Home Blog Page 380

महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन व रिपब्लिकन युवा मोर्चा यांचे वतिने मागणी

पुणे: मध्य प्रदेशातील सागर येथे असलेल्या महार रेजिमेंटच्या मुख्यालयात घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली.

मागील 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भीम जयंती अर्थात 14 एप्रिल रोजी राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे विनंतीपत्र पाठवण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशन संसद भवनबाहेर आंदोलन किंवा दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी या बैठकीत दिली.

यावेळी लेफ्टनंट आनंद वाघमारे, सुभेदार मेजर सुभाष कंकाळ, सुभेदार मेजर पोपट आल्हाट, असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे कोषाध्यक्ष शामराव भोसले सुभेदार मोहन यादव, पुणे शाखाध्यक्ष सुभेदार संतोष वानखेडे, लुकस केदारी , राहुल नागटिळक , किरण सोनावणे , राम डंबाळे , किरण कदम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी असोसिएशनच्या या मागणीसाठी सक्रिय पाठिंबा या बैठकीत व्यक्त केला.

कॅप्टन बाबू पोळके यांचे अध्यक्षीय भाषण झाले तर बुद्ध चव्हाण यांनी महार रेजिमेंटचा इतिहास कथन करून रेजिमेंटच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची आवश्यकता प्रभावीपणे कथन केली. किरण सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यानंतर बैठकीचे अध्यक्ष कॅप्टन बाबू पोळके, राहुल डंबाळे, लेफ्टनंट आनंद वाघमारे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल-डॉ. माधव गाडगीळ

निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल

डॉ. माधव गाडगीळ यांचे मत; डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ प्रदान

सामाजिक संस्थाप्रती सरकारमध्ये संवेदनशीलता वाढावीडॉ. प्रकाश आमटे यांचे मत; आमटे दाम्पत्याला  पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’

पुणे: “निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात. मात्र, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत, हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणाऱ्या लोकांना दोष देतो. खरेतर, निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांमुळेच निसर्गाचा समतोल राखला जात आहे,” असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

पुण्यातील ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात संवादक प्रवीण जोशी यांनी डॉ. आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक विश्वस्त अशोककुमार सुरतवाला, डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, ॲड. जयंत हेमाडे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुनील वर्तक, उद्योजक नितीनभाई देसाई, निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, “वाघांची संख्या वाढली आहे. ते पोटासाठी शिकार शोधत असतात. त्यांना माणसे सापडतात. शहरी लोक म्हणतात, जंगली प्राण्यांचे शहरात अतिक्रमण होतेय; पण आपणच निसर्गाच्या आतमध्ये अतिक्रमण केले आहे. काही हजार वर्षापूर्वी हत्ती, वाघ जंगलात राहत होते. त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जगणे सुलभ होत असले, तरी आर्थिक विषमता अधिक गडद होत आहे. मोठमोठ्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर सर्वानी एकत्रित विचार करण्याची गरज आहे.”

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, “त्वचेच्या आजाराचे दुःख इतरांना कळत नाही. कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले. सहा रुग्णापासून सहा हजारपर्यंत रुग्ण झाले. हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाबांच्या आणि ताईंच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही हेमलकसाला गेलो. तरुण वयात आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाली. स्वयंप्रेरणेने घेतलेल्या या निर्णयात मंदाकिनी सोबत होती. अभावात आनंद मानून तिने खंबीरपणे साथ दिली. हेमलकसामध्ये काम करताना आरोग्य, शिक्षण यावर भर दिला, त्यातूनच त्यांचा विकास होत गेला. हेमलकसा कुटुंब हजार लोकांचे आहे. क्रूर प्राण्यांच्या सहवासात राहूनही जिवंत आहे. त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे.”

