मुंबई – मतदान न करणारेच नंतर सरावाधिक तक्रारी करतात असे आज सलमान खान ने म्हटले आहे तर अमोल पालेकर यांनी मात्र चांगले उमेदवार दिसत नसल्याने लोक मतदान करण्यास उत्साही नसतात असे विधान केले आहे
पाहू यात मतदान केल्यानंतर कोण काय म्हणाले …
सलमान खान : मतदान करून तुम्ही तुमचा मतदारसंघ, शहर, राज्य आणि देशाविषयी एकप्रकारे प्रेमच व्यक्त करत असता. निव्वळ राजकारण करण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघामध्ये काम करणाऱ्याला मत द्या. आज मतदान न करता सहलीला गेलेले लोकच नंतर सर्वाधिक तक्रारी करतात.
अमोल पालेकर : मतदानाची टक्केवारी घसरतेय किंवा शंभर टक्के मतदान होत नाही, अशी नाराजी आपण नेहमीच व्यक्त करतो; पण राजकीय पक्ष उमेदवारांच्या रूपाने चांगला पर्याय जनतेसमोर आणतात का? हा खरा प्रश्न आहे. सध्या चांगले उमेदवार नसल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे.
रणबीर कपूर : आपल्या शहराचा कारभार कुणाच्या हाती असावा, हे तुम्हालाच निवडावे लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि मतदान करा.
मतदानाबाबत सलमान खान – अमोल पालेकर यांची भिन्न मते
पुण्यात दुपारी ३पर्यंत ४६ तर कोल्हापुरात ५८ टक्के मतदान
पुणे- पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु आहे. पुणे जिल्ह्यात दुपारी 3 पर्यंत 46 टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीनपर्यंत सांगलीत ५२ टक्के, साता-यात ५० टक्के, कोल्हापूरात ५८टक्के, सोलापूरात ४५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिका-यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत दुपारी ३ वाजेपर्यंत झालेलं मतदान
वाशिम ३९.८ टक्के नांदेड ४८ टक्के औरंगाबाद ४३ टक्के भंडारा ४४ टक्के पुणे ४५.२९ टक्के सांगली ५२.५९ टक्के अकोला ३६ टक्के वर्धा ४१ टक्के बीड ४९.३० टक्के सातारा ४९.९४ टक्के सोलापूर ४५.४६ टक्के धुळे ४०.३३ टक्के
विदर्भात मुसळधार पाऊस -एकाचा मृत्यु
नागपूर- विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने मतदारांची धांदल चांगलीच उडाली आहे. रामटेकमधील सावनेर मतदान केंद्रावर वीज कोसळून एकाचा मृत्यु झाला असून जवळपास 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रामटेकमधील सावनेर येथील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलिंग पार्टीचा पोलिस कर्मचार्याचा मृत्यु झाला. तसेच 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
आज (15 ऑक्टोबर) विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र मतदान सुरु असताना विदर्भात मात्र मतदानावर पावसाचे सावट आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे विदर्भात मतदानाला सुरूवातीच्या टप्प्यात अल्प
ध्यास आमचा विकास ; मतदान करून सारे , महाराष्ट्र बनवू झकास ।
कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक मानकर यांनी आपल्या परिवारासह मतदान केले

शिरूर -आम्बेगावचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आपल्या पत्नी समवेत

विनोद तावडे आपल्या पत्नी समवेत

पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवार अभय छाजेड

भाजप चे देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता समवेत

शिवाजीनगर चे उमेदवार विनायक निम्हण
गंध पसरवू इथल्या मातीचा ; नक्कीच बजावू हक्क आमचा
मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने मतदान केले –

दक्षिणेत गाजणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे हिने मतदानानंतर उत्स्फूर्ततेने अशी पोझ दिली

मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले

मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी

मराठी कलाकार संतोष चोरडिया

अभिनेता महेश कोठारे

अभिनेता गुलश ग्रोव्हर

अभिनेत्री तेजस्विनी पंडित

अभिनेता अमोल पालेकर आपल्या कुटुंबा समवेत

अभिनेता अतुल कुलकर्णी आणि सोबत IBN लोकमत ची नीलिमा कुलकर्णी

अभिनेता स्वप्नील जोशी

दिग्दर्शक अजय नाईक

निर्माता एकनाथ जावीर

अभिनेता पुष्कर श्रोत्री

अभिनेता तुषार कपूर
पुण्याची मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे
अभिनेत्री पूजा पवार
मोदींचा अवमान सहन करणार नाही – फडणवीस ; गडकरी
नागपूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडिलांचाही अवमानकारक उल्लेख करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या या वर्तनाला महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.तर नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा भाजप नेते नितीन गडकरी यांनी हि दिला आहे
भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी सकाळी नागपुरात मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ‘कोणावरही व्यक्तिगत हल्ले करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भारताच्या पंतप्रधानांच्या वडिलांचा अनादरपूर्वक उल्लेख करणे हे अयोग्यच आहे. शिवसेनेच्या या उद्योगांना भाजपने उत्तर देण्याचे गरज नाही, जनताच त्यांना काय द्यायचे ते उत्तर देईल,’ असे फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्रात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान ‘नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही. भाजप हा लाचारांचा पक्ष नाही. तुम्हाला आमचा सन्मान करणे जमत नसेल तर अपमान तरी करू नका,’ अशा शब्दांत भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला सुनावले आहे.
ऊठ मर्हाठ्या ऊठ, ‘उंदीर’ म्हणणा-यांना धडा शिकव- उद्धव ठाकरे
पुणे- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतील सगळा रोख भाजपविरोधी व मराठी अस्मिता जागवणाराच आहे. ‘‘होय, मी जबाबदारीपासून पळणार नाही. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. एक सामान्य माणूस जर का पंतप्रधान बनू शकतो तर जनतेने ठरवले तर ‘ठाकरे’ मुख्यमंत्री का नाही बनू शकणार? असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणून हिणवणार्यांना जनता पूर्ण गाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही. ही लढाई शिवसेना महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून जिंकणारच आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’साठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. जी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता, दिल्लीपुढे कदापी झुकणार नाही असा रोख ठेवत मराठी माणसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे हि मुलाखत ? – जशीच्या तशी वाचकांसाठी देत आहोत ।
प्रश्न- ही लढाई नक्की कुणाबरोबर आहे? कारण महाराष्ट्रात महाभारत सुरू आहे.
उद्धव- युद्ध जर का आपण मानलं तर राजकीय युद्ध हे राजकीय पक्षांबरोबर आहे. राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांशी आणि खासकरून महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे.
प्रश्न- म्हणजे काय?
उद्धव- महाराष्ट्राच्या अस्मितेला आजपर्यंत जे कोणी उंदीर म्हणाले, त्यांचा पूर्ण नि:पात महाराष्ट्राने केलेला आहे. पुन्हा एकदा बर्याच वर्षांनंतर कुणाचे तरी धाडस हे महाराष्ट्राला उंदीर म्हणायचं झालेलं आहे आणि तो जो राग आहे तो मला पावलोपावली दिसत होता. सभेतील गर्दीतून ज्या काही घोषणा होत होत्या त्या घोषणा अंगावरती रोमांच उभ्या करणार्या होत्या. लोक पेटलेत आता. महाराष्ट्राचा अपमान कधीच सहन केला जात नाही.
म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे चित्र दिसलं. संपूर्ण महाराष्ट्र अपमानाविरोधात एकवटला होता.
प्रश्न- होय. तसाच महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मुळात महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणण्याचं हे धाडस झालंच कसं?
उद्धव- याचं कारण ज्यांना महाराष्ट्राच्या शौर्याची कल्पना नाही. तेच असं धाडस करू शकतात. मध्ये असं बोललं गेलं की, शिवाजी महाराज ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. त्याच बरोबरीने आमचे शिवाजी महाराज म्हणजे बाजारात उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाही की कधीही जावा आणि विकत घ्यावा. पैसे फेकावे आणि विकत घ्यावा असा उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाहीय. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या रोमारोमांत भिनलेला एक विचार आहे. एक तेज आहे आणि शिवाजी महाराज हे दैवत आहेत.
