Home Blog Page 43

धायरी व दौंड येथे अवैध, बनावट मद्यवाहतूक,विक्री- 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच 12 व्हीएल 0955) वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यातील खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मद्य आढळून आले. यात मॅकडॉवेल नं. 1 व्हिस्की 180 मिली 288 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली 192 बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली 240 बाटल्या असा एकूण रु. 24 लाख 4 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) व चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान चेतन बाटे यांच्या घरी छापा टाकून मॅकडॉवेल नं. 1, रॉयल स्टॅग व इंपिरियल ब्ल्यू च्या प्रत्येकी 144 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गोवा एड्रिएल क्लासिक व्हिस्की (७५० मिली) ३६ बाटल्या, विविध बनावट बुचे ६०० नग, रिकाम्या बाटल्या १९२ नग व मोबाईल असा एकूण 1 लाख 18 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या फ्लॅटमध्ये राहणारे आरोपी तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या घरातून गोवा राज्‍य निर्मित एड्रिएल क्लासिक व्हिस्की २८४ बाटल्या, बनावट बुचे – ७५० नग व मोबाईल असा एकूण 4 लाख रु. 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रु. 29 लाख 92 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दौंड विभागा मार्फत 10 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंड येथील स्वामी चिंचोली येथून इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 480 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 240 बाटल्या व मोबाईल असा एकूण रुपये 8 लाख 85 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घटनास्थळी वैभव साळुंखे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून विविध ब्रँड्सच्या एकूण 432 बाटल्या, बनावट लेबल्स १३‍०० नग असा एकूण 1 लाख 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 3 आरोपी अटकेत असून एकूण 10 लाख 12 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणांचा पुढील तपास अनुक्रमे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, डी विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पुणे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे हे करीत आहेत.

अवैध मद्यविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले. तसेच अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमितपणे कारवाई सुरू राहील. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ टोल फ्री क्र. 1800 233 9999 व दूरध्वनी क्र. 020 – 26058633 येथे संपर्क साधावा.

सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची होणार भरती ऑनलाइन अर्ज 26 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 20 ऑक्टोबर :- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी १ पद असून ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल.

भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे माध्यमातून होणार आहे. इच्छुकांनी अर्ज ऑनलाईनच करावेत, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज 26 नोव्हेंबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत स्विकारले जातील.

या भरतीबाबत सविस्तर माहिती व अटी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

अमेरिकेचा अजब अहवाल, म्हणे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताला हरवले-जयराम रमेश म्हणाले, आपला आक्षेप आणि निषेध नोंदवा

0

पहलगाम हल्ला दहशतवादी हल्ला मानला नाही; काँग्रेसने म्हटले- हा भारतीय डिप्लोमसीला मोठा धक्का
वॉशिंग्टन डी.सी-मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार दिवसांच्या युद्धात (ऑपरेशन सिंदूर) पाकिस्तानला मोठे लष्करी यश मिळाल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे.या अहवालात पहलगाम हल्ल्याला दहशतवादी हल्ला नसून “बंडखोरीचा हल्ला” असे संबोधले आहे. हा ८०० पानांचा अहवाल अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाने (यूएससीसी) प्रसिद्ध केला आहे.काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या अहवालाला विरोध दर्शवला आहे आणि त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, “पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालय आपला आक्षेप आणि निषेध नोंदवतील का? आपल्या राजनैतिकतेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.”
अहवालात असे म्हटले आहे की पाकिस्तानने राफेल विमानांसह किमान सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे राफेलची प्रतिमा खराब झाली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की प्रत्यक्षात फक्त तीन भारतीय विमाने पाडण्यात आली आहेत.

यूएससीसीचे म्हणणे आहे की चीनने भारत-पाकिस्तान युद्धाचा वापर थेट युद्धात आपल्या आधुनिक शस्त्रांची चाचणी घेण्यासाठी आणि ती जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी केला.या लढाईनंतर, जगभरातील चिनी दूतावासांनी त्यांच्या शस्त्रांचे कौतुक केले आणि म्हटले की पाकिस्तानने त्यांचा वापर भारतीय लढाऊ विमाने पाडण्यासाठी केला होता.

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पाच महिन्यांनी, चीनने इंडोनेशियाला ७५ हजार कोटी रुपयांना ४२ J-१०C लढाऊ विमाने विकण्याचा करार केला होता.अहवालानुसार, पाकिस्तानने या संघर्षात चीनने पुरवलेल्या शस्त्रांचा वापर केला, ज्यामुळे जगाला त्यांचा लष्करी फायदा दिसून आला. त्यात म्हटले आहे की पाकिस्तानने चीनची HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली, PL-15 क्षेपणास्त्रे आणि J-10 लढाऊ विमाने वापरली.या काळात पाकिस्तानला चीनकडून गुप्तचर माहिती मिळाली असल्याचा भारताचा दावा आहे. तथापि, पाकिस्तानने याचा इन्कार केला आहे आणि चीनने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अहवालांनुसार, २०१९-२०२३ दरम्यान पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांच्या ८२% शिपमेंट चीनमधून आल्या.

अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या USCC बद्दल जाणून घ्या

९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, जेव्हा चीन आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या वेगाने शक्तिशाली होत होता, तेव्हा अमेरिकेत त्याबद्दल चिंता वाढली.
अमेरिकन नेत्यांना हे समजू लागले की चीनमुळे निर्माण होणारे आर्थिक फायदे आणि सुरक्षा धोके दोन्ही एकाच वेळी समजून घेणे आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत, चीनवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याचे काम चीनच्या आर्थिक किंवा तांत्रिक क्रियाकलापांमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे का हे शोधणे होते.
यूएससीसी स्वतः कोणतीही कारवाई करत नाही, ते फक्त एक अहवाल तयार करते आणि अमेरिकन संसदेला सादर करते.
अंतिम अहवालात आयोगाच्या शिफारशींचा समावेश करण्यासाठी, त्यांना किमान 8 सदस्यांचा (दोन तृतीयांश) पाठिंबा आवश्यक आहे.
चिनी माध्यमांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यूएससीसीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात लिहिले आहे की यूएससीसीने पुन्हा एकदा चीनच्या आर्थिक, तांत्रिक आणि सुरक्षा प्रगतीला जगासाठी धोका म्हणून चित्रित केले आहे.सध्याचा दृष्टिकोन असे सूचित करतो की हा अहवाल राजकीय हेतूंसाठी लिहिला गेला आहे आणि त्यात तथ्यांचे पूर्णपणे निःपक्षपाती विश्लेषण दिलेले नाही. आयोग चीनबद्दल खोलवरचे गैरसमज आणि अहंकार बाळगतो. वृत्तपत्र पुढे असे नमूद करते की अमेरिकेला चीनला अधिक पूर्णपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