“सामाजिक संस्थांसोबत शासनाची संवेदनशीलता वाढायला हवी. शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहेत. आदिवासी भागात जागृती करणे अधिक सोपे आहे. दोन्ही संस्कृतीत वेगळेपण आहे. त्या लोकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करायला आम्हाला वेळ लागला; पण त्यांनी एकदा स्वीकारल्यावर सर्व गोष्टी जमून आल्या. लोकांची सेवा करताना देवाचा फार विचार करता कामा नये. बाबांनी तरुणांना घडविण्याचे काम केले. सोमनाथ प्रकल्प उभारला. त्यातून श्रमसंस्कार शिबीर सुरु केले. अनेक तरुण त्यातून तयार झाले. शिक्षणात मोठी विषमता आहे. मूल्यशिक्षण, पर्यावरण यावर काम व्हायला हवे,” असे डॉ. आमटे यांनी नमूद केले.

डॉ. मंदाकिनी म्हणाल्या, “लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे. कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या बाबांच्या घरात जाणार म्हणल्यावर माझे आईवडील तयार झाले नव्हते. त्यांना धक्का बसला होता. पण एकदा बाबांना भेटा, आनंदवन पहा, असे सांगितल्यावर ते आले आणि पाहिल्यानंतर लग्नाला होकार दिला. आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद हेच सुखी आयुष्य आहे. या कामाच्या निमित्ताने आम्हाला खूप सुखाने सहजीवन जगता आले. बाबा व साधनाताईंप्रमाणे माझी व प्रकाश यांचीही वाटचाल सुरु राहिली. पंच्याहत्तरीतही आम्ही समाधानाने आयुष्य जगत आहोत.”

डॉ. शरद मुतालिक यांनी ‘एआयबीडीएफ’च्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ‘त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ २०२१ पासून हे काम सुरू आहे. सर्वांसाठी आधुनिक औषधोपचार सुलभ व परवडणारे व्हावेत, यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.” डॉ. सुनील वर्तक यांनी आजाराविषयी, तसेच आजाराची लक्षणे, कारणे व आधुनिक औषधोपचार याविषयी सांगितले.

स्वागत प्रास्ताविकात अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “या गंभीर आजाराची जागृती वाढावी, फाऊंडेशनचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या कामात लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूने गोंदण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. हा पहिला पुरस्कार निस्पृहपणे महारोगी, आदिवासी विकासासाठी आयुष्य वेचलेल्या आमटे दाम्पत्याला देऊन सन्मानित करणे हा फाऊंडेशनचा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन यापुढे आणखी जोमाने काम होईल.”

रोहिणी गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावाले यांनी आभार मानले. अनन्या जोगळेकर यांच्या सुमधूर आवाजातील प्रार्थनेने सोहळ्याची सुरुवात, तर पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

भोरमधील ग्रामस्थांसाठी पुणेकरांतर्फे वैद्यकीय शिबिराचे आयोजन

फाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अँड मेडिसिन आणि ॲव्हेट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर

पुणे: फाउंडेशन फॉर एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी अँड मेडिसिन आणि ॲव्हेट लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भोर मधील माळेगाव, नसरापूर परिसर येथे तीन दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ४२५ ग्रामस्थांनी सहभाग घेतला. यावेळी आवश्यक रुग्णांना उपचार देखील देण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन स्मिता देशपांडे, सीए. विष्णू बांगड, ॲड. संदीपक फडके, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे, संस्थेचे संस्थापक डाॅ. सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. डोळे तपासणी, चष्मे वाटप, गाठींचे आजार, मूत्र विकार, हर्निया, बीपी, पोटविकार, मधुमेह, ईसीजी यांसह विविध तपासण्या शिबिरात करण्यात आल्या.

