सिल्लोड – आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो म्हणून मोदींनी शिवसेनेविरोधात बोलणार नाही, असे स्पष्ट केले. असतानाही भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सेनेचे नाव न घेता सेनेला उंदीर म्हटल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे पाहू यात काय म्हणाले अमित सहा – ते म्हणाले “ज्या उंदराला वाघ बनवले, तोच आज आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे; त्यामुळे या वाघाला पुन्हा उंदीर करा,‘ असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सिल्लोड येथील सभेत मतदारांना केले.
हे आवाहन करताना शहा यांनी उंदीर आणि वाघाची गोष्ट सांगितली. कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता या गोष्टीतून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, सभेस सुरवात होण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याच्या पद्धतीलाही शहा यांनी फाटा दिला. सभा संपल्यावर मात्र जाता जाता त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, प्रचारात अफजल खानाची फौज उतरल्याचे सांगून भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या पार्श्वभूमीवर येथील सभेत शहा काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. भाषणात त्यांनी कुणाचेही, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता वाघ आणि उंदराची गोष्ट सांगितली. ती अशी ः एका आश्रमातील उंदराला मांजराची कायम भीती वाटायची. त्यामुळे मला मांजर कर, असे वरदान उंदराने आश्रमातील ऋषींकडे मागितले. ते पूर्ण झाले. आता मांजराला कुत्र्याचा धाक वाटायला लागला. पुन्हा त्याने ऋषींकडे कुत्रा बनविण्याचे वरदान मागितले. तेही ऋषींनी पूर्ण केले. कुत्र्याला नंतर परिसरात असलेल्या वाघाची भीती वाटायला लागली. मग त्याने वाघ करावे, अशी विनंती केली. तीही पूर्ण झाले. कालांतराने मनोकामना पूर्ण करणाऱ्या ऋषीमुनींपुढे वाघ उभा ठाकला आणि मी आता तुला खाणार असे म्हणाला. “तू मला खा; पण त्याआधी तुझ्या अंगावर पाणी शिंपडून व मंत्र म्हणून तुला पवित्र करतो,‘ असे म्हणत ऋषीमुनींनी वाघाच्या अंगावर पाणी शिंपडले. पाणी शिंपडल्याने वाघाचा पुन्हा उंदीर झाला. निवडणुकीत वाघाचा उंदीर करा, असे अप्रत्यक्ष आवाहन त्यांनी मतदारांना केले.
अमित शहा शिवसेनेला उंदीर म्हणाले ?
Date: