Home Blog Page 3664

सत्ता हिसकावून घेण्याची घाई भाजपला ; फसव्या जाहिराती आणि मार्केटिंग पासून सावधान -शरद पवार

0

SHARAD_PAWAR_98944f
सातारा- महाराष्ट्राची सत्ता हिसकावून घेण्याची घाई भाजपला झाली असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने खालची पातळी गाठली आहे. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत अथवा वस्तूस्थितीपेक्षा काहीतरी वेगळेच सांगितले जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेल्या जाहिरातीद्वारे हा पक्ष महाराष्ट्राला बदनाम करीत आहे,अशा फसव्या , दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अयोग्य आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली
शरद पवार आज सातारामधील पाटण येथे प्रचार दौ-यावर आहेत. पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचाराला पवार आले असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यासाठी ते वाट्टेल त्या थराला, प्रचाराला जात आहेत. आता भाजपची टीव्हीवर एक जाहीरात येत आहे. म्हणे मागील आमक्या आमक्या वर्षात एवढ्या एवढ्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या. बरं त्या आत्महत्या नव्हे तर हत्या आहेत हत्या आहेत असे जाहिरातीत ठासून सांगितले जात आहे. मात्र, ते चुकीचे आहे.
राज्यात मागील काळात शेतक-यांनी जरूर आत्महत्या केल्या. त्याला अनेक वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, भाजप ज्या पद्धतीने जाहिरातीतून जो चुकीचा प्रचार करीत आहे. त्यातून राज्याचा, महाराष्ट्राचा अवमान होत आहे. देशात आजही जी काही मोजकी प्रगतीशील राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र खूप वरच्या स्थानावर आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत सत्ता हिसकावून घेण्याची घाई जी भाजपला झाली आहे त्याला जनता चोख उत्तर देईल. राज्यातील जनता भाजपला स्वीकारणार नाही असेही पवारांनी सांगितले.

सी लिंक ची ‘ गुलाबी रात ‘

0

प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला मुंबईच्या वांद्रे-वरळी सागरी सेतू शुक्रवारी गुलाबी रंगाने उजळून निघाला होता. ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ‘एस्टी लाऊडर’ या कंपनीतर्फे सागरी सेतूवर ही गुलाबी रोषणाई केली जात आहे. हा सेतू १0 ऑक्टोबरपर्यंत असाच गुलाबी रंगात न्हाऊन निघणार आहे.

