Home Blog Page 368

मंगेशकर रुग्णालयाची सेवाभावीवृत्ती,भुजबळांचा फुले स्मारकाच्या कामासाठी उपोषणाचा इशारा , पेट्रोल डीझेलची दरवाढ,फुलेंच्या जीवनावरील चित्रपट,सुप्रिया सुळे यांचे उपोषण.. विविध प्रश्नांना अजित पवारांची उत्तरे

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी मंगेशकर हॉस्पिटल , रुग्णालयांची सेवाभावी वृत्ती ,मंगेशकर कुटुंबाचे योगदान ,भुजबळांचा फुले स्मारकाच्या कामासाठी उपोषणाचा इशारा , फुलेंच्या जीवनावरील चित्रपट , सुप्रिया सुळे यांचे उपोषण,पेट्रोल डीझेलची दरवाढ अशा पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

माझ्या बहिणीला पुन्हा उपोषण करण्याची वेळ येऊ नये, अशी सक्त ताकीद आपण जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांना दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भोर तालुक्यातील या रस्त्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दूरावस्था झाली असून रस्ता करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. यावर आता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाबाबत देखील अजित पवार यांनी भाष्य केले. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र हा तीढा नक्की सुटेल, जरा धीर धरा, अशा शब्दात अजित पवार यांनी या संदर्भात संयमाचा सल्ला दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, बनेश्वर देवस्थानांकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर ते नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व टीमच्या पाठपुराव्यांमुळे सर्वच रस्ते झाले आहेत. तसेच हा रस्ता लवकर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तीढा सुटलेला नसला तरी त्यावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तिथले जिल्हा नियोजनाचे बजेट दिलेले आहे. निधी दिलेला आहे. या दोन्ही ठिकाणी निधी वाढवण्यात देखील आला आहे. 22 हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा देखील तीढा सुटेल थोडा धीर धरा, धीरे… धीरे, अशा शब्दात अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

बाणेरमध्ये पदवीधर तरुणाकडून साडेतीन लाखांचा हायड्रोफोनिक गांजा जप्त

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात ओझोकुशची (हायड्रोफोनीक गांजा) तस्करी करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी दोनने अटक केली आहे.अर्जुन लिंगराज टोटिगर ( वय २६ वर्षे, रा. सुखवानी पॅनरोमा, सुसगांव, बाणेर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३ लाख ५ हजारांचा ३० ग्रॅम ५४० मिली ग्रॅम ओझोकुश गांजा (हायड्रोफोनीक गांजा) इतर ऐवज जप्त केला. त्याच्याविरुध्द बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हा मार्केटींग आणि सेल्सचा पदवीधर असून सध्या तो खाजगी कंपनीमध्ये काम करीत आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे १० एप्रिलला बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना शिवशक्ती चौक बाणेरमध्ये एकजण गांजा तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्याकडून ३ लाख ५ हजारांचा गांजा जप्त केला.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, प्रशांत बोमादंड्डी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

महार रेजिमेंट मुख्यालय बाबासाहेबांचा पुतळा उभारणार : रामदास आठवले

पुणे : भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व सैनिकांकडून गेल्या 40 वर्षांपासून रेजिमेंटच्या मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भामध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर याबाबत आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आज पाषाण येथील यशदा येथे नीती आयोगाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते, यावेळी महार रेजिमेंट व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले होते.

यावेळी बोलताना आठवले यांनी ” आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारावा यासाठी आग्रही आहोत , यासंदर्भात राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचेही मत सकारात्मक तयार करणार आहे. दरम्यान या प्रश्नावर गरज पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सुद्धा भेट घेऊ असे स्पष्ट आश्वासन आठवले यांनी दिले.

रामदास आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल डंबाळे यांच्या समवेत संतोष वानखेडे , बुद्धा चव्हाण , राहुल ससाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सिंचन घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती:फक्त धमकी देऊन महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, शहांच्या दौऱ्यावरून दमानियांचा घणाघात

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री उद्यापासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिल रोजी ते रायगडावर भेट देतील. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 72 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत जोरदार टीका केली. या घोटाळ्याची चौकशी करायची नव्हती, फक्त धमकावून सत्ता आणायची होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात 72 हजार कोटींचा कथित सिंचन घोटाळा झाला होता. मात्र 2012 मध्ये तो उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे डिसेंबर 2014 मध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. 20 डिसेंबर 2019 रोजी अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा जाणार असल्यामुळे अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही, असे दमानिया म्हणाल्या. 72 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही ना? कारण आपले थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम! ED आणि ACB आता गुंडाळून टाका, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.अमित शहा 12 एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. रायगड किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होणार आहेत.