डाॅ. सचिन देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे अत्यंत महत्त्वाची आहेत. अनेक रुग्ण आर्थिक अडचणींमुळे वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत, त्यामुळे त्यांचे आजार बळावतात. अशा शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यकतेनुसार औषधे मिळतात. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सुनिल पांडे यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.–

तळहातावर निखारा ठेवून सामाजिक कार्यकर्त्यांचे काम-ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य 

पुणे सार्वजनिक सभेचा १५५ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : सार्वजनिक काकांनी ज्या विचारांनी सभेची सुरुवात केली, तो विचार अजूनही संपलेला नाही. सार्वजनिक सभेसमोर आजही अनेक प्रश्न आहेत, ज्यासाठी त्यांना काम करायचे आहे.  तळहातावर निखारा ठेवून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कार्यकर्ते काम करतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. मूल्यात्मक भावनेने दुसऱ्याकडे पाहावे, हेच प्रत्येक धर्म शिकवतो. परंतु तो कोणाच्या हातात जातो, हे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.

पुणे सार्वजनिक सभेचा १५५ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार पेठेतील संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यावेळी उपस्थित होते.  

कार्यक्रमात सद्गुरु स्वाती वसंत खाडे सनातन संस्था यांना वंदनीय रमाबाई रानडे पुरस्कार तर मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या प्राजक्ता मुरमट्टी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना देखील यावेळी गौरविण्यात आले.

डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, आज टीव्ही लावला तर बातम्या बघायची भीती वाटते; अनेक प्रश्न समोर दिसतात. स्त्रियांचे, भाषांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न का आहेत आणि ही परिस्थिती आपण का म्हणून सहन करायची. विद्यार्थ्यांमध्ये विचारांची खूप ताकद आहे. तरुणांना जे सतत बोलत असतात, त्यांना साहित्यातून उत्तर तरुणांनी दिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विद्याधर नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल शिदोरे यांनी प्रास्ताविक केले. शरद गर्भे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.

वित्त कायदाविरोधात नॅशनल को-ऑर्डीनेशन कमिटी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने निदर्शने

पुणे- नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने   केंद्र सरकारने वित्त कायदा मंजूर केला आहे त्याच्या विरोधात .  नॅशनल को-ऑर्डीनेशन कमिटी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने देशभर निदर्शन करण्यात आली.  टेलीफोन भवन बाजीराव रोड येथे नॅशनल को- ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शन असोसिएशन मधील पेन्शनर कर्मचारी आणि आधिकारींच्या सर्व संघटनेत मार्फत जोरदार निदर्शन करण्यात आली. हा कायदा पेन्शन धारकांच्या विरोधात असल्याने कारण पेन्शन फंडाचे  पूर्णआधिकार  न्यायिक न राहता प्रशासकीय होणार आहेत पेन्शन फंडाचे आधिकार केंद्र सरकारने आपल्या ताब्यात  घेतला आहे  १९७२ चा पेन्शन कायदकायदा व आर्टिकल १४ अंतर्गत न्यायिक हक्क काढून प्रशासकीय आधिकार प्रदान करण्यात आले आहे.या कायद्याने पेन्शनवर खालिलप्रमाणे  परीणाम होणार आहेत १)पेन्शन रिव्हिजन कधीच होणिर नाही.२)भविष्यात महागाई भत्ता गोठवला जाऊ शकतो ३)भविष्यात पेन्शन बंद केली जाऊ शकते ४)कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नाही ५)काही अब्ज करोडचा पेन्शन फंड १००% सरकारच्या मालकीच्याआधिकारात राहिल .६)सुप्रीम कोर्टाचे सर्व निर्णय या कायद्याने आपोआप रद्दबातल होतील.७) हे बिल लोकसभेने मंजूर केले आहे (त्या अगोदर खासदारांचा पगार व भत्ते २५% ने वाढवले आहेत). ह्या सर्व कारणासाठी वरील बिल रद्द झाले पाहीजे म्हणून टेलीफोन भवन बाजीराव रोड पुणे येथे  नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने जोरदार निदर्शन करण्यात आली यामधे   संघटनेचे नागेश नलावडे ,युसूफ जकाती ,शशांक नायर ,बबन सुर्यवंशी ,सुधाकर खडके , पुष्पा फराटे , रोहीणी कुलकर्णी  इत्यादीसह उपस्थित होते.वरील निवेदन डीस्ट्रीक्ट कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ,अर्थ आणि नियोजन खाते यांच्या मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान कार्यालय ऑफीस ला पाठवण्यात आले आहे. 

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन च्या वतीने वीरपत्नींना मदतीचा हात 

पिठाच्या गिरण्या आणि शिवण यंत्राची भेट

पुणे : सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात, पण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या वीरपत्नींचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या सौभाग्याला देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या वीरपत्नींच्या जगण्याला आधार देण्यासाठी त्यांना पिठाच्या गिरण्या आणि शिवण यंत्राची भेट देण्यात आली.

शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन च्या वतीने आयोजन वीरमातांना ही मदत करण्यात आली. एरंडवण्यातील सेवाभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा गोडबोले, उपाध्यक्ष सतीश राजहंस, अॅड. रजनी उकरंडे, खजिनदार सुजय गोडबोले, सनदी लेखापाल आणि विश्वस्त अभय शास्त्री, विश्वस्त प्रतिक भोसले, प्रशांत शितूत, निलिमा शितूत, विलास मुळे, पुखराज संचेती, सत्यजित शिंदे उपस्थित होते. फाऊन्डेशनचे एक विश्वस्त पुखराज संचेती यांनी २ गरजू महिलांना दोन टिव्हिएस झेस्ट स्कूटर्स भेट दिल्या.

दीपक शहा म्हणाले,  प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढता येत नाही परंतु जे सेनेत गेले आहेत त्यांच्या कुटुंबाला साथ द्या त्यांना मदत करा. आपण जगातील सगळी दुःख कमी करू शकत नाही पण आपल्या आजुबाजूच्या लोकांना मदतीची गरज असेल तर अवश्य करा.

गीता गोडबोले म्हणाल्या, कॅप्टन सुशांत गोडबोले यांना मदत करण्याची खूप इच्छा होती. त्यांचे कार्य सुरू होते. परंतु ते नसतानाही त्यांचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. वीरमाता आणि वीरपत्नी आधार देणे महत्त्वाचे आहे, अनेक गोष्टी पैशाने नाही तर मानसिक आधाराने देखील साध्य होतात. तोच मानसिक आणि काही प्रमाणात आर्थिक आधार देण्याचा आणि प्रयत्न करत आहोत.

गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची:- अनंत गाडगीळ

मुंबई, दि. ३ एप्रिल २०२५

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर गेले काही दिवस झळकत होता पण घडले मात्र उलटे. ट्रम्प यांचे ते वक्तव्य गुगलीच ठरले, असे काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते मा. आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे.

भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर ट्रम्प यांनी तब्ब्ल २७% करभार जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले. भारतासाठी हा केवळ धक्काच नव्हे तर अपमानही आहे. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालाची सरासरी उलाढाल हि कमी जास्त पद्धतीत अंदाजे ११ हजार कोटींच्या (९५ बिलियन डॉलर्स) पुढे आहे. याउलट अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या मालाची उलाढाल ही ४ हजार कोटींच्या जवळपास गेली आहे. इंजिनियरिंग क्षेत्रातील भारताची निर्यात अंदाजे ७ हजार कोटी, दागिने ५ हजार कोटी, पेट्रोलियम ५ हजार कोटी, यासारख्या असंख्य क्षेत्रातील निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे. या आकडेवारीवरून नुकसान भारताचेच अधिक आहे हे स्पष्ट होत आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयाचे प्रामुख्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत अशी भीती विविध अर्थतज्ञ व्यक्त करीत आहेत. पण विशेष करून आयटी क्षेत्रातील सुशिक्षित बेकारी तर वाहन क्षेत्रातील कामगार वर्गात बेकारी वाढणार आहे. मोदी सरकारला ट्रम्प यांच्यावर इतका भरवसा होता कि या प्रश्नावर विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन चर्चा करण्याचे तारतम्य सुद्धा मोदी सरकारने दाखविले नाही असे गाडगीळ यांनी म्हंटले आहे. ट्रम्प यांच्यावर विश्वास टाकत गाफील राहिलेल्या मोदी सरकारची, ट्रम्प यांनी गुगली टाकत जणू विकेटच घेतली आहे अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पद्धतीने प्रचार-प्रसार व्हावा : डॉ. शरच्चंद्र हर्डीकर

