Home Blog Page 3662

अमित शहा शिवसेनेला उंदीर म्हणाले ?

0

सिल्लोड – आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो म्हणून मोदींनी शिवसेनेविरोधात बोलणार नाही, असे स्पष्ट केले. असतानाही भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सेनेचे नाव न घेता सेनेला उंदीर म्हटल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे पाहू यात काय म्हणाले अमित सहा – ते म्हणाले “ज्या उंदराला वाघ बनवले, तोच आज आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे; त्यामुळे या वाघाला पुन्हा उंदीर करा,‘ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सिल्लोड येथील सभेत मतदारांना केले.
हे आवाहन करताना शहा यांनी उंदीर आणि वाघाची गोष्ट सांगितली. कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता या गोष्टीतून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, सभेस सुरवात होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या पद्धतीलाही शहा यांनी फाटा दिला. सभा संपल्यावर मात्र जाता जाता त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, प्रचारात अफजल खानाची फौज उतरल्याचे सांगून भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील सभेत शहा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. भाषणात त्यांनी कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता वाघ आणि उंदराची गोष्ट सांगितली. ती अशी ः एका आश्रमातील उंदराला मांजराची कायम भीती वाटायची. त्यामुळे मला मांजर कर, असे वरदान उंदराने आश्रमातील ऋषींकडे मागितले. ते पूर्ण झाले. आता मांजराला कुत्र्याचा धाक वाटायला लागला. पुन्हा त्याने ऋषींकडे कुत्रा बनविण्याचे वरदान मागितले. तेही ऋषींनी पूर्ण केले. कुत्र्याला नंतर परिसरात असलेल्या वाघाची भीती वाटायला लागली. मग त्याने वाघ करावे, अशी विनंती केली. तीही पूर्ण झाले. कालांतराने मनोकामना पूर्ण करणाऱ्या ऋषीमुनींपुढे वाघ उभा ठाकला आणि मी आता तुला खाणार असे म्हणाला. “तू मला खा; पण त्याआधी तुझ्या अंगावर पाणी शिंपडून व मंत्र म्हणून तुला पवित्र करतो,‘ असे म्हणत ऋषीमुनींनी वाघाच्या अंगावर पाणी शिंपडले. पाणी शिंपडल्याने वाघाचा पुन्हा उंदीर झाला. निवडणुकीत वाघाचा उंदीर करा, असे अप्रत्यक्ष आवाहन त्यांनी मतदारांना केले.

कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा ?

0

नगर- भारतीय जनता पक्षासह काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही लायक चेहरा नाही. तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? धरणे भरणारा, की दिल्लीपुढे शेपूट हलवणारा, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे केला.
नगरशहर व जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गांधी मैदानात घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. याप्रसंगी सुहास सामंत, अनिल राठोड, विजय औटी, साहेबराव घाडगे, लहू कानडे, शशिकांत गाडे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. करे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. काँग्रेस व भाजपकडे दिल्लीपुढे शेपूट हलवणारेच लोक आहेत. आता तर त्यांना शेपूट हलवण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागते, अशा खिल्ली ठाकरे यांनी उडवली.
महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे युती तुटल्याचे दु:ख नाही. शिवसेनेच्या तिन्ही पिढ्यांनी कधीच विचार सोडले नाहीत. भाजपच्या नव्या पिढीने मात्र स्वार्थासाठी २५ वर्षांची युती तोडली. युती तोडली म्हणजे त्यांनी हिंदुत्वाशी नाते तोडले आहे. पूर्वीचे भगवे कमळ आता भगवे राहिले नसून ते आता पांढरे झाले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. पंधरा वर्षे सत्तेत राहिलेले दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्याच बळावर केंंद्रात सत्तेवर असलेले भाजपवाले आता महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी फौज घेऊन येत आहेत. अफजल खानाच्या नावाची टोपी मी भिरकावली, परंतु त्यात भाजपने डोकं घातले, यात माझी काय चूक आहे? असे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र हे शिवरायांचे राज्य आहे. त्यामुळे दिल्लीत कितीही शहा असले, तरी त्यांच्यापुढे झुकणार नाही. भाजपच्या अटी मान्य केल्या असत्या, तर दिल्लीपुढे हुजरेगिरी करावी लागली असती. हे जनतेला मान्य झाले असते का? सत्तेच्या लालसेपोटी सेनेची कत्तल होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

लडाख मध्ये चीनी घुसखोरी करताना -चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते नरेंद्र मोदी