असा असेल अमित शहांचा महाराष्ट्र दौरा

दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता पुणे विमानतळावर आगमन.
12 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता पाचाडमध्ये लँडींग
सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 1.30 वाजता पाचाडवरुन टेक ऑफ
दुपारी 2 वाजता सुतारवाडी (सुनिल तटकरे निवासस्थान) येथे भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती
दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना
दुपारी 4 ते 6 विलेपार्ले कार्यक्रम (चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम – मुकेश पटेल सभागृह)
रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम
दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीकडे रवाना

मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी:माणुसकीला लागलेला कलंक; तनिषा भिसे प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची तिखट टीका (व्हिडीओ)

मुंबई-तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर कडाडून हल्ला चढवला आहे. मंगेशकर कुटुंब माणुसकीला लागलेला कलंक आहे. त्यांनी कधी कुणाला काही दान केले आहे का? खिलारे पाटलांनी त्यांना रुग्णालयासाठी जमीन दान दिली, पण त्यांनी त्यांनाही सोडले नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

तनिषा भिसे नामक गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलेच वादात सापडले आहे. या रुग्णालयावर गंभीर स्थिती रुग्णालयात आलेल्या तनिषा यांच्या कुटुंबीयांकडे प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली आहे.

विजय वडेट्टीवार बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तनिषा भिसे मृत्यू प्रकरण मी रोज वाचतो आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी काही दान केले आहे का? चांगले गाणे म्हटले म्हणून सगळ्यांनी मिरवले… लतादीदी, आशादीदी, हे दीदी, ते दीदी… यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केले? खिलारे पाटलांनी यांना जमीन दान केली, पण मंगेशकरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यामुळे हे माणुसकीला कलंक आहेत असे मी म्हणतो. अशा पद्धतीने रुग्णालय चालवत असतील, तर मंगेशकर कुटुंब कलंक आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

रावेतकरांचा वचक होता तो आताच्या आरोग्यप्रमुखांच्या नशिबी कुठला ? त्यांच्या निर्णयाला IMA ने केला कडाडून विरोध,म्हणाले,’तुमची सक्ती गैरलागू…

पुणे- महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदी डॉ. अनिल रावेतकर,जी बी परदेशी ,रुपचंद परदेशी ,डॉ. धायगुडे अशा महापालिका अधिकाऱ्यांनी काम केले आहे. शहराच्या आरोग्याची जबाबदारी आपली मानून काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा खाजगी , शासकीय अशा सर्वच रुग्णालयांवर जो वचक होता तोच वचक आता या पदावर सरकारी अधिकारी येऊ लागल्याने आणि प्रचंड भ्रष्ट कारभार वाढल्याने हरवून गेलाय . त्यांचे तोंडी आदेश सूचना यांना जो सन्मान होता तो आता लेखी पत्रांनाही उरला नसल्याचे स्पष्ट झालेय .
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर प्रथम उपचार करा, त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे नोटीसीत नमूद केले. तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्ती महापालिकेने केली आहे. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाकडून पुणे महापालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे. प्रशासनाची सक्ती गैरलागू असल्याचे आयएमएने म्हटले आहे. रुग्णाची इमर्जन्सी नेमकी कशी ठरवायची? असा अर्थहीन सवाल मेडिकल असोसिएशनने महापालिकेला केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेच्या उपचारासाठी नकार दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासनाने खडबडून जागे होत शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास मनाई केली आहे. याबाबत रुग्णालयांना नोटसी बजावण्यात आली. मात्र, आता या निर्णयाला आयएमएने विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याप्रमाणे इस्टिमेट देणे आणि ॲडव्हान्स घेणे हे कायदेशीरमेडिकल असोसिएशन

रुग्णालये ही प्रथम सेवा आहे धंदा नंतर … असे मानणाऱ्या ना आता धक्क्यावर धक्के बसणार आहेत .कारण डिपॉझिट घेणे हे कायदेशीर असल्याचा दावा मेडिकल असोसिएशन ने केला आहे. तातडीच्या रुग्णांकडून पैसे घेऊ नयेत, ही महापालिकेची सक्ती गैरलागू असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. अनेक जण याचा गैरफायदा घेतील, असा दावाही असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. महापालिकेने यावर विचार करावा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाने केली आहे.रुग्णाची इमर्जन्सी नेमकी कशी ठरवायची? असा सवाल करीत इमर्जन्सीमध्ये कुठलाही डॉक्टर आधी पैसे मागत नाही. आधी पेशंटची ट्रीटमेंट करतो, असा हास्यास्पद दावा मेडिकल असोसिएशनने केला आहे . महापालिकेच्या या निर्णयाचा अनेक जण गैरफायदा घेत आहेत. या नोटीसीचा देखील विपर्यास केला जात असल्याचे आयएमएने म्हटले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्याप्रमाणे इस्टिमेट देणे आणि ॲडव्हान्स घेणे हे कायदेशीर आहे. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयाचे नियम हे वेगळे असतात. महापालिकेला देखील याबाबत आम्ही उत्तर देऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