एकदंत प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा ‌‘एकदंत कृतज्ञता पुरस्कारा‌’ने गौरव

पुणे : आयुर्वेद ही पुरातन उपचार पद्धती असून आयुर्वेदाविषयी जगाला प्रचंड आकर्षण आहे. आयुर्वेदाचा देश-विदेशात शास्त्रोक्त पद्धतीने प्रचार व्हायला हवा, अशी अपेक्षा ख्यातनाम अस्थिव्यंगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. शरच्चंद्र हर्डीकर यांनी व्यक्त केली.

शतकपूर्ती केलेल्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा एकदंत प्रतिष्ठानतर्फे ‌‘एकदंत कृतज्ञता पुरस्कार‌’ देऊन आज (दि. 3) गौरव करण्यात आला. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील निमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. शरच्चंद्र हर्डीकर यांच्या हस्ते संस्थेस सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र भागवत यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. एकदंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मुकुंद कोठावदे, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, डॉ. भीम गायकवाड मंचावर होते.
डॉ. कोठावदे यांच्या कर्करोग जागृतीवरील भित्तीचित्रे व कलाकृतींचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या आवारात भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

डॉ. शरच्चंद्र हर्डीकर पुढे म्हणाले, देशात अनंत काळापासून अस्तित्वात असलेल्या आयुर्वेद उपचारपद्धतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उपचार पद्धतीचे कुठलेही शास्त्र शिका पण इतर शास्त्राचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. उपचार पद्धतीत काही मर्यादा वाटत असल्या तरी संशोधनाद्वारे त्यात कशाचा समावेश करू शकतो याचाही विचार होणे अपेक्षित आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आरोग्याच्या क्षेत्रात संवेदनशीलता, नैतिकता आणि मानवता या गोष्टींना खूप महत्त्व आहे. आरोग्याच्या बाबतीत मानवी संवेदना हद्दपार करता येणार नाहीत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात होणारा संवाद हा आंतरिक असतो. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य होत असताना सध्याची आरोग्य क्षेत्रातील उपचार पद्धती चिंतनाचा विषय ठरावा अशी आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. भालचंद्र भागवत म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण मंडळामुळे आयुर्वेदाचा प्रचार देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कामाची दिशा चांगली असेल तर संस्थेच्या कार्याचे नक्कीच कौतुक होते. एकदंत प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांना सर्वेतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात डॉ. मुकुंद कोठावदे यांनी पुरस्कार सोहळ्याविषयी माहिती सांगितली तर संस्थेविषयी डॉ. भाऊसाहेब जाधव यांनी अवगत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा संगोराम यांनी केले तर आभार स्मिता कोठावदे यांनी मानले.

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत आर्थिक साहाय्यासाठी खाजगी अकादमींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३ : राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करावीत या उद्देशाने ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत खाजगी क्रीडा अकादमींनी आर्थिक साहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्र, क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकाराच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक साहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी संबधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहायक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येणार आहे. यात ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग व ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक १० लाख रुपये, ब वर्ग २० लाख रुपये तर ‘अ’ वर्ग अकादमींना वार्षिक ३० लाख रुपये आर्थिक साहाय्य, पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उत्रत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.

त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांनी कळविले आहे.

फॅशन जगतासाठी भारत मोठी बाजारपेठ – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

पुणे, दि. ३: फॅशन जगतासाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथील परंपरा, साजरे होणारे जगातील सर्वाधिक सण, येथील हवामान आणि जनतेच्या गरजा, आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कपडे, दागिने आदींची निर्मिती करावी, असे सांगतानाच या मोठ्या बाजारपेठेचा या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असा सल्ला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिला.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या २२ व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि स्कूलचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मिलिंद लेले, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विकास कक्षाच्या सदस्य डॉ. मंजू हुंडेकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत इनामदार, स्कूलच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती मोहना कदम, प्राचार्य डॉ. गरिमा भल्ला आदी उपस्थित होते.

