निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल-डॉ. माधव गाडगीळ

Date:

निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल

डॉ. माधव गाडगीळ यांचे मत; डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ प्रदान

सामाजिक संस्थाप्रती सरकारमध्ये संवेदनशीलता वाढावीडॉ. प्रकाश आमटे यांचे मत; आमटे दाम्पत्याला  पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’

पुणे: “निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात. मात्र, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत, हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणाऱ्या लोकांना दोष देतो. खरेतर, निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांमुळेच निसर्गाचा समतोल राखला जात आहे,” असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

पुण्यातील ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ‘एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात संवादक प्रवीण जोशी यांनी डॉ. आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक विश्वस्त अशोककुमार सुरतवाला, डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, ॲड. जयंत हेमाडे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुनील वर्तक, उद्योजक नितीनभाई देसाई, निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, “वाघांची संख्या वाढली आहे. ते पोटासाठी शिकार शोधत असतात. त्यांना माणसे सापडतात. शहरी लोक म्हणतात, जंगली प्राण्यांचे शहरात अतिक्रमण होतेय; पण आपणच निसर्गाच्या आतमध्ये अतिक्रमण केले आहे. काही हजार वर्षापूर्वी हत्ती, वाघ जंगलात राहत होते. त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जगणे सुलभ होत असले, तरी आर्थिक विषमता अधिक गडद होत आहे. मोठमोठ्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर सर्वानी एकत्रित विचार करण्याची गरज आहे.”

डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, “त्वचेच्या आजाराचे दुःख इतरांना कळत नाही. कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले. सहा रुग्णापासून सहा हजारपर्यंत रुग्ण झाले. हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाबांच्या आणि ताईंच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही हेमलकसाला गेलो. तरुण वयात आव्हानात्मक काम करण्याची संधी मिळाली. स्वयंप्रेरणेने घेतलेल्या या निर्णयात मंदाकिनी सोबत होती. अभावात आनंद मानून तिने खंबीरपणे साथ दिली. हेमलकसामध्ये काम करताना आरोग्य, शिक्षण यावर भर दिला, त्यातूनच त्यांचा विकास होत गेला. हेमलकसा कुटुंब हजार लोकांचे आहे. क्रूर प्राण्यांच्या सहवासात राहूनही जिवंत आहे. त्यामुळे त्यांच्यावर माझा विश्वास आहे.”

“सामाजिक संस्थांसोबत शासनाची संवेदनशीलता वाढायला हवी. शहरी माणसामध्ये अंधश्रद्धा जास्त आहेत. आदिवासी भागात जागृती करणे अधिक सोपे आहे. दोन्ही संस्कृतीत वेगळेपण आहे. त्या लोकांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करायला आम्हाला वेळ लागला; पण त्यांनी एकदा स्वीकारल्यावर सर्व गोष्टी जमून आल्या. लोकांची सेवा करताना देवाचा फार विचार करता कामा नये. बाबांनी तरुणांना घडविण्याचे काम केले. सोमनाथ प्रकल्प उभारला. त्यातून श्रमसंस्कार शिबीर सुरु केले. अनेक तरुण त्यातून तयार झाले. शिक्षणात मोठी विषमता आहे. मूल्यशिक्षण, पर्यावरण यावर काम व्हायला हवे,” असे डॉ. आमटे यांनी नमूद केले.

डॉ. मंदाकिनी म्हणाल्या, “लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे. कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या बाबांच्या घरात जाणार म्हणल्यावर माझे आईवडील तयार झाले नव्हते. त्यांना धक्का बसला होता. पण एकदा बाबांना भेटा, आनंदवन पहा, असे सांगितल्यावर ते आले आणि पाहिल्यानंतर लग्नाला होकार दिला. आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद हेच सुखी आयुष्य आहे. या कामाच्या निमित्ताने आम्हाला खूप सुखाने सहजीवन जगता आले. बाबा व साधनाताईंप्रमाणे माझी व प्रकाश यांचीही वाटचाल सुरु राहिली. पंच्याहत्तरीतही आम्ही समाधानाने आयुष्य जगत आहोत.”

डॉ. शरद मुतालिक यांनी ‘एआयबीडीएफ’च्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ‘त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम फाऊंडेशन करत आहे. अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ २०२१ पासून हे काम सुरू आहे. सर्वांसाठी आधुनिक औषधोपचार सुलभ व परवडणारे व्हावेत, यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.” डॉ. सुनील वर्तक यांनी आजाराविषयी, तसेच आजाराची लक्षणे, कारणे व आधुनिक औषधोपचार याविषयी सांगितले.

स्वागत प्रास्ताविकात अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “या गंभीर आजाराची जागृती वाढावी, फाऊंडेशनचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून या कामात लोकांचा सहभाग वाढावा, या हेतूने गोंदण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. हा पहिला पुरस्कार निस्पृहपणे महारोगी, आदिवासी विकासासाठी आयुष्य वेचलेल्या आमटे दाम्पत्याला देऊन सन्मानित करणे हा फाऊंडेशनचा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन यापुढे आणखी जोमाने काम होईल.”

रोहिणी गोखले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावाले यांनी आभार मानले. अनन्या जोगळेकर यांच्या सुमधूर आवाजातील प्रार्थनेने सोहळ्याची सुरुवात, तर पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....