प्रश्न- पंचवीस वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटली
उद्धव- तुटली नाही, भाजपने ती तोडली.
प्रश्न- हे आपल्यासाठी वेदनादायक आहे काय?
उद्धव- नक्कीच. मी परवाच्या सभेत अटलजींच्या चार ओळी ऐकवल्या. ती एक भावना होती, युतीच्या मागची. त्या युतीच्या मागे खुर्च्यांचे राजकारण नव्हते. सत्तेची स्वप्नं नव्हती. आपला देश, हिंदुत्व, महाराष्ट्र या एका पवित्र भावनेतून झालेली ती युती होती. त्याच्यामध्ये कधी सत्तेचे खेळ आणि चाळे हे लक्षात घेतले गेले नव्हते. आता पिढी बदललेली आहे. माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप झाले. ठीक आहे नं. घराणेशाहीबरोबर घराण्याची परंपरा जी आहे, जो वारसा आहे तो मी पुढे चालवतोय आणि ते संस्कार घेऊन मी पुढे चाललेलो आहे. अशावेळेला आता जो बुद्धिबळाचा खेळ सुरू झालेला आहे तो क्लेशदायक आहे.
दोन-पाच जागांसाठी ‘महान’ महायुती तुटावी हेसुद्धा क्लेशदायकच आहे.
प्रश्न- होय, पण दोन-पाच जागा नक्की कुठून मोजणार तुम्ही? मोजायला कुठून सुरुवात करणार? १८ जागा दिल्यानंतर पुन्हा दोन-पाच जागा हव्यात. म्हणजे पंचविसेक जागा द्यायच्या आम्ही. आधी तर ते ३४ जागा शिवसेनेकडून मागत होते. शेवटी शिवसेना ही शिवसेना आहे हो.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
उद्धव- शिवसेना ही शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून, शिवसैनिकांनी रक्त सांडून, मर मर मेहनत करून, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे. कुणाला गुलाम म्हणून किंवा बटीक बनून राहण्यासाठी शिवसेनेची निर्मिती नाही झालेली. आम्ही तुमचे मित्र बनून राहू इच्छित होतो, गुलाम बनून नाही राहणार. मित्र म्हणाल तर मैत्रीसाठी आम्ही काहीही करू. प्रेमाखातर काही करू पण बटीक बनून गुलाम म्हणून फक्त सत्तेसाठी आम्ही तुमची पालखी वाहणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही.
प्रश्न- मित्रच जेव्हा शत्रू बनून उभा ठाकतो व वार करतो तेव्हा तुमची भूमिका काय असते?
उद्धव- दुर्दैव आहे, पण शेवटी लढाई तर जिंकायलाच पाहिजे. आजपर्यंत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संकटकाळात सांभाळलं. पंचवीस वर्षे फक्त संकटं आणि संकटंच झेलली. मग ते तुमचे चांगले दिवस. ‘अच्छे दिन’ फार थोडे आले वाट्याला. साडेचार वर्षांचं राज्यातलं सरकारसुद्धा ओढाताणीचं सरकार होतं. केंद्रामध्ये अटलजींचं सरकार होतं तेव्हा चांगली अशी युती होती. बर्याचदा अटलजींचे फोन यायचे बाळासाहेबांना. मग बाळासाहेब फोन करायचे अटलजींना. प्रत्येक वेळेला काही कामच नव्हती. एका उंचीवरची ती नेतेमंडळी होती. एकमेकांशी विचारपूस आणि विचारविनिमय व्हायचा. सल्लामसलत व्हायची. शिवसेनाप्रमुख कधी दिल्लीला गेले नव्हते, पण अटलजी कधीही त्यांना फोन करीत होते. ते एक वेगळं नातं होतं.
प्रश्न- तुम्हाला आज अटलजी आणि आडवाणी यांची आठवण येते का?
उद्धव- येतेच ना. आज दुर्दैवाने अटलजी तर कारभार पाहू शकत नाहीत. आडवाणींकडे आता काय कारभार शिल्लक राहिलाय मला त्याची कल्पना नाही, परंतु युतीची बोलणी ज्यावेळा युती तुटण्याच्या दिशेने जाताहेत अशी लक्षणं दिसायला लागली तेव्हा मी आडवाणीजींना फोन केला. त्यांना मी सांगितलं की, आडवाणीजी जिस तरीके से बातचीत चल रही है, मुझे नहीं लगता की बीजेपी युती कायम रखना चाहती है. तर ते पण उडाले. म्हणाले, नहीं नहीं शिवसेना के साथ तो युती बने रहना चाहिए. कौन कर रहा है आप से चर्चा? मैं किसके साथ बात करू? मी म्हणालो, आडवाणी साब मैंने आपको परेशान करने के लिए फोन नही किया है। फक्त मी एवढंच सांगायला फोन केलाय की, दुर्दैवाने असं घडलंच आणि जर का भाजपने युती तोडली तर आप मुझे माफ करिए. आप लोगों ने बनायी हुई ‘युती’ मैं आगे नहीं ले जा सकता आणि दुर्दैवाने तसंच घडलं.
परश्न- का घडलं? हा प्रश्न आहेच.
उद्धव- भाजपने युती तोडली. कारण काय हे त्यांचं त्यांनाच माहीत. कदाचित त्यांना महाराष्ट्र तोडायचा असेल. त्यांना असं वाटलं असेल की आता केंद्राप्रमाणे इकडेही आपलं एकहाती सरकार येतेय. आपण बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्राची फाळणी करू. विदर्भाचा तुकडा पाडू. अशा वेळेला सरकारमध्ये शिवसेना नसलेली बरी, असं त्यांना वाटलं असेल. पण आता त्यांच्या लक्षात आलंय की त्यांचं सरकार येतच नाही. अखंड महाराष्ट्र टिकविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेलाच मतदान करेल.
प्रश्न- बाळासाहेबांची कमतरता जाणवतेय का?