मंत्री सावकारे पुढे म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून त्यातील आपला ग्राहक कोणता हे निश्चित करून आणि त्यांच्या गरजा, मागणींचा अभ्यास करून फॅशन व्यवसाय, उद्योगात निर्मिती करावी. विद्यार्थिनींनी स्पर्धेच्या युगात प्रथम स्वतःला या क्षेत्रात स्थैर्य मिळविताना काही वेगळे करण्याचा, सर्जनशीलतेचा प्रयत्न करावा. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सण, उत्सवाला काही ना काही शास्त्रीय आधार असून या परंपरेला पुढे आणल्यास तुमचीही प्रगती होईल. आपण जे करू ते देशासाठी करू या विचाराने प्रेरित व्हावे, असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शाश्वतता या संकल्पनेवर मोठा भर आहे. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर करून नवनिर्मिती करत या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी संस्थेने स्थापनेपासूनच केली आहे. त्यातून महर्षी कर्वे यांची दूरदृष्टी दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

श्री. सावकारे पुढे म्हणाले, केंद्र शासनाने टेक्निकल टेक्सटाइल ही नवी संकल्पना समोर आणली असून त्यात वस्त्रोद्योगात वापरल्या जाणारे रंग (डाय) बनविणाऱ्या यंत्रांसाठी अनुदान देण्यात येते. राज्य शासन देखील या संकल्पनेला पुढे घेऊन काम करत आहे.

रेशमाचा धागा तेवढ्याच जाडीच्या लोखंडाच्या धाग्यापेक्षा अनेक पटीने मजबूत तरीही वजनाने हलका असल्याने सैनिकांसाठी बुलेटप्रूफ जॅकिटे बनविण्यासाठी त्याचा उपयोग करण्याबाबत संशोधन सुरू आहे. अशा अनेक नवनव्या संधी या क्षेत्रात निर्माण होत असून त्यांचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

प्राचार्य गरिमा भल्ला यांनी संस्थेचा अहवाल सादर केला, त्या म्हणाल्या, ही संस्था फॅशन डिझाइन क्षेत्रातील देशातील एक अग्रमानांकित संस्था आहे. आजच्या पदवी प्रदान सोहळ्यात संस्थेमार्फत ५ सुवर्ण पदके, १९५ बी. डिझाइन पदवी आणि ११ एम. डिझाइन या पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येत आहेत. संस्थेने मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठ, डी मॉन्टफर्ड आदी विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. संस्थेतील विद्यार्थीनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाईन स्पर्धांमध्ये सहभागी घेऊन यशस्वी झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रीन फॅशन इंडिया परिषदेचा अहवाल सादर करण्यात आला.

या प्रसंगी प्राध्यापक, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणेबाबत

पुणे दि. 3: भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी अग्निवीर योजनेअंतर्गत २0२५-२६ या वर्षासाठी भारतीय नौसेवा अग्निवीर प्रवेशासाठी निवड चाचणीसाठी अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.


शैक्षणिक पात्रता. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळांकडून गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण एकूण ५०% गुणांसह. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या बारावी बोर्ड परीक्षेत बसणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.


उमेदवार अग्निवीर ०२/२०२५, ०१/२०२६ आणि ०२/२०२६ बॅचसाठी २९ मार्च २०२५ ते १० एप्रिल २०२५ (5 वाजेपर्यंत) या कालावधीत https://joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरतांना योग्य माहिती भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पात्र अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवार व्यक्तीकडून अग्निवीर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा असे आवाहन, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

