Home Blog Page 366

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे,पण …-मुख्यमंत्री फडणवीस

रायगडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करण्याप्रकरणी एक कायदा करण्याचे संकेत दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरेतर टकमक टोकावरून लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामु्ळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील, असे ते म्हणालेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा रायगडावर केवळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून आले नाहीत, तर ते छत्रपती शिवरायांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून आलेत. रघूजी राजे आंग्रे यांनी योग्य सांगितले. ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई, कुतूबशाही, आदिलशाही होती. त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते. मोडकळीस येत होते. लढून संपत होते. वाटत होते परकीय आक्रमकांचे राज्य संपणार नाही. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक सूर्य उगवला. ते नसते तर आपण कुणीच नसतो. त्यांच्यामुळे आपण देश आणि धर्माचे काम करत आहोत.

छत्रपतींनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातले तेज जागृत केले. सामान्य मावळ्यांना विरांमध्ये परावर्तीत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केला. त्यानंतर हिंदवी भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला. संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला तो केवळ शिवरायांमुळे.

फडणवीस म्हणाले, आमच्या उदयन महाराज यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायची आहे. सरकार ती करेलच. पण महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे या प्रकरणी काही निश्चित नियम तयार केले जातील. शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारकडून तयार केला जाईल. हे काम सरकार आपल्या हातात घेईल.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची ग्वाहीही यावेळी दिली. ते म्हणाले, अरबी समुद्रातील स्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. पण आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवले होते. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. सरकार हा खटला हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळे करून घेईल. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे हा प्रयत्न आपला असेल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी केली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे. मी अमित शहा यांना मदत करण्याची विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून नॉमिनेट केले आहे. आता 18 ते 21 या कालावधीत फ्रान्समध्ये युनेस्कोपुढे आमचे सादरीकरण होणार आहे. मी व आशिष शेलार तिकडे जाणार आहोत. मला विश्वास आहे की, आपले 12 किल्ले हे केवळ भारताचा नाही तर विश्व वारसा म्हणून दर्जा प्राप्त होईल.

महाराष्ट्रातील आपले सरकार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी काम करताना आमच्यासमोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श व भारताचे संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचे सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा वझे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन

पुणे : मारुतीराया बलभीमा, भजनालागी द्या प्रेमा… श्रीराम-लक्ष्मण-जानकी… जय बोलो हनुमान की… अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत हनुमान जन्माचे कीर्तन पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात पार पडले. श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे झाले.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शन बुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा देखील पार पडला.

‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव व मार्गदर्शन

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व ‘अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’चा संयुक्त उपक्रम

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती ‘एपीएमए’च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.

डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगून ‘नीट’ परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नाना त्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी गुणवत्ता असूनही केवळ पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत, या उद्देशाने मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ‘एपीएमए’ने हा उपक्रम हाती घेतला आहे.”

‘नीट’ परीक्षेच्या प्रवासात ‘एपीएमए’ या विद्यार्थ्यांसाठी सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सविस्तर उत्तरांसह पाच सराव प्रश्नपत्रिका www.apma.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील. भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांसाठी प्रत्येकी दोन, अशी एकूण सहा ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने होतील. ही व्याख्याने झूम, तसेच युट्युबवर लाईव्ह पाहता येतील. ‘नीट’ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे नियम काय आहेत, यावर एक मार्गदर्शनपर व्याख्यानही होणार असल्याचे डॉ. तपस्वी म्हणाल्या.

पुणे शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास आणि यशाची शक्यता निश्चित वाढेल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी www.apma.co.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. १३ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

बंधुतेचा विचार मानवी जीवनात समानता, सन्मान देणाराडॉ. अश्विनी धोंगडे

ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारांचे वितरण

पुणे: “भवतालात अन्याय, अत्याचाराच्या घटना घडताहेत. महिला सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होतोय. जाती-धर्माच्या नावावर समाज विभागला जात आहे. आर्थिक विषमता वाढतेय. अशावेळी मानवी जीवनात समानतेचा धागा विणून प्रत्येक घटकाला सन्मान देणारा बंधुतेचा विचार अधिक व्यापक व्हायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले. 

स्वांतत्र्य व समता आणण्यासाठी कायद्याचा उपयोग होऊ शकतो; मात्र, बंधुता काळजातून यावी लागते. त्यामुळे संविधान आदर्शवादी आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक व्यक्तीला समान न्याय, स्वातंत्र्य आणि सन्मानाची वागणूक द्यायची असेल, तर त्याला बंधुतेच्या विचारांची जोड द्यावीच लागेल, असे प्रतिपादन २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी डॉ. धोंगडे उद्घाटक म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या संमेलनात स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. प्रभू गोरे (संपादक-आधुनिक केसरी, छत्रपती संभाजीनगर), मंगेश कोळपकर (मुख्य वार्ताहर-सकाळ, पुणे), सचिन कापसे (वृत्तसंपादक-लोकमत पुणे), नंदकुमार जाधव (मुख्य उपसंपादक-पुण्यनगरी, पुणे), महेश देशपांडे (वरिष्ठ वार्ताहर-केसरी, अहिल्यानगर), नोझिया सय्यद (वरिष्ठ वार्ताहर-पुणे मिरर), अश्विनी जाधव (वरिष्ठ वार्ताहर-लोकमत ऑनलाईन, पुणे), सागर सुरवसे (वरिष्ठ वार्ताहर-टीव्ही नाईन, सोलापूर), गुलाबराजा फुलमाळी (संपादक-महाराष्ट्र दर्पण, नेवासा) यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार’, तर प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण (पुणे), प्रा. डॉ. संदीप सांगळे (तळेगाव ढमढेरे), प्रा. डॉ. कामायनी सुर्वे (चिंचवड), प्रा. भारती जाधव (वाघोली), हनुमंत चांदुगडे (बारामती), प्रा. डॉ. जयश्री आफळे (सातारा), शरद शेजवळ (नाशिक), विजयकुमार मिठे (नाशिक), दिनकर बेडसे (धुळे), राजू मोहन (देहू), बाळासाहेब गोजगे (तळेगाव दाभाडे), भाऊसाहेब मोते (नाशिक) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अश्विनी धोंगडे म्हणाल्या, “बंधुता चळवळीची आज समाजात गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेकडे टाकलेले हे पाऊल आहे. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला वाहिलेले हे संमेलन समाजात बंधुभाव पेरण्यासाठी उपयुक्त ठरेल. स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीव होत असून, त्यांच्यात धीटपणा येतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यातून मातीत रुजलेल्या स्त्रीवादाचे पुनरुज्जीवन होत आहे. फुले दाम्पत्याने स्त्रीला मानवी जीवनाचा आधार दिला असून, सावित्रीबाई या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांची माता आहेत. भारतीय स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा डॉ. आंबेडकरांनी मांडला.”

प्रा. सुभाष वारे म्हणाले, “स्वातंत्र्य आणि समता सर्वांनाच हवी आहे. मात्र मनाचा सहजभाव असलेल्या बंधुतेबद्दल फारसे बोलले जात नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता याचे आश्वासन देणारी बंधुता आहे. धार्मिक, भाषिक, जातीय आणि आर्थिक भेदांतून मुक्त करण्यासाठी बंधुतेची रुजवण खूप गरजेची आहे. बंधुतेची भावनाच एकमेकांना आपुलकीच्या भावनेने जोडून ठेवणार आहे. आजच्या स्वार्थी, हव्यासी आणि क्रूरतेचा सीमा ओलांडणाऱ्या काळात बंधुतेचा विचार आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाईल.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुता चळवळीची सुरुवात पन्नास वर्षांपूर्वी झाली. समाजात बंधुता रुजवण्याचे कार्य करत गेलो. या वाटेवर अनेक चांगले लोक जोडले गेले. साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यक्तींची साथ लाभली. संविधानातील मूल्यांना खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.” 

प्रा. भारती जाधव, मंगेश कोळपकर, अश्विनी जाधव, नंदकुमार जाधव, गुलाबराजा फुलमाळी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कृष्णकुमार गोयल यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. शंकर आथरे यांनी आभार मानले. मंदाकिनी रोकडे, प्रशांत रोकडे यांनी संयोजन केले. 

पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या  राखीव २० टक्के घरांच्या वितरणात भ्रष्टाचार

पुणे :पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा)च्या ७ प्रकल्पांच्या योजनात दुर्बल घटकांसाठी (ई डब्ल्यू एस ) असणाऱ्या २० टक्के राखीव घरांच्या वितरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करीत याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी  लोकजनशक्ती पार्टी(रामविलास) या पक्षाने आज पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे १२  एप्रिल २०२५ रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.लोक जनशक्ती पार्टीचे  पुणे शहर अध्यक्ष  संजय आल्हाट,कायदेविषयक सल्लागार निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड,के.सी.पवार,राहुल उभे,परमजीत सिंग अरोरा,परबजित सिंग अरोरा,एड.अमित दरेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

यासंदर्भात पक्षाने  पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ(म्हाडा) च्या मुख्याधिकाऱ्यांना ११ एप्रिल रोजी कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. 

