Home Blog Page 39

औंध परिसरात पहाटे बिबट्या; नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन!

‘”नागरिकांनी आपली कुत्री मोकाळ्या ठिकाणी सोडू नयेत. पहाटे शौचास जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. आम्ही बिबट्यांचा शोध घेत आहोत.थर्मल ड्रोन’च्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात येत आहे.;मनोज बारबेले , वन परिक्षेत्र अधिकारी

पुणे:
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या दहशत वाढली असतानाच, आता शहरातही बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. औंध परिसरातील रहिवाशांना आज पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सकाळी नागरिकांनी ही माहिती देताच पुणे वन विभाग तातडीने सतर्क झाला. लगेच RESQ CT टीमसह संयुक्त पथक औंधमध्ये दाखल झाले. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू असून, पथके पूर्ण तयारीत आहेत. बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपकरणांसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४ नंतर बिबट्याचे कोणतेही दर्शन झालेले नाही. तरीही पथके रात्रीदेखील परिसरात शोध व देखरेख ठेवणार आहेत. कॅमेरे, ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले.

औंधसारख्या व्यस्त आणि दाट वस्तीच्या शहरभागात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून वनविभागाची कारवाई निर्णायक ठरणार आहे.
रविवारी पहाटे औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोध मोहीम राबवली. बिबट्या पहाटे चार’च्या सुमारास दिसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
त्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कुठेही बिबट्या दिसून आला नाही. परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

वन विभागाच्या वतीने रविवारी रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध, बाणेर, चतु: श्रुंगी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

“अपयश ही फक्त एक घटना असते, व्यक्ती कधीच अपयशी नसते”: खेर

#IFFIWood,SHARAD LONKAR 23 नोव्‍हेंबर 2025 

गोव्यातील पणजी इथल्या कला मंदिरात आजच्या पहिल्या मास्टरक्लासमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणातून शेकडो लोकांना पूर्णपणे गुंतवून ठेवले. ‘हार मानणे हा पर्याय नाही’ या विषयावरील सत्रात त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आणि विचारांनी उपस्थितांची मने जिंकली.

अनुपम खेर यांनी ‘सारांश’ चित्रपटातील मुख्य भूमिका गमावल्याचा आणि चित्रीकरणाच्या काही दिवस आधी ती पुन्हा मिळवल्याचा किस्सा सांगून सत्राची सुरुवात केली. या भूमिकेसाठी सहा महिने मनापासून तयारी केल्यानंतर, अचानक आलेला नकार त्यांच्यासाठी धक्कादायक होता. निराशेच्या गर्तेत असताना आणि मुंबईला कायमचा निरोप देण्याचा निश्चय केला असताना, ते दिग्दर्शक महेश भट्ट यांना शेवटचे भेटायला गेले. अनुपम खेर यांची तीव्र प्रतिक्रिया पाहून  भट्ट यांनी फेरविचार केला आणि त्यांना पुन्हा चित्रपटात घेतले. पुढे हा चित्रपट खेर यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला. या अनुभवावर भाष्य करताना, खेर यांनी सांगितले की ‘सारांश’ने त्यांना हार न मानण्याचा धडा शिकवला. तो धक्का म्हणजे त्यांच्या उदयाची केवळ सुरुवात होती, असे ते म्हणाले.

“माझी सर्व प्रेरणादायी भाषणे माझ्या जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत”

अनुपम खेर यांनी सत्रादरम्यान स्वतःच्या आयुष्यातील अनेक उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, 14 सदस्यांच्या एकत्र कुटुंबात आणि एका लहानशा कनिष्ठ-मध्यमवर्गीय घरात राहत असूनही, त्यांच्या आजोबांचा स्वभाव निवांत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनोखा होता. त्यांनी परिस्थिती प्रतिकूल असूनही आपल्या आनंदी बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची आजोबांची शिकवण उपस्थितांना सांगितली.

“अपयश ही फक्त एक घटना आहे, व्यक्ती कधीच अपयशी नसते”

अनुपम खेर यांनी आपल्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. त्यांचे वडील वन विभागात लिपिक होते, त्यांनी आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा घडवला हे त्यांनी सांगितले. 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात खेर यांचा 58 वा क्रमांक आल्याचे जेव्हा वडिलांना समजले, तेव्हाचा प्रसंग त्यांनी सांगितला. निकालामुळे नाराज होण्याऐवजी, त्यांचे वडील काही वेळ गप्प राहिले आणि म्हणाले, “जो मुलगा वर्गात किंवा खेळात प्रथम येतो, त्याच्यावर तो विक्रम कायम राखण्याचा दबाव असतो, कारण त्यापेक्षा कमी काहीही मिळाले तर ते अपयश वाटते. पण जो 58 वा आला आहे, त्याच्याकडे आपली स्थिती सुधारण्याची मोठी संधी आहे. म्हणून, माझ्यावर एक उपकार कर, पुढच्या वेळी 48 वा ये.”

“स्वतःच्या बायोपिकमध्ये मुख्य नायक बना”

संपूर्ण सत्रात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना आणि उदाहरणे देऊन उपस्थितांना त्यांचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी स्पष्ट केले की व्यक्तिमत्व म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वतःसोबत निवांत असणे. त्यांनी प्रेक्षकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि त्यांच्या स्वतःच्या बायोपिकमधील मध्यवर्ती पात्र बनण्याचे वारंवार आवाहन केले. त्यांनी प्रश्न केला, “आयुष्य सोपे किंवा सरळ का असावे? आयुष्यात समस्या का असू नयेत? कारण तुमच्या समस्याच तुमच्या बायोपिकला सुपरस्टार बायोपिक बनवतील.”

या आनंदी ‘वन-मॅन शो’ने प्रश्नोत्तराच्या सत्रातही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या समारोपाच्या उत्तरात ते म्हणाले, “‘हार मानणे हा पर्याय नाही’ हे केवळ एक वाक्य नाही. हे अविश्वसनीय कठोर परिश्रम आहेत. माझा विश्वास आहे की तुम्हाला काही हवे असेल, तर तुम्हाला त्याग करावा लागेल आणि चिकाटी ठेवण्यासाठी स्वतःला त्याचे महत्व पटवून द्यावे लागेल. तुम्हाला निराशा सहन करावी लागेल. पण जर तुम्ही हार मानली, तर मित्रांनो, तुमची गोष्ट तिथेच संपेल.”

