Home Blog Page 386

६ एप्रिलला भाजपा स्थापनादिनी नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची होणार घोषणा

नवी दिल्ली – भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आहेत ती म्हणजे शिवराज सिंग चौहान, भुपेंद्र यादव , मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातल्या एका नेत्याचं म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरच्या निवडणुका होणं बाकी आहेत. त्या राज्यात सुरु झाल्या की भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येईल. विविध कारणं समोर येत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड का लांबते आहे याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं होतं. दरम्यान निवडणुकीत भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. साधारण वर्षभरापूर्वी विनोद तावडेंचंही नाव चर्चेत होतं. दरम्यान आता नवे चार चेहरे चर्चेत आहेत. त्यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार की भाजपा धक्कातंत्राचा वापर करुन अनेपक्षित नाव समोर आणणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतात पेट्रोलचे दर .. कमी होणार कि वाढणार ?

मुंबई-: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या कच्च्या तेलावरून मोठी धमकी दिली आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने ट्रम्प संतापले आहेत.एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील रक्तपात थांबवला नाही, तर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 25 ते 50 टक्के सेकंडरी टॅरिफ लादला जाईल.ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत, पण आता ट्रम्प यांचा हा आक्रमक पवित्रा सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. या धमकीचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी 30 टक्क्यांहून अधिक तेल रशियाकडून घेतो.शियन तेल स्वस्त असल्याने गेल्या काही वर्षांत भारताने ही खरेदी वाढवली आहे. पण आता ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जर रशियन तेलाचा जागतिक बाजारपेठेतील पुरवठा कमी झाला तर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त होऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल 73 डॉलर प्रति बॅरलवर आहे, पण या संकटामुळे किंमती झपाट्याने वाढू शकतात.

भारतात याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होईल. देशात आधीच अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे संकट दीर्घकाळ चालले, तर पेट्रोल 125 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचू शकते.यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. अमेरिकेने यापूर्वीच व्हेनेझुएलावर निर्बंध लादले आहेत, तर इराणी तेलावरही बंदी घातली आहे. खाडी देशांचा पुरवठा कमी होत असताना भारतासमोर पर्याय शोधणे कठीण होईल.ट्रम्प यांची ही धमकी कितपत प्रत्यक्षात येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण त्यांनी यापूर्वी टॅरिफबाबत घेतलेले निर्णय पाहता ही बाब गांभीर्याने घ्यावी लागेल. भारत सरकार आता काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी 14 मार्च 2024 रोजी पेट्रोल- डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केल्या होत्या. यापूर्वी 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते, ज्यामुळे पेट्रोलच्या किमती 13 रुपयांनी आणि डिझेलच्या किमती 16 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तथापि, तेव्हापासून सरकारने कोणताही मोठा निर्णय घेतला नाही. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना इंधनाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

पुणे कॉंग्रेसबाबत योग्य अहवाल देण्याची जबाबदारी सतेज पाटलांवर.

रमेश बागवे,मोहन जोशी, अभय छाजेड,संजय बालगुडे यांच्यावरही वेगवेगळी जबाबदारी

मुंबई-कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरात काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या जिल्ह्यात काँग्रेसची नक्की परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी ही सतेज पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येत्या काही काळात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे.दरम्यान पुण्यातील प्रमुख चार नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जुन्या विश्वासू सहकाऱ्यांवरच विश्वास दाखवला आहे. यामध्ये माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर परभणी जिल्ह्याची,माजी विधानपरिषद सदस्य मोहन जोशींवर सोलापूर,तर अभय छाजेड यांच्यावर लातूर तर संजय बालगुडे यांच्यावर कोल्हापूर बाबतचा योग्य अहवाल देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमून त्या जिल्ह्यात काँग्रेसची नक्की परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात या निरीक्षकांनी पक्षाला सोपवायचा आहे. यामध्ये हे निरीक्षक ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद, गटबाजी, निवडणूक जिंकण्याची क्षमता या सगळ्या बाबींवर हा अहवाल असणार आहे. हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल, नंतर शहर, जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत.

कामगाराच्या होरपळून मृत्यु प्रकरणी धनकवडीतील सायबा अमृततुल्यच्या मालकावर गुन्हा दाखल

पुणे- धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकातील चहाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यु झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सायबा अमृततुल्य (Saiba Amruttulya) हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.केशव श्रीमंत जाधव Keshav Shrimant Jadhav (वय २८, रा. भिंताडे अपार्टमेंट, शेलार मळा, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे. या आगीत संतोष श्रीसेन हेगडे (वय २६), याचा मृत्यु झाला होता.याबाबत प्रसाद कृष्णहरी केंची (वय ३०, रा. मानसरोवर अपार्टमेंट, आनंदनगर, सुखसागर नगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे.