पक्षाने पुणे आणि पिंपरी मनपा क्षेत्रात ७ प्रकल्पांची सखोल माहिती घेतली.जिथे प्रकल्प सुरु आहेत त्या जागेऐवजी १ किलोमीटर अंतरात दुसऱ्या ठिकाणी दुर्बल घटकांना २० टक्के घरे देण्याचा नियम २०२० मध्ये करण्यात आला.प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रकल्पच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले आहे.नियमानुसार म्हाडाच्या बांधकाम विकसकांनी १ एकर पेक्षा मोठा प्रकल्प असेल तर २० टक्के क्षेत्रातील घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उपलब्ध करण्यासाठी म्हाडाकडे हस्तांतरित करायची आहेत.तोपर्यंत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र द्यायचे नाही असा नियम असताना या प्रकल्पाना सर्व प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.म्हाडाची इमारत दुसऱ्या जागेवर वर्ग करताना भ्रष्टाचार झाला आहे आणि दुर्बल घटकांना मिळालेली नाहीत .  

  हा भ्रष्टाचार पाहता ज्या ठिकाणी विकसकांचा मूळ प्रकल्प आहे,त्याच ठिकाणी दुर्बल घटकांना घरे द्यावीत,अन्याय करून मूळ हेतूला काळिमा फासू नये,या ७ प्रकल्पात मिळून १४०० घरे दुर्बल घटकांना मिळायला हवी होती ,ती मिळाली नसल्याने मिळावीत ,ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कर्तव्यात कचुराई केली त्यांच्यावर कारवाई करावी,सर्व प्रकल्पांची माहिती वेबसाईटवर द्यावी,आर्थिक गुन्हे शाखेत या प्रकल्पांच्या संदर्भात दाखल तक्रारी वरून गुन्हे दाखल करावेत,आर्थिक दुर्बलांना २० टक्के घरांचा नियम डावलून किती प्रकल्पाना परवानगी देण्यात आली याची माहिती सार्वजनिक करावि ,या सर्व काळात कार्यरत अधिकाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करून कठोर कारवाई करावी,अशा मागण्या या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. 

अमित शहांची घसरली जीभ:औरंगजेबाच्या कबरीचा ‘समाधी’ म्हणून केला उल्लेख; ठाकरे गटाने तत्काळ ‘तडीपार’ म्हणत केला पलटवार

मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावर बोलताना मुघल बादशहा औरंगजेब याच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख समाधी म्हणून केला. त्यांच्या या ‘स्लिप ऑफ टंग’चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला. समाधी ही साधूसंत पुण्यवंतांची असते. त्यामु्ळे छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना किल्ले रायगडावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बोलताना अमित शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी असा केला. माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी या संस्काराचा वटवृक्ष उभा केला. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी आदी अनेक योद्धे शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब जोपर्यंत जिवंत राहिला तोपर्यंत त्याच्याशी लढत राहिले, झुंजत राहिले.

यामुळे स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराभूत झाला. त्याची इथेच समाधी बनली. हे शिवचरित्र भारताच्या प्रत्येक मुलाला शिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे अमित शहा म्हणाले.

समाधी ही साधूसंत पुण्यवंतांची असते

अमित शहा यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा. समाधी साधूसंत पुण्यवंताची असते. ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो. छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आले नाहीत, असे त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी, आपल्या भाषणात अमित शहा यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता जगभरात पोहोचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मी महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. त्यांच्यापासून संपूर्ण देश व जग प्रेरणा घेऊ शकते. स्वधर्म, स्वराज्य व स्वभाषा अमर करणे हे 3 विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नाहीत. ते माणसाच्या स्वाभीमानाशी जोडलेले आहेत. आक्रमण करणाऱ्यांनी आपल्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवरायांनी हा विचार मांडला. आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत गेलो. पण शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सूर्य दैदिप्यमान केला. मी इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून येथे आलो आहे.

छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. याच किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचे काम केले. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचे प्रतीक होता. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आले. पण लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नाराही दिला. त्यांनी शिवरायांचीच प्रेरणा घेतली होती, असे अमित शहा म्हणाले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट- रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

मुंबई, दि. 11 :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले.
या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी), जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी).
000

‘रामपर्व’मधून उलगडले रामायणातील अनोखे प्रसंग

0

प्रभावी सादरीकरणाने रसिक झाले भावविभोर
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : राम-जानकीची पहिली भेट, त्यांचा विवाह, भरतभेट, अशोक वनात बंदिवासात रामाच्या विरहाने दु:खी झालेली सीतामाई, हनुमानाने अशोक वनात जाऊन केलेला संहार, उर्मिलेची मनोव्यथा, सेतू बांधत असताना रामाने रामेश्र्वराची केलेली स्थापना, रावणाच्या निर्णयाने शोकातुर झालेली मंदोदरी अशा रामायणातील दुर्लक्षित राहिलेल्या प्रसंग आणि व्यक्तिरेखांवर आधारित ‘रामपर्व’ या अनोख्या सांगितीक कार्यक्रमात रसिकांना एक वेगळीच भावानुभूती आली. निमित्त होते ‘रामपर्व’ या सांगितीक कार्यक्रमाचे.
गीतरामायणाप्रमाणेच अवीट गोडी असलेल्या ‘रामपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले. या वेळी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती.
‘राम जानकी मिलन झाले’, ‘दशरथ राजा शरयूकाठी’, ‘बागेमधूनी फिरताना सहज पाहिले रामाला’, ‘क्षमा करावी अबोध बाळा’, ‘टंकार गरजल प्रत्यंचेचा’, ‘खचणार नाही नाथा, मी वाट पाहताना’, ‘बांधताना सेतू’, ‘शोकातुर झाली लंकेश्वरी’, ‘झेप घेतली हनुमंताने’ अशा विविध गीतांच्या सादरीकरणाने रसिक त्या त्या प्रसंगांशी जणू एकरूपच झाले. रामायणातील प्रसंगांचा पट उलगडताना भावपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणातून हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी रसिकांना अनोखी अनुभूती दिली आणि रसिकही त्या त्या प्रसंगानुरूप रचलेल्या आणि सादर केलेल्या गीतांशी तादात्म्य पावत भावविभोर झाले. ‘राम सीता नाम घेता टाळ वाजतो’ आणि ‘सावळी ती कांती गोजिरे ते रूप’ या रचनांना उपस्थित श्रोत्यांनी गायकांच्या सुरात सूर मिसळत दाद दिली तेव्हा वातावरण भक्तिरसपूर्ण झाले.
‘रामपर्व’ मधील काव्यरचना कवी अमित गोखले (पार्थ) यांनी रचल्या असून रचनांना संगीतकार हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले आहे. अमित गोखले यांनी निरुपणाद्वारे प्रसंगांची उकल केली.
शुभदा आठवले (संवादिनी), केदार तळणीकर (तबला), अवधूत धायगुडे (तालवाद्य), वेधा पोळ (व्हायोलिन), प्राची भिडे, मेघना भावे (सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत रामभाऊ कोल्हटकर यांनी केले.

नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा समग्र आराखडा तयार करावा

पुणे दि. ११ : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आराखड्यानुसार मंजूर असलेली सर्व कामे गुणवत्ता राखून तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास आराखडा संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री डुडी बोलत होते.

तीर्थक्षेत्र विकासांतर्गत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वढू बु. व तुळापूर, मालोजी राजे भोसले यांची गढी व हजरत चाँदशहवली बाबा दरगाह, श्री क्षेत्र जेजुरी गड, सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधी स्थळ, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करणे श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या सर्व आराखड्यांच्या विकास कामांच्या प्रगती बाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. डुडी यावेळी म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासंदर्भात मंदिर ट्रस्ट, संस्थान येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची मदत घेऊन कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतील त्या प्रशासनातर्फे सोडण्यात येतील, काही ठिकाणी जमीन संपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करावी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठीच्या आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उत्कृष्ट असल्या पाहिजे, कामे पूर्ण झाल्यावर त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, भीमाशंकर तीर्थक्षेत्र सर्वात चांगले तीर्थक्षेत्र तयार झाले पाहिजे त्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा, भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच या परिसरातील विविध देवस्थान, धार्मिक स्थळांची विकास कामे रस्त्याची कामे, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सुविधा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम आदी बाबींचा समावेश या विकास आराखड्यात करुन पुढील दहा दिवसात आराखडा प्रशासनाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या विशेष विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अगोदर येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी नियोजन करावे, असे श्री. डुडी म्हणाले.
बैठकीला, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग वनविभाग, संबंधित विभागांचे अधिकारी, मंदिर देवस्थानाचे पदाधिकारी, बांधकाम विकासक उपस्थित होते.