उद्धव- मी नेहमीच सांगतोय की, कमतरता ही केवळ शिवसेनाप्रमुख म्हणून नाही तर आई-वडील हे आईवडील असतात. प्रत्येक मुलाला ही त्याच्या आईवडिलांची कमतरताही जाणवतेच. लढताना आता मला कमतरता जाणवत नाही. कारण त्यांनी मला पुरेसे आशीर्वाद दिले आहेत, पण आज जे धाडस मी केलेलं आहे, जो स्वाभिमान मी दाखवलेला आहे, तो बघायला ते हवे होते हे नक्कीच. मला आतून असं वाटतंय की त्यांनासुद्धा आपल्या पुत्राचा अभिमान वाटला असता की, हा झुकला नाही. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलं. मैत्रीसाठी वाट्टेल ते करीन, पण मी झुकणार नाही. तोच बाणा कायम ठेवून मी पुढे चाललेलो आहे. आणि त्यांना अभिमान वाटला असता की आपली शिवसेना आपला पुत्र अशीच पुढे नेतोय.
प्रश्न- भारतीय जनता पक्षाचे अनेक मित्र होते ते दूर झाले.
उद्धव- दूर झाले की गरज संपल्यावर दूर केले? ते पहा.
प्रश्न- होय. दूर केले, पण भाजपशिवाय त्यांनी एकाकी लढून राज्याराज्यात स्वबळावर सत्ता आणली.
उद्धव- बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तशीच एकहाती सत्ता महाराष्ट्रात शिवसेना मिळविणार आहे. महाराष्ट्रात मला तेच चित्र दिसतंय.
प्रश्न- एकाकी लढण्याचा रोमांचक अनुभव तुम्ही घेताय.
उद्धव- होय, नक्कीच हा मोठा अनुभव आहे. हे मी संकट नाही मानत, तर संधी मानतोय. नवीन पटनायकांनी तर पाच-दहा वर्षांपूर्वीच भाजपशी युती तोडलीय. असेच चाळे भाजपने त्यांच्याशी केले. युती तोडून पटनायकांनी ओडिशा काबीज केले. आतासुद्धा ऐन मोदी लाटेत ते पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आले. ममता असतील, जयललिता असतील, मायावती असतील. हार-जीत झालीय. जयललिता आता तुरुंगात आहेत. मायावती आता हारल्यात. पण आधी मायावती एकट्याच लढल्या ना. ममता एकट्याच लढल्या, पण त्या महिला असून जिंकलेल्या आहेत. चंद्राबाबू आज पंधरा वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आले. त्यांचे राजकारण असे चाललंय की प्रादेशिक पक्षांना नाहीसे करायचं.
प्रश्न- म्हणजे राज्याची अस्मिताच नष्ट करायची.
उद्धव- राज्यांची अस्मिता नष्ट करायची आणि दिल्लीतून कठपुतळ्यांसारखी माणसं नेमून दिल्लीतून केंद्रशासित असल्याप्रमाणे राज्यांचा कारभार करायचा. अशा दिशेने यांची पावलं पडत आहेत.
प्रश्न- कॉंग्रेसचे हेच धोरण होतं. राज्यातील नेत्यांना मानायचे नाही.
उद्धव- संपवूनच टाकायचं. कठपुतळीचे खेळ दिल्लीत बसून करायचे. त्यांना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या कठपुतळ्याच पाहिजेत.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल?
उद्धव- महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. शिवराय आणि बाळासाहेबांच्या विचाराने भारलेली आहे. भीमशक्ती सोबत आहे. कारण डॉ. आंबेडकर हे तर दैवतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र वेड्यावाकड्या दिशेने जाणार नाही. एकही भगवं मत फुटणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईल. अनेकजण मला विचारताहेत की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे काय? माझ्या कसल्या अस्तित्वाची लढाई? मी उभा राहिलोय तो महाराष्ट्राच्या जनतेच्या भरवशावरती उभा राहिलोय. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानांसह इकडे प्रचार करून गेले. आता कोण कुठे कुठे गेलेत ते फोन करून बघा. महाराष्ट्राच्या अडल्यानडल्याला पुन्हा इकडे येतात काय पहा. कोणीही येणार नाही. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा कोणी येत नाही. संकट येतं तेव्हा कोणी येत नाही. येतात आणि आपले घोड्यावर बसून निघून जातात. परंतु आपण इथलेच आहोत. शिवसेनेला थोडीथोडकी नाही तर ४८ वर्षं झालेली आहेत. शिवसेना हा इथल्या मातीत जन्माला आलेला पक्ष आहे. तो कोणत्याही पक्षातून तुटून फोडून शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला नाही. मराठी माणसांच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी जन्माला आलेला हा पक्ष आहे. अशा वेळेला जे आपल्या अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या मुळावर येताहेत, विकासाच्या बुरख्याआडून महाराष्ट्र तोडण्याची स्वप्नं घेऊन येताहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल.
रश्न- मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांबरोबर इतर भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषत: गुजराती बांधव.
उद्धव- होय. गुजराती बांधव, माता-भगिनी आमच्याबरोबर आहेतच. गुजराती तर आहेतच. मारवाडी, जैन, शीख समाज, हिंदी भाषिक. शीख समाज तर संपूर्णपणे घरी आला होता. त्यांचे ते पुजारी येऊन त्यांच्या भाषेत प्रार्थना करून त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. युती तोडली हे गुजराती बांधवांना आवडलेलं नाहीय. हिंदुत्वासाठी ते ठीक झालं नसल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी मला वचन दिलंय, ‘साब आप चिंता मत करिए, मुंबई में तो हमे शिवसेना चाहिए.’ याचं कारण असं की मोदींना मराठी माणसानं पण मतं दिलीत. मोदींना मीसुद्धा मत दिलंय. तुम्हीसुद्धा मत दिलंय. त्यावेळेला आपण हे बघितलं नाही की गुजराती, मराठी. ते काही जरी असलं तरी येथील गुजराती समाजातील भावना आहे की, आम्हाला शिवसेनाच पाहिजे. कारण मुंबईत आम्हाला फक्त शिवसेनाच मदतीला येते. बर्याच ठिकाणी ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजसुद्धा मला पाठिंबा देतोय. हे एक वेगळं घडतंय यावेळेला.