0

लातूर / रायगड – चीनी सैनिक लडाखमध्ये घुसखोरी करत होते, तेव्हा देशाचे पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झोपाळ्यावर झुलत होते, देशाच्या इतिहासात प्रथमच असे चित्र पाहायला मिळाले, असा प्रहार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात आमची सत्ता आली तर चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवू अशी भाषा करणारे मोदी आता का शांत आहेत, आता का चीन आणि पाक च्या झोपाळ्यावर झुलतआहेत? असा सवाल त्यांनी केला. कोकणात महाड आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराला राहुल गांधी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून सुरवात केली. त्यानंतर ते काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमध्ये आले. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीला आठ दिवस उरले असताना काँग्रेस उपाध्यक्षांनी प्रचाराला सुरवात केली. राज्यातील प्रचाराचा हा त्यांचा पहिला दिवस होता.
राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख मोदी सरकारवर टीका आणि यूपीएच्या काळात केलेल्या कामाची उजळणी असा होता. भाजप सत्तेच्या जोरावर गोरगरीबांच्या हिताचे कायदे बंद खोलीत बदलत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणतीच विकासाची कामे झाली नाही, असा प्रचार भाजप करत आहे. व्यक्ती केंद्रीत राजकारण भाजप करत असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, ‘त्यांचे म्हणणे आहे की फक्त एक माणूस देश घडवत आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लाभभाई पटेल यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तुमच्या माझ्या आणि आमच्या माता-पित्यांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह लावत आहेत.’ सर्वकाही यांनीच केले का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
केंद्रातील भाजप सरकार गरीबांच्या विरोधात असल्याचे राहुल म्हणाले. भाजप सरकारने कँसर, ह्लदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांवरील औषधी महाग केली असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे श्रीमंतांना काही फरक पडणार नाही, मात्र देशातील सर्वसामान्य नागरिकाचे आरोग्य धोक्यात येणार आहे. काँग्रेसच्या काळात मोफत औषधांची योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

खडकवासला मतदार संघाला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवेन

0

मनसेचे खडकवासल्याचे उमेदवार नगरसेवक राजाभाऊ लायगुड़े यांनी आज ८ ऑक्टोबरला माळवाडी, न्यू अहिरे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंडवे – धावडे, एन. डी. ए या भागात प्रचार केला. पदयात्रा काढून त्यांनी या भागातून शेकडो मनसे सैनिकांच्या सोबत शक्ती प्रदर्शन केले. त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
राजाभाऊ म्हणाले, “मी नगरसेवक म्हणून जनतेच्या कामांना व त्यांच्या स्मस्यां सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे आणि आज देखिल घेतोय. आपन मला संधी द्या. जनतेचीच कामे करायची आहेत, असे भावनिक आवहान त्यांनी केले. या भागातील रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा, या समस्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या समस्यांना मी पहिल्यांदा प्राधान्य देईन. व त्या सोडवण्यासाठी मी प्रयेत्न करेन. हा मतदारसंघ निसर्ग, पाणी, हवामान याने समृध्द आहे. आमच्याकडे सिंहगड, खडकवासला धरण असे बऱ्याच गोष्टी आमच्याकडे असल्याने मी या ठिकाणी पर्यटन केंद्र उभारणी करून मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्द करून देईन.
विकास बापू दांगट खडकवासला मतदारसंघाचे मनसेचे अध्यक्ष या वेळी म्हणाले, आमच्याकडे केंद्रीय जल आणि पॉवर संशोधन केंद्र, एन. डी. ए, आय. आय. टी, व खडकवासला धरण असे मोठ – मोठे प्रकल्प झाल्याने मोठ्या प्रमाणात आमच्याकडील शेती यात गेली. त्यामुळे आमचा पिढ्यानपिढ्या असणारा शेती व्यवसायावर गदा आली आणि येतील भूमिपुत्र शेती व्यवसायापासून पोरका झाला. तसेच आमच्या खडकवासलासला धरणाचे पाणी संपूर्ण पुणे शहर, बारामती या भागाला पाणी दिले जाते. आमची जमीन आमची घरे धरणामध्ये गेली. पण आम्हालाच पिण्यासाठी, शेतीसाठी आता पाणी नाही. या समस्या आम्हाला सोडवायच्या आहेत. त्यामुळे राजाभाऊ यांना निवडून द्यावे. आम्ही हे सर्व प्रश्न मार्गी लावू.
या पदयात्रेला प्रकाश ढोरे, महेश महाले, अरुण दांगट, विकास बापू दांगट, प्रविण बापू दांगट, जगदिश वाल्हेकर, संजय पायगुडे,विजय मते, सुर्यकांत कोडीतकर, रमेश करंजावणे, प्रजोत लगड , प्रविण दांगट, भरत लायगुडे, रुपेश घुले, राहुल वाळूंजकर, गणेश धुमाळ, असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या वसाहतीतील वाढीव बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार –अभय छाजेड