२५ एप्रिलला रुपेरी पडद्यावर येतोय ‘फुले’ – एका युगप्रवर्तक परिवर्तनाचा प्रवास

झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रूपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे.

‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे.

दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना नवी ऊर्जा मिळाल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं.

‘फुले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर त्यामागची तत्त्वं, मूल्यं आणि सामाजिक चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो केवळ चित्रपट न राहता, एक सांस्कृतिक आणि वैचारिक अनुभव ठरेल.

या चित्रपटाच्या दृश्यात्मक आणि तांत्रिक मांडणीला सशक्त आकार देणाऱ्या क्रिएटिव्ह टीममध्ये अनेक अनुभवी कलाकार सहभागी आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून सुनीता राडिया यांनी प्रभावी चित्रभाषा वापरली आहे. वेशभूषा डिझायनर अपर्णा शाह यांनी ब्रिटिशकालीन भारतातील वास्तव आणि फुल्यांच्या सामाजिक स्तराचे सूक्ष्म दर्शन घडवले आहे. प्रोडक्शन डिझायनर म्हणून संतोष फुटाणे यांनी काळाला साजेशी पार्श्वभूमी उभी केली असून, सिंक साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे.

संतोष गायके यांनी मेकअप आणि हेअर डिझाइनच्या माध्यमातून पात्रांना अधिक वास्तविक बनवलं आहे. संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचे पार्श्वसंगीत आणि गीतसंगीत कथानकात भावनात्मक गहिराई निर्माण करतं. रौनक फडणीस यांनी आपल्या संकलनातून कथेला गतिमान ठेवताना प्रसंगांची परिणामकारक मांडणी केली आहे. तर पोस्ट प्रोड्युसर म्हणून कुणाल श्रीकृष्ण तारकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

‘फुले’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर एका युगपुरुषाच्या विचारांचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाच्या प्रवासाचा साक्षीदार ठरणारा दस्तऐवज आहे. २५ एप्रिलपासून हा सिने-अनुभव सर्वांच्या भेटीला येतो आहे.

नारायण राणेंना अटक केल्याचा व्हिडिओ अजून सेव्ह:परतफेड झाली की तो डिलीट करेन, नीतेश राणे यांचा ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा

सिंधुदुर्ग-नारायण राणे यांना अटक करतानाचा व्हिडिओ अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी मी याची परतफेड करेन, त्याच दिवशी मी तो व्हिडिओ डिलीट करेन. मी कुणालाही सोडणार नाही, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांना दिला.खासदार नारायण राणे यांचा गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये काल वाढदिवस झाला. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते उपस्थित होते. मंत्री नीतेश राणे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना झालेल्या अटकेवर भाष्य करताना ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवले आणि अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला हा क्षण मी अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी मी त्याची परतफेड करेन त्या दिवशीच हा व्हिडिओ डिलीट करेन. सर्वांचा हिशोब होणार आहे. कारण, राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटणार नाहीत हे मी विश्वासाने सांगतो.

आम्ही 10 वर्षांच्या प्रवासात खूप काही पाहिले. अनुभवले. दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होते. त्यांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेलही पाहिले. पण त्यांनी आम्हाला लोकसभेला साथ दिली. त्यामुळे जुन्या आठवणी पुसल्या गेल्या. तिसऱ्या कुणालातरी खुश करण्यासाठी केसकरांनी ते केले होते. आमचे त्यांच्याशी केव्हाच वैर नव्हते, असेही नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणात अडचणीत सापडलेत. सत्ताधारी महायुतीच्या अनेक नेत्यांना त्यांना या प्रकरणात अटक होण्याची भिती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ठाकरे गटाला हा इशारा दिला आहे.

नारायण राणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाविषयी ज्यांना काही माहिती नाही, त्यांनी फार काही बोलू नये. त्यांना स्वातंत्र्य दिन कोणता याची काहीही माहिती नाही. मी असतो, तर त्या दिवशी कानशिलात हाणली असती, असे ते महाड येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले असते.

नारायण राणे यांच्या या विधानाने राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. या विधानानंतर काही दिवसांतच 23 ऑगस्ट 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना अक्षरशः जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती.

