच्या तोहा या घरकाम करणाऱ्या मुलीची गोष्ट सांगतो. आधुनिक काळातील कैरो शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट विशेष लाभ आणि निष्पापपणा यातील तीव्र विभागणी उघड करतो आणि लहान मुले बहुतेकदा त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा मानवतेच्या तत्वाला अधिक स्वच्छपणे पाहू शकतात हे दाखवून देतो.
हॅपी बर्थडे हा चित्रपट मैत्री आणि असमानता यांचे नाजूकपणे चित्रण करून, कोणत्याही भागात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलासाठी सन्मान, समानता आणि संधी मिळवून देण्यासाठीची युनिसेफची बांधिलकी दाखवून देतो.
2- कडाल कण्णी (भारत/तमिळ भाषा)
तमिळ चित्रपट निर्माते दिनेश सेल्वराज यांचा कडाल कण्णी हा गीतमय चित्रपट अनाथ मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवतो. या मुलांच्या स्वप्नामध्ये देवदूत आणि जलपऱ्या येतात. प्रेम/काळजी, निवांतपणा कोणाशीतरी जोडल्याची भावना याच्या प्रतीकांची स्वप्ने पाहणारे जग यात रंगवले आहे. वास्तव आणि मनोरथ यांचा मिलाफ घडवून हा चित्रपट अशा कल्पना उदात्तपणे मांडतो ज्यांच्या बळावर ती बालके कष्टमय जीवनातही तग धरू शकतात. जिवंत राहण्याचे पहिले स्वरूप स्वप्नांमधून दिसते, याची आठवण हा चित्रपट आपल्याला करून देतो. उत्तम काव्य आणि करुणा यांच्या सहाय्याने कडाल कण्णी चित्रपट, युनिसेफ X-IFFI च्या चित्रपेटिकेत तंतोतंत बसतो. हा चित्रपट एक प्रकारे प्रत्येक बालकाचा स्वप्ने बघण्याचा, लोकांचा नजरेत राहण्याचा आणि प्रेम करून घेण्याचा अधिकार साजरा करतो.
3- पुतुल (भारत/ हिंदी भाषा)
भारतीय चित्रपट निर्माते राधेश्याम पिपलवा यांचा पुतुल चित्रपट, आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या भावनिक वादळात सापडलेल्या सात वर्षांच्या मुलीचे दर्शन घडवतो. दुखावलेल्या आणि गोंधळलेल्या त्या मुलीला तिच्या लाडक्या आजोबांमध्ये आणि ‘डॅमेज्ड गॅंग’ नावाच्या मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये विसावा मिळतो. ती नाहीशी झाल्यावर तिच्या पालकांना त्यांच्या भीतीचा आणि स्वतःच्या अंतरंगातील कच्च्या दुव्यांचाही सामना करावा लागतो. दुभंगलेल्या कुटुंबातील बालकांचे मूकपणे सहन करत राहणे ‘पुतुल’मधून परिणामकारकपणे समोर येते, आणि एका अर्थी संवेदनशील पद्धतीने प्रेक्षकाला हेलावून सोडते. मानसिक स्वास्थ्यासाठी युनिसेफ करत असलेल्या प्रचाराचा प्रतिध्वनी या चित्रपटात उमटलेला दिसतो आणि प्रेम, समजून घेतले जाणे आणि सुरक्षा याचा प्रत्येक बालकाला असलेला अधिकार हा चित्रपट जाणवून देतो.
4- द बीटल प्रोजेक्ट (कोरिया/ कोरियन भाषा)
कोरियन चित्रपट निर्माते जिन क्वांग-क्यो यांच्या हृदयस्पर्शी अशा ‘द बीटल प्रोजेक्ट’ चित्रपटाचा पहिला खेळ, शिकागोमध्ये ‘द एशियन पॉप अप’ मध्ये झळकला होता. चित्रपट सुरू होतो तोच एका प्लास्टिकच्या पिशवीतील ढेपक्यापासून. उत्तर कोरियातील हा ढेपका (बीटल) दक्षिण कोरियातील एका मुलीच्या हाती लागतो. त्या ढेपक्यामुळे कोरियन सीमेच्या दोन्ही बाजूच्या बालकांमध्ये कुतूहल आणि एकमेकांशी जोडल्याची भावना उत्पन्न होते. तो ढेपका देशकालाच्या सीमा भेदून दोन्हीकडे वाटणाऱ्या नवलाईचे प्रतीक बनतो. काहीशा स्नेहभावनेने आणि विनोदी अंगाने उलगडत जाताना हा चित्रपट कुतूहल, सहभावना आणि अतिशय दूरवरच्या ‘अंतरांना’ जोडणारी निरागस आशा यांचे उदात्त रूप मांडतो. दिलजमाई आणि करुणा हे भाव उत्कटपणे मांडणारा ‘द बीटल प्रोजेक्ट’ म्हणजे, शांतता आणि सामंजस्य यांना प्रेरणा देण्यासाठी तरुण मनांमध्ये उमटणाऱ्या कल्पना आणि सहभावना यांच्यावरील युनिसेफच्या विश्वासाचे मूर्तरूप आहे.