0

पानशेत पूरग्रस्तांना ते राहत असलेल्या घराच्या मालकी हक्काचा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने यापूर्वीच मार्गीलावला असून लक्ष्मी नगरच्या पूरग्रस्तांनाही त्यांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळालेआहे. आता येथील रहिवाशांचावाढीव बांधकामाचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देवूअसेपर्वती
विधानसभा मतदार संघाचेकॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगटाचेउमेदवार अॅड. अभय छाजेड यांनीसांगितले. छाजेड यांनी बुधवारी सकाळी संपूर्ण लक्ष्मीनगरचा व शाहूवसाहतीचा परिसर पदयात्रेद्वारेपिंजूनकाढला.
अभय छाजेड यांनी विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क मोहीम सकाळी सहा वाजल्यापासून सुरु केली आज सकाळी मित्रमंडळ सोसायटीच्या मैदानावर फिरायला येणाऱ्यानागरिकांच्या भेठीगाठी घेतल्या. तसेच गंगाधाम सोसायटीच्या मागील केंद्रीय विद्यालयाच्या प्रांगणातफिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांना मतदान करण्याचेआवाहन केले. त्यानंतर त्यांनीअप्पर इंदिरा नगरमधील कामगारांशी चर्चा करून त्यांचेप्रश्न जाणून घेतलेव त्यांचेप्रश्न मार्गी लावण्याचेआश्वासन दिले. त्यांच्यासमवेत इंटकचेसुनील शिंदे, कॉंग्रेसच्या व्यापारी सेलचेअध्यक्ष नेमीचंद सोळंकी,
महावीर बोगावत, भरत काळे, सुनील मोरेआदि उपस्थित होते. त्यानंतर अभय छाजेड यांच्या पदयात्रेला लक्ष्मीनगर चौकीपासून प्रारंभ झाला. सह्याद्री हाउसिंग सोसायटी, शाहूवसाहत, लक्ष्मीनगर, सारंग चौक, अरण्येश्वर शाळा, अजय मंगल कार्यालय असा मार्गक्रमण करीत सारंग सोसायटी येथेपदयात्रा समाप्त झाली..
त्यांच्यासमवेत उपमहापौर आबा बागुल, राजाभाऊ तेलंगे, अमित बागुल, सुधीर शिंदे, मंगेश भोसले, प्रशांतधुमाळ, सचिन दसवडकर, विशाल ढमाल, सोनूकाटे,नंदकुमार बानगुडे आदी प्रमुख कार्यकर्ते पदयात्रेतसहभागी झालेहोते.