 सुदर्शन केमिकल्सतर्फे २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. हा उपक्रम आता केवळ ‘सुधा सितारा’ राहिला नाही, तर खऱ्या अर्थाने ‘सुधा सितारे’ झाला आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सुधा सितारा शिष्यवृत्ती संजीवनी ठरत असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.

सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये १८५ मुली, ४९ मुले व १२ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राठी स्कुलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी सुदर्शन केमिकल्सच्या पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका पाटील, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. मुलींमधील गुणवत्ता हेरून त्यांना अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्याची ही कल्पना विलक्षण आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याला जातोय, याचा आनंद आहे. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.”

राजेश राठी म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टयांना अनुसरून सुधा सीएसआर महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या सीएसआर कार्यक्रमातून आजवर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, आत्मविश्वास वृद्धी आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली जात आहे.”

शिवालिका राजे यांनी सांगितले की, सुदर्शन कंपनीत ‘डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन’ अंतर्गत उपक्रम राबवले जात आहेत. आपण समाजातही हेच मूल्य रुजवत आहोत. यावेळी सुधा सीएसआर उपक्रमांतर्गत, मुलींप्रमाणेच मुलांना आणि दिव्यांगांना दत्तक घेऊन मदत केली जात आहे. या वर्षीच्या सुधा सितारा उपक्रमाची व्याप्ती संपूर्ण रायगड जिल्ह्यात झाली, याचा आनंद आहे.

प्रास्ताविकात माधुरी सणस म्हणाल्या, “सामाजिक जाणिवेतून २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात शेकडो मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती दिली आहे. गरजू मुलामुलींना शिक्षण आणि मेंटॉरशिप देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुदर्शन केमिकल्समधील कर्मचार्‍यांनी या मुलामुलींचे पालकत्व स्वीकारले आहे.”
विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

स्वाती मोहिता आणि संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विशाल घोरपडे यांनी आभार मानले.

बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्स खास महिलांसाठी सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर करा

·         मुलाच्या भविष्यासाठी उत्पन्न

·         संघर्ष ६० गंभीर आंतरराष्ट्रीय संरक्षणासाठी

·         प्रति वर्ष 36,500 रु. महिलांसाठी आरोग्य व्यवस्थापन सेवा

पुणे : भारतातील एका उदाहरणाच्या एका स्वतंत्र जीवन विमा 5 बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सने बजाज अलियान्झ लाइफ सुपरवुमन टर्म ( SWT) ही महिलांसाठी स्वतः तयार सर्वसमावेशक सुरक्षा योजना सादर केली आहे. ही क्रांतिकारी योजना परंपरागत जीवन विम्याचे पलीकडे गाव टर्मशुरन्स लाभ , महिलांसाठी खास संस्था संरक्षण लाभ , पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट आणि आरोग्य व्यवस्थापन सेवा सुविधा समाविष्ट करणारी महिला आणि त्यांच्या कुटुंबांना सर्वांगीण आर्थिक संरक्षण पुरवते.

महिला त्यांच्या कुटुंबाची काळजीपूर्वक उत्कृष्टपणे घेतात आणि त्यांच्या स्वतःच्या आर्थिक सुरक्षेचा विचार तितकाच विचार करायला हवा. बजाज अलियान्झलाईफ सुपरवुमन टर्म महिलांना आर्थिक मदत स्वावलंबी ठेवते , त्यांच्या जीवनातील प्रत्येक शक्तीवर आर्थिक आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी त्यांचे जीवन ध्येय आधार देते. या सर्वाची मुख्य खालीलप्रमाणे आहेत:

टर्म इन्शुरन्सद्वारे सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा: महिला बदलती भूमिका आणि त्यांच्या विशिष्ट आर्थिक गरजा लक्षात ठेवा जीवनाची SWT ही योजना विमाधारकाच्या चौकशीनंतर नामनिर्देशित व्यक्तीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कुटुंबाचा आर्थिक भविष्यकाळ सुरक्षित करते.

• गंभीर संरक्षण संरक्षण ( CI संरक्षण): CI रायडर साहाय्याने SWT 60 प्रमुख संरक्षण संरक्षण देते . श स्तन , गर्भाशय ग्रीवा व अंडाशयाचा कर्करोग यांसारख्या महिला संघटनांचाही समावेश आहे . आपण उपचार दरम्यान आर्थिक न महिला आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकता. स्वतंत्रपणे राहणे हे सर्वात सुरक्षित असते.

