Home Blog Page 385

महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षण घेत आहेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू…

पुणे –

तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै.धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .सुट्ट्यांमुळे लहान मुले पोहण्यासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे जलतरण तलाव फुल होत आहेत.

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ तपन कुमार पाणिग्रही हे या ठिकाणी मुलांना दर्जेदार पद्धतीने होण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अत्यल्प फी मध्ये दर्जेदार पद्धतीने महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये मुलांना प्रशिक्षण लाभत असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे त्यामुळे उन्हापासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत लहान मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जलतरण तलावांवर येत आहेत. बच्चे कंपनी या जलतरण तलावावर सकाळपासूनच गर्दी करत आहेत.

बाणेर परिसरातील इतर जलतरण तलावांच्या मानाने महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर माफक दरामध्ये नागरिकांसाठी कोचिंग तसेच पोहण्याच्या तलावाची सोय उपलब्ध केली असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकाचे देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाणेर परिसरातील खाजगी जलतरण तलावांवर पोहणे शिकण्यासाठी पाच ते सात हजार फी आकारले जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना ही फी परवडत नाही परंतु महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवर अत्यंत कमी फी मध्ये कोचिंग उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील या ठिकाणी पोहण्यासाठी दर्जेदार कोचिंग मिळत आहे.

बाणेर येथील महानगरपालिकेच्या ताम्हाणे जलतरण तलावामध्ये मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असल्यामुळे परिसरातील नागरिक पोहण्यासाठी या जलतरण तलावाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच शॉवरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच पोहण्यासाठी पोहण्याचा ड्रेस कंपल्सरी करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेने अत्यंत अल्प दरामध्ये बाणेर परिसरामध्ये पोहोण्याचा तलाव नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत तसेच लहान मुलांबरोबरच पालक देखील या तलावामध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

स्वर मैफलीतून उलगडला रामनामाचा महिमा  

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवात प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांचे सुश्राव्य गायन ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे : संत एकनाथांची रचना असलेले आणि राम फाटक यांच्या संगीताने नटलेल्या ‘राम नाम ज्याचे मुखी’ या अभंग सादरीकरणाने प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांनी पुणेकरांची मने जिंकली. पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात सुरु असलेल्या २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात या स्वर मैफलीतून रामनामाचा महिमा उलगडला. 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांनी सुश्राव्य गायन सादर केले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. 

स्वर मैफलीचा प्रारंभ यमन रागातील बंदिशीने झाला. त्यानंतर हंसध्वनी रागातील सादरीकरणाने उपस्थित रसिक राम रंगात रंगून गेले. संत चोखामेळा यांच्या ‘आम्हा न कळे ज्ञान’ या अभंग सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. तर, जोहार मायबाप जोहार या अभंगाला उपस्थितांनी टाळ्यांनी साथ दिली. कबीरांच्या भजनाने मैफलीचा समारोप झाला. 

विशाल मोरे (तबला)  सौरव दांडेकर (हार्मोनियम) यांसह कीर्ती कुमठेकर, प्राची गोडबोले, स्वराली आलेगावकर यांनी साथसंगत केली. बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

६ ठिकाणी आगी; ६ लाख ग्राहकांना फटका:सुरळीत वीजपुरवठ्याला वीजयंत्रणे जवळील आगीचे ग्रहण

वीजयंत्रणे बाहेर टाकू नका , जाळू नका : महावितरण

पुणे, दि. ०१ एप्रिल २०२५ : एकी ग्रीष्मकालीन विजेची शक्ती शक्ती विजेची वीज वितरण चालू आहे. हे शहरी व ग्रामीण भागात असलेल्या महापारेषण व महावितरण वीजयंत्रणे बंद किंवा वीजतारां खाली, गवत व पेटवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दैनिकभरात आधारे पारे आणि विक्री वितरण सहा ठिकाणी बिघाड सामंजस्य समूह ६ लाख २३ हजार वीजग्राहक खंडित वीजपुरवट्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तर महावितरणला वीजपुरवठाही सहन करावा लागतो.