5. द ओडिसी ऑफ जॉय (Odiseja e Gëzimit) (फ्रान्स, कोसोव्हो / अल्बेनियन, इंग्रजी, फ्रेंच, रोमानी भाषा)
कोसोवन चित्रपट निर्माते झजिम तेर्झिकी यांचा ‘ओडिसी ऑफ जॉय’ हा चित्रपट कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा नवीन सहस्रकाच्या पहाटे उलगडते. 11 वर्षांचा लिस, त्याचे वडील युद्धात बेपत्ता आहेत, ते दुःख आणि जगण्याचा संघर्ष या दुहेरी आव्हानांचा सामना करत तो आपली वाट शोधतो आहे. आणि जेव्हा तो युद्धानंतरच्या कोसोवोमधून स्थानिक मुलाचं मनोरंजन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या फ्रेंच विदुषकांच्या गटात सामील होतो, तेव्हा लिसचा मानसिक उभारीच्या दिशेने एक शांत प्रवास सुरू होतो, त्याला उमगतं, की एकदा गमावलेली आशा परत मिळवता येते.
सौम्य, पण गहन विचार मांडणारा ‘ओडिसी ऑफ जॉय’, संघर्षातही बालपण जपणारी चिकाटीची भावना टिपतो, आणि प्रत्येक मुलाच्या आनंद, सुरक्षितता आणि भविष्याच्या अधिकारावर असलेला युनिसेफचा (UNICEF) ठाम विश्वास प्रतिबिंबित करतो.
एकत्रितपणे, हे पाच चित्रपट युनिसेफ × इफ्फी सहकार्याचा गाभा साकारतात, आणि चित्रपटाच्या परिवर्तनकारी शक्तीचा वापर करून जगाच्या कोणत्याही प्रदेशातील मुलांच्या आशा, भीती आणि विजय, या भावना प्रकट करतात.
जगभरातील मुलांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या या दमदार चित्रपटांचे प्रदर्शन चुकवू नका.
इफ्फी (IFFI):
1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे, जिथे पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे जातात आणि सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इफ्फी ला खऱ्या अर्थाने झळाळी देणारी गोष्ट म्हणजे, विविध कार्यक्रमांचे अद्भुत मिश्रण- इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, करार आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56 व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, याचा चमकदार मेळ पाहायला मिळेल, आणि जागतिक मंचावर भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा हा अविस्मरणीय सोहळा असेल.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज कंटेनरमधून बल्क सिमेंटच्या (मोठ्या प्रमाणातील) वाहतुकीवरील शुल्काचे सुसूत्रीकरण आणि बल्क सिमेंट टर्मिनल्ससाठी धोरण जाहीर केले. हे धोरण सिमेंट वाहतुकीसाठीच्या रेल्वे सुधारणांचा एक भाग आहे.