नरेंद्र मोदी कामगार विरोधी ; भांडवलदार धार्जिणे -विनायक निम्हण

0

जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेले भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णत: भांडवलदारधार्जिणे असून त्यांची सर्व धोरणे ही
कामगारविरोधी आहेत. अदाणी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींचा बेसुमार विकास म्हणजे देशातील जनतेचा विकास असे मानून कामगार विरोधी धोरणे अवलंबणारे मोदी आणि त्यांचा भाजप पक्ष त्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी प्रत्येक कामगाराने सज्ज व्हायला हवे. अशा परखड शब्दात टीका शिवाजीनगर मतदारसंघातील काँग‘ेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे उमेदवार विनायक निम्हण यांनी कामगारांशी बोलताना केली. खडकी येथील कामगारांची भेट घेऊन प्रचार करताना ते बोलत होते.निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने खडकी येथील अॅमिनेशन फॅक्टरी येथील कामगारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जमीर शेख, खडकी कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष मनीष आनंद, किशोर निमल, नगरसेवक कमलेश चासकर, धर्मपाल यादव आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, गुजरातमध्ये कोट्यवधी नागरीक विविध समस्यांनी ग्रासलेले असूनही स्वत:चे ढोल स्वत:च वाजवत नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास झाल्याचे भासवले. वास्तविक गुजरातपेक्षा महाराष्टृा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. गुजरातमध्ये त्यांनी अदानी, अंबानींना अब्जावधी रुपयांचा फायदा व्हावा, यासाठी विविध सवलतींची खैरात केली. तेच धोरण ते आता देशात राबवू पाहत आहेत. असे सांगून निम्हण म्हणाले की,काँग्रेसने केलेल्या व कामगारांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या कामगार कायद्यात बदल भांडवलदारधार्जिणे आणि कामगारविरोधी कायदे नरेंद्र मोदी आणत आहेत. त्यांच्या या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध देशातील कामगार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत, असे ते म्हणाले. नर्मदा धरणाची उंची 15 मीटरने वाढवून अडीच लाख गरीब कष्टकरी लोकांना त्यांनी देशोधडीला लावले. लाखो आदीवासिंचे जीवन उद्ध्वस्त करून भांडवलदारांना उद्योगासाठी पर्यावरण परवानगी देण्याचा त्यांनी सपाटाच लावला. तसेच देशातील रेल्वे व्यवस्था सुधारून सर्वसामान्य कष्टकरी जनतेला चांगली रेल्वे सेवा देण्याऐवजी अदानी, अंबानींसार‘या बड्या भांडवलदारांचे खिसे गरम राहावेत यासाठी 70 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. या भांडवलदारांच्या हितासाठी कामगारविरोधी निर्णय घेतील, यासाठी त्यांना कडाडून विरोध करीत भाजपला पराभूत करा, असे आवाहन निम्हण यांनी केले.
निम्हण म्हणाले की, कामगारांना 8.33 टक्के बोनस, प्रोव्हिडंड फंड, मॅच्युरिटी, पेन्शन आदी फायदे मिळवून देणारे कायदे कॉंग्रेसने केले. मोदी सरकार मात्र कामगारांना मिळणारे कायदेशीर संरक्षण कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे. कंत्राटी कामगार, भांडवलदार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत व्यवस्थापनाने अंगिकारलेली कामगार निती ही कामगारविरोधी असून कामगारांवर अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध मी संघर्ष करेन. असेही ते म्हणाले. दरम्यान, चाफेकर वस्ती, ओमसुपर मार्केट येथे काढलेल्या पदयात्रेला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनिकेत कपोते, संतोष लोंढे, हेमंत डाबी आदी उपस्थिता होते. खैरेवाडी येथे काढलेल्या पदयात्रेदरम्यानही विनायक निम्हण यांचे जंगी स्वागत करण्यात
आले. पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी झाली होते. यावेळी संजय बालवडकर, सुभाष परदेशी, भूषण आतिक, सूर्यकांत बिश्नोई, संजय मोरे, सचिन हांडे, राहुल वंजारी, अविनाश बेलवडे, महेश पवार आदी उपस्थित होते.

केलेल्या विकास कामांमुळे रमेश बागवे यांच्या पदयात्रेस प्रतिसाद

0

unnamed

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराची पदयात्रेची सुरुवात पुणे कॅंटोन्मेंट भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल चौकापासून झाली . हि पदयात्रा जाफरीन लेन , कुरेशी नगर , सेंटर स्ट्रीट , भीमपुरा लेन , कामाठीपुरा , भोपळे चौक , बाबाजान चौक , बाबाजान नगर , कडबा फडई , कुंभारबावडी, ट्रायलक चौक , नवा मोदीखाना , गवळी गोठा येथे समारोप करण्यात आला.

या पदयात्रेत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक प्रसाद केदारी , करण मकवानी , गौतम महाजन , विनोद मथुरावाला , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , अझिम गुडाकूवाला , प्रविण जाधव , विकास कांबळे , रशीद खिजर, राजू राऊत ,मनिष सोनिग्रा ,किशोर संघेलिया , क्लेमंट लाझरस , एडविन रॉबर्ट , हितेश मकवानी , विनोद सोलंकी , चांद शेख , रसूल शेख , अच्युत निखळ , सुरेंद्र परदेशी , मुन्ना केदारी , कादर सौदागर, अनिल जगताप , विठ्ठल केदारी, मंदाकिनी गायकवाड , शमशाद बेल्लीम ,स्वाती पत्ती , नीता पत्ती , चंद्रशेखर पत्ती , रतन गाडेकर , अमृता पाटेकर , मंगला भिसे , शारदा जाधव , अनामिका गायकवाड , मल्लिका सय्यद , ज्यू मदुरम , शारदा जाधव , मीनाक्षी कडू , भारती मांढरे , रजनी वस्ते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यावेळी रमेश बागवे यांनी सांगितले कि , पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघ गेले अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होता परंतु या मतदारसंघामध्ये आपल्या आमदार निधीतून केलेल्या विकास कामांमुळे मला जनतेने पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला , या भागात पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत , मुक्तिधाम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम , ईदगाह मैदानावरील इंटरलॉक ब्लॉकची कामे करण्यात आली आहेत . जनतेने या विकास कामांची दखल घेतली आहे , त्याची पावती ते नक्किच निवडणुकीत देतील ,राहिलेली विकासकामे आपण आगामी काळात पूर्ण करू , असा विश्वास व्यक्त केला .