दरम्यान , शहरी व ग्रामीण विद्युत विजेचे उपकेंद्र, शेती तसेच घरे , सार्वजनिक ठिकाणी टाकण्याच्या ठिकाणी वीजयंत्रणे सुका आणि ओला कचरा कोतारणे किंवा वीज खाली, गवत किंवा कचऱ्यांच्या ढिगारा पेटव वीजयंत्रणेला निर्माण होत आहे . वीज वितरण खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. नागरिकांनी वीजयंत्रणेच्या जवळ वीजतारांमुक्त किंवा गवत टाकू नये किंवा त्याचा ढिगारा जाळू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण अनेक ठिकाणी महापारे व महावितरणच्या वीजेची शेती, जंगलातून गेलेल्या आहेत. महापारेषणाच्या टॉवर लाइन्स खाली (वीजतारांच्या तुमच्या) गेल्या २३ फेब्रुवारी ते २८ मार्चपर्यंत गवत, उस व जंगलातल्या वणव्याच्या आगीच्या आगीचे पाच प्रकार घडले आहेत. आपस चाकण, भोसरी व हिंजवडी फेज १ ते ३ मध्ये सर्व लहानमो उद्योग तसेच चिंचवड शहर वाकड, भोसरी गावी आदींसह अनेक गावे सुमारे ५ लाख ९६ सदस्य, औद्योगिक व इतर ग्राहक दोन ते तीन गट ४५ ते ६० मिनिट खंडित वीजपुरवत्याला फक्त जावे लागले आहे. तर पुणिनी नवले ब्रीज ओढल्या टाकलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना आगीने महावितरणच्या अमित उपकेंद्राला वीज देणारी वीजवाह जळाली. २७ हजार वीजग्राक नाहक सहन सहन करणे. या आग सर्वांत महावितरणचे देखील वीजक्रीयामध्ये नुकसान होते.

महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी रोहित्रांना संरक्षक जाळे , कंपाऊंड लावले आहे . अनेक कंपाऊंडमध्ये कचरा आणि शिळेपदार्थ टाकण्यात येत असल्याच्या ठिकाणी येत आहे . खाद्यपद विजय मांजर , उंदीर , घुसखोर , पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे वीजयंत्रणेच्या संपर्कात असलेल्या लोकवर विजेच्या उत्पन्नामुळे उत्पन्न खंडित होतो . प्राण्याचे नाहक जीव जाण्याचे प्रकार घडले आहेत.

नागरिकांनी सार्वजनिक वीजवाहिनी खाली तसेच रोहित, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणे स्थान ओलांडू नये. शांत झालेला कचरा जाळू नये . , वाढलेले तण, गवत, उस आगीची निर्मिती दृश्ये मध्ये ट्रिपिंग वीजेने वीज भाग खंड कचरा होतो. वीजयंत्रणा बंद करणे २४ तास सुरू आहेत महावितरणच्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा टोल फ्री नंबरवर माहिती द्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे .

राज्यात अनेक भागात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

गेवराईसह बीड तालुक्यात पडला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

मुंबई :सोमवारी बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार गेवराई शहर गढी, निपाणी जवळका व बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा, नवगण राजुरी, करचोंडी येथे अवकाळी पाऊस झाला आहे, तर शिरूर तालुक्यात वादळी वारे वाहिले.मुंबईत पुढील ३६ ते ४८ तासांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागात मुसळधार पाऊस कोसळेल.मुंबईत पावसाची शक्यता असल्याने मंगळवारी संपूर्ण दिवस वातावरण ढगाळ राहील. यामुळे मुंबईकरांना काहीसा उकाड्याचा सामना करावा लागेल.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विमागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. यामुळे कमाला तापमानात अधूनमधून घट होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.

१ एप्रिल रोजी सकाळच्या उपग्रह निरीक्षणावरून महाराष्ट्रात अंशतः ढगाळ आकाश असल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या कोणतेही गंभीर हवामान अपेक्षित नाही.असे IMD ने म्हटले आहे

मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर भागात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. पश्चिमी प्रकोपामुळे ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळीच्या वातावरणामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. तर काही भागात पूर्वी मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

कोकणात १ ते ४ एप्रिलदरम्यान पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकणच्या दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आदी भागांतही हलका पाऊस होणार आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यांतही चार-पाच दिवस पावसाळी स्थिती असणार आहे.