खडकवासल्यातही लाट परिवर्तनाची

0

————————————-ncp-sharad-pawar-2014 copy
कसबा विधानसभा मतदार संघानंतर खडकवासल्यातही परिवर्तनाची लाट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येतो आहे खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार , महापौर दत्ता धनकवडे, युवक अध्यक्ष अजित बाबर पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष काका चव्हाण, माजी आमदार कुमार गोसावी पंचायत समिती सदस्य नितीन दांगट यांनी एकत्रितपणे केला आहे
पुणे महापालिका हद्दीलगच्या ३४ गावांमध्ये झपाट्याने नागरिकरण वाढले आहे. या गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दिलीप बराटे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून मोठे काम केले आहे. उत्तमनगर, कोंढवे -धावडे, शिवणे, कोपरे या गावांसाठी जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना पूर्ण करून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. शिवगंगा खोर्‍यातील व रांजणे, खामगांव, मावळ, मोगरवाडी, व घेरासिंहगड येथील वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रय▪करणार असल्याचेही दिलीप बराटे यांन यावेळी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवण झालेल्या सिंहगड किल्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्यागाची व शौर्याची आठवण करून देणारे ‘स्वराज्य निष्ठा शिल्प’ उभारण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा मतदारसंघात खानापूर, नर्‍हे, धायरी, वडगांव खुर्द, कोंढवे आदी गार्डन व काकडे सिटी (वारजे) या ठिकाणी सबस्टेशनची ऊर्जा विभागाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी दिलीप बराटे यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगरपालिका हद्द व लगतच्या गावांमध्ये उड्डाणपूल, उद्याने, मोठे व प्रशस्त रस्ते, कचरा निर्मूलनासाठी बायोगॅस प्लॅंटची निर्मिती, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना, मतदारसंघात सुसज्ज असे रुग्णालय, ई – लर्निंग स्कूल, तंत्रशिक्षण, बिझनेस व कर्मशिअल हब, युवकांचे सशक्तीकरण तसेच बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बचत बाजार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही दिलीप बराटे यांनी सांगितले.
कोंढवे धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, शिवणे येथे दिलीप बराटे यांची पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये हजारो नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितील यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. माजी आमदार कुमार गोसावी, पुणे महापालिकेचे महापौर दत्ता धनकवडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदाताई वांजळे, शेखर दांगट पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन दांगट, कोंढवे धावडेचे उपसरपंच अतुल धावडे, माजी नगरसवेक शैलेश चरवड, सुरेशअण्णा गुजर, अहिरेगावचे माजी उपसरपंच सत्यनारायण आबा वांजळे, मारुती किंडरे, रमेश धावडे, गणेश धावडे, युवराज मोरे, माणिक मोकाशी, त्र्यंबक मोकाशी, विजय गायकवाड, बाळासाहेब दांगट या पदयात्रेत सहभागी झाले होते. दिलीप बराटे यांनी आज घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी बराटे यांना विविध समस्यांची जाणीव करून दिली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी एक दिलाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप बराटे यांचा प्रचार करीत आहेत.

कसब्यात लाट आहे पण … परिवर्तनाची

0

11
———————————————
कसबा विधानसभा मतदार संघात लाट आहे पण ती नरेंद्र मोदी यांची नाही तर परिवर्तनाची लाट आहे , या मतदार संघात कसबा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांच्या प्रचाराने चांगलीच रंगत आणली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी काल कसबा विधानसभा मतदार संघातून अनेक जुन्या इमारतींबाबत अभ्यास करून जुन्या वाड्यांचा प्रश्न आपण लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन दिले. येथे लाट आहे पण ती परिवर्तनाची आहे आपल्या उमेदवारीमुळे येथील प्रश्न आता रेंगाळत पडणार नाही तर वेगाने सुटतील अशी आशा मतदारांच्या कडून व्यक्त होते आहे असे यावेळी मानकर यांनी सांगितले
त्यांच्या प्रचारानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारपेठ येथून सुरू झालेली पदयात्रा केसरीवाडा, नारायण पेठ, मोदी गणपती, मुंजोबाचा बोळ, चित्रशाळा चौक, प्रभात प्रेस, माती गणपती येथील गुप्ते मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी दीपक जगताप, भगवान पालकर, दत्ता सागरे, सुरेश बांदड, कैलास कांबळे, रजनी पाचंगे, घारेताई व अनेक स्थानिक गणपती मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. पुणे शहरातील बोहरी समाजाचे धर्मगुरू अब्देअली भाईसाहब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून मानकर यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला. धर्मगुरू अब्देअली भाईसाब यांनी मानकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. कसबा विधानसभा मतदारसंघात शनिवार, नारायण व सदाशिव पेठेमध्ये मोठय़ा प्रमाणावर जुने वाडे आहेत. गेली अनेक वर्षे विविध कारणांमुळे त्यांचा विकास झालेला नसून, मोडकळीस आलेले हे वाडे धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या वाड्यांचा विकास साधताना भाडेकरू व मालक या दोघांचाही समन्वय साधून विकास करण्याबाबत मानकर यांनी दिशा दिली. आपण लवकरच भाडेकरू व मालक यांच्याशी समन्वय साधणार असून यातून नक्कीच सकारात्मक मार्ग निघेल, अशी मला आशा आहे. वाडा मालकांचे नुकसान होऊ न देता विकसकांना जादा एफएसआय देवून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे गृहप्रकल्प उभारणीला माझे प्रोत्साहन राहील. ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूचा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. राज्य व केंद्र शासनाच्या जाचक अटींमुळे हा विकास रखडला असून, पुरातत्व विभागाकडे आपण या अटी शिथिल करण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले. विकास करताना मात्र पुण्याची ओळख असणारी वाडासंस्कृती जतन करून विकास करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून येथील नागरिक जीव मुठीत घेवून राहत आहेत. त्यांना आतातरी आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरीता मी प्रयत्न करणार आहे