प्रश्न- तुमचं मिशन काय?
उद्धव- माझं मिशन महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य बनवणं. ते व्हिजन मी दाखवलेलं आहे. माझं तर आव्हान आहे. इतर सर्व पक्षांनी त्यांचे जे काही जाहीरनामे असतील, दृष्टीपत्रे असतील. घेऊन माझ्यासमोर यावं. मी त्यांच्यासोबत येतो. जनतेसमोर जाऊ. मी माझ्या तयार असलेल्या योजना दाखवतो. तुमच्या तयार असल्याच तर योजना दाखवा. एकही गोष्ट अशी नाही की मी जी हवेत बोललेलो आहे.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचंय.
उद्धव- ही त्यांची इच्छा! शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही.
प्रश्न- पण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले पाहायचेत.
उद्धव- आजपर्यंत असं म्हटलं जातंय की ठाकरे घराण्यात कोणी निवडणूक लढलेलं नाही. बरोबर आहे ते. पण ठाकरे कधी जबाबदारी सोडूनही पळालेले नाहीत. त्यामुळे जनता ही सर्वोच्च आहे. सर्वसामान्य माणसाची ताकद फार मोठी आहे. याच सामान्य माणसाने अनेकांना सत्तेवर बसवले आणि सत्तेवरून उतरविलेदेखील आहे. जनतेचे पाठबळ मिळाले तर सामान्य माणूसही लोकशाहीत सर्वोच्चपदी बसू शकतो. नरेंद्र मोदी यांनी जीवनाची सुरुवात चहा विकण्यापासून केली. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तरीही त्यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली ती सामान्य माणसाच्या पाठबळावरच. या देशाने कष्टकर्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. शिवसेनादेखील कष्टकरी-कामकर्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी-कामकरी जनतेनेही शिवसेनेला नेहमी भरभरून प्रेमच दिले आहे. आताही महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या बाजूने उभी राहणार याविषयी आम्हाला खात्री आहे. सामान्य माणसातून आलेल्या नरेंद्र मोदींना याच जनतेने पंतप्रधान केले. तेव्हा जनतेने ठरवले तर ठाकरे मुख्यमंत्री का नाही बनू शकणार?
पुण्याजवळ हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले-जिवीतहानी टळली
पुणे- पुण्याजवळ थेऊर परिसरातील कोलवडी गावाच्या हद्दीत आज सायंकाळी पाचच्या सुमारास भारतीय हवाईदलाचे सुखोई विमान कोसळले.या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असला तरी वैमानिकांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले आहे.
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५ च्या सुमारास हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोई विमानाने उड्डाण केले होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून विमानाचे उड्डाण झाले होते. मात्र थेऊर परिसरात गेल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. विमान कोसळत असल्याचे कळताच वैमानिकांनी पॅरॉशूटच्या मदतीने विमानाच्या बाहेर उड्या मारल्या . त्यानंतर थोड्याच वेळात विमानाला मोठी आग लागली. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. सुखोई -३० एम के इ या लढाऊ प्रकारातील हे विमान आहे.
डॉ. मोहन धारिया ही एक संस्था होती – डॉ. शंकर अभ्यंकर
पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी केलेल्या वनराईच्या वटवृक्षाच्या छायेत अनेक माणसेविसावली आहेत, अशा भावनाविद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केल्या.
मंगळवार दि. १४ ऑक्टोबर, रोजी वनराई कार्यालयाच्या इको हॉल सभागृहात डॉ. मोहन धारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली सभा पार पडली. यावेळी डॉ. मोहन धारियालिखीत ‘तेथेकर माझेजुळती’ या पुस्तकाचेप्रकाशन डॉ. शंकर अभ्यंकर झाले. डॉ. मोहनधारिया यांच्या प्रथम स्मृतिदिनी हेपुस्तक प्रकाशित करून डॉ. मोहन धारिया यांचा ‘मरावेपरीकीर्तीरूपी उरावे’ हा विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न वनराईनेकेला. यावेळी अभ्यंकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचेकुलगुरूडॉ. दीपक टिळक होते. कॉंग्रेसचेजेष्ठ नेतेउल्हास पवार, आ. मोहन जोशी, उपमहापौर आबाबागुल, डॉ. शां. ब. मुजूमदार, डॉ. के. एच संचेती, डॉ. विनोद शहा, वनराईचेअध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त रोहीदास मोरे, डॉ. विजय देव, ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, जितेंद्र