फुले वाड्याच्या स्मारकासाठी आंदोलनाचा इशारा – छगन भुजबळ

पुणे शहरातील महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी छगन भुजबळ यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली. यावेळी महात्मा फुले वाडा स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरणासाठी भूसंपादनाच्या कामास गती न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
भुजबळ म्तहणाले,’त्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘महात्मा फुले वाडा’ राष्ट्राला अर्पण करण्यात आला. तेव्हापासून या ठिकाणी देशभरातील फुलेप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत असते. या महात्मा फुले वाड्याच्या नजीकच पुणे महानगरपालिकेने उभारलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे. या दोनही स्मारकांत अंतर कमी असल्याने यादरम्यान रस्ता तयार करून त्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे यासाठी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मोठा लढा दिला, तसेच सातत्याने शासन दरबारी पाठपुरावाही केला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून या स्मारक परिसराचे एकत्रीकरण करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामासाठी तातडीने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १०० कोटी रुपयांचा निधी मार्चअखेर वितरित करण्यात आला आहे. असे असतानाही प्रत्यक्षात पाहणी केली असता या ठिकाणी कुठलेही काम होताना दिसत नाही. विशेषतः या परिसरातील लोक स्वतःहून पुढे येत जागा द्यायला तयार असताना कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालून तत्परतेने काम करत आहेत, तर दुसरीकडे अधिकारी मात्र काम करताना दिसत नाही.
अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर जे लोक स्वतःहून पुढे आले आहेत त्यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट घालून दिली. हे सर्व लोक महापालिकेला सहकार्य करत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. यावर अधिकाऱ्यांनी देखील एक महिन्याच्या आत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे म्हटले आहे.

पुणे-मी जरी सरकार मध्ये असलो तरी देशात व राज्यात जातीय जनगणना करण्याची आमची मागणी पूर्वीपासून असून ती आज देखील ठाम आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गाने जाणारे असून समाजातील सर्वांना न्याय मिळावा हीच अपेक्षा असल्याचे मत माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

महात्मा फुले वाडा येथे भेट दिल्यानंतर ते म्हणाले, आम्ही अनेक वर्षापासून भव्य स्मारक होण्याची जागेची मागणी करत आहे. याठिकाणी महात्मा फुले जयंती कार्यक्रम अनेक वर्षापासून करत आहे. फुलेवाड्याच्या आजूबाजूची जागा मोकळी झाली तर पार्किंगकरिता, सभा घेण्यासाठी मोकळी जागा होईल. या जागेसाठी अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत आहे यासाठी आरक्षण असेल, नोटीस देणे असेल, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे या गोष्टी हळूहळू होत आहे, असे भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी १०० कोटीचा निधी जाहीर केला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध होण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु महात्मा फुले वाड्याचे स्मारकाचा कामाचा वेग शून्य आहे असे सांगत भुजबळ यांनी मनपा अधिकाऱ्यांचे कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अनेक लोक जागा देण्यासाठी तयार असताना, मनपा अधिकारी टोलवाटोलवी करत आहे. पुढे काही झाले नाहीतर मला इथेच आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. सरकारला विचारावे लागेल प्रत्येक वेळी आंदोलन केले की, कामाला पुढे वेग मिळेल का? आता आठ दिवस वेळ अधिकाऱ्यांनी मागितला आहे नाहीतर उपोषण करायला मी सध्या मोकळाच आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मदत करतात परंतु मनपा अधिकाऱ्यांना काय अडचण समजत नाही, अशा शब्दांत भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी फुलेवाड्याची पाहणी केली. त्याचवेळी महात्मा ज्योतिराव फुले जयंती शुक्रवारी असल्याने त्याचा अनुषंगाने पुण्यातील फुलेवाडा परिसरात महात्मा फुले यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचा आढावा घेण्यासाठी शेलार पाहणी करत असताना, छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याने सदर दोघांची भेट होऊन चर्चा झाली. फुले यांच्यावरील सिनेमा हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे आणि त्याला कोणी विरोध करु नये असे मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

सेवाभावी शिक्षकांमुळे दिव्यांग स्वावलंबी व स्वाभिमानी-प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

‘लायन्स’तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आनंद मेळावा

पुणे: “सामान्य मुलांना शिकवताना अनेक आव्हाने असतात. अशावेळी सेवाभावी, संयमी वृत्तीने दिव्यांग मुलांना घडविण्याचे, त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनवण्याचे काम तुम्ही शिक्षक करत आहात. अशा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान देत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके यांच्या पुढाकाराने लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षक आनंद मेळाव्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा, रमेश शहा, सचिन नहार, संयोजिका सीमा दाबके आदी उपस्थित होते. यावेळी हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू यांचे विशेष व्याख्यान झाले. कार्यक्रमात दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमोल शिनगारे, अभिजित शिंगडे, तृप्ती चोरडिया, सारा जोशी, ऋत्विक जोशी यांचा सन्मान करण्यात आला.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “दिव्यांग मुलांना घडवणारे शिक्षक धैर्याचे काम करीत आहेत. शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी त्यांना सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. त्यातून निसर्गातील असमतोल कमी होण्यास मदत होईल. त्यांचे अवलंबित्व कमी करून त्याचे रूपांतर संसाधनात व्हावे. सामाजिक जाणीव असलेली अनेक मंडळी समाजात कार्यरत असून, त्यांचे कार्य सरकारला पूरक आहे. सीएसआरमधून काही चांगले उपक्रम राबवता येतील का, यावर भर दिला पाहिजे. ‘दिव्यांग’ या संकल्पनेवर भव्य प्रदर्शन भरवावे.”