नवी दिल्लीतील रेल्वे भवनात या धोरणाची सुरुवात करताना, केंद्रीय मंत्र्यांनी हा क्षण परिवर्तनकारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या धोरणामुळे सीमेंटची किंमत कमी होईल, आणि गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन धोरणानुसार, अंतर आणि वजनाचे टप्पे काढून टाकण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नवीन दर तर्कसंगत करण्यात आला असून, फ्लॅट ग्रॉस टन किमी. साठीचा नवीन दर 0.90 रुपये प्रति टन प्रति किलोमीटर इतका करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, टँक कंटेनर हा मोठ्या प्रमाणात सिमेंट वाहतुकीसाठीचा संपूर्ण प्रदूषणमुक्त लॉजिस्टिक उपाय असेल. ते म्हणाले की, भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूकदार देश असून, त्याने अमेरिकेला मागे टाकले आहे. रेल्वे जाळ्याचा विस्तार प्रतिदिन 4 कि.मी. वरून (2004–14 दरम्यान) 12–14 कि.मी.पर्यंत झाला असून, तो तिप्पट वेगवान झाला आहे. ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे आता जवळजवळ 100% विद्युतीकरण झाले आहे. सध्या देशभरात 1,300 हून अधिक अमृत स्थानके विकसित केली जात आहेत, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
टँक कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या मालवाहतुकीचे सुसूत्रीकरण
रेल्वे गाडीच्या एकूण टन किलोमीटर (GTKM) म्हणून मोजल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष टनेजवर आधारित शुल्क लागू करून नवीन दर रचना सोपी आणि तर्कसंगत करण्यात आली आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी यापूर्वीचे अंतर आणि वजनाचे टप्पे हटवले आहेत. सुधारित प्रणाली अंतर्गत, प्रत्यक्ष कापलेल्या अंतरासाठी प्रति किलोमीटर प्रति टन 0.90 रुपये या दराने शुल्क आकारले जाईल.
बल्क सिमेंट टर्मिनल्ससाठी धोरण
उत्पादन प्रकल्पापासून वापर केंद्रांजवळील टर्मिनल्सपर्यंत विशेष वॅगनरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात सिमेंटची वाहतूक करणे किफायतशीर आणि पर्यावरण स्नेही आहे. कार्यक्षम लॉजिस्टिक्सच्या दिशेने या बदलाला आणखी पाठिंबा देण्यासाठी, भारतीय रेल्वे “बल्क सिमेंट टर्मिनल” धोरणांतर्गत देशभरात बल्क सिमेंट टर्मिनल्सच्या विकासाला गती देईल, त्यामुळे सिमेंटची सुलभ हाताळणी, साठवणूक आणि वितरण सुलभ होईल.
या धोरणाचे अनेक महत्वाचे फायदे असून, यात सिमेंट वाहतूकीच्या खर्चात मोठी घट आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट याचा समावेश आहे, त्यामुळे पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा मिळेल आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. यामुळे एकाच खेपेत मोठ्या प्रमाणात सिमेंटची वाहतूक करणे शक्य होईल, आणि पॅकेजिंगची आवश्यकता कमी झाल्यामुळे गळती कमी होऊन, नुकसान कमी होईल. याशिवाय, हे धोरण यांत्रिक चढ – उताराद्वारे यासाठी लागणाऱ्या वेळेच्या बचतीची खात्री देत असून, त्यामुळे सिमेंट लॉजिस्टिक्सची एकूण कार्यक्षमता वाढेल.
विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे, दि.१९: विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपाल यांचे उप सचिव राममूर्ती आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करुन स्वत:च नवनवीन शोध लावत आहेत. एकप्रकारे ते शास्त्रज्ञाचे काम करीत आहेत. त्यांचा शोध इतरांना मार्गदर्शक आहे. अति प्रमाणात रसायने फवारल्याने रोपांचे नुकसान होते. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले द्रव्य अग्नीअस्त्र व नीमअस्त्राचा आलटून- पालटून फवारणी केल्यास शेतामध्ये कधीही निमॅटोडची समस्या राहणार नाही.
राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन करून पिकांचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली.
यावेळी आयुक्त श्री.मांढरे यांनी ‘पी एम किसान सन्मान निधी’ योजनेसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या हप्त्यापोटी १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत ३६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील अनुभव सांगितले.
विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन- राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे, दि.१९: विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण झाले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपाल यांचे उप सचिव राममूर्ती आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करुन स्वत:च नवनवीन शोध लावत आहेत. एकप्रकारे ते शास्त्रज्ञाचे काम करीत आहेत. त्यांचा शोध इतरांना मार्गदर्शक आहे. अति प्रमाणात रसायने फवारल्याने रोपांचे नुकसान होते. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले द्रव्य अग्नीअस्त्र व नीमअस्त्राचा आलटून- पालटून फवारणी केल्यास शेतामध्ये कधीही निमॅटोडची समस्या राहणार नाही.
राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन करून पिकांचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली.
यावेळी आयुक्त श्री.मांढरे यांनी ‘पी एम किसान सन्मान निधी’ योजनेसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या हप्त्यापोटी १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आत्तापर्यंत ३६ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील अनुभव सांगितले.
पुणे : गेल्या आठवड्याभरात पेट्रोल पंप कर्मचार्यांना मारहाणीच्या ३ घटना घडल्याने पेट्रोल डिलर्स असोसिएशनने पुण्यातील पेट्रोल पंप सायंकाळी ७ नंतर बंद ठेवण्यात येतील, असा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशनने दिला आहे.
याबाबत पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भैरोबा नाला, पुलगेट आणि येरवडा या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांना मारहाणीचे प्रकार झाले आहेत.
याबाबत पेट्रोल डिलर्स असोसिएशनने एक निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे. पेट्रोल हे अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडत असल्याने पेट्रोल पंपचालकांना संप करता येत नाही. त्यामुळे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने निर्णय घेतला आहे की, सायंकाळी ७ नंतर पंप न चालवण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे दोषींवर कारवाई करतील आणि आम्हाला पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास अली दारुवाला यांनी व्यक्त केला.
अमित शाह यांच्याशी अजित पवारांची दिल्लीत यशस्वी मांडवली, जमीन घोटाळ्यातून पार्थ पवारांना क्लिन चिट.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसची सुरुवात; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या सभांचा धडाका..
मुंबई/बुलढाणा, दि. १९ नोव्हेंबर २०२५
महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेच्या अनुषंगाने असलेल्या लाचारीपोटी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. हे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे त्यांच्यात टोळी युद्ध पहायला मिळत आहे. कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील दरे गावात शेतात जाऊन रुसुन बसतात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री गायब होतात. एकनाथ शिंदे यांना निषेध नोंदवायचाच असेल किंवा ते खरेच नाराज असतील आणि काही ठोस घडत नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी तो मुकाट्याने सहन करावा लागणार आहे.
अजित पवारांची यशस्वी मांडवली… पुण्यातील भूखंड प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘मला वाचवा’ अशी विणवनी केली, दिल्लीत त्यांची मांडवली झाली आणि पार्थ पवारला क्लिन चिट मिळाली असे दिसते. तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यातही दिलजमाई झाली असावी. असे नसते तर ९९ टक्के भागिदारी असणाऱ्या पार्थ पवारला सोडून केवळ १ टक्के भागिदारी असलेल्या व काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसती. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करुनही भाजपाने अजित पवार यांना सत्तेत घेतलेच, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
नगरपालिका प्रचाराला सुरुवात.. राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातून प्रचार सभांना सुरुवात केली. बुलढाणा, चिखली, मेहकर येथे त्यांनी प्रचार सभा घेत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. बुलढाण्यातील लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. विकृतींच्या विरोधात लढताना सर्वांची मोट बांधली पाहिजे. शहरातील लोक पाठिशी आहेत त्यांना सभ्य व सुसंस्कृत बुलढाणा हवा आहे. गुंडगिरी, गांजा, अफिम, भ्रष्टाचारापासून जनतेला मुक्ती हवी आहे असे सपकाळ म्हणाले….
भ्रष्ट, ड्रग्ज माफिया, गुंडांना भाजपाची उमेदवारी.. भारतीय जनता पक्षाने नगरपालिका निवडणुकीत ड्रग्ज माफिया, गुंड, भ्रष्टाचारी व ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. गंभीर गुन्हे असलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देऊन वॉशिंग मधून पवित्र केले जात आहे परंतु जनतेने मात्र भाजपाच्या या विकृत, गुन्हेगारी राजकारणाला धारा देऊ नये, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले; ‘जिज्ञासा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दि. १९ नोव्हेंबर २०२५: ‘भारताला २०४७पर्यंत एक ‘विकसित देश’ बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि सर्वच देशवासीयांचे स्वप्न आहे. ही स्वप्नपूर्ती विज्ञान व तंत्रज्ञानाच्या लोकसंवादाशिवाय साध्य होणार नाही. बाल संशोधक अरजित मोरे याने ‘जिज्ञासा’ पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टीला संवादाची जोड दिली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल’ असे मत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. आशिष लेले यांनी बुधवारी (दि. १९) व्यक्त केले.