गोस्वामी, प्रभाकर करंदीकर, विजय सावंत बहारी मलहोत्रा आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, डॉ. धारियांचे व्यक्तिमत्व राजस होते. त्यांचे व्यक्तिमत्वपाहिल्याबरोबर आदर करावा असेहोते. त्यांचेअंत:रंग पराकोटीचेसात्विक होते. राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेली माणसे आपल्या विशिष्ट विचारधारेच्या पलीकडे जातनाहीत; परंतुप्रत्येक विचारधारेमध्येकाहीतरी चांगलेअसतेअशी डॉ. धारिया यांची भावना होती. इतर विचारधारेतलेव आपल्या विचारधारेतलेचांगलेघेवून त्यातून समाजपयोगी कामेकरावीतअसा त्यांचा विचार होता. विश्लेषणात्मक चरित्र व चारित्र्य ते मांडायचे. त्यांचे चिंतन हेसर्वस्पर्शी व सर्वव्यापी असायचे, असेगौरोद्गार डॉ. अभ्यंकर यांनी काढले. त्यांच्यासारखी निस्पृह माणसेसमाजात फार कमी आहेत त्यामुळेनीतिमत्तेचा ह्रास होत चाललाआहेअशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजसत्तेचा मोह कुणाला सुटत नाही परंतुडॉ. धारियांनी तोसोडला. तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी व खेडी स्वायत्त करण्याचा ध्यास त्यांनीघेतला.
डॉ. दीपक टिळक म्हणाले, डॉ. धारीयांच्या समोर नतमस्तक व्हावे असे त्यांचेआयुष्य होते. पर्यावरणाच्या संदर्भातील त्यांचेविचार हेमूलगामी होते. आचार, विचार व उच्चार या तीनहीगोष्टी एकत्रित असणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. डॉ. धारियांच्यामध्ये या तीनही गोष्टीसारख्याच होत्या. राजकारण सोडल्यानंतर त्यांनी झपाटल्यासारखेस्वत:ला वनराईच्या कार्यातझोकून दिले. लोकसंग्रह हा लोकहिताचा आहेहेजाणून त्यांनी ज्ञानपूर्वक, लोकहितवादी कामेनिस्वार्थपणेकेली.उल्हास पवार म्हणाले, उपेक्षित, वंचित, दलित समाजाचे पुनरुत्थान हा डॉ. धारियांच्याजीवनाचा महत्वाचा भाग होता. राजकीय नितीमुल्येकशी जपावी याचा आदर्श त्यांनी घालून दिला. तर डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, सर्वांना एक आयुष्य व्यवस्थित जगलेतर त्यामध्येधन्यतावाटते. मात्र, डॉ. धारिया यांचा जीवनपट मांडताना ते एकाचवेळी राजकारणी, समाजकारणी वपर्यावरणीय धारिया असेजीवन एकाच जन्मात जगले. एकाआयुष्यात अशा तीन क्षेत्रात काम करणेफार कमी लोकांना जमते. त्यांची आयुष्याची कृतार्थताया तीन गोष्टीमध्येच आहेअसेही तेम्हणाले. यावेळी डॉ. विजय देव, डॉ. सतीश देसाई, जेष्ठपत्रकार एस. के. कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, जितेंद्र गोसावी, डॉ. शैलेश गुजर
यांनीही डॉ. धारियांच्या आठवनींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचेप्रास्ताविक श्रीराम गोमरकर यांनी, सूत्रसंचालन प्रकाश जगताप तर आभार किशोर धारिया यांनीमानले.
आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपयांची मदत -मोदी
विशाखापट्टणम – ‘हुद हुद ‘ या चक्रीवादळाने विशाखापट्टणम येथे झालेल्या नुकासानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ते आज (मंगळवार) येथे दाखल झाले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन, मुख्यमंत्री एन चंद्राबाबु नायडू, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, अशोक गजपती राजू व इतरांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटूंबीयांसाठी 2 लाख रुपये; तर जखमींसाठी मदत म्हणून 50 हजार रुपयांच्या रकमेची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. “या संकटसमयी केंद्र सरकार आंध्र प्रदेशबरोबर आहे,‘‘ असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांना नौदलाचे वरिष्ठ अधिकारी वाईस ऍडमिरल सतीश सोनी यांनी यावेळी चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम येथील विमानतळाच्या झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यानंतर शहरामध्ये या वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मोदी हे मुख्यमंत्र्यांसमवेत रवाना झाले. विशाखापट्टणम स्टील कारखान्याला या वादळाचा मोठा फटका बसला असून, गेल्या पाच दिवसांपासून उत्पादन बंद आहे. त्यामुळे दररोजचे 40 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच विमानसेवा बंद असल्यानेही 500 कोटींचा फटका बसला आहे. याशिवाय, शहरामध्ये 40 हजार विजेचे खांब कोसळले असून, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काम सुरू आहे.
काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करणार नाही – राष्ट्रसंघ
साहीब सिंह शहीद
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. पाकने संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा मुद्दा नेला होता. पण या मुद्यामध्ये आम्ही दखल देणार नसून पाकने पुढाकार घेऊन आपसांत चर्चा करून हा मुद्दा सोडवावा असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्कराच्या एका अभियानात सोमवारी दहशतवाद्यांनी गस्त घालणा-या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यात 30 राष्ट्रीय रायफल्स जवान साहीब सिंह शहीद झाले.