प्रवीण पुरी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, आई वडिलांचे योगदान असते. दिव्यांग शिक्षकांना प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञान वापराचा उपयोग यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विनाअनुदानित दिव्यांग शाळांनाही विशेष अनुदान देण्याबाबत योजना राबवली जात आहे. दिव्यांग कल्याणासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.”

डॉ. दीपक शहा म्हणाले, “समाजात चांगले काम करणारी लोकं आहेत. सेवाभावी लोकांमुळे समाज घडत असतो. दिव्यांग शिक्षक अद्वितीय काम करत आहेत. त्यांच्यातील सहनशीलता प्रेरक आहे.” उपेक्षित घटकाला सहाय्य करून त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे रमेश शहा म्हणाले.

सीमा दाबके प्रास्ताविकात म्हणाल्या, “दिव्यांगासाठी गेली चार दशके उपक्रम सुरू आहे. या दिव्यांगाना घडवणार्‍या शिक्षकांसाठी उपक्रम करावा, या भावनेतून गेल्या वर्षीपासून हा आनंद मेळावा घेतला जात आहे. ही एकप्रकारे त्यांच्याप्रती कृतार्थता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे.”

प्रज्ञाचक्षू ब्रह्मदेव काटे यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंजली चौथाई यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा इंदोरमधील शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद, सामाजिक उपक्रमांवर भर

“८०% समाजकारण, २०% राजकारण हेच शिवसेनेचे ब्रीद” – डॉ. गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मध्यप्रदेश दौऱ्यावर…

इंदोर – महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर असून, आज इंदोरमध्ये त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या सदिच्छा भेटीत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनेबद्दलचा अभिमान अधिक बळावला आहे.

“जो उत्साह आणि प्रेरणा तुम्ही दाखवलीत, त्यासाठी मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि तुमचे अभिनंदन करते,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” हेच शिवसेनेचे खरे तत्व आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख करत, “त्यांचा सन्मान प्रत्येक ठिकाणी होतो आणि कार्यकर्त्यांनाही त्याचा आनंद मिळतो,” असे त्यांनी नमूद केले.

या संवादात त्यांनी माजी आमदार अभिजीत अडसूळ यांचाही विशेष उल्लेख केला. “अभिजीत अडसूळ यांनी राष्ट्रीय पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये शिवसेनेची व्याप्ती वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे,” असे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.

पुढे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “आपण भारताच्या शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी आणि विकासासाठी काम करतोय,” आणि त्याचबरोबर सामाजिक न्यायाच्या कार्यावरही भर देण्याचे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे मार्गदर्शक असल्याचे सांगत, गरजूंसाठी आरोग्य शिबिरे, शिक्षणातील मदत यांसारख्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले.

या बैठकीस सुरेश गुजर (मध्यप्रदेश संपर्कप्रमुख, इंदोर), राजीव चतुर्वेदी (राज्यप्रमुख, भोपाळ), नासिर कंसाना गुजर (प्रदेश सचिव), जितेंद्र चतुर्वेदी (महासचिव), भरत तिवारी (प्रदेश सचिव, इंदोर), जया सर्दाना (जिल्हा प्रभारी, इंदोर), वर्षा डोबियार (जिल्हा प्रमुख, इंदोर) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२५’ महोत्सवाचे आयोजन

पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डिजिटल स्ट्रॅटेजिक अडवायझर सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित अतिथी, सहभागी उत्साही विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 या महोत्सवामध्ये ‘मास्टर अँड मिस टेक्नोक्रॅट्स’, ‘माईंडस्वीपर’, ‘बॅटल विथ कोड’, ‘डिझाईन फायर’, ‘गेम ग्लायडर’, ‘सस्टेनप्रेन्युअर’, ‘बिझनेस लिंगो’, ‘लीग ऑफ लीडर्स’ व ‘मास्टर अँड मिस मॅनेजर’ अशा नऊ वैविध्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. देशभरातील ४० इन्स्टिट्यूट्समधील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेतील नोंदणी ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया विनासायास पार पाडण्यासाठी ‘ईआरपी’ प्रणाली वापरण्यात आली. उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिके संस्थेतील व बाह्य स्पर्धकांसाठी स्वतंत्र गटांमध्ये विभागली गेली होती. संस्थेतील प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासह नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव उपयुक्त ठरला. शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी ‘टेकफेस्ट’सारखे शैक्षणिक उपक्रम महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवण्यासाठीची कौशल्ये विकसित होण्याला प्रोत्साहन मिळते. सखोल नियोजन आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. यासह विद्यार्थ्यांनी टीमवर्क, सहकार्य भावना आणि प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षमता विकसित करण्याचे ज्ञान आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष संगणकीय आव्हानांवर केला, ज्यामुळे त्यांना मौल्यवान अनुभव आणि उद्योगाशी संबंधित परिस्थितींचा प्रत्यक्ष परिचय मिळाला. ‘सूर्यदत्त’मध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.”

