Home Blog Page 3661

चारही पक्ष तुम्हाला मूर्ख बनवत आहेत- राज ठाकरे

0

पुणे : “”दार उघड बये दार; या महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्या चारही पक्षांना खड्ड्यात घाल. एकदा राज ठाकरेला सत्ता दे. मी एक विश्‍वास घेऊन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा घेऊन आलो आहे,‘‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना आवाहन केले.
पुणे शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगरचे राजू पवार, पर्वतीचे जयराज लांडगे, पुणे कॅंटोन्मेंटचे अजय तायडे, खडकवासल्याचे राजाभाऊ लायगुडे, कोथरूडचे किशोर शिंदे, वडगाव शेरीचे नारायण गलांडे, हडपसरचे नाना भानगिरे यांच्यासह जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित होते. राज यांनी दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. मात्र, साबरमती नदी विकास प्रकल्पावरून त्यांनी आज गुजरातची स्तुती केली; तर शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले.
ते म्हणाले, “”विरोधकांच्या ऍडजेस्टमेंटमुळे गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेवर राहिले. आपल्या फायलींवर मंत्र्यांकडून सही करून घ्यायची आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचे, हे उद्योग सुरू आहेत. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. या चारही पक्षांनी महाराष्ट्राचा विचका केला आहे. कोणतीही नीतिमत्ता राहिलेली नाही. तरीदेखील आम्हालाच बहुमत द्या, असे ते सांगत आहेत.‘‘
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, “”युती तोडायची हे आधीपासूनच भाजपने ठरविले होते. लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे मनोमिलन सुरू होते. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्यामुळे हे मनोमिलन होऊ शकले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपला साठ उमेदवार आयात करावे लागले. जे काल भ्रष्टाचारी होते, त्यांनाच प्रवेश देऊन उमेदवारी दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदी भाजपच्या प्रचाराला येतात की या दोन्ही कॉंग्रेसच्या, असा प्रश्‍न पडतो. हे सर्व जण तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची कुवत काय आहे, हे मोदी यांनी पहिल्या भाषणात दाखवून दिले आहे. ते सगळे मिंधे आहेत. दोन्ही कॉंग्रेस नालायक आहेत.‘‘

अल्पसंख्यांक रमेश बागवे यांच्याच पाठीशी राहील – गुलामनबी आझाद

0

bagwe

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार गुलामनबी आझाद यांच्या बैठकीचे आयोजन भवानी पेठ येथील निशात टाकीज समोरील दिनशा हॉल येथे संपन्न झाली .
यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार गुलामनबी आझाद यांनी सांगितले कि , देशामध्ये आणि राज्यात अल्पसंख्यांक बांधवाना कॉंग्रेस पक्षाने भरीव कार्य केले आहे , त्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण दिले , मुस्लिम समाजाला कॉंग्रेस पक्षाने साथ दिली आहे , रमेश बागवे यांनी पुण्यामध्ये सर्वात मोठी उर्दू बालवाडी आमदार निधीतून उभारली आहे . तसेच ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण , मुस्लिम दफनभूमीसाठी विकास कामे करण्यात आली आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक बांधवांनी रमेश बागवे यांना साथ देऊन बहुमताने विजयी करावे , त्यांच्या विजयी मेळाव्यास मी त्यांना पुन्हा भेटण्यास येईल . यावेळी विविध मुस्लिम संघटनानी रमेश बागवे यांना पाठींबा दिला. या बैठकिस उमेदवार रमेश बागवे , विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद खान , सदानंद शेट्टी , रशीद शेख , अनिस सुंडके , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी,नगरसेवक सुधीर जानजोत , नगरसेविका लता राजगुरू , नगसेविका लक्ष्मी घोडके , माजी महापौर रजनी त्रिभुवन , माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे , असिफ शेख ,लतीफ शेख , मौलाना काझ्मी , हाजी नदाफ , उस्मान तांबोळी , सादिक लुकडे , माजी नगरसेवक मंजूर शेख , विनोद मथुरावाला , रशीद खिजर , जोस्वा रत्नम , चांद शेख , लतीफ शेख , बबलू सय्यद , सोहेल शेख , मुन्नावर खान , असिफ पटेल , अझीम गुडाकुवाला आदी मान्यवर व कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले .

रोहित टिळक यांच्या पदयात्रेत गुलामनबी आझाद यांचा सहभाग

0

rohit

पुणे, १० सप्टेंबर- लोकमान्य टिळक यांनी देशसेवेसाठी केलेले महान कार्य लक्षात घेवून विधानसभा निवडणुकीत त्यांचे वारस असलेल्या रोहित टिळक यांना खरे तर बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र दुर्देवाने तसे झाले नाही म्हणून आता कसब्यातील जनतेनेचे टिळक यांना निवडून देवून लोकमान्य टिळक यांच्या देशसेवेची पावती द्यावी असे आवाहन अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद यांनी शुक्रवारी येथे केले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) उमेदवार डॉ. रोहित टिळक यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी प्रभाग क्रमांक ४८ मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत भाग घेतल्यानंतर नाडे गल्लीत मतदारांसमोर बोलताना गुलाब नबी आझाद पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या वारसदारालाच मतदार निवडून देतील आणि लोकमान्य टिळक यांच्यावरील आपली श्रद्धा सिद्ध करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने पुणे शहराची इतकी सर्वांगीण प्रगती केली आहे की, देशातील प्रत्येक व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर पुण्यात येउन रहावेसे वाटते असे सांगून आझाद म्हणाले, पुणेकर जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ केली आहे तशीच या विधानसभा निवडणुकीतही करावी.
काँग्रेस उमेदवार रोहित टिळक यांनी यावेळी बोलताना, विविध विकास कामापोटी जागा दिल्यामुळे अथवा रस्तारुंदीकरणामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना बेघर होऊ न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
प्रभाग क्रमांक ४८ मध्ये काढण्यात आलेल्या रोहित टिळक यांच्या या पदयात्रेला नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टिळक यांच्या या पदयात्रेत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, मिलिंद काची, माजी नगरसेवक गोपालदादा तिवारी, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, बबनराव दरेकर, इरफान सय्यद, शशिकांत गायकवाड, जयदीप परदेशी तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती.
टिळक यांच्या पदयात्रेने कसबा मतदारसंघ ढवळून निघाला.
काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २३ आणि ३९ मध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. सूर्या हॉस्पिटल पासून सुरु झालेली ही पदयात्रा पवळे चौक, शेख सल्लाह दर्गा, कुंभारवाडा चौक, भोई आळी, साततोटी चौक, मनपा कॉलनी, दारूवाला पूल, ताराचंद हॉस्पिटल, डुल्या मारुती चौक आदी मार्गाने जाऊन दुधभट्टी भागात विसर्जित झाली. या पदयात्रेने कसबा मतदारसंघ ढवळून निघाला. ठिकठिकाणी सुवासिनींनी रोहित टिळक यांना ओवाळून त्यांचे हृद्य स्वागत केले. या पदयात्रेत श्री टिळक यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, नगरसेवक चंदू कदम, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, साजिद तांबोळी, माजी नगरसेविका विद्याताई भोकरे, स्वाती कथलकर , संदीप अटपाळकर, मयुर भोकरे, नरेश नलावडे, संजय आगरकर, छोटू वडके, संदीप लचके, साहिल तांबोळी , करण गायकवाड, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लक्ष्मी रस्त्यावर अजित पवारांची स्वारी ; सोबत दीपक मानकरांची सवारी ; हाती साऱ्यांच्या घड्याळ ‘लय भारी ‘

0

am1

am2

dm 1

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कसबा विधान सभा मतदार संघाचे उमेदवार दीपक मानकर यांच्या प्रचारासाठी चक्क लक्ष्मी रस्त्यावरून प्रचार फेरी काढली . महापौर दत्ता धनकवडे , अंकुश काकडे , कमल ढोले पाटील , रवींद्र माळवदकर, आनंद सागरे , पुष्पा गाडे , सुरेश बांदल . आदी असंख्य कार्यकर्ते या प्रचार फेरीत सहभागी झाले होते . विजय सिनेमा , बन्सीलाल मार्केट , सोन्या मारुती चौक अशा विविध ठिकाणी अजित पवार यांनी व्यापारी- हमाल – देवदासी – सराफ – रिक्षावाले -पथारीवाले यांच्याशी हस्तांदोलन करीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला

मोदी फार काळ सत्ता टिकवू शकणार नाहीत -गुलामनबी आझाद

0

महाराष्ट्राचा विकास झाला नाही मग इथे कामासाठी इतर राज्यातून लोक का येतात? जिथे विकास तिथे काम सरळ आहे , केवळ एका धर्माचा, प्रांताचा, जातीचा प्रचारक नेता बनणे खूप सोपे आहे. अशा शॉर्ट कट ’ने सत्तेच्या खुर्ची पर्यंत पाहोचणे सोपे आहे मात्र, फार काळ ही सत्ता टिकत नाही असे सांगत समाजातील प्रत्येक घटकाचा, धर्माचा, जातीचा, सर्व प्रांतातील लोकांचा विचार करून देशाचा विकास करणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. कॉंग्रेसने सत्तेसाठी कधीही ‘शॉर्ट कट’चा मार्ग न स्वीकारता देशाचा विकास केला आहे असे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व सरिचटणीस गुलामनबी आझाद यांनी येथे सांगितले
पर्वतीविधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस­चे उमेदवारअॅड. अभय छाजेड यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचामेळावा व अभय छाजेड यांच्या २० कलमी जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात आझाद बोलत होते.त्यांच्या हस्ते अभय छाजेड यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. उपमहापौर आबा बागुल, पी. ए.इनामदार, शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपालतिवारी , रशीद खान, शहर कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्षसंजय बालगुडे,इरफान पठाण,वि जयकांत कोठारी, डॉ. काटकर, मुकेश धीवार आदी यावेळीव्यासपीठावरउपस्थित होते.
आझाद म्हणाले, महाराष्ट्राला महान बनिवण्यामध्ये कॉंग्रेसचे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही मोठे योगदान आहे.टि ळकांसारख्या नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केले.त्यांना स्वातंत्र्यासाठी अनेक युवक, महिला , शेतकरी ,कामगार यांनी सहयोग दिला स्वातंत्र्यानंतर जे जे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री झाले त्यांनी महाराष्ट्राचा विकासच केला.उद्योग, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रात प्रगती झाली. त्यामुळेच देशाच्या इतर इतर प्रांतातील लोककाम मिळवण्यासाठी महाराष्ट्रात येतात.जिथे काम मिळते तिथेच लोक जातात,जिथे विकास होतो तिथेच काम मिळते आणि विकास जिथे असतो तेथे नेतृत्व असते. मोदी आपल्या जाहीर सभांमधून कॉंग्रेसने काहीच केले नाही असे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगत होते त्यावेळी त्यांनागुजरात सोडून इतर प्रांताची माहिती नव्हती. त्यांना कॉंग्रेसने विकास केला नाही हे पढवून पाठवले होते. देशाचा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भारत ही कॉंग्रेसच्याकाळात जगातली मोठी शक्ती बनली आहे हे भाजपा सोयीस्कररीत्या विसरली आहे अशी टीकाही त्यांनी केली.
अभय छाजेड म्हणाले, कॉंग्रेसने अल्पसंख्यांक समाजासाठी गुलाब नबी आझाद यांच्या माध्यमातून मोठे काम केले. अल्पसंख्यांक समाजाला कॉंग्रेसने नेहेमीच न्याय दिला आहे.आपल्या जाहीरनाम्यात रोजगारनिर्मिती , गुंतवणूक, इंटरनेट सुविधा अशा २० कलमी कार्यक्रमांचाअंतर्भाव असून हा जाहीरनामा हा शहराच्या विकासाचाही भाग आहे. आयुष्यभर राजकीय जीवनात काम करताना स्वच्छ प्रतिमा आपण जपली. सर्व थरातील लोकांना बरोबर घेवून सातत्याने काम केले.शेवटचे तीन दिवस उरलेत आता ते मला द्या , मी पाच वर्षे तुमच्यासाठी देईल असेआवाहन त्यांनी केले.
पी. ए. इनामदार म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३३ कोटी होती.,तेव्हा अन्नधान्य आयात करायला लागत होते. आता लोकसंख्या १२५ कोटी झाली असून आपण अन्नधान्यनि र्यात करतो. ही प्रगती कॉंग्रेसने केली आहे. शाळा , महािवद्यालये निघालीत्यामुळे दलित व मुस्लीम समाजातील ६२ टक्के मुली शाळेत जात आहेत. हे सर्व काँग्रेसमुळेझाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी कॉंग्रेसने केली त्यामुळे समाजातीलसर्व घटकांना न्याय मिळाला. ज्याला सर्व समस्या माहिती आहेत, जो उच्चशिक्षित आहे , ज्याचीदिल्लीपर्यंत पोहोच आहे अभय छाजेड यांना प्रचंड मतािधक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

झोपडपट्टीधारकांच्या समस्यांना सर्वािधक प्राधान्य देणार –अभय छाजेड

0

abhay1

पुणे­ पर्वती विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस­ पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचेउमेदवार अॅड. अभय छाजेड यांनीआज शुक्रवारी महादेव नगर, राजीव गांधी नगर, दांडेकर पूल,आंबील ओढा या भागातील झोपडपट्टीवासीयांच्या प्रत्यक्ष भेटी घेत हा संपूर्ण पिरसर पिंजून काढला. पर्वती मतदार संघातील झोपडपट्टीधारकांचे पप्रश्न हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून त्याला मी सर्वािधक प्राधान्य देईल असे छाजेड यांनी सांगीतले.
अभय छाजेड यांनी सकाळी महादेव नगर व राजीव गांधी नगर मधील झोपडपट्टी व त्याभागातील घराघरात जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांनामतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या समवेत माजी उपमहापौर प्रसन्ना जगताप, आबा जगताप,
हिरदास चरवड, शंकर पवार, अवधूत मते,विजय नवलाखा, बाबा गायकवाड, बबन आरकडे,जानराव, वसंत शेंडे दीपक खुणे,कि रण दौंडकर, शशी साठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला दांडेकर पुलापासून सुरुवात झाली. स.न. १३२/१३३, माजी महापौरमाऊली शिरवळकर यांच्या घराजवळील पिरसर, संपूर्ण अंबिल ओढा झोपडपट्टी, सानेगुरुजी स्मारक परीसर असा मार्गक्रमण करीत पर्वती पुलाखाली समाप्त झाली. माऊली शिरवळकर यांच्या घरी
जाऊन छाजेड यांनी त्यांना वाढिदवसाच्या शु भेच्छा दिल्या. त्यांच्यासमवेत लक्ष्मीबाई कांबळे,वैशाली अरुण धिमिधमे, ब्लॉक अध्यक्ष सिचन आडेकर, शेखर वाळुंजकर, सुनीलशिंदे , नाना फाजगे, बाळकृष्णबिर्ला,कि रण सोमवंशी , प्रसाद खराटे, वसंत कुडवे या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य महिला व कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.

ठाकरे बंधूंना एकत्र आणणारे ; कोण आहेत बाजीराव दांगट ?