कुणाल कामराचे पोलिसांना उद्देशून ट्वीट:म्हणाला – 10 वर्षापासून जिथे राहत नाही, तेथे जाणे म्हणजे सरकारी यंत्रणांचा अपव्यय

मुंबई- मी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर म्हणजे माहिमला राहणाऱ्या आपल्या नातलगांच्या घरी जाणे म्हणजे सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे,अशी बोचरी टीका कॉमेडियन कुणाल कामराने केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मुंबईत आपल्या आई-वडिलांकडे चौकशी केल्याचं समजताच कुणाल कामरा याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की ज्या घरात मी १० वर्षांपासून राहत नाही, तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली.या सगळ्यासाठी पोलीस त्यांचा वेळ व यंत्रणा वाया घालवत आहेत.

कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी एका विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. या गाण्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर कुणाल कामरावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. याचदरम्यान, पोलिसांनी कुणाल कामराला दोनदा समन्स बजावले. मात्र, कुणाल एकदाही पोलिसांसमोर हजर झाला नाही. त्यामुळे आज पोलिस चौकशीसाठी कुणाल कामराच्या घरी गेले होते. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. यानंतर कुणालने पोलिसांना उद्देशून एक सोशल मीडिया पोस्ट केली.कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील तोडफोड केली होती. यावेळी कुणाल कामराविरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते. खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले होते परंतु, तो पोलिसांसमोर हजर झाला नाही.

दोन वेळा समन्स देऊनही कुणाल कामरा पोलिसांसमोर हजर न झाल्यामुळे आज अखेर खार पोलिसांचे एक पथक त्याच्या माहीम येथील घरी पोहोचले. त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचे कळवल्यानंतर पोलिसांना आल्या पावली परत जावे लागले. या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने पोलिसांना उद्देशून एक सूचक ट्वीट केले आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे, असे कुणालने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत: एक फोटो देखील टाकला आहे.पोलिसांनी दोनवेळा समन्स बजावूनही कुणाला कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही. आता कामरा हजर झाला नाही तर त्याला पोलिसांच्या वतीने तिसरे समन्स पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या माहिम पोलिसांची एक टीम कामरा यांच्या घरासमोर तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. जर मी मुंबईत परत गेलो, तर मुंबई पोलिस मला अटक करतील. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याचा धोका आहे, असे त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते.

कामराचे स्वागत आमच्या स्टाईलने करू – राहुल कनाल

कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. तसेच न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे.न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, तो दिलासा 7 एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं. कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असले, तरी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे, असे शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी म्हटले आहे.

कुणाल कामराच्या माहीमच्या घरी पोलीस अन शोमधील प्रेक्षकांनाही पोलिसांच्या नोटिसा

मुंबई-एकीकडे मुबीत शिवसेना शिंदे गटाचे काहीजण कामरा याचे स्वागत करू असा धमकीवजा इशारा देत असताना दुसरीकडे दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. म्खाहणून र पोलीस मुंबईतील माहिम येथील कुणाल कामरा याच्या वडिलांच्या घरी दाखल झाले. त्यांनी कुणाल कामराच्या पालकांकडे चौकशी केली. कुणालशी संपर्क झाला आहे का? तो मुंबईत येणार आहे का? चौकशीसाठी हजर होणार आहे का? असे प्रश्न पोलिसांनी कुणालच्या आई-वडिलांना विचारले.

कुणाल कामरा याने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो आयोजित केला होता. याच शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस या शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांवर निर्बंध; विधेयक रद्द करा : आप