एलबीटी मुक्त आणि टोलमुक्त महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

छत्रपतींचा आशीर्वाद , चला देवू मोदींना साथ या भाजपच्या जाहिरातीची खिल्ली आज उद्धव ठाकरे यांनी उडविली
… अरे दिली होती तुम्हाला साथ , पण तुम्ही लाथ दिली , छत्रपतींचा आशीर्वाद मागता आहात त्याच छत्रपतींची शिकवण आहे आम्हाला दिल्ली पुढे झुकायचे नाही म्हणून अशी पुन्हा एकदा भाजपवर टीका करीत आणि त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाणांवर हि आसूड ओढीत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र एल बी टी मुक्त करू आणि टोल मुक्त हि करू त्याबरोबर जकातीची आकारणी प्रणाली हि सुसह्य अशी करू अशी घोषणा आज बोरीवली येथे झालेल्या सभेतूनकेली
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावर दरवर्षी जल्लोषात व उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणारे लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. शिवसेनेची ही वैभवशाली परंपरा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच चालत आली आहे. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याऐवजी शिवाजी पार्कावर शिवसेनेने केवळ शस्त्रपूजन करून दसर्‍याचा उत्सव साजरा केला. आणि बोरीवली येथे सभा घेतली
यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना ठाकरे म्हणाले , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत , पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत सिंचन घोटाळा बाहेर येईल म्हणून आघाडी तोडली ,आणि अजित पवार म्हणत आहेत सहा महिन्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे . आता आम्हीच सत्तेवर आल्यावर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढू . जर सिंचन घोटाळ्याची फाईल चव्हाणांकडे होती तर का नाही अजित पवारांची त्यांनी ‘जयललिता ‘ केली?का पांघरून घातले या घोटाळ्यावर ? काय दोघे घोटाळ्याची रक्कम आर्धी- आर्धी वाटून घेणार होते? श्वेत पत्रिका वगैरे सारी नाटके केली यांनी … आणि चव्हाण यांनी हि सहा महिन्यात कुठे कुठे सह्या केल्या काय कामे केली ती सारी आम्ही बाहेर काढू , काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राला लुटलंयअसेही ते म्हणाले
भाजपने २५ वर्षांची असलेली युती तोडली हे देशभरातील हिंदुत्ववादी लोकांना आवडलेले नाही . अच्छे दिन आल्यावर यांनी २५ वर्षांची साथ सोडली ते आता कोणाकोणाला घेतले बरोबर त्यांचे काय करणार ते त्यांनीच पाहावे असे ते म्हणाले

पुण्यात दहशतवादरुपी रावणाचे प्रतीकात्मक दहन

0

पुणे लोकमान्य फेस्टिव्हल तर्फे दुष्काळ व दहशतवाद रूपी रावणाचे दहन पुण्यातील नदीपात्रात करण्यात आले झेड ब्रीज येथिल नदिपात्र येथे हे दहन करण्यात आले फटाक्यांची आतिशबाजीत हा दिमाखदार पद्धतीत सोहळा पुण्यात रंगला पुणे जिल्ह्यात हा एकमेव ‘रावणदहणाचा हा कार्यक्रम होतो.सर्व वयोगटातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती २५ फुटी ‘रावण’ व ‘फायर शो’ हा कार्यक्रम यावेळी येथे पार पडलाया वेळी लोकमान्य फेस्टिव्हचे संस्थापक अध्यक्ष अँड़. गणेश सातपुते, उत्सव अध्यक्ष नरेश मित्तल निमंत्रक शुभांगी सातपुते संयोजक महेश महाले प्रितेश प्रभुने आदित्य सातपुते इ हजर होते