पुणे येथील एनसीएलच्या सभागृहात शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याच्या ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन संचालक डॉ. लेले व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. वाफिया मसीह, डॉ. नरेंद्र कडू, डॉ. एम. कार्तिकेयन, डॉ. महेश धरणे, डॉ. राकेश जोशी, डॉ. राजेश गोन्नाडे, डॉ. शुभांगी उंबरकर तसेच महावितरणचे श्री. अमोल मोरे, डॉ. संतोष पाटणी, श्री. निशिकांत राऊत यांची उपस्थिती होती. या पुस्तकाच्या लेखनासाठी अरजित मोरे याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणती मित्रा यांनी कौतुक केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाची संधी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा अनुभव व प्रयोगशीलतेसाठी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘जिज्ञासा- एक दिवस शास्त्रज्ञ म्हणून’ (One Day as a Scientist) हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबई येथील शालेय विद्यार्थी अरजित अमोल मोरे याने सीएसआयआरच्या पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवला होता. या अनुभवावर आधारित त्याने ‘जिज्ञासा: फ्रॉम क्युरिऑसिटी टू क्लॅरिटी’ या इंग्रजी पुस्तकाचे लेखन केले आहे.
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, ‘अरजित मोरे याचे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे. विद्यार्थी दशेतील वैज्ञानिक कुतूहल व त्याचे नेमके वास्तव याची मांडणी अरजितने लेखनातून केली आहे. त्यातून शालेय विद्यार्थ्यांना संशोधनासाठी निश्चित प्रेरणा मिळणार आहे’. यावेळी सर्व शास्त्रज्ञ व उपस्थितांनी मनोगतातून अरजितच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण क्षमतेचे कौतुक केले.
अरजित मोरे हा जिल्हा इन्स्पायर मानक अवार्ड २०२५ व होमी भाभा बालवैज्ञानिक सुवर्णपदक 2024 चा मानकरी आहे. त्याचे तीन संशोधन लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून त्याने इल्यूम्ब्रेला (Illumbrella), स्पाईनोगिअर (Spinogear) व गटरगार्ड (Gutterguard) यासारख्या सामाजिक उपयुक्तता असलेले संशोधन विकसित केली आहे.
या पुस्तकातील ११ प्रकरणामध्ये अरजितने डीएनए सिक्वेन्सिंग, सस्टेनेबल केमिस्ट्री, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पर्यावरण विज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास कसा केला याचे सोप्या भाषेत वर्णन केले आहे. ‘जिज्ञासा’ उपक्रमाचा फायदा व शास्त्रज्ञांनी केलेले मार्गदर्शन कसे महत्त्वाचे ठरले याबाबत त्याने मनोगत व्यक्त केले. लवकरच या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित होणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रतिपादन
अतिवृष्टी भागात मदत कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा सन्मान
पुणे, दि. 19: सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना अतिवृष्टीचा प्रंचड फटका बसला. यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक संस्था, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मदत कार्य राबवले होते. सामाजिक कामे करतांना गरजेतून आणि संवेदनशीलवृत्तीने केले पाहिजे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण संचालनालय आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या योगदानानिमित्त ‘संकटातून संकल्पाकडे’ या सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. जोत्स्ना एकबोटे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर जमीन खरवडून गेली. त्याशिवाय या भागातील विद्यार्थ्यांचे ही मोठे नुकसान झाले होते. या संकटातून आपतग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात होत्या. पण तरीही या संकटातून इथल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना या आपत्तीची दाहकता कळावी, यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. कारण कोणतेही सामाजिक कार्य हे गरजेतून आणि अतिशय संवेदनशील वृत्तीने केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत २० महाविद्यालयांनी अतिशय मोलाची मदत केली. ती उल्लेखनीय व इतर महाविद्यालयाकरिता प्रेरणादायी आहे. अशाप्रकारचे राष्ट्रीय सेवा योजनेने सतत करीत राहावे, यामाध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आपण साध्य होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ मधे भारताचे ‘ विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न आपण साकार करण्याकरिता प्रयत्नशील राहूया, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
डॉ. एकबोटे म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये गेल्या काही दिवसात नविन कल्पना राबविल्या आहेत. उच्च शिक्षणामधे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षक भरतीचे प्रयत्न व संशोधन निधी तरतूद झाल्यास निधीची त्रुटी भरून काढता येईल का याबाबत विचार करण्याची गरज आहे, असेही डॉ. म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले.