• चाइल्ड केअर बेनिफिट: मुलाच्या भविष्याची काळजी लक्षात घेऊन समोर आलेले पर्यायी चाइल्ड केअर बेनिफिट देण्यात आले— SWT प्रथमच सादर करण्यात आलेली ही सुविधा धोकादायक आहे.

• व्यवस्थापन सेवा ( एचएमएस): आर्थिक सुरलीकडे ही योजना संपूर्ण आरोग्य तपासणी , ओपीडी सल्लामसलत , गर्भधारणेशी संबंधित सेवा , भावनिक आरोग्य प्रोग्रॅम्स व आहारतज्ञ आरोग्यतज्ज्ञ मार्गदर्शन करणारी एचएमएस सेवा देते—या सुविधे महिलांच्या सर्वांगीण सेवा. कल्याणासाठी कंपनीची बांधिलकी अधोरेखित होते.

बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चुग म्हणाले , “ आजच्या महिला त्यांचे आरोग्य , कल्याण व आर्थिक लाभान्वित बझार पक्षातर्फे त्यांच्या समर्थनार्थ. लाइफवुमन या एकाच उपायसुविधेद्वारे सर्व गरजा पूर्ण करणे ही त्यांची योजना आहे. आत्मनिर्भर आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी आर्थिक शक्ती देते. स्वत:च्या आरोग्याची देखरेख असो किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करणे असो ही सर्वसमावेशक योजना आमच्या महिला ग्राहकांच्या विविध गरजांनुसार सानुकूल बनवते.

अतिरिक्त , बजाज अलियान्झ लाईफने गेल्या काही वेळा आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध टर्म योजना समाविष्ट करून तो अधिक मजबूत केला आहे . जसे की:

बजाज अलियान्झलाईफ ई-टच II ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेट इंडिव्हिज्युअल लाइफ इनश्युरन्स टर्म प्लॅन) सर्व पगारदार व्यक्तींसाठी डिझाइनिंग योजना.

बजाज अलियान्झ लाईफ आयसिक्युअर II ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ इनश्युरन्स टर्म प्लान) – स्वयंरोजगार असलेल्या व्यावसायिकांसाठी योजना.

बजाज अलियान्झ लाईफ डायबेटिक टर्म प्लॅन II सब 8 HbA1c ( नॉन लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल , प्युअर रिस्क प्रीमियम लाइफ इनशुरन्स प्लॅन) – मधुमेहासाठी खास तयार भारताची पहिली टर्म योजना.

बजाज अलियान्झ लाईफ इन्वेस्ट प्रोटेक्ट गोल III (युनिट लिंक्ड , नॉन पार्टीसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाईफ सेव्हीग्ज इनशुरन्स प्लॅन्स ) उच्च जीवन संरक्षण आणि मार्केट-लिंक्ड परतव्याच्या सर्वांचे अद्वितीय संयोजन. या पोर्टफोलिओमध्ये विविध ग्राहक विभागासाठी अनेक उत्पादने आहेत. कंपनीने 9.23% दावा निवारण प्रमाण (वैयक्तिक वर्ष दाव्यांचे निवारण प्रमाण वित्त 2023-2024 साठी) आणि 432% सॉल्व्हन्सी रेशो ( 31 मार्च 2024 पर्यंत) त्यांच्या विश्वसनीयतेच्या निकषाने आपली बांधिलकी राखली आहे. नाविनपूर्ण ग्राहक आणि केंद्रीत अग्रेसर अग्रेसर आहे

भारतीय विद्यार्थी रोबोटिक्स टीम ह्यूस्टनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी रवाना

पुणे: मुंबईतील “टीम आर फॅक्टर 6024” ने USA मध्ये दोन प्रमुख पुरस्कार जिंकून ह्यूस्टनमधील FRC वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता प्राप्त केली आहे. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 16 ते 19 एप्रिल दरम्यान ह्यूस्टन, USA मध्ये होणार आहे.

मुंबई स्थित “टीम आर फॅक्टर 6024” ने मार्च महिन्यात USA मध्ये झालेल्या “फर्स्ट रोबोटिक्स चॅलेंज” (FRC) मध्ये अत्यंत मान्यताप्राप्त ठरले आणि दोन प्रमुख पुरस्कार मिळवले. या टीममध्ये मुंबई, बंगलोर आणि पुणे येथील आठ शाळांतील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे रोबोट प्रोग्राम, डिझाइन आणि अ‍ॅस्सेम्बल केले आहेत, ज्यासाठी त्यांना कोणतीही बाह्य मदत घेतली नाही.