पुणे शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

पुणे- बाणेर ,कात्रज , धनकवडी, नांदेड सिटी अशा आसपासच्या परिसरासह शहरात डेक्कन आणि जे एम रोड वर आज अवकाळी पावसाने हजेरी लावली . अनेक दिवसांपासून वाढलेला उष्मा आणि काल काही ठिकाणी झालेला अवकाळी पाउस आज सर्वत्र कोसळला , काही वेळ जोरदार वारा , काही वेळ रिमझिम धारा , आणि काही वेळ कोसळणाऱ्या जलधारा यामुळे शहर आणि परिसरात सर्वत्र झालेला हाच पहिला अवकाळी पाउस ठरला. पाच वाजता सुरु झालेल्या पावसाच्या धारा साडेसह वाजले तरी बरसतच होत्या. आपल्याकडे प्रथा आहे पाउस येणार म्हटले कि महावितरणची बत्ती अगोदर गुल होते आणि पाउस येऊ लागतो या प्रमाणे अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय येत होता पण नंतर तो सुरु देखील होत होता .

आम्हाला शिर्डी, तिरुपती बोर्डावर घेणार का?:मुस्लिम समाजात हुशार लोक नाहीत का? MIM नेते इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल

वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणत्या नेत्यांनी हडपल्या.. वस्तुस्थिती जाहीर करावी – सरकारने कोणत्या नेत्याच्या नावावर किती जमीन आहे याची आकडेवारी काढावी. त्यांना वस्तुस्थिती समजेल. अनेक राजकीय नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप केल्या आहेत. या विधेयकांतर्गत पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांना जमिनी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. सरकारला नवा कायदा आणण्याची काहीच गरज नव्हती. आता आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही अपेक्षा राहिली नाही. तिथे प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे. तेथील न्यायाधीश सेवानिवृत्त झाल्यानंतर मोदींकडे जावून बसतात, असेही जलील यावेळी बोलताना म्हणाले.
एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपवर तिखट हल्ला चढवला आहे. भाजप वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे वक्फ बोर्डात हुशार नॉन मुस्लिम सदस्य आणणार आहे. मग आमच्या समाजात हुशार लोक नाहीत का? आता ते आम्हाला शिर्डी व तिरुपती संस्थानच्या बोर्डावर घेणार का? केवळ वक्फसाठीच हा निर्णय का? असे विविध प्रश्न जलील यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

लोकसभेने बुधवारी मध्यरात्री 2 वा. वक्फ सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी या प्रकरणी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला. हा विरोध यापुढेही कायम असेल. कालच्या भाषणातून त्यांनी केवळ मुस्लिम समाजाचा विषय घेतला. त्यातून वाद निर्माण केला. ट्रिपल तलाक झाला. औरंगजेब झाला. आता या विधेयकाच्या माध्यमातून नवा मुस्लिम विरोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थन व विरोधाच्या आकड्यात फार मोठा फरक नाही. सरकार मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी व महिलांना बोर्डात स्थान देण्यासाठी हे विधेयक आणल्याचा दावा करत आहे. पण त्यांनी लाडक्या बहिणींना न्याय दिला का?

मी सुरुवातीपासून वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात होतो. वक्फ बोर्ड जो निर्णय घेत होता तो निर्णय घेण्याचा अधिकार आता या विधेयकाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. सरकारने वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांना घेण्याचा निर्णय घेतला आहे सरकार असेच करणार असेल, तर तुम्ही इम्तियाज जलीलला शिर्डीच्या साईबाबा संस्थान मंदिराच्या बोर्डावर घेणार का? तिरुपती बालाजी येथील ट्रस्टवर मला घेणार का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

वक्फ सुधारणा विधेयकाच्या आडून उद्योगपती व बिल्डरांना जमिनी देण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र.

मुंबई-
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकार कडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणताही महत्वाचा निर्णय न घेताच गुंडाळले. मोठी मोठी भाषणे केली पण त्यांना त्यांच्याच जाहिरनाम्याचा विसर पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नटसम्राट शिरला होता पण ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असे वर्णन अधिवेशनाचे करावे लागेल. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाची कबर उकरून काढण्यात आली. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. सरकारने जाणीवपूर्वक मुद्द्यांना बगल दिली.
खडकपूर्णा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदाराला वाढदिवसाची भेट म्हणत त्यांनी सही करत सुप्रमा दिली होती पण आता ते होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच पाण्याच्या प्रश्नावरून तरुण शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे, क्या हुआ तेरा वादा? अशी विचारणा जनता करत आहे असेही सपकाळ म्हणाले.