जनसुरक्षा विधेयकामुळे सामान्य माणसाचा व संघटनांचा आवाज क्षीण होईल :आप

पुणे-सन 2024 च्या विधानसभेमध्ये मांडले दिलेले व्यक्ती व संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करणारे जन सुरक्षा विधेयक रद्द करावे अशी मागणी आम आदमी पार्टीने सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारने एक एप्रिल पर्यंत जनतेकडून याबाबत सूचना व आक्षेप मागविले होते. या विधेयकाद्वारे एखादी संघटना बेकायदेशीर ठरवणे तसेच एखादे बेकायदेशीर कारवायांसाठी वापरले जाणारे ठिकाण अधिसूचित करणे व बेकायदेशीर कृत्ये थांबवण्यासाठी नियम करण्याचा अधिकार शासनाकडे येणार आहे. निवडून आलेल्या बहुतेक सर्व लोकप्रतिनिधींवर मोर्चा काढणे, जमाव जमवणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे अशा पद्धतीचे किरकोळ स्वरूपाचे राजकीय गुन्हे असतातच परंतु आता या कायद्याचा गैरवापर करीत राजकीय विरोधकांचे हेच गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असे गंभीर स्वरूपाचे ठरवले जाऊ शकतात अशी भीती आहे. असे आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी असे म्हटले आहे कि,’या विधेयकात जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता यास धोका किंवा संकट निर्माण करेल असे कृत्य किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे, कर्मचारी वर्गात हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे अथवा सरकारी संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे तोंडी अथवा दृश्य स्वरूपातील कृत्य म्हणजे ‘बेकायदेशीर कृत्य ‘ अशी व्याख्या करण्यात आलेली आहे. तसेच बेकायदेशीर कृत्य करण्यात गुंतलेली व्यक्ति, गट मग त्याला नाव असो अथवा नसो त्याला ‘संघटना’ असे समजले जाणार असल्याने या ढोबळ आणि अस्पष्ट व्याख्यामुळे छोटी आंदोलने, सरकारी कार्यालयातील वादविवाद, अहिंसामार्गी निदर्शने,धरणे,मूक मोर्चा हे सुद्धा बेकायदेशीर कृत्य ठरू शकेल. या अंतर्गत गुन्हे हे दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यात आले असल्याने भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर व वैचारिक तात्विक विरोध करण्याच्या अधिकारावर बंधने येतील, अधिकाराचा गैरवापर होईल असा आम आदमी पार्टीचा दावा आहे. आम आदमी पार्टी तसेच पक्ष पदाधिकारी यांनी राज्यभरातून यासंदर्भात सरकारकडे लेखी आक्षेप नोंदवले आहेत. या विधेयकामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होतील म्हणून हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली आहे.

होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला जीवे मारण्याची दिली सुपारी

पुणे- होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील सुपारी दिलेली तरुणी ही सध्या फरार आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडेचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र, मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आलाय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती.

मयुरी दांगडेला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी देऊन ही घटना घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. .कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत

आजपासून घर,गाडी खरेदी करणे झाले आणखी महाग….

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने वसुली चे धोरण अन त्यामुळे महागाई

मुंबई- घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आजपासून नव्या रेडीरेकनर दरांमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडाच्या वाहनांच्या किमती वाढल्या आहेत,मारुती सुझुकीच्या गाड्या ४% पर्यंत महागल्या आहेत, हे मॉडेलनुसार बदलू शकते. रेडिरेकनरच्या दरात पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढे राहणार आहेत.पुण्यात सरासरी ४.१६ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील घरांच्या किमतीही वाढणार आहेत. कोरेगाव पार्क, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरातील घरांना जास्त मागणी असते. त्यामुळे या भागातील रेडिरेकनरच्या दरातही वाढ होणार आहेपिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. या महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक कंपन्या, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे यामुळे या भागातील सदनिकांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही पिंपरी-चिंचवडमधील रेडिरेकनरच्या दरावर दिसून आला आहे. त्यामुळे पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली आहे.महिलांसाठी सरकारकडून चालवली जाणारी विशेष गुंतवणूक योजना ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) बंद करण्यात आली आहे. या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ होती. या योजनेत ७.५% वार्षिक व्याज देण्यात आले. यामध्ये, किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक २ वर्षांसाठी करावी लागणार होती.आज म्हणजेच १ एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये आणि डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह इतर योजनांमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने, राज्य सरकारने चालू बाजारमूल्य दरांत (रेडीरेकनर) घसघशीत वाढ केली आहे. मुंबईत ३.३९ टक्के, ठाण्यात ७.७२ टक्के आणि राज्यात सरासरी ४.३९ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १०.१७ टक्के वाढ झाली असून नवे दर आज, मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत.