भाऊ माझा कामाचा …

0

dm2

dmmm

dm

बाबारे होऊ देत काहीही … कधी अडचण आली ,कोणाचा त्रास झाला , कुठे मदत हवी ?अशा वेळेला कोण नाही येत कामाला …. भाऊ कडे गेलो तर भाऊ च घेतो आम्हाला समजावून … तोच आमच्या कामाचा … नाही तर काय । खूप ऐकायला येतात , बडी बडी बाते , भाषणे , टी व्ही वरच्या गप्पा … पण घर सावरायला अगदी घरातल्यासारखा हक्काने येतो तो भाऊ च … मृगजळाला फसणार नाही आम्ही … अशी वक्तव्ये खुद्द आज कसब्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांना प्रचारफेरीत ऐकायला मिळाली … आणि म्हणाले … या साठीच तर केला मी अट्टाहास आणखी काय हवे? मानकर यांच्यासमवेतचे कार्यकर्ते जेव्हा प्रचार करताना दीपक भाउंना मते द्या ,घड्याळाचे बटन दाबा दुसरीकडे बटन दाबू नका असे सांगत होते तेव्हा बुजुर्गांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी वाक्ये ऐकायला मिळाली . भावूंकडे गेलेल्या तरुणाई ला रोजगारासाठी मदत केलेली उदाहरणे ऐकायला आली , राजकारण जावू देत तरुणांना संसाराचा -कुटुंबाचा गाडा हाकायला सुरुवात करून देतो भाऊ त्यालाच मते देणार …. अशा वाक्ये कानावर आदळल्याने नवखे बुचकळ्यात पडत होते तर भावुंना निवडणुकीचा प्रचार म्हणजे आपल्या जीवनाची वाटचाल योग्य कि अयोग्य याची प्रचीती येत होती
आज मानकर यांनी मनपा प्र . क्रमांक ५२ दत्तवाडी तसेच गुरुवार , शुक्रवार , रविवार , गणेश पेठ आदी प्रचार फेरी काढली होती यावेळी पूरग्रस्तांचे प्रश्न , सराफी व्यावसायिक आणि कामगार यांच्या समस्या याबाबत वेळोवेळी लक्ष घालून त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले

गडकरींची नार्को करा- गरजले भुजबळ

0

श्रीगोंदे -गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संपूर्ण राज्याला संशय आहे. प्रकाश शेंडगे यांनी याबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली अन् त्यांचे तिकीट भाजपने कापले. दरवाजा सुरक्षित असताना मुंडे कसे काय, मृत्युमुखी पडले याबद्दल संभ्रम आहे. नितीन गडकरी यांच्यासह मुंडेंचा वाहनचालक व अपघात करणारा यांची नार्को चाचणी केली जावी. त्यातून काय घडले ते कळेल.”असे सांगत , माजी मंत्री. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे स्वबळावर सरकार आले, तर शरद पवारच पुन्हा मुख्यमंत्री होतील. असे संकेतले. “अबकी बार शरद पवार’ हाच राष्ट्रवादीचा नारा आहे, असे यांनी जाहीर सभेत सांगितले.
बेलवंडी (जि. नगर) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारसभेतते बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. भुजबळ म्हणाले, गुजरातमधून येऊन काही जण आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. महाराष्ट्राने गुजरातला सयाजीराव गायकवाड यांच्या रुपाने राजा दिला होता.भाजपमध्ये आज कोणाची चलती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोण आहेत. बहुजन समाज ९७ टक्के आहेत. मंत्रिमंडळात मराठा, माळी, वंजारी, धनगर का नाहीत. शेटजी भटजींचे राज्य आले आहे. आमदार बबनराव पाचपुतेंना लक्ष्य करताना भुजबळ म्हणाले, जे भाजपवाले पाचपुतेंना चोर – दरोडेखोर म्हणत हाेते. त्यांच्यात प्रवेश घेतल्यावर ते साधूसंत कसे झाले. अशा माणसांवर न बोलणेच बरे. या वेळी शिवाजीराव नागवडे, घनश्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, अण्णासाहेब शेलार, उमेदवार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, विलास दिवटे, हरिदास शिर्के, बाळासाहेब गिरमकर, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारािनमित्त व्यासपीठावर तालुक्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते एकत्र आल्याचे चित्र होते. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर हे देखील व्यासपीठावर होते. वीर व जगताप यांच्यातील वैर तालुक्यात सर्वश्रुत आहे.
भाजपचा मूळ चेहरा उघड : भाजप शेटजी, भटजींचा पक्ष अशी प्रतिमा गोपीनाथ मुंडेंनी पुसून टाकली. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने मूळ चेहरा उघड करत ओबीसी नेत्यांची तिकिटे कापल्याचा आराेप भुजबळांनी केला.
गुजरातच्या पुढे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात येऊन पाहा, कळसुबाईच्या शिखरावर जाऊन पाहा महाराष्ट्राची उंची, छत्रपतींचे नाव घेऊन कुठे मत मागता, कधी जेजुरीला गेलात का, कधी रायगड पाहिले का? खमंग ढोकळा खाऊन हे दिसणार नाही, तर त्याला महाराष्ट्राची पुरणपोळी खाऊन पाहावे लागते, असे भुजबळ म्हणाले.