‘मास्टर अँड मिस टेक्नोक्रॅट्स’मध्ये तांत्रिक, तार्किक आणि सॉफ्ट स्किल्सचे मूल्यमापन, प्रश्नमंजुषा, गटचर्चा, समस्या सोडविण्याच्या फेऱ्या आणि उद्योग तज्ज्ञांमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती असे स्वरूप होते. ‘माईंडस्वीपर’ स्पर्धेत वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर उपाय तयार करण्यासह कोडिंग व अ‍ॅप्लिकेशन विकास कौशल्य दाखवायचे होते. ‘बॅटल विथ कोड’ ही एक प्रोग्रॅमिंग स्पर्धा होती. यामध्ये डिबगिंग, अल्गोरिदम ऑप्टिमायझेशन आणि स्पर्धात्मक कोडिंग करायचे होते. ‘डिझाईन फायर’ ही डिझाईन स्पर्धा होती. ज्यामध्ये युझर-फ्रेंडली वेब आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार करायची होती. गेमिंग स्पर्धा असलेल्या ‘गेम ग्लायडर’मध्ये स्पर्धकांना धोरणात्मक विचारशक्ती, संघभावना आणि त्वरित प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेची चाचणी द्यायची होती. ‘सस्टेनप्रेन्युअर’ ही उद्योजकतेवरील आधारित स्पर्धा होती, ज्यामध्ये स्पर्धकांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याचा उपयोग करून सामाजिक परिणाम साधणाऱ्या शाश्वत व्यवसाय कल्पनांची मांडणी करायची होती. ‘बिझनेस लिंगो’मध्ये व्यावसायिक संवाद कौशल्य, कॉर्पोरेट शिष्टाचार, वाटाघाटी कौशल्ये आणि सादरीकरण दाखवायचे होते. ‘लीग ऑफ लीडर्स’ ही नेतृत्व क्षमता स्पर्धा होती, ज्यामध्ये निर्णयक्षमतेचे, धोरणात्मक नियोजनाचे आणि संघ व्यवस्थापन कौशल्यांचे मूल्यमापन सिम्युलेशन्स आणि केस स्टडीजच्या माध्यमातून करण्यात आले. व्यवस्थापन कौशल्य स्पर्धा असलेल्या ‘मास्टर अँड मिस मॅनेजर’मध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्व गुणधर्म याचे मूल्यमापन झाले, असे डॉ. मनीषा कुंभार यांनी नमूद केले.

अभिनेत्री माधुरी पवार करणार डबल धमाका

‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री माधुरी पवार तीच्या नव्या प्रोजेक्ट विषयी सांगते, “देणेवाला जब भी देता…देता छप्पर फाडके अशी माझी सध्याची भावना आहे. माझ्याकडे काही चित्रपट व सीरीज असल्या कारणाने मी गेले २ वर्ष टीव्ही मालिका केलेली नाही. मालिकांच आणि माझ जवळच नात आहे. अप्सरा आली हा डान्स रिएलिटी शो जिंकल्यानंतर मी तुझ्यात जीव रंगला तसेच देवमाणूस या सीरियल केल्या. मला मालिका आवडतात. कारण मालिकांमुळे आपण घराघरात दररोज पोहचतो. आपल काम लोकांपर्यंत पोहोचत.”

पुढे ती सांगते, “मी आता दोन्हीकडे शूट करत आहे. स्टार प्रवाह वर येड लागलं प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे हे शोज मी करत आहे. येड लागलं प्रेमाच या सीरियल मध्ये मी निकी हा नेगेटिव्ह रोल करत आहे. ही भूमिका बिनधास्त, नीडर आणि रावडी आहे. तर शिट्टी वाजली रे या रिएलिटी शोमध्ये धम्माल मस्ती करताना मी तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट मध्ये मी वेगवेगळ्या भूमिकेत तुमच्या भेटीला येणार आहे. माझा सगळ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे की तुम्ही हे कार्यक्रम नक्की बघणार. तुमच प्रेम कायम असच राहो हीच सदीच्छा!”