वक्फ सुधारणा विधेयकवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिलेले आहेत. मंदिर, प्रार्थना स्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत, महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. देशात भूमिहिनांची संख्या जास्त होती, आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवून हजारो एकर जमिन जमा करून भूमिहिनांना दिली. पंडित नेहरु यांनी कसेल त्याची जमीन म्हणत कूळ कायदा आणला, नंतर सिलिंगचा कायदा आणला, इंदिरा गांधी यांनी जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला, तर युपीए सरकार असताना आदिवासींना वन जमिनीचा हक्क दिला परंतु भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे का? धारावीची जमीन अदानीच्या घशात घातली आहे. शक्तिपीठ मार्गाच्या नावाखाली कोकणपट्टा अदानी अंबानीला देण्याचा आट घातला जात आहे, तसाच हा प्रकार आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

नरेंद्र मोदींची खूर्ची डळमळीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षानंतर ३० मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला भेट दिली. आपली खूर्ची धोक्यात आल्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आरएसएसची आठवण आली असावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राहुल म्हणाले- चीनचा आपल्या 4000 चौ.किमी जमिनीवर कब्जा:परराष्ट्र सचिव हे शहीदांवर केक कापताहेत; पंतप्रधान पत्रे लिहिताहेत

नवी दिल्ली-भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सरकारला घेरले. ते म्हणाले- चीनने आपल्या ४ चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे, पण आमचे परराष्ट्र सचिव (विक्रम मिश्री) चिनी राजदूतासोबत केक कापत होते हे पाहून मला आश्चर्य वाटले.

लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना राहुल म्हणाले- आम्ही सामान्यतेच्या विरोधात नाही, पण त्याआधी आम्हाला आमची जमीन परत मिळाली पाहिजे. मला कळले की राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी चिनी राजदूतांना पत्र लिहिले आहे आणि आम्हाला इतरांकडूनही याबद्दल माहिती मिळत आहे. चिनी राजदूत भारतातील लोकांना सांगत आहेत की त्यांना एक पत्र लिहिले गेले आहे.

राहुल यांचे व्यंग- भाजपचे तत्वज्ञान प्रत्येक परदेशी देशासमोर नतमस्तक होते

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर राहुल गांधी म्हणाले- एकीकडे तुम्ही आमची जमीन चीनला दिली आणि दुसरीकडे अमेरिकेने आमच्यावर टॅरिफ (टिट फॉर टॅट टॅक्स) लादला. यामुळे देशातील वाहन उद्योग, औषधनिर्माण आणि शेती पूर्णपणे नष्ट होईल.

राहुल म्हणाले- एकदा कोणीतरी इंदिराजींना विचारले की त्या परराष्ट्र धोरणात डावीकडे झुकतात की उजवीकडे? यावर त्यांनी उत्तर दिले की मी डावीकडे किंवा उजवीकडे झुकत नाही. मी एक भारतीय आहे आणि मी सरळ उभी आहे.

भाजप आणि आरएसएसचे तत्वज्ञान वेगळे आहे. विचारल्यावर ते म्हणतात नाही, नाही, आम्ही प्रत्येक परदेशी व्यक्तीसमोर आपले डोके टेकवतो. ते त्यांच्या इतिहासात आहे, आपल्याला माहिती आहे. अमेरिकेच्या शुल्कांवर ते काय करत आहे याचे उत्तर सरकारने द्यावे.

काल अमेरिकेने भारतावर २७ टक्के टिट फॉर टॅट कर लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की भारत अमेरिकन वस्तूंवर खूप जास्त आयात शुल्क लादतो.