पुण्याची मंडई भव्य दिव्य करणार -डॉ. रोहित टिळक

0

rohit 2

मंडईच्या परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक आठवणी
या मंडई परिसराच्या आहेत. ऐतिहासिक मंडई परिसरात लोकमान्य टिळकांचेस्मारक असल्याने
या परिसराशी टिळक परिवाराचे भावनिक नातं तयार झालेआहे. त्यामुळेच मंडई आणि परिसरातील
सर्व समस्यांसोडवण्यासाठी एकत्रित आऱाखडा तयार करावा. नव्या मंडईच्या इमारतीच्या
विस्तारीकरणाला राज्य शासनामार्फत गती देईन, असेकसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस –
पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे) आघाडीचेउमेदवार डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले.
मंडई आणि परिसरातील मतदारांच्या भेटी घेण्यासाठी सकाळी डॉ. रोहित टिळक यांनी तुळशीबागेतील
श्रीरामाचेआणि शारदा गजाननाचेदर्शन घेऊन सुरूवात केली. यावेळी त्यांच्या समावेत डॉ. सतीश
देसाई, नितीन गुजराथी, नाना मारणे, बाळासाहेब मारणे, अनिल सोंडकर, उल्हास भट, बाबूनवले,
भोला वांजळे, मकरंद माणकीकर, शिवराज भोकरे, चंदन मारणे, गणेश टामकर आदी होते. ढोलीबाजाचा
दणदणाट, फटाक्यांचा कडकडाटात गणरायाची आरती करून मतदारांशी संवाद साधण्यास सुरूवात
केली. अनेक गणपती मंडळांनी डॉ. रोहित टिळक यांचेउत्स्फूर्त स्वागत केले. प्रत्येक चौकाचौकात
काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.
मंडईतील व्यापा-यांच्या भेटीगाठी घेतल्यावर बुरूड आळीत जाऊन तेथील बांबूपासून वस्तूतयार करणा-
या या बुरूड कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथून शिंदेआळी, भाऊ महाराज
बोळ, जिलब्या मारूती मंडळ, शनीपार, फडतरेचौक, खालकर तालीम, राजाराम मंडळ, गाडगीळ स्ट्रीट,
गायआळी, रहाळकर राम मंदीर, नागनाथपार, निंबाळकर तालीम, बाजीराव रोड, भरतनाट्यमंदीर, शेडगे
आळी, खजिना विहीर येथेपदयात्रेचा समारोप झाला.

बिबवेवाडीतील घरे नियमित करणार- माधुरी मिसाळ

0

पुणे : बिबवेवाडीतील डोंगरउतार व डोंगरमाथ्यावरील घरे नियमित करू, असे आश्‍वासन पर्वतीतील भाजप, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि स्वाभिमानी महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी दिले.
निवडणुकीच्या प्रचारासाठी मिसाळ यांनी आज महेश सोसायटी, ओटा अप्पर, विघ्नहर्तानगर, शिवतेजनगर, जागडे चाळ परिसरात पदयात्ना काढली. माजी नगरसेवक गोपाळ चिंतल, प्रभाताई मटाले, कालिदास जागडे, नितीन बेलदरे, अजय भोकरे, विशाल दारवटकर, सचिन मारणे, मामा डोलारे, आशाताई बिबवे यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या, बिबवेवाडीतील गावकर्‍यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. निवासीकरण झालेल्या जमिनीवर हिल टॉपचे आरक्षण टाकण्यात आले. प्रस्तावित विकास आराखड्यात हे आरक्षण कायम आहे, पण बिल्डर्सच्या जमिनीवरील आरक्षण उठविण्यात आले. हरीश परदेशी, मंगेश सप्रे, अनिल जाधव, संगीता चौरे यांचा प्रमुख सहभाग होता. या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मिसाळ यांनी या वेळी सांगितले. आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे, औषधे फवारणी केली जात नाही, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचराकुंडीमुक्त प्रभाग ही संकल्पना राबविणार असून, खतनिर्मिर्ती, बायोगॅसनिर्मिर्ती प्रकल्पांना प्राधान्य देणार आहे. आमदार निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देणार आहे.