सायबा हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आगीची वर्दी मिळताच कात्रज व गंगाधाम अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आतमध्ये एक कामगार अडकला असल्याची माहिती मिळताच जवानांनी पाण्याचा मारा करुन जखमी अवस्थेत या कामगाराला बाहेर काढले. या आगीची झळ शेजारील फिर्यादीच्या क्लेझंट होम डेकोर दुकान व कपड्यांच्या दुकानाला पोहचून त्यात त्यांच्या दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले.

सायबा अमृततुल्य या चहाच्या दुकानात दुध तापवत असताना वायू गळती झालेल्या सिलेंडरमुळे ही आग लागली. त्यावेळी संतोष हेगडे या कामगाराला बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यु झाला. अमृततुल्यमध्ये एकूण ८ सिलेंडर होते. त्यापैकी ३ सिलेंडरमधून वायुगळती झाल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत निष्पन्न झाले. अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. दुकानात कोणतीही सुरक्षाविषयक उपाय योजनाची काळजी न घेतल्याने पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करीत आहेत.

ओला-उबेरला “आमचा ऑटोचा, पर्याय : बाबा कांबळे

  • प्रायोगिक तत्‍वावर उपक्रमाची सुरूवात
  • पाच हजार रिक्षा चालक, एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार “आमचा ऑटो, ऐप मेट्रोसी जोडणार

पिंपरी- ओला-उबेर रिक्षा चालकांनी आता “आमचा ऑटोचा,पर्याय निर्माण केला आहे. प्रायोगिक तत्‍वावर याची सुरूवार केली आहे. भविष्यकाळात पाच हजार रिक्षा चालक आणि एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्‍यक्‍त केला.

पिंपरी येथे गुढीपाडव्‍यानिमित्‍त नुकतीच रिक्षा चालकांची बैठक पार पडली. या वेळी बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना योग्य, तत्‍पर सुविधा मिळावी म्‍हणून “आमचा ऑटो. ही सुविधा निर्माण करण्यात आल्याचे या वेळी बाबा कांबळे म्‍हणाले.

या वेळी. मेट्रोचे अधिकारी डॅनियल सर , महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे बाळासाहेब ढवळे लक्ष्मण शेलार, शुभम तांदळे, टेक्नॉलॉजी पटणार सूरज प्रताप सिंग, गैवर कुमार सिंग,आदी उपस्‍थित होते.

बाबा कांबळे म्‍हणाले की, केंद्र सरकार सहकारी तत्त्वावर ओला-उबेरसारखा प्लॅटफॉर्म तयार करू पाहत आहे. यासाठी आम्ही सज्ज असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्‍या घोषणेचे स्‍वागत आहे. यासाठी आम्ही सज्ज आहोत. सहकारी तत्वावर मोबाईल ॲप निर्मिती करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून यामध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड, पुणे येथील रिक्षा चालकांनी घेतला आहे. रिक्षा चालक-मालकांनी एकत्र येऊन, ओला, उबेरच्या धरतीवर स्वतःचा मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा आज केली याचा आनंद आहे. लवकरच या मोबाईल ॲप्‍लिकेशनचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्‍पुर्वी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील, पाच हजार रिक्षा चालक व एक लाख प्रवासी यांना या योजनेमध्ये जोडले जाणार आहे. यानंतर या ॲपचे अधिकृत उद्घाटन केले जाईल, असे बाबा कांबळे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे रवींद्र लंके,विनायक ढोबळे, अविनाश जोगदंड, सिद्धेश्वर सोनवणे, विशाल ससाणे, खालील मकानदार, पप्पू वाल्मिकी, अविनाश साळवे, पप्पू गवारे,दत्ता गिल्ले, बालाजी गायकवाड,साहेबराव काजळे, बबन काळे ,मुकेश सावंत, ज्ञानेश्वर भोसले ,गोविंदा आंधळे, गोरख कांबळे, संतोष पडघाम ,सोमनाथ जगताप,संतोष तामचीकर , दिपक उबाळे यांनी परिश्रम घेतले.

ओला उबेरपासून होणारी लुट थांबणार –
आमचा ऑटो यामुळे रिक्षा चालक मालकांना वैयक्‍तीक फायदा होणार आहे. सध्या ओला उबेर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक-मालकांची लुट करत आहे. कमिशन पोटी मोठी रक्‍कम वसूल करत आहे. आमचा ऑटो या ॲपमुळे हे थांबणार आहे. तसेच नागरिकांनाही त्‍वरीत सुविधा मिळणार आहे.

स्‍वतःचे ॲप्‍लिकेशन सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्‍यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील रिक्षा चालक – मालक यांनी पुढाकार घेतला आहे. आमचा ऑटो हे ॲप्‍लिकेशन प्रायोगिक तत्‍वावर बनविले आहे. त्‍यामधील तांत्रिक अडथळे दूर करून लवकरच त्‍याचे उद्धाटन केले जाईल. प्रवाशांच्‍या सोयीसाठी ते अंमलात आणले जाईल.

बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत.

भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे- येथील भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.त्यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण दिलीप नवले (रा. फ्लॅट नंबर ३०१, बी विंग, सन युनिव्हर्स सोसायटी, नवले ब्रिज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. करण नवले हा भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका राजश्री नवले यांचा मुलगा आहे.याबाबत २८ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी नुकताच (दि. १९ मार्च) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणीचा एक व्यवसाय असून ती आंबेगाव परिसरात राहण्यास आहे. करण नवले याची आणि पीडितेची २०२१ मध्ये एका जीममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटणे बोलणे सुरू होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले.दरम्यान, काही दिवसाने पीडितेने करणला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला करणचे इतर मुलींशी प्रेमसंबध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्याने तिला मारहाण केली. मारहाणीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घडलेला सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्यावर त्याच्या आईने ‘तू माझ्या मुलाचे वाटोळे केले आहे, तुझ्यापर्यंत पोहचायला मला पाच मिनिटे लागणार नाहीत, तू या परिसरात राहायचे नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील,’ अशी धमकी दिली.

त्यानंतर करणने पुन्हा पीडितेला गळ घालून ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे. थोडासा वेळ दे’ असं म्हणत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्याने घरचे आता लग्नासाठी ऐकणार नाहीत म्हणत तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतर २०२४ मध्ये तरुणी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर तिने याबाबत घरी सांगण्यास सांगितले. दरम्यान, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदीत त्यांनी लग्न केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

संघ ठरवणार मोदींचा वारसदार; तो बहुतेक महाराष्ट्रातला असणार! संजय राऊत यांचे सूचक विधान

मुंबई- सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 75 वर्ष पूर्ण करतील, आपल्या निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी त्यांना संघ कार्यालयाला भेट दिली असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.तसेच मोदींचा राजकीय वारसदार संघ ठरवणार आणि बहुतेक तो महाराष्ट्रातला असेल असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल नरेंद्र मोदींचही भाषण झालं. मोदी म्हणाले की संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. मोदींनी हा शोध कुठून लावला? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता याची त्यांनी माहिती घ्यावी. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे काय सांगा. 150 वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, भगत सिंह, सरदार पटेल, वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसंग्राम झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. त्यात संघ कधीच नव्हता आणि कुठेच नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवायचं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या लोकांची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंधभक्त, , भ्रमिष्ट, वेडे करताय. हा देश एक दिवस वेड्यांचा, खोटारड्यांचा देश म्हणून एखाद्या यादीमध्ये यायचा.

गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेत हे सगळं सहन करत आहेत
कुणाल कामराच्या जिवीताला धोका आहे. देवेंद्र फडणवीसांना चांगलं काम करायचं असेल. तर त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या लोकांनी कामराला ठार मारायची धमकी दिली असा माणूस मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? दुसरा कोणी असता तर त्याला पोलीस घेऊन गेले असते. आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल दुसरा कोणी असता तर त्याला मोका लावला असता. त्यांच्या मंत्रिमंडळात असे लोक आहेत त्यांनी कुणाल कामराला टायरवर उलटा टाकून मारणं, जिवंत कसा राहतो अशी भाषा करणं ही विधान तुमच्या मंत्रिमंडळातले लोक करत आहे. आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेत हे सगळं सहन करत आहेत.पुढच्या 15 दिवसांत नरकातला स्वर्ग या मराठी पुस्तकाचं प्रकाशन
माझ्या पुस्तकात आर्थर रोड तुरुंगातले अनुभव तर आहेच. पण त्या काळात त्या देशातलं वातावरण होतं. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यातले भाजपचे काही टुकार नेते, यांनी ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. तो प्रकार नेमका काय होता आणि त्या सगळ्याचं काय झालं? आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं, न्यायालयाने सुटका केली, या सर्वांवर अनुभव आहेत, तुरुंगात मी त्यावर काही टिपणं काढली, जो विचार केला त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं अनेक सहकाऱ्यांचं म्हणनं होतं. कारण संपादक, लेखक म्हणून मी सतत लिहित असतो. पण या विषयवार स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालं आहे, आणि साधारणतः पुढच्या 15 दिवसांत नरकातला स्वर्ग या मराठी पुस्तकाचं प्रकाशन होईल. हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होईल. हे सगळे अनुभव देशाच्या जनतेपर्यंत जावेत. माझ्या प्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले, साकेत गोखले साबरमती तुरुंगात होते, संजय सिंह, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आलं. कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या दबावाखाली झुकले नाहीत. पुस्तकांचा हेतू गौप्यस्फोट करणे नसतं. जेव्हा तुम्ही जीवनातले अनुभव कथन करता, त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणत नाहीत. जे घडलंय, जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जे ऐकलंय ते तुम्ही उतरवता ते सत्य कथन असतं, त्याला सत्याचे प्रयोग म्हणा फारतर.
दिल्ली आता दांडा घालतेय
आमच्या गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला. पण गुढी आमची कायम आहे, ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी हा दांडा पळवला त्यांना दिल्ली आता दांडा घालतेय तो बघा आता.

निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी संघाच्या कार्यालयात
मोदी यांची सप्टेबंरमध्ये निवृत्तीचा अर्ज देण्यासाठी ते संघाच्या कार्यालयात गेले होते. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 10-11 वर्षांत मोदी संघ मुख्यालयात गेले नाहीत. आता मोदी तिथे मोहन भागवतांना सांगायला गेले की टाटा बाय बाय मी जातोय. दोन गोष्टी आहेत संघाची ज्या मला समजल्या आहेत. एक मोहन भागवत आणि पूर्ण संघपरिवाराला देशाच्या नेतृत्वात बदल हवाय. मोदींची वेळ संपला आहे आणि देशात बदल हवाय. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आपल्या मर्जीने निवडू इच्छितो, त्यासाठी मोदी तिथे गेले होते. मोदीजी जाणार आहेत.

देशाचं नेतृत्व बदलावं लागेल
नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की ज्यांचे वय 75 झाले आहे त्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या त्यांच्या आणि संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. सप्टेंबर महिन्यात आपली वेळ आलेली आहे, त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी संघाची एक भूमिका आहे अशी बाब समोर आली आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी 10-11 वर्षात मोदींनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही. नड्डा यांनी तर 400 पार करण्यासाठी संघाची आम्हाला गरजच नाही असे विधान केले होते. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती मोदींचीच भूमिका असते.
झोला बहुत भरा हे उनका
राम, कृष्णही आले गेले. इश्वराचाही मृत्यू झाला. राम गेले, कृष्णही एका पारध्याच्या बाणाने इहलोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागली. देव असो वा मनुष्य. ते विष्णूचे अवतार आहेत, ते नॉनबायोलॉजिकल आहेत हे जरी खरं असलं तरी हिंदुस्थान हा नॉनबायोलॉजिकल नाही. हिंदुस्थानची 140 कोटी जनता ठरवते. तुम्ही त्यांना कितीही मुर्ख बनवायचं ठरवलं, तरीही तुम्ही जे एक धोरण ठरवलं आहे सहकाऱ्यांसाठी 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुहेत जावं लागेल. फकीर आदमी है, झोला लेकर आया था अब झोला भरकर जाएगा. झोला बहुत भरा हे उनका.

मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून
नरेंद्र मोदी यांचे वारस कोण असतील हे राष्ट्रीय स्वयंसेवक ठरवतील. म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, ही चर्चा बाहेर येत नाही. तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे. संघ पुढला नेता ठरवणार आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल.