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

इफ्फीमध्ये उलगडले ‘निलगिरीज’, ‘मु. पो. बॉम्बिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन चित्रपटांचे सिने विश्व


‘शिकार’चे कलाकार आणि चमूने जुबीन गर्ग यांचा केला गौरव, विविध देशांमध्ये केलेल्या प्रवासाची दिली माहिती

‘निलगिरीज’ चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्या संयमाच्या कथा; सह अस्तित्वाचे केले आवाहन

‘बोंबीलवाडी’च्या दिग्दर्शकांनी युद्धकालीन उपहासामागची जादू केली उघड

#IFFIWood,SHARAD LONKAR 23 नोव्‍हेंबर 2025 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( इफ्फी)आज एक आंतरसांस्कृतिक, आंतर श्रेणी संवाद रंगला. निलगिरीज: अ शेअर्ड वाईल्डरनेस’, ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन प्रभावशाली चित्रपटांचे कलाकार आणि चमूंने एकत्रितपणे पत्रकार परिषदेत संवाद साधला. आपल्या चित्रपटातील समृद्ध आणि वैविधतेने गुंफलेल्या  कथानकातील भावना, अंतर्दृष्टी, आणि मार्मिकता त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. 

‘शिकार’: एक आदरांजली, एक प्रवास आणि आसामचा  सिने अनुभव 

एका भावनिक वातावरणात या संवाद सत्राचा प्रारंभ झाला. सत्राच्या प्रारंभी ‘शिकार’ चित्रपटाचे दिग्दर्शक देबांगकर बोरगोहेन यांनी, अलिकडेच पावलेले चित्रपटाचे मुख्य अभिनेते आणि संगीतकार जुबीन गर्ग यांचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. आपण दोखांनी जवळजवळ दोन दशके एकत्र काम केल्याचे त्यांनी सांगितले. आपण सुरुवातीला जुबीन यांना केवळ संगीतासाठी संपर्क साधला होता. त्यांनी कथा ऐकली आणि चित्रपटात आपल्याला अभिनय करायची इच्छा व्यक्त केल्याची आठवण त्यांनी सांगितली. ते आपल्यात असताना प्रदर्शित झालेला हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे,  त्यांना जाऊन 64 दिवस झाले आहेत. आज ते येथे उपस्थित असते तर त्यांना आनंद झाला असता अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

देबांग यांनी ‘शिकार’ च्या रंजक निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितले. हा मोठ्या प्रमाणावर परदेशात चित्रित झालेला पहिला आसामी चित्रपट असून, जवळजवळ 70 टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या चमूमधील बहुतेक जण प्रवास करू शकले नसल्याने, दिग्दर्शकांनी गुवाहाटीतून दूरस्थपणे काम केले, अनेकदा शूटिंगसाठी लाइव्हस्ट्रीमिंगद्वारे मार्गदर्शन करताना ते मच्छरदाणीत असत, असे त्यांनी सांगितले. त्यावर सभागृहात हास्यकल्लोळ उमटला.

या चित्रपटाला इफ्फीत मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाचा उल्लेखही त्यांनी केला. शो हाऊसफुल असल्याचे, आणि देशाच्या विविध भागांतील लोक त्याचे कौतुक करत असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाल्याचे ते म्हणाले. आसामचे सामर्थ्य आणि प्रतिष्ठा दिसून येईल असे, आसामचे खरे चित्रण आपल्याला मांडायचे असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

ओटीटी व्यासपीठांवर प्रादेशिक चित्रपटांच्या दृश्यामानतेच्या समस्यांबद्दलही त्यांनी आपली मते मांडली. या व्यासपीठांममुळे चित्रपट जगभर पोहोचले असले, तरी ते अनेकदा प्रादेशिक चित्रपटांना फारसे महत्व देत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

‘निलगिरीस: अ शेअर्ड वाईल्डरनेस’ मध्ये जिवंत, दैवविविधतेचे  चित्रण

या संवाद सत्रात शिकार सिनेमाच्या चमूने उपस्थितांना भावनिक केले, तर ‘निलगिरीस – अ शेअर्ड वाईल्डरनेस’ च्या चमूने उपस्थितांना विस्मयचकीत व्हायला लावले. चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आदर्श एन सी यांनी अनेक अब्ज वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दुर्मीळ प्रजातींचे 8K आणि 12K गुणवत्तेत छायाचित्रीकरण करण्यासाठी दाखवलेल्या संयमाबद्दल उपस्थितांना सांगितले. वन्यजीव हेच या चित्रपटाचे खरे नायक आहेत, ते वेळेवर येत नाहीत, रिटेक नसतात, अशी गमतीशीर बाब त्यांनी नमूद केली. कधीकधी एकाच दृश्यासाठी तीनेक महिने लागू शकतात या वास्तवाची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, हा माहितीपट सहअस्तित्वाच्या संकल्पनेचाही शोध घेतो. आपल्या घरांच्या अंगणात असलेल्या वन्यजीवांशी आपण कसे जगतो, याची ही गोष्ट आहे. विविध प्रजाती अगदी शेजारी राहतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांच्या घरांपर्यंत पोहोचलो, असे ते म्हणाले.

पथकातील सदस्य  हर्ष यांनी अशा प्रकारच्या चित्रपट निर्मितीच्या अनिश्चिततेचे वर्णन करताना सांगितले की, आमच्या समोर काय चित्रित होणार आहे, याची आम्हाला पूर्वकल्पना नव्हती. प्राणी नेमके कुठे आहेत, हेही माहीत नव्हते. कॅमेऱ्यामागे वन्यजीवांच्या हालचालींबाबत सातत्याने माहिती देणारी मोठी संशोधन टीम आमच्यासोबत होती. हळूहळू आम्ही तयार करत असलेल्या कथानकाची दिशा स्पष्ट होत गेली.

जागतिक माहितीपट क्षेत्रातील मोठ्या संस्थांचा या चित्रपटावर काही प्रभाव पडला का?  असा प्रश्न विचारल्यावर स्पष्ट केले की,  ‘नीलगिरीज’ हा मेक-इन-इंडिया चित्रपट आहे. त्यात काम करणारा प्रत्येक जण भारतीय आहे. दरम्यान, हर्षा यांनीही त्यात भर घालत म्हणाले की, आम्ही जागतिक तंत्रज्ञान आणि कौशल्य यापासून शिकतो आणि ते भारतीय पद्धतीत आणतो. एक दिवस आपणच जागतिक उद्योगासाठी आदर्श ठरू, अशी आमची आशा आहे.

आदर्श यांनी पुढे सांगितले की OTT प्लॅटफॉर्मकडून चौकशी मोठ्या प्रमाणावर येत असली तरी ‘नीलगिरिज’ मोठ्या पडद्यावरच अनुभवावा, अशी पथकाची इच्छा आहे. “अनेक माहितीपट थिएटरपर्यंत पोहोचत नाहीत, पण ‘नीलगिरिज’ला चांगला प्रतिसाद मिळाला. OTT महत्त्वाचे आहे, पण नंतर,” असे त्यांनी नमूद केले.