शशिकांत सुतार आणि महादेव बाबर हे कार्यसम्राट च

0

कोंढवा खु. येथे परिसरातील महिला मेळाव्यात माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी आ. महादेव बाबर या कार्यसम्राटाला पर्याय नाही. मतदारांनी विशेषत: महिलांनी सकाळी सर्वाधिक मतदानाचा उच्चांक गाठावा, असे आवाहन करण्यात आले मेळाव्यात कल्पना थोरवे, स्मिता महादेव बाबर, संगीता ठोसर, मेधाताई बाबर आदी महिला आघाडीप्रमुखांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले.
कोंढवा-कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या भागात उड्डाणपूल उभारणी, नाला चॅनलिंग, भाजी मंडईचे पुनर्वसन, गुंठेवारी नियमित करणे, तिप्पट लादलेले कर कमी करणे, तसेच या भागात विशेष जादा पाणीपुरवठा करणे या प्रश्नांना प्राधान्य व अग्रक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव बाबर यांनी त्या परिसरातील नागरिकांना वाघनगर येथे मतदारांशी संपर्कप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोंढवा बु., कामठेनगर, पुण्यधाम कॉर्नर, कोंढवा बु., कात्रज हायवे आंबेडकरनगर या परिसरात आ. बाबर यांना मतदारांनी औक्षण केले. पदयात्रेत नगरसेवक भरत चौधरी, संगीता ठोसर, गणेश कामठे, माउली कामठे, बाळू कामठे, दादा सकुत, आदित्य हगवणे, ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये माजी नगरसेवक तानाजी लोणकर, राजेंद्र बाबर यांचाही समावेश

भानगिरे यांच्या साठी वसंत मोरे सरसावले

0

कात्रज परिसराच्या विकासाचा पॅटर्न नाना भानगिरे संपूर्ण हडपसर मतदारसंघात राबवतील. आपण केलेल्या विकासकामांची पोहोच पावती कात्रजवासीयांनी भानगिरे यांना द्यावी, असे प्रतिपादन मनसे गटनेते वसंत मोरे यांनी कात्रज येथे बोलताना केले.
मनसे उमेदवार प्रमोदनाना भानगिरे यांनी कात्रज परिसराचा झंझावाती दौरा केला. यावेळी कोपरा सभेत वसंत मोरे बोलत होते. यावेळी भानगिरे, शहरप्रमुख आशिष साबळे, राजाभाऊ कदम, मंगेश रासकर, बाळासाहेब फाटे, नितीन जगताप, योगेश खैरे, प्रशांत मोरे, महेश खेडेकर, मनीषा दीक्षित, अंजली सुपेकर, मंदाताई शेंडगे, शिल्पा तुपे, शेलार काकू, तोंडे काकू, सागर गोळे, नीलेश वतारी यांच्यासह हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना भानगिरे म्हणाले, मनसेची उमेदवारी मला देण्यात वसंतभाऊचे योगदान आहे. कात्रजचा विकासाचा पॅटर्न संपूर्ण हडपसर मतदारसंघात मी राबवेन. कात्रजवासीयांनी या प्रचार दौर्‍यात जो उदंड प्रतिपाद देऊन पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली, त्याची परतफेड कात्रज, सासवड रस्त्याचे चौपदरीकरण आणि विकासकामांकरिता अधिकाधिक निधी देऊन मी काम करणार आहे.
या प्रचार दौर्‍यात कात्रज गावठाण, गोकुळनगर, संतोषनगर, भाजीमंडई, अंजनीनगर, गुजरवाडी फाटा आदी भागात भानगिरे यांचे विविध मंडळे, बचतगट प्रतिष्ठाने, भाजी विक्रेते, कामगारवर्गांनी फटाके लावून जोरदार स्वागत केले.