सर्वांत श्रीमंत उमेदवार भाजपचा … जो आहे भोजपुरी क्रिकेट लीगचा मालक

0

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून मुंबईतील भाजपचे दिंडोशीचे उमेदवार मोहित कंबोज यांचे नाव काही माध्यमांनी आज पुढे आणले आहे आहे .उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोहित कंबोज यांनी आपली संपत्ती३५३,५३ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे हा अब्जाधिश उद्योगपती राजकारणातही सक्रिय आहे. ते भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा विभागाचे अध्यक्ष आहेत. आता नुकतेच त्यांना भाजप मुंबईचे उपाध्यक्षपद दिले गेले आहे. बॉम्बे बुलियन असोसिएशन या मुंबईतील सराफी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि भोजपुरी क्रिकेट लीगचे ते मालक आहेत ते अब्जाधिश असले तरी पदवीधर मात्र नाहीत. सन२००२मध्ये ते वाराणसीहून मुंबईत आले. २००५मध्ये त्यांनी आपली ज्वेलरी कंपनी सुरू केली व आज ते अब्जाधिशांपैकी एक बनले आहेत.
जास्त शिक्षण झाले नसल्याने मोहित यांनी पहिल्यापासून व्यवसायात लक्ष घातले. मोहित यांचा मुख्य व्यवसाय रियल इस्टेट आणिर ज्वेलरी हा आहे. याशिवाय मोहित यांनी बॉलिवूड, क्रिकेट लीग, ज्वेलरी, इन्फ्रास्ट्रक्चर, हॉटेल आणि रिसोर्ट आदि क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. बॉम्बे बुलियन असोसिएशन हि सोने आणि ज्वेलरीचा व्यापार करणा-या व्यापा-यांची संघटना आहे. ही संघटना सन १९४८ मध्ये सोन्याचा व्यापार करणा-या सर्व व्यावसायिकांनी मिळून स्थापन केली होती. सध्या त्या संघटनेचे अध्यक्षपद मोहित यांच्याकडे आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर दरीत एसटी बस कोसळली -2 ठार

0

पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पांगोळीजवळ साता-याहून मुंबईकडे जाणारी एसटी बस पलटून झालेल्या अपघातात 2जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये सुमारे ३० ते ४० प्रवासी असल्याचे अपघातातील जखमींनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चालू बस रस्त्याच्या खाली उतरल्याने अचनाक पलटी झाली आणि ५० फूट खोल दरीत कोसळली अशी माहिती बसमधील एका जखमी प्रवाशाने दिली आहे. दरम्यान, पोलिस, डॉक्टर, ५ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक लोकांनी याठिकाणी मदतकार्य करण्यासही सुरुवात केली आहे. बस दरीत कोसळल्यामुळे मदतकार्यासाठी २ क्रेनही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघात झालेल्या बसचा क्रमांक MH-07 9830 असा असल्याचे समजते खंडाला पोलिस प्रशिक्षण केंद्रानजीक हि घटना घडल्याचे वृत्त आहे

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित बुध्द विहारात जाऊन पूजन

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांची आज घोरपडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती . घोरपडी बाजारातील आयप्पा मंदिरापासून या पदयात्रेस सुरुवात झाली . आजच्या पदयात्रेत रमेश बागवे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित घोरपडी भागातील विकास नगर बुध्द विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले . तसेच घोरपडी भागातील मतदारांना विजयादशमीनिमित शुभेछा दिल्या. घोरपडी बाजारातील अय्यप्पा मंदिर , घोरपडी गावमधील श्रीनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले . तर जामा मस्जिद मधील मुस्लिम बांधवांच्या नमाज पठनानंतर त्यांच्या भेटी घेतल्या . त्यानंतर घोरपडी बाजार , फैलवाली चाळ , रेल्वे गेट साईबाबा मंदिर , फिलिप्स चाळ , विकास नगर बुध्द विहार , श्रीनाथ महाराज मंदिर , मरिमाता नगर , भाजी मार्केट , जामा मस्जिद आदी भागात काढण्यात आली होती .