आदर्श यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चौकशी मोठ्या प्रमाणात होत असली तरी ‘नीलगिरीज’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांनी अनुभवावा, अशी टीमची इच्छा आहे. ते म्हणाले, अनेक माहितीपटांना थिएटरपर्यंत पोहोचता येत नाही, परंतु ‘नीलगिरीज’ला मिळणार उत्तम प्रतिसाद पाहता, ओटीटी महत्त्वाचे आहेच, पण त्याची सध्या तरी वेळ नाही, असे त्यांनी सांगितले.

‘मुक्काम पोस्ट बॉम्बीलवाडी’ : विनोद आणि वसाहतीकालीन गोंधळ यांचा संगम

प्रसंगाला नवी उर्जा देत, ‘मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी’च्या टीमने विनोद आणि इतिहासाचे अप्रतिम मिश्रण सादर करून संपूर्ण सभागृह आनंदाने भरून टाकले. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भारत शितोळे यांनी आपल्या मूळ नाटकाला 1942च्या पार्श्वभूमीवरील चित्रपटात रूपांतरित करताना भेडसावलेल्या आव्हानांचे आणि मिळालेल्या आनंदाचे वर्णन केले की, महाराष्ट्रातील एक शांत खेडेगाव स्वातंत्र्यलढ्याच्या उंबरठ्यावर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या गोंधळात अडकते.

गंभीर विषयांमध्ये विनोद साधण्याविषयी बोलताना परेश यांनी नमूद केले, गरिबी सारख्या विषयांवर आधारित अनेक उत्तम विनोदी कलाकृती निर्माण झाल्या आहेत. विनोद सत्याला कधीच लपवून ठेवू शकत नाही, अनेकदा तोच सत्य अधिक प्रभावीपणे प्रकट करतो, असे त्यांनी सांगितले. ओटीटी प्रादेशिक चित्रपटांना कसे बदलत आहे, यावर बोलताना परेश म्हणाले की, प्रवास घरापासूनच सुरू होतो. प्रादेशिक सिनेमाने जागतिक स्तर गाठावा असे वाटत असेल तर स्थानिक प्रेक्षकांकडूनच त्याला आधी पाठिंबा मिळायला हवा. निर्माते भरत शितोळे यांनीही सहमती दर्शवत सांगितले की, ओटीटी मुळे संधी वाढल्या आहेत, परंतु प्रादेशिक चित्रपटांना या माध्यमांवर अजूनही पाहिजे तितके दाखवले जात नाही.

या पत्रकार परिषदेत भारताच्या चित्रपटसृष्टीचे बहुविध पैलू प्रभावीपणे उलगडले. नीलगिरींच्या स्वच्छ, निसर्गसमृद्धतेपर्यंत,  बॉम्बीलवाडीची उत्साही विनोद-नाट्यमय शैली; आणि जगभर पसरलेली आसामी जीवनातील भावस्पर्शी कथनशैली. प्रत्येक पथकाने प्रामाणिकपणा, आत्मीयता आणि सर्जनशील स्पष्टतेने संवाद साधत, ईफ्फीत  साजऱ्या होत असलेल्या मूल्यांचा सन्मान होत असल्याचे पुन्हा प्रकर्षाने सिध्द केले. येथे प्रत्येक कथा महत्त्वाची, प्रत्येक प्रदेशाची ओळख जपली जाते आणि प्रत्येक दिग्दर्शक आपले वेगळे जग घेऊन येतो.

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

स्वरमयी गुरुकुलतर्फे डॉ. रेवती कामत यांची गायन मैफल

पुणे : सुश्राव्य, सुमधुर गायन त्याला संयमित तबला वादनासह मोहक संवादिनीच्या सुरावटींची लाभलेली साथ अशा सांगीतिक मैफलीचा आनंद आज रसिकांना मिळाला. निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित डॉ. रेवती कामत यांच्या शास्त्रीय गायन मैफलीचे.

स्वरमयी गुरुकुल, संभाजी उद्यानासमोर येथे आज (दि. २३) या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. रेवती कामत यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग ललतमधील गुरू डॉ. अश्र्विनी भिडे-देशपांडे रचित ‘हो नंदलाल’ या विलंबित एक तालातील रचनेने केली. यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांचे सांगीतिक विचार मांडत डॉ. रेवती कामत यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची ‘नम जपत बार बार, हे गोपाल हे दयाल’ ही भक्तिभावपूर्ण बंदिश सुमधुरपणे सादर केली.

डॉ. कामत यांनी जौनपुरी राग सादर करताना दोन बंदिशी ऐकविल्या. यात झपतालातील ‘मानो जरा नित दिन’ तसेच ‘पायल बाजन लागी रे अब’ यांचा समावेश होता. ‘अब मोरी बात मान ले पिहरवा’ ही राग शुद्ध सारंगमधील बंदिश प्रभावीपणे सादर करून त्यांनी रसिकांना आनंदित केले.

मैफलीची सांगता भैरवीने करताना डॉ. रेवती कामत यांनी सुप्रसिद्ध ऐतिहासिक कवी, संगीतकार अमीर खुसरो यांनी रचलेल्या जीवनाचे वास्तव दर्शविणाऱ्या ‘बहुत रही बाबुल घर’ या रचनेतील अर्थपूर्णता प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविली.  

डॉ. रेवती कामत यांना भरत कामत (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), ओजस्वी वर्टीकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत स्वरमयी गुरुकुलचे सल्लागार भरत वेदपाठक यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी घोडके यांनी केले.

 “पुण्याने देशाला मोजके व कसलेले खेळाडू दिले” – राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

 एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे पुण्यात भव्य स्वागत

पुणे : तमिळनाडूमध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप २०२५ च्या ट्रॉफीचे आज पुण्यात अत्यंत भव्य स्वागत करतो, “मी या ट्रॉफीसह आलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो. तसेच ही वर्ल्ड कप ट्रॉफी भारतातच राहील, अशी मी मनापासून अपेक्षा करतो. पुण्याने  भारतीय हॉकीला नेहमीच गुणी दिग्गज आणि अनुभवसंपन्न खेळाडू दिले आहेत.यात धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव उज्ज्वल केले आहे,” असे विचार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर या वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफीचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षपदी कृष्ण प्रकाश (आयपीएस), अतिरिक्त पोलीस महासंचालक – फोर्स वन आणि अध्यक्ष हॉकी महाराष्ट्र) यांनी निभावले. यावेळी हॉकी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष मनोज भोरे आणि हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांनीही ट्रॉफीचे स्वागत केले. याशिवाय विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस (प्राचार्य – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, पुणे), सिस्टर लैला (प्राचार्या – सेंट एन्स हायस्कूल) आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले,
“पिल्ले परिवाराने जागतिक पातळीवर अनेक विक्रम नोंदवले आहेत. हॉकी क्षेत्रात पुण्याचे योगदान अतिशय मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातून आणखी धनराज पिल्ले आणि विक्रम पिल्ले यांच्यासारखे खेळाडू निर्माण होतील, अशी माझी अपेक्षा आहे. आज पुण्यातील दहा खेळाडू राष्ट्रीय निवड शिबिरात सहभागी आहेत, ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यातील खेळाडूंना आवश्यक ती मदत राज्य शासन आणि महाराष्ट्र संघटना नक्कीच देईल.”