0

( डाव्या बाजूला संग्राहय असे फोटो आणि उजव्या बाजूला बाजीराव दांगट यांचे आपल्या मुलांसमवेतचे छायाचित्र)
काल दिवसभर विविध वृत्त वाहिन्यावर व आज विविध वृत्तपत्रात राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर ;सेना आणि मनसे यांनी या विधानसभा निवडणुकीत एकत्र यावे या संदर्भात घडलेला वृत्तांत सांगताना ज्या बाजीराव दांगट यांचा नामोल्लेख राज ठाकरे यांनी केला ते बाजीराव दांगट कोण ? असा प्रश्न अनेक लोकांना पडला असेल . आपल्या हयातीत दोन भावांनी वेगळे लढू नये अशी भावना स्व. बाळासाहेब ठाकरे यांची असताना आपल्या पित्यासमान काकांचे न ऐकणारे राज यांनी या बाजीराव दांगट यांचा प्रस्ताव स्वीकारला म्हणजे ती कोणीतरी पावरफुल व्यक्ती असेल अशी अनेकांची समजूत झाली असेल . वास्तव मात्र वेगळेच आहे … हि व्यक्ती तुमची आमच्या सारखी सर्वसामान्य आहे .
कोण आहेत बाजीराव
आपण मार्मिक वाचले किंवा पाहिले तरी असेल . मराठी माणसासाठी शिवसेना नावाची संघटना उभी करण्यासाठी व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते तरी प्रभावी माध्यम आपल्याकडे असावे असे बाळासाहेबांना वाटे . त्यात ते हाडाचे व्यंगचित्रकार असल्याने आपली कला आपल्यासाठी स्वतः साठी वापरता येऊ शकते,त्यासाठी एखादे पाक्षिक व साप्ताहिक आपल्या हाती असावे असे वाटल्याने बाळासाहेबांनी अनेक आर्थिक संस्थाकडे मदत मागितली पण कोणीही पुढे येत नाही असे पाहून निराश झालेले बाळासाहेब शेवटी त्याकाळातील नामवंत वृत्तपत्र वितरक सावळाराम तथा बुवा दांगट यांना भेटले व आपला विचार त्यांना सांगितला . मराठी माणसासाठी काहीतरी चांगले होणार या कल्पनेने बुवा दांगट यांनी बाळासाहेबांची कल्पना उचलून धरली रु ५००० /- दिले आणि त्यातूनच मार्मिकचा जन्म झाला . त्याच मार्मिकच्या जीवावर शिवसेना राज्यभर पोहोचली व आज शिवसेना राज्यात आपली पाळेमुळे घट्ट रोऊन उभी आहे . त्याचे बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकेच श्रेय ज्या बुवा दांगट यांना आहे त्यांचे सुपुत्र आहेत बाजीराव दांगट .
सुरूवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांमध्ये दांगट कुटुंब अग्रस्थानी होते . अडचणीच्या वेळी दांगट यांनी त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे , स्नेहाचे संबंध निर्माण झाले होते . ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाले त्यावेळी काही दिवस बाळासाहेबांनी दांगट यांच्या कुटुंबात आश्रय घेऊन पोलिस यंत्रणेला चकमा दिला होता . त्यामुळे त्यामुळे स्व. बाळासाहेब ,मीनाताई (मासाहेब) राज , उद्धव यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध निर्माण झाले झाले होते . त्यामुळेच त्या बाजीराव दांगट यांना ठाकरे कुटुंबीय आपल्या घरातील समजत असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद न देणाऱ्या राज यांनी तत्काळ प्रतिसाद दिला . पण दुर्दैव आडवे आले आणि उद्धव यांना घेरलेल्या बडव्यांनी दांगट यांच्या प्रयासाला अपयश आणले कि काय ? असा प्रश्न आता साहजिकच निर्माण होवू पाहतो आहे .
नावाप्रमाणेच बाजीराव …. बाजीराव आहेत
दांगट न्यूज पेपर अजेन्सी चे सर्वोसर्वा बाजीराव दांगट यांनी मनात आणले तर त्यांना कोणत्याही राजकीय पक्षात सहज संधी मिळाली असती कारण त्यांचे अनेक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याशी अगदी घानिष्ठ संबंध आहेत .कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,भाजपा , मनसे या सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ८०-९० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना निवडणुकीत कुठूनही उभे राहणाची ऑफर दिली होती पण ती त्यांनी नम्रपणे नाकारत आपले बंधू बाळासाहेब दांगट यांना जुन्नर विधानसभा निवडणुकीत संधी देऊन दोन वेळा निवडून आणले होते . आपल्या माता -पित्याप्रमाणेच दातृत्व बाजीराव यांच्या अंगी असून आमदार , खासदार बनण्याची संधी असूनही ते या क्षेत्रापासून दूर का आहेत हे न सुटणारे कोडे आहे

बारामतीकरांनो काका पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा

0

बारामतीकरांनो काका पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा
बारामती- येत्या १५ ऑक्टोबरला काका पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले , बारामतीच्या परिसरातील शेतकरी आजही काका-पुतण्याच्या गुलामगिरीत असून, त्यांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच आपण येथे आलो आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जोरदार फटकेबाजी केली. पवार काका-पुतण्यांनी सामान्यांची शेत, जमिन आणि स्वप्नं सगळं काही लुटले असल्याची जहरी टीकाही केली.
तुम्ही संरक्षणमंत्री असतानाही पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती सुरूच होत्या. मग शरदराव, तेव्हा तुम्ही सीमेवर गेला होतात का?, असा सडेतोड सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांसह सर्वच टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पवार काका-पुतण्याला लक्ष्य केलं.आम्हाला आमची जबाबदारी कळते. सीमेवर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. जवानांचं मनोबल खच्ची होईल असं बोलू नका, राजकीय व्यासपीठावर हे विषय आणू नका, असंही मोदींनी आपल्या विरोधकांना सुनावलं.
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू आहे आणि नरेंद्र मोदी दिवसाआड महाराष्ट्रात सभा घेताहेत, पंतप्रधान कार्यालय बंद पडलंय, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. त्यांचा आज मोदींनी समाचार घेतला.
ते म्हणाले ,15 ऑक्टोबरचा दिवस बारामतीच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल,15 वर्षातील कुशासनाचा अंत करण्याची हि बारामतीकरांना संधीआहे ,
पाणी मागण्यासाठी आलेल्यांसाठी अजित पवारांनी कसे शब्द वापरले हे ठावूक आहे , अनेक गावांना आजही पिण्याचं पाणी मिळत नाही,अजूनही बारामतीतील 40 हून गावे पाण्यावाचून वंचित आहेत ,सरकारी अनुदानातील सहकारी साखर कारखाने तोट्यात अन् खासगी मालकीचे कारखाने नफ्यात कसे?मी गरीबी अनुभवली आहे, माझे सरकार अशाच सर्वसामान्यांसाठी आहे , ज्यांनी दहा वर्षात दहापटीने भ्रष्टाचार केला, त्यांना राजकारणात स्थान देऊ नका.शेतकऱ्यांची मतं मिळवली, पण आजवर कधी यांनी शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार केला नाहीअमेरिकेत भारताचा जयजयकार होतोय, ही सर्व सव्वाशे कोटी भारतीयांची करामत आहे , महाराष्ट्राचा सर्वत्र जयजयकार व्हावा, यासाठी भाजपला बहुमत द्या.असेही मोदी म्हणाले

मोदींचा जन्मही नव्हता तेव्हापासून काँग्रेस देशासाठी लढते आहे

0

मोदींचा जन्मही नव्हता तेव्हापासून काँग्रेस देशासाठी लढते आहे
औरंगाबाद – यांचा जन्मही नव्हता झालेला , नेहरू – इंदिरा -राजीवजी यांच्या काँग्रेस ने देशासाठी काय केले हे यांना सांगण्याची आवश्यकता नाही काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये केलेल्या कामाचे प्रमाणपत्र आम्हाला कोणाकडून घेण्याची गरज नाही, ते काम देशातील जनतेसमोर आहे, असे सांगत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. मोदींचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून काँग्रेस देशाच्या विकासासाठी झटत असल्याचे त्यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत सांगितले. मराठवाड्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित औरंगाबादमधील आमखास मैदानावरील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते.
मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणात 60 वर्षांचा हिशेब काँग्रेसला मागत असतात त्याला सोनिया गांधी यांनी त्यांचा नामोल्लेख टाळून प्रथमच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘ यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाकरा नांगर धरणाच्या माध्यमातून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली. जे आज मोठमोठ्या गप्पा मारत आहेत ते फक्त पाच वर्षांचे असताना नेहरुजींनी आधुनिक भारताचा पाया रचला. इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी हरितक्रांती केली तेव्हा हे फक्त 13 वर्षांचे होते.
देशात दुधाची कमतरता दूर करण्यासाठी जेव्हा श्वेतक्रांती केली गेली तेव्हा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत होते, असा प्रहार सोनिया गांधी यांनी केला.राजीव गांधी माहिती तंत्रज्ञानासाठी झटत होते, तेव्हा हेच लोक त्यांची खिल्ली उडवत होते. पण आज त्याच क्रांतीच्या जोरावर हे आपला गाजावाज करुन घेत आहे. राजीव गांधींनी तेव्हा हे काम केले नसते तर यांना आता आपला प्रपोगंडा शक्य झाला असता का? असा सवाल सोनियांनी केला.
सोनिया गांधी यांनी भाजप – शिवसेना सोडल्यास कोणाचेच नाव घेऊन हल्ला चढवला नाही. निवडणुकीच्या तोंडावर आघाडी तोडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘कालपर्यंत जे आपल्या सोबत होते त्यांना आज सत्तेची हाव सुटली आहे. त्यासाठी त्यांनी आघाडी तोडली. शिवसेना – भाजप प्रमाणेच त्यांचा उद्देशही फक्त सत्ता आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली. एवढ्या वर्षांमध्ये देशाने आर्थिक, वैज्ञानिक आणि शेतीमध्ये मोठा विकास केल्याचे सोनियांनी सांगितले. देशाचा विकास कोणा एका व्यक्तीमुळे आणि एका दिवसात होत नाही. आज भारत मंगळावर गेल्याचा उल्लेख करुन त्या म्हणाल्या, ‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राजवटीत देशाने प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने टाकले आहे.’