एकिकडे सीमेवर भारताच्या विविध भागांत फायरिंग सुरुच आहे. त्याचवेळी काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरुच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोमवारी अमेरिकेच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाच्या भेटीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. शरीफ यांनी सिनेटर टीम केन आणि अँगस किंग यांची भेट घेतली.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, ‘नवाज शरीफ यांनी दोन्ही सिनेटरला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव हाच काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अशा प्रयत्नात काश्मीरच्या लोकांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.’ यादरम्यान, पाकिस्तानने सीमेवर पुंछच्या विविध भागांमध्ये असलेल्या चौक्यांवर फायरिंग करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. केरनी, शाहपूर आणि साब्जियामध्ये थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरुच आहे. यात एक महिला जखमी झाली आहे.भारतीय लष्करही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहे. रविवारी सकाळपर्यंत म्हणजे सुमारे 24 तास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून फायरिंग बंद होती. शनिवारी पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये फायरिंग केली होती. त्यात एक जण जखमी झाला होता. 1 ऑक्टोबरपासून पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यात 8 जण ठार झाले आहेत, तर 90 जण जखमी आहेत. फायरिंगमुळे सीमेवरील गावांत राहणा-या सुमारे 32 हजार नागरिकांना घर सोडावे लागले आहे.
अरुणा इराणीचे मराठीत पुनरागमन
आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान पटकावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी. नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विभिन्न भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने करण्याची त्याची खासियत आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्री अरुणा इराणी तब्बल २० वर्षानंतर ‘बोल बेबी बोल’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करताहेत. ‘बोल बेबी बोल’ या चित्रपटाची निर्मिती त्यांचे बंधू बलराज इराणी यांनी केली असून, दिग्दर्शन स्व. विनय लाड यांनी केलंय. कौटुंबिक धमाल नाट्य असलेल्या या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा अभिनय पहाता येणार आहे.
‘ए. वी. आर. एंटरटेनमेंट’ चे विरल मोटानी प्रस्तुत, ‘मॅजेस्टिक एंटरटेनमेंट’ चे बलराज इराणी निर्मित, ‘बोल बेबी बोल’ चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासह मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे, सिया पाटील, चतुरा मोट्टा, दुर्गेश आकेरकर, मुकेश जाधव, अर्चना गावडे, सुरेश सावंत, पीटर एरोल, दिप्ती प्रकाश, विजय चव्हाण, संतोष मयेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. अरुणा इराणी यांनी या सिनेमात दुर्गादेवी या घरंदाज स्त्रीची महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे. एक खोटे लपवताना अनेकदा आणखी खोटे बोलले जाते, त्यामधून उडणारा गोंधळ आणि त्या साऱ्यातून शेवटी समोर येणारे सत्य या कथा आशयावर या सिनेमाचे कथानक बेतलंय. चित्रपटाची कथा राजन अग्रवाल यांनी लिहिली असून पटकथा राजन अग्रवाल, स्व. विनय लाड, संजय बेलोसे यांची तर संवाद संजय बेलोसे यांनी लिहिलेत. विवेक आपटे लिखित यातील गीतांना निशिकांत सदाफुले यांनी संगीत दिलं असून आनंद शिंदे, वैशाली सामंत, संजीवनी भेलांडे, अमृता नातु, रेश्मा, राहुल सक्सेना या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. समीर आठल्ये यांनी ‘बोल बेबी बोल’ चे छायांकन केले असून कला दिग्दर्शन इजाज शेख, रवी यांनी केले आहे.
‘बोल बेबी बोल’मधील दुर्गादेवीची कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय व तितकीच कडक व्यक्तिरेखा साकारायला अरुणा इराणी यांनी मराठीसाठी खूप मेहनत घेतली आहे. २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्या मराठीत पुनरागमन करीत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयीचे कुतूहल निश्चितच वाढले आहे. येत्या ६ नोव्हेंबरला ‘बोल बेबी बोल’ हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
‘हुदहुद’मुळे विशाखापट्टणम् उध्वस्त,22 ठार; पाणी 100 तर दुधाची 80 रुपये लीटरप्रमाणे विक्री सुरू