चीनच्या शस्त्रास्त्र उद्योगाच्या विकासाचे आरोप करणे किंवा त्याचे चुकीचे प्रतिनिधित्व करणे हे कोणत्याही सार्वभौम देशाच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या मूलभूत अधिकाराला नकार देण्यासारखे आहे, असे वृत्तपत्रात म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्स पुढे नमूद करते की अमेरिका पुरवठा साखळीला शस्त्र बनवत नाही तर अमेरिका आहे. चिप तंत्रज्ञानावर निर्बंध घालून, लष्करी उपकरणांवर बंदी घालून, कंपन्यांना काळ्या यादीत टाकून आणि आपल्या मित्र राष्ट्रांवर दबाव आणून अमेरिकेने चीनविरुद्ध आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला आहे.याउलट, चीनचा प्रतिसाद केवळ अमेरिकेच्या निर्बंधांना प्रतिसाद म्हणून आहे, जगाला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नाही. चीनचे दुर्मिळ पृथ्वी खनिज धोरण पुरवठा साखळी स्थिर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, निर्यात मर्यादित करण्यासाठी नाही.शेवटी, हा अहवाल बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास अमेरिकेला किती अडचण येत आहे हे दर्शवितो. वर्षानुवर्षे त्याच कथनाची पुनरावृत्ती करणे, तथ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि राजकीय पक्षपातीपणा बाळगणे या सर्वांमुळे अहवालाची जगभरातील प्रतिष्ठा कमकुवत झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी अपघात, आज मिळाली माहिती-ताम्हिणी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली थार:6 तरुणांचा मृत्यू

20 दिवसांपूर्वीच घेतली होती नवीन कार

पुणे- पर्यटनासाठी कोकणात निघालेल्या तरुणांच्या एका ग्रुपवर काळाने घाला घातल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ‘थार’ कार 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे .मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही तरुण मंगळवारी रात्री कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. मंगळवारपासून हे तरुण संपर्कात नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. मोबाईल लोकेशन तपासले असता, ते रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आज सकाळी स्थानिक रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता, 500 फूट खोल दरीत चक्काचूर झालेली थार आढळून आली.

हृदयद्रावक बाब म्हणजे, ज्या गाडीचा अपघात झाला ती ‘थार’ कार अवघ्या 20 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती. नवीन गाडीतून फिरण्यासाठी निघालेल्या या तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला. कारमध्ये एकूण 6 पुरुष प्रवासी होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातात प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, साहील बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी, शिवा माने या तरुणांचा मृत्यू झाला असून, हे सर्व पुण्यातील रहिवासी होते. इतर दोघांचा शोध सुरू आहे.

अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस आणि ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे’च्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. दरीची खोली जास्त असल्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह आढळून आले असून, दोरखंड आणि क्रेनच्या साहाय्याने ते बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अद्याप दोन जण बेपत्ता असल्याने रेस्क्यू टीम त्यांचा कसून शोध घेत आहे.”

सोमवारी (ता.१७) रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने कोकणात फिरण्यासाठी प्रथम शहाजी चव्हाण (वय-२२,रा. कोंढवे धावडे, पुणे) पुनित सुधारक शेट्टी, (वय-२०, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे), साहील साधु बोटे (वय-२४, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे) श्री महादेव कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), ओंकार सुनील कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे,) शिवा अरुण माने (वय-१९, रा. कोपरे गाव,भैरवनाथ नगर, पुणे) हे सर्व सहा युवक निघाले होते. परंतु दुसऱ्या दिवसापासून त्या सर्व युवकांचा कोणताही संपर्क त्यांच्या घरच्यांशी त्यांच्या मित्रांशी तसेच नातेवाकांशी झाला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या त्या युवकांच्या पालकांनी या घटनेबाबत उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

१९ नोव्हेंबरच्या रात्री माणगाव पोलिसांनी ताम्हिणी घाटात शोधमोहीम सुरू केली. तेव्हा एका अवघड वळणावर लोखंडी संरक्षण कठडा तुटलेला आढळला. ड्रोन उड्डाण केल्यानंतर घनदाट झाडीत थार कारचा एक भाग चमकताना दिसला व अपघात निश्चित झाला. रात्र झाल्याने तपास मोहीम थांबवावी लागली; मात्र २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० पासून पुन्हा मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान दरीतील झाडा झुडपात विखुरलेल्या अवस्थेत सहाही तरुणांचे मृतदेह मिळाले

ताम्हिणी घाटातील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

जीर्ण झालेले संरक्षण कठडे, असुरक्षित वळणे, रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे आणि वाहतूक या सर्व बाबींची मोठी पुनर्पडताळणी होण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना ताम्हिणी घाटातील सुरक्षिततेची दयनीय अवस्था उघड करते आणि प्रशासन तसेच हा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असल्याने या विभागावर मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पुण्यात 41 प्रभागांमध्ये एकूण 35 लाख 51 हजार 469 मतदार-प्रभाग निहाय यादी प्रसिद्ध

पुणे- राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक 16 जुलै 2025 रोजीचे आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार तसेच दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी पालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेली प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
त्यानुसार 41 प्रभागांमध्ये एकूण मतदार 35 लाख 51 हजार 469 आहेत.
प्रारूप मतदार यादीवर दिनांक नोव्हेंबर 20 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करून घेण्यात येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग घेणार अंतिम मतदार यादी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

मतदाराने घ्यावयाच्या हरकतींचे प्रकार-
१. स्वतः मतदाराने केलेले अर्ज – ज्या मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले असेल त्यांनी नमुना हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे

  1. इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत घेतलेले हरकत- ज्या तक्रारदारास अन्य मतदाराबाबत हरकत घ्यायची आहे त्यांनी नमुना ब मध्ये मतदाराचे तपशील, त्याचे रहिवासाचे पुरावे तसेच यादी भाग क्रमांकाची प्रत जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
  • एकच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे नमुना मधील अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांच्यामार्फत त्या संस्थेच्या लेटरहेडवर संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या स्वाक्षरीने एकत्रितपणे सादर करता येतील.
  • कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही.

प्रभागातील मतदार संख्येचा तक्ता

सर्वाधिक मतदार संख्या असलेले १० प्रभाग
क्रपुणे महानगरपालिका सर्वाधिक मतदार असलेले प्रभागमतदारसंख्या
1प्रभाग ०९ – सुस – बाणेर – पाषाण160242
2प्रभाग ३८ – बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज148769
3प्रभाग ०४ – खराडी – वाघोली124667
4प्रभाग ४१ – महंमदवाडी – उंड्री119967
5प्रभाग ३३ – शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)114882
6प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक – केशवनगर – साडेसतरा नळी111735
7प्रभाग ०३ – विमाननगर – लोहगाव107028
8प्रभाग ०१ – कळस – धानोरी – लोहगाव उर्वरित105713
9प्रभाग ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरी104798
10प्रभाग १९ – कोंढवा खुर्द – कौसरबाग102593

पुणे महापालिका जाहीर प्रभाग निहाय प्रारूप मतदार संख्या 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी
प्रभाग ०१ – कळस – धानोरी – लोहगाव उर्वरित105713
प्रभाग ०२ – फुलेनगर – नागपूर चाळ78626
प्रभाग ०३ – विमाननगर – लोहगाव107028
प्रभाग ०४ – खराडी – वाघोली124667
प्रभाग ०५ – कल्याणी नगर – वडगावशेरी82132
प्रभाग ०६ – येरवडा – गांधीनगर72507
प्रभाग ०७ – गोखलेनगर – वाकडेवाडी80451
प्रभाग ०८ – औंध – बोपोडी90799
प्रभाग ०९ – सुस – बाणेर – पाषाण160242
प्रभाग १० – बावधन – भुसारी कॉलनी79278
प्रभाग ११ – रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर70605
प्रभाग १२ – छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी72480
प्रभाग १३ – पुणे स्टेशन – जय जवान नगर76136
प्रभाग १४ – कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा71819
प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक – केशवनगर – साडेसतरा नळी111735
प्रभाग १६ – हडपसर – सातववाडी91422
प्रभाग १७ – रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी82044
प्रभाग १८ – वानवडी – साळुंखेविहार71113
प्रभाग १९ – कोंढवा खुर्द – कौसरबाग102593
प्रभाग २० – शंकर महाराज मठ – बिबवेवाडी65061
प्रभाग २१ – मुकुंदनगर – सॅलसबरी पार्क69122
प्रभाग २२ – काशेवाडी – डायस प्लॉट73002
प्रभाग २३ – रविवार पेठ – नाना पेठ79726
प्रभाग २४ – कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के.ई.एम. हॉस्पिटल70707
प्रभाग २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई71765
प्रभाग २६ – घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभूमी67008
प्रभाग २७ – नवी पेठ – पर्वती70838
प्रभाग २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द73104
प्रभाग २९ – डेक्कनजिमखाना – हॅप्पी कॉलनी68668
प्रभाग ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी69211
प्रभाग ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड81449
प्रभाग ३२ – वारजे – पॉप्युलर नगर87438
प्रभाग ३३ – शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)114882
प्रभाग ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरी104798
प्रभाग ३५ – सनसिटी – माणिक बाग69802
प्रभाग ३६ – सहकारनगर – पद्मावती79925
प्रभाग ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी74519
प्रभाग ३८ – बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज148769
प्रभाग ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर62205
प्रभाग ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी98913
प्रभाग ४१ – महंमदवाडी – उंड्री119967

DRAFT VOTER LIST 2025
Ward No.-Total Voters
1-105713
2-78626
3-107028
4-124667
5-82132
6-72507
7-80451
8-90799
9-160242
10-79278
11-70605
12-72480
13-76136
14-71819
15-111735
16-91422
17-82044
18-71113
19-102593
20-65061
21-69122
22-73002
23-79726
24-70707
25-71765
26-67008
27-70838
28-73104
29-68668
30-69211
31-81449
32-87438
33-114882
34-104798
35-69802
36-79925
37-74519
38-148769
39-62205
40-98913
41-119167
एकुण मतदार -3551469

पार्थ,मुंढवा जमीन घोटाळा:राजेंद्र मुठे समिती कधीच स्थापन केली नव्हती-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गजब दावा

पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी राजेंद्र मुठे समिती कधीच स्थापन केली नव्हती, असा अजब दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या समितीने परवाच आपला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर बावनकुळे यांनी हे विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी राजेंद्र मुठे समिती स्थापन केली होती. या समितीने गत मंगळवारी आपला अहवाल सादर केला. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या मते, या समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट देऊन केवळ या प्रकरणातील इतर आरोपी दिग्विजय पाटील व शीतल तेजवानी यांच्या डोक्यावर खापर फोडले आहे. या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले असताना आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारने राजेंद्र मुठे समिती स्थापनच केली नसल्याचा दावा केला आहे.

या वृत्तानुसार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राजेंद्र मुठे नामक समिती कधीच स्थापन केली नव्हती. त्यामुळे त्यांचा अहवाल काय आहे हे मला माहिती नाही. प्रस्तुत घोटाळा उजेडात आला तेव्हा जमाबंदी आयुक्तांनी समिती स्थापन केली. प्राथमिकदृष्ट्या जे या घोटाळ्यात गुंतलेले दिसून आले त्यांच्यावर स्थानिक पातळीवरील समितीच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई करम्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील समितीनंतर महाराष्ट्र सरकारने विकास खारगे यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीचा अहवाला या प्रकरणी महत्त्वाचा राहणार आहे.

या समितीपुढे अंजली दमानिया यांच्यासह या प्रकरणात आरोप करण्यात आलेले अधिकारी व इतरांचे म्हणणे ऐकले जाईल. विकास खारगे समितीचा अहवाला आल्यानंतर यासंबंधी अंतिम कारवाई कुणावर करायची? हा व्यवहार कसा रद्द करायचा? याचा निर्णय घेतला जाईल. सरकारला तो व्यवहार रद्द करायचा आहे. त्यानुसार संबंधितांना 42 कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी कुणीही सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, विकास खारगे समितीने पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार असलेल्या दिग्विजयसिंह पाटील यांना मुदतवाढ दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या समितीचा अहवाल लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर कंपनीला आपले म्हणणे मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण दिग्विजयसिंह पाटील यांनी आपल्याला 18 नोव्हेंबर रोजी नोटीस मिळाल्याचे नमूद करत वाढीव मुदत मागितली होती. त्यानुसार खारगे समितीने त्यांना वाढीव मुदत दिली. दरम्यान, प्रस्तुत भूखंड घोटाळ्याप्रकरणी दिग्विजय पाटील यांची बुधवारी खारगे समितीपुढे हजर झाले.

दुसरीकडे, पार्थ पवारांना देण्यात आलेली क्लीनचिट म्हणजे केवळ विनोद नाही, तर ते महाराष्ट्राचे प्रशासन रसातळाला गेल्याचे लक्षण आहे, अशी जोरदार टीका माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. प्रशासनाने राजकारणी व घराणेशाहीशी संगनमत केल्याचा आरोपही त्यांनी या प्रकरणी केला आहे. ते म्हणाले, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे.

घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI, करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट, रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया, प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला. आणि तरीही ते ‘निर्दोष’. ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे. कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर. त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

पुण्यात सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

पुणे- जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी एका सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी ऊसतोड मजूर कुटुंबातील असून, तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी हा देखील त्याच वस्तीतील शेजारीच असल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे असून तोही ऊसतोड कामगार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला जबरदस्तीने एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घाबरून घरी परतल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली. मुलीने आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितल्याने पालकांनी तात्काळ ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ओतूर पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही तासांच्या आत आरोपी देवीदास गर्जेला अटक केली. पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत. पीडित बालिकेवर पुण्यातील शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.या घटनेनंतर ऊसतोड कामगारांच्या वस्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ओतूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आणि शांतता राखली. या प्रकरणी भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (२)(एन), तसेच पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये देविदास गर्जे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“पुरुष अजूनही प्रचंड भावनिक भार वाहत आहेत-परवीन शेख

मुंबई, 20 नोव्हेंबर 2025 :“पुरुष अजूनही प्रचंड भावनिक भार वाहत आहेत — तेही अनेकदा शांतपणे. असे येथे एमपॉवरच्या अध्यक्ष परवीन शेख यांनी म्हटले आहे.

 आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उपक्रम असलेल्या एमपॉवरने आपल्या हेल्पलाइन, समुपदेशन व्यवस्था आणि युवा आउटरीच कार्यक्रमांमधील पाच वर्षांच्या डेटाचे एकत्रित विश्लेषण जाहीर केले आहे. या विश्लेषणातून भारतीय पुरुषांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांची स्पष्ट वाढ दिसून येते. अधिकाधिक पुरुष मदतीसाठी पुढे येत आहेत, परंतु त्यांच्यावरचा भावनिक ताण विशेषत: तरुण आणि कार्यरत वयोगटात सातत्याने वाढताना दिसत आहे.

एमपॉवरने या कालावधीत आपल्या सर्व सेवा विभागांद्वारे आणि आउटरीच मोहीमांद्वारे अंदाजे 2.83 लाख पुरुषांपर्यंत पोहोच साधली. यात 18 ते 25 वयोगटातील तरुण पुरुषांची संख्या सर्वाधिक होती. तरुणांसाठी राबवलेल्या उपक्रमांद्वारेच जवळपास 2,07,350 तरुणांपर्यंत पोहोचता आले. यात मानसिक आरोग्य तपासणी, लवकर हस्तक्षेप कार्यक्रम, कॅम्पस उपक्रम, समुदाय प्रकल्प आणि बहु-शहर मोहिमांचा समावेश होता. ही आकडेवारी या वयोगटातील उच्च संवेदनशीलता तर दर्शवतेच, पण जेव्हा शैक्षणिक संस्था आणि समुदाय पातळीवर मानसिक आरोग्यासाठी सहकार्य उपलब्ध करून दिले जाते, तेव्हा तरुण पुरुष त्याबद्दल अधिक मोकळेपणाने बोलतात आणि मदत घेण्यास अधिक तयार असतात, हेही स्पष्ट करते.

26 ते 40 वयोगटातील कामकाज करणाऱ्या पुरुषांमध्ये मदत मागण्याचे प्रमाण एमपॉवर 1on1 या २४×७ हेल्पलाइनवर सर्वाधिक दिसून आले. 2022 ते 2025 दरम्यान 75,702 पुरुषांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधला. यापैकी अनेक जणांनी अनामिकरित्या मदत मागितली, कारण प्रत्यक्ष सेवा घेण्याबाबत पुरुषांना लज्जा, गैरसमज किंवा न्यायाधीशांच्या भीतीमुळे संकोच वाटतो, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

या कॉल्सपैकी 16,698 कॉल्स हे नातेसंबंधातील समस्या, नैराश्य आणि तणावाशी थेट संबंधित होते. यावरून भावनिक ताण, वैयक्तिक नात्यांतील संघर्ष आणि मूडशी निगडित समस्या—हेच मदत मागण्यामागील सर्वात प्रमुख कारण ठरतात, हे दिसून येते. आशादायी बाब म्हणजे 40% पुरुष कॉलर्सना कॉल संपेपर्यंत तणावात लक्षणीय घट झाल्याचे जाणवले, ज्यामुळे त्वरितसहानुभूतीपूर्ण समुपदेशनाचे प्रत्यक्ष परिणाम सिद्ध होतात.

भौगोलिकदृष्ट्या पाहता, शहरी आणि उपनगरी भागात प्रतिसाद सर्वाधिक होता. पुण्याने 1,13,435 तरुण पुरुषांपर्यंत पोहोच साधली, तर मुंबईत 53,657 तरुणांना क्लिनिकल सेवा, आउटरीच आणि युवा उपक्रमांद्वारे जोडता आले. राजस्थान, दिल्ली, बेंगळुरू, गोवा आणि हैदराबाद या इतर प्रदेशांमधून मिळून 40,००० हून अधिक तरुण पुरुषांशी संपर्क झाला. यावरून देशभरातील विविध समुदायांमध्ये मानसिक आरोग्याच्या गरजा व्यापक प्रमाणात आणि सातत्याने वाढत असल्याचे अधोरेखित होते.

एमपॉवरच्या हेल्पलाइन आणि विविध कार्यक्रमांमधील संवादांमध्ये सर्वाधिक दिसून आलेल्या मानसिक आरोग्य समस्यांमध्ये तणावथकवा (बर्नआउट), नैराश्य, चिंता, नातेसंबंधातील ताण, शैक्षणिक दबाव, कौटुंबिक संघर्ष, कमी आत्म-सन्मान, एकाकीपणा आणि आर्थिक अनिश्चितता यांचा समावेश होता. अनेक पुरुषांनी आपल्या भावनिक संघर्षांबद्दल उघडपणे बोलण्याची अडचण व्यक्त केली आणि बहुधा भावना दाबून ठेवणे, सामाजिकदृष्ट्या दूर राहणे किंवा कामात अति गुंतून जाणे अशा पद्धतींनी तोंड देत असल्याचे सांगितले. काहींनी ताण कमी करण्यासाठी व्यसनात्मक पदार्थांकडे वळल्याचेही नमूद केले. या वर्तन पद्धती पुरुषांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे किंवा तो व्यक्त न करणे — या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतात, हे दर्शवतात.

या निष्कर्षांवर बोलताना एमपॉवरच्या अध्यक्ष परवीन शेख म्हणाल्या,  पुरुष अजूनही प्रचंड भावनिक भार वाहत आहेत — तेही अनेकदा शांतपणे. आमच्या डेटामधून स्पष्ट होते की पुरुष जेव्हा मदतीसाठी पुढे येतात, तेव्हा त्यांना मिळणारा दिलासा तत्काळ आणि अर्थपूर्ण असतो. आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो की अनेक पुरुष ताण कमी करण्यासाठी गेमिंगकडे वळतात. हे तात्पुरते विचलन देऊ शकते, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास हे स्वतःच अनारोग्यकारक पद्धती आणि गेमिंग-ऍडिक्शनमध्ये बदलू शकते.

आपल्याला विशेषतः आपल्या तरुण पुरुषांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे — त्यांना ताण आतल्या आत ठेवण्याऐवजी लवकर मदत घेण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीत मुलांना व पुरुषांना ‘मजबूत’ राहायला शिकवले जाते, पण मदत मागणे ही कमजोरी नाही — ती एक शक्ती आहे, जी तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, ताण निरोगी पद्धतीने हाताळण्यास आणि आयुष्यात अधिक साध्य करण्यास सक्षम बनवते. या पुरुष मानसिक आरोग्य दिनी आमचा संदेश सोपा आहे:  तुम्हाला तुमचे संघर्ष एकटेच वाहून न्यायची गरज नाही. कारण गोपनीय, सहृदय आणि कोणत्याही प्रकारच्या जजमेंटपासून मुक्त असलेली मदत उपलब्ध आहे.”

एमपॉवर पुरुषांसाठी मानसिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी क्लिनिकल केअर, बहुभाषिक हेल्पलाइन, विद्यापीठे व शाळांमधील कार्यक्रम, लवकर तपासणी (स्क्रीनिंग), समुदाय-आधारित उपक्रम आणि क्षमतावृद्धी कार्यशाळा अशा विविध माध्यमांद्वारे देशभरात सातत्याने काम करत आहे. क्लिनिकल तज्ज्ञता आणि सक्रिय आउटरीच यांचा मिळून तयार झालेला एमपॉवरचा एकात्मिक मॉडेल पुरुषांना — त्यांच्या वय, शहर किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीची पर्वा न करता — कलंकमुक्त, सुरक्षित वातावरणात मदत घेण्यास प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

तसेच, त्वरित आणि गोपनीय सहाय्याची गरज असलेल्या व्यक्तींसाठी एमपॉवरची 1on1 मानसिक आरोग्य टोल-फ्री 24×7 हेल्पलाइन उपलब्ध आहे:
📞 १८००-१२०-८२००५०

सह्याद्रीत टायगर कमबॅक

0

चांदोलीत वाघीणीची यशस्वी जंगलात मुक्तता; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा, STR T–04 जंगलात परतली


सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्रसंख्यावाढीत आज एक ऐतिहासिक पाऊल टाकत चांदोली राष्ट्रीय उद्यानात नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या STR T–04 या वाघीणीला नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून तिचे वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण, अनुकूलन व प्रशिक्षण करण्यात आले होते. 18 नोव्हेंबरला एनक्लोजरचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला असला तरी वाघीण दोन दिवस आतच फिरत राहिली होती. त्या काळात तिने एनक्लोजरमध्येच शिकार केली आणि नैसर्गिक जीवनशैलीचे सर्व संकेत दर्शवले. अखेर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता ती अतिशय शांत, डौलदारपणे दरवाजातून बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण करत मोकळ्या वनक्षेत्रात प्रवेश केला.
वाघीणीच्या चांदोली आगमनानंतर तिला जंगलातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अनुकूलन प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची शिकार करण्याची प्रवृत्ती, नैसर्गिक परिस्थितींना दिलेली प्रतिक्रिया, क्षेत्रचिन्हीकरणाची पद्धत आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा अभ्यास करण्यात आला. भारतीय वन्यजीव संस्था (WII) येथील वैज्ञानिक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाचे तज्ज्ञ पथक तिला दररोज तपासत होते. अखेर सर्व निरीक्षणानंतर ती संपूर्णपणे तंदुरुस्त असून जंगलातील स्वतंत्र जीवनासाठी पूर्ण योग्य असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला.
वाघीणीच्या मुक्तीनंतर तिला सतत निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी अत्याधुनिक रेडिओ कॉलर प्रणाली बसविण्यात आली आहे. Satellite Telemetry व VHF Tracking च्या माध्यमातून तिच्या हालचाली दिवस-रात्र नोंदवल्या जातील. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि WII या सर्व संस्थांचे प्रशिक्षित पथक तयार ठेवण्यात आले आहे. तिच्या निवासस्थानी बदल, शिकार पद्धती, मानवी वस्त्यांपासून अंतर, नैसर्गिक हालचाली यांची नोंद सातत्याने घेतली जाईल. अचानक परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी Veterinary Rapid Response टीमही सज्ज ठेवण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यावर क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी सांगितले की, वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दाखवली आहे आणि तिचे सर्व वर्तन नैसर्गिक जंगलातील वाघांसारखेच दिसून आले आहे. ती आता पूर्णपणे स्वावलंबी जीवनासाठी सक्षम आहे. आम्ही तज्ञांच्या सहकार्याने तिच्या पुढील प्रत्येक हालचालीचे काटेकोर वैज्ञानिक निरीक्षण करणार आहोत. तर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक म्हणाले की, राज्यात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवला जात आहे. या वाघीणीच्या यशस्वी पुनर्वसनामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचे एकत्रित सहकार्य महत्त्वाचे ठरले. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, WII चे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, तसेच अनेक वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने हा टप्पा राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून जंगलातील जैवविविधतेसाठीही तो सकारात्मक ठरणार आहे. चांदोलीच्या जंगलात नव्या उमेदीने दाखल झालेली ही वाघीण सह्याद्रीच्या वन्यजीव संवर्धनासाठी नवी सुरुवात मानली जात आहे.

भाडेकरूचे सामान रस्त्यावर: घरमालक आणि त्याला साथ देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आयुक्तांनी शिकविला धडा

पुणे- बेकायदेशीर रित्या भाडेकरूला थेट रस्त्यावर आणणाऱ्या घर मालकाविरोधात आणि त्याला साथ देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास पोलीस आयुक्तांनी चांगलाच धडा शिकविला आहे

पोलीस ठाण्यात येऊन घराला परस्पर कुलूप लावल्याची तक्रार भाडेकरुने केली असता घरमालकाला असे तुम्हाला करता येणार नाही, हे सांगून त्यांना गुन्हा करण्यापासून परावृत्त केले नाही. त्यामुळे घरमालक आणि सामाजिक कार्यकर्त्या यांनी विनापरवाना घरात शिरुन भाडेकरुचे सामान बाहेर काढून ठेवले . या घटनेत गुन्हा करण्यापासून आरोपींना परावृत्त न करता कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा करुन बेजबदारपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य केल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खराडीतील सहायक पोलीस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख यास निलंबित केले आहे.घरमालक राजकुमार बन्सल व प्रभा करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


याबाबतची माहिती अशी, गौरव शिवशंकर लखानी (वय ३५, रा. गेरा पार्क व्हिव आय, साऊथ विंग, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. लखानी हे राजकुमार बन्सल (वय ६४, रा. गेरा एमरेल्ड, खराडी) यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये २७ एप्रिल २०२५ पासून भाड्याने रहात होते. १५ सप्टेंबर २०२५ रोजी घरमालक राजकुमार बन्सल यांनी त्यांच्या भावाला एक महिन्याच्या आतमध्ये घरखाली करा, अशी नोटीस दिली होती.त्यावेळी त्यांनी आम्हाला दुसरे घर बघण्याकरीता वेळ द्या, असे सागिंतले होते. तरी सुद्धा त्यांनी ३१ ऑक्टोंबर रोजी फिर्यादी यांना न विचारता व घरात कोणी नसताना त्यांच्या घरास घरमालकाने कुलूप लावल्याचे दिसून आले. घरमालकाविरुद्ध तक्रार देण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी ते खराडी पोलीस ठाण्यात आले. तेव्हा घरमालक राजकुमार बन्सल व सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे हे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी दुसरे घर पाहण्याकरीता ८ दिवसांची मुदत मागितली. त्यावेळी आम्ही तुम्हाला मुदत देणार नाही, तुम्ही आताच्या आता घर खाली करा, नाही तर आम्ही तुमचे घरातील सामान बाहेर काढून ठेवू, असे सांगून ते निघून गेले होते. फिर्यादी लखानी हे कामाला निघून गेले. रात्री ८ वाजता घरी गेले, तेव्हा त्यांच्या घरातील सामान हे सोसायटी लिफ्टचे समोर पार्किंगमध्ये ठेवलेले दिसले. विनापरवाना घरात शिरुन घरातील सामान बाहेर काढुन स्वत:चे लॉक लावले.

त्यावरुन खराडी पोलिसांनी घरमालक राजकुमार बन्सल व प्रभा करपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडील पत्रावरुन फिर्यादी हे भाड्याने रहात असताना त्यांच्या घरामध्ये विनापरवाना प्रवेश करुन घरामधील साहित्य बाहेर काढले. त्यासाठी तुम्हास हा गुन्हा करण्यापासून आरोपींना परावृत्त करता आले असते, परंतु तुम्ही तसे न करता कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा करुन बेजबाबदारपणाचे वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य केले आहे, त्यावरुन सहायक पोलीस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले आहे.

‘संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : खरा लेखक सर्जनाच्या सर्व शक्यता तपासून पाहतो. बंदिस्त चौकटीत न अडकता विविध विषय हाताळत, सर्वसमावेशक सूत्रे आपल्या साहित्यकृतीतून मांडतो. हे सूत्र स्वीकारत ललिता सबनीस यांनी जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता दर्शवत मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन आपल्या साहित्यकृतींमधून घडविले आहे, असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.

संस्कृती प्रकाशनतर्फे ललिता श्रीपाल सबनीस लिखित ‘संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ चार पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी (दि. १९) झाले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, कवयित्री अंजली कुलकर्णी, साहित्यिक वि. दा. पिंगळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, विविध वाङ्‌मय प्रकारात लेखनप्रयोग करताना ललिता सबनीस यांनी रूढी, परंपरा यांच्यावर पुनर्विचार करणाऱ्या नायिका, स्त्रीवादाची मूल्ये दर्शविणारे संसारी शहाणपण तसेच लैंगिकता आणि नैतिकता या विषयावर थेट भिडण्याचे सामर्थ्य दाखविले आहे.

उत्तम संवेदनशील नागरिक घडावेत या दृष्टीने केलेले प्रयत्न त्यांच्या साहित्यकृतीतून जाणवतात. यातूनच त्यांनी जबाबदार बालसाहित्यकाराची भूमिका उत्तमपणे निभावली आहे. त्यांचे वाङ्‌मयीन विचार सुशिक्षितांना संस्कारित होण्यासाठी मार्गदर्शक आहेत. रंजक तरीही प्रबोधनात्मक आणि मूल्य जपणारे साहित्य माणुसकीचा आवाज बुलंद करणारे आहे.

हा प्रकाशन सोहळा म्हणजे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांचा आनंद मेळावा आहे, असे सांसून कृष्णकुमार गोयल म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या साक्षीने ललिता सबनीस यांनी मराठी साहित्याला नवी दिशा, उर्जा देणाऱ्या साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. या साहित्यकृती समाजभान जागवतील असा विश्वास आहे.

लेखन प्रवासाविषयी बोलताना ललिता सबनीस म्हणाल्या, साक्षरता पालकत्व, कुटुंब प्रबोधन, नातेसंबंध, महान स्त्रीयांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या साहित्यकृतींमधून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आनंदाने हसत खेळत, चैतन्याची बाग फुलवत होणारे बालकांचे प्रबोधन यांसह समर्पण आणि त्यागाची भूमिका मांडत विचार करायला लावणारी शोकांतिका या साहित्यकृती वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ठरतील.

‘समर्पण’ या कादंबरीविषयी बोलतानात अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ललिता सबनीस यांनी सामाजिक मूल्यव्यवस्था, नैतिकता व अनैतिकतेतील द्‌वंद्व, त्याग, समर्पणाची भावना या विषयी वास्तवपूर्ण मांडणी करत उत्तम संवादात्मकतेतून प्रसंग उभे करत वाचनियता जपणारी साहित्यकृती निर्माण केली आहे. तर ‘लहानपण देगा देवा’ या कवितासंग्रहातून मुलांच्या भावविश्र्वाशी तन्मयता साधत सभोवताल, निसर्गविभ्रम, नातेसंबंध यांच्याविषयी प्रसन्न, मोहक तसेच साध्या व सोप्या शब्दात मांडणी केली आहे.

वि. दा. पिंगळे म्हणाले, ‘संसारी शहाणपण’ या साहित्यकृतीतून ललिता सबनीस यांनी सुखी संसाराची गुरुकिल्लीच वाचकांच्या हाती दिली आहे. आजच्या काळातील मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा एकसंध व्हावी याकरिता हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. देशाच्या मातीत जन्मलेल्या स्त्री रत्नांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख ‘संस्कृतीनिष्ठ नायिका’ या पुस्तकातून वाचकांसमोर येत आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले तर सुनीताराजे पवार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिनेश फडतरे यांनी केले.

महापालिका क्षेत्रातील पुनर्विकासातील अडथळे कमी करण्यावर भर

0

मुंबई पुनर्विकासाला गती; 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ: भाडेकरूंना नोंदणी फीपासून पूर्ण सवलत

मुंबई-येथील पुनर्विकास प्रक्रियेतील भाडेकरूंना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान नवीन इमारतीत जागा मिळणाऱ्या भाडेकरूंना आता नोंदणी फीपासून पूर्ण सवलत देण्यात येणार आहे. आतापर्यंत 400 चौरस फुटापर्यंत ही सवलत लागू होती. मात्र यामध्ये मोठा बदल करत सरकारने मर्यादा थेट 600 चौरस फुटांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून पुनर्विकास प्रक्रिया अधिक गतीने होण्याची शक्यता आहे.

नवीन धोरणानुसार भाडेकरूला मिळणाऱ्या घराचे क्षेत्रफळ 200 चौरस फुटांनी वाढले तरीही नोंदणी फी आकारली जाणार नाही. अनेक वर्षांपासून जुन्या, जर्जर इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये नोंदणी शुल्काचा मोठा बोजा पडत होता. या शुल्कामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक अडचण वाढत होती. त्यामुळे ही फी माफ करण्याचा निर्णय हा सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. राज्य सरकारने पुनर्विकास प्रक्रियेतील अडथळे कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध पातळीवर प्रयत्न केले असून ही सवलत त्याच धोरणाचा पुढील टप्पा मानला जात आहे.

महसूल विभागाने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना विशिष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की मार्गदर्शक सुचना 2(अ) आणि 2(ब) मधील बदल केवळ क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांना लागू असतील. त्यामुळे व्यक्तिगत पुनर्विकास किंवा छोट्या प्रकल्पांमध्ये ही तरतूद लागू होणार नाही. शिवाय या सवलतीमुळे सन 2025–26 साठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदर तक्त्यात कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच सध्याच्या आर्थिक वर्षातील कर रचनेत कोणताही बदल होऊ नये, यावर सरकारने स्पष्ट भर दिला आहे.

याशिवाय महसूल विभागाने हेही सूचित केले आहे की, जर प्रस्तावित बदलांमुळे वार्षिक मूल्यदर तक्त्यात वाढ किंवा घट होण्याची शक्यता निर्माण झाली, तर ती बदल 1 एप्रिल 2026 पूर्वी अंमलात येऊ नयेत. यामुळे सरकारने नियमात तातडीचा बदल न करता नागरिकांवर किंवा महापालिकेच्या कर व्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची खात्री केली आहे. पुनर्विकासाशी संबंधित नोंदणी प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेले हे पाऊल प्रशासनिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. महसूल विभागाचे अधिकारी, नियोजन विभाग आणि पुनर्विकासातील संबंधित संस्था या सर्वांना या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