भाजपने सोडल्यानंतर शिवसेनेशी मी युती करण्यास तयार होतो

0

मुंबई -‘शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसं बोलणंही झालं होतं. त्यासाठी अर्जवाटपही थांबवलं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही. त्यामुळंच सगळं फिसकटलं,’ असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला.’एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
युती तुटली तेव्हा शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या ज्या बातम्या प्रसारीत झाल्या त्या खऱ्याच होत्या याबाबतचा स्पष्ट दुजोरा आज राज ठाकरे यांच्यावक्तव्यामुळे मिळाला आहे राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी राज यांचे फोनवर बोलणे झाले होते. त्या दोघांमध्ये रणनीतीही ठरली. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून नंतर प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अखरे उशीर झाला असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले ,”युती तुटली त्याच दिवशी सामनाचे वितरकबाजीराव दांगट मला भेटण्यासाठी आले. उद्धव ठाकरे व मी एकत्र यावे असे त्यांनी सुचवले. त्यावर पण काय करायला पाहिजे अशी मी विचारणा केली. त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. त्यानंतर दांगट तिथून गेल्यानंतर मला रात्री फोन आला. उद्धवला माझ्याशी बोलायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. पण उद्धवचा फोन नंबर माझ्याकडे नाही. तुम्ही मला तिथे जावून फोन लावून द्या असे मी सांगितले. त्यानुसार दांगट गेले व उद्धवला फोन लावून दिला. त्यानंतर उद्धवशी बोललो. विचारपूस झाल्यानंतर उद्धव म्हणाला, तु पाहिले ना भाजपने कसा दगा दिला. त्यावर मी म्हटले अरे मला जर बाहेर असून सगळे कळते तर तुला कसे कळले नाही. बरं ते जाऊ दे आता काय करायचे, कारण वेळ उरलेला नाही. त्यानंतर उद्धव म्हणाला, आपण तीन गोष्टी करू शकतो. त्या म्हणजे,पहिले आपण एकमेकांशी चर्चा करू. दुसरी म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीका करायची नाही.तिसरी म्हणजे निवडणुकीनंतर काय ते पुढचे पाहू
आम्ही दोघांनीही आमच्या पक्षातील नेत्यांची नावे एकमेकांना सांगितली. त्यांच्यात चर्चा होणार हे ठरलेले होते. या बोलण्यानंतर मी माझ्या सहका-यांशी चर्चा केली. आम्ही संध्याकाळपर्यंत एबी फॉर्मही थांबवले. पण दुसरा दिवस अखेरचा असल्याने मला एबी फॉर्म वाटप करावे लागले. आम्ही पाच वाजेपर्यंत उद्धवच्या फोनची वाट पाहिली. पण फोन आला नाही. त्यामुळे नंतर विषय बंद झाला.”
अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती दिली. या सर्व मुलाखतीतही राज ठाकरे यांच्या बोलण्यातून आपल्याला विचारणा झाली नाही, तसे झाले असते तर प्रतिसाद दिला असता असे त्यांना म्हणायचे असल्याचे जाणवले. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोघांच्या एकत्र येण्याच्या शक्यतांना आणखी बळकटीच मिळाली आहे.

सक्तमजुरी झालेल्या उमेदवारासाठी मोदींनी घेतली सभा!

0

पुणे- काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून केंद्रात सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 12 गुन्हे दाखल असलेले व एका खटल्यात तुरुंगवासासह एका वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झालेले भाजपचे राहुरीतील आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोदींनी आज राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सभा घेतली.
अनेक खटले नावावर असलेल्या व सक्तमजुरी झालेल्या कर्डिले यांच्यासाठी पंतप्रधानांनीच प्रचार सभा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चार दिवसापूर्वी मोदींनी धुळे येथे भाजपचे उमेदवार व तेलगी घोटळयाप्रकरणी आरोप झालेले अनिल गोटेंसाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी टीका झाली असतानाही भाजपने व पंतप्रधानांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी उमेदवाराच्या प्रचार सभेला जाण्यास पसंती दिली आहे. यावरून भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे हे स्पष्ट होत आहे. तसेच सत्ता आणण्यासाठी आकडेच उपयोगाचे असतात यावर भाजपचा अढळ विश्वास बसू लागला आहे. नैतिकच्या गप्पा मारत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपचा तीन-चार महिन्यांतच दुसरा रंग दाखवू लागला आहे.
अहमदनगरमधील अशोक लांडे खून प्रकरणी कर्डिले आरोपी आहेत. हा खटला सध्या नाशिक सेशन कोर्टात सुरु आहे. लांडे खून प्रकरणात कर्डिले यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकरसह त्यांचे दोन भाऊ, वडील तसेच काँग्रेसचा निलंबित शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर व इतर 12 आरोपी आहेत. कोतकर व कर्डिले एकमेंकांचे नातेवाईक आहेत. राजकीय संघर्षातूनच लांडेंचा खून केल्याचा कर्डिले-कोतकर यांच्यावर आरोप आहेत.
मागील आठवड्यापासून मोदींनी महाराष्ट्रात सभांचा धडाकाच लावला आहे. मोदी आपल्या भाषणांतून काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान हल्लाबोल करीत आहे.
नरेंद्र मोदी रोजच तीन-तीन चार-चार सभा घेत असल्याने त्यांच्या भाषणात तोच-तोच पणा येत असल्याने त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे.