मुंबई-सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेसंबंधीची सुनावणी मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे सध्याची नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया आहे तशीच सुरू राहणार आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेविषयी निर्माण झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गत सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते. तसेच सध्याची निवडणूक प्रक्रिया रोखण्याचाही इशारा दिला होता. यामुळे नगरपंचायत व नगरपरिषदेच्या येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. पण आज कोर्टाने यासंबंधीची सुनावणी मंगळवारपर्यंत लांबणीवर टाकल्याने ही निवडणूक प्रक्रिया तूर्त जैसे थे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज काय झाले सुप्रीम कोर्टात?
आजच्या सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यासाठी काही काळ थांबण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे येत्या मंगळवारपर्यंत हे नोटिफिकेशन निघणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकल बॉडीजचे नोटिफिकेशन अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानुसार, निवडणुकीची सध्याची प्रक्रिया आहे तशीच सुरू राहील, पण त्याचे निकाल जाहीर होणार नाहीत. या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही. पण ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यावर मात्र निवडणुकीचे नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत जाहीर होणार नाही. आजच्या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख झाला नाही. पण महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन आले नसल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ असा होतो की, यापुढे जिल्हा परिषदेचे नोटिफिकेशनही मंगळवारपर्यंत जाहीर होणार नाही, असे ते म्हणाले.
याचिकाकर्त्याचे आक्षेप?
या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत संताप व्यक्त केला होता. त्यात कोर्ट म्हणाले होते की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटले होते की, बांठिया आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती, त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात. म्हणजेच, ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे. परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली.
या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केले नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, आमचा आदेश अगदी सरळ होता, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो. न्यायमूर्ती जॉयमला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला. राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आज पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे.
19 ते 21 नोव्हेंबर-अर्ज मागे घेण्याचा अवधी
दरम्यान, राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली असून आजपासून अर्जांची छाननी सुरू झाली आहे. वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी चिन्हांसहित उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 2 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होतील. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम प्रश्नचिन्हाखाली आला आहे.
सध्या न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक ठरणार आहेत. न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते, बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असते, यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील, हे अवलंबून आहे. सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.
पुणे, दि. 19: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि चंदादेवी चारिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे मांगल्य कार्यालय, बुधवार पेठ, पुणे येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
अध्यक्षीय भाषणात विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व समाज कल्याण विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तृतीयपंथी नागरिकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नशामुक्त भारत अभियानानिमित्त उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
अभिनय कुंभार (IRS) यांनी तृतीयपंथी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी अभिनय कुंभार , प्रधान आयुक्त, आयकर विभाग, पुणे व हृषीकेश रावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास चंदादेवी चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथी नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सुमारे २०० तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे संजीव अग्रवाल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
यावेळी कार्यक्रमाच्या औचित्याने विविध शासकीय विभागांमार्फत सेवा-सुविधांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, परिमंडल-ई रेशनिंग कार्यालय मार्फत शिधापत्रिका सेवा, उपजिल्हाधिकारी (महसूल) कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेची माहिती, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम नोंदणी तसेच भूसंपादन अधिकारी, नोडल ऑफिसर-४ मार्फत आधार अद्ययावत करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
सुमारे २०० पारलिंगी माता-भगिनींनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली.