राज- उद्धव यांनी एकत्र यावे अशी नाना पाटेकर यांची ही इच्छा

0

2379327851_037b037a58

राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे ,महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू नक्कीच एकत्र येतील असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. नाना पाटेकर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा ते बोलत होते.आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन असेही नानाने सांगितले
नाना पाटेकर म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे. पण ते एकत्र येत नव्हते. पण सध्या जी राजकीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे ते एकत्र येतील असे मला 100 टक्के नव्हे तर 300 टक्के वाटते. राज आणि उद्धव यांच्यात कोण ऐकत नाही याविषयी नानांना छेडले असता बिनधास्त नाना म्हणाले, दोघेही समंजस आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. या दोघांतील कोण ऐकत नाही हे सांगणे कठीण आहे, कारण ऐकतील ते ठाकरे कसले? असा फटकेबाजी नानाने केली. सेना-भाजप युती तुटू नये असे मला वाटत नव्हते. आघाडीही तुटायला नको होती. कारण यात सर्वांचे नुकसान होणार आहे. युती, आघाडीच्या वेळी मतदान कोणाला करायचे ते ठरवता यायचे आता सर्वच जण मैदानात असल्याने कोणाला शिक्का मारावा ते कळत नाहीये असा त्रागा नाना यांनी व्यक्त केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना मत देऊ नका मग तो कोणत्याही का पक्षाचा असेना असे आवाहन करताना नाना म्हणाले, मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी एक समाजातील एक सामान्य माणूस आहे. पण मला शरद पवार, बाळासाहेब ठाकरे व बड्या लोकांवर टीका केली पटत नाही. सध्या सामान्यांवर खूप बंधनं आहेत मात्र ती राजकारण्यावर आहेत. आपण राजकारणात जाणार नाही. कारण तो आपला प्रांत नाही. कॅमेरा आपला प्रांत आहे. मात्र, कोणी जर मला राज्यसभेत पाठवले तर मी जरूर संसदेत जाईन. ज्याने मला पाठवले त्याच्यापेक्षा तेथे मी माझे विचार मांडेन. पण मला सर्वांनी भरभरून दिले आहे आता मी त्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही नानांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूमागे घातपात नसल्याचा सीबीआयचा निर्वाळा

0

नवी दिल्ली- सतीश शेट्टी यांचे मारेकरी सापडत नाही म्हणून कोर्टाला क्लोजर रिपोर्ट देणाऱ्या सीबीआयने चार महिन्यापूर्वी दिल्लीत झालेल्या दिवगंत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा दिला आहे. सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल आज सादर केला. त्यात ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री गडकरींवर हल्ला होण्यामागे मुंडेंच्या मृत्यूची चौकशीबाबत सरकार टाळाटाळ करीत असल्याने वंजारी समाजाच्या तरूणाने नैराश्यातून गडकरींवर बूट उगारल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने भाजपनेच हा अहवाल तत्काळ पुढे आणण्याच्या जोरदार हालचाली केल्याचे वृत्त एका वृत्त संस्थेने प्रसिध्द केले आहे
मोदी सरकारने जुलै महिन्यात मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी मान्य करीत सीबीआयला तसे आदेश दिले होते. आता तीन-चार महिन्यानंतर सीबीआयने मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा अहवाल तयार करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विभागाकडे सादर केला आहे. हा अहवाल अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी त्यातील निष्कर्ष बाहेर आला आहे. यात मुंडेंच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा सीबीआयने दिला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड भागात बूट मारण्याचा प्रयत्न झाला ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड असून तो वंजारी समाजाचा व भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी जरी या माथेफिरूने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगीतले असले तरी याबाबत नानाविध शंका उपस्थित केल्या जात आहेत
विरोधकांसह भाजपमधील अनेक नेत्यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेला आणखीच तोंड फुटले होते. गडकरी-मुंडे यांच्यातील राजकीय वितृष्टामुळे मुंडे समर्थकांत गडकरींबाबत रोष आहे. त्यामुळेच मुंडेंच्या अंत्यविधीला गडकरींना भाजपमधील काही मंडळींनी जाऊ दिले नव्हते. एवढेच नव्हे तर आता गडकरींना बीडमध्ये प्रचारालासुद्धा येऊ दिले नाही. मुंडेंचा अपघाती मृत्यू हा वंजारी समाजासाठी मोठा धक्का होता. . अखेर भाजपने यावर पडदा टाकत सीबीआयचा अहवाल पुढे आणला आहे.