पुण्यात संगीत आणि साहित्योत्सवाने होणार ग्रंथाली’च्या सुवर्ण महोत्सवाची सांगता


सांगीतिक मैफल व जन्मशताब्दी स्मृतिजागर
पुणे : ग्रंथाली वाचनप्रसार आणि संस्कृतिकारण करणारी संस्था सर्वदूर मराठी मुलाखत प्रसिद्ध आहे. 1974मध्ये आरंभ करत ग्रंथालीने अनेक साहित्यात्रा योजल्या. ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा…. यातील बर्‍याच यात्रांची सांगता पुण्यात झाली. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तकं ग्रंथालीने प्रसिद्ध केली. बहुजनांच्या दुःखाचा हुंकार त्यात होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक घडत होते. त्याचवेळी ग्रंथाली सामाजिक-सांस्कृतिक भान राखत जगण्याच्या सर्वांगांना भिडणार्‍या कलांचेही व्यासपीठ झाली.
गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ग्रंथालीने डिजिटल माध्यमातही आपली वाट चोखाळली आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नुकताच विलेपार्ले येथे जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ आणि विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचा स्मृतिजागर घडवला.
सुवर्ण महोत्सवाची सांगता करतानाही, शुक्रवार, 4 एप्रिल ते रविवार 6 एप्रिल 2025, असे तीन दिवस ग्रंथालीने भव्य संगीत आणि साहित्योत्सव योजला आहे. तो संवाद, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने होईल.
यामध्ये 4 एप्रिल रोजी, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सांगीतिक मैफल रंगणार आहेत. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, विदुषी अश्‍विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सांगता समारंभाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर लाइव्ह पोर्ट्रेट रेखाटन करणार आहेत.
जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य आणि व्यक्तित्व उलगडणारे कार्यक्रम शनिवार, 5 तारखेला ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होईल. तर रविवारी, 6 तारखेला सकाळी 10.30 ते 1 या वेळेत विद्याधर पुंडलीक यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम होईल. रामदास भटकळ, कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनात आखलेल्या या कार्यक्रमाच्या संहिता राजीव नाईक व मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिल्या आहेत. प्रत्येक साहित्यिकावर निर्मित लघुचित्रफीत त्यांचे जीवन व कार्य सांगेल. त्याचे लेखन संपादन राजीव जोशी यांनी केले आहे. यामध्ये अभिवाचन, पुस्तिका प्रकाशन, नाट्यप्रवेश असेल. मराठी रंगभूमी, सिनेमा-मालिकांतील ख्यातनाम कलावंत या साहित्याच्या आविष्कार आपल्या वाचिक अभिनयातून चित्रदर्शी साकार करतील. चंद्रकांत काळे, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, प्राजक्त देशमुख, ऐश्‍वर्या नारकर, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर-साटम, पुष्कर श्रोत्री, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, गौतमी देशपांडे, पूर्वा पवार, मोहित वैद्य, विशाख म्हामणकर आणि मोनिका गजेंद्रगडकर असे कलावंत यात सहभागी होत आहेत.
याचबरोबर या दोन्ही कार्यक्रमांत ग्रंथालीच्या 50 वर्षांतील उपक्रम व कार्यक्रमांचा आढावा ग्रंथालीचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. मृण्मयी भजक मांडतील. तसेच ग्रंथप्रदर्शन व सवलतीत विक्री होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. पुढील काही रांगा राखीव असतील. 4 तारखेच्या कार्यक्रमासाठी प्रवेशिका मिळण्यासाठी सुनील महाजन 9371010432 (संवाद, पुणे) आणि 5 व 6 तारखेच्या प्रवेशिकांसाठी राजेश देशमुख 8698580739 (सचिव, महाराष्ट्र कल्चरल सेंटर) आणि दोन्ही कार्यक्रमांसाठी आर्या करंगुटकर 9004949656 व धनश्री धारप 9223466860 या क्रमांकांवर संपर्क साधावा. प्रवेशिक दोन्ही थिएटरवर 1 एप्रिल 2025 पासून उपलब्ध असतील, असे ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप कळवतात.

ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारतीय नौदलाची जहाजे मदत सामग्रीसह रवाना

मुंबई-म्यानमार आणि थायलंडमध्ये 28 मार्च 2025 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर, भारत सरकारने म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमइए) निर्देशांनुसार, एकात्मिक संरक्षण स्टाफ मुख्यालय, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या सहकार्याने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) प्रयत्न सुरू आहेत.

एचएडीआर अंतर्गत भारतीय नौदलाच्या त्वरित प्रतिसादाचा भाग म्हणून, पूर्वी नौदल कमांड मधील सातपुडा आणि सावित्री ही भारतीय नौदलाची जहाजे 29 मार्च 2025 रोजी यंगून साठी रवाना झाली आहेत.  ही भारतीय नौदलाची आपत्कालीन मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (एचएडीआर) प्रतिसादाची तात्काळ कारवाई आहे.तसेच, अंदमान आणि निकोबार कमांड मधील भारतीय नौदलाची जहाजे कर्मुक आणि एलसीयू 52 देखील 30 मार्च 2025 रोजी यंगून कडे मदतकार्यासाठी रवाना होतील.

या जहाजांवर सुमारे 52 टन मदत सामग्री चढवण्यात आली

आहे, ज्यामध्ये आवश्यक कपडे, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि आपत्कालीन वस्तूंचा समावेश आहे. भारतीय नौदल हा या प्रदेशातील “पहिला प्रतिसादकर्ता” (फर्स्ट रिस्पॉन्डर) म्हणून कार्य करण्याच्या भारताच्या संकल्पनेप्रति पूर्णतः कटिबद्ध आहे.

संरक्षण मंत्रालयात पदवीधर, बारावी पाससाठी भरती; वयोमर्यादा 55 वर्षे आणि पगार 47,000 पर्यंत

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्मर्ड व्हेइकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) ने स्टोअर कीपर, असिस्टंट, टेक्निशियन आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट avnl.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरली जात आहे. उमेदवारांना फॉर्म ऑफलाइन भरावा लागेल.