या पदयात्रेत पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष असिफ शेख , माजी नगरसेविका मंगला मंत्री , प्रदीप परदेशी , तुषार मंत्री , अरविंद अंगिरवाल , महेश मिश्रा , संजय वाघमारे , महावीर परदेशी , भुजंगराव मसलखांब , अक्षय राजोरे , फ्रेंकी हिरेकेरूर , सिल्वेस्टार आनंदराज , प्रविण जाधव , राजेश गायकवाड , मुकेश टिकारे , शेखर कवडे , योगेश घोडके , रुपेश गायकवाड , विजय परदेशी , अखबर बशीर खान , निलेश घोडके , प्रेम परदेशी , आरोग्यम सेल्वम हिरालाल परदेशी , बंटी पिल्ले , विजय घिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते

निवडणुकीत ‘आता होऊ द्या खर्च’ चा सूर ..

0

1

निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येक जण आश्वासनांची बरसात करताहेत. याच पाश्वभूमीवर नविन सिंग आणि राकेश आर. भोसले निर्मित ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा धमाकेदार मराठी चित्रपट येतोय. सर्वसामान्यांना आवडेल त्यासोबतच विचारवंतांनाही रुचेल अशा वास्तवदर्शी कथानकावर हा चित्रपट बेतला असून बाळकृष्ण शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. चित्रपटाचा विषय निवडणुक आणि राजकारणावर बेतलेला असल्याने याच्या संगीतात देखील याची खास झलक पहायला मिळणार आहे. पंकज छ्ल्लानी प्रस्तुत ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ हा राजकीय व्यंगपट येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय; तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि आशिष विद्यार्थी यांच्या हस्ते ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ ची गीत ध्वनीफित प्रकाशित करण्यात आली असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटात दोन गीते असून दोन्ही गीते श्रवणीय आणि रंगतदार झाली आहेत. यातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ‘आता होऊ दया खर्च’ ही रेश्मा सोनावणे त्यांच्या आवाजातील ठसकेदार लावणी गीत प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या गीताचे शब्द अरविंद जगताप यांचे असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. मराठीत प्रथमच निऑन कलर्सचा वापर करून या गीताचे सादरीकरण करण्यात आले असून प्रेक्षकांना ते पडद्यावर पाहताना त्यातील वेगळेपण जाणवेल. या सोबत ‘नटरंगी नार’ हे उर्मिला धनगर यांच्या आवाजातील गीत देखील प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार आहे.
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटात प्रेक्षकांना नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे यांच्या पारंपारिक शत्रुत्वाची कथा अधिक मनोरंजकतेने पहायला मिळणार आहे. ‘सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स’ च्या या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. सिनेमाचे छायांकन सुरेश सुवर्णा यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन अमित बाईंग, कला दिग्दर्शन संदीप इनामके यांनी केले आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते बाबासाहेब पाटील असून वितरणाची जबाबदारी ‘पिकल एन्टरटेनमेंट’ सांभाळीत आहेत.

मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांच्या लक्षवेधी भूमिका असलेल्या या चित्रपटात हिंदी ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ आणि आशिष विद्यार्थी देखील विशेष भूमिकेत दिसणार आहे. ‘एस. एम. एस. इंटरटेनमेंट’ प्रस्तुत, या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांच्यासह डॉ. विलास उजवणे, स्वप्नील राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके, विनीत भोंडे, मेडेलीना अलेक्झांड्रा, पूर्णिमा अहिरे, रसिका वझे, ज्योती जोशी, शरद शेलार, विनोद खेडकर, उज्वला गोड या कलाकारांच्या भूमिका आहेत. १० ऑक्टोबरला ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चित्रपटगृहात दाखल होतोय; त्यापूर्वी यातील सुरेल गीते निवडणुकीच्या रणधुमाळीत निश्चितच धमाल उडवून देणार आहेत.