विशाखापट्टणम – दक्षिण भारतात हुदहुद वादळाने विशाखापट्टणममध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. वादळामुळे आतापर्यंत 22 जण ठार झाले आहेत. येथे पाण्याची बाटली 100 रुपये तर दुधाची 80 रुपये लीटरप्रमाणे विक्री सुरू झाली आहे शहरातील विमानतळाची सर्वाधिक हानी झाली असून, मोबाईल आणि वीजव्यवस्था कोलमडली आहे.
रुग्णालयांत वादळातील पिडितांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच रोजच्या जीवनावश्यक वस्तु मिळवण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी विशाखापट्टणमचा दौरा करीत आहेत. पाहणी केल्यानंतर मोदी एक आढावा बैठक घेणार असून विशाखापट्टणमचे पुर्वसन करण्याबाबतची रुपरेषा मोदींसमोर मांडली जाणार आहे.\शक्यतेच्या तुलनेत या वादळामुळे कमी प्रमाणात नुकसान झाले. त्याचे कारण म्हणजे हवामान विभागाने अत्यंत तंतोतंत माहिती दिली होती. हवामान विभागाचा याबाबतचा अंदाज नासापेक्षाही तंतोतंत ठरला. नासाने 10 ऑक्टोबरला दिलेल्या माहितीत, वादळ 12 ऑक्टोबरला आंध्रच्या किनारपट्टीवर येणार असे सांगितले होते. पण निश्चित स्थळाबाबत काहीही सांगण्यात आले नाही. तसेच वादळ ताशी 185 किमी वेगाने येईल आणि फायलीन वादळाप्रमाणे त्याचे स्वरुप असेल असेही नासाने म्हटले होते. त्याउलट हवामान विभागाने 6 ऑक्टोबरलाच याबाबत माहिती दिली होती. तर 10 ऑक्टोबरला हे वादळ विशाखापट्टणच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे सांगितले होते. हवेचा वेग ताशी 195 किमी असेल असे सांगितले होते. तसेच फायलीनएवढी तीव्रता नसेल असेही सांगण्यात आले होते.
मोदींचा महाराष्ट्राच्या मातीवर काहीएक हक्क नाही—प्रदीप जैन
पुणे- देशातील जनतेला खोटेस्वप्नेदाखवून व खोटेबोलून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा महाराष्ट्राच्या मातीवर काही एक हक्क नाही अशी टीका कॉंग्रेसचेमाजी केंद्रींय मंत्री प्रदीपजैन यांनी काल येथे केली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचेपरिवर्तन अभय छाजेड यांच्या ऐतिहासिक विजयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पर्वती विधानसभा मतदारसंघाचेकॉंग्रेस-पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडेगटाचेउमेदवार अॅड. अभयछाजेड यांच्या दि १३ रोजी झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेमध्येजैन बोलत होते. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचेसचिवव महाराष्ट्राचेसह्प्रभारी श्यौनक वाल्मिकी, आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेशकॉंग्रेस कमिटीच्या सचिव प्रा. मनीषा पाटील, अभय छाजेड, नरेंद्र व्यवहारे, शिवा मंत्री, नीता परदेशी, बालाजी तेलकर, महेश वाबळे, प्रकाश आरणे,रवी ननावरे, द.स.पोळेकर, बालाजी तेलकर, अमित बागुल आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
जैन म्हाणाले, मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर परदेशातील काळा पैसा परत आणू, महागाई कमीकरू, ३ महिन्यात ३५ लाख बेरोजगारांना रोजगार देवूअशी खोटी आश्वासनेदिली. त्यापैकी एकहीगोष्ट झालेली नाही. मोदी हेमहाराष्ट्राचेविभाजन होवूदेणार नाही असेसांगतात तर नितीन गडकरी वेगळा विदर्भाच्या घोषणा करतात. भाजपा हा जनतेला भडकावणारा पक्ष आहेहेउत्तरप्रदेशच्यानिवडणुकीत सर्वांनी पाहिलेआहे. मतांची विभागणी करणेहा एकमेव उद्देश त्यांचा असतो. तो सर्वांनीओळखला पाहिजे. पुण्यानेमोठ्या मताधिक्यानेभाजपचा खासदार निवडून दिला, असेअसताना
पुण्याची मेट्रो सारख्या विकासकामांच्या बाबतीत त्वरित निर्णय घेवून ती कामेमार्गी लागायलाहवी होती पण तेहोताना दिसत नाही. महाराष्ट्रात, आणि पुण्यात आयटी, ऑटोमोबॅईल उद्योग व इतरउद्योग ही कॉंग्रेसची देन आहेअसेसांगून जैन म्हणालेमोदी यांचा गोरा चेहरा खोटेबोलून मार्केटिंगकरीत आहे. त्याउलट आमचेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा आहे. त्यांच्याकडेकोणीही बोट दाखवूशकत नाही. नगरसेवक व शहराध्यक्ष म्हणून अभय छाजेड यांनी शहराच्याविकासाठी अनेक कामेकेली हेसर्वांना माहिती आहे. त्यामुळेत्यांच्यामागेसर्व कार्यकर्त्यांनी उभे
राहून त्यांना प्रचंड मताधिक्क्यानेविजयी करण्याचेआवाहन त्यांनी केले. श्यौनक वाल्मिकी म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेकायदेकेलेतेतोडण्याचीभाषा मोदी करीत आहेत. मात्र त्यांना महाराष्ट्रातील जनता मतदानाच्या माध्यमातून धडाशिकविल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा सर्वात मोठा शत्रूहा नरेंद्र मोदी आहेत. मुंबईमहाराष्ट्राचेहृदय आहे, त्याची धडधड थांबली तर महाराष्ट्र संपेल असेसांगतानाच नरेंद्र मोदी
हेखोट्यांचा सरदार आहेत अशी टीका त्यांनी केली. ज्या देशात खाण्यासाठी दोन वेळची रोटी वघालण्यासाठी लंगोटी नव्हती त्यादेशात मोदींसारख्याकडेमोठमोठ्या गाड्या आल्या त्या कोठूनआल्या असा सवाल करीत वाल्मिकी यांनी कॉंग्रेस नसती तर भारतातील जनता ही गुलामगिरीतच
राहिली असती असेनमूद केले. दलीतांपैकी ना कोणी मुख्यमंत्री, ना कोणी कलेक्टर झाला असता अशीटिप्पणीही त्यांनी केली.