“ हॉकी हा फक्त खेळ नाही, तर ध्यान व अनुशासनाचा संगम आहे” – कृष्ण प्रकाश

कार्यक्रमात बोलताना आयपीएस कृष्ण प्रकाश म्हणाले, “हॉकी ट्रॉफी टूरचा मुख्य उद्देश राष्ट्रीय खेळाचा प्रसार करणे आणि मेजर ध्यानचंद यांसारख्या महान खेळाडूंना आदरांजली वाहणे हा आहे. निरोगी शरीरातूनच निरोगी मनाची निर्मिती होते. म्हणून हॉकी हा केवळ खेळ नसून ध्यान, शिस्त आणि व्यायाम यांचा सुंदर संगम आहे.”

ते पुढे म्हणाले,“नेल्सन मंडेला यांनी खेळाच्या माध्यमातून पंथ, भाषा आणि वर्णभेद दूर करून राष्ट्राला एकत्र आणले. भारताची युवा शक्ती अपार आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी पदके जिंकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

या कार्यक्रमात विक्रम पिल्ले, रमेश पिल्ले, विकास पिल्ले, पूजा आनंद, वारिदा शेख, संजय शेट, मनीषा साखरे, फादर टायटस आणि सिस्टर लैला यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 पुण्यात ट्रॉफी टूरचा उत्साहात प्रवास – ट्रॉफी हैदराबादकडे रवाना

ट्रॉफी टूरची सुरुवात लोहेगाव येथील संत तुकाराम हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. येथे तीन शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
यानंतर ट्रॉफीचा काफिला खडकीतील एक्सेलसियर थिएटर चौकात दाखल झाला. येथून रॅली निघाली आणि राजघरना, सलाम जनरल स्टोअर, गांधी चौक मार्ग ओलांडत ती कर्नल भगत हायस्कूल येथे पोहोचली. रॅलीत स्थानिक युवक, प्रशिक्षक व ज्येष्ठ हॉकीपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यानंतर ट्रॉफीला सेंट व्हिन्सेंट हायस्कूल मैदानावर आणण्यात आले, जिथे भव्य स्वागत सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर ही ट्रॉफी पुढील प्रवासासाठी पुण्यातून हैदराबादकडे रवाना झाली.

विमाने कोसळली.. तशी भाजप’ची विश्वासार्हता भुईसपाट..

अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा.. मात्र  सरकारी संपत्तीच्या लुटीला राजकीय थारा..!
⁃काँग्रेस’ची प्रखर टिका
पुणे दि २३ – 
२०१४ मध्ये हाती आलेल्या व “आर्थिक महासत्ता होऊ घातलेल्या” भारत देशाची, दुर्दशा करून ही ‘स्वकर्तबगारीचा पुरुषार्थ’ सांगु शकत नसल्याने, भाजप नेते तथ्यहीन, दिशाभूल करणारी व बेजबाबदार वक्तव्ये करण्यात स्वतःला धन्य मानतात हे देशाचे दुर्दैव असुन, जनते सोबत प्रतारणा असल्याची घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस‘चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. 
ते पुढे म्हणाले की,  २६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांना जागीच पकडून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावणाऱ्या तत्कालीन “काँग्रेस सरकारने” अतिरेक्यांना पकडण्याच्या कारवाई पेक्षा ही ‘पाकिस्तान’ वर (?) हल्ला करण्याची, देवेंद्र फडणवीस अपेक्षा ठेवतात..! मात्र काँग्रेस सरकारने पकडलेले खतरनाक अतिरेकी मसूद अजहर सह चौघांना, केंद्रात भाजप (१९९९ – २००४) सत्तेत असतांना कंदहार विमानतळावर गुडघे टेकत सोडून दिल्याचे सोईस्कर विसरतात…!! 
पंतप्रधान मोदी, विना निमंत्रण पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफांच्या वाढदिवसा निमित्त ‘केक व बिर्याणी’ खायला जातात. 
लाहोर बस यात्रा काढणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजीं च्या नंतर नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवानी हे केवळ भाजप नेतेच् पाकिस्तान ला गेल्याचा इतिहास साक्ष आहे..! 
मात्र काँग्रेस कालावधीत एकही नेता आगंतुक पणे पाकिस्तान ला गेल्याची घटना इतिहासात नाही. 
अमेरिकेचे अध्यक्ष ड्रोनाल्ऱ्ड ट्रंम्प च्या हातचे बाहुले बनणाऱ्यांनी व त्यांच्या इशाऱ्यावर पाकिस्तानवरील कारवाई थांबवणाऱे भाजप नेते काँग्रेस’ला उपदेशाचे डोस देऊन स्वतःचे हसे करून घेत आहेत. 
उरी, पठाणकोट, पुलवामा, पहेलगाम व दिल्ली’त आलेले अतिरेकी व प्रचंड प्रमाणात वारंवार आलेली हजारो किलो आरडीएक्स स्फोटकांचा सुगावा का लागला नाही (?) आपली सुरक्षा यंत्रणा वारंवार का अपयशी ठरली (?) याचे उत्तर मात्र बेजबाबदार व कोडगेपणाने देत नाहीत, याचे ना ऊत्तरदायीत्व ना खेद ना खंत..!
आत्मनिर्भर”ची भाषा करणारे व करोडोंच्या सरकारी खर्चाने स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे भाजप’चे श्रेयजीवी नेते, दुबई’च्या एअर शो मध्ये नुकतेच अचानक कोसळलेले ‘तेजस फायटर विमान’ हे अमेरिकन इंजिन व फ्रान्स, ईस्राईल च्या पार्ट वर का बनवले गेले होते (?) याचे व या अनुषंगानेच संरक्षण दल प्रमुखांनी, भारतीय सैन्य सामग्री वेळेत मिळत नसल्याची, दुसऱ्यांदा केलेली जाहीर तक्रारी वर केंद्र सरकार व संबंधित मंत्री मुग गिळून का गप्प बसलेत (?) असा संतप्त सवाल ही वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. 
भ्रष्टाचार, सरकारी जमीन, महसूल व स्टँम्प ड्युटीच्या लूटीची प्रकरणे सत्ता टिकवण्याच्या स्वार्थासाठी दडपण्याची वृत्ती भाजप नेत्याच्या ठायी बोकाळत आहे. एका रात्रीत कॅसिनो मध्ये कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या महसुल मंत्री बावनकूळे काँग्रेसवर उथळ टीका करण्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, हीच त्यांची सत्तेसाठी भ्रष्टाचाराशी तडजोड करण्याची अगतिकता असल्याचे ही प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले..! 