बापरे भाजपाला तब्बल 2243 कोटीची देणगी म्हणजे 88% रक्कम एकट्या भाजपाच्या वाट्याला! मग पैशावरच्या निवडणुका या एकतर्फीच होणार! : आम आदमी पार्टी

पुणे- ८८ टक्के राजकीय देणगी रक्कम एकट्या भाजपकडे असेल आणि तीही प्रामुख्याने मोठ्या भांडवलदारांकडून मिळाली असेल तर या निवडणुका न्यायपूर्ण रास्त कशा होणार असा प्रश्न आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी असे म्हटले आहे कि,’निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि मुख्यत्वे वीस हजार पेक्षा अधिक रकमेच्या डोनेशनची जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून एडीआर या संस्थेने त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार २०२३- २४ सालात भाजपला २२४३ कोटी रक्कम मिळाली तर काँग्रेसला याच काळामध्ये २८१ कोटी तर आम आदमी पार्टीला केवळ ११ कोटी रक्कम मिळाल्याचे दिसते.

भाजपला या आधीच्या वर्षी ७१९ कोटी मिळाले होते तिथपासून ही २२४३ कोटी एवढी मोठी उडी भाजपने मारली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रोरल बाँड याचा सहभाग असणार आणि सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी २०२४ मध्ये इलेक्ट्रोरल बाँड बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. अर्थात त्या देणगीदारांची चौकशी मात्र झाली नाही. परंतु इलेक्टोरल बाँड चा उपयोग मुख्यत्वे भाजपलाच होत होता. याचे कारणही उघड आहे. त्यावरती सुप्रीम कोर्टाने पण शंका उपस्थित केली होतीच. काही कंत्राटी डोनेशन्स याचा संबंध स्पष्टपणे अधोरेखित करता येतो असे अनेक पत्रकारांनी पुढे आणलेपण होते.
यात भाजपाच्या तुलनेने काँग्रेसही खूप मागे दिसतो तर आम आदमी पार्टी त्यांच्या देणगीच्या एक टक्के सुद्धा रक्कम मिळूवू शकली नाही हे दिसतेच आहे. तरीही दिल्ली पंजाब अशा ठिकाणी आम आदमी पार्टीने जबरदस्त लढत दिली.

यातून पुढे येणारा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे या डोनेशन देणाऱ्यांची संख्या! या अहवालाप्रमाणे भाजपला २२४३ कोटी रक्कम ८३५८ देणगीदारांकडून मिळाली तर आम आदमी पार्टीला ११ कोटी रक्कम ही १६७१ देणगीदारांकडून मिळाली. याचा अर्थ भाजपला सरासरी एका देणगीदाराकडून २६ लाख रुपये मिळाले तर आम आदमी पार्टीला ६५ हजार रु देणगीदारामागे मिळाले. यावरून भाजपला देणारे हे अदानी अंबानी या भांडवलदार/ व्यावसायिक वर्गातील (८९%) आहेत हे उघड आहे तर आम आदमी पार्टीला देणगी देणारा हा मुख्यत्वे वैयक्तिक देणगीदार आहे हे लक्षात येते. त्यामुळेच भाजपची धोरणे अदानी सारख्यांच्या सोयीची का असतात हेही उघड होते असा आरोप आपचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये इलेक्टोरल ट्रस्ट सोबत एसीएमई सोलर एनर्जी (पवनचक्की), रुंगटा सन्स (खाण उद्योग (,भारत बायोटेक (वॅक्सिन), आयटीसी इन्फोटेक अशा कंपन्या आहेत. साधारणपणे या कंपन्यांनी प्रत्येकी ५०- ८० कोटी रक्कम दिलेली आहे. त्याचा संबंध त्यांना मिळालेल्या कंत्राटांशी कसा आहे हे पहावे लागेल.

 ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने आज जाहीर केलं की लीसेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपट ट्रेलमध्ये आता एक नवीन मूर्ती सामील होणार आहे आणि ती आहे यशराज फिल्म्सच्या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) ची! ही लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारली जाणारी पहिली भारतीय चित्रपट मूर्ती ठरेल! याचबरोबर DDLJ च्या 30 व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचीही सुरुवात होईल – हा चित्रपट एक अजरामर आणि पुरस्कारप्राप्त रोमँटिक कॉमेडी आहे, ज्याने आदित्य चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता.

ही कांस्य मूर्ती बॉलिवूडचे दोन सुपरस्टार – शाहरुख खान आणि काजोल – यांना DDLJ मधील प्रसिद्ध पोजमध्ये दाखवेल. या वर्षीच्या वसंत ऋतूमध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आज झालेली ही घोषणा याचे उदाहरण आहे की ब्रिटनमधील 50 लाखांहून अधिक दक्षिण आशियाई समुदाय DDLJ या चित्रपटावर किती प्रेम करतो. हा चित्रपट भारत आणि जागतिक दक्षिण आशियाई समाजासाठी एक पॉप-संस्कृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे.