उद्यापासून पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार महाराष्ट्रात

0

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किमान 5 दिवस प्रचार करण्यासठी येत आहेत रोज तीन जाहीर सभा यानुसार ते राज्यात 15 सभा घेतील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या मोदी बीड, औरंगाबाद आणि मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. तर, 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, गोंदिया, नाशिक येथे मोदी जाहीर सभा घेतील.

पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांचे 10 दिवस प्रचारसभेसाठी दिले आहेत. त्यानुसार मोदी 5 दिवस महाराष्ट्रात व 5 दिवस हरयाणात प्रचारसभा घेतील. प्रत्येक दिवशी 3 सभा या न्यायाने मोदी महाराष्ट्र व हरयाणात प्रत्येकी 15-15 सभा घेणार आहेत. याचबरोबर गरज पडली तर आणखी सभा घेणे शक्य आहे का याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. मात्र प्रचारासाठी आजपासून केवळ 10 दिवसच उरल्याने मोदींच्या 15-15 सभाच होणार हे जवळपास निश्चित आहे. सभा वाढवायच्या झाल्यास रोज चार-चार सभा घेण्याचे नियोजन केले जाऊ शकते का ? याची हि चाचपणी होण्याची शक्यता आहे .

मोदी म्हणजे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन -शरद पवार

0

मार्केटिंग आणि प्रोजेक्शन चे आधुनिक तंत्र नरेंद्र मोदी अवलंबत आहेत हेच तंत्र त्यांनी केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी वापरले होते आणि सत्ता मिळविल्यानंतरही वापरत आहेत बाकी नवीन काही नाही ,परदेश दौऱ्यांमध्ये मनमोहनसिंग यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत होता ते हि चांगली कामगिरी करीत परंतु त्यांनी कधी त्याचे मार्केटिंग आणि प्रोजेक्शन केले नाही . मनमोहन सिंग आणि मी असे आम्ही दोघे हि एकाच जमान्यातील राजकारणी आहोत फक्त सभा करायच्या आणि व्यासपीठावरून निघून जायचे एवढेच करीत असत . इंटरनेट सोशल मिडिया , वेब मिडिया व्हाटस अप कडे आम्ही लक्ष दिले नाही आता अन्य सर्वच पक्षातील तरुणाई हे पाहू लागली आहे असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , आताच्या सरकारला बहुमत आहे पण . पूर्वीच्या सरकारनेच घेतलेल्या निर्णयांचा अंमल सध्या दिसतो आहे भारत सरकार कडे २ वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचे वक्तव्य केले जाते पण यांचे सरकार आले मे महिन्यात मग धान्य पेरले कधी/ आणि उगवले कधी ? असा सवाल त्यांनी केला . आजकाल मार्केटिंग आणि प्रोजेक्शन आणि संवाद याकडे लक्ष दिले पाहिजे अशाच आशयाची गरज श्री पवार यांनी प्रतिपादित केली मोदी यांनी पंतप्रधान पदी असताना महाराष्ट्रात एवढ्या जास्त संख्येने सभा घेणे यावरूनच त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीला दिलेले महत्व लक्षात येते असे हि ते म्हणाले.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी अजित पवार यांनी चालविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील टिके संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले , मी कधी कोणाचे नाव घेत नाही , आणि व्यक्तिगत टीका हि करीत नाही आमच्या पक्षातील सहकाऱ्यांना असाच सल्ला देईल त्यांनी व्यक्तिगत टीका टाळून विकास कार्यक्रम मांडावेत आघाडी का कशी तुटली यावरील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले , ‘ सोनिया गांधी ची आघाडी व्हावी अशीच पूर्णतः सकारात्मक भूमिका होती मात्र राज्यातील त्यांच्या पक्षाच्या फळी तून प्रतिसाद मिळाला नाही आणि आयत्यावेळी जिथे १३०/ १४० जागा लढायची तयारी करीत होतो तिथे राज्याची निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय घेण्याची वेळ आली एकाच दिवस उरला होता आणि राज्यातील काँग्रेस ने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि त्यात काही मतदारसंघ आमच्या वाटेचे होते अशा परिस्थितीत आमच्यापुढे पर्याय नव्हता आम्हाला २८५ जागा लढविण्याचे आव्हान स्वीकारावे लागले सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर जनतेपुढे जात आहेत हि चांगली संधी असली तरी परिस्थिती अवघड आहे आणि आव्हानात्मक आहे असे हि ते म्हणाले आमची जी तयारी होती त्याहून दुप्पट जबाबदारी आता येवून पडली आहे पण दिवसेंदिवस