पुणे, दि. 19: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीस इच्छुक उमेदवारांसाठी सर्विस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या तयारीचे निःशुल्क छात्रपूर्व प्रशिक्षण कोर्स नाशिक रोड, नाशिक येथे 15 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 11 डिसेंबर 2025 पर्यंत मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना संकेतस्थळावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टे डाउनलोड करून तीन प्रतींसह पूर्ण भरून आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी 0253-2451032 किंवा 9156073306 (व्हॉट्सअॅप) या क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे. 000
पुणे-भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांचा सन्मान महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून करण्यात आला. पुणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी रेश्मा पुणेकर भारतीय महिला बेसबॉल संघाचे नेतृत्व करत आहेत. थायलंड देशांमध्ये झालेल्या महिला एशिया कप क्वालिफाय राऊंडमध्ये भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त झाले होते. या स्पर्धेचे नेतृत्व रेश्मा यांनीच केले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये तब्बल बारा वर्षे बेसबॉल खेळासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले योगदान दिले आहे. आज पर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक सामने खेळले आहेत. अनेक पुरस्काराची मानकरी ठरलेल्या आहेत. विशेष करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू ते भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यातून त्या भारतीय बेसबॉल संघाला पुढे घेऊन जात आहेत. चीन देशात झालेल्या एशियन कप स्पर्धेमध्ये सन्मानजनक कामगिरी केल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम व अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे साहेब यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे कौतुक केले आणि रेश्मा पुणेकर (क्रीडा अधिकारी) भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या यांना महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पुणे – मुंढव्यातील बॉटनिकल गार्डन जमीन प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. “या प्रकरणात पार्थ पवार यांचा नेमका सहभाग काय हे तपासण्यासाठी, घटनेच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ४:३० या वेळेत त्यांचे मोबाईल ‘टॉवर लोकेशन’ आणि ‘सीडीआर’ (कॉल डेटा रेकॉर्ड) तपासण्यात यावेत,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तसेच, या गंभीर प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर त्या ठाम आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी आरोपी सूर्यकांत येवले याला मिळालेल्या जामिनावर संशय व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जर येवलेला कोठडीत ठेवून त्याचा जबाब नोंदवला असता, तर पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव उघड झाले असते. हे सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झाला आहे.” पोलिसांनी आता तातडीने न्यायालयात जाऊन येवलेचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्याला अटक करून या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव वदवून घ्यावे, असे थेट आव्हानच दमानिया यांनी पोलिसांना दिले.
पोलिस डायरीचा दाखला आणि दादागिरीचा आरोप
यावेळी दमानिया यांनी पोलिस डायरीतील नोंदींचे वाचन करून गंभीर बाबी समोर आणल्या. त्या म्हणाल्या, आता अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण पोलिस स्टेशन डायरीतले उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. १६ जून २०२५ दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी उपरोक्त विषयान्वये आम्ही मुंढवा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना मुंढवा पोलिस ठाण्यात हे कळवण्यात आलं की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करुन आमच्या सिक्युरीटी लोकांना बॉटेनिकल गार्डनमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे पोलिसांची कुमक पाठवा. अधिकाऱ्यांच्या आदेशाने आम्ही उपनिरीक्षक मुंडे यांच्यासह सदर ठिकाणी गेलो. त्यावेळी बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम (वय-५७), महेश पुजारी आणि फिल्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचे चार गार्ड हजर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेश मोरे यांनी नियुक्ती केली आहे. पण ती जागा बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने बाळासाहेब कदम यांनी सांगितलं. अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्यांनी पोलिसांना फोन केला. जागा रिकामी करुन घ्या अशी मागणी करतात.
बॉटनिकल गार्डनच्या जागेवर ‘अमेडिया’ कंपनीने हक्क सांगत जागा रिकामी करण्यासाठी दबाव टाकला होता. या कंपनीच्या वकिलाने फोन करून पोलिसांची फौज बोलावून घेतली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, कंपनीच्या माणसांकडे जागेची कोणतीही कागदपत्रे नव्हती. तरीही कंपनीचे वकील आणि बाऊन्सर्स यांनी तिथे जाऊन दादागिरी केली, असा आरोप दमानिया यांनी केला.
पार्थ पवार यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना त्या म्हणाल्या, “पार्थ पवार यांचा कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) तत्काळ मागवावा. त्यातील ‘कोड’वरून आणि टॉवर लोकेशनवरून घटनेच्या वेळी ते अडीच किलोमीटरच्या परिघात कुठे होते, याचा उलगडा होईल. तसेच पोलिस ठाण्यात आणि गार्डनमध्ये घुसणारी माणसे कोण होती, हे देखील तपासात निष्पन्न होईल.”
आतापर्यंत पार्थ पवार यांचे नाव एफआयरमध्ये घातले नाही, तर ते होईल. पोलिसांनी मोठा वकील ठेवून सूर्यकांत येवले यांचा अंतरीम जामीन रद्द करावा, त्यांना अटक करावी आणि हा सर्व प्रकार करण्यास कोणी भाग पाडले, याबाबत त्यांचा जबाब नोंदवावा. या सगळ्याचा उलगडा झाल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर येतील. पार्थ पवारला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाहीये. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी मी लढत राहणार आहे, असा निर्धार अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.