पंडित चंद्रशेखर महाजन आणि पंडित रत्नाकर गोखले यांचे बहारदार सादरीकरण

गानवर्धन प्रस्तुत विशेष संगीत मैफल

पुणे : सकाळचे प्रसन्न वातावरण अधिक उत्साही करणाऱ्या राग जौनपुरी आणि राग भटियारमधील गायन – वादनाने रविवारी सकाळी रसिकांना सुरेल मेजवानी मिळाली आणि ‘गानवर्धन’ आयोजित स्वरसुमनांजली मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

गानवर्धन प्रस्तुत आणि रसरंग गुरुकुलाच्या साह्याने ज्येष्ठ गायक, गुरू, रचनाकार, लेखक कै. पंडित बबनराव हळदणकर  यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन – वादनाच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत रसिकांनी पं. हळदणकर यांचे शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांचे गायन तर पंडित रत्नाकर गोखले यांच्या व्हायोलीन वादनाचा आस्वाद घेतला. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात रविवारी सकाळी ही मैफल झाली.

गानवर्धन संस्थेतर्फे आयोजित स्वरसुमनांजली मैफलीची संकल्पना रसरंग गुरुकुलची होती. पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांनी राग जौनपुरीने सुरुवात केली. झुमरा तालात निबद्ध ‘ऐसो अब रंग धुलिया’ ही पारंपरिक रचना आणि त्याला जोडून मध्यलय त्रितालातील ‘तान पेहेले’ ही मनरंग यांची बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी उस्ताद विलायत हुसेन खाँ रचित राग कुकुभ बिलावलमधील ‘प्राणपिया तेरो रंगरूप छब देखत’ ही त्रितालातील बंदिश पेश केली. मोजक्या वेळात प्रभावी गायनाचा प्रत्यय त्यांनी दिला. त्यांना दत्तात्रेय भावे (तबला), ओजस रानडे (संवादिनी), मयूर कोळेकर (तानपुरा व स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

मैफलीच्या उत्तरार्धात आकाशवाणीवरील ज्येष्ठ व्हायोलीनवादक पंडित रत्नाकर गोखले यांचे वादन झाले. विदुषी माणिक वर्मा यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन म्हणून माणिकताईंनी लोकप्रिय केलेला राग भटियार त्यांनी प्रस्तुत केला. या रागात रूपक, त्रिताल आणि एकतालातील रचनांचे त्यांनी प्रत्ययकारी सादरीकरण केले. संगीत मानापमान नाटकातील ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’ हे नाट्यपद सादर करून, रागमाला पेश करत त्यांनी वादनाची सांगता केली. रागमालेचे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यामध्ये हिंडोल, भूप, बिलावल, शंकरा, देस, तिलककामोद, बसंत, श्री, मारवा, पूरिया, भैरव, गुजरी तोडी, मालकंस, भैरवी, जौनपुरी, सारंग आणि काफी अशा रागांचा समावेश होता. त्यांना आदित्य देशमुख यांनी तबल्याची पूरक साथ केली. अभिजीत पटाईत यांनी व्हायोलीनवर साथ केली.

याप्रसंगी हळदणकर कुटुंबीयांपैकी उषाताई हळदणकर, पुत्र गौतम हळदणकर उपस्थित होते. तसेच विवेक जोशी, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी, सविता हर्षे, सुधीर धर्माधिकारी उपस्थित होते. युवा होतकरू गायक विद्यार्थी तुषार गोरे याला ११ हजार रुपयांची शिष्यवृत्ती उषाताई हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तुषारने स्वरचित बंदिशीचे गायन करत शिष्यवृत्तीचा स्वीकार केला.

डॉ. विद्या गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद घोटकर स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाले, पंडित बबनराव हळदणकर हे उच्चविद्याविभूषित प्रतिभावंत गायक, गुरू तर होतेच, पण उत्तम रचनाकार होते. त्यांनी रसपिया या नावाने अनेक बंदिशी रचल्या. मोठा शिष्यपरिवार निर्माण केला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या मैफलीचे आयोजन करण्यात आले.

गौतम हळदणकर म्हणाले, बाबांमध्ये सर्जनशीलतेचे अनेक पैलू होते. बंदिशकार हा त्यापैकी एक पैलू होता. त्यांच्या रचनांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. ते उत्तम लेखकही होते. त्यांच्या पुस्तकांनाही पुरस्कार प्राप्त झाले.

घोरात्कष्टात स्तोत्र पठणातून शेकडो भक्तांचा दत्तचरणी मंत्रघोष

१२८ व्या दत्तजयंती उत्सवानिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन ; भारतासह विविध देशांत एकत्रित पठण

पुणे : गुरुदेव दत्त… श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुणे व जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक होत होता.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात १२८ व्या दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभानिमित्ताने करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जया तराणेकर, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, देविदास जोशी, हरी मुस्तीकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, शिरीष पाटुकले, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.

अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांचे  ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ७५ कमल पुष्पांचा हार, ७५ गुलाबपुष्पांचा गुच्छ देवून तसेच ७५ भगिनींनी त्यांना औक्षण केले. त्रिपदी परिवाराची गुरूपरंपरा दर्शविणारे गुरु श्री दत्तात्रेय, प. पू. टेंबे स्वामी, श्री नाना महाराज आणि श्री बाबा महाराज यांचे एकत्रित भव्य छायाचित्र देण्यात आले. करुणा त्रिपदी आणि श्री दत्त प्रतिकारण स्तोत्र या पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

शरदशास्त्री जोशी म्हणाले, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे मानवतेची गाथा आहेत. त्यांच्या स्तोत्राचा सामूहिक पाठ केला त्यामुळे त्यांचेही स्मरण यावेळी झाले आहे, असे त्यांनी सांगितले.  प. पू. बाबा महाराज तराणेकर म्हणाले, दत्त संप्रदायाची मंदिरे देशभरात आहेत. परंतु श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे दत्त जयंतीची सुरुवात  लोकमंगलवर्धक घोरात्कष्टातच्या सहस्त्र आवर्तनाने होते. ही परंपरा अन्यत्र कोठेही नाही. घोरात्कष्टातचे स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची ही दैवी चिकित्सा आहे.

अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, ट्रस्टचा १२८ वा दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमाद्वारे सुरु झाला आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी या उपक्रमाला प्रारंभ झाला होता. अवघ्या २० ते २५ साधकांसह सुरु झालेला स्तोत्र पठणाचा कार्यक्रम आज महाराष्ट्रासह भारतातील विविध  शहरातील शाखांत व ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटन यांसह विविध देशात देखील हे पठण ऑनलाइन पद्धतीने झाले. घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव असतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले.