आत्मविश्वास हि वाढतो आहे आम्हाला नक्कीच बहुमत मिळेल असा विश्वास आहे
सिंचन घोटाळा हा राष्ट्रवादी विरोधात प्रचारासाठीच तयार केलेला विषय आहे ते म्हणाले १० वर्षात जिथे ३० हजार कोटी खर्च झाला त्यात ७० हजार कोटीचा घोटाळा होईलच कसा ?यासंदर्भात राज्याच्या प्रमुखांनी ‘ केवळ १ ते २ टक्के पाणी वाढले असे केलेले वक्तव्यही वस्तुस्थितीला धरून केलेले नव्हते असे ते म्हणाले .
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले ,महाराष्ट्राच्या निर्मिती साठी शेकडोंनी प्राण दिले हे राज्य एकसंघ राहावे अशीच इच्छा राहील , पण तरीही मला वाटते हा निर्णय राजकारण्यांनी घेवू नये तो जनतेवर सोपवावा जनमत घेवून त्यावर निर्णय व्हावा , स्वतंत्र विदर्भाच्या नावाने ज्यांनी निवडणुका लढविल्या त्यांना नाही हे हि त्यांनी नमूद केले , मुंबई हे सर्वधर्मियांचे शहर आहे सर्वांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे मराठी – गुजराती हा वाद वाढवून असे अंतर वाढविणे आपल्याला मान्य नाही . आमचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत एखाद्या नेत्याचा चेहरा घेवून आम्ही निवडणूक लढवू शकत नाही असे सांगून ते म्हणाले निवडून आलेल्या विधिमंडळ सदस्यांचा कल पाहून निवड करण्याची पद्धत आमच्या पक्षात आहे भुजबळ – आर आर -क्षीरसागर अनिल देशमुख – अजित पवार अशी ८ ते १० मंडळी राज्याचे नेतृत्व उत्तम प्रकारे करू शकतील अशा ताकदीचे आहेत , सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले नाही कारण त्यांना केंद्रात रस आहे राज्यात नाही असेही ते म्हणाले

नारायण राणे शनिवारी पुण्यात तोफ डागणार

0

माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे हे शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. सिंहगड रोडवर सायंकाळी सहा वाजता, तर कॅन्टोन्मेंटमध्ये सायंकाळी सात वाजता या सभा होणार आहेत.केंद्रात भाजपची सत्ता असली तरी सध्या वातावरण बदललेले आहे. मोदी लाट ओसरली असल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. शहरातील मतदारांची मानसिकता बदलल्याने काँग्रेसला निश्‍चित फायदा होणार असल्याचा दावा पुणे शहर काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवारांनी आज काँग्रेसभवनात संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी असल्याने आणि मानसिकता बदलत असल्याने आमचा विजय निश्‍चित असल्याचे यावेळी नमूद केले. या पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झाली असून, शहरात सगळ्या मतदारसंघांत परिस्थिती वेगळी असल्याने काँग्रेसचे उमेदवार हे सर्व ठिकाणी विजयी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी नगरसेवक संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शहरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले असल्याचे नमूद केले. तसेच, आगामी काळात प्रचाराची मदार आता पक्षाचे राज्य आणि देशपातळीवरील नेतेमंडळी सांभाळणार असून, प्रचारसभांचे आयोजन करण्यात येऊन काँग्रेस प्रचाराची राळ उडवून देणार असल्याचे बालगुडे यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे लचके तोडू पाहणार्‍या दिल्लीतील मोगलशाही सरकारला धडा शिकवा — आदित्य ठाकरे