रिक्त पदांची माहिती:

ज्युनिअर मॅनेजर एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग: ०१ जागा
डिप्लोमा टेक्निशियन (सीएनसी ऑपरेटर): ०१ जागा
डिप्लोमा टेक्निशियन टूल डिझाइन: ०२
सहाय्यक कायदेशीर: ०१
दुकाने/एमएम/खरेदी: २
ज्युनिअर मॅनेजर/मेकॅनिकल: ०१ जागा
स्टोअर कीपर: ०२ जागा
एकूण पदांची संख्या: १०
शैक्षणिक पात्रता:

ज्युनिअर मॅनेजर एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग-

पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
डिप्लोमा तंत्रज्ञ-

संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा
सहाय्यक कायदेशीर-

बीएसएल, एलएलबी
स्टोअर कीपर-

१२वी पास
वयोमर्यादा:

जास्तीत जास्त ५५ वर्षे
पगार:

दरमहा ₹३७,००० – ₹४७,०००
निवड प्रक्रिया:

स्क्रीनिंग चाचण्या
मुलाखत किंवा लेखी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता:

आर्म्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी

ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ-४२१५०२, ठाणे, महाराष्ट्र


राष्ट्रीय आरोग्य अभियानात बारावी उत्तीर्ण डॉक्टरांची भरती; वयोमर्यादा ४३ वर्षे, ७० हजारांपर्यंत पगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र मध्ये ९४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये ५०० कंडक्टर पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, वयोमर्यादा ४० वर्षे

राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने राजस्थान राज्य परिवहनमध्ये ५०० कंडक्टर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rssb.rajasthan.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

पाच हजार जलज्योतींनी केला 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प

जनसेवा न्यास, हडपसर आणि अमनोरा येस्स फाऊंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त महिलांची भव्य रॅली

पुणे : जनसेवा न्यास, हडपसरतर्फे अमनोरा येस्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महिला महोत्सवात सहभागी झालेल्या हडपसर परिसरातील सुमारे पाच हजार जलज्योतींनी येत्या वर्षभरात 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला. रॅलीत सहभागी झालेली प्रत्येक महिला एका कुटुंबाला पाण्याच्या बचतीसाठी उद्युक्त करणार आहे.

हडपसर परिसरातील माळवाडी, वैदुवाडी, रामटेकडी, ससाणे नगर, गोंधळे नगर/सातववाडी, फुरसुंगी/भेकराई नगर, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, अमनोरा, शेवाळवाडी, मुंढवा/मांजरी, कुमार पिकासो, उंड्री/पिसोळी, व्हिनस वर्ल्ड स्कूल, अमरसृष्टी तसेच अमनोरामधील महिलांची अस्पायर टॉवर्स आणि अवंतिकांची मेट्रो टॉवर्स समोरून अशा एकूण 17 ठिकाणांहून सायंकाळी महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. नऊवारी साडी या पारंपरिक वेशभूषेत महिला मराठमोळा फेटा बांधून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीची सांगता अमनोरा क्रिकेट ग्राउंड, एड्रिनो टॉवर समोर, अमनोरा, हडपसर येथे झाली. प्रयागराज येथील जलकलशाचे पूजन करून 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला. समारोपस्थळी दुचाकीद्वारे आलेल्या महिलांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्र सेविका समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंदाताई साठे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत, विश्वस्त भूषण तुपे, सी. ई. ओ. चेतन कुलकर्णी, अमनोरा येस्स फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, प्रविण पाताळे, महेश करपे यांची मंचावर प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. या वेळी जलज्योती संकल्पनेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून या गणेशोत्सवापासून पुढील गणेशोत्सवापर्यंत 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात महिला शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत त्याची साखळी निर्माण केल्यास 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल.

प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, आज उपस्थित नारीशक्तीचे दर्शन अत्यंत सकारात्मक असून प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास थांबविणे या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे.

चंदाताई साठे म्हणाल्या, मराठी नवीन वर्षाची सुरुवात पाणी बचतीच्या संकल्पाने होत आहे, ही आनंददायक बाब आहे. आज उपस्थित असलेल्या महिला शक्तीच्या बळावर ही संकल्पना नक्कीच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास वाटतो. वसुधैव कुटुंबकम्‌‍ आणि सर्वे भवन्तु सुखिन: या संस्कृतीची जपणूक भारतीय हिंदू परंपरा करत आहे. ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी आजच्या पिढीने तार्किक, ऐतिकहासिक, शास्त्रियदृष्ट्या सखोल अभ्यास करून त्यांच्यापर्यंत हिंदू संस्कृतीचे महत्व पोहोचविणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला आई-बहिण मानण्याची हिंदू संस्कृती घराघरात प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज आहे.

उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पत्नी आणि तिच्या मित्रासह 6 जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर- उपजिल्हाधिकारी असलेल्या आपल्या पतीचा खून मित्राच्या मदतीने करणारी पत्नी आणि तिच्या मित्रासह पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पत्नीने मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकाऱ्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके (५०, रा. जालाननगर) यांनी तक्रार दिली. पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या मित्राने केंब्रिज चौकात पिस्तूल रोखले, असा आरोप त्यांनी केला आहे. कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्र विनोद उबाळे (३८) आणि भाऊ आतिष देशमुख (४२) यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी २००० मध्ये सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झाला. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचे वर्तन बदलले. कटके यांच्याकडे स्कोडा कार (एमएच २१, एएक्स ०१०५) आहे. ती कार पत्नी वापरते.