मुंबईतील पुनर्विकास हा गेल्या दोन दशकांपासून कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. विशेषतः दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात नोंदणी फी, स्टॅम्प ड्यूटी आणि इतर शुल्कांमुळे नागरिकांना होणारा आर्थिक भार मोठा होता. नव्या निर्णयामुळे पुनर्विकासाला नवी गती मिळेल, तसेच नागरिकांचा विश्वासही वाढेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्रातील पुनर्विकासातील अडथळे कमी करण्यावर भर देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी काही सवलती देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे हा रडणारा नाही, लढणारा आहे पण तुम्ही पतंग उडवित आहात : उपमुख्यमंत्री शिंदे


महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही
मुंबई : महाराष्ट्रात एनडीए आपापसात भांडताना दिसत आहे याची तक्रार करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतली का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता शिंदे म्हणाले, तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे आणि आपण ते पाहिले आहे वेळोवेळी. या छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो आणि खरे म्हणजे बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते त्यामुळे तिथे मोठे यश मिळाले. तसेच बिहारच्या जनतेला पूर्वीचे जंगलराज नको होते, विकास राज पाहिजे होते. महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितले की एकजुटीचे बळ काय असते आणि जनतेने महायुतीला यश मिळाले.

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर तुम्ही अमित शहा यांना भेटला, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे तुमचे कल्पना विलास आहे, हे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलो आहे आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढे सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्याचे जे काही प्रश्न आहेत हे राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा केली. त्यातून एवढेच ठरले की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हा विषय संपला आहे. हा विषय इथे दिल्लीत नव्हताच मुळात.

रवींद्र चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, यावर काय म्हणाल? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबतीत त्यांचे जे काही पक्ष श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील. आणि हा विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि मी शिवसेनेचा नेता आहे आम्ही आमच्या नेत्यांना सूचना देण्याचे काम केले आहे. महायुती मजबुतीने निवडणुकांना सामोरे जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले यश मिळणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अचानक दिल्लीला भेट देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांविषयीची आपली नाराजी अमित शहांना कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकारांशी संवाद साधला असून भेटी संदर्भात माहिती दिली आहे.….दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे. त्यामुळे मी बिहारच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. चांगली चर्चा त्यांच्यासोबत झाली. बिहारमध्ये दैदीप्यमान यश मिळाले आहे त्यामुळे जाताजाता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

पेट्रोल पंपांना मागताच मिळेल सुरक्षा:पोलिस आयुक्तांचे आश्वासन

पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनची पोलीस आयुक्त अमितेश. कुमार यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक — गुन्हेगारी प्रकरणांवर तात्काळ पोलिस मदतीचे आश्वासन

पुणे, 19 – पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त . अमितेश कुमार यांची आज अत्यंत फलदायी भेट घेतली.

असोसिएशनने शहरातील काही पेट्रोल पंपांवरील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत व सुरक्षा चिंतेबाबत चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेत फक्त पाच मिनिटांत समस्या सोडवण्याची दिशा दाखवली. त्यांनी गुन्हेगारीने बाधित पेट्रोल पंपांना तात्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

सीएनजीच्या कमतरतेमुळे काही पेट्रोल पंपांवर अत्यंत दबाव वाढला असून, प्रभावित पंपांची संपूर्ण यादी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहे.

या सकारात्मक प्रतिसादामुळे, असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अमानुल्ला खान यांनी तात्काळ प्रभावाने पंप बंद करण्याचा निर्णय मागे घेतला असल्याची माहिती देण्यात आली.

अली दारूवाला, प्रवक्ते, पुणे पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन म्हणाले:
“पोलीस आयुक्त अमित कुमार यांनी त्वरित प्रतिसाद देत आमची समस्या हाताळली. त्यांच्या आश्वासनामुळे पेट्रोल पंपाची सुरक्षा आणि कामकाज सुरळीत राहण्यास मोठी मदत मिळणार आहे.”

खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते- राजेंद्र पवार

अजिंक्यपद विजेत्या महावितरण पुणे-बारामती संघाचा श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते गुणगौरव

पुणे, दि. १९ नोव्हेंबर, २०२५- खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते तसेच खिलाडू वृत्ती जोपासली जाते. पुढे त्याचा फायदा वीज कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामे करताना होत असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाने अजिंक्यपद मिळविले होते. त्यानिमित्त विजेत्या संघाचा संचालक श्री. राजेंद्र पवार यांच्या हस्ते रास्तापेठ येथील कार्यालयात बुधवारी (दि. १९) गुणगौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन करताना श्री. राजेंद्र पवार म्हणाले, मागील काही वर्षांपासून महावितरणमधील खेळाचा दर्जा उंचावत चालला आहे. कंपनीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. या खेळाडुंना लागणाऱ्या सुविधा मध्ये देखील दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. नवीन भरतीमध्ये देखील अनेक खेळाडू कंपनीत आले आहेत. त्यामुळे पुढील काळात स्पर्धा अधिक वाढेल. यावर्षी ज्यांना बक्षिसे मिळाली नाहीत. त्यांनी अधिक मेहनत घेऊन पुढच्या स्पर्धेत मुसंडी मारावी. सोबतच अजिंक्यपद कायम पुणे-बारामती संघाकडेच राहील यासाठी प्रयत्न करावेत.

व्यासपीठावर प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, पुणेचे मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे, बारामतीचे मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंते श्री. ज्ञानदेव पडळकर, श्री. सिंहाजीराव गायकवाड, श्री. अनिल घोगरे व श्री. संजीव नेहते यांची उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले, खेळामुळे आयुष्याला एक शिस्त येते. हारणे, जिंकणे हा खेळाचा विषय आहे. पण प्रत्येकाने स्वत:च्या ‘फिटनेस’साठी खेळलेच पाहिजे. महावितरणमध्ये येत्या काळात खेळासाठी स्वतंत्र धोरण आणावे अशी आग्रही मागणीही श्री. खंदारे यांनी केली. तर खेळाडुंनी फक्त तयारी करावी, त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे व श्री. धर्मराज पेठकर यांनी दिली.

भारताच्या खो-खो संघाचा कर्णधार तथा महावितणचा खेळाडू प्रतिक वायकर, अजय चव्हाण व अनिता कुलकर्णी या खेळाडुंनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. पुणे-बारामती संघाच्या विजयासाठी प्रयत्न करणारे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे व श्री. श्रीकृष्ण वायदंडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.