DDLJ मध्ये राज आणि सिमरन या दोन एनआरआयंची कथा आहे, जी युरोप आणि भारतात फिरते, आणि जी किंग्स क्रॉस स्टेशन येथून सुरू होते. विशेष बाब म्हणजे, लीसेस्टर स्क्वेअरचा भाग DDLJ मधील एका दृश्यात दिसतो, जिथे राज आणि सिमरन पहिल्यांदा (अनभिज्ञपणे) भेटतात. या दृश्यात स्क्वेअरमधील दोन प्रमुख सिनेमागृह दिसतात — राज Vue सिनेमा समोर आहे, आणि सिमरन Odeon स्क्वेअरच्या पुढे चालत आहे.

हा नवीन पुतळा Odeon सिनेमा बाहेरील पूर्व टेरेसवर बसवला जाईल, त्या दृश्याच्या सन्मानार्थ. चित्रपटात लंडनमधील इतर ठिकाणं — Horseguards Avenue, Hyde Park, Tower Bridge, आणि King’s Cross Station देखील दाखवण्यात आली आहेत.

या चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पडला आहे, इतका की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत भेटीदरम्यान DDLJ चा उल्लेख केला होता. यूकेमध्ये या चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्व आजही कायम आहे. याच चित्रपटावर आधारित Come Fall In Love – The DDLJ Musical हे नवीन संगीत नाटक 29 मे 2025 पासून मॅंचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये सुरू होणार आहे. 140 दशलक्षांहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स असलेले शाहरुख खान हे आजच्या काळातील सर्वात प्रिय अभिनेता आहेत.

DDLJ मधील शाहरुख खान आणि काजोल आता ‘सीन्स इन द स्क्वायर’मध्ये आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांसोबत समाविष्ट होणार आहेत — मागील 100 वर्षांतील 10 अन्य आयकॉनिक पात्रांमध्ये हैरी पॉटर, लॉरेल और हार्डी, बग्स बनी, जीन केली (सिंगिंग इन रेन), मैरी पॉपिंस, मिस्टर बीन, पैडिंग्टन आणि DC सुपरहीरोज बैटमैन आणि वंडर वीमेन यांचा समावेश आहे.

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विल्यम्स म्हणाले: “शाहरुख खान आणि काजोल या आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतातील दिग्गजांना आमच्या ट्रेलमध्ये समाविष्ट करणे हा एक सन्मान आहे. DDLJ ही सर्वाधिक यशस्वी आणि महत्त्वपूर्ण बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. ही प्रतिमा केवळ बॉलिवूडच्या जागतिक लोकप्रियतेचे प्रतीक नाही, तर लंडनच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सवही आहे. आम्हाला खात्री आहे की जगभरातून चाहते लीसेस्टर स्क्वेअरमध्ये भेट देतील, जे चित्रपट आणि मनोरंजनाचे केंद्र आहे.”

यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी, म्हणाले,”जेव्हा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. ही ‘Scenes in the Square’ मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय फिल्म ठरते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हा पुतळा DDLJ च्या 30 वर्षांच्या प्रवासाचा गौरव आहे आणि युकेमध्ये या चित्रपटाने साधलेला सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित करतो. हा पुतळा भारतीय चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय आकर्षण दर्शवतो आणि सिनेमा माध्यमातून समुदायांमध्ये मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.”

Yash Raj Films’ historic blockbuster Dilwale Dulhania Le Jayenge becomes the first-ever Indian film to be honored with a statue in Leicester Square, London!

Heart of London Business Alliance today announced a new statue will be joining the exciting ‘Scenes in the Square’ movie trail in Leicester Square, with Yash Raj Films’ historic blockbuster Dilwale Dulhania Le Jayenge (DDLJ) becoming the first-ever statue honouring Indian cinema to be erected in London. This will mark the start of 30-year celebrations of DDLJ, one of the most loved blockbuster Hindi films of all time, the timeless and multi award-winning rom-com which also marked the directorial debut of Aditya Chopra.

The bronze statue will depict the two Bollywood megastars, Shah Rukh Khan and Kajol, in an iconic DDLJ pose. Set to be unveiled in Spring this year, today’s announcement signifies how the film is loved by the over five million strong British South Asian community. DDLJ is a pop culture milestone for India and South Asians globally.

Dilwale Dulhania Le Jayenge follows two non-resident Indians, Raj and Simran, and their star-crossed love story across Europe and India, beginning on a train from King’s Cross Station. The location couldn’t be more fitting, with Leicester Square featuring in DDLJ in a scene when Raj and Simran first cross paths, albeit unbeknown to one another, before setting off on their European adventure. Fittingly, the scene features two of the square’s cinemas prominently, with Raj seen in front of the Vue cinema, and Simran walking past the Odeon Leicester Square.

The new statue will be positioned along the eastern terrace, outside the Odeon cinema, honouring this scene. Other London locations featured in the film include Horseguards Avenue, Hyde Park, Tower Bridge and King’s Cross Station.

The film has left a lasting impact on Indian cinema, becoming such a global phenomenon that even Barack Obama, the then President of the United States, referenced it on his official state visit to India. In UK, the film’s cultural significance remains, with a new musical based on DDLJ, Come Fall In Love – The DDLJ Musical, set to start at the Manchester Opera House on 29th May, 2025. With over 140 million followers on social media, Shah Rukh Khan, the film’s leading man, is the most loved actor of our times.