0

राजगुरूनगर : स्वतंत्र विदर्भाच्या नावाखाली आणि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे अखंड महाराष्ट्राचे लचके तोडण्याची स्वप्ने पाहणार्‍या दिल्लीतील मोगलशाही सरकारचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राजगुरुनगर येथे दिला.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सेनेचे अधिकृत उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने मित्र म्हणून ज्यांना २५ वर्षे सांभाळले, प्रसंगी सर्व सुख दु:खात साथ दिली, त्याच मित्राने केवळ स्वार्थासाठी सहकारी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. ही निवडणूक म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाची लढाई असून भगव्याची ताकद काय आहे, ती या निवडणुकीत राज्यातील जनता दिल्लीत बसलेल्यांना दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले, युतीची बोलणी करण्यासाठी मी सेनेच्या इतर नेत्यांसमवेत भाजपच्या नेत्यांकडे गेलो होतो. परंतु चोवीस वर्षांचा हा मुलगा आमच्याशी काय बोलणी करणार? अशी भाजपच्या लोकांनी माझी संभावना केली. परंतु या निवडणुकीत युवा सेनेची ताकद काय आहे. ती तुम्हाला तरुणांच्या मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतो, असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, या आघाडी सरकारने तीन वेळा महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेस व राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. खासदार आढळराव म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आ. दिलीप मोहितेंच्या गुंडगिरी व दहशतीला तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. यावेळी विजया शिंदे, दत्ता कंद यांची भाषणे झाले.
याप्रसंगी संपर्कनेते मनोहर गायखे, पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे, राजू जवळेकर, खेड बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, अतुल देशमुख, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका अध्यक्ष गणेश सांडभोर, महिला आघाडीच्या विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अमृता गुरव, तालुका अधिकारी दत्ता कंद, नाना टाकळकर सह शिवसैनिक उपस्थित होते.

महात्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्र बनविणार

0

1

गंज पेठेतील महत्मा फुले स्मारकाला ऐतिहासिक पर्यटन केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी फुले स्मारकाचे अत्याधुनुकीकरण येथी २०० रहिवाश्याच्या सहभागाने करू अशी ग्वाही आज येथे कसबा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दीपक मानकर यांनी दिली तसेच येथून जवळच असलेल्या मासे आळीतील व्यापाऱ्यांसाठी आधुनिक शीतगृह उभारण्याचा मनोदय हि आज येथे त्यांनी बोलून दाखविला या परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि हा परिसर स्वच्छ -सुंदर -आणि संपन्न अशी पुण्याची वसाहत बनविण्यासाठी आपण कसोशीने राज्यसरकार आणि महापालिका यांच्याकडून या योजना राबवून घेवू असे ते म्हणाले , या परिसराच्या पूर्वेस असलेल्या टिंबर मार्केट परिसरातील नाला बंदिस्त करून – सुशोभीकरण करून त्यावर वाहनतळ उभारण्याची योजनाही अमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे यावेळी त्यांनी सांगितले . जागतिक स्वच्छता दिनाचे ओचित्य साधून पंचहौद येथून अभियानाची सुरुवात त्यांनी येथून सफाई मोहीम राबवून केली आणि या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस चे अजय दराडे , मुनाफ शेख , जे व्ही पटेल , आयुब भाई , हनीफ कुरेशी , बाबा कुरेशी आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी त्यांच्या समवेत या अभियानात सहभागी झाले होते