माजी महापौर दत्ता गायकवाड यांची काँग्रेस शी प्रतारणा ; संगीता गायकवाड , नगरसेविका पदाचा राजीनामा द्या – निम्हण

0

DSC03029
.काँग्रेस पक्षाची पदे भोगून मानसन्मान मिळविलेल्या माजी महापौर दत्ता गायकवाड यांनी केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी अचानकपणे काँग्रेसची साथ सोडली गायकवाड यांच्या पत्नी संगीता गायकवाड या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. मात्र, पती दत्ता गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सौ. गायकवाड यांनी आपल्या नगरसेविका पदाचा राजीनामा द्यावा आणि राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान विनायक निम्हण यांनी गायकवाड यांना दिले. अचानकपणे काँग्रेसची साथ सोडल्यामुळे औंधकर नागरीक नाराज झाले आहेत. अशा मनोवृत्तीला औंधमध्ये अजिबात थारा नाही. अशा प्रवृत्तींना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका अ‍ॅड. तानाजी चोंधे यांनी केली.
काँग्रेस-पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे)चे शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवार विनायक निम्हण यांनी औंधमध्ये काढलेल्या पदयात्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत चोंधे बोलत होते. यावेळी वसंतराव गायकवाड, सुरेश रानवडे, वसंतराव जुनवणे, सुरेश जुनवणे, दिलीप गायकवाड, निवृत्ती कलापुरे, उत्तमशेठ आसवले, भिमराज नखाते, विकास रानवडे, रुपेश जुनवणे आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. चोंधे म्हण्आले, औंध हे पुणे शहराचे पश्‍चिमेचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे औंधच्या विकासासाठी विनायक निम्हण हे कायमच प्रयत्नशील राहिले
आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच औंध परिसर विकसित होताना दिसतोय. याचाच परिपाक म्हणून औंधमधील बहुतांश सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरीक, तरुणांनी निम्हण यांना पाठिंबा दर्शवला आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी दत्ता गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले आहे. मात्र, नागरीक अशा प्रवृत्तीला थारा देणार नाहीत, असेही अ‍ॅड. चोंधे यांनी सांगितले.
स्वत:च्या हव्यासापोटी खोटे-नाटे आरोप करून नागरीकांची सहानुभूती मिळवण्याचा दत्ता गायकवाड यांचा प्रयत्न हास्यास्पद असून त्यास नागरीक बळी पडणार नाहीत, असा विश्‍वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत गायकवाड यांनी व्यक्त केला.
विलास रानवडे यांचे हि यावेळी भाषण झाले

बहुजन मराठी संघटना दीपक मानकरांच्या पाठीशी

0

कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार दीपक मानकर यांच्या पाठीशी सर्व बहुजनवादी आणि मराठा संघटना ठाम पाने उभ्या आहेत आणि मानकर यांनाच विजयी करण्याचे अव्वाहन त्या करीत आहेत असे आज येथे विकास अन्न पासलकर , राजेंद्र कोंढरे , नामदेव मानकर अनिल मारणे , बाळासाहेब मोहोळ , संजय ढगे ,प्रभाकर बर्गे , विराज तावरे आदी बहुजन मराठा संघटना च्या नेत्यांनी स्पष्ट केले शिवाजी व्यायाम मंडळ येथे बहुजन मराठा संघटना च्या कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी या सर्वांनी मानकर यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला रवींद्र माळवदकर नगरसेवक प्रशांत जगताप , शांतीलाल मिसाळ ,शबीर खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
कसब्यातील बागा फुलाविणार – दीपक मानकर
कसबा विधानसभा मतदार संघात अनेक बागा आहेत पण सर्व ठिकाणी दुरवस्था झाली आहे
या सर्व बागा फुलविण्याची गरज आहे शहरातील या बागांमध्ये बालकांसाठी खेळण्या बसविणे – लाल मातीचे जॉगिंग मार्ग करणे , नैसर्गिक धबधबे तयार करणे , बसण्यासाठी बाके टाकणे एकंदरीत बागांचे सुशोभीकरण करणे अत्यावश्यक आहे ते आपण करणार असल्याचे आज दीपक मानकर यांनी सांगितले

मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार-रमेश बागवे

0

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा झंझावात गुरुवारी कोरेगाव पार्क भागात पोहोचला . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आतापर्यंत विकासालाच कौल दिला आहे . या निवडणुकीतही जागरूक मतदार शहराचा विकास साधणारया कॉंग्रेसलाच बहुमतांनी निवडून देतील , असा विश्वास रमेश बागवे यांनी व्यक्त केला .
त्यांच्या प्रचाराची सुरुवात कोरेगाव पार्क मधील हॉटेल चंद्रमापासून झाली . हि पदयात्रा बर्निंग घाट , चंचल तरुण मंडळ , संत गाडगे महाराज वसाहत , दरवडे मळा, कवडेवाडी , विद्युत नगर , मदारी वस्ती , मीरा नगर , भैरोबा पंपिंग स्टेशन येथे समारोप झाला . ठिकठिकाणी मतदारांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले . महिलांनी त्यांचे औक्षण केले . या सर्व भागामध्ये रमेश बागवे यांना विजयासाठी शुभेछा देण्यात आल्या . रमेश बागवे यांनी आपल्या आमदार निधीतून कोरेगाव पार्क मधील खाजगी सोसायटीमध्ये विकास कामे केली आहेत . त्यामध्ये रागविलास सोसायटीमध्ये नाल्याचे सीमाभिंतीचे काम , जॉगिंग ट्रेकचे काम , अग्रसेन सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम इंटरलॉक ब्लॉक टाकण्याचे काम , ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम , गाडगे महाराज वसाहत येथे समाजमंदिराचे काम करण्यात आली आहेत . पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणल्यामुळे ” आमचे मत रमेश बागवे यांनाच ” अशा प्रतिक्रिया या प्रचारादरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या .भविष्यातहि मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे रमेश बागवे यांनी सांगितले.
या पदयात्रेत शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगीता तिवारी , विजय जगताप , प्रकाश बर्गे , अशोक वाघचौरे , अड. अनुपमा जोशी , डॉ. सलोनी नाईक , रमाकांत म्हस्के , योगेश वाघेला , उमाकांत म्हस्के , संतोष आल्हाट ,सुर्यकांत पुजारी , परशुराम मुल्ला , रवींद्र लोंढे , सुर्यकांत म्हस्के , बापू उजागरे , देवेंद्रसिंग चावला , बापू पवार , इब्राहीम शेख , हरीश चव्हाण , भगवान सरोदे , माणिक डोमणे , हेमचंद्र चौधरी , उमेश तोडकर , संतोष माटे , प्रदीप कांबळे , राजकुमार पाचपिंडे , समीर लोंढे , जनार्दन बोथा , सुनिता शिंदे , सोनिया जाधव , पुष्पा कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार गुलाबनबी आझाद यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवार दिनांक १० ऑक्टोंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता भवानी पेठ येथील निशात टाकीज समोरील दिनशा हॉल येथे होणार आहे .

या बैठकित मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आ

पर्वती मतदारसंघ झोपडपट्टी मुक्त करणार –अभय छाजेड

0

पुणे-पर्वती मतदार संघ हा झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आपले प्रथम प्राधान्य असेल असे सांगून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेद्वारे (एसआरए) आहे त्याच जागेवर झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकीची पक्की घरे मिळवून देवू असा निर्धार पर्वती विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे उमेदवार अॅड. अभय छाजेड यांनी व्यक्त केला.
छाजेड यांनी गुरुवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाला भेट देवून फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या व त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच त्या भागातील नवश्या मारुती येथील झोपडपट्टी, शाहीर अण्णा भाऊ साठे झोपडपट्टी येथेही घराघरात जावून मतदारांच्या भेटी घेतल्या, त्यांचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासमवेत माजी उपमहापौर प्रसन्ना जगताप, शंकर पवार, हरिदास चरवड, आबा जगताप आदी उपस्थित होते. झोपडपट्टी धारकांचे आहे त्याच जागेवर पुनर्वसन करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. पर्वती मतदारसंघ हा पर्वती टेकडीच्या नावाने असून पर्यावरणाचे महत्व लक्षात घेवून ही टेकडी हिरवीगार करण्यासाठी तसेच तिच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही छाजेड यांनी नमूद केले.
बुधवारी संध्याकाळी छाजेड यांनी एस. टी. कॉलनी, स,नं. ३५ व ३८, बालवीर चौक, गोलघर, जवाहर मित्र मंडळ, लक्ष्मीनारायण चित्रपट गृहामागील बाजू, राहाटीची विहीर, आदर्श मित्र मंडळ, प्रियदर्शनी चौक, सदाबहार चौक, लोकमान्य हाउसिंग सोसायटी, पर्वती दर्शन, वेलणकर नगर असा मार्गक्रमण करीत मॅरेथॉन भवन येथे समाप्त झाली. छाजेड यांच्या समवेत दीपक ओव्हाळ, मामा परदेशी, सादिक कुरेशी, दीपक घोलप, बेबी नाझ खान, कांबळे ताई, सुरेखा भोसले, मिसाळ गुरुजी आदी शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते.
कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अभय छाजेड यांनी विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क सुरु केला असून कोपरा सभांच्या माध्यमातून युपीएच्या काळात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांचा व घेतलेल्या निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवली जात आहे. बुधवारी संध्याकाळी तळजाई लुंकड गेट, दाते स्टॉप व संत नगर, पद्मावती येथे कोपरा सभा घेण्यात आल्या. मुकेश धीवार, जयराम भोसले, निलेश खंडाळे, महेश वाबळे, प्रकाश आरणे, अमित बागुल यांनी या कोपरा सभा घेतल्या.