सुरक्षेसाठी या कारला ‘जीपीएस’ यंत्रणा बसवली आहे. ३ मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचा जीपीएस अलर्ट कटके यांना आला. त्यांनी लगेचच गाडीचा पाठलाग सुरू केला. रात्री साडेआठ वाजता केंब्रिज चौकात ही कार दिसली. तेथे बाजूलाच दुसरी कार (एमएच २१ बीयू ८१११) उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचे कटके यांना माहिती होते. तेथेच उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखले. जातिवाचक बोलून ‘आडवा आलास तर उडवून टाकील,’ अशी धमकी दिली होती. तसेच घरी सारिकाने जातिवाचक शिवीगाळ केली. घरातील नोकरांसमोरच, ‘तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेत,’ असे बोलून अपमान केला. ‘काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल,’ अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सारिका, विनोद उबाळे, सारिकाची आई सुवर्णाबाई, भाऊ आतिष, मोलकरीण छायाबाई, संगीताबाई या सर्वांनी कट रचून कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली. फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

२०२१ मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरला. त्यामुळे जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली. शाळेचा संपूर्ण कारभार सारिका सांभाळायला लागली. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे याचे सद्गुरू सदानंद नावाचे हॉटेल होते. शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर तो घेत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली. तो मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांना २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

मशिदीच्या खिडकीतून येत पुरली स्फोटके,नंतर दोघे लपले मक्याच्या शेतात‎..मोबाइल लोकेशनवरुन अटक,५ दिवसांची‎ कोठडी

गेवराईमशिदीत जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवल्याची घटना ‎अर्धमसला (ता.गेवराई) गावात घडली. या घटनेनंतर दोन्ही ‎संशयित विजय गव्हाणे व अशोक तागडे हे दुचाकीने ३५‎किमीवरील शिंपेगाव येथे पळून गेले. शिंपेगाव हे संशयित‎गव्हाणेच्या मावशीचे गाव आहे. दोघे त्या गावात मावशीच्या‎मक्याच्या शेतात लपून बसले होते. गेवराई पोलिसांनी घटनेनंतर ३‎तासांतच रविवारी सकाळी ६ वाजता दोघांना शेतातून अटक‎ केली. दोघांनी स्फोटासाठी मशिदीच्या मागील खिडकीतून प्रवेश‎करत खड्डा खोदून जिलेटिन पुरले होते. मोबाइल लोकेशनवरून‎त्यांना पोलिसांनी पकडले.‎अर्धमसला येथील शेतकरी जना कांदे‎ यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु‎आहे. त्या कामावरून संशयित विजय‎ गव्हाणे याने जिलेटीनच्या कांड्या चोरून‎आणल्या होत्या. त्यांचा वापर‎स्फोटासाठी केला. दोघांना गेवराई‎ न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची‎ पोलिस कोठडी सुनावली आहे.‎

पोलिस अधीक्षक‎नवनीत काँवत, संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस‎ महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी अर्धमसला गावात जाऊन ‎व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा करत पाहणी केली.‎जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनीही गावात जाऊन माहिती ‎घेतली आहे. राशेदअली हुसेन सय्यद (६९) यांनी तलवाडा‎ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर भारतीय न्याय संहिता‎२०२३ अंतर्गत समाजात तेढ निर्माण करणे, कट रचणे,‎जातिवाचक शिवीगाळ, स्फोट घडवणे, धार्मिक भावना दुखावणे‎कलम २९८, २९९, १९६, ३२६(जी), ३५१(२), ३५२, ६१(२),‎३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मिनिटांत‎ पोलिसांना कळवले अर्धमसला गावातील माजी सरपंच‎ बाळासाहेब राऊत यांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली.‎घटनेनंतर गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎

या गुन्ह्यातील संशयित विजय‎ गव्हाणे याचे घर मशिदीपासून २००‎ मीटर अंतरावर आहे. घटनास्थळी‎ पोलिसांना एक टॉर्च , फरशीचे‎ तुकडे मिळाले. संशयिताने ‎मशिदीपासून वायर टाकून घरात‎ बसूनच स्फोट घडवला असावा‎ असा अंदाज आहे.‎

घटनेच्या निषेधार्थ गेवराई‎शहरातील शास्त्री चौकात‎शहर बंद करण्याचा निर्णय‎ घेतला होता, तर काही‎ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने‎बंद ठेवली होती. गेवराईचे‎आमदार विजयसिंह पंडित‎यांनी मध्यस्थी केली.‎तपासात हलगर्जीपणा ‎झाल्यास आंदोलन‎ करण्याचा इशारा त्यांनी‎दिला. त्यामुळे गेवराई शहर‎बंदचा निर्णय मागे घेण्यात‎आला. तर दुसरीकडे‎घटनेचा निषेध म्हणून ‎तलवाडा येथील व्यापारी ‎बांधवांनी दुकाने बंद ठेवली ‎होती. मात्र, आरोपींना अटक ‎होताच बाजारपेठ पुन्हा सुरू‎केली. व्यापाऱ्यांनी घटनेचा ‎निषेध नोंदवला.‎

शिवमणी च्या ‘पुष्पांजली’ ने ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवात नादब्रह्मची अनुभूती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४१ वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : ड्रम, डफ, घुंगरू, शंख यांसह विविध वाद्यांवर नाद उमटवित रसिकांना मंत्रमुग्ध करणारे वादन सादर करताना प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, रुना रिझवी शिवमणी, पंडित रविचारी व सहका-यांनी ‘पुष्पांजली’ स्वरमैफलीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. पुणेकरांनी हे वाद्यवादन प्रत्यक्ष अनुभवताना नादब्रह्माची अनुभूती घेतली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पदमश्री शिवमणी यांच्या हस्ते झाले.

यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपासिंग गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुष्पांजली कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. त्यापूर्वी बहारदार सनई वादनाने मैफलीचा प्रारंभ झाला. यावेळी प्रथम तुला वंदितो, तुज मागतो मी आता, बाप्पा मोरया रे., चिक मोत्याची माळ, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.. या गीतांचे स्वर सनई या पारंपरिक वाद्यातून रसिकांना ऐकायला मिळाले.

प्रास्ताविकात ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायासमोर ही संगीत सेवा रसिकांसाठी अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिली जात आहे. यंदा ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.

रसिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

धर्माच्या नावावर तुम्हाला देश नाही बांधता येत, हे तुर्की ना अगोदर समजले : राज ठाकरे….

धर्म घराच्या उंबरठ्याच्या आत सांभाळला पाहिजे:राज ठाकरे

महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित, मुंबईतील चार नद्या मारल्या – ठाकरे
महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थितीही बिकट आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यामध्ये सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, ढोरणा या नदीपात्रांमधील पाणी हे अत्यंत वाईट आहे. हा माझा रिपोर्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार मेल्या. म्हणजे त्या मारल्या. सांडपाणी, झोपडपट्टी यांमुळे त्या चार नद्या मेल्या. आता पाचवीही मिठी नदी मरायला आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
तर चीनची भिंत बांधली गेली असती
प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. ज्यावेळेला गंगेवरच्या या सगळ्या गोष्टी पाहत होतो, त्यावेळी मला कळेना हे कसे काय चालले. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले. म्हणजे अर्धा भारत आला का? असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याला आलेल्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केला. त्यातील 5 लाख आपण व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी पकडू. बाकीचे काठावरच बसले असतील. प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली, तर चीनची भिंत बांधता आली असती, असे राज ठाकरे म्हणाले.
देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे?
ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी रुपये खर्च झाले त्यावर. नुसते अग्नी दिल्यासारखे करतात आणि तसेच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? असा सवाल राज ठाकरे यांची केला. आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करायला नको का? असेही ते म्हणाले. काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सर्व विधी करण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक जण आजारी पडले – राज ठाकरे
निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे आणि शुभेच्छांचे अनेक फोन नेमके आजच आले. आज का आले? याचा अर्थ मला समजतो. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या? त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
त्यातील पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणले. मी ते पिण्यास नकार दिला. नव्याने वारे शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटले मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. जिला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्या नद्यांकडे आजचे राज्यकर्ते नाही, खूप वर्षांपासूनचे गंगा साफ करावी, असे बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून अजून गंगा साफ करत आहेत. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही गंगा साफ करणार असे सांगितले.
आपल्याकडील देशामधील नद्यांची अशी अवस्था आहे की, पाणी पिणे लांबची गोष्ट, तुम्ही अंघोळ करू शकत नाहीत. माझ्याकडे उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले की, कित्येक लाखो लोक इथे अंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. प्रश्न हा गंगेच्या, कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये. तर प्रश्न हा पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचे पाणी तिथे असते, होते. त्या गोष्टी अजूनही थांबवले जात नाही, असे राज ठाकरे म्हणाले. एका मिनिटासाठी गंगेची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी गंगा नदीचा एक व्हिडिओ दाखवला.
ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मते दिसली. त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून देखील ईव्हीएममध्ये त्यांची मते दिसली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून निशाणा साधला. निवडणुका कशा झाल्या? काय काय गोष्टी घडल्या? यावर माझे बोलून झालेले आहे. आता जे झाले ते झाले. आता यापुढचे बघायचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.