त्रिपदी परिवार पुणे शाखेचे तेजस व भाग्यश्री तराणेकर, हरी मुस्तीकर, श्रीरंग लोंढे, सुभाष कुलकर्णी यांनी आयोजनात सहकार्य केले. विश्वस्त डॉ. पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. युवराज गाडवे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

स्वच्छतादूत अंजली माने यांचा सन्मान 

सदाशिव पेठेत कचराकुंडी मध्ये सापडलेले रुपये दहा लाख प्रामाणिकपणे परत केलेल्या तेथील स्वच्छतादूत अंजली माने यांचा ट्रस्ट तर्फे सन्मानचिन्ह व महावस्त्र देवून विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

सखी प्रेरणा मंचाच्या श्री हरिद्रामार्चन पूजेची विश्वविक्रमाला गवसणी

जेजुरी: सखी प्रेरणा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती तसेच धार्मिक यात्रा शनिवारी श्री क्षेत्र मल्हारगड, जेजुरी येथे अत्यंत भक्तिभावात संपन्न पडली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात, भंडारा खोबऱ्याची उधळण करत आणि धूप–दीपांनी सजलेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. वडगावशेरी मतदारसंघातील तब्बल ५ हजार महिला या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या.

सखी प्रेरणा मंचाच्या उपक्रम मालिकेतील तिसरे पुष्प म्हणून संपूर्ण उपक्रम “महिलांनी महिलांसाठी” या स्वरूपात राबवण्यात आला. पूजेची तयारी, प्रवासाची आखणी, मंदिरावरील व्यवस्था, प्रसाद अशा प्रत्येक गोष्टी महिलांनी स्वतः सांभाळल्याने हा उपक्रम स्त्रीशक्तीच्या संघटनशक्तीचे उत्तम उदाहरण ठरला. या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून आयोजकांसाठी तसेच सहभागी महिलांसाठी ही बाब अभिमानाची आहे.

श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती करताना महिलांनी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला. मल्हारी मार्तंडाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात भंडारा उधळून भक्तिभाव व्यक्त करण्यात आला.

यावेळी सखी प्रेरणा मंचाच्या संस्थापक अध्यक्षा ऐश्वर्या सुरेंद्र पठारे म्हणाल्या, “स्त्री ही संस्कृतीची वाहक आहे. तिच्या मनात श्रद्धा दृढ झाली की घरापासून समाजापर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मल्हारी मार्तंडाच्या चरणी अर्पण केलेले हे तिसरे पुष्प महिलांच्या भक्तिभावाचे, स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारे ठरले आहे. उपक्रमाची विश्वविक्रमात झालेली नोंद आम्हा सर्व महिलांचा सन्मानच आहे.” या पूजेसाठी डॉ. राजेंद्र खेडकर आणि सौ. मनिषा खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांचे मनःपूर्वक आभार.

श्री क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्तांचे तसेच श्री क्षेत्र केतकावळे येथील श्री बालाजींचे दर्शनही यावेळी घेण्यात आले.

“श्रद्धा, संस्कृती, परंपरा, अध्यात्म आणि स्त्रीशक्ती यांचा संगम असलेल्या या उपक्रमाने ऊर्जा मिळाली आहे”, असे मत सहभागी महिलांनी व्यक्त करत सखी प्रेरणा मंचाचे आभार मानले.

सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून या पुढेही महिलांसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.

मतदार यादीतील दुबार नावे वगळा,अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतील सुमारे ३ लाख मतदारांची दुबार नोंदली गेलेली नावे मतदार यादीतून त्वरित वगळावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने न्यायालयात जावू, असा इशारा माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिकेला दिला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. मतदारांची एकूण संख्या ३५लाख४१हजार४६९ आहे. त्यात ३लाख४४६ नावे दुबार आहेत. ही दुबार नावे आलीच कशी? कोण अधिकारी यासाठी जबाबदार आहेत? याची चौकशी व्हायला हवी. येत्या ५ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी दुबार नावे वगळली जावीत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मतदार यादी जाहीर करताना प्रशासनाने आठ दिवसांची मुदत वाढवून घेतली होती. तरी हा घोळ झाला कसा? असा सवाल जोशी यांनी केला आहे.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्र, हरियाणा येथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुका व्होट चोरी, दुबार मतदान अशामुळे वादग्रस्त झाल्या आहेत. मतदार वगळण्याचेही प्रकार झाले आहेत. या कारणांनी निवडणुकीतील निकालाबाबत मतदारांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका पारदर्शी वातावरणात व्हायला हव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यादृष्टीने यादी तयार करताना भौगोलिक हद्दीचे घोळ मिटविणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळणे ही कामे व्हायला हवीत, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना करताना भाजपच्या नेत्यांनी हस्तक्षेप केले, असे आक्षेप आहेतच. निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा गैरवापर करून भाजप कोणत्याही थराला जावू शकतो, असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे.

अजरामर गीतांनी रंगली ‘मनात रुजलेली गाणी’ मैफलवंचित विकास संस्थेतर्फे आयोजन; सुरेल सफरीत हरवले पुणेकर रसिक

पुणे : ‘या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’, ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘या व्याकुळ संध्या समयी’, ‘तेथे कर माझे जुळती’, ‘गगन सदन’, ‘मन रानात गेलं ग’, ‘मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात’ अशा मनात घर करून राहिलेल्या अजरामर गाण्यांची संगीत मैफल रसिकांनी अनुभवली. ‘रसिका तुझ्याचसाठी’ या गीताने सुरु झालेल्या या मैफलीची सांगता ‘जरा विसावू या वळणावर’ गाण्याने झाली.

निमित्त होते, वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मनात रुजलेली गाणी’ या संगीत मैफलीचे! स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात सुवर्णकाळातील मराठी गीतांची सुरेल मैफल गुंजली. संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि रसिक श्रोते एकत्र येऊन संस्थेच्या कार्याची ओळख करून घेणे आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश होता.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, वसंत प्रभू आदींची मनात खोलवर रुजलेली अजरामर गाणी रंगली. सुधांशु नाईक, आरती परांजपे आणि चैत्राली अभ्यंकर यांनी भावपूर्ण गायनाच्या जोरावर रसिकांना संगीताच्या जादुई प्रवासात नेले. प्रत्येक गाण्याला अनुरूप असे चित्रांकन आणि ओघवते निवेदन यामुळे सादरीकरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता.

याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाह संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. समाजातील विविध स्तरांतील घटकांना स्वाभिमानी व सन्माननीय आयुष्य जगता यावे, या उद्देशाने विलास चाफेकर यांनी वंचित विकास संस्थेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी, परित्यक्त्या, देहविक्रय करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुले, तसेच आरोग्य क्षेत्रातील अनेक उपक्रम संस्था राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले. लहान मुलांसाठी ‘निर्मळ रानवारा’ मासिक तसेच मुलांसाठी ‘निहार’ या निवासी संकुलासारखे प्रकल्प संस्थेच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे असल्याचे संचालिका सुनीताताई जोगळेकर यांनी सांगितले.

संगीताच्या सुरांनी भारलेल्या या मैफलीत एकत्र आलेल्या रसिकांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांबद्दल उत्सुकता आणि प्रशंसा व्यक्त केली. ‘मनात रुजलेली गाणी’ ही मैफल सूर, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरली.

“आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील”; श्रद्धांजली सभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत

पुणे : स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत

सभेचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. आनंद करंदीकर यांच्यासोबतच्या अनेक दशकांच्या सहवासाच्या आठवणी अत्यंत भावपूर्ण शब्दांत व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “१८ तारखेला मला ‘आनंद गेले’ ही बातमी समजताच अनेक वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या नेत्रदान-देहदानाचे संकल्प प्रत्यक्षात कसे उतरवावेत याच विचाराने मन भरून आले.”

आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “१९७६ मध्ये आम्ही साधेपणात, सामाजिक बांधिलकी जपत विवाह केला. फक्त ५० जणांच्या उपस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतला.”

१९८१ मध्ये युवक क्रांती दलातील संघर्ष, रोजगार हमी योजना, सावकारीमुक्ती, जनआंदोलन आणि गरीबांसाठीच्या लढ्यात आम्ही दोघेही समर्पितपणे उभे राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली. “कोणत्याही सामाजिक लढ्यात ‘तू नक्की जा’ असे प्रोत्साहन मला आनंद सतत देत असे. आणीबाणीच्या काळात आमचे घर कार्यकर्त्यांसाठी सदैव खुले होते,” असे त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक आठवणही सामायिक केली. त्या म्हणाल्या, “मी सहा महिन्यांची गर्भवती असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात आम्हा दोघांना अटक झाली. कस्टडीत मला त्या अवस्थेत पाहून आनंदने माझ्यासाठी कविता लिहिली होती.”

शेवटी त्यांनी डॉ. करंदीकर यांच्या सामाजिक कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांच्या विचारांची परंपरा सदैव जिवंत राहील,” असे सांगितले.

सभेत मान्यवरांचे मनोगत आणि आठवणी

मुक्ता करंदीकर यांनी वडिलांच्या आठवणी सांगताना अनेक भावनिक क्षण शेअर केले. सत्यजीत गोर्हे-परळीकर, विचारवेध संस्थेचे अध्यक्ष अनिकेत माळी आणि जागृती संस्थेच्या अनिता पवार यांनी त्यांच्या सोबतचा सहवास, सामाजिक कामातील तळमळ आणि प्रेरणादायी अनुभव सांगितले.
आनंद करंदीकर यांची भाची अमृता काळे यांनी दिवंगत मामासाठी पाठवलेले मनोगत वाचून दाखवले.
दिवंगत डॉ.आनंद यांची भाची अमृता हिने तिच्या लाडक्या नंदू मामाबद्दल भावना व्यक्त केल्या. आनंद करंदीकरांचे भगिनी जयश्री काळे यांनी त्या वाचुन दाखविल्या .अमृताने लिहीले की नंदू मामा आणि तिचे आजोबा विंदा करंदीकर यांच्यात बुद्धिबळाचे खेळ रंगत असत आणि त्यातून त्यांच्या बौद्धिकतेचे दर्शन घडत असे. आयुष्याच्या चढ-उतारात नंदू मामाचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे ठरले आहे.

डॉ.आनंद करंदीकर यांचे कनिष्ठ भाऊ उदय करंदीकर यांनी आठवण सांगितली की बेडेकर चाळीत कॉलरा आणि टायफॉईडची साथ असताना इंजेक्शनची भीती दूर करणारा आनंद दादा नेहमी पुढाकार घ्यायचा. मोठ्या कंपनीत नोकरी करताना रोज मला टाटा करूनच निघत असे. नंतर समाजकार्य करण्यासाठी त्याने उच्च पगाराची नोकरी सोडली तेव्हाही इतरांचा विचार प्रथम ठेवणारा तो माणूस होता.

उमेश वाघ (अखिल जनवडी मंडळ, गोखलेनगर) यांनी जातीअंताच्या कार्यात डॉ. करंदीकर यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली. जागृती सेवा संस्थेच्या मंगलाताई पाटील यांनी त्यांच्या सहृदय, दातृत्वपूर्ण स्वभावाचा उल्लेख केला. नगरसेवक आदित्य माळवी यांनी जातीअंत कार्यक्रमांदरम्यान झालेल्या परिचयाच्या आठवणी मांडल्या.

परभणीचे भूषण भुजबळ यांनी २०१९ च्या विचारवेध कार्यक्रमातील भेट, नांदेड विभागीय संमेलनातील त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव आणि त्यांच्या प्रेमळ, सहज वागणुकीचा उल्लेख केला. लॉकडाऊन काळात मानसिक आरोग्यावर डॉ. करंदीकर यांनी केलेल्या ऑनलाइन मार्गदर्शनाचीही दखल घेण्यात आली.

स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या शोभा कोठारी त्यांच्या समांतर चाललेल्या सामाजिक चळवळीतील योगदानाचे स्मरण केले. डॉ. करंदीकर यांच्या व्याख्यानमालेवर आधारित पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.

कृषी विकास तज्ञ नरेंद्र हेगडे यांनी १९८० पासूनच्या सहवासाच्या आठवणी सांगताना म्हटले, “आनंद करंदीकर हे नावाप्रमाणेच आनंदी, निर्व्याज आणि शेतकऱ्यांविषयी अपार ममत्व बाळगणारे होते.”

विचारवेध कार्यकर्ती त्रिवेणी यांनी सामाजिक विषयांवरील त्यांच्या तर्कशुद्ध चर्चा आणि व्यक्तिगत पातळीवरील प्रेरणेचा उल्लेख केला. “माझा आंतरजातीय विवाह हा त्यांच्या विचारप्रेरणेनेच शक्य झाला,” असे त्यांनी सांगितले.