कोथरुड मधील रस्ते, पाणी प्रश्नी मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक

वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करा!

महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन चर्चा- ना. पाटील

पुणे- कोथरूड मधील रस्ते, पाणी प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच, पुढील आठवड्यात सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग कढण्याबाबत आश्वस्त केले.

कोथरुड मधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी प्रमुख विषयासंदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे मालमत्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप, भवन विभागाचे युवराज देशमुख, महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, विलास भालेराव यांच्या सह भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला कोथरुड मतदारसंघातील पाणीपुरवठ्यातील अडचणींची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि सोसायटी भागात समान पाणीपुरवठा व्हावा; यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोथरुड मधील वस्ती भाग हा अनेक ठिकाणी चढावर वसलेला असल्याने; उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना मर्यादा येत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. यामध्ये प्रामुख्याने सुतारदरा, किष्किंधा नगर केळेवाडी भागावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले, त्यावर उपाय म्हणून लोकसहभागातून वस्ती भागाच्या सुरुवातीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देऊ; सदर टाक्यांमध्ये महापालिकेने पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

याशिवाय कोथरुड मधील विकास आराखड्यातील रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये परांजपे शाळेसमोरील डीपी रस्त्यामधील एक रहिवासी न्यायालयात गेल्याने, सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची बाब पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असल्याने महापालिकेने न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, अशी सूचना केली. याशिवाय चांदणी चौकातील मुख्य महामार्गालगत एकलव्य महाविद्यालय येथून जाणाऱ्या १५ मीटरच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच, हा प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी सदर भागातील अतिक्रमणे हटवावित. त्यासोबतच रस्त्याचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची सातत्याने नाट्यगृहाची मागणी होत आहे. त्याशिवाय कोथरुड मध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह तथा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर सविस्तर अध्ययन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, या विषयांसह मतदारसंघातील इतर समस्यांसंदर्भात वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल तयार करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी बैठकीत दिले. सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे यावेळी आश्वास्त केले.

सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाचं संरक्षण द्या:कष्टकरी जनतेचे 50 हजार कोटी लटकले -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : सहकारी बँका आणि पतसंस्थामधील ठेवीदारांना १५ लाखापर्यंतच्या रकमेचे संरक्षण मिळावे यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

दि.31/03/2025 पर्यंत बुडालेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत या मागणीकरिता
एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज सोमवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी बारा वाजता श्री गणरायाची महाआरती करण्यात आली .

गेल्या काही वर्षापासून देशातील 40 बँका बुडत आहे तर महाराष्ट्रात 2008 पतसंस्था बुडाल्या आहेत यामध्ये देशातील कष्टकरी जनतेचे जवळपास 50 हजार कोटीच्या आसपास रक्कम अडकून आहे. आज पर्यंत बँकेतील खातेदारांना पाच लाखापर्यंत असलेली रक्कम मिळाली आहे तर पाच लाखांवरील असलेली रक्कम व पतसंस्थेमध्ये अडकलेल्या कष्टकरी नागरिकांच्या रकमेतील एकही रुपया आज पर्यंत मिळाला नाही तरी ज्या कष्टकरी नागरिकांचे पाच लाखापुढील रक्कम ही बँकेमध्ये अडकून आहे तसेच पतसंस्थेमध्ये अडकून असलेली रक्कम कष्टकरी जनतेला लवकरात लवकर मिळावी ही रक्कम देण्यास बँक व पतसंस्था सक्षम नसतील तर बँकेतील व पतसंस्थेतील संचालकांची मिळकत तात्काळ जप्त करून तिचा लिलाव करून यातून आलेली रक्कम तात्काळ कष्टकरी खातेदारांना मिळावी अशी प्रार्थना उपस्थित असलेल्या सर्वांनी श्री गणराया चरणी मागणी केली.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले, महाराष्ट्राचे नेते व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी बँका बळकट करण्यासाठी सतत प्रयत्न केले पण केंद्र सरकारने नवीन निर्माण केलेले सहकार खाते व या खात्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे व भारतीय जनता पक्षाचे धोरण हे सहकाराविरोधात आहे.देशातील सहकारी बँका बुडाल्या आणि त्या बँकेत अडकलेले सर्वसामान्य जनतेचे पैसे बुडाले तरी सरकारला फिकीर नाही. उलट मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे या पद्धतीने धोरण राबवत आहेत.

मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी सांगितले , .2013 ला पुण्यातील रुपी बँकेला आरबीआय ने निर्बंध टाकले आणि ती आता बुडाली आहे यामध्ये पुण्यातील अनेक कष्टकरी नागरिकांचे पाच लाखाहून अधिक रक्कम असलेले पैसे अडकलेले आहे
.
या महाआरतीला माजी आमदार मोहन जोशी,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर,वैभव दिघे, चेतन अग्रवाल,मंडळाच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष ॲड.सुमंगल वाघ,उपाध्यक्ष किशोरी कचरे,मंडळाचे खजिनदार सुरेश निंबाळकर,उपाध्यक्ष संतोष बाहेती,दीपक शेडगे,राजू मोतीवाले,सेक्रेटरी हिमाली सडेकर,भारती घारे,रमेश खोपडे,आशिष वेलणकर,उदय लेले अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा थाटात साजरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात आयोजन

पुणे : शुभमंगल सावधान चे मंगल सूर…श्री वल्लभेश महाराज की जय चा जयघोष… अक्षता व फुलांची उधळण आणि ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण… अशा भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी १० वाजून ५४ मि. श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला. भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम , त्यामुळे या सोहळा अनुभविण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांसह राजाभाऊ घोडके व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गौरी पालेशा आणि मयूर पालेशा यांनी लग्नसोहळ्याच्या धार्मिक विधीत सहभाग घेतला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले.

सभामंडपात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम! बहुस्याम! अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिने युक्त असणा-या भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे. त्यामुळे हा सोहळा मंदिरात थाटात साजरा झाला.

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७५ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव

पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती… झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… सिंधी गीतांची बहारदार मैफल… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे ‘लाल झुले लाल झुले लाल झुलेलाल’ हे अखंड भजन अशा भावभक्तीमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले.

सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७५ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, प्रियांशी कर्वाणी, रीतिका सुंदरानी, अमान सुंदरानी यांच्यासह १७ गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिम्फनी बँड, सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्टने उपस्थितांची मने जिंकली. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे आकर्षक नृत्यकलेचे सादरीकरण झाले. प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील चार-साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले.

मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला, जय पिंजानी आदी उपस्थित होते.

अशोक वासवानी म्हणाले, “सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३८ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.”

रामायणाची महती मोठी असून तो  जीवनग्रंथ:ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीमत् रामायण प्रवचन

पुणे : प्रभू श्रीराम यांचा आदर्श अवतार आहे. श्रीराम चरित्र हे आचरण्याकरिता आणि भगवान श्रीकृष्ण चरित्रातून बोध घ्यायला हवा. रामायण हे प्रमाण असून तो आद्यग्रंथ आहे. आजच्या काळात रामायणाची महती मोठी असून रामायण हा जीवनग्रंथ असल्याचे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांनी व्यक्त केले. 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने डॉ. नामजोशी यांचे श्रीमत् रामायणावर प्रवचन सुरु आहे. 

डॉ. कल्याणी नामजोशी म्हणाल्या, सनातन धर्म हा अक्षय असून अनादी काळापासून चालत आलेला आहे. यापूर्वी आपण हिंदू म्हणून मर्यादित केले होते. आता हिंदू आहोत यावर मर्यादित न राहता, सनातन हिंदू धर्म असे म्हटले जाते. हिंदू धर्म हा वेदाधिष्टीत आहे. प्रभू श्रीरामांचे चरित्र आदर्शवत असून जीवन व्यवहारात उपयुक्त असे आहे. 

भरत तुळशीबागवाले म्हणाले, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही:2029 चे PM म्हणून लोक मोदींकडेच पाहतात, मोदींचा उत्तराधिकारी वक्तव्यावर फडणविसांचे भाष्य

अजित पवारांनी यावरून धडा घ्यावा: शरद पवार गटाचा टोमणा

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती आहे, असे ते म्हणालेत.दरम्यान यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी तातडीने यावर ,’ अजित पवारांनी ‘वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही’ या फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ समजून घ्यावा असे टोमणे मारायला सुरुवात केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानमुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरेच वर्षे काम करणार आहेत. त्यांच्याकडे आमच्या सर्वांचा आग्रह आहे. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे 2029 चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. वडील जिवंत असताना मुले असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे. त्यामुळे आत्ता कुणाचाही व कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्यामुळे ती अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सदर कबर एएसआय संरक्षित आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्न नाही. या कबरीला कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी संरक्षण मिळाले आहे. त्यामु्ळे या प्रकरणी कायद्याने तिचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. पण हे मात्र निश्चित आहे की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही औरंगजेबाच्या कबरीने ग्लोरिफिकेशन अर्थात उदात्तीकरण होऊ देणार नाही.

नव्या शिक्षण पद्धतीवरून सोनिया गांधींवर निशाणा

सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे शिक्षणाचे जातीयीकरण होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, माझ्या मते शिक्षणाचे जातीयीकरण नव्हे तर भारतीयीकरण होत आहे. इंग्रजांनी ज्या शिक्षणाचे ‘मॅकेलेकरण’ केले. आपल्या देशाला गुलाम बनवण्यासाठी मॅकेलेचे पत्र आहे. जोपर्यंत आपण येथील शिक्षण पद्धती बदलणार नाही, तोपर्यंत आपण भारतावर राज्य करू शकत नाही, असे तो म्हणाला होता.

याचा अर्थ जी शिक्षण पद्धती तेव्हा आली होती, ती भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी आली होती. त्या शिक्षण पद्धतीत बदल करून तिचे भारतीयीकरण केले जात असेल तर त्याचे कुणालाही दुःख होऊ नये. कुणीही राष्ट्रभक्त व्यक्ती असेल तो शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण व्हावे असेच म्हणाले. सोनिया गांधींनी याची संपूर्ण माहिती घ्यावी व भारतीयीकरणाला पूर्णपणे पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले.

कुंभमेळ्यावरील भाविकांना स्वच्छ पाण्याचा अनुभव देणार

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ करण्यावर आपला भर असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, निश्चितपणे महाराष्ट्रातील नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत. त्या अविरल झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी सरकारने एक मिशन हाती घेतले आहे. पण हे काही लगेच होणारे काम नाही. कारण, सर्वच महापालिका, नगरपालिका व ग्राम पंचायतीच्या सांडपाण्याची प्रक्रिया करावी लागेल. तसेच उद्योगांच्याही पाण्याचे प्रक्रिया करावी लागेल. वेगवेगळ्या नाल्यांचे पाणी ट्रॅप करून त्यावर प्रक्रिया करावी लागते.

हा खूप मोठा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा व काहीसा खर्चिक कार्यक्रम आहे, पण तो केलाच पाहिजे असे आमचे मत आहे. त्याची सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा कुंभमेळा होईल व लोक पवित्र गोदावरीत स्नानाला येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल असा आमचा प्रयत्न असेल, असे फडणवीस म्हणाले.

जनतेला स्वस्त वीज देणार

फडणवीस म्हणाले, राज्यातील विजेचे दर 10 टक्क्यांनी कमी होत आहे. मी विधानसभेतही हे सांगितले होते. विजेचे दर पुढच्या 5 वर्षांत दरवर्षी टप्प्याटप्याने कमी करण्यात येणार आहेत. त्यानुसार आमची जी याचिका आहे, ती नियामक मंडळाने स्वीकारली आहे. ती स्वीकारताना काही मुद्यांवर आमचे मतभेद आहेत. हे मतभेद दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज मिळेल. याविषयी आपली जी कंपनी ही कंपनीही जी 70-80 कोटींच्या डेब्टमध्ये आहे, ती देखील डेब्टफ्री करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी बीडमध्ये शांतता असल्याचे सांगत शांतता भंग करणाऱ्यांवर एकसमान कारवाई करण्याचीही ग्वाही दिली. तसेच मशिदींवरील भोंग्याच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचेही आश्वासन दिले.