या विद्यार्थ्यांचा समूह 8वी ते 12वीच्या दरम्यान आहे. त्यांनी “माइंड फॅक्टरी” मुंबई येथे मार्गदर्शक निलेश शाह आणि पारुल शाह यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्या तयार केलेल्या रोबोटचे नाव “गोल्डफिश” आहे. टीममधील काही सदस्य हे मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत, ज्यात समृद्धी स्वरुप, रिनेसा देधिया, प्रपटी दोशी, रिधान देधिया, सक्षम गुप्ता, रचित जैन आणि अर्जुन वशिष्ठ यांचा समावेश आहे.

तर, अन्य सदस्य हे मुंबईतील “डीएसबी इंटरनॅशनल स्कूल”, “पेस जूनियर कॉलेज”, “जामनाबाई नारसी स्कूल”, “विटी इंटरनॅशनल स्कूल”, “राजहन्स विद्यालय” आणि “सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल” येथील विद्यार्थी आहेत. पुण्यातील “विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” आणि गोव्यातील “शारदा मंदिर स्कूल” येथील विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

टीम आर फॅक्टर 6024 ने ‘2025 इमेजरी अवॉर्ड’ आणि ‘2025 इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड’ मिळवले आहेत. इमेजरी अवॉर्ड इंजिनीअरिंग आणि व्हिज्युअल डिझाइनला मान्यता देतो, तर इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड समुदायात इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील उत्साही भावना वाढविण्यासाठी दिला जातो. या पुरस्कारासाठी टीमने USA, मेक्सिको आणि टर्की येथील इतर टीम्सशी स्पर्धा केली.

टीम 6024 ही FRC च्या इतिहासातील पहिली भारतीय टीम आहे, आणि त्यांचा उद्देश FIRST (For Inspiration & Recognition of Science & Technology) या नॉन-प्रॉफिट संस्थेचा भारतात आधार मजबूत करणे आहे. या टीमने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकालात गरीब विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवले, पुण्यात FIRST टेक चॅलेंज (FTC) आयोजित केले आणि विविध सत्रांमध्ये आपल्या नवकल्पनांचे प्रदर्शन केले.

टीम आर फॅक्टर 6024 च्या या यशाने भारतीय रोबोटिक्स क्षेत्रात एक नवीन आयाम निर्माण केला आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ११ एप्रिल २०२५ : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथून समोर आलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका तरुणाकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. आरोपी तरुणाने मुलीवर लग्नासाठी दबाव टाकून तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “शाळकरी मुलीला त्रास सहन न झाल्यामुळे तिने आत्महत्या केली. हे वृत्त समोर आल्यानंतर अत्यंत खेद वाटतो. आजही आपल्या समाजात अशा घटनांमुळे अल्पवयीन मुलींना सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”

डॉ. गोऱ्हे यांनी समाजातील नागरिकांना जागरूकतेचे आवाहन करत सांगितले की, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीची भूमिका बजावली पाहिजे. मुलींना कोणताही त्रास, छेडछाड अथवा धमकी दिली जात असेल, तर त्यांनी कोणतीही भीती न बाळगता ११२ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा. तसेच महिला सहायता संस्था जसे की स्त्री आधार केंद्र यांच्याकडे संपर्क साधून मदत घेता येईल.

त्यांनी पालकांनाही आवाहन केलं की, मुलींच्या वागण्यात कोणतेही भावनिक वा मानसिक बदल जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधावा. सुरक्षितता, भावनिक आधार आणि समजूतदारपणाची गरज असलेल्या अशा प्रसंगांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

डॉ. गोऱ्हे यांनी शैक्षणिक संस्थांनाही या विषयात पुढाकार घेण्याचे सुचवले. शाळा व महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण, स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क आणि मदत केंद्रांची माहिती देणारे कार्यक्रम नियमितपणे राबवले जावेत. समाजानेही अशा घटना रोखण्यासाठी एकत्र येऊन सतर्कता बाळगली पाहिजे. आपल्या परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली जाणवल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

“या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. समाजात अशा अमानुष वागणुकीला थारा नाही. आपली जबाबदारी आहे की अल्पवयीन मुलींना सुरक्षित, सन्मानजनक आणि निर्भय आयुष्य मिळावं,” असे ठाम मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.