The DDLJ stars Shah Rukh Khan & Kajol join the who’s who of international cinema at Scenes in the Square, alongside ten other film icons from the past 100 years. DDLJ will be next to iconic film characters like Harry Potter, Laurel & Hardy, Bugs Bunny, Gene Kelly in Singin’ in the Rain, Mary Poppins, Mr. Bean, Paddington and DC Super-Heroes Batman and Wonder Woman.

Mark Williams, Deputy Chief Executive at Heart of London Business Alliance, says: “It’s fantastic to have the opportunity to add to our trail Shah Rukh Khan and Kajol, who are such titans of international cinema. Dilwale Dulhania Le Jayenge is one of the most successful and important Bollywood films of all time, and we’re excited by the prospect of bringing to the trail the first film that actually features Leicester Square as a location. The statue is a fitting tribute to the global popularity of Bollywood and a celebration of London’s rich diversity. We’re in no doubt it will attract fans from all around the world to Leicester Square, the home of film and entertainment.”

Akshaye Widhani, CEO of Yash Raj Films, added: “When Dilwale Dulhania Le Jayenge (DDLJ) was released 30 years ago, the film became a defining moment for Indian cinema and changed the face of the industry, capturing the hearts of everyone who saw it all over the globe. We’re thrilled to be the first Indian film to be represented in ‘Scenes in the Square’. It also marks 30 years of DDLJ, a film that has spread love and joy globally and shows the cultural impact it has had in UK. We are honoured that our superstars and our film are being recognized on the world stage alongside the Hollywood elite, from Gene Kelly to Laurel & Hardy to Harry Potter. This statue will be a great way to express the international appeal of Indian movies and build bridges amongst communities through cinema.”

सूर तालातून उलगडले सुधीर फडके यांचे संगीत युग

जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात ‘बाबूजी आणि मी’ कार्यक्रमात श्रीधर फडके यांचे सादरीकरण

पुणे : ‘ स्वयें श्रीरामप्रभु ऐकती   कुश लव रामायण गाती’ अशा गीतांमधून उलगडणारे ‘गीत रामायण’, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, सुधीर मोघे यांच्यासारख्या गीतकारांसोबत जुळलेले सूर, अशा अनेकविध आठवणींमधून ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जीवनप्रवास आणि संगीत प्रवास उलगडला.

श्री सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित ‘बाबूजी आणि मी’ या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी आपल्या वडिलांसोबतच्या अनेक आठवणींना सुरांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी आपल्या वडिलांबरोबरच स्वतः संगीतबद्ध केलेली भावगीते आणि सुगमगीते सादर केली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर आणि अजय बहिरट यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर, तबलावादक तुषार आंग्रे, सिंथेसायझर वादक ओमकार पाटणकर, तालवाद्य वादक आदित्य, आणि बासरीवादक निलेश देशपांडे यांनी सुरेल साथसंगत केली.

श्रीधर फडके म्हणाले, बाबूजींची बहुतेक सर्व गाणी ही शास्त्रीय संगीतावर आधारित असूनही सुगम आहेत. त्यांच्या गाण्यांमधील भाव रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तो प्रयत्न यशस्वी झाला तर मी स्वतःला एक कलाकार म्हणून धन्य मानतो.

कार्यक्रमाची सुरुवात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या “देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देव्हाऱ्यात” या गीताने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना आणि श्रीधर फडके यांचे संगीत असलेले ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ हे गीत सादर करत वातावरण भक्तिमय केले.

यानंतर गीतकार सुधीर मोघे यांचे ‘सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ हे सुधीर फडके यांनी गायलेले गीत सादर झाले. त्याचबरोबर ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ हे श्रीधर फडके यांनी स्वतः संगीतबद्ध केलेले गीत सादर करत, त्यांच्यात बाबूजींचा संगीत वारसा कसा उतरला आहे, हे दाखवून दिले. ‘रूपे सुंदर सावळा गे माय,’ ‘बाई मी विकत घेतला श्याम,’ ‘तोच चंद्रमा नभात’ अशा एकाहून एक सरस गीतांनी श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांनी मैफल रंगवली.–

योगाभ्यानंद माधवनाथ महाराज पादुका पूजन 

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : प.पू. योगाभ्यानंद माधवनाथ महाराज यांच्या पादुका पूजन व दर्शन सोहळा बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेतले.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, योगाभ्यानंद माधवनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय नामजोशी, नीलिमा नामजोशी यांचा यावेळी ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला. तर, माध्यान्ह आरती मृणालिनी हेमंत रासने यांच्या हस्ते झाली. माधवनाथ महाराज हे श्रीमंत दगडूशेठ व श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे अध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या पादुका इंदौर येथून पुण्यात आल्या असून दत्तमंदिरात पूजनासाठी व दर्शनासाठी आल्या होत्या.