समारोप

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी डॉ. आनंद करंदीकर यांच्या सामाजिक कर्तृत्वाला, निष्ठेला आणि विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समाजातील समानता, संवेदना आणि परिवर्तनाच्या मूल्यांना त्यांच्या कार्याने सदैव दिशा दिली असल्याचे मत एकमुखाने व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास ईॅडसर्चचे डॅा. अशोक जोशी, डॅा. शैलेश गुजर, जेहलम जोशी , चंद्रशेखर वैद्य , शमसुद्दीन तांबोळी, अस्लम शेख, सुदर्शना त्रिगुणाईत, नितीन पवार , संदिप शिंदे, केदार पाठक, योगेश केसकर, डॅा.मुग्धा केसकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या , पोलिसांनी तपासात कसूर करू नये

मुंबई–पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आले आहेत. यामुळे प्रकरण अधिकच चिघळले असून पोलिस तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः पंकजा मुंडे यांनी निवेदन जारी करत या घटनेबाबत दुख: व्यक्त केले असून, कोणतीही कसूर न करता सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

मुंडे म्हणाल्या की, घटनादिवशी संध्याकाळी त्यांचे पीए अनंत गर्जे अत्यंत आक्रोशाने फोनवर बोलले आणि पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. हा धक्का स्वतःलाही बसल्याचे त्या म्हणाल्या. गौरी गर्जे यांच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक कोनातून तपास करावा, असे आवाहन करताना ही घटना मन सुन्न करणारी आणि अतिशय वेदनादायक असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या वरळी परिसरात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र गौरी यांच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू आत्महत्या नसून संशयास्पद असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना राजकीय स्तरावरही चांगलीच गाजत असून या मृत्यूमागील सत्य काय, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी गौरी पालवे गर्जे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र त्यावेळी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या गौरी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्रीपासूनच वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसून कडक कारवाईची मागणी केली. कुटुंबीयांचा आरोप असा की, गौरीची वाढती मानसिक घालमेल, तणाव आणि विवाहित जीवनातील समस्या यांमुळे त्या त्रस्त होत्या. त्यांच्या मते, ही साधी आत्महत्या नाही तर संशयास्पद मृत्यू असून यामागे घरातील छळ आणि वादांचे धागेदोरे आहेत. अखेर रविवारी सकाळी पोलिसांनी अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

या प्रकरणात राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने ही घटना थेट राजकीय वर्तुळात पोहोचली. विविध पक्षांकडून आणि सामाजिक संस्थांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे. गौरी आणि अनंत गर्जे यांचे लग्न अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नाचा कालावधी कमी असूनही गौरी यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असावे? यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस कुटुंबीयांची चौकशी करून दोन्ही बाजूंचे निवेदन घेत आहेत. अनंत गर्जे घटनेच्या वेळी घरी नव्हते, असा दावा करीत आहेत; परंतु पोलिसांच्या तपासात या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणावर स्वतः पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अनंत गर्जे यांनी रडत फोन करून पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. ही घटना मला धक्का देणारी होती. पोलिसांनी कोणतीही कसूर न करता योग्य तपास करावा, अशी माझी विनंती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाले की, गौरीचे वडील अतिशय दुःखात आहेत, त्यांची वेदना मला समजू शकते. अशा घटना कोणालाही अस्वस्थ करून जातात. एखाद्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत असते, हे बाहेरच्या लोकांना कधीच पूर्णपणे कळत नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने मी स्वतःही हादरून गेले आहे.

या प्रकरणावरील पुढील कार्यवाही आता पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. शवविच्छेदन अहवाल, कॉल रेकॉर्ड्स, घरातील परिस्थिती आणि दोन्ही कुटुंबीयांच्या विधानांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. तिन्ही आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला असून आवश्यकता भासल्यास अटकही केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सूचित केले आहे. दरम्यान, गौरी यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या या घटनेचा अंतिम निकाल तपासात काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही आत्महत्या नाही, गौरी गर्जे यांच्या मामांचे मोठे विधान; म्हणाले- गौरी लढाऊ मुलगी होती, ती आत्महत्या करूच शकत नाही

0

मुंबई-मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असतानाच हा प्रकार घडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या कुटुंबाने अनंतवर गंभीर आरोपही केले आहेत.गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात तिच्या मामांनी गंभीर आरोप केले असून, गौरी कधीच आत्महत्या करणारी मुलगी नव्हती; ती लढाऊ, मजबूत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारी होती, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते आणि ते गौरीला सतत मानसिक त्रास देत होते, असा दावा करत मामांनी गौरीचा मृत्यू हा आत्महत्या नसून संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. अनंत गर्जे यांनी स्वतःच्या हातावर वार करून मीही मरेन आणि तुला अडकवेन, अशी धमकी दिल्याचेही मामांचे म्हणणे आहे.

मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. भाजप नेत्या आणि सामाजिक न्यायमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. केईएम रुग्णालयात दंतवैद्यक विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या गौरी गर्जे या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घरातील वाढते वाद, अनंत गर्जे यांचे कथित अनैतिक संबंध आणि पतीचा त्रास या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून चौकशीला सुरुवात केली आहे. अनंत गर्जे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या त्यांच्या डोळ्यांसमोर घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, ते तिला थांबवण्यासाठी पुढे का सरसावले नाहीत, हा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे घरातून निघून गेले असून ते सध्या फरार आहेत, अशी माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. त्यामुळे संशय अधिकच गडद होत असून, त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नसून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणात गौरी गर्जे पालवे यांच्या मामांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन महिन्यांपासून अनंत आणि गौरी यांच्यात सतत वाद सुरू होते. गौरीला अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यानंतरही तिने संसार टिकवण्यासाठी त्याला माफ केले. परंतु, अनंत गर्जे यांनी त्या महिलेशी चॅटिंग करणे थांबवले नाही. याच कारणावरून घरात अनेकदा भांडणं व्हायची. एवढेच नव्हे, एकदा झालेल्या वादात अनंत यांनी स्वतःच्या हातावर वार करून मीही मरेन आणि तुला देखील त्यात अडकवेन, अशी धमकी दिल्याचेही मामांनी सांगितले. त्यांच्या मते, गौरी ही लढाऊ आणि मानसिकदृष्ट्या मजबूत मुलगी होती; ती कधी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास; पवार व ठाकरेंचा पक्षही फोडला.

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर २०२५

काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. यावेळी खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, सुरेंद्र घोडसकर, तिरुपती पाटील कोंढेकर, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, भारतीताई पवार, रेखाताई चव्हान, तौसिफ इनामदार, आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत विकासाची शिखरे काँग्रेस सरकारने गाठली. पण २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजपाने काय दिले, तर फक्त खोटी आश्वासने दिली. नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्तपन्न दुप्पट करणार हे सर्व हवेतच विरून गेले. नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी व अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे..

काँग्रेस पक्षाने भोकरला खूप काही दिले. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण भोकरला आल्यावर मात्र… नाम बडे और दर्शन खोटे, अशी परिस्थिती होती, अशा लोकांचा इतिहास विसरू नका. भोकरचे ते डरपोक लोक मोदींच्या कळपात जाऊन बसले, ‘जो डर गया ओ मर गया’, त्यांनी गद्दारी केली, पळून गेले आता शेठ, सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे जाणते नेतृत्व आहेत, त्यांनी राज्याच्या विकासासाठी, समाजकारणासाठी आपली हयात खर्ची घातली, वैचारिक मतभेद असू शकतात पण आज सत्ताधारी पक्ष त्यांना त्रास देत आहे, ते अशोभनीय आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. पूर्वी पोरं चोरणारी टोळी होती आता भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, याचा धिक्कार करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.